Skip to main content

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 28/05/2021 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांना खऱ्या अर्थाने जेमतेम ३ महिनेच निर्वेध कारभार करता आला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यांच्या आतच चिनी विषाणूने भारतात व महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केली व तो धुमाकूळ अजूनही सुरू आहे. या विषाणूचा भारताला व महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला आणि अजूनही बसत आहे. दुर्दैवाने एकूण रूग्णांची संख्या व एकूण मृत्यु यात अगदी प्रारंभापासूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी जनतेचा निष्काळजीपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढीच केंद्र व राज्यसरकारची नियोजनशून्य उपाययोजना कारणीभूत आहे. हे दीड वर्ष अत्यंत वादळी ठरले. महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. दुर्दैवाने बहुतेक सर्व प्रसंगात राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व क्वचितच दिसले. मागील सव्वा वर्षात मुख्यमंत्री बहुतांशी घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. यातील काही संकटे अनपेक्षित निसर्गनिर्मित होती तर काही राज्य सरकारने स्वतः ओढवून घेतली होती. सुशांतसिंग राजपूत व त्यानंतर घडलेले महाभारत, कंगना रनौटवर सूडबुद्धीने केलेली कारवाई, टीकाकारांना मंत्र्यांनी घरी उचलून आणून बेदम मारणे, सचिन वाझे व अनिल देशमुख प्रकरण, संजय राठोड व धनंजय मुंडे प्रकरणे, औषध उत्पादकांना धमकावणे अशी अनेक प्रकरणे टाळता येण्यासारखी होती. राऊत, नबाब मलिक, पटोले, सचिन सावंत असे अनेक वाचाळ सरकारच्या बाजूने व भाजपविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत. दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे. हे सरकार पडावे यासाठी फडणवीस व चंपा पाण्यात देव ठेवून वाट पहात आहेत. सुशांतसिंग प्रकरण, वाझे प्रकरण, प्रताप सरनाईकांवर धाड, १२ नियुक्त आमदारांची यादी अडवून ठेवणे अशा प्रकारातून सरकारची जास्तीत जास्त कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत वाचाळ असलेले चंपा सरकार पडण्याचा रोज एक नवीन मुहूर्त सांगतात. आधी म्हणत होते की नोव्हेंबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार पडणार. नंतर म्हणायला लागते की २ मे नंतर हे सरकार पडणार हे शाळेतला मुलगाही सांगेल. आता म्हणतात महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडणार. नंतर म्हणाले की राज्यात सत्ताबदल निश्चित आहे व कसा होणार ते अजित पवारांना माहिती आहे. फडणवीस म्हणाले की २ मे नंतर हे सरकार पाडणार. पण हे सरकार काही केल्या पडत नाही. भाऊ तोरसेकर व इतर काही पत्रकार सुद्धा सरकार पडणार अशी भाकिते सातत्याने करीत आहेत. अमित शहा व पवारांचं काहीतरी शिजतंय, महाराष्ट्रात काहीतरी घडणार अशी भाकिते किमान ७ महिन्यांपासून सुरू आहेत. शरद पवार आजार किंवा कोणत्या तरी कारणाने मागील जवळपास २ महिन्यांपासून राजकारणापासून संपूर्ण दूर राहून गप्प आहेत. त्याचाही सोयिस्कर अर्थ काढला जात आहे. एकंदरीत बार्शी लाईटच्या वेगाने या सरकारने दीड वर्षांची मजल मारली आहे. दीड वर्षात यांनी काहीही केले नाही व यांचे अस्तित्वही दिसत नाही. महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे.

वाचने 49851
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

कोकणात दोन चक्रीवादळे आली आणि खूप नुकसान झाले. मागच्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळानंतर मामु एक आठवड्यानंतर स्वतः पाहणी करायला गेले. आताच्या चक्रीवादळानंतरही ते असेच तीन-चार दिवसांनंतर तिथे गेले. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये नुकसानीची पाहणी करायला गेले पण महाराष्ट्रात आले नाहीत आणि गुजरातला पॅकेज जाहीर केले गेले तसे महाराष्ट्राला जाहीर केले गेले नाही अशी टीका झाली. मात्र केंद्र सरकारकडून मदत मागण्यापूर्वी राज्य सरकारने नक्की किती नुकसान झाले याचा आढावा घेऊन ते आकडे केंद्राला सादर केले होते का हा पण प्रश्नच आहे. हे वादळ महाराष्ट्रातून पुढे गुजरातला गेले. त्यानंतर दोन दिवसांनंतर मोदी तिथे पाहणी करायला गेले. तोपर्यंत तरी आपले मामु महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करायला गेले होते का नाही ही शंकाच आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते वादळ पुढे सरकल्यावर लगेच नुकसानीची पाहणी करायला कोकणात गेले होते. ते तीन दिवस तिथे होते. आणि आपले मामु तीन-चार तासात पाहणी करून घरी परतले सुध्दा. असले नादान आणि अकार्यक्षम सरकार अशा संकटांच्या वेळी महाराष्ट्राच्या कपाळी आले हे नक्की कोणाचे आणि कधीचे भोग म्हणायचे हेच समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

वादळात मदत करायचीच करायची असते आणि ते सगळं काम केंद्र सरकारचे असते अशी काही तरी त्यांची कल्पना असणार. गुजरातला मदत झाल्यावर मग मदत किती हवी असते ते पण चेक करायचं असतं ते त्यांना समजलं असणार. तसंही वादळामुळे कोकण चं नुकसान झालं म्हटल्यावर NCP आणि काँग्रेस चा काही संबंध च नाही. तेव्हा त्यांनी ते शिवसेनेवर सोडून दिलं. मोदींनी पश्चिम बंगाल आणि ओरिसा चा दौरा करण्याचं निश्चित केलंय. दोन्ही ठिकाणी बीजेपी चं सरकार नाही. तेव्हा फक्त बीजेपी वाल्या गुजरातला मदत करायची होती हा दावा फोल ठरतो. याचा अर्थ या माणसाने काही तरी महत्वाचा शासकीय प्रोटोकॉल केलेला नसणार. कदाचित पंतप्रधानांच्या दौऱ्या च्या आधी त्या भागाचे assessment करायचं mandatory असणार आणि ते या माणसाला माहीत नसणार.

In reply to by पिनाक

कदाचित पंतप्रधानांच्या दौऱ्या च्या आधी त्या भागाचे assessment करायचं mandatory असणार आणि ते या माणसाला माहीत नसणार. अखिल वैश्विक चाणक्य ज्याने अख्ख्या भारताचं राजकारण ढवळुन काढलय तो सोबत असतानासुद्धा माहित नाही म्हणजे नवलच म्हणायचं ????

In reply to by इरसाल

ठीक आहे, नवीन मुख्यमंत्र्याना माहित नाही मग ते त्यांचे सत्तासोबती काय फक्त १०० कोटी वसुल करायला आहेत काय?

In reply to by इरसाल

कंपाऊंडर लोकसभेवर निवडून आले नसल्यामुळे आणि राजकारण हा त्यांचा साईड धंदा असल्यामुळे (खरा धंदा टोमणे मारणे आणि तोंडावर पडणे) त्यांना प्रोटोकॉल ची माहिती नसावी

In reply to by पिनाक

म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला मदत केली नाही त्याची चूकीपण राज्य सरकारचीच. व्वा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पश्चिम बंगाल आणि ओरिसा मध्ये त्यांचा दौरा आहे. तिथे मदत दिली जाणार. खरं तर पश्चिम बंगाल ला मदत नाकारली गेली असती. बरं महाराष्ट्रात तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी असताना आणि दोन्ही पैकी निदान एक पक्ष गळाला लावण्याचे प्रयत्न होत असताना उगीचच नाकावर लाथ मारण्याचा प्रयत्न करण्याचे काय कारण?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कदाचीत महाराष्ट्राचे सक्षम सरकार चक्रीवादळ नुकसान झेलू शकेल असा केंद्राला विश्वास असावा म्हणून त्याने दुबळ्या राज्यांना मदतीचा हात दिला असावा.

In reply to by आग्या१९९०

+१ किल्लारी भूकंपावेळी महाराष्र पुन्हा ऊभा करनारे तसेच कछ वेळीसमीतीवर नेमले गेलेल पवार साहेब ज्या राज्यात आहेत तिथे आपली काय गरज??? हे माहीत असल्याने मोदी महाराष्ट्रात आले नसावेत. जे मोदींच्या लक्शाक आले ते समर्थकांच्या कधी लक्शात येईल?? राज्य पवार साहेबांच्या हातात सुखरूप असल्याने मोदीही महाराष्ट्राबद्दल काळजी वाहत नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत. पण हे सेना समर्थकांंना सांगा जे मोदी महाराष्ट्रात आले नाहीत म्हणून ओरडत आहेत.

In reply to by आग्या१९९०

शून्य वाचन असल्याचे सिद्ध होतंय. वाचन वाढवा. नुसत्या हवेत फुसक्या सोडणे थांबवा.

In reply to by श्रीगुरुजी

असेच लोकांना वाटत . ते आले नाहीत म्हणून लोक खूष आहेत . वादळ मुळे महाराष्ट्र मध्ये खूप नुकसान झाले आहे तेव्हा महाराष्ट्राला मोदी नी का मदत जाहीर केली नाही म्हणून लोक रागात आहेत. केंद्रीय करा मध्ये येथून खूप पैसा गेला आहे मदत मिळणे हा हक्क आहे ह्या राज्याचे च पैसे आहेत. मोदी आले नाहीत म्हणून लोक नाराज आहेत हे लॉजिक काय च्या काय आहे. येवून इथे नजर लावू नये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राज्य पवार साहेबांच्या हातात सुखरूप असल्याने मोदीही महाराष्ट्राबद्दल काळजी वाहत नाहीत. अगदी अगदी पण महाराष्ट्राच्या जनतेला अगदीच अक्कल नाही. साहेबाना फक्त ५४ जागा देऊन महराष्ट्राच्या जनतेने त्यांचा उपमर्द केलेला आहे. नुसतं एकदाच नव्हे तर सातत्याने. एकदा सुद्धा पाऊणशे जागा दिल्या नाहीत. ५८,७१ ६२,४१ आणि आता ५४ हे काय आकडे आहेत? या वयात एवढे पावसात भिजले त्याची जरा सुद्धा जाणीव नाही. महाराष्ट्राच्या जनतेला भर चौकात फटकेच मारले पाहिजेत.

In reply to by सुबोध खरे

ते आले नाहीत म्हणून लोक खूष आहेत . श्री मोदीच काय साहेब सुद्धा आले नाहीत कि काँग्रेसमधील कोणीही आले नाहीत. आपले मुख्यमंत्री आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमात वेळात वेळ काढून संपूर्ण चार तास कोकणच्या दौऱ्यावर गेले होते. त्याची तुम्हा लोकांना कदरच नाही.

सुशांत सिंह च्या प्रकरणाचे नाव उगाच यादीत घातले असे वाटते. ते घडवलेले प्रकरण आहे, कोणी ते सांगायला नकोच.

महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे. >>>> आणी देशाच्या??? देशाच्या भाळी खेळखंडोबा असला तर चालतो का??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

देशाच्या भाळी खेळखंडोबा असला तर चालतो का?? अगदी अगदी देशाच्या जनतेला अक्कल नाहीच. आणि आता २०२४ मध्ये परत श्री मोदींना निवडून देऊन खेळखंडोबाच काय तर भारतीय लोक देशाला पार रसातळाला नेणार. अगदी पाकिस्तान कडे आपल्याला मदतीची याचना करायला लागणार असे दिसतंय. देशाच्या दोन साडेसात्या ( पंधरा वर्षे) एका पाठोपाठ एक चालू आहेत असे दिसते.

दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे >>> आणी राज्याच्या सुदैवाने ते विरोधी पक्शात आहेत. नाहीतर महाराष्ट्राचा कोल्हापूर-सांगली झाला असता. लोक कोरोनाशी लढताहेत आणी हे आता सरकार पडेल तेव्हा पडेल ह्याच्या घोषणा करताहेत. भाजप सत्तेतच काय पण विरोधी पक्शातही राहण्या लायक नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाजप सत्तेतच काय पण विरोधी पक्शातही राहण्या लायक नाही. अगदी अगदी भाजप सत्तेतच काय पण विरोधी पक्शातही काय या पृथ्वीतलावरच राहण्या लायक नाही.

परंपरेनुसार मालकांच्या सूचनेला फाट्यावर मारलेले आहे. चालू द्या !

काल एक घडामोड वाचली. मा. मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नाकावर टीच्चून असा बंगालमधे तृणमुल कॊंग्रेसने विजय मिळवला तरी ममतादीदी आणि केंद्रसरकार यांच्यातला तेढ काही कमी झालेले नाही असे दिसते. जिंकणे आणि पराभव हा राजकारणाचा नियमित असलेला भाग असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालची पाहणी केली आणि नंतर दोन्ही राज्यांचे मुख्यंमंत्री व अधिका-यासोबत बैठक घेतली. मात्र मोमता दिदी तिथे ३० मिनिटापर्यंत बैठकीतच आल्या नाहीत, आल्यानंतर ममतांनी एक अहवाल पंतप्रधानांकडे सोपवला व निघून गेल्या. दुसरीकडे मा.मोदींनी ओडिशाला पाचशे कोटी देण्याची घोषणा केली तर नवीन पटनायक म्हणाले आम्हाला कोणतेही पॅकेज नको. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री हे व्यक्ती नव्हे तर संस्था असतात, असे वागणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. एकूणच देशात केंद्र आणि राज्यांचे वाद पुढेही चालूच राहतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्यांना राज्यांना १००% कोविडच्या लसी मोफत द्यायची इच्छा नाही त्यांच्याकडून नुकसानीसाठी कोण अपेक्षा करेल? सगळी राज्य आत्मनिर्भर आहेत, त्यांचे ते घेतील बघून. ह्यांनी पुढील इलेक्शनच्या तयारीच कराव्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर यांचा प्रतिसाद वाचून रबिष कुमार ची आठवण झाली. केंद्र सरकारची काही चुकी नसेल तर फक्त वार्तांकन करायचे.. आणि केंद्र सरकार कडून थोडेसे खट्ट झाले तर बातमीच्या नावाखाली टीका, उणे दुणे काढणे आणि वयक्तिक टीका सुरू करणे.

काल सावरकर जयंती साजरी झाली. शिवसेनेच्या सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला भाजपचा विरोध आहे का?? सावरकरांना भारतरत्न का देत नाहीये भाजप सरकार?? प्रणव मुखर्जी हेया काॅंग्रेसच्या व्यक्तीला भाजपने भारतरत्न दिला पण हिंदूत्ववादी सावरकरांना दिला जात नाहीये. भाजपला हिंदूत्वाशी काही प्राॅब्लेम आहे का??

ते गोमातेला उपयुक्त प्राणी मानता होते म्हणून विरोध असेल. असंही त्यांना दुसऱ्या पक्षांच्या लोकांचा गौरव करायला आवडतो. त्यांच्यासाठी गालीच्या अंथरतात, बिचारे खरे कार्यकर्ते सतरंज्या उचलतात.

In reply to by शाम भागवत

क्लिप बघीतली. त्यात खवळण्यासारखे काय वाटले नाही. अनिल थत्ते कोण, कुठला (पुणेरी वाट्टोय) आणि त्यांचा टोन हा कट्टावर शिळोपाच्या गप्पा मारताना काही मंडळीचा असतो तसा आहे. मी लै भारी इस्टाइल.... त्यांनी चित्रविचित्र टिकल्या का लावल्यात?

In reply to by नावातकायआहे

ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं सगळंच रंगीबेरंगी. ८० च्या दशकात प्रभात टॉकीजच्या बाजूला त्यांची मारुती गाडी उभी असायची,भडक रंगाची. त्या गाडीची प्लॅस्टिक सर्जरी झालेली असायची. का ते सांगायची गरज आहे का?

In reply to by नावातकायआहे

अनिल थत्ते हा माणूस दखल घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. आचरटपणा करणारा विदूषक आहे तो. अशा लायकीची माणसे फडणवीसांचे समर्थक असतील तर फडणवीसांचं भविष्य अवघड आहे एवढेच सांगू शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

ते त्यांच्या पोशाखाकडे बघून दिसतंय, पण समर्थकांमुळे नेते लोकांचं भविष्य अवघड कसं आहे ते कळलं नाही. फडणवीसांचे करोडो समर्थक असावेत (१०५ आमदार x क्ष मते = किती मते?) त्यातला एखादा आचरट असला तर त्यांचं भविष्य अवघड? अवघड आहे.

In reply to by Rajesh188

हे कुठून कळले? काही आतल्या गोटातली बातमी / लिंक / मुलाखत? मनाने छापणार्या बातम्यांना "राहुल गांधी बातमी" म्हणतात हे आपणास विदित असेलच.

In reply to by पिनाक

प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ केनेडी यांच्याबद्दल एक दंत कथा सांगितली जाते. १९२९ मध्ये वॉल स्ट्रीटवर शेअरचे भाव मोठय़ा प्रमाणावर गडगडले. केनेडी हे एका बूट पॉलिशवाल्याकडून आपले बूट स्वच्छ करून घेताना त्या माणसाने केनडी यांना बाजाराबद्दल काही सल्ले देण्यास सुरुवात केली. केनेडी यांनी कार्यालयात आल्यावर त्यांचे सर्व शेअर विकून टाकले आणि नंतरच्या दोन दिवसांत वॉल स्ट्रीटवर होत्याचे नव्हते झाले. ज्या गुंतवणूकदारांना अनुभव नसतो असे लोक त्यांचे अर्धवट ज्ञान पाजळायला लागले की पुढे नक्कीच धोका असतो. हीच कारणमीमांसा येथेही लागू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ही ओढून ताणून लावलेली मीमांसा वाटते. किंबहुना केनेडींची गोष्ट सुद्धा खरी असली तरी ती फायनान्शिअल मार्केट मधल्या बबल बद्दल आहे. राजकारण आणि क्रिकेट या मध्ये प्रत्येक भारतीय व्यक्तीची मते असतात आणि त्या वर चर्वितचर्वण, वादविवाद अगदी पारापासून ते ट्विटर पर्यंत चालू असतात. जसे फडणवीसांचे पाठीराखे आहेत, तसे ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस चे नेते, पवार इत्यादींचे पण पाठीराखे पडतात आणि ते आपली मते तितक्याच जोरकसपणे मांडत असतात. या मुळे जर एखाद्या नेत्याला फरक पडत असता तर आश्चर्य. तुम्ही स्वतः फडणवीसांचे विरोधक आहात त्यामुळे असं म्हणताय. पण मी म्हणतो कुणीही काहीही लिहिलं /म्हटलं तरी अशा गोष्टींनी फारसा फरक पडत नाही.

च च च... भल्या पहाटे बाशिंग बारामतीकरांनी धोबीपछाड केले त्या धक्क्यातून चाणक्य अजूनही सावरले नाहीत. आता ताकही फुंकून पितील महाराष्ट्रात.

Was Nehru gay? Did he have bisexual relations? Did he die because of STD? What foreign media said about Jawaharlal Nehru हा OpIndia मधला लेख वाचला. हास्यास्पद आणि विकृत/दुष्ट मानसिकतेने लिहिला गेलेला लेख आहे असे माझे मत बनले आहे. हा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून असण्याचे कारण कि, मी आधी ऑपइंडिया बद्दल काहीतरी तुम्हाला दिलेल्या प्रतिसादात बोललो होतो, आणि तुमचा मीडिया विषयात रस आहे असे वाटले आहे. या पलीकडे काही कारण नाही. OpIndia कचरापट्टी का आहे- पूर्ण लेख "थियरीज" सांगण्यासाठी लिहिला आहे. प्रत्येक थियरी नंतर/आधी
While there are only speculations of Jawaharlal Nehru being bisexual
Amongst all these speculations behind the real reason for Nehru’s death, one is also that Nehru died of the Sexually Transmitted Disease AIDS.
Though there is no evidence about Rajiv Dixit’s hypothesis
असे शेपूट जोडले आहे. आणि लेखाच्या शेवटी काय लिहिले आहे ?!
While all these are speculations with no definite proof, these controversies that revolve around the life of the first Prime Minister of India Jawaharlal Nehru cannot be ignored considering it keeps resurfacing on the internet and social media spaces time and again.
गंमत आहे की नाही ? पुरावा नाही, आणि स्पेक्युलेशन पण आहे, पण दुर्लक्ष करता येत नाहीत म्हणे, आणि म्हणे नेट वर रिसरफेस होत राहतात म्हणे. हे ऑपइंडिया वलेच करतात की रिसरफेस ! हे फक्त आताचेच नाही. पुन्हा पुन्हा पहिले आहे की यांचे रिपोर्ट्स सोशल मीडिया वरच्या अनव्हेरिफाईड पोस्ट वर आधारित असतात. परवा मदनबाण ह्यांनी टाकलेल्या लिंक मध्ये पण नेमके हेच दिसले- सोमि वरच्या पोस्टला बातमी म्हणून Op ने छापले होते. हे ऑप वाले साले ऑफिसात बसून फेसबुक ट्विटर वरचे त्यांच्या साईटीवर छापतात. काहीही ग्राउंड वर्क करतात असे दिसत नाही. NL चा अभिनंदन सेखरी न्यूजलाँड्रीची तुलना OpIndia शी केल्यावर खवळला होता ते बरोबरच वाटते आहे आता असल्या बातम्या वाचून. हि झाली एक बाजू. पुढे, हे पुरेपूर काळजी घेतात कि समलैंगिक असणे म्हणजे कोणता गुन्हा आहे असे त्यांच्या लेखातून थेट म्हणणारे काही लिहीत नाहीत. पण ज्या सोमि वरच्या लेखकांची मते हे उचलतात त्यांची अशीच मते असतात, त्यांचे म्हणणे हेच असते, नेहरू समलैंगिक होता ! घोर पाप ! आरारारारारा! काय हे अश्लाघ्य अस्तित्व! टार्गेट ऑडियन्स पण त्याच विकृत मनोवृत्तीचा असण्याची शक्यता पण खूप. सिफिलीसने मेला, अरेरे, काय माणूस! थेट म्हणण्याची हिम्मत नसते, पण संदेश हाच असतो- "समलैंगिक असणे ही विकृती आहे आणि हा विकृत नेहरू समलैंगिक होता."

@ चंद्रसूर्यकुमार मागच्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळानंतर मामु एक आठवड्यानंतर स्वतः पाहणी करायला गेले. आताच्या चक्रीवादळानंतरही ते असेच तीन-चार दिवसांनंतर तिथे गेले. मामु ला लोकांची वेदना जाणुन घेण्या पेक्षा विरोधकाना टोमणा मारण्याची इच्छा उफाळत असावी, मी ३-४ तासासाठी का होइना हवेतील फोटो सेशन करायला नाही तर इथे जमीनीवर आलो आहे अस बोलुन त्यांनी दौर्‍याची सांगता केली. @ आग्या१९९० हो, थत्ते ठाणेकरच आहेत, त्यांची गाडी मी अनेकदा अगदी जवळुन पाहिली आहे. मो.ह विद्यालयाच्या [ मी याच शाळेचा विद्यार्थी होतो. ] समोरच्या उजव्या बाजुला [ जिथे आधी प्रभात टॉकिज होते ] एक टॉवर आहे त्याच्या बाहेरच्या ही कार अनेकदा उभी असायची,त्यांच्या केंसा प्रमाणेच कारचीही रंगरंगोटी असायची / आजही आहे फक्त कारच मॉडेल बदललं आहे. जितक मला स्मरते त्यानुसार कारच्या मागे 'मी चक्रम आहे. माझ्या मागे येऊ नका आणि माझ्या पुढे जाऊ नका' असे वाक्य लिहलेले होते. बहुतेक हेच वाक्य आजही त्यांच्या कारच्या मागे असावे. आता मामु आणि हाताला बांधलेल्या घडाळ्याच्या सरकार बद्धल बहुधा मा.देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट सांगितलेले आहे की हे सरकार पाडण्याची अजिबात इच्छा / घाई नसुन अंतर्गत कलहाने हे आपणहुनच पडेल.तसेही आत्त्ता सरकार स्थापन करण्याची घाई भाजपला नसावी... कारण चालु सरकारच्या विरोधात जितका असंतोष अधिक वाढेल तोच पुढे त्यांच्या फायद्याचा ठरेल. @ अमरेंद्र बाहुबली ज्या प्रमाणे क्रंतीसूर्य बॅरिस्टर.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारत रत्न द्यावयास हवे, त्याच प्रमाणे हिंदुस्थानचे जेम्स बॉन्ड मा.अजीत कुमार डोभाल यांनाही याच पुरस्काराने सन्मानित करायला हवे असे मला वाटते. अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले, तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन ! इति:- वि.दा. सावरकर वेगळी बातमी :- श्रीलंकेच्या संसदेने वादग्रस्त ठरलेल्या कोलोंबो पोर्ट सिटी ला मान्यता दिली आहे. आता चीन कन्याकुमारी पासुन फक्त २८६.७६ किलोमीटर अंतरावर येउन उभा ठाकला आहे. With Colombo port city, China sees a potential overseas colony in Sri Lanka Sri Lankan parliament passes controversial Bill on China-backed Port City हंबनटोटा हे बंदर घशात घातल्या नंतर आता कोलंबो चा घास चीन ने घेतला आहे.मागच्या महिन्यात चायनीज रक्षा मंत्र्यांनी श्रीलंकेत जाउन त्यांच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेतली होती. नक्की हे काय चालु आहे ? का झाले ? हे समजण्यासाठी खाली व्हिडियो देत आहे. जाता जाता :- फना होने की इजाजत ली नही जाती है | वतन से मोहब्बत पूछकर की नही जाती है |

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Be happy for this moment. This moment is your life. :- Omar Khayyam

In reply to by मदनबाण

बहुधा मा.देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट सांगितलेले आहे की हे सरकार पाडण्याची अजिबात इच्छा / घाई नसुन अंतर्गत कलहाने हे आपणहुनच पडेल.तसेही आत्त्ता सरकार स्थापन करण्याची घाई भाजपला नसावी... कारण चालु सरकारच्या विरोधात जितका असंतोष अधिक वाढेल तोच पुढे त्यांच्या फायद्याचा ठरेल. खालील वक्तव्ये वाचा. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा आघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल आघाडी सरकार २ मे नंतर पडणार राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल

In reply to by मदनबाण

हे अजूनही आशेवर आहेत. शिवसेनेने अनेक वेळा घोर अपमान केला, अर्वाच्य शिवीगाळ केली, लाथाडलं, अमित शहांंची निर्लज्ज अशी संभावना केली, मोदींना रोज शिव्याशाप दिले, फडणवीस व चंपाची टिंगल उडवून निर्भत्सना केली तरीही लोचटासारखे हे झोळी पसरून सेनेच्या दारात उभे आहेत. https://www.lokmat.com/politics/if-modi-says-so-we-will-make-friends-ti…

केरळ high कोर्टानं केरळ सरकारचा 80:20 सूत्रानुसार शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय रद्द केला आहे. या सूत्रानुसार एकूण शिष्यवृत्तीपैकी 80% हिस्सा हा मुस्लिम विध्यार्थ्यांना मिळत होता तर 20% हा उरलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळत होता, ह्या मध्ये धर्मांतरीत सुद्धा पात्र होते. केरळ च्या एकूण लोकसंख्या 45% लोकसंख्या ही अल्पसंख्याक आहे. https://m-timesofindia-com.cdn.ampproject.org/v/s/m.timesofindia.com/ci…

स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू आपल्या पायांवर उभा राहात असताना बर्‍याचदा बाहेरून अन्न-धान्य आयात करायची वेळ यायची. अमेरिकेकडून तांबडा गहू वगैरे आयात करावा लागणे हा भारताचा इतिहास आहे. तो लिबरांडू व सिक्युलर लोकांना कटू वगैरे वाटत असेल; परंतु दुसर्‍याचे मागून घेण्यात लाज कसली? त्यानंतर हरितक्रांती करून भारत अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. धान्याची कोठारे भरुन वाहू लागली आणि परकीयांकडून मदत घेणे भारताने थांबवले. असा हा मूर्खपणा बरेच काळ चालू राहिला. दुसर्‍याकडून दानधर्मात फुकट पदरात पाडून घेण्यासारख्या सनातन पुण्यकर्माची लाज वाटू लागली लोकांना. परंतु आता विश्वगुरु झाल्यापासून व अच्छेदिन आल्यापासून मदत घेऊन ती लाटण्याचा आनंदोत्सव पुनरेकवार सुरु झाला आहे. कोणत्याही श्रेष्ठ सनातनी हिंदूला अभिमान वाटेल असा दानधर्माचा ओघ सुरु झाला आहे. त्यातलेच एक नवीन अभिमानपुष्प म्हणजे केनियासारख्या देशाने पाठवलेली मदत! धन्य धन्य!! https://m.economictimes.com/news/india/covid-19-relief-kenya-donates-12-tonnes-of-food-products-to-india/articleshow/83033605.cms

In reply to by नगरीनिरंजन

तुमच्यासारखे लोक काही गोष्टी समजावून घ्यायच्या मनस्थितीत नसतात हे मला माहित आहे. भारत विश्वगुरू झाला तर त्याचे तुमच्यासारख्यांना वाईट वाटेल असे मी तरी म्हणणार नाही. मात्र भारत विश्वगुरू मोदींच्या नेतृत्वात झाला तर त्याचे मात्र तुमच्यासारख्यांना नक्कीच वाईट वाटेल याची १००% खात्री आहे. भारतावर कोरोनाची दुसरी लाट हे आलेले मोठे संकट होते. असे संकट आल्यानंतर जगातील इतर देशांनी आपण होऊन मदत करणे यात काहीही आश्चर्य नाही. अमेरिकेत २००५ मध्ये कॅट्रीना हे भयानक वादळ आले होते आणि त्यात न्यू ऑर्लिन्स हे शहर उध्वस्त झाले होते. त्यावेळी जगातल्या कोणकोणत्या देशांनी अमेरिकेला मदत पाठवली होती याची जरा माहिती करून घ्या. फार लांब जायची किंवा संदर्भ शोधायला फार कष्ट घ्यायची गरज नाही. अगदी विकीपीडीयावरही वाचायला मिळेल. https://en.wikipedia.org/wiki/International_response_to_Hurricane_Katri… अमेरिकेला त्यावेळेस कोणीकोणी मदत केली होती या देशांच्या यादीत युरोपमधले समृध्द देश होतेच तर भारतही होता. इतकेच नाही तर अगदी अफगाणिस्ताननेही अमेरिकेला मदत पाठवली होती. तेव्हा 'कसली डोंबलाची सुपरपॉवर' वगैरे अमेरिकेतले कोणी म्हणाले होते का? त्या देशावर तशी वेळ आली होती म्हणून सगळ्या जगाने अमेरिकेला मदत पाठवली. तीच गोष्ट आता भारताविषयी. बाकी गरळ टाकणे चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

Kenya has donated 12 tonnes of food products to India as part of its COVID-19 relief efforts, a statement said on Friday. The east African country has sent 12 tonnes of tea, coffee and groundnut produced locally to the Indian Red Cross Society, it said adding that the packets will be distributed across Maharashtra with food aid.
अरे रे. नीट वाचलं तर कळलं असतं की मदत देशाला आहे कि संस्थेला. आणि बेष्ट सीएम चा कारभार इतका भारी आहे, इतकं नाव आहे जगात की दुसरे देश मदत पाठवत आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

दुसर्‍याकडून दानधर्मात फुकट पदरात पाडून घेण्यासारख्या सनातन पुण्यकर्माची लाज वाटू लागली लोकांना.
संपादक मंडळ - सदर आयडी, संबंध नसताना कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सनातन धर्माची निंदानालस्ती करत आहे. .या आयडी वर योग्य ती कारवाई करावी ही विनंती.

In reply to by वामन देशमुख

सनातनी हिंदू म्हणजे उच्चवर्णीय किंवा पारंपरिक रिझर्वेशन वाले असं त्यांना म्हणायचं असतं. सतत सवर्ण वर्गाचा द्वेष करून तो दाखवून देण्याचे त्यांचे प्रकार हा मानसिक रोगाचा प्रकार आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. तक्रार न करता त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायला हवी असे माझे प्रामाणिक मत आहे.

In reply to by नगरीनिरंजन

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नॉटीपणा परत सुरू झालेला दिसतोय. मुळात भारतात मोठ्या प्रमाणात अन्नधान्य पिकते व त्यातील मोठा वाटा भारत निर्यात करतो हे सर्व जगाला माऊ आहे. अगदी चिनी विषाणूच्या काळातही भारतात धान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसरं म्हणजे केनिया किंवा अशा कोणत्याही देशाकडे भारताने अन्नधान्याची मदत मागितलेली नाही ना भारतात अन्नधान्याची टंचाई आहे ना भारतात अन्नधान्याअभावी कोणी मरत आहे.. भारत काही प्रमाणात डाळी, पामतेल वगैरे योग्य ती किंंमत देऊन आयात करतो, परंतु कोणत्याही देशाकडे फुकट मागत नाही. आणि शेवटी, ही मदत अत्यंत उत्कृष्ट सरकार लाभलेल्या व जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री लाभलेल्या व भारतातील सर्वाधिक श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्रात वाटली जाणार आहे. तस्मात याबाबतीत लाज वाटायची असेल तर ती महाराष्ट्राच्या नॉटी राज्यकर्त्यांना वाटायला हवी. तस्मात नॉटी लोकांना जितकी गरळ ओकायची आहे तितकी ओतू दे. यावरून एक घटना स्मरली. या घटनेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे व नाईलाजाने मला या प्रकारात सामील व्हावे लागले होते. अमेरिकेत ९ सप्टेंबर २००१ या दिवशी हल्ले झाल्यानंतर इन्फोसिसचा ग्लोबल मार्केटिंग हेड फणीश मूर्तीने एक आदेश काढला. त्यानुसार अमेरिकेला रोख मदत देण्यासाठी इन्फोसिसच्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना आपला एक दिवसाचा पगार व भारतातील कर्मचाऱ्यांना ऐच्छिक रोख पैसै अमेरिकेला मदत म्हणून द्यावे लागले. मी स्वतः एक रूपया सुद्धा दिला नव्हता, परंतु मला आमच्या बिझनेस युनिटमध्ये हा टास्क ड्राईव्ह करावा लागला होता. अमेरिकेसारख्या अत्यंत धनाढ्य देशाला त्यांनी अजिबात मागणी न करता अशी किरकोळ मदत स्वतःहून देणे हा मूर्खपणा होता. परंतु तुमच्यासारख्या नॉटींंनी याचा अर्थ अमेरिका भिकेला लागली असा काढला असता.

In reply to by श्रीगुरुजी

कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय ने 2020-21 के लिए प्रमुख फसलों का तीसरा अग्रिम अनुमान जारी किया खाद्यान्न उत्पादन रिकॉर्ड 30.544 करोड़ टन रहने का अनुमान है; जो 2019-20 की तुलना में 79.4 लाख टन ज्यादा है किसानों के अथक प्रयासों, कृषि वैज्ञानिकों के योगदान और सरकार की नीतियों का परिणाम हैं ये सकारात्मक नतीजे : श्री तोमर 3rd Advance Estimates 2020-21 इथे इंग्रजीतून

In reply to by नगरीनिरंजन

@ नगरीनिरंजन अमेरिकेकडून तांबडा गहू वगैरे आयात करावा लागणे हा भारताचा इतिहास आहे. तो लिबरांडू व सिक्युलर लोकांना कटू वगैरे वाटत असेल; परंतु दुसर्‍याचे मागून घेण्यात लाज कसली? अमेरिकेने पीएल४८० {पब्लीक लॉ ४८०) च्या अंतर्गत अगदी निष्कॄष्ठ दर्जाचा गहु (तिथे जनावर पण या गव्हाला तोंड लावायचे नाहीत म्हणे !) भारतात धाडला होता

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Love me or hate me, both are in my favour. If you love me, I will always be in your heart, and if you hate me, I will be in your mind." :- Qandeel Baloch

In reply to by आग्या१९९०

"गुजराती कंपनी" असं जर न्यायालयाने म्हटलं असेल तर न्यायालय parciality आणि biased बोलतंय असं माझं मत आहे. कंपनी कुठल्या भाषेच्या व्यक्तीने स्थापन केली आहे किंवा ती कुठल्या शहरात आहे याबद्दल न्यायालयाला वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही. न्याय सर्वांसाठी समान असायला हवा. आणि असं खरंच न्यायालयाने म्हटलं असेल तर ती गंभीर गोष्ट आहे.