मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे.
गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला.
गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही.
१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या.
१९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या.
गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली.
नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत.
११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.
वर्गीकरण
वाचने
52808
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
वर उल्लेख केलेली चित्रे कुठे
In reply to तरी पण त्यांनी ते पैगंबर चे by निपा
हो, ह्या बद्द्ल नुसते वाचले
In reply to वर उल्लेख केलेली चित्रे कुठे by नावातकायआहे
ithe bagha
In reply to हो, ह्या बद्द्ल नुसते वाचले by मराठी_माणूस
देव
In reply to ithe bagha by निपा
विविध धर्मातील देव देवतांवर
In reply to देव by माईसाहेब कुरसूंदीकर
म्हणजे कुणी हिंदू देवतांचा
In reply to विविध धर्मातील देव देवतांवर by बापूसाहेब
fire पॉवर
In reply to म्हणजे कुणी हिंदू देवतांचा by निपा
Secular कुठं आलं आता इथे .
In reply to देव by माईसाहेब कुरसूंदीकर
नास्तिकांनी हिंदू देवांवर
In reply to Secular कुठं आलं आता इथे . by निपा
पाश्चिमात्य देशप्रमुख व जनता...
In reply to Secular कुठं आलं आता इथे . by निपा
हिंदू अजिबात कडवे नाहीत.
In reply to पाश्चिमात्य देशप्रमुख व जनता... by प्रदीप
बऱ्यापकी सहमत ...
In reply to पाश्चिमात्य देशप्रमुख व जनता... by प्रदीप
हं
In reply to तरी पण त्यांनी ते पैगंबर चे by निपा
द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली
उत्तम बातमी!
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
बहुतेक हे न्यायालयीन
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
गिरे तो भी टांग उपर.
In reply to बहुतेक हे न्यायालयीन by कॉमी
?
In reply to गिरे तो भी टांग उपर. by शलभ
याला मोठ्या प्रमाणावर
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
हा लेख internet वर उपलब्ध आहे
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
भीषण वास्तव
सहमत आहे
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
गाफील गोवाhttps:/
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
खूप generalize करू नका .
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
खूप generalize करू नका .
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
+१
In reply to खूप generalize करू नका . by निपा
राज्यसरकार ने 45 वर्षा खालील
अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेनं तुम्ही पाऊल टाकलं....
यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?
मोदी ला डिफेन्ड करण्याशिवाय
In reply to यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? by मुक्त विहारि
मोदी ला
In reply to मोदी ला डिफेन्ड करण्याशिवाय by निपा
जो सातवी पास आहे की नाही
In reply to मोदी ला by सुबोध खरे
नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल
In reply to जो सातवी पास आहे की नाही by नगरीनिरंजन
नोट.
In reply to नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल by सुबोध खरे
कोणत्याही नेत्याबद्दल इतके
In reply to नोट. by शा वि कु
मुळात या नेत्याबद्दल आशुतोष,
In reply to नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल by सुबोध खरे
महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!!
यात एअर इंडिया चा संबंध नाही.
In reply to महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!! by नावातकायआहे
रेट्रोस्पेक्टिव्ह
In reply to महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!! by नावातकायआहे
राजीव सातव यांचे कोरोना व
भावपूर्ण आदरांजली
In reply to राजीव सातव यांचे कोरोना व by श्रीगुरुजी
भावपूर्ण आदरांजली
In reply to राजीव सातव यांचे कोरोना व by श्रीगुरुजी
अनिल थत्तेंची ही मुलाखत पाहिली
अनिल थत्तेंबद्दल व त्यांच्या
In reply to अनिल थत्तेंची ही मुलाखत पाहिली by धर्मराजमुटके
मुस्लिमबहुल मलेरकोटला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित....
""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा
मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...
In reply to ""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा by मुक्त विहारि
मी पण आधी हिंदी चित्रपट बघत होतो ....
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे... by गॉडजिला
https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk
In reply to मी पण आधी हिंदी चित्रपट बघत होतो .... by मुक्त विहारि
बापरे हे असं प्रकरण असेल हे कधी उमगलेच नाही
In reply to https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk by मुक्त विहारि
मी तरी हिंदी चित्रपट बघणे
In reply to ""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा by मुक्त विहारि
मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात ....
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे by पिनाक
ही माझी सगळ्यात आवडती फाईट
In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
ही माझी सगळ्यात आवडती फाईट https://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZMअफलातुन कॅम्रा वर्क. पिन ड्रॉप सयलेंन्स, कसलेही पार्श्वसंगीत नाही (एकुण प्रकरण डावखुरे वाटु शकते) अन सोनेपे सुहागा म्हणजे संपुर्ण फाइट सिक्वेंसमधे पाळलेले सोशल डिस्टेंसिंग..... अफलातुन कलाकृती.Cigarette Accupressute Technology https://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63cकाय ट्रीपी पार्श्वसंगीत आहे... सुरेख. संपुर्ण सिन मात्र चुकवु नये असाच.Banana fighting https://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xegकट्टाकरुन घरी परतल्यावर हा सिन बघणे फार धोकादायक.Heart operation https://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MUदिज स्टंट परफॉर्म्ड बाय प्रोफेशनल्स, डाँट ट्राय इट अॅट होम ही त्यांची पाटी फारच बोलकी आहे... मुवीजी आपण म्हणजे खरोखर कहर आहात.... _/\_मद्रासी नाही हो :(
In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
तेलुगू
In reply to मद्रासी नाही हो :( by उपयोजक
.
In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
नका ना बघू
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे by पिनाक
राजीव सातव यांच्यावर शासकीय
साध्वी प्रज्ञा
'करोनामध्ये मंदिरे बंद आहेत.
In reply to साध्वी प्रज्ञा by कॉमी
Uttarakhand Congress leader
In reply to साध्वी प्रज्ञा by कॉमी
धन्यवाद.
In reply to Uttarakhand Congress leader by श्रीगुरुजी
भारतात वाचाळ नेत्यांची संख्या
In reply to धन्यवाद. by कॉमी
सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले;
Narada Scam
In reply to सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; by मुक्त विहारि
गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही
झाले पिऊन इथे...
In reply to गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही by कपिलमुनी
विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती : योगी
आपण त्यांचं घर उन्हात बांधू.
In reply to विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती : योगी by कपिलमुनी
त्याच बांध तुझा बांध
In reply to आपण त्यांचं घर उन्हात बांधू. by आग्या१९९०