Skip to main content

ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

लेखक मनो यांनी मंगळवार, 18/05/2021 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी. तांत्रिक बाबी - ०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est) १) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे. २) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz… कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल - १) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल. २) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. ३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील. ४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति. ५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल ६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल. इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे. ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे. *ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे सुरुवातीला परिचय चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात मनो - पानिपत पुस्तकाबद्दल श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 50482
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

कट्टा अटेंड करणे miss झाले.. पण सकाळी उठल्याबरोबर यूट्यूब वर पूर्ण व्हिडिओ पाहिला. पुढचा कट्टा नक्की अटेंड करणार.

कट्टा अटेंड करणे miss झाले.. पण सकाळी उठल्याबरोबर यूट्यूब वर पूर्ण व्हिडिओ पाहिला. पुढचा कट्टा नक्की अटेंड करणार.

मंडळी माझा हा पहिलाच कट्टा होता . मागे पुण्यातला पाताळेश्वर कट्टा माझा हुकला . असो . पण ज्यांची नावं आपण वाचतो त्या मंडळींना प्रत्यक्ष पाहून मजा वाटली , आनंद वाटला . प्रकाश ,कुमारआणि काही ज्येष्ठ मंडळी आणि तरुण पिढी सगळेच

काल बर्याच दिवसानन्तर बर्याच लोकात मिसळता आले. त्यासाठी संयोजकांचे मनापासून आभार. कट्टा खूपच छान झाला. श्रीरंग जोशी॑चे सूत्रसंचालन आवडले. तीनही सत्र आवडली. नवीन / जुन्या अनेक सदस्या॑ची ओळख आवडली. पुढच्या कट्ट्याच्या प्रतीक्षेत. आणि लवकरच सर्व सुरळीत होऊन एखादा प्रत्यक्ष कट्टा व्हावा ही आशा आणि प्रार्थना.

हा ऑनलाईन कट्टा लै भारी झाला. एन्जॉय केला कट्टा ! संयोजनाबद्दल कौतुक वाटले. सुत्रसंचलन फारच मस्त झाले. मनो, श्रीरंग जोशी आणि संयोजकांचे विशेष धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

@ चौथा कोनाडा: तुम्ही केले तसे स्केच करणे - तेही समोर प्रत्यक्ष व्यक्ती किंवा स्थिर फोटो नसून स्क्रीन वरील हलती बोलती प्रतिमा असताना, एवढ्या कमी काळात - किती कठीण आहे याची चांगलीच कल्पना आहे. असे चित्र करणे खरेच कौतुकास्पद आहे. तुमची चित्रे मिपावर लेख लिहून जरूर टाका. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद, चित्रगुप्तजी ! आपल्यासारख्या सिद्धहस्त चित्रकाराने केलेले कौतुक म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ! खरं तर मी अजुन शिकत आहे असं चित्रं काढणं.

काही वेळ सहभागी होता आलं. संयोजकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन...! -दिलीप बिरुटे

काही अपरिहार्य कारणांमुळे (म्हणजे नेमकी कालच मला लौकर झोप आल्यामुळे) दुर्दैवाने मी ऑनलाईन कट्टा मिसला. :( रेकॉर्डिंग पाहिले व अजूनच वाईट वाटले. पुढील कट्ट्याच्या प्रतीक्षेत! सं - दी - प

व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहिले. जबरी झाला कट्टा!!

रात्री 8 पर्यंत कट्टा आहे याचा माझा जप चालू होता. ऐनवेळी 2 नातेवाईकांचे कॉल आले. त्यासाठी नाईलाजाने त्यांकडे जावे लागले. आज यु ट्यूब वर बघितल्यानंतर खूप मिस केलं याची जाणीव झाली. पुढचा कट्टा अगदी येणार म्हणजे येणार. बाकी कट्टयाविषयी बोलायचं झाल्यास श्रीरंग सरांचा हसतमुख चेहरा पाहून अगदी प्रसन्न वाटलं (तुमच्याशी मैत्री करायला मला खूप आवडेल). गणेशा सरांचे बिनधास्त बोल आवडले. चौथा कोनाडा सरांचे शीघ्र चित्र फार आवडले आणि ते पाहून आपल्याला का असे येत नसावे याचा हेवा वाटला. बाकी सर्व सहभागी सदस्यांचे कौतुक वाटले. असेच कट्टे अगदी प्रत्येक महिन्याला आयोजित करावे. ज्यांना शक्य होईल ते येतील. पुणे आणि मुंबई मध्ये जास्त कट्टे आयोजित होत असल्याने बाकीच्या शहरातील मिपाकरांसाठी ऑनलाईन कट्ट्याला विशेष महत्व आहे असे मला वाटते. त्यासाठी ते सतत आयोजित व्हावे. ज्यांनी यासाठी परिश्रम घेतले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद....!

कट्टा भारी झाला.. चित्रे.. गणित.. इतिहास.. सारे काही जबरदस्त होते... मज्जा आली...