✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अचानक पुणे-३० कट्टा

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
गुरुवार, 04/16/2009 - 12:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8948 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

मस्त अप्रतीम

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 04/16/2009 - 12:59 नवीन
मस्त लिहिलेत धावता आढावा घेतलात ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

फर्मास

नंदन
गुरुवार, 04/16/2009 - 13:02 नवीन
वृत्तांत! पुरेपूर कोल्हापूरच्या कट्ट्याची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त धावता

अवलिया
गुरुवार, 04/16/2009 - 13:04 नवीन
मस्त धावता आढावा ! --अवलिया
  • Log in or register to post comments

खणखणीत ऽऽऽ

छोटा डॉन
गुरुवार, 04/16/2009 - 13:07 नवीन
बिका, एकदम खणखणतीत वृत्तांत लिहला आहे. हसुन हसुन पडलो ... (आयला आजकाल भरल्या पोटाने असे हासणे कठिणच जाते. असो.) किती वाक्ये निवडुन त्याखाली स्मायली टाकु असे झाले आहे. अवघा वॄत्तांतच उत्तम, मजा आली ... ( ओ मालक, कधी आमच्या गरिबांच्या बेंगलोर कट्ट्याचा वॄत्तांत लिहा. ;) ) ------ (कट्टेकरी)छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

मस्त कट्टा केलात हो बिपिनदा.

अमोल खरे
गुरुवार, 04/16/2009 - 13:10 नवीन
फोटो टाकलेत ते बरं केलंत.....काही थोर माणसांचे चेहरे बघायची संधी मिळाली.
  • Log in or register to post comments

लेको असे

विसोबा खेचर
गुरुवार, 04/16/2009 - 13:11 नवीन
लेको असे अचानक कट्टे करता आणि आम्हाला जळवता काय?! :) असो, झक्कास वृत्तांत रे बिपिनदा! :) तात्या.
  • Log in or register to post comments

भौ....

मनिष
गुरुवार, 04/16/2009 - 13:14 नवीन
जरा आम्हाला पण फोन लावत जा की, पुण्यातच आहोत अजून! :) असो! कट्टा मस्त रंगलेला दिसतोय, ;) बिपिनदा, अजून काही दिवस असशील पुण्यात तर भेटूया नक्की! एक अधिकॄत कट्टा करूया का शनिवारी?
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/16/2009 - 13:37 नवीन
कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे, अरे पण गृहस्था, भारतात कधी गेलास तू अचानक? स्वाती
  • Log in or register to post comments

अचानकच!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/16/2009 - 13:45 नवीन
अगं मी असा अचानकच जातो नेहमी भारतात. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

च्यायला... चिडव लेका

संदीप चित्रे
गुरुवार, 04/16/2009 - 20:46 नवीन
इथे आम्ही अचानक भारतात जायचं म्हटलं तरी 'दिवस जाणं' काही चुकत नाही ...... वेळेतल्या फरकामुळे रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिका योग्य

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/16/2009 - 13:41 नवीन
बिका योग्य ठिकाणी "पान" मागितलंत ते बरं केलंत! परवा मला टेलिस्कोपसमोर उभे राहून "पान कुठे मिळेल" विचारत होता बिकाकाका! Image removed. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

जबरा

सुमीत भातखंडे
गुरुवार, 04/16/2009 - 13:46 नवीन
मस्तं कट्टा आणि तितकाच रंगतदार व्रुत्तांत. अप्रतिम.
  • Log in or register to post comments

झकास

दिपक
गुरुवार, 04/16/2009 - 13:55 नवीन
झकास वृतांत.. मस्तच जमला अचानक कट्टा :)
  • Log in or register to post comments

मस्त आहे

मैत्र
गुरुवार, 04/16/2009 - 14:08 नवीन
करा... अजून कंपूबाजी करा आणि जळवा लेको !!! X( X( X( X(
  • Log in or register to post comments

पुणे

नितिन थत्ते
गुरुवार, 04/16/2009 - 14:49 नवीन
सारखं पुणे ३० - पुणे३० काय लावलंय हो बिपिनभौ. अशानं आम्ही रागावू बरं का!!!!! =)) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

झकास

घाटावरचे भट
गुरुवार, 04/16/2009 - 14:51 नवीन
झकास कट्टा....अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अरेरेरेरेरेरे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 04/16/2009 - 15:13 नवीन
आयला येवढा मोठा कट्टा मिस केला मी . छ्या.... टिंग्याला झाडला पाहीजे माझा नंबर नीट न टिपल्याबद्दल. असो. कट्टा एकदम पुणे - ३० झालेला दिसतो आहे. :) अवांतर: बिपीनदा किती दिवस आहात अजून पुण्यात? भेटू परत एकदा. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

मी सुध्दा सध्या पुण्यात आहे

खडूस
गुरुवार, 04/16/2009 - 15:54 नवीन
पुढचा कट्टा कधी ? - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

आम्हाला

बाकरवडी
गुरुवार, 04/16/2009 - 16:52 नवीन
आम्हाला विसरलात राव ! चितळ्यांच्या दुकानातून बाकरवडी आणून खाल्ल्याचे लिहीले नाही ! असे का बाँ ! ;)
  • Log in or register to post comments

अरे वा!

शाल्मली
गुरुवार, 04/16/2009 - 17:00 नवीन
झक्कासच झालेला दिसतोय कट्टा! मस्त वृत्तांत. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

हा हा हा....

धमाल मुलगा
गुरुवार, 04/16/2009 - 17:11 नवीन
अरे बिपिनदा, तू नुसतं पश्याच्या कॅफेवर घेऊन चल असं रिक्षावाल्याला सांगितलं असतंस तर त्यानं तुला आधी दंडवत घालुन प्रेमानं रिक्षात बसवून व्यवस्थित योग्य जागी सोडलं असतं :)
हा माणूस हाडाचा "शोधक पत्रकार" आहे, प्रश्नच नाही. Wink कमी पण मार्मिक बोलणं हा यांचा गुणविशेष. अतिशय बारीक नजर आणि जबरदस्त निरीक्षणशक्ती.
अगदी अगदी!!! पुर्ण सहमत!! अशक्य रसायन आहेत मोडकसाहेब :) बाकी, डागदरांच्या दवाखान्यात आल्यावर त्यांच्या टेबलावरची दोन "World War II" असं लिहिलेली जवळपास माझ्या वजनाएवढीच जड पुस्तकं पाहुन मी बसल्याजागीच गार पल्डो होतो.
रिवाजाप्रमाणे १० वेळा रिंग झाल्याशिवाय फोन उचललाच गेला नाही.
=)) =)) अरे गप ना बाबा!
आम्ही सगळे इतक्या जवळ जमलो आहोत हे ऐकल्यावर तर ते अस्वस्थच झाले.
म्हणजे काय? होणारच की राव! इतके रथी महारथी जमलेले. 'कांटे'ची टीम अड्ड्यावर जमलेली आणि त्यात नेमकं महेश मांजरेकर नाही? ;)
"कपडे घालून (खरं म्हणजे त्याना कपडे बदलून असे म्हणायचे होते, चुकून होतात चुका बोलताना गडबडीत, आपण सांभाळून घ्यायचं) आलोच"
=)) =)) इच्चिभनं! आमचं आपलं "णो कॉमेंट्स" बाकी, प.रा.सारखा दिलखुलास दोस्त सापडणं खरंच अवघड आहे. लॉर्ड टिंगी (पहिला) ह्याच्या पुनःदर्शनाने ऊर भरुन आला. आहो, काही झालं तरी साहेबाच्या देशातली माणसं ही..आमच्यासारख्या देशी गावंढळांना कोण अप्रुप असतं ह्यांचं (त्यात पुन्हा जर त्यांनी पेश्शल शिंगल माल्ट पाजली असेल तर जरा जास्तच ;) ) बाकी, ते दाढे डाक्टर म्हणजे बघा, गेल्या टायमाला मिशीसकट व्हतं, आन ह्या वक्ताला मिशी गायप!!! हे म्हंजी गेल्या टैमाला रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा भ्येटलेलं आन् ह्याबारीला लक्की शर्मा असं वाटलं. :) बिपीनदा तर काय, ऑलवेज रॉक्स.... (ऑन द रॉक्स नव्हे!!) आपलाच, (कंपूबाज) ध मा ल. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

जय हो !

मुक्तसुनीत
गुरुवार, 04/16/2009 - 17:33 नवीन
वृत्तांत वाचला. श्रुति धन्य जाहल्या ! मूळ वृत्तांत आणि प्रतिक्रियांचे कारंजे जोरदार ! काही व्यक्तींचे फोटु पहिल्यांदा पाह्यले. मोडकांची दाढी लय भारी वाटली बॉ ! :-) पुणे-३० मधला दिलखुलासपणा ...तिथे चापलेली बिर्याणी ..ओले केलेले घसे. आणि काव्यशास्त्रविनोदेन मित्रांबरोबर घालवलेला काळ... हाय ! या दानासि , या दानाहून , अन्य नसे उपमान. पीएल च्या "रावसाहेब" मधले ते प्रसिद्ध वाक्य लागू होते आहे : "त्यांनी व्यसने खूप केली. परंतु त्यांचे सगळ्यात मोठे व्यसन म्हणजे माणसं ! माणसं जवळ नसली की चैन पडायचे नाही त्यांना !" (काय खरं का नाय मिष्टर कार्यकर्ते ! ;-) )
  • Log in or register to post comments

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/16/2009 - 17:50 नवीन
काय करू भाऊ? हे व्यसन जबरदस्तच आहे... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सह्ही..

शितल
गुरुवार, 04/16/2009 - 17:37 नवीन
बिपीनदा, वृत्तांत मस्त लिहिला आहेस रे. प-या जास्त उपवास करतो वाटते .;) धम्या नेहमी प्रमाणे धबाधबा हसत आहे..;) बिपीनदा शाळा घेत आहे..;) आणि टिंगी बद्दल काय बोलावे.. हॅ हॅ हॅ करणे कसा विसरला तो.. ;) फोटो ही मस्त. अदितीच्या प्रतिसादातील फोटो ही मस्त. :)
  • Log in or register to post comments

पश्चात्ताप!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/16/2009 - 17:52 नवीन
त्याला खूप झापला आम्ही, तुला त्रास देतो म्हणून. मग पश्चात्ताप झाला त्याला म्हणून गप्प आहे तो. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

हेहेहे (

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/16/2009 - 18:02 नवीन
हेहेहे ( ह्या पुढे असेच हसावे लागणार ) हा माणूस नेहमी "माझ्या कॅफेत आलेल्या सुंदर मुली" वगैरे शब्दप्रयोग वापरत असतो. त्यामुळे मला जाम उत्सुकता लागली होती. पण तिथे बघतो तर काय.... शुकशुकाट. आणि एक माणूस चूपचाप कोपर्‍यात बसला होता. बिका येणार हे कळल्यामुले सर्व 'सौंदर्यस्थळांना आम्ही आधीच सावधगीरीची सुचना देउन ठेवली होती. त्यातुन टिंग्या पण येतो आहे म्हणाल्या बरोब्बर आम्ही कॅफेच लवकर बंद करायचा निर्णय घेतला ;) प्रतिसाद वगैरे तसे इमाने इतबारे आणि चांगले देतो हा परा. हा विषय ताणून धरला आणि याने प्रतिसाद द्यायचे बंद केले तर? आपलंच नुकसान. गप्प बसलो. कसल कसल ! काल खिशाला अज्जीबात हात न लावता आम्ही 'इमाने इतबारे' दिलेल्या सगळ्या प्रतिक्रीयांचे कष्ट वसुल केले. घसा ओला केल्यावर थोडे फार (थोडेफारच) पैसे शेअर करावे असा विचार होता परंतु तेव्हड्यात डॉक्टरसाहेबांनी 'वरचे पैसे' राहुद्यात असे म्हणल्या बरोब्बर आम्ही आमचे पाकिट म्यान केले. (सदाशिव पेठ -३०) (ह्या पुढे डॉक्टरांच्या लेखावर लक्ष ठेवावे लागणार) देशमुख राजे गढीतुन तातडीन निघाले परंतु आमच्या पर्यंत थोडे आरामातच पोचले ;) आल्यावर त्यांनी लगेच मैफिलीचा ताबा घेउन टाकला हे.सां. न.ल. टिंग्यापंत आमच्याकडे पाठ करुन आम्हाला शोधत असल्याने त्यांना शोधुन काढण्यात बराच वेळ गेला. त्यांनी सारखे मला 'तुला आधी कुठेतरी पाहिले आहे , पाहिले आहे... असे बर्‍याचदा ऐकवले. ज्या पोलिस चौकी बाहेर आपण माझी वाट पाहात उभा होतात तिथे आतच माझा फोटो टांगला आहे ही आठवण मी त्यांना अज्जीबात करुन दिली नाही. पण टिंग्याला काहि शंका आली असावी कारण आल्यापासुन परत जाईपर्यंत तो त्याची 'सॅक' अगदी उराशी बाळगुन बसला होता. मोडक साहेबांनी जुने ठेवणीतले काही किस्से सांगुन बहार आणली. एकुणच त्यांचा सदस्य परिचय बघुन आश्चर्य वाटले :) डॉक्टरां विषयी जास्ती काहि लिहित नाही कारण मग मला न्युनगंड आल्यासारखे वाटायला लागेल. फक्त आर.डीं. चे चाहते म्हणून त्यांनी खास कलकत्याहुन मागावलेली दुर्मीळ दिनदर्शीका ज्यावर आर.डीं. चे अतिशय दुर्मीळ फोटो आहेत, वर्ल्ड वॉर नावाचे प्रकरण ज्यानी आमची सातवी/आठवी/नववी हि शालेय वर्षे हिरोशीमा नागासाकी केली... त्या विषयावर डॉक्टर , बिपीनदा ह्यांची चर्चा ऐकुन साला हे आपल्याला इतिहास शिकवायला का न्हवते असे वाटुन गेले ;) त्या चर्चेत मध्येच थोडासा भाग घेउन टिंग्यानी आम्हाला आमच्या 'अशीक्षीत' पणाची जाणीव अजुन तिव्रतेने करुन दिली ;) बिकां तर काय भेटल्या भेटल्याच एकदम आपले वाटुन गेले. त्यांना काय किंवा इतर कोणालाच काय, पहिल्यांदा भेटतोय असे जाणवलेच नाही. एका सुखद कट्ट्याबद्दल ह्या सगळ्यांचे मनापासुन आभार. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

बिपिन'दा....

मृगनयनी
Fri, 04/17/2009 - 10:26 नवीन
बिपिन'दा.... एकंदर तुमचा कट्टा छानच झाला म्हणायचा! :) आपल्या पुढच्या दौर्‍यात आम्ही आपणास नक्की भेटू! :) अवांतर : १. ब्रिटिश टिन्गी उर्फ ब्रिट्स... खूपच सात्विक चेहर्‍याचा वाटतो. :) २. प. रा. ला सारखं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय! (ईस्पेशली सुजाता' कोल्ड्रिन्क च्या आसपास! ) :-? असो.... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अचानक

रेवती
गुरुवार, 04/16/2009 - 18:12 नवीन
अचानक कट्ट्याचा अचानक वृत्तांत.:) बिपिनभाऊंची लेखनशैली चांगली आहेच, त्यातून सगळे दोस्तलोक भेटल्यावर जरा ज्यास्तच आनंद झालेला फोटूत दिसला. प रा ने माझा अंदाज साफ चुकवला. आधी वाटलं हा माणून उंच धिप्पाड असणार.... (हलके घेणे). रेवती
  • Log in or register to post comments

सगळे मिपा बंधू च दिसत आहेत मिपा भगिनींना आमंत्रण का नाही ??

वाहीदा
गुरुवार, 04/16/2009 - 18:39 नवीन
Where are the Mipa ladies and Gals gone ?? :? अन हे काय बिप १ आठवड्या पासून कोकलते आहे मी.. की भक्ती ला भेटायचे आहे अन तुला ही तर गुपचुप कट्टा पण केलास ?? ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत..

प्राजु
गुरुवार, 04/16/2009 - 18:50 नवीन
टिंग्याचा आणि जबडे... आपलं दाढे साहेबांचा फोटो दिसत नाहीये.. ;) बिर्याणी एकदम सुंदर! दृष्ट काढावी अशीच. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

बिका

विनायक प्रभू
गुरुवार, 04/16/2009 - 18:56 नवीन
मी प्रतिक्रिया देणार नाही.
  • Log in or register to post comments

म्या बी

दशानन
गुरुवार, 04/16/2009 - 19:35 नवीन
म्या बी ! जय कोल्हापुर ! जय महाराष्ट्र ! जय गुडगांव ! जय हरयाणा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मस्त रे ...

संदीप चित्रे
गुरुवार, 04/16/2009 - 20:02 नवीन
अचानक घडलेल्या भेटीगाठी आणि गप्पांच्या मैफिलींची मजा वेगळीच असते. पुढच्या वेळी पुण्याला गेल्यावर एस्.पीज.ची बिर्याणी मस्ट आहे !!! ------ धम्या लेका आता लग्न होऊन खूप महिने झाले की ! माझ्या लग्नानंतर दीड महिन्यातच मला वाढीव मापाच्या पँट शिवाव्या लागल्या होत्या :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

अरे संदिपदादा,

धमाल मुलगा
Fri, 04/17/2009 - 15:03 नवीन
मुळात देवानं आमचं प्रॉजेक्ट सँक्शन करतानाच एफ.एस.आय. इतका कमी ठेवला होता, की वाढून वाढून त्यात वाढ ती किती होणार? चाळीतल्या दोन खोल्यांचा महाल तर नाही ना होऊ शकत? :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

अरे वा! मस्तच रे.

चतुरंग
गुरुवार, 04/16/2009 - 20:23 नवीन
बिका, पुण्यातला मुक्काम अंमळ सत्कारणी लावलेला दिसतोस! नेहेमीप्रमाणेच चिमटे, टपल्या, कोपरखळ्यांचा मनमुराद वापर करीत लिहिलेला अनौपचारिक कट्ट्याचा खुसखुशीत वृत्तांत वाचून मजा आली. 'पाणवठा' शब्द आवडला! उन्हाळ्यात तर फारच गरज असते पाणवठ्यांची! ;) एसपीज ची बिर्याणी एकदम झक्कास दिसतेय. पराकडे बघून माझा त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा अंदाज एकदम बरोबर आल्याचा आनंद झाला! धम्याला काँपिटिशन आहे गडी! ;) धम्याच्या चेहेर्‍यावरचे 'कमावलेले हसू' एकदम लाजवाब! :D टिंग्या चेहेर्‍यावर सोज्वळपणाचे भाव आणण्याची पराकाष्ठा करताना हतबल झाल्यासारखा का दिसतोय? ;) 'बुल्गानिन मोडक' एकदम 'सीझन्ड' दिसताहेत! बसल्याजागी समोरच्याची बत्ती गुल करण्याचे कसब दाखवतोय त्यांचा चेहेरा! त्यांची दाढी एकदम झक्कास बॉ. 'डॉ. अमोल पालेकरांचा' दवाखाना एकदम चकाचक नवीन दिसतोय (ते बसलेत त्या खुर्चीचे प्लास्टिक कवर देखील अजून तसेच आहे!) चतुरंग
  • Log in or register to post comments

कळलं बरं...

श्रावण मोडक
गुरुवार, 04/16/2009 - 20:41 नवीन
चतुरंगा, सीझन्ड या शब्दांतून काय म्हणायचंय ते कळलं बरं... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

फक्त तुम्हीच रंगाशेठ!!!!

धमाल मुलगा
Fri, 04/17/2009 - 15:07 नवीन
धम्याच्या चेहेर्‍यावरचे 'कमावलेले हसू' एकदम लाजवाब!
खरोखर...फक्त तुम्हीच आहात हो ज्यांनी खरं काय ते ओळखलं. विदुषकाच्या रंगवलेल्या हसर्‍या चेहर्‍यामागची दु:खं वाचु शकणारे तुमच्यासारखे अगदीच विरळा.... =)) =)) >>धम्याला काँपिटिशन आहे गडी! =)) आमची दोघांची युतीदेखील झालेली आहे म्हाराजा.... आम्ही दोघं मिळून टार्‍याला चेपणार आहोत. तो टार्‍याही आम्हा एकेकाला पाहुन टरटर करतो, पण आम्ही दोघं एकत्र असलो की भिजल्या मांजरागत गप असतो. ;) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वा मजा केलीत

धनंजय
गुरुवार, 04/16/2009 - 20:37 नवीन
पुणे-३० मधला कट्टा - मस्तच वृत्तांत
  • Log in or register to post comments

ह्म्म...परा

मदनबाण
गुरुवार, 04/16/2009 - 20:41 नवीन
ह्म्म...परा एकदम हिरो दिसतो. :) धमाल शेट पण जोरात हायेत...:) टिंग्या कधी यतोस रे ठाण्याला मामलेदारची मिसळ चापायला ? बिपिन भाऊ लय बिझी माणुस हाय तरी त्यांनी त्यांच्या अमुल्य वेळ पुणे ३० साठी राखुन ठेवला या बद्धल त्यांचे अभिनंदन !!! ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

राव

विनायक प्रभू
Fri, 04/17/2009 - 06:58 नवीन
काय सांगताहात राव. पुणे ३० पत्ता शोधेपर्यंत माणुस ठाण्यावरुन दील्लीला पोचेल. अचानक म्हणे.
  • Log in or register to post comments

खरं

भडकमकर मास्तर
Fri, 04/17/2009 - 07:46 नवीन
खरं सांगायचं तर हे वाचताना " अगदी उत्तम चिडचिड" झाली... .... चांगला कट्टा मिस झाला. (बिकांनी डिसेंबर महिन्यात येतो येतो असं म्हणत टांग दिलेली होती ती जखम पुन्हा उघडी हो ऊन भळाभळा वाहू लागली) ;) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान वृत्तांत

चित्रा
Fri, 04/17/2009 - 15:23 नवीन
फोटो, वृत्तांत आवडले.
  • Log in or register to post comments

आरे वा !!

अनिल हटेला
Fri, 04/17/2009 - 16:11 नवीन
छोटेखानी कट्टा मस्तच झालाये !! लेख आणी त्यावरच्या एक से एक प्रतीक्रिया जबरदस्त !! अभिनंदन !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा