कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज
३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
........................
पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
.......
31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.
या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.
ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.
गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.
दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.
अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत.
कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.
अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्क्यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………
वाचने
114768
वाचनखूण
प्रतिक्रिया
230
प्रतिक्रिया
लेख आवडला. चर्चा वाचायला
उत्तम लेख.
.....
लस व कोविद अप्रोप्रिएट बिहेवियर ... शंकासमाधान
लिन्क
IGg antibodies म्हणजे काय?
In reply to IGg antibodies म्हणजे काय? by चामुंडराय
चामुंडराय,
माहिती बद्दल धन्यवाद
आजचा मटा
In reply to आजचा मटा by चौकटराजा
चौरा
In reply to चौरा by हेमंतकुमार
जमल्यास ..
In reply to चौरा by हेमंतकुमार
नाही दिसत लेख तिथे.आणि मांस
In reply to चौरा by हेमंतकुमार
नाही दिसत लेख तिथे.आणि मांस
खरे तर
In reply to खरे तर by Rajesh188
मांसाहार ..
In reply to खरे तर by Rajesh188
संम ला विनंती आहे की या
चौरा,
बाधित व्यक्ती च्या
बाधित व्यक्ती च्या
राजेश
In reply to राजेश by हेमंतकुमार
अजून एक अंदाज आहे ....
आजची बातमी
In reply to आजची बातमी by चौकटराजा
मी मुंबईत राहत असताना एका
विकृत लोक आहेत
व्यथा पीपीईच्या
उपाय ..
In reply to उपाय .. by हेमंतकुमार
आपला सर्वांचाच अनुभव
उपयुक्त
धन्यवाद!
ल भा,
सर्व मिपाकरांना...
भावी संशोधन
In reply to भावी संशोधन by हेमंतकुमार
या संशोधनातून खालील सुधारणा करण्याचे योजिले आहे :
पुढे सार्स व्हायरस च त्रास देईल असे काही नाही.
In reply to पुढे सार्स व्हायरस च त्रास देईल असे काही नाही. by Rajesh188
मानवी आरोग्यासाठी हजारों
ताजी बातमी :
उपयुक्त
In reply to उपयुक्त by हेमंतकुमार
उपयुक्त
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
सुखद बातमी. डॉक्टरांचे कौतुक
बनावट औषधविक्री
आपली जनता थोडक्यात बचावली अशा
In reply to आपली जनता थोडक्यात बचावली अशा by आग्या१९९०
WHO कुठल्याही औषधाला मान्यता
कोविडोत्तर निरीक्षण
In reply to कोविडोत्तर निरीक्षण by हेमंतकुमार
माझे दोन नातेवाईक पहील्या
+१
बापरे!
काही रुग्णांच्या बाबतीत सांधेदुखी आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतातबापरे!परंतु कोविडचे दीर्घकालीन
In reply to परंतु कोविडचे दीर्घकालीन by गॉडजिला
:)
उपयुक्त
पूरक उपचार : ताजी बातमी
In reply to पूरक उपचार : ताजी बातमी by हेमंतकुमार
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by माहितगार
उत्तर :
In reply to उत्तर : by हेमंतकुमार
धन्यवाद, अतिशय महत्वाची
In reply to धन्यवाद, अतिशय महत्वाची by रात्रीचे चांदणे
रा चा ,
In reply to उत्तर : by हेमंतकुमार
२- deoxy-ग्लुकोज किंमत वाजवी की अवाजवी?
In reply to २- deoxy-ग्लुकोज किंमत वाजवी की अवाजवी? by माहितगार
मा गा
वा! बातमी पाहून मनांत उमटलेल्या .......
mucormycosis टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ?
In reply to mucormycosis टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ? by माहितगार
म्हणजे इथे
+
In reply to + by हेमंतकुमार
धन्यवाद डॉ. कुमार,
मागा
In reply to मागा by हेमंतकुमार
हाच प्रश्न होता.कारण समजलं.
लस दुष्परिणाम
गोंधळी,
मागा ,
In reply to मागा , by हेमंतकुमार
धन्यवाद, आणखी गुगलींग
मागा ,
In reply to मागा , by हेमंतकुमार
डॉ.हर्ड इम्यनिटी कशी मिळू
In reply to डॉ.हर्ड इम्यनिटी कशी मिळू by Bhakti
भक्ती,
In reply to भक्ती, by हेमंतकुमार
इस्रायलचे कौतुक.
भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका ?
प्रा डॉ,
हे पाहा
सेकुलर लोकाना
दिव्यकिर्ती म्हणून व्लॉगरचा
मा गा
लस घेउनही सन्सर्ग
https://www.loksatta.com/desh
अ अ ,
In reply to अ अ , by हेमंतकुमार
मात्र आता आपल्याकडे जे सोळा
In reply to मात्र आता आपल्याकडे जे सोळा by प्रचेतस
शक्यता तीच वाटतेय. किंवा
Ivermectin : मतभिन्नता
माहितीपूर्वक लिंक
In reply to माहितीपूर्वक लिंक by राहुल मराठे
श्री. राहुल मराठे,
धन्यवाद .
.....
पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे करोनामुळे निधन
नवीन औषध खरच परिणामकारक आहे का?
सु मा
पांढऱ्या बुरशीचा आजार
रेमडिसेविर dropped
भक्ती ,
हो अगदी!
आदरांजली !
In reply to आदरांजली ! by हेमंतकुमार
चिपको आंदोलन ना?
नवी माहिती
In reply to नवी माहिती by हेमंतकुमार
हा नवीन स्ट्रेन
+१११
पण....
तर्कांबाबत सावधानता
In reply to तर्कांबाबत सावधानता by माहितगार
तेंव्हा करोना मुळे रक्तातील
In reply to तेंव्हा करोना मुळे रक्तातील by सुबोध खरे
हा नवीन स्ट्रेन
In reply to तेंव्हा करोना मुळे रक्तातील by सुबोध खरे
आपल्या वैद्यकीय
मागा
In reply to मागा by हेमंतकुमार
_/\_
उपचार..
In reply to उपचार.. by हेमंतकुमार
विज्ञान प्रगतीपथावर आहे हि
लसिकरण, वायूजन्यता आणि कोविडकाळजीस साजेसे वागणे
लेख...
कोविड ची लास घेतल्यानंतर ४५
In reply to कोविड ची लास घेतल्यानंतर ४५ by राहुल मराठे
लस
रा. म.
नवे औषध
औषधांवरून एक प्रश्न
In reply to औषधांवरून एक प्रश्न by तुषार काळभोर
अगदी ...
स्पुतनिक लस घ्यावी का?
- स्पुतनिक लस घ्यावी का?
- ही लस कुणी मिपाकराने घेतली आहे का?
- ही लस घेणे सुरक्षित आहे का?
मला मत / सल्ला हवा आहे. हा प्रतिसाद या धाग्यावर अयोग्य वाटत असल्यास क्षमस्व.In reply to स्पुतनिक लस घ्यावी का? by वामन देशमुख
डॉ. गोडबोले यांच्या मते तरी
वादे,
प्रगती
कशामुळे नियंत्रित आलो दुसरी लाट
पहाडमूळ : संशोधन
सुधारणा ..
मान्यता
लस आयात
लस मिश्रण
In reply to लस मिश्रण by हेमंतकुमार
माझ्या एका नातेवाईकाने
In reply to माझ्या एका नातेवाईकाने by शाम भागवत
शा भा
अतिशय सुंदर लेख
In reply to अतिशय सुंदर लेख by Nitin Palkar
निपा,
लस सक्ती
ऑलिम्पिक्स...
डेल्टा
उपयुक्त संशोधन
त्रिसूत्रीचे पालन
कोणतेच ठाम निष्कर्ष नाहीत
नवी लस मंजुरी
रोज पेपर मधे नवीन रुग्ण, बरे
In reply to रोज पेपर मधे नवीन रुग्ण, बरे by मराठी_माणूस
माझे अनेक मित्र अमेरिकेत
In reply to माझे अनेक मित्र अमेरिकेत by सुबोध खरे
बरोबर.
In reply to बरोबर. by गवि
नाही, याचा अर्थ तसा नाही.
In reply to नाही, याचा अर्थ तसा नाही. by सुबोध खरे
आता लक्षात आले. दिलासा
In reply to नाही, याचा अर्थ तसा नाही. by सुबोध खरे
असे असेल तर इतर आजार असणार्
In reply to असे असेल तर इतर आजार असणार् by मराठी_माणूस
इतर आजार असलेले सगळेच लोक
In reply to माझे अनेक मित्र अमेरिकेत by सुबोध खरे
हे लोकां पर्यंत कसे जाइल ?
....
डेल्टा व निरीक्षणे
In reply to डेल्टा व निरीक्षणे by हेमंतकुमार
लस घेतलेल्या लोकामध्ये
In reply to लस घेतलेल्या लोकामध्ये by Rajesh188
इथे