Skip to main content

ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

लेखक मनो यांनी मंगळवार, 18/05/2021 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी. तांत्रिक बाबी - ०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est) १) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे. २) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz… कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल - १) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल. २) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. ३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील. ४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति. ५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल ६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल. इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे. ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे. *ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे सुरुवातीला परिचय चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात मनो - पानिपत पुस्तकाबद्दल श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 50482
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by चित्रगुप्त

रेकॉर्डेड माहितीपेक्षा थेट प्रक्षेपण अधिक उस्फूर्त असते. कट्टेकरी प्रश्न विचारु शकतात, दाद देऊ शकतात. कट्ट्यादरम्यान तुमची पेंटिंग्ज पाहणे कट्टेकर्‍यांसाठी पर्वणी ठरेल. कृपया याबाबत पुनर्विचार करू नये.

In reply to by कंजूस

कंजूसराव, उत्तम सुचवणी ! हा पहिला ऑनलाईन कट्टा असल्यामुळे अश्या वेळ वाचवण्याच्या क्लुप्त्या महत्वाच्या आहेत. अर्थात कमी उपस्थिती असेल तर चित्रगुप्त यांची प्रात्यक्षिकासहित महिती पहायला,ऐकायला खुपच आवडेल !!! आणि चित्रगुप्त यांचा " यूट्यूबवर स्लाईडशो आणि चित्ररसिकांचा स्वतंत्र कट्टा" : १०१ % अनुमोदन ! खुप मजा येईल !

कार्यक्रम आराखड्यात एक विषय नवीन श्री. अरविंद कोल्हटकर मिपा आणि ऐसी अक्षरे या दोन्ही स्थळांवर अनेकदा माहितीपूर्ण आणि वेगळे असे इतिहास, संस्कृत, गणित इत्यादी विषयांवर लिहित असतात. ते शुल्बसूत्रांतील भूमिति याविषयी बोलतील. पत्रिकेत ४) क्रमांकावर श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति असा बदल संपादकांना करता आला तर करावा ही विनंती.

लहान मुलान्चे आणि एकुणच सगळ्यान्चेच सध्या होणारे अति स्क्रिन एक्स्पोझर आणि त्याचे परिणाम ह्यावर चर्चा झाली तर ऐकायला आवडेल.

म्या यकदा वडापावची गाडी सिंबायसीस च्या बाहेर लावली होती तिथं अन्कॉन्फरंस सुरु होती.. म्या इचारलं म्हंजे काय ? तो पोट्टे बोलु गेले की तिथ्ठ PHP camp unconference चालु हाय.. मंजे कुनीबी तिथे जमयचं आन पिच्पीतलं काय बी म्हायत असेल तर लगेच बोर्डाव ल्ह्याचं इषय लोकाना आवडला के लगा तुमास्नी मोटी खोली भेटुन जाते अन तुमी प्रेसेंटेशन सुरु क्रायचं ज्याज्या पब्लिकाला तुम्च्या इशयात रस हायि ते आपोपा तुमच्य रुमास्नी गोळा होत्याल बस आपन हेच ऑनलाइन मिपा कट्याले करयाच्च... १) एक धागा काढाचा मिपा कट्टा २०२१ लाइव २) जस जसं पब्लीक येत जाइल आन त्याना काइ इषय असेल लोकांशी बोलाचा तर त्याचे एक सेपरेट रुम बन्वुन त्याचा युआरेल या धाग्याव देचा, जायचं ते जात्याल त्यावं क्लिक करुन... उदा, चित्रगुप्तजी आलं मिटींगात अन म्हत्लं की मला यावर संवाद सादाय्वडेल की एक संवादगट नामक मिटींग्रुम करायची १) इशय चित्रक्ला. प्रमुख उपस्थीती चित्रगुप्त. त्याचा युआरेल २) इशय लेणी. प्रमुख उपस्थीती प्रचेतस. त्याचा युआरेल ३) इशय अम्रुतानुभव. प्रमुख उपस्थीती मार्कस गामा. त्याचा युआरेल ४) इशय कॉफी वीथ सोनेरी पेय. प्रमुख उपस्थीती फक्त बीहारी त्याचा युआरेल ५) इशय छंद माझा डवखुरा, प्रमुख उपस्थीती फलाना फलाना त्याचा युआरेल अमका ढिमका... म्हंजे गर्दी होनार नाय अन ज्यांना निसतं या इशयातुन त्यात जायचय अन कट्याचा आनंद घेयाचा हाय तेंचे बी सोय हुन जाइल

In reply to by गॉडजिला

ही पहिलीच वेळ आहे, या वेळचा अनुभव पाहून पुढे करू सुधारणा. खरं सांगायचं तर किती लोक येतील हाच अंदाज नव्हता. कुणाची काय आवड ते तर लांबची गोष्ट झाली. कट्टा हाउसफुल झाला की पुढे सुधारणा करू.

In reply to by मनो

कुणाची काय आवड ते तर लांबची गोष्ट झाली
बराबरै. तसं तर आपण इथंही भेटत आहोत आपल्या आवडी निवडी शेअर करत आहोतच, कट्याच्या अनेक लाभांपैकी एक म्हणजे ज्यांचे लेख आप रोज वाचतो, प्रतिसादतो त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटायला मिळते याचा आनंद घेणॅ. आपण एक्टे नसुन आपल्या आचार विचाराचे/ प्रभाव टाकणारे चार लोकांसोबत एक थोडीशी स्पेस शेअर करता येणे (अर्थात हे करणे काहींचे साध्य नसुन साधनही असु शकते पण तो विषय आत्ता नको) हे उद्देश असल्याने त्यानुशंगाने नियोजन झाले तर मजा येइल कट्याला... अर्थात माझ्या प्रमाणे मिपाचाही असा कट्टा हा प्रथम प्रयोग असल्याने फार उत्सुकता आहे या सांस्कृतीक कार्यक्रमाबाबत... पोर्बॅबली इट कूड ब्यी ब्रेक्थ्रु ? हु नोज ?

बरेच दादा लोक येणार असल्याने लैच दंगा होणार असे दिसते, या ऑनलाईन कट्ट्याला मी पण मुकौपस्थिती लावायचा प्रयत्न करेन. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, तुम्ही लिहिलेल्या "मुकौपस्थिती" मुळे माझ्या डोळ्यापुढे आलेलं तुमच्या उपस्थितीचं चित्रं : HNBDH2234

In reply to by चौथा कोनाडा

हे पाहुन आम्हाला "अ आ आई, म म मका, मी तुझा मामा दे मला मुका" हे गाणे आठवले पण वरील प्रतिसादात आम्हाला आम्हाला "मुकं करोती वाचालं" यातला मुक अपेक्षीत होता पैजारबुवा,

  • कट्ट्यावर सोशल डिस्टंसिन्ग पाळायचे आहे का?
  • कट्ट्यावर मास्क घालून बसायचे आहे का?
  • कट्ट्यावर किती वेळ बसायचे आहे?
  • बसायचेच आहे तर चखणा काय काय आहे?
  • नंतर खायला काय काय आहे?
ह्या ह्या ह्या !!!

In reply to by वामन देशमुख

१. हो. उदाहरणार्थ मंडई, दारूचा गुत्ता अश्या गर्दीच्या ठिकाणाहून कट्टाला उपस्थित राहू नये. घरातून उपस्थित राहिल्यास उत्तम. बायका, मुलांना दुसऱ्या खोलीत बसायला सांगितल्यास १०० % सोशल दिस्तां डिस्तसिंग राखले जाईल. २. मास्क चालेल. पण बाकीचेही कपडे घालणं अनिवार्य. फक्त मास्क आणि चड्डी/टॉवेलवर बसलोय असं नको. ३. आपण कितीही वेळ बसला तरीही चालेल. आम्ही १ तासाने निघणार. ४. चाखणा आपल्या आवडीचा आणि आपल्या आपणच आणावा. आम्हाला सँपल कुरिअर करावे. पत्ता व्यानि केलेला आहे. ५. नंतर मिपातर्फे खायला काही नाही. जेवण स्वतच्या जबाबदारी वर करावे. उपाशी पोटी झोपले तरी आम्हाला काही देणेघेणे नाही ! ह्या ... ह्या ... ह्या ...

कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास काय करता येईल? मोबाईलचा कॅमेरा जोडता येतो का? लोकांचे व्हिडिओ बघून आणि नुसते ऑडिओ ऐकवणे असे काही करता येईल का?

In reply to by सुरिया

कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास काय करता येईल? मोबाईलचा कॅमेरा जोडता येतो का? लोकांचे व्हिडिओ बघून आणि नुसते ऑडिओ ऐकवणे असे काही करता येईल का? >> कॉम्प्युटर व मोबाईल दोन्हीकडून जॉइन करता येईल. कॉम्प्युटरच्या मोठ्या स्क्रीनवर पाहायचं. मोबाईलवर ऐकायचं, बोलायचं, अन मोबाईलच्या क्यामेर्‍याने दिसायचं.

In reply to by तुषार काळभोर

तसे नाही, मोबाईलमध्ये झूम वापरायचेच नाही. फक्त कॅमेरा वापरायचा. झूम पीसीवरच इन्स्टॉल करायचेय.

In reply to by सुरिया

डायनोसर नामशेष व्ह्यायच्या आधी, म्हणजे अंदाजे २००५-०६ मध्ये चायनीज फोन जर केबल ने विंडोज एक्सपी कॉम्प्युटरला जोडला, तर तो वेब कॅम म्हणून डिटेक्ट व्ह्यायचा अन वापरता यायचा. आता तसं होत नाही.

नमस्कार मंडळी , मीही जॉईन होईन . वाट पाहतो

In reply to by मोहन

मीटिंगची लिंक धाग्यात दिलेलीच आहे, ती पुन्हा खाली देतोय. https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz… पासवर्ड द्यायची गरज नसेल (अथवा ऐनवेळी धाग्यावर देणार असतील) असे वाटते !

पुढच्या कट्ट्याला मी पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी ह्यावर जो काही माझा अभ्यास आहे तो share करू शकतो. आजच्या कट्ट्याला वेळ मिळाल्यास आज पण करू शकतो पण पहिलाच कट्टा असल्याने बघुयात कसं होतंय

In reply to by कंजूस

विडिओ तर केलेला नाहीये अजून पण माझ्याकडे पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन आहे फोटो सकट

मीटिंग कोड :- 970 2319 7139 मीटिंग पासकोड :- हा तुम्ही ध्यायचा विसरलात का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “When you connect to the silence within you, that is when you can make sense of the disturbance going on around you.“ :- Stephen Richards

In reply to by मदनबाण

लिंकमध्येच pwd parameter असल्यानं अजून काही लागत नाही. तरी काही लागलं तर इथे विचारा, हा धागा मी उघडून ठेवतो आहे, ९.२० पासून

येण्याचा प्रयत्न करेन. ज्यांना येणे जमणार नाही त्यांच्यासाठी इतिवृत्त (रेकाॅर्डेड स्वरूपात ) असेल का?

मंडळी, पहिली घंटा झालेली आहे....... !

मीटिंग आय डी दिल्यावर पासवार्ड मागत आहे व आपण दिलेल्या लिंकमधला पासवर्ड तिथे दिलेल्या फील्ड पेक्षा मोठा आहे !

थोडी घाई करा. वेळ कमी आहे. दुसरे असे की, लिहीणे हे माध्यम टाळून आपण दिसणे या माध्यमाकडे का वळतो आहोत याचा शोध घ्यायला हवा. ते कितपत योग्य आहे की अयोग्य आहे यावर चर्चा करावी.

कट्टा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. YouTube वर रेकॉर्डिंग अपलोड झालं की इथेच त्याची लिंक देईन. पुढच्या वेळी काय सुधारणा करायला हव्यात ते जरूर सांगा. कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त लांबला, पण प्रत्येकाला बोलण्याची संधी देणे आवश्यक होते असे मला वाटते.

In reply to by मनो

मिपाकरांचा अगदी पहिलाच सार्वजनिक कट्टा खूप छान झाला. यापुपढे वेगवेगळ्या विषयांवरील स्वतंत्र कट्टे करूया. तुम्ही दोघांनी पुढाकार घेऊन खूप कष्ट घेऊन ही सुरुवात केली हे खूपच कौतुकास्पद आहे. आभार आणि शुभेच्छा.

कट्टा मस्तच झाला! अनेक दिग्गज ज्यांचे फक्त लिखाण वाचले होते त्यांचे दर्शन झाले!! पु.क.प्र!

मिपाकर कट्टा मस्त झाला . श्रीरंग आपले संयोजनासाठी खूपच आभार ! मनो आपले अभिनंदन न कौतुक . आपण खूपच मेहनत घेत आहात . पुढच्या पुस्तकासाठी खूप शुभेच्छा ! उर्दू पाहायला तरी मिळते पण फारसी भाषा काळाच्या ओघात मागे पडली आहे आणि आपण तिचा अभ्यास करत आहात , ग्रेट ! चित्रगुप्त वावा ! आपली चित्रे पाहून नजर हरखली . मस्त न मस्त . तुमच्याशी खूप बोलण्यासारखे आहे . आपल्याला संपर्क साधतो . अरविंद काका , आपलेही कौतुक आहे . हजर असलेल्या सर्व सदस्यांचे कौतुकच आहे . विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती कमी असताना , हजर असलेल्या कविता , भक्ती आणि नूतन यांचे . चौथा कोनाडा अहो काय झटपट अन सुरेख स्केच ! बापरे ! भारी भारी मंडळींचा सहवास मिळाला हे भाग्यच . आता प्रत्येकाचे नाव घेत नाही पण उपस्थित सर्वच मंडळी ! असे कट्टे घ्यायला काही हरकत नसावी . ज्यांना शक्य आहे ते अटेंड करतील . पुन्हा आभार . कळावे

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

वृत्तांत चांगला लिहीलाय. चित्रगुप्त काका तुमच्या चित्र त्यामागील कथा ऐकून भारी वाटलं.नवीन चित्रांची वाट पाहते.तुमचे मित्र प्रकाश काकां कडे बरेच किस्से असणार.मस्त बोलले ते! मनो तुमचा व्यासंग फारच मोठा आहे.नवीन उपक्रमसाठी शुभेच्छा! कोल्हाटकर काका अबब !पहिल्या दुसऱ्या स्लाइडलाच डोक्याहून विमान चालले होते.पण स्लाइडस शेअर नक्की करा. श्रीरंगने यांनी छान हसतमुखाने सुत्रे सांभाळली.:) सूचना १.दरवेळी एक नवीन पुस्तकाच्या निमित्ताने नवीन लेखकाला बोलवत रहा. २.चित्र,फोटो , भटकंती इत्यादी अशा दृश्य कलाकृती सादरीकरण कलाकारांना नक्की सहभागी करा. सहभागी सर्वांच्या मनमोकळ्या बोलण्याने मजा आली. असेच गप्पा मारत रहावे.:)

कविता जाधव आपल्याला संपर्क साधू शकत नाही. कृपया आपण मला व्यनि कराल का ? म्हणजे रिप्लाय देता येईल . आभार न कळावे

ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU सुरुवातीला परिचय चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU&t=1440 मनो - पानिपत पुस्तकाबद्दल https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU&t=2765 श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU&t=4025 राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप https://www.youtube.com/watch?v=HciJUcXytAU&t=5053 शक्य झालं तर मूळ धाग्यातच टाकावे अशी संपादकांना विनंती.

In reply to by मनो

धन्यवाद मनो. कट्टा हुकला पण आता रेकॉर्डिंग पाहतो. श्रीरंग शेठ मस्त सूत्र संचालन करत होते हे थोड्या वेळासाठी डोकावल्यावर दिसत होते.

In reply to by कंजूस

प्रत्येक लिंकमध्ये t= एवढाच फरक आहे. तिथे सेकंदात द्यायचं की कुठे सुरू होणार. जर वेगवेगळे आकडे t= च्या समोर टाकले, तर ते चालतात का?

In reply to by कंजूस

कदाचित तुमच्या ब्राउझर हिस्टरी मध्ये match झाल्याने, तुम्ही लिंक दुसरी टाकली तरी ब्राउझर दिलेले t सोडून जास्त पाहिलेल्या शेवटच्या t लिंकला उघडतो आहे.

कट्टा छानच झाला संयोजकांचे व सर्व सहभागी परिवाराचे अभिनंदन !

दोन तासांचा डाउनलोड* करून घेतला आणि भराभर पाहून घेतला. कट्टा फारच छान झाला आहे. साधारण तीन महिन्यांत एकदा असा महाकट्टा करावा. #* डाउनलोड youtube go वर होतो. किंवा Get video.org/en वर 360p size. तो पेन ड्राइववर टाकून टिवीला पाहता येतो.

कट्टा एकदम सुरेख झाला. नेटक्या संयोजनाबद्दल करण्यासाठी मनो आणि श्रीरंग जोशी यांचे आभार. चित्रगुप्तांची चित्र सफर एकदम सुरेख. मनो यांनी त्यांच्या पुस्तकामागे घेतलेले परिश्रम उलगडून दाखवले त्यांचे खास आभार आणि आगामी पुस्तकासाठी शुभेच्छा. नेमकं नेटवर्क खंडित झाल्यामुळे काहीकाळ अरविंद कोल्हटकर यांचे शुल्बसुत्रांतील भूमिती विषयक सादरीकरण पाहू शकलो नाही पण ते रेकॉर्डिंगमुळे पाहता येईल. उपस्थित सर्व मिपाकरांचेही अनेक आभार. मजा आली कट्ट्याला.

थोरामोठ्यासोबत असे मनमोकळे, अनौपचारीक क्षण मिळणे ही अत्यन्त आल्हाददायक बाब आहे. एकूणच कोरोनामुळे धमाल जरी बंद झालेली दिसली तरी मजा पुरेपूर चालू आहे याचीच पावती हा कट्टा देतो

या कट्ट्याच्या आयोजनासाठी मनो यांचे मनःपूर्वक आभार व मला सुत्रसंचालनाची जबाबदारी दिल्याबद्दलही आभार. सहभागी होणार्‍यांच्या मोठ्या संख्येमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमाच्या परिणामकारकतेवर मर्यादा येईल असे वाटत होते. परंतु सर्वांनी शिस्त पाळल्याने ही मर्यादा जाणवली नाही अन कट्टा बहारदार झाला. चित्रगुप्त यांची चित्रे जवळून बघता येणे व त्यांच्या तोंडून त्याबाबत माहिती ऐकायला मिळणे ही पर्वणीच होती. मनो यांच्या बॅटल ऑफ पानिपत या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास थोडक्यात जाणून घेता आला व त्यांच्या आगामी पुस्तकाबाबतही माहिती मिळाली. श्री. अरविंद कोल्हटकर यांच्या शुल्बसूत्रांतील भूमिति विषयावरील प्रेझेंटेशन रोचक होते अन गणिताच्या इतिहासाच्या थोडी ओळख यातून झाली. त्यांच्या या विषयावरच्या लेखांचे दुवे: चौथा कोनाडा यांनी कट्ट्यादरम्यान काढलेले चित्रगुप्त यांचे चित्र, मदनबाण यांनी दाखवलेली पुरातन मंदिरांच्या रचनाशास्त्राची चित्रफीत व होळकर वंशातल्या स्त्रीचे तैलचित्र व बिपिन सांगळे यांचे काव्यवाचन व गणेशा, विदेशी वाचाळ व इतर काही मिपाकरांच्या खेळकर व उस्फुर्त प्रतिक्रियांनी कट्ट्याची रंगत अधिकच वाढवली. 'हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या' ही हिंदी म्हण सांगणार्‍या इंदूरच्या प्रकाश (चित्रगुप्तांचे मित्र) यांनीही उत्तम माहिती दिली. मिपाच्या माध्यमातून ओळख झालेल्या बर्‍याच मित्रांबरोबर प्रथमच थेट संवाद साधता आला. सामिल झालेल्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार. तसेच सुत्रसंचालक म्हणून मला सांभाळून घेतल्याबद्दल तर विशेष आभार. हा स्नेह असाच वृद्धींगत होत राहो.

संयोजकांचे मनापासून आभार . श्रीरंग आपले सूत्रसंचालन खूप आवडले. चित्रगुप्त काका यांची चित्रे अप्रतिम. कोल्हटकर काकानी प्राचीन गणिताचा इतिहास उलगडला त्याबद्दल आभार. मनो तुमच्या पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंतचा प्रवास उलगडला याबद्दल आभार. चौथा कोनाडा यांचे शीघ्र चित्र खूप आवडले. मिपा वर असणाऱ्या आयडींचे प्रत्यक्षात दर्शन झाले त्याबद्दल अजून एकदा आभार. पुढच्या कट्ट्याच्या प्रतीक्षेत.

इंटरनेट गंडलं होतं. मग एअरटेल 4G डेटा कार्ड, माझ्या मोबाईलचा हॉटस्पॉट, नंतर बायकोच्या मोबाईलचा हॉटस्पॉट अशा माध्यमातून ये जा करत होतो. दोन वेळा मोबाईलवरून ॲप वापरूनही कनेक्ट केलं, पण तोच इश्यू होता. शनिवार संध्याकाळच्या नेटवर्क कंजेशन मुळे वारंवार खंड पडत होता. मग चित्रगुप्त यांचा भाग सुरू असताना कंटाळून फोनवरून कॉल केला आणि ऐकू लागलो. उर्वरित कट्टा फक्त ऐकला. मनो यांनी रेकॉर्डिंग केल्याने जे मिस केलं त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता आला. (२ तास कट्टा चालला, हे रेकॉर्डिंग ने कळलं, काल वेळ कसा गेला ते कळलंच नाही.)

ऑनलाईन कट्टा इतका छान झाला, प्रत्यक्ष कट्ट्यात कितीतरी पट मजा येत असेल, हे नक्की!

प्रत्यक्ष कट्ट्यात कितीतरी पट मजा येत असेल, हे नक्की!
>>> +१११ 2019 मधल्या दिवाळीपूर्व पुणे कट्ट्यानंतर सध्याच्या वातावरणामुळे बराच काळ कट्टा होऊ शकलेला नाही याचा खेद होतो. त्या सुखद आठवणी अजूनही येतात. पुढच्या वर्षी सर्वत्र निरोगी वातावरण असावे आणि मग लवकरात लवकर एक प्रत्यक्ष कट्टा व्हावा ही मनोमन इच्छा !

चांगला झाला. पण पुढचा कट्टा अधिक नेटका, आटोपशीर व लक्षात राहील असा करण्यासाठी एकच मुलाखत (१० मिनिटांची) ठेवावी व बाकीचा वेळ ओळख व गप्पांसाठी ठेवावा.

चांगला झाला. पण पुढचा कट्टा अधिक नेटका, आटोपशीर व लक्षात राहील असा करण्यासाठी एकच मुलाखत (१० मिनिटांची) ठेवावी व बाकीचा वेळ ओळख व गप्पांसाठी ठेवावा.