Skip to main content

सध्या मी काय पाहतोय ? भाग ५

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 24/04/2021 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्‍या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा कुमार आयुष्याशी नेमका कसा संबंध असणार असतो ? अश्या अनेक आणि इतर प्रश्नां पैकी काहींची उत्तरे तुम्हाला पहिल्या सिझन मध्ये मिळतील आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २ रा सिझन येण्याची वाट पहावी लागेल, जी अर्थातच मी आतुरतेने पाहत आहे. या मालिकेत कुमार महाजन च्या भुमिकेत स्वप्नील जोशी तर चक्रपाणीच्या भुमिकेत बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कृष्णाची अविस्मरणीय भुमिका साकारणारे नितिश भारद्वाज दिसतात. कुमारच्या बायकोची भुमिका तेजस्वीनी पंडीत ने केली असुन ती एकदम खवा-मावा दिसते ! :) यात तिने उत्कट चुंबन दृष्ये देखील अगदी मन लावुन दिली असुन प्रेक्षकांची मने देखील उत्कट होतील अशी ती झाली आहेत. :))) जर तुम्ही आत्ता पर्यंत ही वेब सिरीज पाहिली नसेल तर एका रोमांचक गुढ अनुभवाला तुम्ही पारखे आहात, तेव्हा दुसरा सिझन येण्याचा आधीच पहिला सिझन पहाच. तुमची ही सोय इथे आहे :- https://www.mxplayer.in/show/watch-samantar/season-1/identical-stranger…

मदनबाण.....

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 51919
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

गेल्या तीनेक आठवड्यात नेटफ्लिक्सवर 'अ सुटेबल बॉय' ही सिरीज बघितली. विक्रम सेठ या लेखकाच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज आधारीत आहे. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतातील, विशेषतः बंगालमधील पहिल्या पाच वर्षातील पार्श्वभूमी या सिरीजला आहे. नेटफ्लिक्सच्या सिरीजचा एक दर्जा नक्कीच असतो तो या चित्रीकरणातून जाणवतो. ही सिरीज एकूण सहाच भागात आहे आणि कथा एकूण चार कुटुंबांभोवती फिरते. लता नावाच्या १९ वर्षाच्या 'लग्नाळू' मुलीसाठी एक 'सुटेबल बॉय' शोधणे या कोणत्याही कुटुंबात होणार्‍या घटनेभोवती सगळी कथा फिरते. शेवटपर्यंत नक्की कोण 'सुटेबल बॉय' होणार याची उत्कंठा लागून राहते. माझा तरी त्या चार कुटुंबांचा एकमेकांशी संबंध काय आणि कोण कोणत्या कुटुंबातील आहे याचा सुरवातीला थोडा गोंधळ झाला होता. ही सिरीज सहाच भागात आहे आणि सिझन वगैरे भानगड नाही त्यामुळे बघायला कंटाळवाणी होत नाही. वैधानिक इशारा-- सिरीजमधील काही दृष्ये अगदी निळ्या चित्रपटात शोभावी अशी आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक वगैरेंबरोबर ती सिरीज बघताना कुचंबणा होऊ शकेल.

२ छान पाहिले : ‘अमल’ हा हिंदी : यावर स्वतंत्र धागा काढलाय 'मिनारी' हा कोरिअन. अमेरिकी शहरातून स्थलांतरित होऊन खेड्यात शेतीसाठी गेलेल्या कुटुंबाची कहाणी . छानच.

In reply to by हेमंतकुमार

यातला नायक अमेरीकेत शेति करायला महिंद्रा ट्रॅक्टर वापरतो हे बघुन भारी वाटलं...

खरंतर ५० + झाले धागा नविन काढाया पाहिजे पन लिवाव काय हेच पक्क नसल्याने ह्यालाच रेटत हाय... :) वरती पंढरीच्या विठुराया कविता अनेकदा ऐकली आणि प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आल्यानं, मनं अजुन कोडगं झालं नसल्याची माझीच मला खात्री पटली ! 'संक्या, काहीही व्हायलंय बे हे... Whatsapp Kavita

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Soppanasundari... :- Veera Sivaji

In reply to by मदनबाण

पंढरीच्या विठूराया ने खरेच गलबलून येते, अप्रतिम कविता आहे. सिनेमा बघून रडणे हे माझ्यासाठी एकदम दुर्मिळ आणि रिफ्रेशिंग अनुभव असतात. मिपावरच कोणीतरी सुचवलेला ट्रायल ऑफ शिकागो ७ सिनेमातल्या काही घटनांमुळे डोळ्यातून पाणी आले आणि आश्चर्य वाटलं. तारे जमी पर नंतर आताच ! :) छान सिनेमा आहे शिकागो ७.

राधे सिनेमा फारच टीका उठली आहे. हआहैको मधला प्रेम नंतर बजरंगी भाईजानच आवडता आणि माझ्या मुलीला त्यातली मुन्नी :) मुलीबरोबर कितीही वेळा पाहू शकते हा सिनेमा आणि हे दोन सिनतर फारच आवडतात.

राधे सिनेमा फारच टीका उठली आहे. खरं तर... ह्या म्हातार बाबाचे चाळेच इतके घाणेरडे असतात की त्याचे चित्रपट म्हणजे केवळ मर्कटलिला. हा विकृत माणुस आणि मुंबई पोलिस माझ्या मनातुन तेव्हाच कायमचे उतरले जेव्हा रविद्र पाटिल हा लावारिस मौत मेला ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANI

Aspirants आज UPSC च्या अभ्यासावर बनवलेली मालिका youtube वर बघितली. मस्त आहे

In reply to by राघवेंद्र

भयंकर क्रेझ आहे त्याची सध्या... अक्षरशः होपलेस लोक यासाठी प्रयत्न करताना जो महानपणाचा आव आणतात ते बघुन तर जर चुकुन हा निवडला गेला तर काय होइल या नुस्त्या विचारानेही धडकी भरते. खरे तर हे प्रकरणच कोबायाशीमारु (स्टार ट्रेक) आहे. तुम्ही जितक्या जास्त संखेने परिक्षा द्याल तितकेच अवघड तुमची निवड बनेल. बाकी जसे कोटा फॅक्टरी काढले तसेच आस्पायरंट काढले, पिचर्स सोडले तर टीवीएफ मधे तसाही दम नाही.

In reply to by राघवेंद्र

या मालिका तशा चांगल्या आहेत पण दोन निरीक्षणे १) तर या मालिकांमध्ये जो प्रॉयोजक असतो त्याच्या सेवेचा किंवा उत्पदनाचा उल्लेख केलेला दिसतो ( ऊन अकादमी असेल किंवा कोणी म्युच्युअल फंड असेल ) पण तो उल्लेख ( प्रोडक्त्त प्लेसमेंट ) सरळ सरळ कळतो कि उबग येतो .. हे भाडीपा मध्ये पण द्या झूम म्हणून ५ भागांची मालिका जुन्य नाटकांवर आधारित , त्यांनचा प्रायोजक "बीरा " बियर पण त्याचे ( प्रोडक्त्त प्लेसमेंट ) इतके ओढून ताणून आणलेले आहे .. २) Aspirants तर दुसरे निरीक्षण :यातील मुख्य व्यक्तिरेखा जी आहे ती एक एपिसोड मध्ये किती वेळा स्वेटर बदलते ते पहा .. मान्य आहे कि दिल्लीत स्वेटर जस्ट असतात लोकांकडे आणि हि व्यक्तिरेखा जरी विद्यार्थी असली तरी नोकरीतून वेळ काढून परीकेशेच्या तयारी साठी दिल्लीत आली आहे म्हणजे त्याच्याकडे पैसे आहेत .. तरी पण एवढे स्वेटर !

अबोमिनेबल-अनिमेशन सिनेमा. येती या क्रिअचरला त्याच्या घरापर्यंत एव्हरेस्टला नेण्यासाठी यी आणि छोट्या मित्रांची गोष्ट आहे.:)

In reply to by जुइ

मी माझ्या मुलीबरोबर घरीच पाहिला,खुपचं खुश होती ती.तसाच दुसरा सिनेमा म्हणजे कुंफू पांडा , मज्जा येते मुलांबरोबर असे सिनेमे पाहताना :)

In reply to by Bhakti

आम्ही माय लेकिने अजून एक पाहिला तो म्हणजे लायन किंग आणि फ्रोझन २

आवडता सिनेमा पुन्हा बघितला. त्यातला आवडता प्रसंग- V अक्षरापासून इतके शब्द आहेत, हे कळते. मस्त संवाद.
Evey-who are you ? V-who? Who is but the form following the function of what, and what I am is a man in a mask. Evey- Oh I can see that. V-Of course you can. I'm not questioning your powers of observation, I'm merely remarking upon the paradox of asking a masked man who he is. But on this most auspicious of nights permit me then, in lieu of the more commonplace sobriquet to suggest the character of this dramatis persona. Viola! In view, a humble vaudevillian veteran cast vicariously as both victim and villain by the vicissitudes of fate. This visage, no mere venere of vanity is a vestige of vox populi, now vacant, vanished. However this valorous visitation of a bygone vexation stands vivified and has vowed to vanquish the venal and virulent vermin vanguarding vice and vouchsafing the violently vicious and voracious violation of volition! The only verdict is vengeance, a vendetta, held as a votive not in vain, for the value and veracity of such shall one day vindicate the vigilant and the virtuous. Verily, this vichyssoice of verbiage veers most verbose. So let me add simply that it is my honour to meet you, and you may call me V.

In reply to by गॉडजिला

इथे फेटा उडवलेली इमोजी आहे असे समजावे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Music is the divine way to tell beautiful, poetic things to the heart.”Pablo Casals

एस.पी. तुम्हाला आम्ही किती आठवावे...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Music is the divine way to tell beautiful, poetic things to the heart.”Pablo Casals

In reply to by मदनबाण

रोजाच्या गाण्याची भ्रष्ट नक्कलही पचनी पडली जस्ट बिकॉज ऑफ लिजेंड्स असोसिएटेड (S. P. Balsubramaniam, Chitra)

व्हेंटिलेटर +१ कितव्यांदा पाहतेय मोजदाद नाही. कोकण, बाप्पा :) भावना कशा सहज मांडाव्यात असा सिनेमा!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene

काल आर्मी ऑफ द डेड पाहिला, BBB मूवी फक्त मायकल बे काढतो असा समज होता पण झेक स्नायडरनेही तेच प्रकरण केले आहे. हुमा कुरेशी ला काम नाही. AAA मूवी दिगदर्शित करणाऱ्या डायरेकटर कडून हि अपेक्षा आजिबात न्हवती... तसं सर्व चांगलं आहे पण नेटफलिक्स चा लो बजेटपणा कदाचित मधे आला असावा... https://youtu.be/Bfrs1FhGSxQ

In reply to by गॉडजिला

माझी पण काहीशी निराशाच झाली, टीपी आहे तसा. झोंबी जनरवरचा सर्वोकृष्ट वर्ल्ड वॉर झी हाच असावा. वॉकिंग डेड सिरीज सुद्धा भारी आहे.

In reply to by प्रचेतस

चित्रपट मुळात जर सायफाय फँटसी जेनर आहे त्यात २ तासाच्यावर मोठा चित्रपट, सुरुवात मुख*थुन द्रुश्याने केल्यावर मायकल बे स्टाइल चित्रपटत आहे हे प्रेक्षकाला समजावल्यावर नंतर अक्षरश: अधांतरी सोड्ले आहे .. अपेक्षित दे मारपटाची मजा नाही, अ‍ॅक्षन चांगली आहे पण त्यामागील नाट्य रंगलेले नाही, हिरो, स्टारकास्ट, प्लॉट सर्व पातळीवर निराशा... नेमके उलगडत जाणारे कथानक नाही... म्हणजे चित्रपट धड हिस्ट स्टोरी नाही, xxx अलग किसम का एजंट झँदर केज नाही, वर्ल्ड वॉर झी सारखा सब्स्टंस नाही, नात्यातली नाट्यमयता नाही, सध्याच्या लॉकडाउन संदर्भात पोलीसाचा क्वारंटाइनची धमकी देणारा एक सिन सोडला तर मनात उतरायला पुरेसा संदर्भ नाही, झोंबीची बायको कोणाला का हवीय त्यामागे कसलाही आगापिछा नाही, नेमकं व्हिलन कोण याचा ठळक रेफर्न्स नाही त्याचं जे प्याद आहे ते स्वताच्या कर्माने जाते त्यामागे प्रोटोगनीस्टचे कसलेही कर्तुत्व नाही... दुर्दैवाने सत्यकथा / डोक्युमेंटरीही नाही, शेक्स्पिअरन शोकांतीका म्हणावी जिथे शेवटी सर्व वाइटच होते तर त्यासाठी लागणारी गुंतागुंत नाही मग अफलातुन व्हि एफ एक्स सोडले तर नेमकं काय दाखवयचे आहे याचा पत्ता दाखवणार्‍याला आणी पाहणार्‍याला न लागु देण्याचे शिवधनुष्य स्नायडरने का उचलले ? मुळात ज्यांना झोंबी बॅशिंग बघायचेय त्यांना रेसीडंट एविल, झोंबीलँड आधीच आहेत, ज्याना जरा सब्स्टंस हवा त्याना आयम लिजेंड, वर्ल्ड वॉर झी आहेत मग झॅक स्नायडर नावाचे जे वलय /जादु आहे त्याच्याकडून असा चित्रपट नेट्फ्लिक्सच बनवु शकते...

गौर गोपाळ दास यांचे जगभरात १.२ कोटी पाठीराखे आहेत. आता त्यांनी मराठीतून मुलाखत द्यायला सुरवात केली आहे. एबीपी माझावरची ही त्यांची दुसरी मुलाखत एबीपी माझावरील ही सर्वात मोठी मुलाखत असून, एबीपी माझावरील सर्वात जास्त वेळा पाहिलेल्या मुलाखतीमधील एक असा मान तिला फक्त आठवड्याभरात मिळवला आहे.

In reply to by शाम भागवत

ह्या मुलाखतीची माझा ने बरीच जाहिरात देखील केली होती, ही मुलाखत चालु असताना थोडीशी पाहिली आणि नंतर युट्युबवर देखील अर्धी पाहिली आहे. सवळ मिळताच उरलेली अर्धी मुलाखत देखील पाहणार आहे. त्यांचा व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेला विनोदी व्हिडियो देखील मी पाहिला आहे, तो इथे खाली देतो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon

In reply to by शाम भागवत

@ शाम भागवत गौर गोपाळ दास यांची मुलाखत पाहत होतो... तेव्हा पटकन ते जे सांगत आहेत तेच मी आयटी क्षेत्राच्या बाबतीत मत व्यक्त करना लिहले होते. ते क्रिकेट चे १ तासाचे उदाहरण देतात [ ३६:४० ] तर मी माझ्या प्रतिसादात ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट बद्धल उदाहरण दिले आहे. १०+ वर्ष त्यांचा विचार / विवेचन आणि माझा प्रतिसाद टॅली होतो... :))) साधारण ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क करणारा व्यक्ती मल्टिटास्किंग मध्ये चँपियन झालेला असतो... मल्टिटास्किंग म्हणजे अनेक ठिकाणी एकाच वेळी लक्ष देउन काम करणे याचा दुसरा अर्थ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी करणे ! थोडक्यात तुम्ही डिस्ट्रॅक्शन प्रॅक्टिस करता, रोज, अनेक महिने , अनेक वर्ष ! जी गोष्ट तुम्ही रोज प्रॅक्टिस करता त्यात तुम्ही तरबेज बनता हा गुणधर्म आहे, त्यामुळे साधारण १०+ वर्ष मध्ये या प्रोफाइल मध्ये घालवलेली लोक त्यांची लक्ष केंद्रीत करायची क्षमताच गमावून बसतात आणि नविन तंत्रज्ञान शिकण्यास ते असमर्थ ठरतात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman

@ गॉडजिला बॉलिवुड कुचतो शरम करो, बेशर्म लोगों से शर्म की उम्मिद करना ही गलत हय ! विदेशी चित्रपट किंवा दक्षिणेतील चित्रपट यांची कॉपी / संवाद / गाणी सगळं सगळं उचलायच त्याची मसाला भेळ करायची आणि चित्रपटाच्या नावाखीली थेटर मध्ये आणुन बक्कळ पैसा छापायचा. हरीश पटेलां बद्धल इतकी माहिती नव्हती. त्यांच्या मिस्टर इंडिया मधला "गयी भैस पानी में" हा संवाद नंतर सगळीकडेच फारच प्रचलित झाला होता. हल्लीच मी राजेश खन्ना यांची एक मुलाखत पाहिली होती, त्यांचा आवाज, त्यांच्या बोलण्याचा अंदाज क्या बात ! हिदुस्थानातील पहिला आणि अगदी खर्‍या अर्थाने असलेला सुपरस्टार ! [ मी आता परत आनंद पाहणार आहे. ] इज्ज़ते, शोहरते, चाहतें, उल्फतें , कोई भी चीज़ दुनिया में रहती नही आज मै हूँ जहाँ, कल कोई और था ये भी एक दौर है, वो भी एक दौर था हा दाग [ १९७३ ] चित्रपटातील डायलॉग राजेश खन्ना त्यांच्या शेवटच्या काळात अनेक पुरस्कार किंवा इतर कार्यक्रमात आवार्जुन म्हणायचे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon

In reply to by मदनबाण

आणि चित्रपट बघत हरखुन गेलो, अगदी रमेश व सिमादेव पासुन राजेश खन्न्ना, अमिताभ पर्यंत सर्वच अप्रतिम.

तु है मेरा सन डे हा मुव्हि कोणी पाहिला आहे का? टाईम पास्,फिल गुड टाईप आहे.

आधी स्त्रिमुक्ती प्रकरण वाटले होते पण फिबी वॉलर ब्रिजने टोटल धमाल केलीय... पहिला सिजन फिनाले हा शेवट नाही, मध्यांतर आहे इतके ध्यानात ठेवा.

अभिनयसंपन्न, चांगले पण कंटाळवाणे सादरीकरण.. ढकलत ढकलत पाहिला...

कर्णन नावाचा धनुषचा तामिळ सिनेमा पाहिला. फार दाक्षिणात्य सिनेमे पाहिले नाहीयेत. कर्णन म्हणजे अगदी भीषण सिनेमा आहे. अगदी आतडे पिळवून टाकतील असे काही प्रसंग आहेत. संगीत, अभिनय उत्तम आहे. धनुषचा अभिनय तर छानच आहे, पण सोबत इतर पात्र सुद्धा उत्तम वठवली गेली आहेत. पोडियानकुलम नावाचे छोटेसे गाव असते. तिथे बस स्टॉप नसतो, त्यामुळे बससाठी जवळच्या गावात जावे लागत असते. त्या गावातील लोक पोडियानकुलम मधल्याना हीन वागणूक देत असतात. या विरुद्ध कर्णन नावाचा तरुण मुलगा संतापून जातो, आणि हे बदलण्यास बघतो. सुरुवातीला काही गावकरी त्याच्या विरोधात असतात, भीतीमुळे. पण अश्या काही गोष्टी घडतात कि सगळ्यांना कर्णनच्या सोबत यावेच लागते. शेवट फारसा आवडला नाही, हे स्पॉयलरशिवाय नमूद करतो. सगळीच गाणी छान आहेत. खासकरून समारंभात आपल्या पत्नीचे वर्णन करायचे गाणे, आणि सुरुवातीचे गाणे- देवीचा मुखवटा घातलेली लहान मुलगी म्हणजे गावाकडे पाहणारी देवी हि कल्पना फार आवडली.

नावाच्या विरूद्ध आहे, एक हळवी लव्हस्टोरी !:)

In reply to by Bhakti

मला तर तमिळ सिनेमा असेल वाटलं होतं चक्क तेलगू निघाला कारण तेलगूमधे इतकं डावेपण आता दिसत नाही... कॉम्रेड नावही योग्य आहे कारण हिरोईन शेवटी जे करते ते हिरोच्या पाठींब्यामुळे नाही तर जेंव्हा तिचा आत्मसम्मान दुखावतो तिच्यावरील अन्यायाची ती प्रतिक्रिया तिच्या स्वजबाबदारीने दिलेली आहे हिरो इथं catalyst आहे म्हणून कॉम्रेड नांव दिशाभूल करणारे नाही ते रेबेलनेस चे प्रतीक म्हणून वापरले आहे अर्थात त्याचा प्रचलित अर्थ, सामाजिक व राजकीय संदर्भ यातून सर्वाना गुंफणारी एक संपुर्ण मिती तयार होते आणी व्यक्तीपरत्वे त्यामितीचे संदर्भही निराळे असून अपेक्षित शेवट एकच असल्याने चित्रपट एकाच वेळी लैंगिक शोषण, स्त्री सशक्तीकरण, साम्यवाद आणि बरेच कांगोरे स्पर्श करतो या शिव धनुष्यात काही प्रश्न अनुत्तरित व काही समाधान देणारे अनुभव देतात त्यामुळे प्रत्येकाला हा चित्रपट भावेल असं अजिबात नाही

In reply to by गॉडजिला

हो हो इटेन्स शब्द जास्त बरोबर आहे. प्रत्येकाला हा चित्रपट भावेल असं अजिबात नाही, मी तर तिसऱ्यांदा​ पाहिलाय, पहिल्या भागात पावसाचे असंख्य फ्रेम्स आवडतात, दुसर्‍या भागात नायकातील बदल अधिक भावतो.

Drishyam 2 पाहिला (हिंदी डब). आवडला लिंक Drishyam 2