कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज
३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
........................
पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
.......
31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.
या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.
ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.
गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.
दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.
अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत.
कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.
अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्क्यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………In reply to IGg antibodies म्हणजे काय? by चामुंडराय
In reply to आजचा मटा by चौकटराजा
In reply to चौरा by हेमंतकुमार
In reply to चौरा by हेमंतकुमार
In reply to चौरा by हेमंतकुमार
In reply to खरे तर by Rajesh188
In reply to खरे तर by Rajesh188
एच आय व्ही रिसस माकडे संबंध असाच आलेला काय ?>> याचे विवेचन मी आधी इथे केलेले आहे : https://misalpav.com/node/43784 मुळात हा खतरनाक विषाणू माणसात आला कुठून याचे संशोधकांना कुतूहल होते. हा शोध घेता त्याचे मूळ मध्य व पश्चिम आफ्रिकेत सापडले. तेथील चिम्पान्झी आणि अन्य काही माकडांना त्याचा संसर्ग होतो. २०व्या शतकाच्या मध्यात या प्रदेशांत माणसे वृक्षतोडीसाठी ट्रकने जाऊ लागली. त्या दरम्यान ती तेथील वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण करू लागली. त्यातूनच कधीतरी एखाद्या HIV संसर्ग झालेल्या मांसातून हा विषाणू माणसाच्या संपर्कात आला. अशा तऱ्हेने बाधित झालेल्या माणसातून तो समाजात आला आणि पुढे जगभर फैलावला.
In reply to राजेश by हेमंतकुमार
In reply to आजची बातमी by चौकटराजा
In reply to उपाय .. by हेमंतकुमार

In reply to भावी संशोधन by हेमंतकुमार
In reply to पुढे सार्स व्हायरस च त्रास देईल असे काही नाही. by Rajesh188
In reply to उपयुक्त by हेमंतकुमार
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
In reply to आपली जनता थोडक्यात बचावली अशा by आग्या१९९०
In reply to कोविडोत्तर निरीक्षण by हेमंतकुमार
काही रुग्णांच्या बाबतीत सांधेदुखी आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात
बापरे! In reply to परंतु कोविडचे दीर्घकालीन by गॉडजिला

In reply to पूरक उपचार : ताजी बातमी by हेमंतकुमार
In reply to एक प्रश्न by माहितगार
In reply to उत्तर : by हेमंतकुमार
In reply to धन्यवाद, अतिशय महत्वाची by रात्रीचे चांदणे
In reply to उत्तर : by हेमंतकुमार
In reply to २- deoxy-ग्लुकोज किंमत वाजवी की अवाजवी? by माहितगार
२- deoxy-ग्लुकोज च्या उत्पादन प्रक्रीयेत असा नेमका किती फरक असणार आहे?>>> याचे अभ्यासपूर्ण उत्तर औषधनिर्माण शास्त्रातील तज्ञ व्यक्ती देऊ शकेल. मलाही जाणून घ्यायला आवडेल.
In reply to mucormycosis टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ? by माहितगार
In reply to + by हेमंतकुमार
बुरशी लागणचे प्रमाण या वेळी अधिक का आहेतूर्त माझ्यासमोर तुलनात्मक विदा नाही. पण काही शक्यता अशा वाटतात : दुसऱ्या लाटेमध्ये अधिक माणसे आजारी पडणे, अधिक रुग्णालयात दाखल करावी लागणे आणि ऑक्सिजनचे उपचार अधिक प्रमाणावर करावे लागणे या गोष्टी दिसून आल्यात. आता बुरशीजन्य आजार होण्याची तीन कारणे पुन्हा बघू : १. स्टिरॉइडचा अधिक डोसमध्ये व अधिक काळ वापर २. रुग्णाचे अतिदक्षता विभागातील अधिक काळ वास्तव्य ३. काही रुग्णांच्या ऑक्सिजन उपचारादरम्यान ह्युमिडीफायर्स वापरतात. त्यातील पाणी निर्जंतुक केलेले नसणे. वरील घटक या लाटेत कारणीभूत ठरले असावेत.
In reply to मागा by हेमंतकुमार
In reply to मागा , by हेमंतकुमार
In reply to मागा , by हेमंतकुमार
In reply to डॉ.हर्ड इम्यनिटी कशी मिळू by Bhakti
In reply to भक्ती, by हेमंतकुमार
In reply to अ अ , by हेमंतकुमार
मात्र आता आपल्याकडे जे सोळा आठवड्यापर्यंत केले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही.त्यामागे लसींचा तुटवडा हे अशास्त्रीय कारण असावे :)
In reply to मात्र आता आपल्याकडे जे सोळा by प्रचेतस
In reply to माहितीपूर्वक लिंक by राहुल मराठे
याच्या उपचारासाठी clotrimazole, miconazole, or nystatin, fluconazole
या प्रकारची औषधे वापरली जातात.फन्गल इन्फेक्शन भारतातच अधिक आहेत का?>> त्यासंबंधी इथे काही माहिती आहे. त्यानुसार मार्च अखेरीस जगातील एकूण बुरशी रुग्णांपैकी 70 टक्के भारतात होते. परंतु इथे मेख आहे. ही महासाथ सुरू होण्यापूर्वी या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण आधी बघू. दोन देशांची तुलना इथे दिलेली आहे. रुग्णसंख्या प्रति लाख लोक अशी आहे : भारत 14 ऑस्ट्रेलिया 0.06 या वर्षाखेरीस विस्तृत विदा आल्यावर अधिक भाष्य करता येईल.
In reply to आदरांजली ! by हेमंतकुमार
In reply to नवी माहिती by हेमंतकुमार
त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते.+१११
या महामारीच्या अगोदर कुणाला म्युकरमायकोसिस का झाला नाही>>> आधीही हा आजार भारतात वाढत होता असे हा २०१९ चा संदर्भ म्हणतो . ....... " In reality, a rising number of cases are reported from India [5,10,16,17]."
डॉ. तात्या राव लहाने हा माणूस विश्वासार्ह राहिलेला नाही. राजकारणी माणसांना लस देण्यासाठी हि व्यक्ती त्यांच्या घरी जाते (याचे अनेक फोटो वृत्तपत्रात आले होते) हे एकंदर वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. आणि अशी लस घरी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे सुद्धा ओढले होते.एखाद्या विषयावरील भाष्य करण्याचा नैतिक अधिकार हा विश्वासार्हतेवर अवलंबून असतो हे मान्य आहेच. पण तर्कशास्त्रानुसार विश्वासार्ह नसलेला/ नैतिक आधिकार नसलेला माणूस प्रत्येक वेळेस खोटेच बोलेल असे गृहीत धरता येत नाही. समुद्रातल्या चक्रीवादळाची बातमी इतरबाबतीत विश्वासार्ह नसलेल्या माणसाने देऊन जहाज बंदरात आणण्याचे सुचवले पण व्यक्ती विश्वासार्ह नाही म्हणून नाकारले पण चक्रिवादळाची बातमी तर बरोबर होती आणि जहाज आणि त्यातील माणसे बुडाली असेही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक जोखिमीच्या शक्यतेचा शहानिशा व्यक्तिच्या विश्वासार्हतेची बाब बाजूस ठेऊन केली जाणे श्रेयस्कर आणि गरजेचे असू शकते किंवा कसे. कोरोना व्हायरसच्याच बाबतीत वुहान मधून वेगळ्या व्हायरसची शक्यता व्यक्त करणार्या डॉक्टरवरचेच आधी तोंड बंद करण्याचा प्रकार चिनी मंडळींनी केला आणि त्याचे परिणाम अखील मानव भोगतो आहे. करोना व्हायरस एअरबोर्न असण्याचे लक्षात न येणे, मास्कची गरज वेळीच लक्षात घेता न येणे याही गोष्टी तार्कीक उणीवेमुळेच घडल्या. आणखीही बरीच उदाहरणे पँडेमीक हाताळणीत दिसून येतात. एकीकडे तात्याराव लहाने वैद्यकीय उपचारांबद्दल लावल्या जाणार्या गालबोटाची जबाबदारी झटकण्या साठी व्हायरस म्युटेशन कडे बोट दाखवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तात्यारावांच्या दाव्यातही तार्कीक उणिवेची शक्यता नाकारता येत नाही) दुसरीकडे व्हायरस मुटेशनच्या परिणामाने श्युगरलेव्हल वाढण्याची शक्यता शंका जरी आली तरी वैज्ञानिक पद्धतीने तपासल्याशिवाय फेटाळणे श्रेयस्कर ठरत नसावे किंवा कसे. सांगण्याचा मुद्दा वैज्ञानिक दृष्टीकोणासाठी, तात्यारावांचे इतर बाबीतील वागणे आणि त्यांनी व्याधीबाबत केलेली तक्रार यांची गल्लत करणे श्रेयस्कर नसावे किंवा कसे.
In reply to तर्कांबाबत सावधानता by माहितगार
In reply to तेंव्हा करोना मुळे रक्तातील by सुबोध खरे
In reply to तेंव्हा करोना मुळे रक्तातील by सुबोध खरे
एकीकडे तात्याराव लहाने वैद्यकीय उपचारांबद्दल लावल्या जाणार्या गालबोटाची जबाबदारी झटकण्या साठी व्हायरस म्युटेशन कडे बोट दाखवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तात्यारावांच्या दाव्यातही तार्कीक उणिवेची शक्यता नाकारता येत नाही)माझ्या प्रतिसादातून उपरोक्त वाक्यही स्पष्ट केले आहे. तात्यारावांच्या इतरही उणीवा असतील पण संबंध नसलेल्या ठिकाणी त्यांचा संबध लावणे विज्ञानास आणि तर्कशास्त्रास अनुसरुन आहे का याची खात्री करणे श्रेयस्कर असावे एवढाच काय तो मुद्दा मी मांडला आहे. प्रा.डॉ. ते अनेक इतरही मित्रवर्यांच्या लेखनावरही वेळोवेळी तार्कीक मर्यादा दाखवण्याची वेळ येते तेव्हा तसे आपपर भाव न ठेवता खीसपाडणे हा आमच्यासारख्या कुरुंदकरी बाण्याच्या लोकांचा स्थायीभाव असतो. बाकी आपल्या वेळोवेळच्या ज्ञान आणि मार्गदर्शना बद्दल आदर आहेच. 'हेल्दी' चर्चेसाठी अनेक आभार.
In reply to उपचार.. by हेमंतकुमार
In reply to कोविड ची लास घेतल्यानंतर ४५ by राहुल मराठे
In reply to औषधांवरून एक प्रश्न by तुषार काळभोर
- स्पुतनिक लस घ्यावी का?
- ही लस कुणी मिपाकराने घेतली आहे का?
- ही लस घेणे सुरक्षित आहे का?
In reply to स्पुतनिक लस घ्यावी का? by वामन देशमुख
In reply to लस मिश्रण by हेमंतकुमार
In reply to माझ्या एका नातेवाईकाने by शाम भागवत
In reply to अतिशय सुंदर लेख by Nitin Palkar
In reply to रोज पेपर मधे नवीन रुग्ण, बरे by मराठी_माणूस
In reply to माझे अनेक मित्र अमेरिकेत by सुबोध खरे
In reply to बरोबर. by गवि
In reply to नाही, याचा अर्थ तसा नाही. by सुबोध खरे
In reply to नाही, याचा अर्थ तसा नाही. by सुबोध खरे
In reply to असे असेल तर इतर आजार असणार् by मराठी_माणूस
In reply to माझे अनेक मित्र अमेरिकेत by सुबोध खरे
In reply to डेल्टा व निरीक्षणे by हेमंतकुमार
In reply to लस घेतलेल्या लोकामध्ये by Rajesh188
लेख आवडला. चर्चा वाचायला