चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ५)
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांना खऱ्या अर्थाने जेमतेम ३ महिनेच निर्वेध कारभार करता आला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यांच्या आतच चिनी विषाणूने भारतात व महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केली व तो धुमाकूळ अजूनही सुरू आहे. या विषाणूचा भारताला व महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला आणि अजूनही बसत आहे.
दुर्दैवाने एकूण रूग्णांची संख्या व एकूण मृत्यु यात अगदी प्रारंभापासूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी जनतेचा निष्काळजीपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढीच केंद्र व राज्यसरकारची नियोजनशून्य उपाययोजना कारणीभूत आहे.
हे दीड वर्ष अत्यंत वादळी ठरले. महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. दुर्दैवाने बहुतेक सर्व प्रसंगात राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व क्वचितच दिसले. मागील सव्वा वर्षात मुख्यमंत्री बहुतांशी घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. यातील काही संकटे अनपेक्षित निसर्गनिर्मित होती तर काही राज्य सरकारने स्वतः ओढवून घेतली होती. सुशांतसिंग राजपूत व त्यानंतर घडलेले महाभारत, कंगना रनौटवर सूडबुद्धीने केलेली कारवाई, टीकाकारांना मंत्र्यांनी घरी उचलून आणून बेदम मारणे, सचिन वाझे व अनिल देशमुख प्रकरण, संजय राठोड व धनंजय मुंडे प्रकरणे, औषध उत्पादकांना धमकावणे अशी अनेक प्रकरणे टाळता येण्यासारखी होती. राऊत, नबाब मलिक, पटोले, सचिन सावंत असे अनेक वाचाळ सरकारच्या बाजूने व भाजपविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत.
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे. हे सरकार पडावे यासाठी फडणवीस व चंपा पाण्यात देव ठेवून वाट पहात आहेत. सुशांतसिंग प्रकरण, वाझे प्रकरण, प्रताप सरनाईकांवर धाड, १२ नियुक्त आमदारांची यादी अडवून ठेवणे अशा प्रकारातून सरकारची जास्तीत जास्त कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत वाचाळ असलेले चंपा सरकार पडण्याचा रोज एक नवीन मुहूर्त सांगतात. आधी म्हणत होते की नोव्हेंबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार पडणार. नंतर म्हणायला लागते की २ मे नंतर हे सरकार पडणार हे शाळेतला मुलगाही सांगेल. आता म्हणतात महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडणार. नंतर म्हणाले की राज्यात सत्ताबदल निश्चित आहे व कसा होणार ते अजित पवारांना माहिती आहे. फडणवीस म्हणाले की २ मे नंतर हे सरकार पाडणार. पण हे सरकार काही केल्या पडत नाही.
भाऊ तोरसेकर व इतर काही पत्रकार सुद्धा सरकार पडणार अशी भाकिते सातत्याने करीत आहेत. अमित शहा व पवारांचं काहीतरी शिजतंय, महाराष्ट्रात काहीतरी घडणार अशी भाकिते किमान ७ महिन्यांपासून सुरू आहेत.
शरद पवार आजार किंवा कोणत्या तरी कारणाने मागील जवळपास २ महिन्यांपासून राजकारणापासून संपूर्ण दूर राहून गप्प आहेत. त्याचाही सोयिस्कर अर्थ काढला जात आहे.
एकंदरीत बार्शी लाईटच्या वेगाने या सरकारने दीड वर्षांची मजल मारली आहे. दीड वर्षात यांनी काहीही केले नाही व यांचे अस्तित्वही दिसत नाही. महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे.
प्रतिक्रिया
दोन चक्रीवादळे
वादळात मदत करायचीच करायची
असं कसं अस कसं
हं
खिक.. विंगर्जी मध्ये याला
कंपाऊंडर लोकसभेवर निवडून आले
म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला
पश्चिम बंगाल आणि ओरिसा मध्ये
अच्छा म्हणून राज्य सरकारचीच
कदाचीत महाराष्ट्राचे सक्षम
+१
खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम
असं कोणीही ओरडत नाहीत. हल्ली
शून्य वाचन असल्याचे सिद्ध
मोदी राज्यात येवूच नयेत
मग मंत्री लोक का बोंबलत होते?
राज्य पवार साहेबांच्या हातात
ते आले नाहीत म्हणून लोक खूष
मत.
महाराष्ट्राच्या भाळी हा
देशाच्या भाळी खेळखंडोबा असला
त्याचे परिणाम देश भोगतोय ना??
अगदी अगदी
मोठमोठ्या घोषणांना भूलली जनता
काय कळालयं ?
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून
भाजप सत्तेतच काय पण विरोधी
+१
फाट्यावर मारलंय
चालू घडामोडी..
पॅकेज नाकारले.
ज्यांना राज्यांना १००%
बिरुटे सर यांचा प्रतिसाद
आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड
+१
सगळया भाज्यांमध्ये गुळच हवा.
+१
काल सावरकर जयंती साजरी झाली.
ते गोमातेला उपयुक्त प्राणी
आता हे काय नवीन?
का?
ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं
भा. पो! "अभ्यास" वाढवला
ऐंशी च्या दशकात मी लै म्हंजे
अनिल थत्ते हा माणूस दखल
ते त्यांच्या पोशाखाकडे बघून
१०६ आमदार
हे कुठून कळले? काही आतल्या
१०६ आमदार
१०६ आमदार
Pagination