Skip to main content

चालु घडामोडी ( सप्टेंबर २०२१)

लेखक शुर यांनी मंगळवार, 21/09/2021 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन. https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gauta…

वाचने 23901
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

माणुस दुख्ख गिळुन जगु शकतो पण सुख पचवणे सामन्यांचे काम नाही. अर्थात उपयोगी नक्किच आहे पण… जिथे मॉर्फिन झेपत नाही तिथे हेरॉइन…? शाहाण्या माणसाने दुर राहिलेलेच बरे नाही का ? * = डॉक्टरला विचारा… हेरॉइन नाही पण मॉर्फिनवर तर ते नक्कि सल्ला देतिल.

In reply to by गॉडजिला

मॉर्फीन पासून हेरॉईन( डाय एसेटील मॉर्फीन) तयार करणे हि अगदीच साधी प्रक्रिया आहे. मॉर्फीन ऍसेटीक ऍन हायड्राईड बरोबर उकळले कि हेरॉईन तयार होते. दोन्हीची वेदनाशामक क्षमता समकक्ष मात्रेत (equivalent doses) एकच आहे परंतु हेरॉईनचा परिणाम लवकर कमी होतो आणि त्याची व्यसनक्षमता ( addiction potential) हे मॉर्फीन पेक्षा किती तरी जास्त आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात हेरॉईन चा वापर केला जात नाही. उलट एखाद्या व्यक्तीला व्यसन लावून त्याला आपला कायमचा ग्राहक करणे हे हेरोइनसाठी जास्त सोपे असल्यामुळे आणि त्याचा परिणाम लवकर उतरत असल्यामुळे ( जास्त वेळेस घ्यावे लागते) अमली पदार्थाच्या व्यापारात गुंतलेल्या लोकांना हेरॉईन हे जास्त सोयीचे पडते.

In reply to by गॉडजिला

घेऊन पहा. डोस जास्त झाला तर एकदम विमानाचे हवेतून थेट स्वर्गारोहणही होईल. हा का ना का जुन्या व्यसनी माणसांचे व्यसन सोडल्यानंतर परत "टर्की" झाल्यास( परत अमली पदार्थ घेतल्यास असे होते. कारण शरीराची सवय मोडलेली असते आणि जुनाच डोस घेतल्यास ओव्हर डोस होऊन श्वसन बंद होऊन मृत्यू होतो.

Narcotics Control Bureau ला जुलै २०१९ पासून पूर्ण वेळ मुख्य नाही. आहे ती ऊर्जा सिनेनटांच्या मागे खर्च करताहेत.

ती ऊर्जा सिनेनटांच्या मागेनसून बॉलिवूड मधील अमली पदार्थांचे आणि हवाला दलालांचे जाळे उध्वस्त करणे हे आहे. बाकी अर्धवट माहितीवर तुमची पच पच चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सिनेनट हे तर एन्ड युजर्स आहेत. सगळे मादक द्रव्य हिमाचल प्रदेशात उगवते , तिथेच पकडायचे की

In reply to by hrkorde

हायला तालिबानी आणि इतर स्मग्लर लोक यडपटच दिसतात. एवढं लफडं करून एवढी अफू अफगाणिस्तानातून इराण मध्ये नेऊन तेथून मुंद्रा सारख्या आडवळणी बंदरात घेऊन जायला. According to Iran's Anti-Narcotics Law, possession of narcotics is a felony punishable by death or life imprisonment if: The person is found in possession of over 30 grams (1.1 ounce) of heroin, morphine, cocaine, LSD, methamphetamine, or similar drugs. हिमाचल प्रदेशात जायचं ट्रक मध्ये भरायचं वर सफरचंद भरायची आणि खात खात मजेत घेऊन यायचं. हा का ना का अमली पदार्थ वाले तर बॉलिवूड मध्ये काही ग्राम शोधत फिरतात म्हणे -संपादित-

सोमय्यांनी गेल्या 10 वर्षात आरोप केलेल्या व्यक्ती कृपा शंकर भुजबळ अजित पवार बबनराव पाचपुते राणे परिवार गावित परिवार आज ह्यातले बहुतांश भाजपात तरी आहेत , भाजपाचे मित्र तरी आहेत किंवा बाइज्जत बरी आहेत.

किरीट सोमैय्या ह्यानी राणेंवर ३०० कोटी रुपयाच्या मनी लॉंडरिंगचा आरोप केला होता. तरीही राणेंना भाजपात घेण्यात आले. ह्याचा अर्थ सोमैय्या नेहमी खोटे बोलतात किंवा सोमैय्याना पक्षात किंमत नाही. https://www.hindustantimes.com/mumbai-news/i-won-t-join-bjp-or-quit-con…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फडणवीसांनी सुद्धा विधानसभेत राणेंच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची यादी वाचली होती. परंतु नंतर फडणवीसांच्या आग्रहामुळेच राणे कुटुंबियांना भाजपत घेतले, राज्यसभेची व विधानसभेची उमेदवारी दिली आणि नंतर केंद्रात मंत्री सुद्धा केले. सोमैय्या खोटे बोलत नाहीत व त्यांना पक्षात किंमत नाही असे नाही. सध्या मोदी-शहांवर फडणवीसांचा प्रभाव असल्याने इतर सर्व गौण आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

खोटे बोलत नाहीत selective बोलतात.त्यांना जेवढे बोलायला सांगितले आहे तेवढेच बोलतात. १०५ असून सुद्धा सत्ता न मिळाल्या मुळे पक्ष नैराश्यात आहे. त्या मुळे कधी कंगना,कधी अर्णव,कधी राम कदम,कधी फडणवीस, कधी चंपा हे सरकार वर आरोप करत असतात. पण ह्या दोन वर्षात एक पण जनतेचा प्रश्न bjp नी विधान सभेत मांडला नाही ना त्या विषयी भाष्य केले आहे. भ्रष्टाचार विषयी सोमय्या ना काही देणे घेणे नाही तो तर त्यांच्या पक्षातील लोक पण दणकून करत आहेत. पण त्या वर हे कधीच बोलणार नाहीत.जनतेच्या समस्येवर bjp कधीच बोलणार नाही. रोजगार वर,भाव वाढीवर,कधीच बोलणार नाही.

नवी दिल्ली : वाढत्या मध्यमवर्गासह त्यांच्या वाढत्या विवेकाधीन खर्चामुळे भारत २०५० पर्यंत जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश बनेल. जागतिक आयातीत ५.९ टक्के वाटा असलेला भारत चीन आणि अमेरिकेच्या मागे असेल. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सध्याच्या अनुमानित रँकिंगनुसार, भारत २.८ टक्के आयात वाट्यासह सर्वात मोठ्या आयातदार देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे आणि २०३० पर्यंत चौथा सर्वात मोठा आयातदार बनणार आहे, असे एका नवीन अहवालात म्हटले आहे. =========== https://maharashtratimes.com/business/business-news/india-will-be-third… =========== काही समजले नाही. आयात जास्त म्हणजे चलन जास्त बाहेर जाणार आणि जास्त कचरा आय येणार ना ? मग त्या कर्मफलवादाचे काय होणार ? गल्फ असेल , मालदीव असेल , हे लोक अन्नधान्यही आयात करतात , कारण त्यांची मजबुरी आहे, तिथे काही पिकतच नाही. पण भारताला दिवसेंदिवस आयात वाढवायची काय आवश्यकता आहे ?

In reply to by hrkorde

जागतिक आयातीत ५.९ टक्के वाटा असलेला भारत चीन आणि अमेरिकेच्या मागे असेल. China exported $2.49 trillion in goods while it imported $2.13 trillion. निर्यात करण्यासाठी कच्चा माल हा आयात करावा लागत असेल तर आयात पण वाढणारच ना? भारत लस निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे त्याबरोबरच लशी साठी कच्चा माल पण तेवढा जास्त आयात करावा लागणारच ना? केवळ टीका करण्यासाठी एकतर्फी मांडणी आणि कोणत्याही गोष्टीचा अर्धवट अर्थ लावणे सोडून द्या

In reply to by hrkorde

लस निर्यात त्याबरोबरच लशी साठी कच्चा माल पण तेवढा जास्त आयात करावा लागणारच ना? डोक्यात शिरतंय का?

In reply to by सुबोध खरे

स्मार्ट सिटी निर्माण करणार होते काय झाले त्याचे झाल्या का देशात स्मार्ट city. अजुन तरी मुंबई सहित दोनतीन शहर व्यतिरिक्त काहीच दिसत नाही स्मार्ट झालेले. चीन वर मोठी आगपाखड केली होती. चीन कडून माल येणे बंद झाले का. स्वदेशी चा नारा दिला होता किती स्वदेशी प्रोडक्ट जगात धुमाकूळ माजवत आहेत. उलट इथे खूप वस्तू चा तुटवडा असल्या मुळे बाकी देशाकडून आयात च करावे लागत आहे ते पण पहिल्या पेक्षा जास्त. महागाई विषयी बोलायला च नको. चुली परत पेटवायची वेळ आली आहे.

In reply to by सुबोध खरे

According to market and consumer data firm Statista, the top 10 commodities imported by India in 2020-21 were: Crude petroleum (21.6%) Gold (5.9%) Petroleum products (5.8%) Coal, coke and briquettes (4.7%) Pearl, precious and semi-precious stones (4.7%) Electronic components (3.4%) Telecom instruments (3%) Organic chemicals (2.5%) Industrial machinery (2.5%) Electric machinery and equipment (2.3%) त्यातच पुढे हेही आहे India’s top 10 trade partners from where it imported the above commodities in 2020-21, according to Statista, were: China (13.7%) United States of America (7.5%) United Arab Emirates (6.3%) Saudi Arabia (5.6%) Iraq (5%) Hong Kong (3.5%) Switzerland (3.5%) South Korea (3.3%) Indonesia (3.1%) Singapore (3.1%) Note: The percentage figures in brackets signify the foreign trade partner’s share in India’s total imports. China takes the lion’s share https://www.cogoport.com/blogs/top-10-india-imports-and-import-sources

In reply to by सुबोध खरे

आयात चुकीची असते, न आयात करणारे शूरवीर असतात, कर्ज घ्यायचं म्हणजे चूक, deficit budget वाईट असतं अशा प्रकारच्या negative IQ मुळे किंवा ड्रग्ज घेतल्यामुळे निर्माण होणारी कल्पनाशक्ती असणारे भारतात बरेच आहेत. अशांना उत्तर दिलं की ते चेकाळतात. त्या पेक्षा ignore करावं.

In reply to by सुबोध खरे

मध्यम वर्गीय आणि उच्च madhyam वर्गीय लोकांच्या बदलेल्या सवयी मुळे देशा ची आयात वाढली आहे. प्रगत युरोपियन देशातील लोक सामाजिक मूल्य ,आहार ,विहार पाळत आहेत . पण भारतातील ज्यांना शिक्षित समजले जाते तो मध्यम आर्थिक वर्गा नी त्यांचे जीवनमान असे बदलेल आहे की त्याला तोड नाही.(आंधळे ,ज्यांना सरकार पण नीट निवडता येत नाही) त्या मुळे गरज नसलेल्या फालतू सामानाची आयात वाढली आहे.

In reply to by Rajesh188

भारतातील लोक जास्तं अन्न खाऊ लागले आहेत म्हणूनच जगात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे - जॉर्ज बुश ज्युनिअर

In reply to by गॉडजिला

आंधळे ,ज्यांना सरकार पण नीट निवडता येत नाही

आपला पगार किती? आपली लायकी किती? हे न पाहता आपण महापालिकेत उंदीर मारायच्या विभागात असलो तरी ठोकून द्यायचं हा का ना का ८० कोटी मतदारापैकी पन्नास कोटी मतदारानी निवडून दिला आहे सरकारला. आपण कोण आहोत याचा "ज~ रा~ सा" तरी विचार करत जा कि राव

मार्केटिंग चे बळी आहेत भारतीय .तीस वर्षापूर्वी भारतीय लोकांची असलेली मानसिकता,राहणीमान आंनी आताची ह्याचा थोडा जरी विचार केला तर लक्षात येईल. भारतीय लोकांची मानसिकता,राहणीमान ,खाद्य संस्कृती%पेहराव ह्या मध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.. खाण्या पिण्याच्या सवयी पण बदलल्या नाहीत . त्या मुळे आयार तर वाढणारच च . सर्व परदेशी कंपन्यांना जसा समाज हवा तसा भारतात आहे. जाहिरात बघून fair and lovely घेणार आणि गोरे होण्याची वाट बघत बसणारा. सर्व चांगल्या सवयी सोडून सर्व वाईट सवयी भारतीय लोकांनी खूप लवकर आत्मसात केल्या आहेत.

आयात काय असते, निर्यात काय असते, अर्थव्यवस्था कशी चालते, समाज एखादि गोष्ट का करतो इत्यादी गोष्टींबद्दल ढिम्म माहिती नसताना बालिश आणि गावंढळ अर्ग्युमेंट्स करून प्रत्येक गोष्टीवर टीका करणारी एक नवीन जमात गेल्या काहि वर्षांत उदयाला आली आहे. फार फार तर एखाद्या फोटोग्राफर* चे क्वालिफिकेशन असणारे लोक कॉम्प्लिकेटेड आणि interdependent गोष्टींवर बथ्थड पणे बोलून आपले अज्ञान पाजळतात तेव्हा हसू न येता कीव येते. Meeks will inherit the earth हे खरंच आहे की काय? * एका विशिष्ट व्यक्तीवर किंवा कामावर ही टीका नव्हे याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

म्हणजे या सगळ्यांना राहुल गांधींनी KT दिलीये असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? ;-)

In reply to by राघव

काही KT न घेता डायरेक्ट एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत.

Heroin worth ₹879 crore seized at JNPT,Jawaharlal Nehru Port Trust ( 1 held याला काय म्हणणार? पंडित नेहरूंच्या बंदरात त्यांच्या वंशजांनी अमली पदार्थ आयात केले का? काय राव ? काहींच्या काही म्हणजे किती?

लोकहो, मुंदडा बंदरात बरंच हेरॉईन सापडलं. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर हेरॉईन पकडलं जाणं यापूर्वी फार कमी वेळा घडलंय. इथला संदर्भ घेतो : https://moneyinc.com/the-20-largest-drugs-seizures-in-world-history/ इथे हेरॉईनचा तिसरा क्रमांक आहे व तो फक्त ४८० किलोचा (१०५९ पाऊंड ) आहे. म्हणजे अर्धा टन देखील नाही. मुंदडामधलं ३ टन ही जगातली आजपावेतो सर्वात मोठी हेरॉईनची धरपकड असू शकते. माझ्या मते हे हेरॉईन भारतात विकण्यासाठी नसून त्याचं गन्तव्यस्थान अतिपूर्वेस असावं. इतक्या मोठ्या उलाढाली स्थानिक बाजारात होत नसतात. हा बोजा ( शिपमेंट ) पकडली जाणं हा त्याच्या मालकांना फार मोठा धक्का आहे. थँक यू, मोदी! -गा.पै.

ज्या प्रामाणिक ,देश प्रेमी अधिकारी असलेल्या व्यक्ती नी हे ड्रग पकडले आहे . त्या अधिकाऱ्याला सरकार काय इनाम देत आहे ह्याची update media ni लोकांना द्यावी. पुढील दहा वर्ष.नाही तर बिचारा बडतर्फ होवून त्याच्या वर च कोर्टात केस ठोकल्या जायच्या.

In reply to by Rajesh188

ज्या प्रामाणिक ,देश प्रेमी अधिकारी असलेल्या व्यक्ती नी हे ड्रग पकडले आहे .

त्या अधिकाऱ्याला सरकार काय इनाम देत आहे ह्याची update media ni लोकांना द्यावी.

ज्या शूर वीर सैनिकांनी १९७१ मध्ये पाकिस्तानला हरवून बांगला देशाला स्वातंत्र्य दिलं त्या सैनिकांना अधिकाऱ्याना सरकार काय इनाम दिले आहे ह्याची update media ni लोकांना द्यावी. हायला उगाच श्रीमती इंदिरा गांधीना सगळं श्रेय देत होते ५० वर्षे! राजेशा ~ ~ कुठे होतास रे इतकी वर्षे -- भारतमाता आक्रोश करते आहे

प्रधानमंत्र्या च्या नावाने गोळा केलेला पीएम केयर फंड हा भारत सरकारचा निधी नसून एका धर्मादाय संस्थेचा निधी असल्याचे पीएमओ कडून दिल्ली कोर्टात सांगितलं गेलंय. लोकांना किती मोठा चुना लावला गेलाय, विचार करा. आजची बातमी. PM-CARES Fund not a fund of Government of India, Delhi HC told-https://indianexpress.com/article/cities/delhi/pm-cares-fund-not-a-fund…

In reply to by शुर

इथे पण लोकांना मूर्ख बनवायचे उद्योग.फेकाफेक,खोटे बोलणे हेच भारत सरकार च वैशिष्ट आहे काय.

मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील गायरातगंज तहसीलमधील शासकीय प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पवन सेन या विद्यार्थ्यावर निशाद बेगम नावाच्या त्याच्या शिक्षिकेच्या सूचनेनुसार काही लोकांनी हल्ला केला. विद्यार्थ्याने शाळेत गंध परिधान केल्यामुळे हा हल्ला झाला. ही मारहाण इतकी भयंकर होती की विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

In reply to by निनाद

Bjp चे सरकार आहे कायदा आणि सुव्यवस्था बिलकुल नाही.एक शिक्षिका stundent ला मारत आहे कायद्याचा धाक राहिला नाही. लगेच तबोडतोप mp चे राज्य सरकार केंद्राने बरखास्त करावे.

In reply to by Rajesh188

मुसलमान शिक्षिकेने हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे.

मोदी अमेरिका दौर्यावर आहेत. कमला हॅरिस ह्यांच्याबरोबर त्यांची भेट झाली. बायडेन ह्यांच्याबरोबर भेट अजुन व्हायची आहे. एक बाळबोध प्रश्न- ओबामा २०१५ साली भारतात आले होते. स्वागताला खुद्द मोदी विमानतळावर हजर होते. / नंतर ट्रम्प अहमदाबाद येथे आले तेव्हाही मोदी विमानतळावर स्वागताला हजर होते. अमेरिकेचा अध्यक्षाने देशप्रमुखांची भेट विमानतळावर घ्यायची नाही असा तेथील शिष्टाचार आहे का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बहुधा असावा. अमेरिकन अध्यक्षाने विमानतळावर जाऊन कुणाचीही भेट घेतल्याचे निदान मी तरी पाहिलेले नाही. कदाचित अमेरिका सुपरपॉवर असल्याने तसे केले जात असावे. सध्या वेगवेगळ्या 180 देशांचे राष्ट्रप्रमुख UNO साठी अमेरिकेत उतरत असल्याने तसेही he will be stretched.

In reply to by कपिलमुनी

पावसात छत्री सुद्धा धरली होती म्हणे. फाईल हातात घेऊन टागोरांची नक्कल करून झाली. आता विमानात कागद वाचून शास्त्रीजिंची नक्कल केली.

In reply to by श्रीगुरुजी

त्याकाळी नेहरूंनी सीजीआय किंवा व्ही एफ एक्स वापरून व्हिडीओ तयार केला होता म्हणे

In reply to by कपिलमुनी

पण ट्रुमन विमानतळावर स्वागताला येऊन उपयोग काय झाला? याच अमेरिकेने नेहरूंच्याच काळात १९५४ मध्ये १२० F-86 लढाऊ विमाने पाकिस्तानला दिली होती.

In reply to by श्रीगुरुजी

चर्चेचा मुद्दा विमानतळावर स्वागत करायला अध्यक्ष येतो की नाही हा होता. तसा शिनपिंग बरोबर झुल्यावर झुलून आणि पाकिस्तान ला जाऊन शिरखुरमा खाऊन काय उपयोग झाला ? अशीही चर्चा होईल. सध्या जो मान नेहरूंना दिला गेला तो शेठ ला मिळाला नाही इतकाच आहे.

In reply to by कपिलमुनी

लाहोल विलाकुवत! वल्ला हबीबी!! नेहरूंना अमेरिकेने काहीतरी मान दिला म्हणे आणि नेहरूंनी त्याची एक चित्रफीत करून प्रसिद्धी पण केली (ज्याचा देशाला शून्य उपयोग झाला आणि असला मान देऊनही अमेरिका पाकड्यांच्याच बाजूला राहिली), पण तो मान लालबहादूर शास्त्री, इंदिरा, राजीव, नरसिंहराव, मनमोहन इ. ना का दिला नसावा? आणि मोदींना असला दिखाऊ मान न देता सुद्धा अमेरिका ३७० कलम, सर्जिकल हल्ला वगैरे विषयात पाकड्यांच्या बाजूला न जाता भारताच्या बाजूने का आहे?

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दा वेगळा चर्चा वेगळी ! गोलपोस्ट बदलणे चालू राहू द्या , शिनपिंग , नवाझ वगैरे सोयीस्करपणे बाजूला ठेवू .

In reply to by कपिलमुनी

सध्या जो मान नेहरूंना दिला गेला तो शेठ ला मिळाला नाही इतकाच आहे.
नेहेरु नंतर क्रमाने राधाक्रुष्णन, ईंदिरा गांधी, मोरारजी देसाई, राजीव गांधी , पी व्ही नरसिंहाराव, ईंद्र कुमार गुजराल, वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी जाउन आले. त्यात किती जणांना नेहेरुंसारखा (एयरर्पोर्ट वर जाउन रीसिव्ह करायचा) मान मिळाला ? त्यामुळे मान फक्त (मोदी) शेठ ला मिळाला नाही हे वाक्य चुकीचे आहे. (मोदी) शेठ च्या जागी ईंद्र कुमार गुजराल टाकले तरी वाक्य तसेच राहते ..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सधारणपणे विदेशी पाहुण्यांना विमानतळावर रीसिव्ह करायला जायचा जो प्रोटोकॉल अमेरीकेत आहे तो डिपार्ट्मेंट ऑफ स्टेट च्या अखत्यारीत आहे. त्यांचे "Office of the Chief of Protocol" हे सारे सोपस्कार प्रेसिडेंट च्या वतीने पार पाडते. ऑफीशियल स्टेट व्हि़जीट च्या वेळेस मात्र अमेरिकन प्रेसिडेंट पाहुण्यांना रीसिव्ह करायला व्हाईट हाऊस च्या दक्षिण लॉन वर जातात. प्रत्येक देशाचे हे राजशिष्टाचार वेगळे असतात. त्यात प्रसंगी बदलही होतात. येणार्‍या पहुण्याची भेट ही किती महत्त्वाची आहे / त्यामुळे देशाला काय / किती फायदा होईल यावर हे सारे अवलंबुन असते.

In reply to by सुक्या

६०-७० वर्षांपूर्वी पाहुण्या देशाच्या प्रमुखाचे स्वागत करायला तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष विमानतळावर उपस्थित रहात असावे. परंतु काही काळाने प्रोटोकॉल बदलला असावा व त्यामुळे कोणत्याही देशाचा/ची प्रमुख अमेरिकेत आला/ली तरी अमेरिकेचे अध्यक्ष त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जात नसावे. अलिकडच्या काळात अमेरिकेचा अध्यक्ष एखाद्या देशाच्या प्रमुखाचे स्वागत करायला विमानतळावर उपस्थित राहिल्याचे वाचनात आले नाही. थसे झाले असल्यास लिंक द्यावी. कदाचित पोप किंवा इंग्लंडच्या राणीसाठी अपवाद असावा. परंतु तसे वाचनात आले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हो. ६०-७० वर्षांपूर्वी तशी प्रथा असावी. सध्याच्या काळात तरी मला अमेरिकेचे अध्यक्ष स्वागतासाठी विमानतळावर गेला असे कुठे दिसले नाही. स्टेट व्हीजीट हा संपुर्ण वेगळा विषय आहे. त्यात पहुण्यांचे स्वागत करायला अमेरिकेचे अध्यक्ष स्वतः सपत्नीक जातात; पण व्हाईट हाउस च्या लॉनवर. त्यांतर तोफांची सलामी , परेड , संध्याकाळचे भोजन , बॉलरुम डांस असला कार्यक्रम असतो. वर्किंग व्हीजीट ही वेगळी .. यात मीटींग / पत्रकार परीषद वगेरे असते. क्वचीत शिष्ट्मंडळावरोबर दुपारचे भोजनही असते.

In reply to by सुक्या

सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख हे संयुक्त राष्ट्रांच्या सभे साठी आलेले आहेत, अमेरिकेच्या स्टेट व्हिजीट साठी नाहित. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, स्टेट व्हीजीट हा संपुर्ण वेगळा विषय आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाण्याची प्रथा नाही (किंवा मोडित निघाली) राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या जोडीदाराने पाळावयाच्या राजशिष्टाचाराच्या थोड्या अधिक माहितीचा दुवा.

In reply to by अनन्त अवधुत

अमेरिकेन सरकारच्या 'सेक्रेटरी ऑफ स्टेट' च्या अखत्यारीतील "ऑफिस ऑफ द चीफ प्रोटोकॉल" ह्यांच्या अधिपत्याखाली, परदेशी राष्ट्रप्रमुख तसेच इतर परदेशी सरकारी मंडळीसाठी आचरणांत येणारे प्रोटोकॉल्स येतात. सर्वसाधारपणे, त्या ऑफिसनुसार, परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भेटी पांच प्रकारांत मोडतात-- १. स्टेट व्हिजीट २. ऑफिशिअयल व्हिजीट ३. ऑफिशिअयल वर्कींग व्हिजीट ४. वर्कींग व्हिजीट ५. प्रायव्हेट (खाजगी) व्हिजीट ह्यांत प्रत्येक भेटीच्या दरम्यान, खालीलपैकी कुठल्या गोष्टी केल्या जातील/ सुविधा दिल्या जातील, तसेच भेट अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या निमंत्रणावरून आहे किंवा खाजगी, ह्यांत फरक आहे. वरीलपैकी पहिल्या दोन, स्टेट व्हिजीट व ऑफिशिअयल व्हिजीट ह्या फक्त राष्ट्रप्रमुख (भाताच्या संदर्भांत पंतप्रधान, राष्ट्रपति, उपपंतप्रधान, उपराष्ट्रपति) ह्यांच्यासाठीच आहेत. तसेच पहिल्या चार प्रकारच्या भेटी, अमेररिकन राष्टप्रमुखांच्या आमंत्रणावरूनच केल्या असाव्यात. प्रोटोकॉलमधे, व्हाईट हाऊसच्या जवळच असलेले 'ब्लेयर हाऊस' किती दिवस/ रात्रींसाठी उपलब्ध केले जाईल, अमेरिकन राष्ट्राध्याक्षांची भेट असेल का, व्हाईट हाऊसच्या दक्षिण दरवाज्याच्या समोर असलेल्या हिरवळीवर तोफांच्या सलामीसकट आगमनचा सोहळा असेल का, स्टेट डिनर असेल का, इत्यादी बाबींत फरक आहे. ह्यांपैकी पहिल्या दोन प्रकारांत अगदी सूक्ष्म फरक आहे, तर त्या दोघांत व तिसर्‍या व चौथ्या प्रकारांत जरा जास्त फरक आहे. येणार्‍या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत ते जिथून अमेरिकेत प्रवेशणार, त्या 'पोर्ट'वर कसे केले जाईल, ह्याविषयी येथे थोडी त्रोटक माहिती आहे. पण ह्यावरून असे दिसते की स्वत: राष्ट्रपति अथवा उपराष्ट्रपति ह्यांपैकी कुणी हजर रहावे, ह्याविषयी प्रोटोकॉलमधे काहीही माहिती सापडत नाही. मात्र वरील दुव्यांत आगमनाचा व परतीचा सोहळा व्हाईट हॉलच्या दक्षिणेकडील हिरवळीवर होण्यासंबंधी काही उल्लेख आहेत. तेव्हा थोडक्यांत विमानतळावर कोण हजर होते, हा काही महत्वाचा मुद्दा नाही. वरील दुव्यांवरून असे दिसते की, सर्वोच्च पातळीवरील 'स्टेट व्हिजीट्स' एका वर्षांत जास्तीत जास्त सहा होतात. इतर मात्र अनेक असू शकतात. अमेरिकन सरकारच्या 'इतिहासा'च्या दुव्यावर कुठल्या देशाचे, कोण राष्ट्रप्रमुख, कुठल्या वर्षी व कुठल्या पातळीवरील व्हिजीट्ससाठी अमेरिकेत गेले होते, त्याची माहिती आहे. वर्षाच्या हिशेबांत पाहिले तर १९४९ साली, सर्व मिळून फक्त पाच राष्ट्रप्रमुखांनी तेथे भेट दिली आहे. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले असल्याने हे झाले असावे. ह्या पाचांत नेहरूंचा समावेश आहे. त्याविषयी थोडे सविस्तर पुढे लिहीतो. मात्र, उदा. २०१४ मध्ये एकंदरीत ७४ व्हिजीट्स आहेत, तर २०१९ मधे सर्व मिळून ४० आहेत. आता, नेहरूंच्या १९४९ मधील बहुचर्चित भेटीचे पाहूयांत*. तेथील सरकारच्या 'इतिहासा'च्या दुव्यावरून ते तिथे अधिकृतरीत्या ११ ते १५ ऑक्टोबर ह्या दरम्यान होते. मात्र, काही इतर दुव्यांवरून असे दिसते की त्यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर १९४९ ह्या महिन्यांतील सर्व मिळून सुमारे एक महिना अमेरिका व कॅनडा ह्या देशांत काढले, त्यांत त्यांनी अनेक भेटी घेतल्या व काही ठिकाणी भाषणेही केली. त्यांतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हिस्कॉन्सिन येथे ४ नोव्हे. १९४९ रोजी केलेल्या भाषणाचा येथे गौरवपूर्ण उल्लेख आहे.
UW President E. B. Fred declared Nehru’s visit memorable for its scholarship and exchange with a nation where “the true aristocrat is a man of learning.”
तर, अगदी नवीन घडी बसवणार्‍या देशाचा राष्ट्रप्रमुख इतका दीर्घकाळ देशाबाहेर, स्वतःच्या विद्वत्तेची जाणीव करत, भाषणे देत फिरतो, हे स्वतःचे मार्केटींग नव्हे तर नेमके दुसरे काय आहे? त्या प्रदीर्घ मुशाफिरींत, त्यांनी तेथील उद्योजकांच्या भेटीगाठी केल्याचे कुठेही नमूद झालेले नाही. त्यांच्या दुर्दैवाने व तत्कालिन भारतीय जनतेच्या सुदैवाने तेव्हा सोशल मीडिया अस्तित्वांत नव्हते. रेडियो जेमतेम सुरू झाला होता, दूरचित्रपाणी दूरच राहिली. अर्थात पुढे, त्यांच्या कारकीर्दीच्या कालखंडांत जगणारे आम्ही, त्यांना मुले कशी आवडतात, गुलाब कसे आवडतात, इत्यादी माहिती चघळत होतो. त्यांचा जन्मदिन, १४ नोव्हेम्बर भारतांत, 'बालदिन' म्हणून साजरा केला जात असे. १९६२ च्या चीन युद्धानंतर- ज्याविषयी भारतीयांनी काही न बोललेलेच बरे-- मग जे सिनेतारक- तारकांचे जवानांसाठी मदत गोळा करण्याकरीता मेळावे भरवण्यात आले, त्यांतील त्यांचा सहभाग-- विशेषतः लताबाई 'ऐ मेरे वतन के लोगों' ब्रेबॉर्न स्टेडियमवरील कार्यक्रमांत गात असतांना समोर बसलेल्या त्यांच्या डोळ्यांत अश्रू कसे आले, ह्याच्या रसभरीत कहाण्याही आम्ही पचवत होतो. हे सर्व वैयक्तिक मार्केटींग नव्हे तर नक्की काय होते? हे असले काही मोदींनी आता केले तर काय गहजब होईल? (* ह्यांतील दुवे मला चंद्रसूर्यकुमारांनी पुरवले आहेत).

In reply to by प्रदीप

उत्तम प्रतिसाद! नेहरूंच्या भेटीच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष उपस्थित असल्याने भारतासाठी काही चांगले झाल्याचे वाचनात नाही. मोदी अनेक देशांच्या भेटीवर जातात व त्याचा फायदा वेळोवेळी दिसत आहे. चीन, जपान, रशिया, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स अशा कोणत्याही देशांचे प्रमुख अमेरिकेत अधिकृत राजनैतिक भेटीवर आले तरी अमेरिकेचे अध्यक्ष त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित असल्याचे मागील ३-४ दशकात वाचनात आले नाही. त्यामुळे मोदींंच्या स्वागताला बायडेन विमानतळावर न येणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

In reply to by प्रदीप

अमेरिकेत मार्केटिंग करून नेहरू अमेरिकेत इलेक्शन लढवणार होते का ? अमेरिकेत कुणाला न भेटताही नेहरू काळात भारतात धरणे , विमानतळ , एम्स , आय आय टी , पीएसयु झाले,आणि गावभर फिरूनही विश्वगुरु सगळे विकून टाकत आहेत , ना सरकारी क्षेत्रात निर्मिती , ना खाजगी क्षेत्रात मेक इन इंडिया

In reply to by hrkorde

अमेरिकेत मार्केटिंग करून नेहरू अमेरिकेत इलेक्शन लढवणार होते का ?
तुम्ही इतका बालिश प्रश्न विचाराल असे वाटले नव्हते. पण असो. साधारणपणे, प्रत्येक मोठा नेता नार्सिसिस्ट असतो व तसा तो असलाच पाहिजे, अन्यथा त्याला देशाचा राज्यशकट, स्वतःच्या मतानुसार चालवणे अशक्य आहे. हे नेहरू, इन्दिरा गांधी, मोदी ह्या सर्वाच्या बाबतीत लागू आहे. तेव्हा तशा प्रत्येक नेत्याने स्वतःचे मार्केटिंग - देशांतर्गत तसेच परदेशांतही -- करणे आवश्यक आहे. व हे सर्वजण ते तसे करीत आलेले आहेत. तसेच परदेश दौर्‍यांत उद्योजकांना व देशास उपयोगी पडतील अशा संस्थांच्या प्रमुखांना भेटणे, हे महत्वाचे काम तेव्हाही नेहरूंनी केले असावे, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. तुम्ही धरणांचा उल्लेख केला आहे, तेव्हा आपले पहिले मोठे धरण, भाक्रा नांगल येथे उभारण्यांत आले, त्याची केवळ आखणीच नव्हे, त्यर प्रत्यक्ष बांधणीचे कार्यही १९४६ सालीच सुरू झालेले होते असे विकीपेडियाचा दुवा सांगतो:
The agreement for this project had been signed by the then Punjab Revenue Minister, Sir Chhotu Ram in November 1944 with Raja of Bilaspur and finalised the project plan on 8 January 1945. Preliminary works commenced in 1946.
ऐम्स स्वतःविषयी म्हणते:
The health survey and development committee ,chaired by Sir Joseph Bhore, an Indian Civil Servant ,had in 1946 already recommended the establishment of a national medical centre
पण हे तपशिलही आपण येथे सोडून देऊयात. फक्त हे रिसोर्सेस आणण्याचे काम करण्यासाठी, देशाचा राज्यशकट चालवणार्‍या नेत्याने, परदेशांतील दौर्‍यांत किती वेळ घालवायचा, व तो नक्की कायकाय करण्यांत, ह्याचा प्रश्न उपस्थित होतो. आता इतक्या उशिरा १९४९ साली नेहरूंनी ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या परदेश दौर्‍यांत नक्की कुठेकुठे भेटी दिल्या व कसल्या कामांसाठी ह्याविषयी फारसा तपशिल मिळत नाही. मी उल्लेखिलेल्या यु. व्हिस्कॉन्सिन येथे जाऊन केकेल्या भाषणामुळे देशाला काय मिळण्याची शक्यता होती? तेथे त्यांनी स्वतःची प्रगाढ वगैरे स्कॉलरशिप दाखवली, ह्यापलिकडे काय? ही असली भाषणे जगन्नेते करीत असतात व त्यांतून त्यांना भरपूर पैसेही मिळतात (टोनी ब्लेयर, ओबामा ही अलिकडची ठळक उदाहरणे). पण हे पदावरून उतरल्यावर करावयाचे उद्योग आहेत. देशाच्या कामासाठी, देशाच्या खर्चाने (पैसा व अमूल्य वेळ) करावयाचे नव्हेत. येथे नेहरूंनी पंप्र असतांना केलेल्या परदेशवार्‍यांची जंत्री दिलेली आहे, ती फारशी चूक असावी असा संशय नसल्यास जरूर पहावी. १९४९ च्या दौर्‍यांत, आयर्लंड येथील कुराह रेसकोर्सला दिलेली एक भेटही आहे! त्या दुव्यानुसार त्यांच्या पंप्र कालावधीत नेहरूंनी ४७ देशांना वेळोवेळी भेटी दिल्या- ह्यांतील काही भेटी एकाहून जास्त वेळा!सर्व मिळून एकंदरीत ७१ दौरे आहेत. दळवळ्ण अतिशय कठीण, व वेळकाढू होते अशा काळांत एक पंप्र बाहेर फिरण्यांत इतका वेळ, पैसा घालवू शकतो, हे थक्क करणारे आहे.
आणि गावभर फिरूनही विश्वगुरु सगळे विकून टाकत आहेत , ना सरकारी क्षेत्रात निर्मिती , ना खाजगी क्षेत्रात मेक इन इंडिया
ह्या फालतू, गैरलागू भरकट- उचकाऊ (ट्रोलिंग) भागास मी तर प्रतिसाद देणार नाहीच पण इतर कुणीही तसा देऊ नये असे मी येथे आवाहन करतो. विषय भरकटला जाऊ नये.