Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 24/04/2021 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय. हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत. हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे. कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.

वाचने 68535
प्रतिक्रिया 276

प्रतिक्रिया

तज्ञांनी डूम्सडेचे आकडे द्यायला सुरवात केली. वॉशिंग्टन विद्यापीठातील तज्ञांच्या मते मे महिन्यात दररोज ५ हजार मृत्यू भारतात होणार. https://maharashtratimes.com/international/international-news/coronavir… असल्या तज्ञांनी मागच्या मे महिन्यातच लाखो लोकांना कोरोना होईल, इतके हजार लोक मरतील, २०२० च्या शेवटापर्यंत ३० लाख लोक भारतात मरतील वगैरे अंदाज व्यक्त केले होते. पण तसे काहीही न होता त्यांचे अंदाज चुकून सप्टेंबरपासून अचानक रूग्णसंख्या कमी का झाली हे काही त्यांना सांगता आले नव्हते. आता दुसर्‍या लाटेत असले तज्ञ लोक आता डूम्सडेचे आकडे द्यायला लागले आहेत. या तज्ञ लोकांचा पूर्वेतिहास लक्षात घेता हे भाकित खरे ठरण्यापेक्षा खोटे ठरायची शक्यता जास्त आहे. म्हणज असले अंदाज ते लोक देत असतील तर सध्याच्या काळात ती एक सकारात्मक बातमी म्हणावी का?

In reply to by मराठी_माणूस

ह्या तज्ञांचे त्यांच्या स्वतःच्या देशा बद्दल काय मत आहे ?
त्याविषयी माहिती नाही. पण भारताविषयी मात्र या लोकांचे कायमच डूम्सडेचे अंदाज राहिले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी सुरवातीला वीसेक वर्षे भारत देश एक कसा राहू शकणार नाही, भारताचे कसे तुकडेतुकडे पडतील, राज्याराज्यांमध्ये दंगली कशा होतील असली भाकिते होती. त्यानंतर भारतात वाढत्या लोकसंख्येमुळे धान्य कसे कमी पडेल आणि कसे लाखोंच्या संख्येने भूकबळी पडतील असली भाकिते यायला लागली. त्यानंतर १९८० च्या दशकात पंजाब भारतापासून वेगळा कसा होणार, भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर शीख सैनिक असल्याने सैन्यात बंडाळी होणार वगैरे भाकिते केली गेली. मग १९९० च्या दशकात अशीच भाकिते काश्मीरविषयी केली गेली होती. गेल्या वीसेक वर्षात भारतात डूम्सडे कसा येणार याविषयी या ढुढ्ढाचार्यांना भाकिते करायला काही न मिळाल्याने ते बहुदा अस्वस्थ असावेत. ती संधी नेमकी कोरोनाने त्यांना दिली. एक गोष्ट समजत नाही. या अमेरिकन ढुढ्ढाचार्यांना भारताचा इतका द्वेष का वाटतो? खरं तर लोकशाही, विविधता आणि इतर मूल्ये वगैरे गोष्टी लक्षात घेता असा द्वेष असायचे काही कारण नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कदाचित भारतीयांच्या सार्वजनिक ठिकाणच्या बेशिस्त वर्तनावरून ही प्रजा कोणालाही सहजी न जुमानणारी , स्वयंशिस्त न पाळणारी आहे हे लक्षात घेऊन अंदाज बांधत असावेत.

सप्टेंबर २०२० मध्ये माजी मंत्री रणजितसिंग पाटील यांनी विधानपरिषदेत ऑक्सिजनचा तुडवटा होऊ शकेल तेव्हा ऑक्सिजन प्लॅन्ट्स बांधण्याकडे लक्ष देण्यात यावे ही मागणी केली होती. पण तेव्हा महाभकास आघाडी सरकारपुढे कंगनाचे घर पाडणे, अर्णबला त्रास देणे, वाझेकडून कोट्यावधींची खंडणी उकळणे ही त्यापेक्षा बरीच जास्त महत्वाची कामे असल्याने ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारणे या किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेच माननीय पंतप्रधानांबद्दल ही लागू होईल. राहूल गांधीनी कोरोना स्फोट होईल असं जानेवारी की फेब्रूअरी २०२० मध्ये सांगीतले होते.

In reply to by Ujjwal

बेस्ट आहे न्युज. पण लवकर बाजारात उपल्ब्ध व्हायला हवी.

तज्ञांच्या देशाचे नाव, आणि "अश्याच तज्ञांनी" मागच्या वेळेस केलेली भाकिते चुकली, म्हणून खोटे म्हणणे चुकीचे वाटते. त्यांचे जर स्टॅटिस्टिकल मॉडेल असेल तर त्यांच्या नॅशनॅलिटी चा संबंध नाही. भारताचा द्वेष वैगेरे फारच फार फेच्ड. आयआयटी खरगपूरच्या मॉडेल नुसार आपण मे तिसऱ्या आठवड्यात किंवा थोडेसे आधी ग्राफच्या शिखरावर पोहोचू. तेव्हा ३५ लाखापर्यंत ऍक्टिव्ह केसेस असू शकतात. संग्राम पाटील नावाचे डॉक्टर यूकेतून व्हिडीओ बनवतात त्यांनी सुद्धा कालावधी जवळपास हाच सांगितलं आहे.शिखरानंतर हळूहळू वाढ कमी होईल. https://www.financialexpress.com/lifestyle/health/indias-covid-graph-ma…

In reply to by कॉमी

चेच मनिन्द्र अग्रवाल म्हनुन आहेत ट्विटरवर. त्यांचे मॉडेल सध्यातरी अक्युरेटली टॅली होत आहेत. त्यांच्यामते, पीक्स गाठले गेले असुन, बरेचसे मेजर सिटीज आता पीक क्रॉस करुन गेलेत किंवा पीकवर आहेत. मूंबई ठाणे पीक क्रॉस झालेले सांगताहेत, तर पुणे ऑन पीक. तरी २ आठवडे अत्यंत काळजीपुर्वक रहाणे भाग आहे. एखादाजरी सुपर स्प्रेडर निसटला तर संपल सगळ. (बाकी भारत द्वेश अन थर्ड वर्ल्ड कंट्री सिंड्रोम आहेत बर वेस्टर्न अ‍ॅकेडेमिक्सममध्ये)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ट्विटर बघितले. शहरवाईज ग्राफ जास्त लॉजिकल वाटतंय. त्यांचे मॉडेल बरोबर असो अशी आशा. वेस्टर्न अकॅडेमिक्सचा बायस वैगेरे स्विपिंग स्टेटमेंटला काही अर्थ नाही. ज्या पर्टीक्युलर अकॅडमीची चर्चा आहे तिचा बायस दाखवा, तर अर्थ. नाहीतर आपल्याला आवडणारा वेस्टर्न रिसर्च स्वच्छ, नावडणारा साला कोलोनियल पिग.

In reply to by कॉमी

माझा पण साधारण हाच अंदाज आहे. Lockdown च्या पहिल्या आठवड्यात केस वाढत असतात, त्यानंतर कमी व्हायला लागतात असा अंदाज आहे.. आणि आता अनलॉक झाले तरी देखील लोक बाहेर पडतील असे वाटत नाही, कारण करोनाची भयानकता जवळ जवळ प्रत्येक कुटुंबाने या ना त्या मार्गाने अनुभवली आहे.

In reply to by कॉमी

बऱ्याच शहरांबाबत अन राज्यांबाबत वेगवेगळे आहेत. कमी अधिक प्रमाणात मे पहिला दुसरा आठवडा दाखवतात पीक बाबत.

मागच्या श्रीगुरूजींच्या धाग्याने कमी वेळात विक्रमी अशी ३५० प्रतिसादांची धावसंख्या ऊभारल्या बद्दल गुरूजींचे धणूष्यबाण, वाघाची प्रतिमा आणी हातात शिवबंधन बांधून अभिनंदन. :)

*सावध व्हा अन्यथा आपली स्थिती भारतासारखी होईल! पीएम इम्रान खान यांचे पाकिस्तानला आवाहन* हेच पहायचं राहीलं होतं :( https://pudhari.news/news/International/Pakistan-PM-Imran-Khan-s-appeal…

...... पुणेकर उद्योजकाच्या पुढाकारातून सिंगापूरमधून येणार ३५०० व्हेंटीलेटर्स; मोदी सरकार करणार ‘एअर लिफ्ट’ ..... -------------- https://www.loksatta.com/pune-news/3500-ventilators-and-8000-oxygen-con… --------------

.....अनिल देशमुख यांच्या घर, कार्यालयांसह विविध ठिकाणी सीबीआयची छापेमारी..... https://www.loksatta.com/maharashtra-news/parambir-singh-letter-cbi-has… ------------- CBI ला जर चौकशीची परवानगी दिली तर, अजूनही बरेच काही बाहेर येऊ शकते.... कदाचित महाराष्ट्र राज्यात घरोघरी भात तरी नक्कीच मिळेल ......

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :) बरोबर..!!! अमेरिकेने खूपच लवकर मारले लादेन ला. नाहीतरी ओसामाजी आणि हाफिज साहेब म्हणणारी टोळीचे प्रयत्न वाया गेले. इमेज क्लीन करण्याची सुरवात केलीच होती तेवढ्यात अमेरिकेने लादेन ला जन्नतवासी केले. तीच बाब झाकीर नाईक या देवमाणसाबाबत.. झाकीर नाईक जी एक्तत्मेचा आणि मानवतेचा संदेश घेऊन कामं करतायेत असे भर सभेत बोलणे, मिठ्या मारणे, त्यांच्या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणे अशी कामे देखील एक पक्ष अगदीआत्ताआत्तापर्यंत करतच होता.. त्याला फक्तं पक्षात घेणच बाकी राहिले होते.. !!! अशी जातीय "घाण" हुंगत हुंगत जाणे आणि तिला पक्षात घेणे किंवा छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.

In reply to by बापूसाहेब

छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.>>> असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :) बरोबर बोललात. हो ना. पब्लिक आता हुशार झालिये.. कारण पाहिले फक्तं मेसेजेस चालायचे पण आता बहुतांश लोकं बोलतात , लिहितात, आवाज उठवतात आणि आज त्याचाच परिणाम आहे की ३०० पार झालेत. असो तुम्ही मुळ मुद्द्याला बगल दिऊन गाडी तिसरीकडे नेलीत.. अश्या घाणेरड्या धार्मिक प्रवृत्तीना प्रोत्साहन देणे, मदत करने , कायदेशीर मदत करणे, आणि इमेज क्लीन करणे ही कामं करणार्या पक्षाच नावं मी घेणार नाही.. कारण तुम्ही ते ओळखले असेल. !!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे शिवसेनेत आहेत... अब्दुल सत्तार, यांच्या बाबतीत माहिती मिळवलीत तर, फारच उत्तम..... Youtube वर क्लिप्स उपलब्ध आहेत...

In reply to by मुक्त विहारि

अब्दूल सत्तारच ऊदाहरण आहेत. राष्ट्रहीताचे सोंग आणणार्या पक्शात येऊन कोण कोण पावन झालं? अर्थात तिकडे दुर्लक्श करूयात ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अज्ञानी असलेले कधीही उत्तम... अर्थात, तुम्ही पळपुटेपणा करणारच, हा अनुभव आहेच ... अजूनही तुम्हाला ह्या राजवटीतली कामे सांगता आली नाहीत ...

In reply to by मुक्त विहारि

१०५ घरी बसवल्याचा राग किती दिवस मनात ठेवनार?? आता ऊभी हयात विरोधी पक्शातच जाणार आहे. अजून द्या “क्लिन चीट“ :)

वास्तविक असल्या स्टोरीज (अनेक तद्दन खोट्या, इतर काही अतिशयोक्त, अजून काही मोडतोड केलेल्या...) काही ठराविक माध्यमे इतकी करतात व तथाकथित विद्वान, विचारवंत इत्यादी. त्या लगोलग उचलून पसरवतात, की ह्या अनेक माध्यमांची विश्वासार्हता, निदान माझ्या दृष्टिने तरी संपूर्ण संपलेली आहे. ह्यात बर्‍याच भारतीय आणि काही जुन्या, नावाजलेल्या पाश्चिमात्य मीडियांचा समावेश आहे. आता 'द वायर' हे खरे तर साम्यवादी बाजूचे न्यूज पोर्टल. अर्थात, ह्याला कमर्शियल दृष्टिकोन असण्याची जरूरी नाही, म्हणजे क्लिक्सवर अवलंबून राहून त्यांना जाहिराती मिळवून पैसा करण्याची जरूर नाही (किमानपक्षी, साम्यवादाच्या बांधिलकीमुळे तशी ती नसावी. असलीच तर ती स्वतःशीच प्रतारण आहे). तसे असल्यास, एकादी बातमी 'ड्यू डिलिजन्स' न करता देण्याची त्यांना घाई नसावी. पण तरीही राजनाथ सिंगांच्या तोंडी काही खोटे वक्तव्य खपवल्यावर, ते तसे करावेसे त्यांना वाटले- अथवा तसे करणे त्यांना भाग पडले. मग दिलेली बातमी मागे घ्यावी लागली व हा खुलासा द्यावा लागला. असा खुलासा देणे हेही नसे थोडके. इतरस्त्र तेही केले जात नाही. .

In reply to by प्रदीप

द वायर साम्यवादाकडे झुकते म्हणजे काय समजले नाही. डावीकडे झुकणारे आहे, पण साम्यवादी कशावरून आहे ? (डावे म्हणजे कॉमी हे जुने मिसकनसेप्शन आहे.) आता साम्यवाद/समाजवाद ह्या छत्रीखाली अत्यंत भिन्नभिन्न अनेक विचारधारा आहेत. त्यापण सशस्त्र क्रान्ती वाला टिपिकल कॉमी ते निओ लिबरल अर्थव्यवस्थेत राहूनच सरकारने लोकांचे भल्यासाठी कामे करावीत म्हणणारा फ्री मार्केट पुरस्कर्ता सोशलिस्ट, इतकी भयंकर व्हास्ट रेंज आहे. आणि असावीच. इतक्या पूर्वीचे तत्वज्ञान, इतक्या देशांमध्ये इतक्या काळापासून इटक्यांदा चर्चिले गेले आहे कि त्याचे रूप बद्दलणारच. त्यामुळे साम्यवादाची प्रतारणा वैगेरे फार ब्रॉड विधान झाले. वायर टीमचे काय विश्वास आहेत हे जास्त महत्वाचं, प्रतारणा आहे की नाही पाहण्यासाठी.

In reply to by प्रदीप

वायरने खोटी बातमीचा खपवली/खपवायला लावली ह्याची इतकी खात्री का ? चूक सुद्धा असू शकतेच. हे मीडिया हाऊस असे असे वाईट आहे, हे फारच अपुरे आहे. एखाद्या बातमीची पडताळणी त्या बातमीच्या सोडून इतर कोणत्या संदर्भाने करू नये. त्यातल्या रिपोर्टेड फॅक्टस ची तरी.दिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का, आणि पूर्ण आहेत का, हे इतर सोर्सेसशी पडताळणी करून पाहणे. त्यातल्या मताबद्दल मीडिया हाऊस च्या संदर्भाने विचार होऊ शकतो. पण त्यातले तथ्य निर्विवाद असतील तर मीडिया हाऊसचे नाव आणि त्यांची मते इरिलेव्हन्ट आहेत.

In reply to by कॉमी

हे मीडिया हाऊस असे असे वाईट आहे, हे फारच अपुरे आहे. एखाद्या बातमीची पडताळणी त्या बातमीच्या सोडून इतर कोणत्या संदर्भाने करू नये. त्यातल्या रिपोर्टेड फॅक्टस ची तरी.
कुठल्याही व्यक्तिची, व्यक्तिसमूहाची, आस्थापनाची विश्वासार्हता असते, व ती आपण आपल्या अनुभवांवरून बनवत असतो. मी २०१३ सालापासून काही परदेशी व भारतीय बातम्या देणार्‍या मीडियागृहांना जवळून पहात आलो आहे. तेव्हा माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून, मी त्यांच्या विश्वासार्हतेविषयी मते बनवली आहेत. मी इतके ठामपणे सांगू शकतो की ही मते वरवर कुणीतरी काहीतरी सांगितले म्हणून, अथवा, 'एकाने- दुसर्‍याला-माहिती-दिली/मत-सांगितले, दुसर्‍याने-तिसर्‍याला.... 'अशा तर्‍हेने बनवलेली नाहीत. न्यू यॉर्क टाईम्स, गार्डियन, सी. एन. एन,. फायनॅन्शियल टाईम्स ही परदेशी आस्थापने व भारतांतील एकाद-दुसरे सोडून इतर सर्वच आस्थापने सातत्याने अतिशय एकांगी बातम्या देतात, 'ओपिनियन' ह्या नावाखाली काहीबाही लिहीतात, अनेकदा बातम्या चूक असतात (तथ्याला धरून नसतात), इतकेच नव्हे, त्या रचलेल्या असतात-- हे सर्व मी प्रत्यक्ष अनुभवले आहे, व त्यावरून मी हे मत बनवलेले आहे. बरे, हे त्यांचे रीपोर्टिंग, भारताविषयीच नव्हे तर मी राहतो तेथील घटनांच्या बाबतीतही तसेच आहे व होते. तेव्हा, मी ही सदर घटना व अशा पुढे होणार्‍या घटनांविषयी ह्या आस्थापनांना 'बेनेफिट ऑफ डाऊट' देणार नाही. तसे प्रत्येक गोष्तीच्या बाबतीत करणे मलातरी जरूरीचे अजिबात वाटत नाही.

In reply to by प्रदीप

हे गृहस्थ, एड्वर्ड ल्यूस, फायॅन्शियल टाईम्सचे ज्येष्ठ वार्ताहर आहेत. "Associate Editor, Financial Times, US-based writer/columnist. Former DC & India bureau chief." . ही असली बातमी आपण कुठेही, कधीही ऐकलेली नाही, ना पाहिलेली आहे. पण हे ट्वीट आले, की तात्काळ मी त्याची सत्यासत्यता मूळापासून तपासून घेणार नाही, तसे करणे निव्वळ वेळ व शक्तिचा अपव्यव आहे. पण मी वर लिहील्याप्रमाणे, फाटाचे सर्वच रिपोर्टिंग असलेच आहे हे मी नेहमीच पहात आलेलो आहे. ह्या फाटाला मी तर, स्किफोफ्रेनिक वर्तमानपत्र म्हणतो. म्हणजे, मुख्य विभाग सगळा, ईकॉनॉमी, कंपन्या, कॅपिटल्स, बाँड्स, इन्वेस्टमेंट्स, इत्यादींवर असतो. मग दर वीकांतास इतर सेक्शन्स असतात- लाईफ अँड आर्ट्स-- ह्यांत एक मुलाखत, बहुधा कुठल्यातरी डाव्या, अतिडाव्या व तथाकथित लिबरल व्यक्तिची. ही मुलाखत 'लंच विथ एफ. टी.' अशी असते, जिचा जेवणाचा खर्च एफ. टी. करते. हा खर्च अनेकदा बर्‍यापैकी असतो, पण गप्पा मात्र डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या. ह्या सेक्स्नमधे पुढे आर्ट्स विभाग असतो, ज्यात अतिशय उच्च किंमतीच्या जुन्या-नव्या आर्ट्वर्क्सविषयी माहिती असते, कुठला पुढील लिलाव कुठे आहे, ह्याची माहिती असते. अजून एक सचित्र विभाग 'हाऊस अँड होम' हा पाश्चिमात्य देशांतील उच्च घरांच्या माहितीबद्दल असतो. आणि सर्वांत कहर म्हणजे, दर दुसर्‍या वीकांतात अजून एक स्पेशल विभाग असतो, त्याचे नावच 'हाऊ टू स्पेंड'. नावाप्रमाणेच हा विभाग अतिशय उच्चभ्रू वस्तू अथवा, जागांविषयी असतो. म्हणजे, पैसा मिळवण्याचे स्त्रोत सर्व भांडवलदारांच्या कंपन्यांकडून, आणि स्वतःचा सूर अतिशय डावा. ह्या सगळ्याच पाश्चिमात्य तथाकथित लिबरल मीडियांच्या मागे एक सूक्ष्म धार्मिक सूरही असतोच असतो.

In reply to by प्रदीप

मीडिया हाऊसच्या आयडियोलॉजी बद्दल आणि विश्वासार्हते बद्दल मत जरूर असावे, शंका जरूर असावी. तशी माझीही मते आहेतच. पण औट ऑफ हँड उडवून लावणे अत्यंत अयोग्य. उदा, तो स्क्रोल लेख तुमि जशी चिरफाड केली त्याशिवाय उडवणे अयोग्य नाही का ? Op India हे भयंकर कचरा रिपोर्टींग करते असे माझे मत आहे, तरी त्यांच्या आर्टिकल्स ची उडवाउडवी चूकच. तुम्हाला कुठले मीडिया हाऊस भारतात आणि बाहेरचे आवडतात ? तुम्ही याबद्दल बराच विचार केलाय म्हणून विचारतो.

In reply to by कॉमी

ऑपइंडियाच्या बातम्या अतिरंजित, खोट्या अथवा चुकीच्या असतात, असे माझ्यातरी पहाण्यात आलेले नाही. पण त्यांची रिपोर्ट्सच्या मांडणीची पद्धत अतिशय वाईट आहे- शब्दबंबाळ, इकडे- तिकडे पसरलेले -- थोडक्यात रिपोर्ट्सची कॉपी कशी लिहू नये, ह्याचे ते आदर्श उदाहरण आहे. भारतांत मी इंडियन एकस्प्रेस, लाईव्हमिंट व थोडेफार फर्स्ट्पोस्ट वाचतो; तसेच फेबु व ट्विटरवरूनही बरीचशी चांगली माहिती मिळते. परदेशांत वॉल स्ट्रीट जर्नल (धूमे सोडून) मला आवडते. व्हिऑन स्ट्रीमींगही चांगले असते. तुमचेही असे काही सांगा.

In reply to by प्रदीप

लोकसत्ता ताज्या घडामोडी वाचायला. न्यूजलाउंड्रीचे ग्राउंड रिपोर्टींग चांगले असते. ते वाचतो. बाकी जी गोष्ट रोचक वाटते त्यासंदर्भात जिथे लिहिले आहे तिथे वाचतो. प्रिंट चे कट द क्लटर चांगले विश्लेषक असते. मागचे राजकीय संदर्भ कळतात. अमेरिकन राजकारण करमणूक म्हणून फॉलो करतो. त्यांचे लेफ्ट- राईट डिबेट असतात त्या पाहतो. सॅम सिडर, चार्ली कर्क, बेन शापिरो, सेक्युलर टॉक विथ काईल कलिनस्की, डेव्हिड पॅकमॅन, डेस्टीनी, हसनआबी वैगेरे. चांगली करमणूक होते. त्यातला जेस्सी ली पिटर्सन नावाचा मुलाखतकार आहे, त्याच्या मुलाखती इतक्या भन्नाट असतात की हसून हसून पुरेवाट व्हावी.

In reply to by प्रदीप

म्हणजे सनातन प्रभात ची इंग्लिस आवृत्ती वाटते :D

In reply to by प्रदीप

या असल्या मंडळींनी अनेकदा अशा खोट्या गोष्टी पेरल्या आहेत. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कॅन्सरचे कुठलेसे औषध ७ हजार रूपयांवरून एक लाख रूपये झाले आहे अशी बातमी या लोकांनी पेरली होती. तसेच कुमारी मातांना आपल्या मुलांसाठी पासपोर्ट काढायचा असेल तर आपल्यावर बलात्कार झाला होता का ही बातमी पासपोर्ट फॉर्ममध्ये देणे या कुमारी मातांना बंधनकारक असेल अशीही बातमी यांनी आणली होती. या सगळ्या बातम्या खोट्या होत्या हे सांगायलाच नको. पनवेलला एका चर्चच्या कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याने रागातून दगड मारून चर्चच्या खिडकीची काच फोडल्यावर तो अगदी राष्ट्रीय कटाचा भाग असावा अशाप्रकारे त्यांनी अपप्रचार केला होता. राजदीप सरदेसाईला आपण खोटे बोललो होतो असे हैद्राबादच्या कोर्टामध्ये कबुल करावे लागले होते. अशा कित्येक कथा आहेत. एकूणच हे सगळे पुरोगामी मिडियावाले (एक तर काँग्रेस समर्थक असतील, समाजवादी असतील किंवा डावे असतील) असलेच थर्डक्लास असतात. त्यातही 'द हिंदू' किंवा 'फ्रंटलाईन' किंवा वायर किंवा स्क्रोल सारखे डावे सगळ्यात हलकट. लाल रंगाच्या अगदी फिक्या छटांपासून सगळ्यात गडद छटांपर्यंत सगळ्या छटांचे लोक थोड्याफार प्रमाणाने तसलेच असतात आणि कम्युनिस्टांविषयी मला जितका संताप आहे तितका संताप असलेले कोणीही मिपावर नाही याचा मला सार्थ अभिमान आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता . लांबून एक इसम लंगडत येताना दिसला . एक डॉक्टर म्हणाले " याला काय झालं असेल हो ? " डॉक्टर १ :left knee arthritis ." डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis ". डॉक्टर ३ :" काहीतरीच काय !Ankle sprain असणार ." डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार ." डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय . डॉक्टर ६.............काही बोलणार.... तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला , . . . . इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणात पाय भरलाय..... आजची मीडिया देखील असेच अंदाज लावत बसते......

पण भारताविषयी मात्र या लोकांचे कायमच डूम्सडेचे अंदाज राहिले आहेत. आकडे किंवा इतर सांखिकी बद्धल मला विशेष काही माहित नाही, परंतु सध्य काळात मृत्यू चे प्रमाण हे करोनाच्या सुरुवातीच्या काळा पेक्षा नक्कीच अधिक आहे. आजु-बाजु स्थिती आणि एकंदर बातम्या पाहिल्यावर स्थिती भयावह आहे हे लगेच कळते. रुग्णालयाच्या पायरीवर लोक मृत्यूमुखी पडलेली पाहतो आहे,यावरुन मला करोना काळाच्या आधीची परिस्थिती आठवते, तेव्हा ऑफिस चालु होते आणि चीन मधले लिक झालेले व्हिडियो मी डाउनलोड करुन फॉरवर्ड करत होतो,अगदी हापिसात देखील लोकांना चीन मध्ये काय घडतय ते सांगत होतो. तेव्हा चीन मध्ये लोक असेच रस्त्यात मरुन पडतानचे काही व्हिडियो मी पाहिले होते. आज तशीच काहीशी परिस्थिती आपल्या इथे निर्माण होताना दिसते. माझ्या ओळखितले, फार लांबचे नातेवाईक / ओळखीतले लोक करोनामुळे गतप्राण झालेले आहे. करोना नंतर वर्क फ्रॉम होम सुरु झाले त्यानंतर माझ्या नविन बॉस ने कार्यभार सांभाळायला घेतला,आमच्या टिम मधल्या कोणालाच त्यानी पाहिले नव्हते ना आम्ही त्यांना फक्त फोन आणि व्हॉइस मिटिंगवर जवळपास रोज बोलणे असायचे. हा बॉस माझ्याच कॉलनीच्या आत कुठे तरी एका सोसायटीत राहतो आणि मी त्याच्या इतक्या जवळ आहे हे एकदा मोकळ्या गप्पां मधुनच आम्हा दोघांना समजले. नंतर कंपनीने लॅपटॉप वितरीत करण्यास सरुवात केली,त्यावेळी मी नुकताच करोना मधुन सावरत होतो. तेव्हा माझा लॅपटॉय याच बॉस ने आमच्या सोसायटीच्या वॉचमन केबीन मधे आणुन ठेवला. नंतर काही काळाने हापिसात शिफ्टिंग होते तेव्हा आमच्या अजुन एक सिनियर बॉसने फोन केला की काही व्यक्तिगत सामान डेस्क मध्ये असेल तर सांगा ! मी सांगितले माझ्या डेस्कटॉपवर लालबागच्या गणपतीचा एक साधा फोटो आहे [ तो बाप्पा माझ्या बरोबर इतके वर्ष प्रत्येक प्रोजेक्ट फिरतो आहे. ] तो मला मिळाला तर फार आनंद होइल. ते देखील माझ्या साहेबाने केले, तो फोटो देण्यासाठी आमचे एक दोन वेळा बोलणे झाले पण या-ना त्या कारणाने भेटीचा योग जुळुन येत नव्हता. शेवटी एक दिवस त्यांचा मला फोन आला, त्यांच्या कुटुंबा सोबत ते बाहेर जाणार होते तेव्हा जाताना माझ्या कॉलनीतुन बाहेर पडताना तुला तो फोटो देतो असे त्यांनी मला कळवले.मला अत्तरांची भारी आवड ! आमची पहिली भेट लक्षात रहावी म्हणुन माझ्याकडची अगदी मधाळ सुगंधाची कुपी घेउन ठेवली, त्यांची माझी भेट झाली आणि बाप्पाचा फोटो घेतल्यावर त्यांना मी अत्तर लावले. ही आमची पहिली आणि शेवटची भेट ठरली ! बॉस म्हणणे त्यांना चुकीचे ठरावे,कारण बॉसिंग न करणारा,मनमोकळा आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असणारा राजा माणुस तो. ते हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट झाल्याचे अचानक कळले, त्यांना त्यांच्या मोबाइलवर फोन लावला तेव्हा तो उचलुन बोलण्याच्या स्थितीत ते होते,म्हणाले रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले आहे, [ या नंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला पण नंतर परत अ‍ॅडमिट करावे लागले. ] २ दिवसांनी हापिसच्या व्हॉट्सग्रुप मध्ये त्यांना रक्ताची [प्लेटलेट्सची गरज असल्याचा मेसेज वाचला ] गरज असल्याचे समजले. हॉस्पिटल मध्ये फोन लावला तर ती गरज भागल्याचे डॉक्टरांकडुन कळले आणि व्हेंटिलेटर वरुन काढले असल्याचे कळले .मला वाटले आता धोका कमी झालेला दिसतोय फक्त श्वास घ्यायला त्रास होतोय, पण एकदोन दिवसातच ते गेल्याचे समजले ! एक व्यक्ती एक वर्षासाठी माझ्या आयुष्यात आला आणि एकदाच भेट होउन कायमचा दुरावला ते कधीच न भेटण्यासाठी ! :( हे सगळ कठीण आहे, दु:खद आहे, वेदनादायी आहे आणि अस्वस्थ करणार आहे, रोज मृत्यूच्या बातम्या, रोज होणारे लोकांचे हाल, अपुर्‍या पडणार्‍या ववस्था या सर्व गोष्टींचा एक अनामिक ताण मनावर आहे. खरतर मन कुठे तरी दुसरीकडे वळावं, ताणातुन काही काळ का होइना मोकळीक मिळावी म्हणुनच खरं तर मी हे वेब सिरीज, चित्रपट पाहण्याचा धडाका लावला आहे,कारण मनावरील ताण कमी करणे गरजेचे आहे. अगदी आत्ता देखील आचार्य अत्रे यांचे केवळ भाषण ऐकत बसलो होतो. विनोदा सारखे दुसरे उत्तम औषध मनावर सध्या तरी उपलब्ध नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #BoycottRadhe

In reply to by मदनबाण

फार रिलेटेबल प्रसंग आहे हो. फारशी ओळख नसणारे, येता जाता हाय हॅलो पुढे इन्ट्रॅक्शन नसणारे लोक अचानक दिसेनासे झाले की भयंकर वाटतं.पहिल्या लोकडावून संपल्या नंतर आमच्या ऑफिस मधल्या एका तरुण मुलानं (२२-२३) अचानक आत्महत्या केली. आदल्या दिवशीपर्यंत संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत ऑफिस मध्ये इतर मुलांसोबत सोबत हसत खेळत नीट होता, आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली. काय कारण माहित नाही. हा सुद्धा कोव्हिड बळीच असावा. तो नुकताच तीन महिन्यांपूर्वी जॉईन झालेला, ओळख फारशी नव्हतीच. हसतमुख, जरा गंभीर इन्ट्रोव्हर्ट माणूस होता. आपल्याला वाटत असते की घाई काय आहे, यांची ओळख करून घ्यायला अजून खूप दिवस आहेत. आता हुरहूर लागते.

In reply to by मदनबाण

सध्य काळात मृत्यू चे प्रमाण हे करोनाच्या सुरुवातीच्या काळा पेक्षा नक्कीच अधिक आहे. आजु-बाजु स्थिती आणि एकंदर बातम्या पाहिल्यावर स्थिती भयावह आहे हे लगेच कळते.
हा वेगळा मुद्दा आहे आणि यात नाकारण्यासारखे काहीच नाही. माझा मुद्दा हा की मोठे ढुढ्ढाचार्य तज्ञ लोक जेव्हा सगळीच वाट लागेल असे अंदाज व्यक्त करतात तेव्हा तसे काही होत नाही हा पूर्वेतिहास लक्षात घेता आता जर असे अंदाज परत यायला लागले असतील तर ती एक सकारात्मक बातमी समजावी का? कारण या मंडळींचे अंदाज कधीच बरोबर येत नाहीत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

माझा मुद्दा हा की मोठे ढुढ्ढाचार्य तज्ञ लोक जेव्हा सगळीच वाट लागेल असे अंदाज व्यक्त करतात तेव्हा तसे काही होत नाही हा पूर्वेतिहास लक्षात घेता आता जर असे अंदाज परत यायला लागले असतील तर ती एक सकारात्मक बातमी समजावी का? कारण या मंडळींचे अंदाज कधीच बरोबर येत नाहीत. ओक्के. मला मात्र यावेळी परिस्थिती अधिक खराब होइल अशी खरचं भिती वाटत आहे. नविन करोना स्ट्रेन हा अधिक काळ हवेत स्थिर राहत आहे असे सध्या तरी समजत आहे आणि जो इन्फेक्शन रेट आहे तो देखील पहिल्या लाटे पेक्षा अधिक वाटत आहे. असो... येत्या काळात चित्र अधिक स्पष्ट होइलच. हिंदूस्थाना विषयी आणि त्याच्या प्रत्येक गुणा बाबत परदेशी मिडिया नेहमीच पक्षपाती राहिलेला आहे, हे राष्ट्र कधीच सामर्थशाली होउ नये आणि हिंदूंच्या विरुद्ध जे काही करणे आणि लिहणे शक्य आहे ते त्यांनी नेहमीच केलेले आहे. ============================================================================================ ऑक्सिजन :- 05 JAN 2021 5:02PM by PIB Delhi PM CARES Fund Trust allocates Rs.201.58 crores for installation of 162 dedicated PSA Medical Oxygen Generation Plants in public health facilities 19.Maharashtra 10 महाराष्ट्राला १० प्लांट साठी पैसे मिळाले, मग किती प्लांट उभारले गेले सांगा बरं ? उभारले नसले गेले तर ते पैसे कुठे गेले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHORE

In reply to by मदनबाण

महाराष्ट्राला १० प्लांट साठी पैसे मिळाले, मग किती प्लांट उभारले गेले सांगा बरं ? उभारले नसले गेले तर ते पैसे कुठे गेले ? Pm cares मधून पैसे ऍलोट होण्याचा अर्थ त्या पैशांची खर्चाआसाठी उपलब्धता करणे असा आहे. ते पैसे राज्यांना खर्च करण्यास दिले असा नाही तुम्ही दिलेल्या दुव्यात procurment cmss कडून होणार आहे असे लिहिले आहे. हि केंद्र सरकारची संस्था आहे.

In reply to by नावातकायआहे

मागील भागात प्रदीप ह्यांनी टेंडर डॉक्युमेंट दिले आहे. ते उघडा. त्याचे पान 45 काढा. त्याआधी तुम्ही स्वतः दिलेलं डॉक्युमेंट उघडा. त्यात प्रोकर्मेंट ( अर्थ- वस्तू मिळवणे, वाटाघाटी करणे, किंमत ठरवणे, इतर अटी ठरवणे.) कोणाकडे आहे ते पाहा. ठीक. १. प्रोकर्मेंट- केंद्र सरकार करणार आहे. २. पैसे- ४०% माल मिळाल्यावर आणि ६०% प्लांट उभारून तसे नक्की झाल्यावर. बिल निघणार- केंद्राच्या नावावर. (Cmss) अलोकेशनचा अर्थ पैसे देणे असा होत नाही तर खर्चासाठी तरतूद करणे होतो. हा खर्च करणे प्रोक्युर्मेंटचाच भाग आहे. मग, वस्तू मिळण्यापासून उभी होण्यापर्यंत पैसे खर्च करण्याचा आणि राज्य सरकारचा काहीही संबंध येत नाही. मुळात, केंद्राने पैसे राज्याला दिले हा निष्कर्ष कुठून निघतो ? जे वाचले त्यावरून cmss स्वतःच सप्लायर ना पेमेंट करणार आहे असे दिसते. प्लांट का बांधून झाले नाहीत ह्याची उदाहरणार्थ करणे स्क्रोल लेखात आहेत.

In reply to by कॉमी

तुम्ही इथे लिहीलेले बाकी सर्व बरोबर आहे. फक्त
वस्तू मिळण्यापासून उभी होण्यापर्यंत पैसे खर्च करण्याचा आणि राज्य सरकारचा काहीही संबंध येत नाही
इथे मात्र थोडी गडबड झालीय का? उपकरणांची खरेदी व प्रत्यक्ष उभारणी ह्यांचे पैसे CMSS ही केंद्राची संस्था देणार आहे, हे अगदी बरोबर आहे. पण साईट तयार करण्याची जबाबदारी त्या त्या राज्यांची असेल ना?

In reply to by नावातकायआहे

प्रोक्युरमेन्ट जर केंद्र सरकारने केली तर राज्य सरकारला कसे काय पैसे मिळतात ? फक्त १० प्लांट साठी पैसे असे का म्हणतायत ? किती पैसे दिले का नाही बोलत ? पीडीएफ मध्ये लिहिले आहे प्रोकर्मेंट केंद्र सरकार संस्था cmss करणार आहे.

.... पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली? https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai/navi-mumbai-police-c… ------------- आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-situation-handlin… देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल… यावरून मतं मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितलं. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आहेत. जर ह्या बतमीमध्ये तथ्य असेल तर भाजपा सरकार चुकीच्या वाटेने जात आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढे मोठे संकट असताना ट्विटर वर तक्रार करायला वेळ काढणारे सरकार... धन्य आहे. तसेही ट्विटर वर कसे असावे ह्याचे चकाकते उदाहरण पक्ष प्रवक्ते वारंवार देत असतातच.

In reply to by रात्रीचे चांदणे

कंटेंट रीमुव्हल रिक्वेस्ट लूमन डेटाबेस वर स्टोअर होतात. ठठे भार्ट्सरकार्ने कोणकोणते ट्विट्स काढायला सांगितले त्यांची यादी आहे. आता हे ट्विट भारतातून पाहता येत नाहीत. बाहेरच्या देशात दिसतात. जवळपास ५० ट्विट्स होते. त्यातले काही खोट्या माहितीवर आधारित होते असे वायर म्हणते. काही ट्विट्झ मध्ये मोदी मेड डीजास्टर असा हॅश टॅग होता. काही ट्विट मध्ये मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. काही ट्विट मध्ये माहिती अशी काही नाही, फक्त मोदींच्या कामाबद्दल असंतुष्टी होती. पवन खेरा ह्यांनी तब्लीघी जमातीवर इतका गदारोळ झाला आणि कुंभ मेळ्याबद्दल काहीच नाही असे कसे, असा प्रश्न विचारला होता. हि सगळी ट्विट भारत सरकारने ट्विटर ला काढून टाकायला सांगितली. https://m.thewire.in/article/tech/as-covid-19-crisis-deepens-twitter-ta…

कोरोना समस्यावर केंद्र सरकार आता दिवसेंदिवस धोरणांच्या बाबतीत अधिक विनोदी होत चाललेले दिसत आहे, देशात आता मुक्तकंठाने केंद्रसरकारच्या धोरणावर टीका होत आहे, आता ती टीका जागतिक स्तरावरही होतांना दिसून येत आहे. परदेशी दैनिकांमधून आत्मगौरवाचे, आत्मसंतुष्टकांचे वाभाडे काढलेले दिसत आहे. "मोदींचा अतिआतिविश्वास भोवला, भारताने दुसर्‍या लाटेला जो प्रतिसाद दिला त्याने अनेक कच्चे दुवे आहे, यातून इतर देशांनी धडा घेण्यासारखे आहे'' - द गार्डियन. (दुवा दी गार्डीयन) करोनाचा संसर्ग होत असतांना गंगास्नान कुंभमेळ्यावर टीका केल्याचे दिसते. ट्रम्प प्रमाणे निवडणुका मोदींनी सोडल्या नाहीत. मोर्चे रॅली यावरही ही टीका दिसून येते. मोदींनी आपलं अपयश झाकण्यासाठी त्यांचं खापर राज्यांवर कसे फोडले त्याचंही वर्णन दी गार्डीयन करतांना दिसते. (सविस्तर पोष्ट वाचावी) चुकीच्या निर्णयांनी भारताने करोनाचा पेच आणखी गंभीर केला त्यात आत्मसंतुष्टाही भोवली. करोना रोखण्यातील भारताच्या सातत्याचे अपयश हे जागतिक परिणाम करणारे आहे. (न्युयॉर्क टाइम्स) अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या नेतृत्वाच्या चुकांचा पाढा या दैनिकांनी वाचलेला दिसून येतो. पंतप्रधान यांनी त्यांच्या स्वतःच्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशा-याकडे दुर्लक्ष केले त्यांच्या चुकांच्या परिणाम भोगावे लागत आहे. नरेंंद्र मोदी यांच्या अतिआत्मविश्वासामुळे हे सारे घडले. मा.मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्बंध कसे राखावेत असे म्हटले आहे. मंत्रीमंडळातील मंत्रीही मोंदींची खुशामत करतात वगैरे असे म्हटले आहे. असे दोन्ही वृत्तपत्रातील संपादकीयचा आशय दिसतो. द वाशिग्नटन पोष्टनेही असेच वाभाडे काढलेले दिसत आहेत. क्रिकेट, कुंभमेळा, आणि सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका केलेली दिसते. एकतर या सर्व दैनिकांनी विरोधी पक्षाशी संगनमत केले असावे अशी शंका आहे. जगभराच्या दैनिक आणि तज्ज्ञांच्या मी एक लक्षात आणून देऊ इच्छितो की आदरणीय पंतप्रधान मा.मोदी हे स्वतःच एक मोठे तज्ज्ञ असल्याने आम्हाला कोनाच्याही सल्ल्याची आणि सल्लागाराची गरज नाही, गरज पडत नाही. आम्ही आमचं पाहून घेऊ. मला वाटतं, या दैनिकांच्या मागे सीबीआय चौकशी लावावी मग नीट होतील, असे माझे व्यक्तीगत मत आहे. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. ;) -दिलीप बिरुटे