मित्रहो, काही काळापासून मिपावर येत असलेल्या 'चालू घडामोडी', 'सध्या मी काय पाहतोय' वगैरे धाग्यांवर अनेक मिपाकर उत्साहाने सहभाग घेत आहेत. या धाग्यांमधून 'बाहेर'च्या जगातील लोक काय करत आहेत याची माहिती मिळत असली तरी खुद्द मिपाकर काय करत आहेत, हे कळत नाही. कसलातरी छंद जोपासणार्या, काहीतरी वेगळेच करण्याची आवड असलेल्या, आपण स्वतः काहीतरी झपाटून केले पाहिजे असे वाटत असलेल्या हरहुन्नरी, हौशी, छंदिष्ट मिपाकरांसाठी हा धागा आहे. आपण अगदी छोटेसे का होईना, पण हौशीने स्वतः काही करत असाल, नवीन काही शिकत असाल, कश्यात तरी सहभागी होत असाल तर ते इथे अवश्य लिहावे अशी सर्वांना विनंती आहे. तर आता सुरूवात स्वतःपासून करतो.
मी रंगवत असलेली चित्रे घरात सर्वत्र लावत असलो, तरी त्यांना चौकटी करवून घेणे कधी जमले नाही. मला एक चित्र करायला जेवढा खर्च येतो, त्याच्या अनेक पटींनी एकेका चवकटीवर करावा लागेल, हे त्याचे मुख्य कारण. जुन्या बाजारात कधी कधी चांगल्या चवकटी असलेले जुने आरसे वा चित्रे मिळतात, पण आपले चित्र अगदी नेमक्या त्याच आकाराचे असेल, तरच त्या वापरता येतात.
मध्यंतरी तूनळीवर अचानकच ' हौ टु मेक वुडन फ्रेम' असे काही बघायला मिळाले. असे बरेच विडियो बघितल्यावर आपण हे करून बघायला हवे असे वाटू लागले. मग बाजारातून काही लाकडे, सेट स्क्वेयर, चिमटे, कॉर्नर स्ट्रॅप, मायटर बॉक्स, करवत वगैरे आणून प्रयत्नाला लागलो.
लाकूड कापताना ते अजिबात हलू नये म्हणून क्लँप वगैरे लावणे, करवत चालवताना हात स्थिर ठेवणे, मोजमाप अगदी अचूक करणे, हे अगदी आवश्यक असल्याचे थोड्या चुका झाल्यावर लक्षात आले. तसेच अनेक बारीकसारीक गोष्टी या विचार, प्रयत्न आणि जुगाडबाजी यातूनच साध्य होतात आणि असे करताना मोठेच समाधान लाभते, याची वारंवार अनुभूति येत गेली.
योग्य त्या मापाचे तुकडे मायटर बॉक्सच्या सहाय्याने कापल्यावर ते बरोबर काटकोनात जुळवून आधी चिकटवताना कॉर्नर स्ट्रॅपचा चांगला उपयोग होतो.
.
सुरूवातीला अगदी साधी फ्रेम बनवून बघितली. नंतर जरा रुंद आणि कारागिरी केलेल्या लाकडाची. त्याबरोबरच फ्रेमला वेगवेगळ्या प्रकारे रंगवणे आणि रंगातला भगभगीतपणा घालवण्यासाठी घासणे, खरवडणे, रंगावर रंग चढवणे वगैरे उद्योग करून बघितले.
.
याप्रकारे केलेल्या प्रयत्नातून थोड्या चित्रांना आता चवकटी लाभल्या आहेत आणि काही नवीनच रोचक काम करण्यातून मिळणारा आनंद आणि समाधान यांचा लाभ होत आहे. आता आणखी कठीण, उत्तम दर्जाच्या चवकटी करण्याचा बेत आहे.
अन्य मिपाकर पण आपापल्या उद्योगांबद्दल लिहून या धाग्यात भर घालत राहतील अशी आशा आहे.
वाचने
43871
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्रे भारी आहेत, मुख्य
@टवाळ कार्टा: कोपर्यातले चित्र समजण्यासारखे होईल
In reply to चित्रे भारी आहेत, मुख्य by टवाळ कार्टा
ते खालच्या बाजूला उजव्या कोपर्यातले सोडून
In reply to चित्रे भारी आहेत, मुख्य by टवाळ कार्टा
@ उपयोजकः अनाकलनीय चित्रे आणि कोट्यावधीच्या किंमती
In reply to ते खालच्या बाजूला उजव्या कोपर्यातले सोडून by उपयोजक
अनाकलनीय चित्रे आणि त्यांच्या कोट्यावधीच्या किंमती
In reply to @ उपयोजकः अनाकलनीय चित्रे आणि कोट्यावधीच्या किंमती by चित्रगुप्त
कार्पेट म्हणजे आपण विदेशांत
@साहना: चाणाक्ष वाचकाने 'ताडल्या'चा पुरावा.
In reply to कार्पेट म्हणजे आपण विदेशांत by साहना
मागच्या धाग्याच्या विषयावरून
In reply to @साहना: चाणाक्ष वाचकाने 'ताडल्या'चा पुरावा. by चित्रगुप्त
अमेरिके मधील DIY संस्कृती
In reply to @साहना: चाणाक्ष वाचकाने 'ताडल्या'चा पुरावा. by चित्रगुप्त
@साहना,बरेच वेगळे छंद केलेत.
In reply to अमेरिके मधील DIY संस्कृती by साहना
नक्की
In reply to @साहना,बरेच वेगळे छंद केलेत. by कंजूस
@साहना: उच्च दर्जाचा ब्रेड
In reply to अमेरिके मधील DIY संस्कृती by साहना
उच्च दर्जाचा ब्रेड
In reply to अमेरिके मधील DIY संस्कृती by साहना
सुंदर आणि तुमच्या गरजेचा छंद आहे.
चित्रकार कि सुतार?
In reply to सुंदर आणि तुमच्या गरजेचा छंद आहे. by कंजूस
सहमत आहे
In reply to चित्रकार कि सुतार? by शशिकांत ओक
उपयोजकः काहीसा असहमत आहे.
In reply to सहमत आहे by उपयोजक
@ कंजूसः प्रश्नांची उत्तरे.
In reply to सुंदर आणि तुमच्या गरजेचा छंद आहे. by कंजूस
धन्यवाद सर.
In reply to @ कंजूसः प्रश्नांची उत्तरे. by चित्रगुप्त
स्पृहणीय!
@ कंजूस आणि तुषार काळभोरः सविस्तर प्रतिसाद ...
डिआयवाय उपक्रम आवडला
@रंगा, प्रॉब्लेम सोपा दिसतोय.
In reply to डिआयवाय उपक्रम आवडला by श्रीरंग_जोशी
@ श्रीरंग जोशी: 'गिट्टी' वापरण्याची ची गरज लाकडात नाही.
In reply to डिआयवाय उपक्रम आवडला by श्रीरंग_जोशी
अजुन भर घालतो
In reply to @ श्रीरंग जोशी: 'गिट्टी' वापरण्याची ची गरज लाकडात नाही. by चित्रगुप्त
प्लॅस्टिकचे फिलर
In reply to डिआयवाय उपक्रम आवडला by श्रीरंग_जोशी
+१
In reply to प्लॅस्टिकचे फिलर by भुजंग पाटील
लाकडाची चौकाट?
In reply to +१ by मनो
प्लास्टिक च्या फिलर ना अँकर
In reply to डिआयवाय उपक्रम आवडला by श्रीरंग_जोशी
अनेक धन्यवाद
In reply to डिआयवाय उपक्रम आवडला by श्रीरंग_जोशी
smile.amazon.com :)
In reply to डिआयवाय उपक्रम आवडला by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to smile.amazon.com :) by भुजंग पाटील
भिंत
In reply to डिआयवाय उपक्रम आवडला by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to भिंत by चौकस२१२
@ श्रीरंग जोशी: स्क्रूसाठी धातुचे वॉशर वापरा.
गिट्टीचा सोपा उपाय
गिट्टी किंवा रावळ प्लग नसेल
In reply to गिट्टीचा सोपा उपाय by कंजूस
मस्तच
मला काही दिवस आधी एका मोठ्या
ओळंबा विकत आणायची गरज नाही...
In reply to मला काही दिवस आधी एका मोठ्या by साहना
पण त्यासाठी ओळंबा?
In reply to मला काही दिवस आधी एका मोठ्या by साहना
आडवी लेव्हल चेक करण्यासाठी पारदर्शक नळी उत्तम..
In reply to पण त्यासाठी ओळंबा? by कंजूस
ओळंबा गवंडी लोक कशासाठी
In reply to पण त्यासाठी ओळंबा? by कंजूस
भिंत बांधताना ती जमीनिशी
In reply to ओळंबा गवंडी लोक कशासाठी by साहना
डी आय वाय आणि मी ..
चौकटराजा इन वंडरलँड.
In reply to डी आय वाय आणि मी .. by चौकटराजा
डी आय वाय
In reply to डी आय वाय आणि मी .. by चौकटराजा
आयकिया च्या फर्निचर ची जोडणी करणे
In reply to डी आय वाय by चौकस२१२
आतापर्यंतच्या अनुभवावरुन माझी
In reply to आयकिया च्या फर्निचर ची जोडणी करणे by राघवेंद्र
माहिती द्या!
@king_of_net... सामान LOWES मधून घेतले आहे.
In reply to माहिती द्या! by king_of_net
Ohh!!
In reply to @king_of_net... सामान LOWES मधून घेतले आहे. by चित्रगुप्त
@king_of_ netभारतात अॅमेझॉनवर उपलब्ध आहे
In reply to Ohh!! by king_of_net
इथे मिळेलhttps://www.amazon
In reply to @king_of_ netभारतात अॅमेझॉनवर उपलब्ध आहे by चित्रगुप्त
वाह !
राजकारणावरच्या चर्चा, चिमटे
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरे कि नाही डॉ बिरुटे सर?
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कदचित पुढुन काढलेल्या
In reply to खरे कि नाही डॉ बिरुटे सर? by शशिकांत ओक
डोकीवरचा ओला टाउल
In reply to कदचित पुढुन काढलेल्या by गॉडजिला
खरं तर....
In reply to खरे कि नाही डॉ बिरुटे सर? by शशिकांत ओक
वाह +१
सध्या ऑफिसकामांमधेच व्यस्त
सध्या ..
In reply to सध्या ऑफिसकामांमधेच व्यस्त by प्रचेतस
=))
In reply to सध्या .. by चौकटराजा
कधी वो ?
In reply to =)) by प्रचेतस
gari banwlwle soneri pey
फेसाळते थंडगार
घरी बियर बनवणे बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे .
In reply to फेसाळते थंडगार by चौकस२१२
दापोली विद्यापीठातील Food
In reply to घरी बियर बनवणे बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे . by मुक्त विहारि
असे ऐकून आहे ..
In reply to घरी बियर बनवणे बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे . by मुक्त विहारि