✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छंदिष्ट, हरहुन्नरी, उद्योगी मिपाकर सध्या काय करत आहेत ? (एप्रिल २०२१)

च
चित्रगुप्त यांनी
गुरुवार, 04/15/2021 - 03:12  ·  लेख
लेख
मित्रहो, काही काळापासून मिपावर येत असलेल्या 'चालू घडामोडी', 'सध्या मी काय पाहतोय' वगैरे धाग्यांवर अनेक मिपाकर उत्साहाने सहभाग घेत आहेत. या धाग्यांमधून 'बाहेर'च्या जगातील लोक काय करत आहेत याची माहिती मिळत असली तरी खुद्द मिपाकर काय करत आहेत, हे कळत नाही. कसलातरी छंद जोपासणार्‍या, काहीतरी वेगळेच करण्याची आवड असलेल्या, आपण स्वतः काहीतरी झपाटून केले पाहिजे असे वाटत असलेल्या हरहुन्नरी, हौशी, छंदिष्ट मिपाकरांसाठी हा धागा आहे. आपण अगदी छोटेसे का होईना, पण हौशीने स्वतः काही करत असाल, नवीन काही शिकत असाल, कश्यात तरी सहभागी होत असाल तर ते इथे अवश्य लिहावे अशी सर्वांना विनंती आहे. तर आता सुरूवात स्वतःपासून करतो. मी रंगवत असलेली चित्रे घरात सर्वत्र लावत असलो, तरी त्यांना चौकटी करवून घेणे कधी जमले नाही. मला एक चित्र करायला जेवढा खर्च येतो, त्याच्या अनेक पटींनी एकेका चवकटीवर करावा लागेल, हे त्याचे मुख्य कारण. जुन्या बाजारात कधी कधी चांगल्या चवकटी असलेले जुने आरसे वा चित्रे मिळतात, पण आपले चित्र अगदी नेमक्या त्याच आकाराचे असेल, तरच त्या वापरता येतात. मध्यंतरी तूनळीवर अचानकच ' हौ टु मेक वुडन फ्रेम' असे काही बघायला मिळाले. असे बरेच विडियो बघितल्यावर आपण हे करून बघायला हवे असे वाटू लागले. मग बाजारातून काही लाकडे, सेट स्क्वेयर, चिमटे, कॉर्नर स्ट्रॅप, मायटर बॉक्स, करवत वगैरे आणून प्रयत्नाला लागलो. . . लाकूड कापताना ते अजिबात हलू नये म्हणून क्लँप वगैरे लावणे, करवत चालवताना हात स्थिर ठेवणे, मोजमाप अगदी अचूक करणे, हे अगदी आवश्यक असल्याचे थोड्या चुका झाल्यावर लक्षात आले. तसेच अनेक बारीकसारीक गोष्टी या विचार, प्रयत्न आणि जुगाडबाजी यातूनच साध्य होतात आणि असे करताना मोठेच समाधान लाभते, याची वारंवार अनुभूति येत गेली. योग्य त्या मापाचे तुकडे मायटर बॉक्सच्या सहाय्याने कापल्यावर ते बरोबर काटकोनात जुळवून आधी चिकटवताना कॉर्नर स्ट्रॅपचा चांगला उपयोग होतो. ... सुरूवातीला अगदी साधी फ्रेम बनवून बघितली. नंतर जरा रुंद आणि कारागिरी केलेल्या लाकडाची. त्याबरोबरच फ्रेमला वेगवेगळ्या प्रकारे रंगवणे आणि रंगातला भगभगीतपणा घालवण्यासाठी घासणे, खरवडणे, रंगावर रंग चढवणे वगैरे उद्योग करून बघितले. ... . याप्रकारे केलेल्या प्रयत्नातून थोड्या चित्रांना आता चवकटी लाभल्या आहेत आणि काही नवीनच रोचक काम करण्यातून मिळणारा आनंद आणि समाधान यांचा लाभ होत आहे. आता आणखी कठीण, उत्तम दर्जाच्या चवकटी करण्याचा बेत आहे. . अन्य मिपाकर पण आपापल्या उद्योगांबद्दल लिहून या धाग्यात भर घालत राहतील अशी आशा आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43666 वाचन

💬 प्रतिसाद (109)

प्रतिक्रिया

@king_of_net... सामान LOWES मधून घेतले आहे.

चित्रगुप्त
गुरुवार, 04/15/2021 - 18:06 नवीन
@king_of_net... सामान LOWES मधून घेतले आहे. मात्र हवे असलेले सामान नेमक्या कोणत्या स्टोर मधे उपलब्ध आहे हे आधी नेटवर बघून जाणे उपयुक्त ठरते. बाकी मला ठाऊक नसलेली अनेक अवजारे आणि अन्य उपयोगी वस्तू तिथे प्रत्यक्ष फिरण्यातून नव्यानेच समजलेली आहेत. Miter Box बरोबरच ती करवत सुद्धा येते. Stopper असलेली घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: king_of_net

Ohh!!

king_of_net
Fri, 04/16/2021 - 17:40 नवीन
Lowe's म्हणजे Out of India वाटतं???? तस असेल तर मग मार्गच खुंटला... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@king_of_ netभारतात अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे

चित्रगुप्त
Fri, 04/16/2021 - 19:14 नवीन
बहुतेक भारतात अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे Miter Box आणि करवत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: king_of_net

इथे मिळेलhttps://www.amazon

मनो
Sat, 04/17/2021 - 09:30 नवीन
इथे मिळेल https://www.amazon.in/Black-Decker-Steel-Mitre-Orange/dp/B07L8QBR3M/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/15/2021 - 13:21 नवीन
वाह ! चवकटी आवडल्या. उघड्या पाठीचं चित्र आवडलं. म्हणजे बाकीचीही आवडली. सध्या छंद म्हणून असे विशेष काही नाही. फुटकळ वाचन. मोबाइल Os खटपट बाकी काही नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

राजकारणावरच्या चर्चा, चिमटे

प्रचेतस
गुरुवार, 04/15/2021 - 14:23 नवीन
राजकारणावरच्या चर्चा, चिमटे काढणे वगैरे राहिलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरे कि नाही डॉ बिरुटे सर?

शशिकांत ओक
गुरुवार, 04/15/2021 - 19:12 नवीन
'ते' चित्र पुढून काढले असते तर रंगत वाढली असती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदचित पुढुन काढलेल्या

गॉडजिला
Fri, 04/16/2021 - 10:37 नवीन
कदचित पुढुन काढलेल्या चित्रात व्यक्तिचा खोटा विग समजुन येउ शकतो या भितीपोटी चित्र मागुन काढले गेले असावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

डोकीवरचा ओला टाउल

कंजूस
Fri, 04/16/2021 - 10:44 नवीन
दाखवायचा आहे आणि पाठीच्या कण्यावरची रेघही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

खरं तर....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/18/2021 - 17:44 नवीन
'ते' चित्र पुढून काढले असते तर रंगत वाढली असती
! आपण पडलो रसिक. आपण सर्वच अंगांने आलेल्या चित्रांचा आस्वाद घेतो. चित्रगुप्तांनी अनेक चित्र अशी 'सर्वांगाने' इकडे मिपावर अनेकदा टाकली आहेत. ती सर्वच चित्र सुंदर वाटलेली आहेत. सौंदर्यांच्या पातळीवर अतिशय उंचीचं होत जातात अशी चित्र. गवळणी यमुना डोहात स्नान करीत आहेत आणि त्यांची वस्त्रे घेऊन कान्हा झाडावर बसून बासरी वाजवत आहेत. ’दे रे कान्हा, चोळी आणि लुगडी’ नको रे निरखू आमची अनावृत्त ओलेती काया. वगैरे. -दिलीप बिरुटे (रसिक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

वाह +१

Bhakti
गुरुवार, 04/15/2021 - 13:40 नवीन
Image removed. खूप सुंदर चित्र आहेत.चवकटीसाठीची खटाटोप मस्तच आहे. मी सिल्क थ्रेड ज्वेलरी बनवायचे शिकले आहे.यामध्ये मी अनेक साड्यांवर रंगसंगतीनुसार नेकलेस,बांगड्या आणि कानातले बनविले आहे.स्वत: तयार केलेले दागिने मिरवण्यात वेगळीच मज्जा आहे.याच्यापुढे अजून इरकल दागिने शिकणार आहे.
  • Log in or register to post comments

सध्या ऑफिसकामांमधेच व्यस्त

प्रचेतस
गुरुवार, 04/15/2021 - 13:55 नवीन
सध्या ऑफिसकामांमधेच व्यस्त आहे. मधून मधून मिपावर फुटकळ लेख लिहित असतो. :) आपले कलाकौशल्य आवडले, फोटो मस्तच.
  • Log in or register to post comments

सध्या ..

चौकटराजा
गुरुवार, 04/15/2021 - 14:17 नवीन
आग्यावेताळ, आगोबा ई ई सर्व डी आय वाय बंद आहेत ! कारण पेटणारे सरपण सादळले आहे संसारात रमल्याने हे ही लिहा की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
गुरुवार, 04/15/2021 - 14:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कधी वो ?

कंजूस
गुरुवार, 04/15/2021 - 14:30 नवीन
आळेफाटा दिला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

gari banwlwle soneri pey

चौकस२१२
गुरुवार, 04/15/2021 - 15:18 नवीन
khare tar ghari biyar banwne he karnyache khup warsh dokyat aahe .. pan tyaadhi kahi lakudkam kutरa jinywar jau naye mahnun dar karne chalu aahe , shiwya bit, mirchya ani kothimbir lawali aahe ... kumpanabhowtichi sagali jamin ukrun kadhwi lagnar aahe karan rang dyayacha aahe ..ata he sagal zalywar gari banwlwle soneri pey पहिजेच !
  • Log in or register to post comments

फेसाळते थंडगार

चौकस२१२
गुरुवार, 04/15/2021 - 17:06 नवीन
खरे तर घरी बियर बनवणे बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे . ( हे येथे राजमान्य आहे आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अगदी तोटी असलेल्या पिपापापासून ते बार्ली पर्यंत सहज मिळतात ) ) म्हणजे श्रमपरिहाराला बरी .. पण त्याआधी काही श्रम चालू आहेत ते म्हणजे - जिन्याच्या सुरवातीला एक लाकडी दार बनवले आहे ( कुत्रा वर फिरकू नये म्हणून) त्याला रंग देणे, बागेत बिट , मिरच्या आणि कोथिंबीर लावली आहे ती यशस्वी रित्या उगवणे आणि कुंपणाला खेटून जमा झालेली माती दूर लोटणे जेणेकरून लाकडी कुंपण व्यस्थित रंगवता येईल ... हे झाली कि मग फेसाळते थंडगार सोनेरी पेय हवेच
  • Log in or register to post comments

घरी बियर बनवणे बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे .

मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 17:15 नवीन
बियर बनवून झाली की रेसिपी देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

दापोली विद्यापीठातील Food

Bhakti
गुरुवार, 04/15/2021 - 17:37 नवीन
दापोली विद्यापीठातील Food Technology विभागाला भेट द्या.२ वर्षांपूर्वी काजूपासून फेणी तयार करायचा उपक्रम ते सुरू करणार होते.तुम्हीही करू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

असे ऐकून आहे ..

चौकटराजा
गुरुवार, 04/15/2021 - 19:12 नवीन
कोणत्याही करोबोहायड्रेट च्या रसात यीस्ट घातले की काही काळाने दारू तयार होते. द्राक्षाच्या रसात यीस्ट घालून पहा ! यीस्ट बेकरीवाल्याकडे मिळेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

रेसिपी अशी वेगळी नसणार कारण

चौकस२१२
Sat, 04/17/2021 - 09:10 नवीन
रेसिपी अशी वेगळी नसणार कारण तयार किट मिळते येथे त्याप्रमाणे करणार . तुम्ही आधी तुमच्या देशात असे करायला परवानगी आहे का बघा नाही तर वास सुटला तर वांदे होतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भारतात किट आहेत,पण तो

Bhakti
Sat, 04/17/2021 - 09:48 नवीन
भारतात किट आहेत,पण तो फरमेंटेशन करायचा जार सहज नाही मिळत बहूतेक.तिकडचा जार -फोटो वा माहिती असेल तर द्यावी (ज्ञानात भर).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

छान आहेत सर्व चित्र आणि तुमचे

गणेशा
गुरुवार, 04/15/2021 - 17:28 नवीन
छान आहेत सर्व चित्र आणि तुमचे चौकटचे काम सुद्धा..
  • Log in or register to post comments

वेगवेगळी झाडे आणि कलम तयार

बापूसाहेब
गुरुवार, 04/15/2021 - 18:05 नवीन
वेगवेगळी झाडे आणि कलम तयार करण्याचे प्रयत्न चालू केलेत गेल्या वर्षीपासून.. पेरू अंबा सीताफळ ड्रॅगन फ्रूट अंजीर अशी सगळी मिळून जवळपास 200 रोपे घरीच तयार केलेत. कलम करण्यासाठी लागणार्या फांद्या मित्रमंडळी कडून मिळवल्या. ड्रॅगन फ्रूट ची 2 रोपे 2 वर्षापूर्वी सोलापूर भागातून आणली होती. त्याच दोन झाडापासून हळूहळू 50 झाडे तयार केलीयेत. आता पावसाळा आला की सर्व झाडे गावी शेतात deploy करणार आहे. त्याचसोबत अजून काही फळझाडे जसे चिक्कू, फणस, 2-3 दुर्मिळ प्रकारचे आंबे, द्राक्ष, लीची इ विकत घेणार आहे.
  • Log in or register to post comments

मस्त एकदम

राघवेंद्र
गुरुवार, 04/15/2021 - 18:51 नवीन
मस्त एकदम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

मस्तच ....

मुक्त विहारि
Fri, 04/16/2021 - 17:53 नवीन
व्यनि करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

फ्रेमिंग छानच !!

बबन ताम्बे
गुरुवार, 04/15/2021 - 19:25 नवीन
चित्राला फ्रेम करणे पुण्यात पण महागच आहे. पाव इंपेरियल साइझच्या चित्रालाच ३०० रुपये सांगतात. ती पण अगदी साधी फ्रेम. आपण मस्त फ्रेमिंग केलेय चित्रगुप्तजी. चित्रांना फ्रेम मुळे आणखीनच उठाव येतो.
  • Log in or register to post comments

पुण्यात एकवेळ प्रेम करणं सोपं

चौथा कोनाडा
Fri, 04/16/2021 - 14:57 नवीन
पुण्यात एकवेळ प्रेम करणं सोपं आहे पण फ्रेम करणं नाही असं जाणकर लोकं सांगतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

अगदी खरे ..

चौकटराजा
Fri, 04/16/2021 - 19:29 नवीन
कॅम्पात क्लोवर सेंटर मध्ये एक दुकान आहे तेथील मोकळ्या फ्रेम ची किंमत ५००० रु च्य दरम्यान असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

फ्रेमला सीजन्ड लाकूड वापरतात

कंजूस
Fri, 04/16/2021 - 20:26 नवीन
प्रेमाचं माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

फ्रेम्स छानच!

स्मिता.
Fri, 04/16/2021 - 16:01 नवीन
फ्रेम्स छानच दिसत आहेत. कोपरेसुद्धा सफाईदार जमलेत. काकांचा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे. आणखी चित्रांच्या फोटोंची वाट बाघतेय.
  • Log in or register to post comments

व्हाईट ड्राय इरेझ बोर्ड्स

भुजंग पाटील
Fri, 04/16/2021 - 23:10 नवीन
पॅन्डेमीक मुळे अजून किमान ८ महिने तरी घरूनच काम करावे लागणार (आणि मुलांची व्हरर्चुअल शाळा) असल्याने हे ड्राय इरेझ बोर्ड्स तयार केले. २ बोर्ड्स चा एकूण खर्च फक्त $३५.
  • पॉलिशड हार्ड बोर्ड - ८' - ४' - $१५
  • प्लस्टिक फ्रेम - $८
  • इंडस्ट्रियल स्ट्रेन्थ व्हेल्क्रो - $१०
  • मेटल अँगलस $२.
सगळ्या गोष्टी होम डेपो किंवा लोवेज मध्ये मिळतात, आणि बोर्ड्स पाहिजे त्या साईझ मध्ये कापून पण देतात, त्यान्च्या कडे गर्दी नसेल तर. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

६ * ४

भुजंग पाटील
Sat, 04/17/2021 - 00:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुजंग पाटील

२ * ४

भुजंग पाटील
Sat, 04/17/2021 - 00:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुजंग पाटील

माझे लॉकडाऊनचे प्रयोग

प्रसाद गोडबोले
Sat, 04/17/2021 - 02:12 नवीन
माझे लॉकडाऊनचे उद्योग : चार दिवस जोडुन शनिवार रविवार आणि गुढीपाडवा अशी सुट्टी मिळाली म्हणुन वाळवणाचे काही प्रयोग करुन पाहिले : साबुदाणा बटाट्याच्या पापड्या: Image removed. Image removed. Image removed. Image removed. भरलेल्या तळणीच्या मिरच्या : Image removed. Image removed. ३. गव्हाच्या कुरडया : Image removed. Image removed. Image removed. Image removed. आज्जीची फार आठवण आली . तिला प्रचंड कौतुक वाटलं असतं . आपं काय शिकलो ? : साबुदाणा पापड्या सोप्पा प्रकार आहे अगदीच कमी कष्टाचा. पण गव्हाच्या कुरडया मात्र वेळखाऊ आणि कष्टाचा प्रकार आहे . २ पातेली गहु भिजवुन सुध्दा खुप कमी प्रमाणात चिक निघाल्याने पुढे कुरडया करायचा घाट घातला नाही, तसाच खाऊन टाकला. तळणीच्या मिरच्या करताना मात्र घेताना एक गडबड झाली. कारण आम्हाला "मिरच्या आण " म्हणलं की आम्ही मिरच्या आणतो. भावनगरी, ब्याडगी , कश्मीरी, लवंगी हे प्रकार आम्हाला केवळ ऐकुन माहीत . समोर ठेवले तर ओळखताही येणार नाहीत. ( तसेही मला एक शेपु सोडला तर इतर पालेभाज्याही ओळखता येत नाहीत म्हणा. शेपु ओळखता येतो कारण त्याच्या वासाने मळमळते अन उलटी येते म्हणुन =)) ) ते असो. मोठ्ट्।या दिसल्या त्या मिरच्या आणल्या , चांगल्याच झणझणीत झाल्या आहेत !! हे सर्व करत असता असता मनात एकोनॉमिक्स वर चिंतन चालु होतेच : प्रिन्सिपल ऑफ मार्जिनल एफिशियन्सी (एखद्याला एखादे काम दुसर्‍या इतर कोणत्याही कामापेक्शा थोडेसे जरी जास्त चांगले जमत असेल तर त्याने फक्त तेच काम करावे आणि बाकीची कामे ऑटसोर करावी. हेच त्यच्यासाठी आणि ओव्हरॉल समजासठी बेस्ट असते ) किंव्वा अ‍ॅडम स्मिथ म्हणाला तसा इन्व्हिझिबल हॅन्ड ( म्हणजे कोणताही व्यवहार करताना , दोन्ही बाजुच्या पार्टी स्वत्:च्या स्वार्थाचा विचार करत असतात आणि स्वतःची युटीलिटी वाढवत असतात , सो नेट नेट दोघांचीही युटीलिटी वाढत असते आणि वेल्थ तयार होत असते . ) म्हणजे कसं की हे सगळे आपण करायच्या ऐवजी आपण आपले एकोनॉमिक्स , फायन्नास चे काम केले असते अन हे ऑट्सोर्स केले असते तर आपल्या वाचलेल्या वेळेची किंमत कैक पटीने जास्त आहे म्हणुन आपला फायदा झाला असता आणि बाहेर २-४ जणांना रोजगार मिळाला असता. सो नेट नेट आपण कामांचे जितके जास्त सॅग्रिगेशन करु शकु तितके स्वतःसाठी आणि ईकोनॉमीसाठी आणि समाजासाठी चांगले असेल ! असो. आमचे आपले सनातनी वर्णाश्रम व्यवस्था समर्थक स्वात्मरंजन. वगैरे वगैरे ! हे असले सगळे आयसोलेटेड पॉईंट्स जुळुन येताना पहायला खूप छन वाटतं ! एकुणच मजा आली . १. फोटो न दिसल्यास दिलगीर आहे २. फोटो अव्वच्यसव्वा आकाराचे दिसल्यसही दिलगीर आहे ( नक्की हाईट आणिविडथ काय ठेवावी बरें फोटो व्यवस्थित दिसण्याकरिता? )
  • Log in or register to post comments

सध्याच्या घरांत, उन कमी आणि धूळ जास्त, असल्याने वाळवणे बंद

मुक्त विहारि
Sat, 04/17/2021 - 05:46 नवीन
इतके सगळे करत आहात तर एक सोपा प्रकार करा मुगवडे बिन कष्टाचा आणि कधीही कामाला येणारा प्रकार आहे कृती पण सोपी आहे पहाटे 5 वाजता मुगडाळ भिजत घालायची, एक मध्यम आकाराचा बाऊल चालेल... एक किलो मुगडाळीचे, भरपूर मुगवडे होतात...रोज केलेत तर, 15-20 दिवस लागतील ... 7 वाजता वाटायची एक ताट घेऊन, शेंगदाण्याच्या आकारा इतपत, गोळे बनवून टाकायचे.साधारण पणे, एक तास लागेल... 5-6 दिवस कडकडीत उन दाखवायचे... दमट हवा असेल तर खूप दिवस टिकत नाहीत, दसर्याच्या आत संपवून टाका... तळलेले मुगवडे, कुठल्याही फळभाजीची रंगत वाढवतात पण, हे खरे खुलतात ते वांग्याच्या भाजी बरोबरच .... वांग्याच्या भाजीची रेसिपी देतो .... https://misalpav.com/node/25590
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मार्कस, प्रयोग आवडले.

कंजूस
Sat, 04/17/2021 - 06:32 नवीन
तळणीच्या मिरच्या पाहिल्या आणि हसलो. पापड्यात वाटलेली हिरवी मिरची आणि चिंचकोळ घातल्यास फार छान लागतात, प्रमाण मात्र ट्रायलने ठरवावे लागेल. आणि फोटोंसाठी सरधोपट टेम्प्लेट <br />फोटो क्रमांक _*_<br /> <img src="लिंक" width ="80%" /><br /> फोटो क्रमांक _*_ आणि लिंक टाकून ते सर्व कॉपी करून लेखनात हवे तिथे टाकणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वाह मार्कसजी, तुमच्या अंगी ही

सतिश गावडे
Sat, 04/17/2021 - 12:15 नवीन
वाह मार्कसजी, तुमच्या अंगी ही कला सुद्धा आहे हे माहिती नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हि असली कामे करताना योग्य

चौकस२१२
Sat, 04/17/2021 - 09:27 नवीन
हि असली कामे करताना योग्य अशी अवजारे असणे अतिशय महत्वाचे आहे नसली तर पार वैतागवाडी होते
  • Log in or register to post comments

छान धागा हो चित्रगुप्त.

अभिजीत अवलिया
Wed, 04/21/2021 - 21:39 नवीन
छान धागा हो चित्रगुप्त. माझे म्हणाल तर, गेले अनेक महिने आमच्या फार्महाउसवर राहून WFH चालू आहे. नेहमीप्रमाणे आवरून एक दीड तासाचा प्रवास करून ऑफिसला जाणे ह्याची गरज नसल्याने सगळे सुशेगात करायला वेळ मिळतोय. लहानपणी इच्छा असूनही खेळायला न मिळालेला एक खेळ म्हणजे बॅडमिंटन. सध्या रोज सकाळी ४५ मिनिटे बॅडमिंटन खेळतो. अधून मधून शेतातून चालत जाऊन कुठंतरी झाडाखाली जाऊन शांतपणे बसतो. घरापासून १ किमी वर कृष्णा माई वाहते. कधी कधी तिकडे चक्कर टाकतो. मोर, सुगरण हमखास दिसतातच. इतरही वेगवेगळ्या पक्षांचे निरीक्षण करणे चालूच आहे. शेतातील घर असल्याने दिवस रात्र कमालीची शांतता असतेच. तांबट, पोपट, घुबड, बुलबुल, आणि असंख्य प्रकारच्या चिमण्या घराबाजूच्या झाडांवर दिवसभर किलबिलाट करत असतात. अधून मधून घरात आत पण येतात. ५-६ वर्षांपूर्वी घराच्या बाहेरच्या सज्ज्यात एका चिमणीने घरटे बनवले होते ते अजूनही आहे. आतापर्यंत अनेक चिमण्यांची बाळंतपणे तिथे पार पडलेली आहेत. घरासमोर एक चिंचेचे झाड आहे. तिची अवीट गोडीची चिंच खायला माकडांची फौजच्या फौज येते. त्यांच्या तावडीतून जी थोडीफार वाचते ती आम्हाला खायला मिळते. घरापासून थोड्या अंतरावर एक जांभळाचे झाड हेरून ठेवले आहे. त्याची जांभळे पिकण्याची वाट बघतोय. करवंदाच्या जाळ्यांचा शोध घ्यायचा बाकी आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त तर निव्वळ अप्रतिम. एखाद्या चांदण्या रात्री गच्चीवर 'बसण्याचा' आनंद आणि सुट्टीच्या दिवशी विहिरीत पोहण्याचा आनंद पण मिळतोय. आता भाजीसाठी एक वाफा करून त्यात भाजी लावणार आहे. तर एकंदरीत आयुष्यात कदाचित कधीही अनुभवायला मिळाले नसते अशा वातावरणाचा आनंद घेणे चालू आहे.
  • Log in or register to post comments

हेवा वाटावा

तुषार काळभोर
Wed, 04/21/2021 - 22:05 नवीन
हेवा वाटावा असा हवाहवासा काळ व्यतीत करताय. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

@ अभिजीतः वा वा वा. खूपच छान

चित्रगुप्त
Wed, 04/21/2021 - 22:21 नवीन
असे जीवन असावे असे अनेकांना वाटत असते पण ते लाभत नाही. तुम्ही ते प्रत्यक्षात जगत आहात हे फारच थोर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

नशीबवान आहात ...

मुक्त विहारि
Wed, 04/21/2021 - 22:33 नवीन
तुम्ही हे क्षण कधीच विसरू शकणार नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

फोटू टाका राव माणसांचे नसले

चौकस२१२
गुरुवार, 04/22/2021 - 04:28 नवीन
फोटू टाका राव माणसांचे नसले तरी चालतील पण जागेचे टाका ? आणि मग कामाचा के काय करता ? फार्म हाऊस प मोठ्या शहराचं जवळ आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

फार्म हाऊस कराड व सातारा

अभिजीत अवलिया
गुरुवार, 04/22/2021 - 08:01 नवीन
फार्म हाऊस कराड व सातारा यांच्या मधोमध आहे. फार्म हाऊस पेक्षा घर म्हणणे जास्त योग्य. फार्म हाऊस म्हटले की मुळशी, पवना परिसरातील फार्महाऊस नजरेसमोर येतात. त्यांच्या तुलनेत आमची झोपडीच. बाकी फोटो विकांताला टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

हायला,

सुबोध खरे
गुरुवार, 04/22/2021 - 12:38 नवीन
हायला, हेवा वाटावा अशी स्थिती आहे. पावसाळ्यात कट्टा करावा वाटतोय. सगळं खर्च माझा. काय म्हणताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

चालतय. आणि कट्ट्याचा खर्च

अभिजीत अवलिया
गुरुवार, 04/22/2021 - 17:17 नवीन
चालतय. आणि कट्ट्याचा खर्च माझ्याकडेच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छान वर्णन . फार्म हाऊस कराड

सिरुसेरि
Fri, 04/23/2021 - 17:26 नवीन
छान वर्णन . फार्म हाऊस कराड व सातारा यांच्या मधोमध या वर्णनावरुन कोडोली , गोडोली , उंब्रज , भोर परिसर वाटतो आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/22/2021 - 11:11 नवीन
सुंदर, असेच राहा निवांत तिकडेच. आणि इंजॉय करा. च्यायला, मी बॅडमिंटन खेळायला जात होतो नियमित खेळायला येणारे संसर्गाच्या भितीने येणे बंद झाले. नाय तर दोन तीन सेट म्याचेस झाल्या की दिवसभर नीट राहतो माणूस. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

खरं आहे का?

कंजूस
Fri, 04/23/2021 - 16:30 नवीन
उगाचच म्हणतोय .कृष्णाकाठचे घर कल्पनेनेच दिसत आहे. कराड ,पलुस, किर्लोसकरवाडी, औदुंबर भाग माहिती आहे. मोर असतातच शेतांंत, ओढ्यांंत. रम्य असते . कितीही सूर्य तापो झाडाखाली काय छान झोप येते. मोकळी हवा . मग अचानक वावटळ उठते दुपारी तिनाला. कुठून तरी ढग येतो. पाऊस पाडून जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा