मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे.
गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला.
गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही.
१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या.
१९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या.
गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली.
नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत.
११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.
वर्गीकरण
वाचने
52808
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांचं म्हणजे विरोधी
In reply to त्याच बांध तुझा बांध by कपिलमुनी
“…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,”
चीनने पूर्ण ताकद लावली, अखेर अमेरिकाच इस्रायलसाठी मैदानात उतरली
सुधारणा
In reply to चीनने पूर्ण ताकद लावली, अखेर अमेरिकाच इस्रायलसाठी मैदानात उतरली by मुक्त विहारि
जवाहरलाल नेहरूबिल क्लिंटन यांच्या चुकीची फळे, इस्त्रायलला पण भोगावी लागणार होती... अशी सुधारणा करायला हवी असे वाटते.UNSC
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
एक लिंक मिळाली ....
In reply to UNSC by मुक्त विहारि
समजत नाही
In reply to UNSC by मुक्त विहारि
जवाहर लाल नेहरू यांचे आंतरराष्ट्रीय धोरण बघता आणि विशेषतः
In reply to समजत नाही by चंद्रसूर्यकुमार
शक्यता?
In reply to जवाहर लाल नेहरू यांचे आंतरराष्ट्रीय धोरण बघता आणि विशेषतः by मुक्त विहारि
हॅ
In reply to शक्यता? by कपिलमुनी
Not pursuing the UNSC seat
In reply to हॅ by कॉमी
लोकसभेतील चर्चा
In reply to Not pursuing the UNSC seat by श्रीगुरुजी
भारत
In reply to लोकसभेतील चर्चा by चंद्रसूर्यकुमार
दावा
In reply to भारत by अनिरुद्ध.वैद्य
भारत
In reply to दावा by चंद्रसूर्यकुमार
अटालांटीक
In reply to भारत by अनिरुद्ध.वैद्य
"Letters to Chief Ministers
In reply to लोकसभेतील चर्चा by चंद्रसूर्यकुमार
धक्कादायक
In reply to "Letters to Chief Ministers by श्रीगुरुजी
हे भलेमोठे पुस्तक भारत
In reply to धक्कादायक by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to हे भलेमोठे पुस्तक भारत by श्रीगुरुजी
हो, नक्कीच काहीतरी संभ्रम आहे
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
नेहरूंनी सर्व राज्यांच्या
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
असे दिसते
In reply to नेहरूंनी सर्व राज्यांच्या by श्रीगुरुजी
धन्यवाद, श्रीगुरुजी आणि
In reply to Not pursuing the UNSC seat by श्रीगुरुजी
बिल क्लिंटन बाबतीत माहिती न्हवते
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
गोव्यात रात्री २-६ दरम्यान