आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले
(मल-आशय !)
मलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे.
नाकात तुमच्या काही का ही?, का म्हणता आत दरवळते आहे.
खोल तळाशी मोठा पापलेट, वा अथवा चिकन चा तुकडा.
मलसारक हे चूर्ण त्यावरी, का? एरंडेल हा - जुनाच झगडा!
असे मलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती.
केवळ चित्र तसे पाहता, नाक दाबूनी दूर धावती.
अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो.
सोसू कळ थोडी म्हणता, अवचित प्रोग्राम होऊन जातो.
(फोटू टाकण्याचा मोह आवरला आहे हे कृप्या लक्षात घ्यावे)
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
10 Jun 2021 - 8:25 am | अत्रुप्त आत्मा
पैजार बाबा की जय!
___/\___ =))
वारलो रे वारलो!!!!
------------------------
जाता जाता:- चला,आपल्या समप्रदयात एक सक्रिय मेंबर वाढला! ;)
10 Jun 2021 - 8:29 am | अनन्त्_यात्री
त्याचे चित्र मनात तरळून गेले.
ही कविता एखाद्या योग्य कविता संग्रहाच्या मलपृष्ठाची शोभा वाढवो ही शुभेच्छा! :)
10 Jun 2021 - 8:30 am | अत्रुप्त आत्मा
@(फोटू टाकण्याचा मोह आवरला आहे हे कृप्या लक्षात घ्यावे) --- =))))))))
10 Jun 2021 - 9:04 am | प्रचेतस
अरारारारारारारा =))
कहर आहे. मूळ प्रेरणा असलेल्या कवितेच्या कवीचा ह्या प्रांतात असलेला लौकिक लक्षात घेता असे काही विडंबन येईल असे वाटलेच होते.
10 Jun 2021 - 9:42 am | संजय पाटिल
धन्य धन्य हो माउली...
10 Jun 2021 - 9:44 am | गुल्लू दादा
लय भारी..
10 Jun 2021 - 10:42 am | पाषाणभेद
विडंबन करण्यातही वेळ योग्य साधली गेली आहे. :-)
10 Jun 2021 - 10:53 am | कुमार१
लय भारी..
10 Jun 2021 - 2:04 pm | टवाळ कार्टा
=))
10 Jun 2021 - 2:39 pm | कंजूस
अहो कोणता म्हणुनी काय पुसता?
प्रतिदिनी एक दोनदा येतोच.
आता गेली दोन चार वर्षे आनंद पुसण्यातच गेली.
10 Jun 2021 - 2:45 pm | श्रीगुरुजी
मस्त!
10 Jun 2021 - 4:03 pm | इरसाल
भ्यानक......भारीच
10 Jun 2021 - 4:04 pm | चौथा कोनाडा
😆
10 Jun 2021 - 4:07 pm | वामन देशमुख
जबरा विडंबन!
मलाशयाचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली!
18 Jun 2021 - 6:10 pm | गॉडजिला
वारल्या गेल्या आहे
10 Jun 2021 - 4:08 pm | वामन देशमुख
10 Jun 2021 - 4:30 pm | सोत्रि
जबरदस्त!
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
- (पैजारबुवांचा पंखा झालेला) सोकाजी
10 Jun 2021 - 4:46 pm | गॉडजिला
मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे !
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे !
लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की
राजसा, माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे !
तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे !
रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे !
30 Jun 2021 - 12:26 pm | चौथा कोनाडा
देही वणवा पिसाटला
चंद्राने टाकलिया ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला
चांदण उरात
रात ही भरात
सोडून मोकळे केस
धोक्याच ठिकाण
आलया तुफान
मोडून लाजेची वेस
भरतीची वेळ…मांडून खेळ
चांदवा उधाणला
चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर
तार्याच्या डायमंडचा झुमका
सॅण्डलच्या कडीगत कमरेला चैन
करी बेचैन मादकसा ठुमका
गोर्या या गाली देतो
माज थोडी लाली
माझी व्हीनसच्या शाईनची काया
आणली तुझ्यापाशी कंप्लीट ही गॅलक्सी
टाइम नको दवडू वाया
वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप
अधांतरी जीव शिणला
11 Jun 2021 - 4:41 pm | तुषार काळभोर
ज.ह.ब.ह.रा.हा.ट!
काय ती प्रतिभा म्हणायची!
17 Jun 2021 - 4:35 pm | चांदणे संदीप
कहर! निस्ता धुराळा!
सं - दी - प
23 Jun 2021 - 12:37 pm | खिलजि
पैंबू काका ... फोटूपण टाका
ह्ही ह्ही ह्ही
चारपाच जण फोटू बघून असेच बारीक होऊन जातील
बारीक काय मी तर म्हंतो जेवायचे सोडून देतील