पूर्वपीठिका - १
१९९० च्या दशकात खेळलेल्या काही कसोटीपटूंची फलंदाजीतील सरासरी :
| सचिन तेंडुलकर ५३.७८ |
राहुल द्रविड ५२.३१ |
| मो.अझरुद्दीन ४५.०३ |
स्टीव्ह वॊ ५१.०६ |
| ब्रायन लारा ५२.८८ |
ग्रॅहम गूच ४९.६६ |
| जॅक कॅलिस ५५.३७ |
अरविंद डिसिल्वा ४२.९७ |
| रिकी पॉन्टिंग ५१.८५ |
अँडी फ्लॉवर ५१.५४ |
पूर्वपीठिका - २
प्रसंग : क्रिकेट वर्ल्डकप १९९६ - उपांत्य फेरी सामना
निमित्त : भारत विरुद्ध श्रीलंका, १३ मार्च १९९६
स्थळ : ईडन गार्डन, कोलकाता

आता, वरच्या यादीत एक खेळाडू असायला हवा, ज्याची सरासरी ५४.२० होती. म्हणजे समकालीन फलंदाजांमध्ये केवळ जॅक कॅलिस त्याच्या पुढे होता.
एकवीस वय असताना कसोटीत पदार्पण केलेल्या या खेळाडूने पहिल्या सात सामन्यात दोन द्विशतके व दोन शतके अशी जबरदस्त कामगिरी केली होती.
तरीसुद्धा कारकिर्दीच्या तीन वर्षात त्याला केवळ १७ सामने खेळायला मिळाले. ज्यात त्याने ५४.२० ची सरासरी नोंदवली. सर्वकालीन कसोटी फलंदाजी सरासरीमध्ये हा खेळाडू एकोणिसाव्या क्रमांकावर आहे.
दुर्दैवाने त्याची कसोटी कारकीर्द सतरा सामने खेळून केवळ पस्तीस महिन्यात संपली.
विनोद कांबळी

प्रेक्षणीय फटके, flamboyant व्यक्तिमत्व आणि सोन्याच्या दागिन्यांची आवड.... espncricinfo साईटवर त्याच्या प्रोफाइलमध्ये लिहिल्याप्रमाणे विनोद कांबळी हा 'वेस्ट इंडिया'चा कमी आणि 'वेस्ट इंडीज'चा खेळाडू जास्त वाटायचा.

विनोद कांबळीचा विषय निघाला की सचिन तेंडुलकरचा उल्लेख होतोच. विशषेतः त्या दोघांनी हॅरिस शिल्ड स्पर्धेत केलेल्या ६६४ धावांच्या भागीदारीचा. सोळाव्या वर्षी सचिन रणजी खेळू लागला आणि वर्षभरात विनोदसुद्धा. विनोदचं रणजी पदार्पण पहिल्या बॉलवर षटकार लगावून झालं, हा योगायोग नक्कीच नसावा. लवकरच सचिनला पाकिस्तान दौऱ्याची संधी मिळाली आणि तिथे पाकिस्तानी तोफखान्याला तोंड देणारा मुलगा म्हणून सर्वांच्या नजरेत सुद्धा आला. त्यावेळी विनोदची निवड एकोणीस वर्षाखालील संघात झाली होती. युवा आशिया कप स्पर्धेत त्याचे संघ सहकारी अजय जडेजा व सौरव गांगुली होते. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मात्र विनोदला अजून काही काळ थांबावं लागलं. १९९१ मध्ये शारजामध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने एकदिवशीय सामन्यात पदार्पण केलं, पण त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. १९९३ सुरु होताना विनोदने कसोटीत पदार्पण केलं. इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील पहिली कसोटी. पहिल्या सामन्यात विनोदने काही उल्लेखनीय केलं नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यानं अर्धशतक केलं. तिसऱ्या सामन्यात त्याने थेट द्विशतक झळकावत २२४ धावा तडकावल्या!!! तर पुढच्याच म्हणजे कारकिर्दीच्या चौथ्या सामन्यात त्याने २२७ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या व चौथ्या सामन्यात तो दहा वर्ष अबाधित असलेला सुनील गावस्कर यांचा एका डावातील सर्वाधिक धावांचा (२३६) भारतीय विक्रम मोडण्याच्या इतका जवळ आला होता.

लवकरच सहाव्या व सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन शतके झळकावून त्याने आपल्यात सार्वकालीन महान फलंदाजाची गुणवत्ता असल्याचं सिद्ध केलं. हे सर्व घडलं त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या केवळ आठ महिन्यात! त्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत त्याने अजून दोन अर्धशतकं केली. विनोदची कारकीर्द सुरु होऊन तेरा महिने झाले होते. त्याची कसोटी कामगिरी अशी होती:
- १० कसोटी सामने (खरं तर ९. एका सामन्यात पावसामुळे एकूण केवळ बारा षटकांचा खेळ होऊ शकला होता)
- ११ डाव
- ९३७ धावा
- ९३.७० सरासरी

त्यानंतर विनोदाचे पुनरागमन अशक्य झाले. आणि अभूतपूर्व म्हणावी अशी सुरुवात झालेली एक कारकीर्द अपयशाच्या पायरीवर संपली. आकडे दाखवतात कि विनोद कांबळी हा एक महान खेळाडू होता. पण खरं तर तो महान होता होता राहून गेला. सांख्यिकीविषयी असं म्हटलं जातं की statistics reveal a lot but not everything. किंवा आकडे खूप काही दाखवतात पण सर्वकाही नाही. या विधानाचं 'विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द ' इतकं चांगलं उदाहरण क्वचितच मिळेल.

संदर्भ :
https://www.espncricinfo.com/player/vinod-kambli-30009 https://en.wikipedia.org/wiki/Vinod_Kambli https://wisden.com/stories/podcast/vinod-kambli-what-went-wrong-with-sa… https://www.cricketcountry.com/articles/when-vinod-kambli-featured-alon…
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम लेख!
उत्तम लेख.
+२
In reply to उत्तम लेख. by प्रचेतस
हो. हा त्यांचा लेख वाचलेला
In reply to +२ by तुषार काळभोर
वाया गेलेले टॅलेंट.
वाया गेलेले म्हणण्यापेक्षा
In reply to वाया गेलेले टॅलेंट. by ॲबसेंट माइंडेड…
चला मिपावर याचा सत्कार झाला हे एक उत्तम झालं
फार कठिण परिस्थीतीला सामोरा
In reply to चला मिपावर याचा सत्कार झाला हे एक उत्तम झालं by गॉडजिला
फार कठिण परिस्थीतीला सामोरा गेला बिचारा…ती परिस्थिती त्यानी स्वतःच आणली होती. लेख आवडला.मला हेच कळत नाही भारतीय खेळाडु पडतात तरी कमी कुठे
In reply to फार कठिण परिस्थीतीला सामोरा by रंगीला रतन
कौटुंबिक आर्थिक पार्शवभूमी हे
In reply to मला हेच कळत नाही भारतीय खेळाडु पडतात तरी कमी कुठे by गॉडजिला
ओके थोडक्यात
In reply to कौटुंबिक आर्थिक पार्शवभूमी हे by रंगीला रतन
मस्त लेख!
वा !
काही आकडेवारी चुकलीये.
१९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील चार डावात त्याने चार शतके केली.दोन सामन्यातील चार डावात ४ शतके म्हणजे सलग ४ डावात शतके झाली. आकडेवारी अशी आहे की तो ४ नसून ३ डाव खेळला होता व १२५,४ व १२० अशा धावा केल्या होत्या.साल १९९४. वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील सहा डावात विनोदने चार अर्धशतके केली.या मालिकेत कांबळी तीनही कसोटीत प्रत्येकी फक्त १ डाव खेळला व त्यात ५, ८२ व ५७ अशा धावा केल्या होत्या. अर्थात कांबळीची कसोटी कारकीर्द खूप लहान असल्याने आकडेवारीतील या चुका किरकोळ आहेत. त्याची चार शतके ही भालत व श्रीलंकेत (म्हणजे भारतीय उपखंडात) आहेत. भारतीय उपखंडाबाहेर तो फक्त न्यूझीलंडमध्ये १ कसोटी खेळलाय व तेथे तो फारसा यशस्वी नव्हता. इंग्लंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशात तो खेळलेला नाही. त्याच्या २१ कसोटी डावांपैकी फक्त ५ भारताबाहेर आहेत. म्हणजे त्याच्या फलंदाजीतील बहुसंख्य धावा भारतीय खेळपट्ट्यांवर केल्या आहेत. वेगवान परदेशी खेळपट्ट्यांवर तो खेळला असता तर त्याचा कस लागला असता. त्यामुळे मी त्याला महान फलंदाज, सचिनपेक्षा चांगला फलंदाज वगैरे मानत नाही. कांबळी खूप गरीब किंवा सामान्य घरातून पुढे आला होता. जरी तो व सचिन एकाच शाळेत शिकले असले, एकाच प्रशिक्षकाकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले असले तरी दोघांच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे. सचिन मध्यमवर्गीय सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबातुन आला होता. त्याच्यावर सुशिक्षित मध्यमवर्गीय संस्कार झाले होते. प्राध्यापक असलेले वडील व मोठ्या भावाचे त्याला सातत्याने मार्गदर्शन मिळत होते व त्यामुळे सचिनचे पाय कायम जमिनीवर होते. याउलट कांबळीला घरून असा कोणीही मार्गदर्शक नव्हता. त्यामुळे खूप गरीब परिस्थितीतून त्याला एकदम पैसा, प्रसिद्धी मिळायला लागल्यानंतर तो हवेत तरंगायला लागला. ज्या क्रिकेटमुळे त्याला पैसा व प्रसिद्धी मिळू लागली त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत न करता तो सवंग गोष्टींच्या मागे लागला. आफ्रिकेत तो एकदा बाहेर जाऊन जॉनी व्हर्साची ब्रॅन्डचा ६०० अमेरिकन डॉलर्स किंमतीचा (अंदाजे २४,००० रूपये) विजारीचा पट्टा घेऊन आल्यानंतर कर्णधार अझरूद्दीन सुद्धा थक्क झाला होता. त्याज दौऱ्यात एका सामन्यापूर्वी तो पहाटे ४ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात गाणी ऐकत बसला होता. पैशांची उधळपट्टी, पहाटेपर्यंत जागरणे हे त्याच्या खेळासाठी मारक आहेत हे समजावून सांगणारा जवळचा मार्गदर्शक त्याला लाभला नाही हे दुर्दैव! संघातून स्थान गमावल्यानंतर खेळावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी तो रिऍलिटी शो सारख्या सवंग गोष्टीत अडकला व तेथेच त्याची कारकीर्द कायमची संपली. एकाअर्थी त्याची क्रिकेट कारकीर्द संदीप पाटिल सारखी अल्पावधीतच संपली. संदीप पाटीलने सुद्धा जाहिराती, चित्रपट, साप्ताहिक यामध्ये गुंतून स्वतःची क्रिकेट कारकीर्द खड्ड्यात घातली होती. गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शकाअभावी व सवंग गोष्टीत गुंतल्यामुळे कांबळीची कारकीर्द संपुष्टात आली.काही आकडेवारी चुकलीये.
In reply to काही आकडेवारी चुकलीये. by श्रीगुरुजी
१९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील चार डावात त्याने चार शतके केली.हे असं हवं, पुढील दोन सामन्यातील तीन डावात त्याने दोन शतके केली.साल १९९४. वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील सहा डावात विनोदने चार अर्धशतके केली.हे असं हवं, या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील तीन डावात विनोदने दोन अर्धशतके केली. धन्यवाद. तसा बदल करून घेतो लेखात.आवडला
लेख आणि शिर्षक आवडले..
सचिन फार काही करु शकला नसता.
In reply to लेख आणि शिर्षक आवडले.. by गणेशा
छान ........
छान लिहिलंय.
क्रिकेट फारसा कळत नाही,
बोर्डाचा नावडता खेळाडू
खरेच शापित खेळाडु होता विनोद
विनोद कांबळीच्या क्रिकेट
हायला
In reply to विनोद कांबळीच्या क्रिकेट by सिरुसेरि
उत्तम आढावा
लेख आवडला. विनोद कांबळी खूप
‘विनोद कांबळी अजून आहे. आपण अजूनही जिंकू शकतो’
१. १९९६ च्या विश्वचषकातला
वेदनादायी आठवणी
In reply to १. १९९६ च्या विश्वचषकातला by चावटमेला
१९९६ च्या विश्वचषकातला
In reply to १. १९९६ च्या विश्वचषकातला by चावटमेला
कांबळी = स्वयंचीत खेळाडु!
कांबळी = स्वयंचीत खेळाडु!
In reply to कांबळी = स्वयंचीत खेळाडु! by अथांग आकाश
विनोद कांबळीने न्युझीलंडच्या
विनोद कांबळी हा एक महान
छान लेख,
मुंबईत अजुन एक जबरदस्त फलंदाज क्लब लेव्हलला होता
In reply to छान लेख, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अनिल गुरव
In reply to मुंबईत अजुन एक जबरदस्त फलंदाज क्लब लेव्हलला होता by तुषार काळभोर
अनिल गुरव यांच्याबद्दल अधिक
In reply to मुंबईत अजुन एक जबरदस्त फलंदाज क्लब लेव्हलला होता by तुषार काळभोर
तुका, जोशीसाहेब, अभिजीत
In reply to अनिल गुरव यांच्याबद्दल अधिक by अभिजीत अवलिया
अत्यंत क्लेशदायक
In reply to अनिल गुरव यांच्याबद्दल अधिक by अभिजीत अवलिया
अजून एक गुणवान खेळाडू म्हणजे
असाच अजून एक प्रतिभावान
In reply to अजून एक गुणवान खेळाडू म्हणजे by प्रचेतस
पद्माकर शिवलकर आणि राजिंदर गोयल
In reply to असाच अजून एक प्रतिभावान by श्रीगुरुजी
खरे आहे
In reply to पद्माकर शिवलकर आणि राजिंदर गोयल by तुषार काळभोर
कोटा पद्धत
In reply to खरे आहे by ज्ञानोबाचे पैजार
सर्व प्रतिसाद पण वाचले..
वाह
In reply to सर्व प्रतिसाद पण वाचले.. by गणेशा
सर्वात डेंजरस गोलंदाज ....