प्रवास कसला? फरफट अवघी!
एक आर्त काव्य , सलील कुलकर्णी
( कवी माहित नाही बहुतेक संदीप खरे किंवा सुधीर मोघे )
https://www.youtube.com/watch?v=xyHtnZW0dNA
अजुन उजाडत नाही ग!
दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग!
ना वाटाचा मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग!
पथ चकव्याचा, गोल,
सरळ वा कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी!
पान जळातून वाही ग...
कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे. गंध आंधळे भवताली वनराई ग
तमातली भेसुर शांतता... कानी कूजन नाही ग...
एकच पळभर एखादी कळ
अशी सनाणुन जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते ग!
ती कळ सरते... हूरहुर उरते अन् पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही ग…
छान आहे
संदिप खरे
केवळ मिपाकरांबरोब्र वाटावी
संदिप खरे म्हणजे मोरपीस..