मित्रहो, काही काळापासून मिपावर येत असलेल्या 'चालू घडामोडी', 'सध्या मी काय पाहतोय' वगैरे धाग्यांवर अनेक मिपाकर उत्साहाने सहभाग घेत आहेत. या धाग्यांमधून 'बाहेर'च्या जगातील लोक काय करत आहेत याची माहिती मिळत असली तरी खुद्द मिपाकर काय करत आहेत, हे कळत नाही. कसलातरी छंद जोपासणार्या, काहीतरी वेगळेच करण्याची आवड असलेल्या, आपण स्वतः काहीतरी झपाटून केले पाहिजे असे वाटत असलेल्या हरहुन्नरी, हौशी, छंदिष्ट मिपाकरांसाठी हा धागा आहे. आपण अगदी छोटेसे का होईना, पण हौशीने स्वतः काही करत असाल, नवीन काही शिकत असाल, कश्यात तरी सहभागी होत असाल तर ते इथे अवश्य लिहावे अशी सर्वांना विनंती आहे. तर आता सुरूवात स्वतःपासून करतो.
मी रंगवत असलेली चित्रे घरात सर्वत्र लावत असलो, तरी त्यांना चौकटी करवून घेणे कधी जमले नाही. मला एक चित्र करायला जेवढा खर्च येतो, त्याच्या अनेक पटींनी एकेका चवकटीवर करावा लागेल, हे त्याचे मुख्य कारण. जुन्या बाजारात कधी कधी चांगल्या चवकटी असलेले जुने आरसे वा चित्रे मिळतात, पण आपले चित्र अगदी नेमक्या त्याच आकाराचे असेल, तरच त्या वापरता येतात.
मध्यंतरी तूनळीवर अचानकच ' हौ टु मेक वुडन फ्रेम' असे काही बघायला मिळाले. असे बरेच विडियो बघितल्यावर आपण हे करून बघायला हवे असे वाटू लागले. मग बाजारातून काही लाकडे, सेट स्क्वेयर, चिमटे, कॉर्नर स्ट्रॅप, मायटर बॉक्स, करवत वगैरे आणून प्रयत्नाला लागलो.
लाकूड कापताना ते अजिबात हलू नये म्हणून क्लँप वगैरे लावणे, करवत चालवताना हात स्थिर ठेवणे, मोजमाप अगदी अचूक करणे, हे अगदी आवश्यक असल्याचे थोड्या चुका झाल्यावर लक्षात आले. तसेच अनेक बारीकसारीक गोष्टी या विचार, प्रयत्न आणि जुगाडबाजी यातूनच साध्य होतात आणि असे करताना मोठेच समाधान लाभते, याची वारंवार अनुभूति येत गेली.
योग्य त्या मापाचे तुकडे मायटर बॉक्सच्या सहाय्याने कापल्यावर ते बरोबर काटकोनात जुळवून आधी चिकटवताना कॉर्नर स्ट्रॅपचा चांगला उपयोग होतो.
.
सुरूवातीला अगदी साधी फ्रेम बनवून बघितली. नंतर जरा रुंद आणि कारागिरी केलेल्या लाकडाची. त्याबरोबरच फ्रेमला वेगवेगळ्या प्रकारे रंगवणे आणि रंगातला भगभगीतपणा घालवण्यासाठी घासणे, खरवडणे, रंगावर रंग चढवणे वगैरे उद्योग करून बघितले.
.
याप्रकारे केलेल्या प्रयत्नातून थोड्या चित्रांना आता चवकटी लाभल्या आहेत आणि काही नवीनच रोचक काम करण्यातून मिळणारा आनंद आणि समाधान यांचा लाभ होत आहे. आता आणखी कठीण, उत्तम दर्जाच्या चवकटी करण्याचा बेत आहे.
अन्य मिपाकर पण आपापल्या उद्योगांबद्दल लिहून या धाग्यात भर घालत राहतील अशी आशा आहे.
वाचने
43871
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
रेसिपी अशी वेगळी नसणार कारण
In reply to घरी बियर बनवणे बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे . by मुक्त विहारि
भारतात किट आहेत,पण तो
In reply to रेसिपी अशी वेगळी नसणार कारण by चौकस२१२
छान आहेत सर्व चित्र आणि तुमचे
वेगवेगळी झाडे आणि कलम तयार
मस्त एकदम
In reply to वेगवेगळी झाडे आणि कलम तयार by बापूसाहेब
मस्तच ....
In reply to वेगवेगळी झाडे आणि कलम तयार by बापूसाहेब
फ्रेमिंग छानच !!
पुण्यात एकवेळ प्रेम करणं सोपं
In reply to फ्रेमिंग छानच !! by बबन ताम्बे
अगदी खरे ..
In reply to पुण्यात एकवेळ प्रेम करणं सोपं by चौथा कोनाडा
फ्रेमला सीजन्ड लाकूड वापरतात
In reply to पुण्यात एकवेळ प्रेम करणं सोपं by चौथा कोनाडा
फ्रेम्स छानच!
व्हाईट ड्राय इरेझ बोर्ड्स
- पॉलिशड हार्ड बोर्ड - ८' - ४' - $१५
- प्लस्टिक फ्रेम - $८
- इंडस्ट्रियल स्ट्रेन्थ व्हेल्क्रो - $१०
- मेटल अँगलस $२.
सगळ्या गोष्टी होम डेपो किंवा लोवेज मध्ये मिळतात, आणि बोर्ड्स पाहिजे त्या साईझ मध्ये कापून पण देतात, त्यान्च्या कडे गर्दी नसेल तर.६ * ४
In reply to व्हाईट ड्राय इरेझ बोर्ड्स by भुजंग पाटील
२ * ४
In reply to व्हाईट ड्राय इरेझ बोर्ड्स by भुजंग पाटील
माझे लॉकडाऊनचे प्रयोग
सध्याच्या घरांत, उन कमी आणि धूळ जास्त, असल्याने वाळवणे बंद
In reply to माझे लॉकडाऊनचे प्रयोग by प्रसाद गोडबोले
मार्कस, प्रयोग आवडले.
In reply to माझे लॉकडाऊनचे प्रयोग by प्रसाद गोडबोले
वाह मार्कसजी, तुमच्या अंगी ही
In reply to माझे लॉकडाऊनचे प्रयोग by प्रसाद गोडबोले
हि असली कामे करताना योग्य
छान धागा हो चित्रगुप्त.
हेवा वाटावा
In reply to छान धागा हो चित्रगुप्त. by अभिजीत अवलिया
@ अभिजीतः वा वा वा. खूपच छान
In reply to छान धागा हो चित्रगुप्त. by अभिजीत अवलिया
नशीबवान आहात ...
In reply to छान धागा हो चित्रगुप्त. by अभिजीत अवलिया
फोटू टाका राव माणसांचे नसले
In reply to छान धागा हो चित्रगुप्त. by अभिजीत अवलिया
फार्म हाऊस कराड व सातारा
In reply to फोटू टाका राव माणसांचे नसले by चौकस२१२
हायला,
In reply to फार्म हाऊस कराड व सातारा by अभिजीत अवलिया
चालतय. आणि कट्ट्याचा खर्च
In reply to हायला, by सुबोध खरे
छान वर्णन . फार्म हाऊस कराड
In reply to फार्म हाऊस कराड व सातारा by अभिजीत अवलिया
वाह !
In reply to छान धागा हो चित्रगुप्त. by अभिजीत अवलिया
खरं आहे का?
In reply to छान धागा हो चित्रगुप्त. by अभिजीत अवलिया
मिपाकर सध्या काय करत आहेत ?
आज जागतीक पुस्तक दिन
हे पहा काही फोटो.
अतिशय सुंदर
In reply to हे पहा काही फोटो. by अभिजीत अवलिया
चौकोनी विहीरीची संकल्पना आवडली ....
In reply to हे पहा काही फोटो. by अभिजीत अवलिया
व्वा, अभिजीत अवलिया, सुंदर
In reply to हे पहा काही फोटो. by अभिजीत अवलिया
विहीरीला कुंपण वा भिंत नाही.
In reply to व्वा, अभिजीत अवलिया, सुंदर by चौथा कोनाडा
कुंपण लावून घ्या ....
In reply to विहीरीला कुंपण वा भिंत नाही. by अभिजीत अवलिया
@ अभिजीतः वा. कमाल आहे. क्लोद मोनेची चित्रेच जणू.