Skip to main content

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 13/05/2021 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. gouriamma गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला. गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही. १९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या. १९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्‍या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अ‍ॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या. गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली. नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत. ११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.

वाचने 52808
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by नावातकायआहे

हो, ह्या बद्द्ल नुसते वाचले आहे , प्रत्यक्षात ते चित्र काय होते हे माहीत नाही.

In reply to by निपा

विविध धर्मातील देव देवतांवर टीका केली की प्रसिद्धी मिळतेच शिवाय बुद्धिमंतांकडून कौतुकही होते. उद्या गिरीश कुबेर/कुमार केतकर्/रविश कुमार ह्यांचे कौतुक न करतील तर नवल. आता ३३ कोटी देव मदतीला येणार नाहीत हे सांगायला ह्यांची गरज नाही. ईटली/फ्रांस्/अमेरिकेतही अनेक करोना बळी गेले , तेथे येशू वा आणी कोणी मदतीला आला नाही. पण लोकाना भडकवायचे व सेक्युलरपणाचा आव आणायचा..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विविध धर्मातील देव देवतांवर टीका केली की प्रसिद्धी मिळतेच शिवाय बुद्धिमंतांकडून कौतुकही होते.
चूक. काही धर्मातील देवांवर टीका केल्यावर डायरेक्ट जन्नत चे तिकीट मिळते. एखाद्याचा गळा कापायला त्याधर्मातले धर्मवीर मागे पुढे बघत नाहित..

In reply to by बापूसाहेब

म्हणजे कुणी हिंदू देवतांचा अपमान केला मग आपण त्यांना सोडून देतो का ? जर fire पॉवर दिली तर असं आपण नाही करणार ? कि दुखऱ्या जागीची टीका आपल्याला सहन नाही होत ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Secular कुठं आलं आता इथे . देव (कुठलाही ) आला कि का बरं सेकयुलरपणा येतो ? इथले लोक Jebus Jesus करत नाही . Jesus चे शेकडो कार्टून्स आहेत . पैगम्बरा चे पण काढले . हिंदू चे पण ... ते कार्टून एक व्यंग आहे , हे पण समजावणे म्हणजे मग अवघडच आहे .

In reply to by निपा

नास्तिकांनी हिंदू देवांवर टीका केली म्हणून आम्हाला काहीही त्रास होत नाही. एखादा माणूस हिंदूंच्या देवांसारखीच इतरांच्या देवांवर पण टीका करत असेल तर त्याला त्याचा नास्तिकपणा म्हणून सोडून देण्याइतके हिंदू सहिष्णू नक्कीच आहेत.. त्यात सुद्धा ही टीका तर खूप संयत भाषेत आहे. मला एम एफ हुसेन मिळाला तर त्याचा एक पाय कापायला नक्कीच आवडेल. पण म्हणून सरसकट तोच न्याय मी सगळ्यांवर का लावू? लक्ष्यात ठेवा, गीतेत कृष्ण सांगून गेला आहे, कृती जितकी महत्वाची आहे त्यापेक्षा जास्त त्या कृतीचे परिणाम आणि त्या मागचा हेतू असतो. एखादी गोष्ट पाप किंवा पुण्य अशी सरळ नसते, तर ज्या परिस्थितीत ती होते, ती परिस्थिती पाप पुण्य ठरवते. तेव्हा उगीच तुमचा अजेंडा रेटत इथे बसू नका, आम्हाला या वादात पडायला कोणालाही इंटरेस्ट नाHइ.

In reply to by निपा

वास्तविक, पाश्चिमात्य देशांत सर्वसाधारण जनता तसेच त्या देशांचे प्रमुख, अगदी निधर्मी आहेत, हे 'भारतीय हिंदू अतिशय धर्मकडवे आहेत' ह्याइतकेच चुकीचे विधान आहे. काही ठळक उदाहरणे: १. डेव्हिड कॅमेरॉन ह्यांनी ते यू. के. चे पंतप्रधान असतांना, 'आमचा देश क्रिश्चियन आहे' असे उघडपणे म्हटले होते. २. अमेरिकेत तर धार्मिक रीतिरीवाज (उदा. गर्भपातावर) मोठा चर्चेचा विषय होतो, विशेषतः निवडणूकांच्या वेळी. ३. अमेरिकन प्रेसिडेंट धर्मगुरूंच्या 'वेक' ला जातात. ४. आयर्लंडमधे एका भारतीय स्त्रीला, तिच्या व बाळाच्या स्वास्थ्यासाठी गर्भपात जरूरीचा होता, तो त्या देशाच्या कॅथॉलिक धर्मरीतींचे उल्लांघन करत असल्या कारणाने, कायद्याने नाकारण्यात आला. शेवटी त्या आजारांत तिचा मृत्यू झाला. आयर्लंड हा देशच कॅथॉलिक आहे, तो निधर्मी नाहीच. ५. जर्मनीच्या सत्तारूढ पक्षाचे नावच मुळी 'क्रिश्चियन डेमॉक्रॅटिक पार्टी' असे आहे. आणि ते दशकांनू दशके, आयर्लण्ड (कॅथॉलिक) व उ. आयर्लण्ड (प्रोटेस्टंट) नक्की काय चालले आहे, बरे? त्यावरून १९६९-१९९८ ह्या सुमारे तीन दशकांच्या काळांत दोन्ही बाजूंमधे धुमश्चक्री होत होती. ह्या कालखंडास तेथे 'द ट्रबल पीरीयड' असे संबोधले जाते. आता, त्या उघड दंगली संपल्या असल्या, तरी मूळ वाद चिघळतोच आहे. परवाच फायनीन्शियल टाईम्सच्या वीकएंड- पुरवणीत, बेलफास्टला रहाणार्‍या मॅरीयन इलियट ह्या कॅथॉलीक धर्माच्या इतिहासकाराचा, तेथे कॅथलिकांची कशी घुसमट होत रहाते, ह्याबद्दलचा अतिशय विस्तृत लेख वाचनांत आला. तेव्हा, युरोपांत तेव्हढाच 'निधर्मी' पणा आहे, जेव्हढा भारतांतील हिंदूंत आहे. 'त्या' व्यंगचित्राची, समाजमाध्यमांतील काहीजणांनी केलेली उठाठेव सोडून, इतर कुणीही कसलीही दखल घेतलेली नाही व ती तशी घेतली नाही, हेच बरोबरही आहे. पण, उगाच युरोपीयन्स अतिशय निधर्मी आहेत व भारतीय हिंदू धर्मनिष्ठ कडवे इत्यादी म्हणणे, हे वास्तवाचे भान नसल्याचे लक्षण आहे.

In reply to by प्रदीप

हिंदू अजिबात कडवे नाहीत. त्यांची मंदिरे पाडून तेथे एखादी वास्तू उभारली तरी ते सहन करतात.

In reply to by प्रदीप

प्रदीप बऱ्यापकी सहमत ... लोकशाही वादी पाश्चिमात्य सरकार आणि प्रथांवर ख्रिस्ती प्रभाव आहेच हे खरे.. कारण साधे आहे येथेख्रिस्ती बहुल आहेत पण त्याचे फार अवडंबर वाटत नाही हा फरक फक्त ( आयर्लंड मधील गर्भपात बंदी सारखी गोष्ट सोडली तर ) पण गंमत म्हणजे भारतात असताना वाटायचं कि प्रत्येक ख्रिश्चियन दार रविवारी इमाने इतबारे चर्च ला जात असेल पाश्चिमात्यदेशात... इकडे आल्यावर कळले कि तसे काही नाही यात युनाइटेड स्टेट्स मध्ये तर गॉड अँड गन हे समीकरण आणि टोकाला जायचे हे जर जास्तच प्रखर पने दिसते त्यामानाने ते कानडा, ऑस्ट्रेलिया आणि नू झीलंड मध्ये कमी

'द वीक' या नियतकालिकाने २४ जानेवारी २०१६ च्या अंकात निरंजन टकलेने सावरकरांवर ‘Lamb Lionised’ नावाचा लेख लिहून सावरकरांविषयी बरेच खोटेनाटे लिहिले होते. त्यावर न्यायालयीन लढाई झाली आणि शेवटी 'द वीक' ला त्या लेखाबद्दल माफी मागावी लागली. एकीकडे मदर तेरेसावर 'असंतांचे संत' हा लेख लिहिल्यावर दुसर्‍या बाजूकडून त्याविरूध्द काही प्रतिक्रिया उमटायच्या आधीच 'भावना दुखावल्या जातील' या गृहितकातून अख्खा अग्रलेख मागे घेतला जातो. इतकेच नव्हे तर तेच गिकुकाका पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या आणि सतत जामिनासाठी अर्ज करणार्‍या एका महाभागाचे लेख वरचेवर प्रसिध्द करतात. आणि दुसरीकडे अशाप्रकारचे लेख वारंवार वेगवेगळ्या लेखकांकडून लिहिले जाऊनही ५ वर्षे न्यायालयीन लढाई लढावी लागते. असो. savarkar

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बहुतेक हे न्यायालयीन निर्णयाने नाही, तर विक ने स्वतःहून थकून/कंटाळून केले आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

याला मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जालावर प्रसिद्धी दिली पाहिजे. असे झाले तरच असल्या हलकटाना थोडा तरी चाप बसेल. ते आपले तोंड बंद करतील अशी माझी फारशी अपेक्षा नाहीच

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हा लेख internet वर उपलब्ध आहे . तो लेख retract नाही केला आहे . https://www.theweek.in/theweek/cover/life-and-legacy-of-veer-savarkar.h… काय खोटे नाटे लिहिले आहे त्यावर प्रकाश टाकावा

भीषण वास्तव दारू एम आर पी ला/ कितीही किमतीला घ्यायची लोकांची तयारी आहे पण औषधे मात्र स्वस्तात/सवलतीत पाहिजेत आणि लस तर फुकटच पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

खूप generalize करू नका . सगळी कडे लस फुकट आहे . लवकर हवी असेल तर पैसे मोजा अस काही होऊ शकते. पूर्ण भारतात टॅक्सेस आहेत . काही लोकांनी लस नाही घेतली कि त्रास सर्वांना होण्याचा धोका आहे . दारू चा आणि याचा काय संबध ?

In reply to by सुबोध खरे

खूप generalize करू नका . सगळी कडे लस फुकट आहे . लवकर हवी असेल तर पैसे मोजा अस काही होऊ शकते. पूर्ण भारतात टॅक्सेस आहेत . काही लोकांनी लस नाही घेतली कि त्रास सर्वांना होण्याचा धोका आहे . दारू चा आणि याचा काय संबध ?

राज्यसरकार ने 45 वर्षा खालील लोकांचे लसीकरण बंद केले अशी घेषणा केली आहे. तरी पण मुंबई मधील काही लसीकरण केंद्रा वरती 45 पेक्षा कमी वय असणाऱ्यांच लसीकरण चालू आहे.

अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेनं तुम्ही पाऊल टाकलं; गोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र -------- https://www.loksatta.com/maharashtra-news/gopichand-padalkar-letter-to-… ----------- काय बोलावं, ते सुचेना ....

यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?; फडवीसांचा सोनियांना सवाल ----------- https://www.loksatta.com/maharashtra-news/devendra-fadnavis-letter-to-s… ------------ काही टक्के जनतेला, फडणवीस यांचे म्हणणे पटणार नाही...

In reply to by मुक्त विहारि

मोदी ला डिफेन्ड करण्याशिवाय यांच काही काम नाही.

In reply to by सुबोध खरे

जो सातवी पास आहे की नाही ह्याचाही पत्ता नाही व अनेकांचा मृत्यु या एका गोष्टीखेरीज इतर प्रत्येक बाबतीत अपयशी ठरला आहे अशा माणसाला संबोधन काय वापरायचे ह्याची काळजी करून आपली लायकी दाखवायची खाज फार! =))

In reply to by नगरीनिरंजन

नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल येते असे नव्हे. साठ कोटी भारतीय जनतेने ज्याला बहुमताने दोनदा निवडून दिले आहे अशा नेत्याबद्दल इतके अनुदार उद्गार काढून आपण आपली लायकी मात्र दाखवून देताय. असो

In reply to by सुबोध खरे

मोदींना आदरार्थी बहुवचन नाही वापरले तरी प्रॉब्लेम आहे. पण इतरत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फावड्या, पेंग्विन, खुजलीवाल म्हणले तर चालते.

In reply to by शा वि कु

कोणत्याही नेत्याबद्दल इतके अनुदार उद्गार काढून आपण आपली लायकी मात्र दाखवून देता आहात याचे भान ठेवावे . बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

मुळात या नेत्याबद्दल आशुतोष, संजय सिंह या नालायक विकृतांनी मुद्दाम खोटंनाटं पसरवून त्यांच्या प्रतिमाभंजनाचा अयशस्वी प्रयत्न केला. बहुसंख्य जनतेने या आरोपांवर कणभरही विश्वास ठेवला नाही. जो खरंच किमान एक दोन बुकं शिकलेला आहे, त्याने असले अनुद्गार काढण्याआधी निदान हे आरोप खरे आहेत का खोटे याची स्वतः शहानिशा करायला पाहिजे होती. मिपावर सुद्धा पप्पू आहेत हे पुनःपुन्हा सिद्ध होतंय.

In reply to by नावातकायआहे

यात एअर इंडिया चा संबंध नाही. भारत सरकारचे देणे आहे. आणि एअर इंडिया भारत सरकारच्या कंपनी असल्याने तिला यात ओढले जात आहे. माझ्या मते असं कितपत करता येते याबद्दल शंका आहे. तसं म्हणायचं तर फक्त अमेरिकन सरकारवर दबाव आणण्यासाठी अमेरिकन संस्थांची भारतातली खाती पण liquidate करता येऊ शकतातच की.

In reply to by नावातकायआहे

कर तेव्हाही निषेधाहार्यच होते, अन आताही, ताबडतोब मागे घ्यायला हवे! जे(बका)टली काकांचा हा निर्णय चुकिचाच. (सेकंड होमलोनव्याजावर कॅप घातली हा ही चुकिचाच)

राजीव सातव यांचे कोरोना व त्यातून उद्भवलेल्या न्यूमोनियाने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. कॉंग्रेसमधील काही मोजक्या सभ्य, शांत, चांगल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांना श्रध्दांजली. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/congress-leader-mp-r…

In reply to by श्रीगुरुजी

कुठे करोनाकाळात त्या एका साध्या गुंडनेत्यांच्या अंत्ययात्रा आणि कुठे असे हिरे _/\_ तस माझा राजकारणाचा अभ्यास कमी आहे,पण महाराष्ट्रातील क्रांग्रेसमध्ये इतका मितभाषी आणि कर्तृत्वान नेता होता हे आता कळाले.नेते अक्षरशः रडत आहेत.पाहून भरून आलं.

In reply to by श्रीगुरुजी

कुठे करोनाकाळात त्या एका साध्या गुंडनेत्यांच्या अंत्ययात्रा आणि कुठे असे हिरे _/\_ तस माझा राजकारणाचा अभ्यास कमी आहे,पण महाराष्ट्रातील क्रांग्रेसमध्ये इतका मितभाषी आणि कर्तृत्वान नेता होता हे आता कळाले.नेते अक्षरशः रडत आहेत.पाहून भरून आलं.

मुस्लिमबहुल मलेरकोटला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित, मुख्यमंत्र्यांचं ईदच्या निमित्ताने गिफ्ट ---------- https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/national/punjab-govt-ha… ------------

""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा | salman khan warning said please do not participate in piracy serious action would be taken by cyber cell kpw 89 | Loksatta" https://www-loksatta-com.cdn.ampproject.org/v/s/www.loksatta.com/manora… ----------- मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...

In reply to by गॉडजिला

संजय दत्तला माफी दिली आणि मी हिंदी चित्रपट सृष्टी बद्दल माहिती घ्यायला सुरूवात केली. जी काही माहिती मिळाली, ती बघून मी तरी, माझ्या घामाचा पैसा मी हिंदी चित्रपट बघण्यासाठी मोजत नाही .... https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vd https://m.youtube.com/watch?v=q4jP1LyOa_8&t=1s https://m.youtube.com/watch?v=5HIQl16gN_c

In reply to by मुक्त विहारि

https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk# जब 'बॉबी' के फायनेंस के लिए हाजी मस्तान की चौखट पर पहुँच गए राज कपूर

In reply to by मुक्त विहारि

आपल्यामुळे फार मोठ्या मोहाच्या विषापासुन माझा बचाव झाला आहे. तुम्हाला माझ्याकडून एक वोडका मार्टीनी फ्री.

In reply to by मुक्त विहारि

मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...
मी फक्त साऊथ चे डब पिक्चर बघतो. जेंटलमन नंबर 1, पुलीसवाला गुंडा, आज का सिंघम वगैरे वगैरे

In reply to by पिनाक

Heart operation https://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MU ------- Banana fighting https://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xeg -------- Cigarette Accupressute Technology https://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63c ------ ही माझी सगळ्यात आवडती फाईट https://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZM

In reply to by मुक्त विहारि

ही माझी सगळ्यात आवडती फाईट https://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZM अफलातुन कॅम्रा वर्क. पिन ड्रॉप सयलेंन्स, कसलेही पार्श्वसंगीत नाही (एकुण प्रकरण डावखुरे वाटु शकते) अन सोनेपे सुहागा म्हणजे संपुर्ण फाइट सिक्वेंसमधे पाळलेले सोशल डिस्टेंसिंग..... अफलातुन कलाकृती. Cigarette Accupressute Technology https://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63c काय ट्रीपी पार्श्वसंगीत आहे... सुरेख. संपुर्ण सिन मात्र चुकवु नये असाच. Banana fighting https://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xeg कट्टाकरुन घरी परतल्यावर हा सिन बघणे फार धोकादायक. Heart operation https://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MU दिज स्टंट परफॉर्म्ड बाय प्रोफेशनल्स, डाँट ट्राय इट अ‍ॅट होम ही त्यांची पाटी फारच बोलकी आहे... मुवीजी आपण म्हणजे खरोखर कहर आहात.... _/\_

In reply to by मुक्त विहारि

कन्नड,तमिळ,तेलुगू,मल्याळम या चार दक्षिण भारतीय भाषा आहेत. तमिळ तेलुगूमधे अॅक्शन मुव्हीज जास्त असतात. कन्नड गरीब वर्गाला नजरेसमोर ठेवून बनवलेले जरा लो बजेट असतात. मल्याळम कथा,पटकथा,दिग्दर्शन याबाबत चारही भाषांमधे दर्जेदार असतात.

In reply to by उपयोजक

तेलुगू प्रामुख्याने धमाल गाणी, नृत्य, अवास्तव पण तांत्रीक सफाइदार फाइट सिन्स तमिळ अंगावर येणारा इमोशनल अत्याचार, मारधाड अन एकदंम मातीचा फिल.. बरेचदा नको इतका. डावं सोडता ही येत नाही अशी पंचायत असलेले प्रकरण, पण अत्यंत प्रयोगशील. कन्नड सायफाय, डायनोसोर, सोन्याची खाण, म्युजिकल मर्डर मिस्ट्री... आता इंडस्ट्री कात टाकत आहे, चांगले प्रयोग होत आहेत. मल्याळम प्रामुख्याने लो बजेट पण कथा,पटकथा,दिग्दर्शन, अभिनय याकडे विषेश लक्ष .

In reply to by मुक्त विहारि

ह्यातले ऑपरेशन, केळे फाईट, सिगरेट हे सिन हृदये कळेयम या spoof किंवा थट्टेखोर सिनेमातले आहेत. ते गंभीर प्रसंग म्हणून चित्रित नाही झाले.

In reply to by पिनाक

ते डबडे तेलुगू सिनेमे. उत्साह वाढतो मग त्यांचा. फिजिक्स गपचुप कोपर्‍यात उभं राहून स्वत:ची होणारी लक्तरं पाहत असतं तेलुगू सिनेमात. :(

राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमात अत्यसंस्कार; १५ ते २० हजार लोकांची गर्दी https://react.etvbharat.com/marathi/maharashtra/state/hingoli/congress-… राज्यातील आमदार खासदारांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रभारी के. एच. पाटील, महुसल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, पूनर्वसन व मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सतेज पाटील, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, आमदार माधवराव जवळगावकर,आमदार राजू नवघरे, आमदार आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, भाऊ पाटील, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास, सत्यजित तांबे, अमर खानापुरे, गुजरात युवक काँग्रेसचे मानसिंग डोड्या, श्री संपत कुमार, नीरज कुंडल, यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.

In reply to by कॉमी

'करोनामध्ये मंदिरे बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कुणीच येणार नाही. स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून हे उपास-तापास बंद करा. रोज ४ अंडी खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त पदार्थ भरपूर खा’, असा सल्ला बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू समाजबांधवांना दिला असून या सल्ल्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी फोनवरून आक्षेप नोंदवला. या चर्चेतही गायकवाड आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. मुस्लिम समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मुस्लिम समाजात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे आणि हिंदू धर्मीयांमध्ये मांसाहाराचे प्रमाण कमी आहे म्हणून हिंदूंमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे, या वक्तव्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करायला हवी, असे सांगितले असता त्यांनी त्यास नकार दिला, असे शेटे यांनी सांगितले. https://maharashtratimes.com/maharashtra/buldana/dont-fast-in-corona-ea… कोरोनासंसर्ग न होण्यासाठी कोणी गोमूत्र पितात तर कोणी कोंबड्या-अंडी चेपतात.

In reply to by कॉमी

Uttarakhand Congress leader says ‘corona sent by Lord Krishna’. “Both Corona and Krishna starts with the sound of ‘K’. Hence it’s obvious that the coronavirus has been sent by him in this world,” Uttarakhand Congress vice-president Suryakant Dhasmana reportedly said. ह्याला म्हणतात जबाबदारीने बोलणे. https://www.hindustantimes.com/india-news/uttarakhand-congress-leader-s…

In reply to by श्रीगुरुजी

हि मंडळी पण धन्य आहेत. यादीत डॉ. हर्षवर्धन यांना सुद्धा जागा मिळेल- कोरोनील, ह्या थापाड्या औषधाचे प्रमोशन करायला डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी जातीने उपस्थित होते. हे सुद्धा अत्यंत बेजबाबदार वागणे आहे. https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/industry/healthcare/bi…

In reply to by कॉमी

भारतात वाचाळ नेत्यांची संख्या अतोनात आहे व असे नेते सर्व पक्षात आहेत. यांचं कधी हसू येतं, कधी चीड येते तर कधी कीव येते.

सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या ------- "Narada Scam: सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या - Marathi News | CBI detains four leaders, including two ministers of Trinamool in Narada scam; Mamata banerjee also reached | Latest crime News at Lokmat.com" https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/crime/cbi-deta… --------------