✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

स
साहित्य संपादक यांनी
Sat, 06/26/2021 - 10:53  ·  लेख
लेख
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
101953 वाचन

💬 प्रतिसाद (288)

प्रतिक्रिया

एक पोपट रागवलाय जणू ...

तुषार काळभोर
गुरुवार, 07/08/2021 - 06:13 नवीन
एकदम खुन्नस ने बघत असल्या सारखा दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

मस्त!

राघव
गुरुवार, 07/08/2021 - 11:09 नवीन
सर्वसाक्षीशेठ, खूप सुंदर आहेत सगळे पोर्ट्रेट्स! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

पहिला पोपट मस्त आहे

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/08/2021 - 14:14 नवीन
एखादा फास्ट बॉलर बॉल टाकायला तयार असताना असाच सज्ज उभा असतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

राघूचे आणि राघव यांचे फोटो आवडले

गोरगावलेकर
गुरुवार, 07/08/2021 - 09:11 नवीन
@सर्वसाक्षी. छान पोट्रेट्स @राघव. सर्व फोटो आवडले. आम्हाला हरिहरेश्वर मंदिरात फोटो काढण्यास बंदी करण्यात आली होती
  • Log in or register to post comments

अजून दोन फोटो

गोरगावलेकर
गुरुवार, 07/08/2021 - 09:17 नवीन
गंगटोकहून लाचेन (उ.सिक्कीम) जातांना वाटेत चुंगथांग येथे तीस्ता ऊर्जा प्रकल्पातर्फे लावलेली एक पाटी आणि त्यावरील माझ्या भटकंतीच्या आवडीशी निगडित एक छान सुविचार फोटो : नोव्हेंबर २०१९ Image removed. साम वाळवंट, जेसलमेर येथील एक सूर्योदय फोटो: नोव्हेंबर २०१६ Image removed.
  • Log in or register to post comments

दोन्ही

गुल्लू दादा
गुरुवार, 07/08/2021 - 09:50 नवीन
दोन्ही फोटो झकास. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

गंगटोकचा सुविचार व फोटो मस्तच

टर्मीनेटर
गुरुवार, 07/08/2021 - 18:05 नवीन
गंगटोकचा सुविचार व फोटो मस्तच आणि सुशिंचा डाय हार्ड फॅन असल्याने त्यांचा कथानायक असलेल्या दाराबुलंदचे गाव म्हणुन आवर्जून आणि विशेष जिव्हाळ्याने बघितलेल्या 'साम' चा फोटो तर लै भारी 👍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

राजस्थान (२०१६) सहलीबाबत एक आठवण.

गोरगावलेकर
गुरुवार, 07/08/2021 - 22:30 नवीन
नुकतीच नोटबंदी झाली होती. एटीएमच्या रांगेत उभे राहण्यासाठी बहुतेक पर्यटकांनी आपली सहल रद्द केलेली. जेसलमेरला अगदी तुरळक पर्यटक. एका उंटवाल्याला हाक मारावी तर दहा जणांचा गराडा. मागणी कमी-पुरवठा जास्त त्यामुळे अगदी कमी किमतीत तेही मोठा राउंड मारायला मिळत होता. तीन दिवसात कित्येकदा उंटावरून साम व थार वाळवंटात फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटला. आमचा फायदा होत असला तरी त्यांचा उंटांच्या खाण्याचा खर्च तरी निघत असेल का शंकाच होती. त्यामुळे ग्रुपतर्फे प्रत्येक राईडनंतर स्वखुशीने बक्षीस मात्र द्यायला विसरलो नाही. हा सूर्योदयाचा फोटो घेतला त्याच फेरीच्या परतीत भाचीचा महागडा फोन वाटेत कुठेतरी पडला. परत आल्यावर नाश्टा वगैरे आटोपून हॉटेल सोडायच्या वेळी फोनची आठवण झाली. फोन केला तर रिंग वाजत होती पण कोणी उचलत नव्हते. वाळूत कुठे गाडला गेला असेल तर परत मिळणे मुश्कीलच. उंटवाल्याना गाठले. त्यांच्याकडे काम नव्हतेच. दोघे-तिघे बरोबर निघाले. भाची कसे कसे गेलो ती वाट दाखवत होती. एके ठिकाणी मात्र ती दाखवत असलेली दिशा उंटवाल्याना चुकीची वाटली. कारण उंटांच्या पाउलाच्या खुणा दुसरीकडेच जात होत्या. त्यांचे म्हणणे सकाळपासून या भागात दुसरा ग्रुप आलेला नाही. तसेच वाराही नाही त्यामुळे २-३ तासांपूर्वीच्या पाऊलखुणा बुजलेल्या नाहीत व त्या आमच्याच ग्रुपच्या आहेत. आणि खरोखर त्यांनी नेलेल्या वाटेवरच फोन सापडला. वास्तविक आम्हाला चुकीच्या वाटेवर नेऊन नंतर ते फोन शोधू शकत होते. पण त्यावेळी धंद्याची बिकट अवस्था असतांनाही त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली या गोष्टीला सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

किस्सा आवडला

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/09/2021 - 10:05 नवीन
आपण ज्यांना गरीब समजतो बहुतेक वेळा ते लोकच खुप श्रीमंत असतात. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

भारी आहे किस्सा....

टर्मीनेटर
Fri, 07/09/2021 - 10:45 नवीन
भारी आहे किस्सा.... स्थानिकांना त्या त्या परिसराचे माहित असलेले बारकावे, त्यांचे भौगोलिक ज्ञान, त्यांची निरीक्षणे आणि अनुभव आपल्यालाही खूप काही शिकवून जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

छायाचित्रे अपलोड कशी करतात

हंटरब्राव्हो
गुरुवार, 07/08/2021 - 11:18 नवीन
छायाचित्रे अपलोड कशी करतात बुवा? मार्ग दाखवा.
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com

राघव
गुरुवार, 07/08/2021 - 12:09 नवीन
http://www.misalpav.com/comment/1030977#comment-1030977 येथे मार्गदर्शन केलेले आहे. तसेच इतर प्रतिसादही उपयुक्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंटरब्राव्हो

माहिती उपयुक्त आहे पण तरीही

हंटरब्राव्हो
गुरुवार, 07/08/2021 - 12:47 नवीन
माहिती उपयुक्त आहे पण तरीही काय समजाना बॉ… असो. काही फक्त व्यवसायानिमित्त पाहायला मिळणाऱ्या जागांचे आणि ठिकाणांचे फोटो होते. सर्वसामान्य नागरिक तिथं जाऊ शकत नाहीत म्हणून शेअर करावेसे वाटले. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

(No subject)

हंटरब्राव्हो
गुरुवार, 07/08/2021 - 12:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वेरुळ वेरुळ

प्रचेतस
गुरुवार, 07/08/2021 - 12:37 नवीन
वेरुळ Image removed. वेरुळ Image removed.
  • Log in or register to post comments

छान!

Bhakti
गुरुवार, 07/08/2021 - 14:11 नवीन
अजिंठा अजिंठा पण द्या असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे अजिंठा

प्रचेतस
गुरुवार, 07/08/2021 - 14:25 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

यातला

गुल्लू दादा
गुरुवार, 07/08/2021 - 14:59 नवीन
यातला पहिला खूप आवडला. बाकीचे पण छान आहेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तीनही फोटो अप्रतिम आहेत.

Bhakti
गुरुवार, 07/08/2021 - 16:45 नवीन
तीनही फोटो अप्रतिम आहेत. लवकर वारी घडावी रे देवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान आहेत फोटोज!

टर्मीनेटर
गुरुवार, 07/08/2021 - 17:35 नवीन
छान आहेत फोटोज! माझ्याकडेही अजिंठा लेण्यांचे काही फोटोज असतील, शोधाशोध करुन मिळाल्यास तेही डकवीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाह!

राघव
गुरुवार, 07/08/2021 - 17:45 नवीन
फार फार सुंदर वल्लीभौ! एक नंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रचेतस,

चौथा कोनाडा
गुरुवार, 07/08/2021 - 18:18 नवीन
प्रचेतस, सुंदर आहेत तिन्ही फोटोज !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अप्रतिम फोटो

गोरगावलेकर
गुरुवार, 07/08/2021 - 18:54 नवीन
दोन्ही लेण्यांचे फोटो सुंदर. अजिंठ्याचे विशेष आवडले. पेडगावचा फोटो पूर्वी पाहिला असला तरी परत बघायला छानच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/08/2021 - 14:16 नवीन
दगडातलं सौदर्य शोधावे ते याच माणसाने पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१११११११११११११११

नावातकायआहे
गुरुवार, 07/08/2021 - 14:31 नवीन
+१११११११११११११११ नाद च करायचा नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अगदी मनातलं बोललात... लेणी,

टर्मीनेटर
गुरुवार, 07/08/2021 - 15:59 नवीन
अगदी मनातलं बोललात... लेणी, शिल्प आणि मूर्तिकलांबद्दल त्यांचा व्यासंग प्रचंड आहे 🙏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वाह! सुंदर फोटोज

टर्मीनेटर
गुरुवार, 07/08/2021 - 15:46 नवीन
वाह! सुंदर फोटोज 👍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुंदर

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/08/2021 - 17:38 नवीन
उत्तम चित्रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पेडगाव

प्रचेतस
गुरुवार, 07/08/2021 - 12:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

कसले अवशेष आहेत हे?

टर्मीनेटर
गुरुवार, 07/08/2021 - 15:47 नवीन
कसले अवशेष आहेत हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पेडगावचे भग्न बाळेश्वर मंदिर.

प्रचेतस
गुरुवार, 07/08/2021 - 16:39 नवीन
पेडगावचे भग्न बाळेश्वर मंदिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

तीन तासांपूर्वी टिपलेले सह्याद्रीचे निसर्गसौदर्य...

टर्मीनेटर
गुरुवार, 07/08/2021 - 16:46 नवीन
तीन तासांपूर्वी टिपलेले सह्याद्रीचे निसर्गसौदर्य... Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

पहिला

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/08/2021 - 17:38 नवीन
खास आव्डला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

+१

राघव
गुरुवार, 07/08/2021 - 17:46 नवीन
असेच म्हणतो. फ्रेश आहे एकदम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

खूप सुंदर!

गोरगावलेकर
गुरुवार, 07/08/2021 - 18:56 नवीन
रस्त्याच्या हेअर पिन वळणाचा फोटो मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

सुरेख.

प्रचेतस
गुरुवार, 07/08/2021 - 19:03 नवीन
सुरेख. ताम्हिणी घाट की वरंधा घाट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

पेण तालुक्यातील व्याघ्रेश्वर

टर्मीनेटर
गुरुवार, 07/08/2021 - 19:18 नवीन
पेण तालुक्यातील व्याघ्रेश्वर मंदीराच्या रस्त्यावरील विराणी ह्या आदिवासी पाड्या जवळचा परिसर …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खूपच सुरेख आहे. सह्याद्री

प्रचेतस
गुरुवार, 07/08/2021 - 19:54 नवीन
खूपच सुरेख आहे. सह्याद्री कायमच सुंदरच दिसतो, मात्र पावसकाळात त्याचे सौंदर्य फारच खुलून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

सुरेख.....!

तुषार काळभोर
गुरुवार, 07/08/2021 - 22:00 नवीन
पहिला वळणदार फोटो तर एकदम भारी... . . . भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फोटो आवडले.

कंजूस
Fri, 07/09/2021 - 08:28 नवीन
साम वाळवंटाचा विशेष आवडला. तीन फेऱ्या झाल्यात राजस्थानात पण वाळवंटी भाग अजून बाकी आहे. अजून तीन लागतील. लेण्यांचे नेहमीप्रमाणे सुरेख. सह्याद्री घाट- स्वत:चे वाहन नसल्याने अशी दृष्ये एसटीच्या खिडकीतूनच पाहून समाधान मानावे लागते.
  • Log in or register to post comments

(No subject)

हंटरब्राव्हो
Fri, 07/09/2021 - 15:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

तुमचा फोटो

कंजूस
Mon, 07/12/2021 - 09:00 नवीन
Image removed. Image tag. टाकलेच नाहीत., raw=0 नाही. raw=1 करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंटरब्राव्हो

सुंदर फोटो...

टर्मीनेटर
Mon, 07/12/2021 - 11:50 नवीन
सुंदर फोटो... लेह-लडाख फोटोंमध्ये जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्षात सुंदर दिसत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सहमत

कंजूस
Mon, 07/12/2021 - 19:31 नवीन
फोटोंमध्ये जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्षात सुंदर दिसत नाही जीवघेणं थंड वाळवंट आहे. आणि मनुष्यास गाढवासारखं गवत पाण्यावर जगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

:) :) :)

टर्मीनेटर
Mon, 07/12/2021 - 21:15 नवीन
जीवघेणं थंड वाळवंट आहे. आणि मनुष्यास गाढवासारखं गवत पाण्यावर जगता येत नाही.
😀 😀 😀 अर्थात हे खरं असलं तरी त्या ठिकाणाला भेट द्यायची इच्छा असलेल्या कोणालाही नाउमेद करण्याचा माझा बिलकुल उद्देश नाही. इतक्या उंचीवर, हाडे गोठावणाऱ्या थंडीत रहाण्याची शारीरिक क्षमता, मुबलक वेळ, रस्ता मार्गे जाणार असतील तर भरपूर लांब अंतराचा आणि चक्राकार रस्त्यांवरचा प्रवास करण्याची तयारी असल्यास एक अनुभव घेण्यासाठी जरूर जावे. पण फेसबुक, इंस्टाग्राम वा अन्य सोशल मीडिया वरील विलक्षण सुंदर दिसणारे फोटोज आणि ब्लॉग्स वरची रसभरीत वर्णने वाचून किंवा RE (रॉयल एनफिल्ड) गँग्सचे अनुभव ऐकून/वाचून जायची इच्छा झाली असेल तर नक्कीच पुनर्वीचार करावा असा आगंतुक सल्ला देऊन थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लेह लडाखचे ब्लॉग

कंजूस
Tue, 07/13/2021 - 08:15 नवीन
बरेच वाचलेत. आणि फोटो प्रदर्शनंही पाहिली आहेत. एका बाइक ब्लॉगमध्ये लिहिलंय - वाटेत टपरीवर म्यागी, गुलकोज बिस्किटे, चा मिळतो. चा पिताना टपरीवाला विचारतो "आप लोग यहा क्यूं आते हैं? दसबारह बाईकवाले ग्रूप रोज दसपंधरह या जादा आते हैं। ------------- प्लान - कोची/बंगळुरु/मुंबई/पुणे ... बाइक्स रेल्वेने दिल्लीला पाठवायच्या आणि मग रोंरोंरों सुरू. पण काही अपवाद म्हणजे तिथे जाऊन थंडीतही राहतात आणि खरा अनुभव घेतात तिथल्या खडतर जीवनाचा. यापेक्षा अधिक सैन्यातले घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

मी तर म्हणतो आवर्जुन जा.

सौंदाळा
Tue, 07/13/2021 - 20:59 नवीन
मी तर म्हणतो आवर्जुन जा. अतिशय वेगळा निसर्ग, मोनेस्ट्री, रिव्हर राफ्टींग, धबधबे, ओसाड वाळवंटे, हिरवीगार कुरणे, प्रचंड तलाव, विविधरंगी डोंगर, खळ्खळुन वाहणार्‍या नद्या, तुरतुकसारखे डोंगरावर वसलेले आणि एलओसी पासुन जवळ असलेले नितांतसुंदर गाव, हानले सारखे चीन हद्दीजवळचे पक्षीनिरिक्षणासाठी प्रसिध्द गाव आणि वेधशाळा, लोमा आणि न्योमा दरम्यानचे अप्रतिम लँड्स्केप, बाईकवरुन जाताना छोट्या गावातील रस्त्याच्या कडेला एका ओळीत आपल्याला टाळ्या द्यायला थांबलेली गोजिरवाणी मुले. खुपच मजा येते. जुलै, ऑगस्टमधे तापमान पण सुसह्य असते. आणि शक्य असेल तर बाईक घेऊनच फिरा. कारमधुन फिरलात की ५०% नजारा हरवुन जातो आणि प्रवासाची मजा यायच्याऐवजी शीण येतो. २५-३० च्या स्पीड्ने डोंगरदर्‍यातुन रमत गमत बाईक चालवण्याची मजाच वेगळी. तुम्हाला खोटे वाटेल पण ६ दिवसात (नाष्टा, दोन्ही जेवणे पकडुन) एकदाच भाज्या घालुन नुडल्स (मॅगी नाही) खाल्ल्या. अर्थात बाईक चालवण्याची आवड, शारीरिक तंदुरुस्ती या महत्वाच्या गोष्टी आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

धन्यवाद. पुढच्या वेळी लक्षात

हंटरब्राव्हो
Mon, 07/12/2021 - 12:30 नवीन
धन्यवाद. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

छायाचित्रांची मेजवानी आहे ;)

अथांग आकाश
Fri, 07/09/2021 - 16:13 नवीन
छायाचित्रांची मेजवानी आहे ;) Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

हंटरब्राव्हो
Fri, 07/09/2021 - 18:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा