काय वाचताय ?
प्रेरणा- मदनबाण यांचा मी सध्या काय पाहतोय धागा.
मला वाटते, की सिनेमे, टिव्ही/ओटीटी सिरीज, युट्यूब व्हिडीओज सारखेच पुस्तकं, ब्लॉग्ज, पेपर/नियतकालिकांमधली विशिष्ठ विषयांवरची सदरे किंवा कोणतेही वाचायचे माध्यम यांच्या बद्द्ल देवाणघेवाण सुद्धा मनोरंजक राहील. वाचण्यासाठी नवनवीन गोष्टी समजतील.
मी सुरुवात करतो.
मी खालील दोन पुस्तके वाचत आहे:
१. फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी ‘ड्युन’ (Frank Herbert’s ‘Dune’)- १९६५
पृष्ठसंख्या- ४१२

-विज्ञानकादंबर्यांमध्ये खुप प्रसिद्ध कादंबरी आहे ही. सर्वोत्तम विज्ञानकथांच्या याद्यांमध्ये हटकून ड्युन दिसत होती. म्हणल ट्राय करुन बघुया. आता जिथपर्यंत वाचून झाली आहे तिथपर्यंत ही कादंबरी फक्त विज्ञानकथा नसून सरळ सरळ एपिक फॅन्टसी सारखी वाटते आहे. पूर्ण नवीन विश्व लेखकाने उभारले आहे. कथा- मानवजात एका इम्पेरियम/साम्राज्यामध्ये एकत्र आहे. साम्राज्याचा प्रमुख म्हणुन एक सम्राट आहे, आणि वेगवेगळ्या ग्रहांवर सम्राटाच्या नावे व्यवस्थापन करणारी घराणी आहेत, (अंतराळातले गेम ऑफ थ्रोन्स म्हणता येईल, फक्त हे GoT च्या आधी प्रकाशित झाले आहे.) तर, आर्टेड्स घराण्याचा, स्पेसिफिकली, पॉल आर्टेड्स या मुलाचा प्रवास आपण पाहातो. त्यांच्या होम-ग्रहावरुन आर्टेड्सना नवीन ग्रहाचे व्यवस्थापन दिले असते- आराकीस नावाच्या ग्रहाचे. ह्या ग्रहाचा ९०%+ वाळवंटी असतो. पाणी इतके दुर्मिळ असते की तेच चलन आणि संपत्ती असते. तिथे खोल वाळवंटामध्ये "मलेन" नावाचा पदार्थ सापडत असतो, जो जिवन वाढवणारा असतो, आणि त्यामुळे अत्यंत मौल्यवान. पण हा पदार्थ गोळा करणे सुद्धा तितकेच अवघड असते, कारण वाळूमधून झटकन प्रवास करु शकणार्या राक्षसी अळ्या नेहमी त्या पदार्थांच्या साठ्याच्या आसपास असतात. त्यापुढे, हार्कोनेन घराणे, जे आर्टेड्सचे काही पिढ्यांपासूनचे शत्रू असतात, त्यांनी बरेच वर्ष आराकीस वर राज्य केले असते. त्यामुळे, त्यांनी आर्टेड्स साठी काहीना काही सापळा आराकीस वर रचून ठेवलाय हे नक्की असते. आराकीस वरचे नेटिव्ह लोक म्हणजे फ्रेमेन. हे फ्रेमेन लोक पाण्याच्या दुर्भिक्षात राहाण्यासाठी अॅडॅप्ट असतात. वाळवंटात फिरताना शरीरातला ओलावा वातावरणात आजिबात निसटू नये म्हणून 'स्टिलसूट' नावाचे वस्त्र वापरत असतात. आणखी मसाला असतो तो म्हणजे 'बेने गेशेरीत' नावाची संस्था असते, जी फ्रेमेन सारख्या "रानटी" किंवा मुख्य धारेतल्या बाहेरच्या लोकांचा पुढे मागे वापर करुन घेण्यासाठी त्यांच्यात, (खोट्या) प्रोफेसीज/भविष्यवाण्या पेरुन ठेवत असते. एकूण, पॉल ह्या भविष्यवाण्यांच्या आधारे स्वतःला मुआ'दीब नावाने फ्रेमेन्सच्या लढाऊ आणि आक्रमक धर्माचा प्रेषित कसा बनवतो, आणि हार्कोनेन घराण्याशी कसा लढतो अशी कथा आहे. ह्यात ईस्लामच्या उदयाशी पॅरॅलल स्पष्ट आहेत. बरेच फारसी शब्द वापरले आहेत. कथेवर तीन वेळा सिनेमा येऊन गेला आहे आणि चौथ्यांदा यावर्षी येणार आहे. टिमोथी कॅल्मेट पॉलच्या भुमिकेत दिसेल. २. द कमिंग ऑफ द थर्ड राईश- रिचर्ड एव्हन्स. (२००४) पृष्ठसंख्या- ६५६
वाळींबेंचे नाझी भस्मासूराचा उदयास्त न वाचलेल्या दुर्मिळ लोकांपैकी मी एक आहे. तेव्हा हे अगदी क्लीन स्लेट घेऊन वाचत आहे. नाझी जर्मनी वरच्या त्रिधारेतले हे पहीले पुस्तक आहे. त्रिधारा अशी आहे- १. द कमिंग ऑफ द थर्ड राईश २. थर्ड राईश अॅट पॉवर ३. थर्ड राईश अॅट वॉर. पुस्तकाची दिर्घ प्रस्तावना खुप उत्तम आहे. नाझी जर्मनीवर इतकी पुस्तके येऊन गेली आहेत, मग आणखी एक लिहायचे प्रयोजन काय? ह्या प्रश्नाचे उत्तर लेखक एव्हन्स ह्यांनी दिले आहे. की नाझी जर्मनीचा संक्षिप्त, किंवा निवडक पैलूंवर प्रकाश टाकणारी बरीच चांगली आणि वाईट पुस्तकं असली तरी, नाझी जर्मनीतल्या नागरीकाला सभोवताली काय दिसत होते ? त्या वेळी काय चर्चा, काय राजकीय प्रश्न होते ? आणि एकूणच नाझी जर्मनीचे सखोल आणि सर्वांगीकचित्रणपाहाण्यास मिळत नाही. ते या त्रिधारे द्वारा देण्याचा प्रयत्न आहे. पहीले पुस्तक जिथपर्यंत वाचून झाले त्यावरुन सखोल महीती मिळणार हे समजले आहे. आत्तापर्यंत बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा ह्यांचे शासन, आणि पहील्या महायुद्धानंतर धाधांत अराजकतेनंतर जर्मनी मध्ये पहीले लोकशाही शासन १९१८ मध्ये कसे आले, आणि व्हर्सेलीस करारातल्या अपमानकारक अटींचा राजकारण आणी नागरी जीवन यांच्यावर काय प्रभाव पडला हे सांगितले आहे. जर्मनीत धार्मिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष, ते वांशिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष हा प्रवास तपशीलवार दाखवला आहे. यापुढे पुस्तक लोकशाही राज्य १९१८-१९३३ दरम्यान कसे चालले, लोकांचा वैचारीक कल कुठे होता आणि तो कसा हळूहळू बदलत गेला, असे जाईल आणि शेवटी १९३३ मध्ये नाझी जर्मनीचा उदय होऊन संपेल. पुस्तक अत्यंत तपशीलवार आहे, आणि ह्या बद्दल रस असल्यास उत्तम पर्याय आहे. तुम्ही काय वाचताय ? (चित्रे आंतरजालावरुन साभार.)

वर्गीकरण
वाचने
43541
वाचनखूण
प्रतिक्रिया
96
वा !
In reply to वा ! by हेमंतकुमार
भारी!
In reply to भारी! by कॉमी
+१
In reply to भारी! by कॉमी
कालच तूनळीवर हे नाटक पाहिले.
चांदोबा चे जुने अंक ..
In reply to चांदोबा चे जुने अंक .. by आंद्रे वडापाव
@ आन्द्रे वडापावः चांदोबाचे जुने अंक कुठे मिळाले ?
In reply to @ आन्द्रे वडापावः चांदोबाचे जुने अंक कुठे मिळाले ? by चित्रगुप्त
@ चित्रगुप्त .. इथे पहा
In reply to @ चित्रगुप्त .. इथे पहा by संग्राम
@संग्राम
In reply to @ चित्रगुप्त .. इथे पहा by संग्राम
@संग्राम :नव्यात जुनेपण आहे. अनेक आभार.
In reply to @ चित्रगुप्त .. इथे पहा by संग्राम
संग्रामशेठ, भरपूर दिवस पुरेल
In reply to @ चित्रगुप्त .. इथे पहा by संग्राम
धन्यवाद
सध्या गृहशोभिकेचे काही अंक वाचत आहे
फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी
In reply to फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी by Bhakti
.
In reply to . by कॉमी
किती दिवसांनी ही नावं ऐकली
In reply to . by कॉमी
ड्यून भाग दुसरा आज पाहिला.
In reply to . by कॉमी
नोटेड...
In reply to नोटेड... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा भाग इतका रोमांचित आहे की
कमिंग ऑफ थर्ड राईश वरती
In reply to कमिंग ऑफ थर्ड राईश वरती by आनन्दा
नक्कीच प्रयत्न करीन. _/\_
उत्तम धागा
In reply to उत्तम धागा by प्रचेतस
आमच्या सारख्या नूब्जनी कोणते
In reply to आमच्या सारख्या नूब्जनी कोणते by कॉमी
पाडगावकरांनी अनुवाद केलेले
In reply to पाडगावकरांनी अनुवाद केलेले by प्रचेतस
The Mahabharata: Vol I & II - A Modern Rendering - रमेश मेनन
In reply to The Mahabharata: Vol I & II - A Modern Rendering - रमेश मेनन by तुषार काळभोर
@ प्रचेतस आणि तुषार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- MasterIn reply to @ प्रचेतस आणि तुषार by मदनबाण
भास्य रचल्याने हे भाष्य करत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Masterसध्याच
In reply to सध्याच by जेम्स वांड
क्या बात है वांडोबा, लै
In reply to क्या बात है वांडोबा, लै by प्रचेतस
पापिलॉन व डेझर्टर अतिशयोक्तच आहेत
In reply to पापिलॉन व डेझर्टर अतिशयोक्तच आहेत by गॉडजिला
एस्केप स्टोरी वरून
In reply to क्या बात है वांडोबा, लै by प्रचेतस
प्रचेतस भाऊ
मी आणि नथुराम
द इन्साइडर
In reply to द इन्साइडर by वामन देशमुख
याचा मराठी अनुवाद अंतःस्थ
In reply to द इन्साइडर by वामन देशमुख
या पुस्तकाबद्दल माहित नव्हते.
द ब्लॅक क्लाउड
द ब्लॅक क्लाउड
कोणते महाभारत वाचावे?
A World Without Islam हे
सध्या द सेवन्थ स्क्रोल हे
In reply to सध्या द सेवन्थ स्क्रोल हे by राघव
त्याच्या आधीचे द रिव्हर गॉड
In reply to त्याच्या आधीचे द रिव्हर गॉड by प्रचेतस
मी सेवेन्थ स्क्रोल वाचले आहे
In reply to मी सेवेन्थ स्क्रोल वाचले आहे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद.
In reply to सध्या द सेवन्थ स्क्रोल हे by राघव
सेवन्थ स्क्रोल रोचक वाटतेय.
भारतातले घोडे
द मित्रोखिन अर्काएव्स - द
मी सध्या
सध्या व्यंकटेश माडगूळकरांचे
निसर्गप्रेमी? प्राण्यांबद्दल?
In reply to निसर्गप्रेमी? प्राण्यांबद्दल? by कंजूस
लगेच बघतो!!!
'बुडता मज आवरी' १/४ राहिलय.
सध्या या पुस्तकाचे पुनर्वाचन
...
In reply to ... by कॉमी
ड्यून
...
अधुन मधुन वाचन.
लव्हाळी - श्री ना पेंडसे
In reply to लव्हाळी - श्री ना पेंडसे by धनावडे
खरं त्याचा काळ आहे मुंबईतला
श्री संत एकनाथ महाराज कृत
कथा
सुधारणा ..
ग्राफिक नॉव्हल !
ही मार्जेनची आत्मकथा आहे. वर्ष- १९७८, इराण. इराण मध्ये पहलवी घराण्याची सत्ता आहे, पण ती संपुष्टात त्याच वर्षी आली. मार्जिचे वय होते- १०. ती उच्चशिक्षित आणि धर्माच्या प्रभावातून मोकळे असणाऱ्या प्रेमळ घरात राहत होती. मार्जिचे आई वडील दोघेही मार्क्सिस्ट होते. ती स्वतः फ्रेंच प्रभाव असलेल्या युनिसेक्स शाळेत जात असे. त्या वेळेस पहलवी घराण्याच्या शहाने आपल्या विरोधकांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न चालू केले होते. रेक्स नावाच्या थिएटरला आतील लोकांसकट जाळून टाकल्याने (पोलिसांनीच जाळले असे विरोधकांचे म्हणणे होते.) लोकांचा आक्रोश वाढला, आणि हुकूमशाही संपवण्याची चळवळ जोराने उभी राहिली. मार्जिचे आईवडील सुद्धा चळवळीत सहभागी होते. पण, १९७९ मध्ये इराणीयन रिव्हॉल्युशन किंवा इस्लामिक रिव्हॉल्युशन मुळे आयातुल्ला खोमेनी सत्तेवर आला, आणि इराण आगीतून फुफाट्यात गेला, आणि इस्लामिक राष्ट्र म्हणून इराणची स्थापना झाली. त्या नंतर झालेल्या सामाजिक बदलांचे चित्रण सेत्रापी यांनी पर्सेपोलिस मधून केली आहे. पर्सेपोलिस म्हणजे पर्शियन साम्राज्याची राजधानी. पर्शियन साम्राज्याच्या वैभवाची आठवण म्हणून नाव पर्सेपोलिस ठेवले आहे. सेत्रापी म्हणतात-
In reply to ग्राफिक नॉव्हल ! by कॉमी
रोचक कथानक वाटते
In reply to रोचक कथानक वाटते by गॉडजिला
+११
In reply to रोचक कथानक वाटते by गॉडजिला
पर्सिपोलिस नाव वाचून
In reply to पर्सिपोलिस नाव वाचून by प्रचेतस
रोचक माहिती.
In reply to रोचक माहिती. by कॉमी
अशोकस्तंभ म्हणजे तुम्ही
In reply to अशोकस्तंभ म्हणजे तुम्ही by प्रचेतस
दोनीही. विकित सारनाथचा स्तंभ
In reply to दोनीही. विकित सारनाथचा स्तंभ by कॉमी
मौर्यन स्तंभ हे स्वतंत्र उभे
ऋषिकेश गुप्तेंचा अंधारवारी
In reply to ऋषिकेश गुप्तेंचा अंधारवारी by कॉमी
गानु आजी
In reply to गानु आजी by तुषार काळभोर
हो, कारण-
हिटलर चे यश ?
In reply to हिटलर चे यश ? by धर्मराजमुटके
लोक हा विषय फार अवघड आहे समजणे
In reply to लोक हा विषय फार अवघड आहे समजणे by गॉडजिला
हेच कारण आहे महाभारत आजही अमर
तीन हजार टाके -सुधा मूर्ती
नुकतंच 'किशोर शांताबाई काळे'
In reply to नुकतंच 'किशोर शांताबाई काळे' by मनो
पुस्तक छान आहे
In reply to नुकतंच 'किशोर शांताबाई काळे' by मनो
तेंव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सुधारला असं म्हणता येईल!
In reply to तेंव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सुधारला असं म्हणता येईल! by तुषार काळभोर
ज्यांना
In reply to नुकतंच 'किशोर शांताबाई काळे' by मनो
बापरे. वाचायलाच पाहिजे.
In reply to नुकतंच 'किशोर शांताबाई काळे' by मनो
पुस्तक काल वाचलं
शांताराम वाचलंय का कोणी?
In reply to शांताराम वाचलंय का कोणी? by तुषार काळभोर
हो, वाचलंय.
In reply to हो, वाचलंय. by प्रचेतस
यावर चित्रपट निघणार होता
In reply to शांताराम वाचलंय का कोणी? by तुषार काळभोर
एकदा वाचायला चांगले आहे.
आज सकाळी मेडिटेशनवर असलेली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen ChawlaIn reply to आज सकाळी मेडिटेशनवर असलेली by मदनबाण
मोठेपणीही मला बालपणात घेऊन गेलेली जी पुस्तके आहेत
अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या या
इश्कमे शहर होना
In reply to इश्कमे शहर होना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
In reply to इश्कमे शहर होना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
भाऊ पाध्ये यांचे १९६५ मध्ये
In reply to भाऊ पाध्ये यांचे १९६५ मध्ये by श्रीगुरुजी
वसुनाका फार पुर्वी वाचल होतं
कायदाविषयक.
अधर्मयुध्द हे गिरीष कुबेर