✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रवास कसला? फरफट अवघी!

च — चौकस२१२, Tue, 09/07/2021 - 08:38
एक आर्त काव्य , सलील कुलकर्णी ( कवी माहित नाही बहुतेक संदीप खरे किंवा सुधीर मोघे ) https://www.youtube.com/watch?v=xyHtnZW0dNA अजुन उजाडत नाही ग! दशकामागून सरली दशके अन् शतकाच्या गाथा ग! ना वाटाचा मोह सुटे वा ना मोहांच्या वाटा ग! पथ चकव्याचा, गोल, सरळ वा कुणास उमगत नाही ग प्रवास कसला? फरफट अवघी! पान जळातून वाही ग... कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे नसते काही असले ग त्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग स्पर्श आंधळे. गंध आंधळे भवताली वनराई ग तमातली भेसुर शांतता... कानी कूजन नाही ग... एकच पळभर एखादी कळ अशी सनाणुन जाते ग क्षणात विरती अवघे पडदे लख्ख काही चमचमते ग! ती कळ सरते... हूरहुर उरते अन् पिकण्याची घाई ग वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही ग…

प्रतिक्रिया द्या
2567 वाचन

💬 प्रतिसाद (4)

छान आहे

हेमंतकुमार
Tue, 09/07/2021 - 20:29 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments

संदिप खरे

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 09/07/2021 - 21:20 नवीन
संदिप खरे यांची कविता आहे हि, पण मला कळल नाही इथे का टाकलिये?
  • Log in or register to post comments

केवळ मिपाकरांबरोब्र वाटावी

चौकस२१२
Wed, 09/08/2021 - 15:04 नवीन
केवळ मिपाकरांबरोब्र वाटावी म्हणून ... मग कुठे असे दुवे द्यायला परवानगी आहे ? एक तर मिपावर नवीन धागा काढताना "लेखन करा " यात तो कोणतया शीषर्काखाली ताकाचे ते निवडताना काही तरी तांत्रिक गडबड होते .. असा ड्रॉप डाऊन मेनू नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

संदिप खरे म्हणजे मोरपीस..

Bhakti
Tue, 09/07/2021 - 22:13 नवीन
संदिप खरे म्हणजे मोरपीस.. कानात अजून आवाज घुमतोय.. नोस्टालजिया....रात्र रात्र जागवल्या ह्या गीतांनी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा