Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 14/04/2021 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे. यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल. युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली. हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे. पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी. अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या. ... ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.

वाचने 70447
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संजय उवाच ऐकून धन्य झालो ... हसावे कि पादावे हे कळेना ... आता सर्व मिपाकर मिळून एक काम करूयात ,, र १८८ आणि मामू यांची आणि संजय यांची भेट घडवून आणू यात र १८८ यांनी पुढे असा सल्ला दिला आहेच कि महाराष्ट्राने चीन बरोबर डिरेक्त वयहार करावा रेमिडीसीवर का काय ते मिळवण्यासाठी .... मग चीन कशाला इस्राएल बरोअबर मामुंनी व्यापार करावा आणि मोदींना जे जमले नाही ते निदान महाराष्ट्ररा पुरते तरी करावे .... अरे पण यात गोची होईलइस्राएल बरोअबर व्यापार केला तर "मोमीनपुऱ्यातील" लोकांना वाईट वाटेल ना ! ... नक्कोच ते .. रद्द १८८ आणि मामूनची भेट रद्द ...

In reply to by पिनाक

ब्रुक फार्माच्या मालकाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे दमणहून याच सरकारच्या पोलिसांनी उचलून आणले हे पाहता या सरकारपासून दूरच राहावे असे कंपन्यांना वाटले तर त्यात त्यांची चूक कशी म्हणता येईल? समजा फडणवीस-दरेकर वेळेत पोलिस स्टेशनला पोचले नसते तर ब्रुक फार्माच्या मालकाचा पण मनसुख हिरेन झाला असता का? सध्याच्या परिस्थितीत सामान्य लोकांना मदत व्हावी असे कितीही वाटले तरी हे विकतचे दुखणे गळ्यात लोढणे म्हणून कोण कंपनी मालक अडकवून घेईल आणि कशाकरता घ्यावे?

In reply to by पिनाक

Remdesivit भारतीय कंपन्या महाराष्ट्र ला देत नसतील तर चीन शी महाराष्ट्र नी संपर्क करावा आणि तेथून आयात करावी मुंबई मध्ये. इम्रानला सुद्धा विचारायला काही हरकत नाहीं

In reply to by Rajesh188

पण आयातीला केंद्राची परवानगी लागते. ती नाही मिळाली तर चीन/पाकिस्तानला लसींचे कंटेनर मुंबईत एअरड्रॉप करण्यास सांगावे किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना राज्य सरकारने स्वखर्चाने चीनला पाठवून त्यांचे लसीकरण करून आणावे व या कंपन्याचे व मोदींचे नाक कापावे.

In reply to by श्रीगुरुजी

व्हाइट कॉलर लोक जी ह्या भूमी ची लेकर आहेत तीच परकी झाली आहेत औषध नाही मिळाले की ह्यांना आनंद होतो,लस उपलब्ध नाही झाली की ह्यांना आनंद होतो. त्या इम्रान भाई ,भाई ला contract देतील ते लस पोचवायचे तो तरी ह्या माती चे उपकार फेडेल. सिनेमा मध्ये पण दाखवतात ना घरातील बेरोजगार मुलगाच आई वडिलांची सेवा करतो तसे(सिनेमा साहेब). ज्या शेतकऱ्यांना white कॉलर लोकांनी शिव्या दिल्या .तेच शेतकरी संकट काळात भाज्या,दूध ह्यांची कमतरता येवून देत नाही . आणि रोज दोन घास पोटात जात आहेत.. बाकी सर्व संधी च फायदा घेवून लूट करत आहेत किंवा अडवणूक..

In reply to by Rajesh188

+१ भाजप हा राज्य करण्याच्या लायकीच पक्श नाही सुदैवाने हे लोकांना आता कळलेय. सुदैवाने राज्यात भाजप सत्तेत नाही. देश कधी भाजपमूक्त होतो ते पाहूयात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राज्यात भाजपा सत्तेत नाही म्हणूनच राज्य करोना बाबतीत एक नंबरवर आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

+१ भाजपा सत्तेत असती तर गुजरात प्रमाणे आकडे लपवले असते आणी महाराष्ट्र राज्य कोरोना बाबतीत एक नंबरवर नसते. :) महाविकास आघाडीवाले मुर्ख आहेत खरे आकडे देवून स्वतची घालवून घेत आहेत. महाविकास साॅरी गुन्हा सिध्द झालेला नसला तरी भाजपेयीनी निकाल दिलेला असल्याने महावसूली म्हणूयात महावसूली आघाडीचा निषेध. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अगदीं अगदी

In reply to by पिनाक

या कंपन्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने महाराष्ट्राबाहेर जावे. अन्यथा पोलीस उचलून नेतील.

एवढंच आहे की इतके पण राजकारण करू नका की आपलेच परके वाटायला लागतील. लोक औषदा वाचून तडफडून मरत आहेत आणि तेच औषध महाराष्ट्रर ला मिळू नये म्हणून सत्तेचा वापर करू नका. लस मिळू नये म्हणून सत्तेचा वापर करू नका. महाराष्ट्र लाचार होवून केंद्र सरकार पुढे औषध आणि लस ह्यांची भीक मागत उभा राहिला पाहिजे ही कोणती मानसिकता. देशात असे राजकारण कधीच झाले नाही. आणि औषध ,आणि लस मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या की जो काही लोकांना आनंद होतो. तो कोणता आनंद.त्याला राक्षसी आनंद च म्हणले पाहिजे.

In reply to by Rajesh188

+१ असो. महाआघाडी सरकार खंबीर आहे. गुजरात हाल भोगतच आहे. केंद्रात ही स्वपक्शाचे सरकार असल्याने गुजराती राज्यकर्त्याना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहण करावा लागतोय. सुदैवाने विकासपुरूष केजरीवाल असो की ठाकरे केंद्राचे गलिच्छ खेळ जनतेसमोर आनताहेत.

In reply to by कपिलमुनी

४५ वर्षांहून कमी वय असूनही दुसर्यांदा लसीचा डोस घेतला. :) आता मुर्ख काॅग्रेसी गुलाम किंवा शिवसैनिक वशिलेबाजीचा आरोप लावतील त्यांचा आधीच निषेध. आपण सर्व भाजप समर्थकानी ह्यावर मौन पाळूयात :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खर तर ह्यात जे दोषी कोणी दोषी असतील तर कारवाई केली पाहिजे. फडणवीसांवरती टीका करून काय होणार आहे. फडणवीस जर मुख्यमंत्री असले असते तर टीका योग्य आहे, पण स्वतः सत्तेत असताना कारवाई करायची सोडून काँग्रेस चे आमदार मिडिया मध्ये टीका करत आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वयोमर्यादा पाहून लसिकरण करण्याची जबाबदारी कुणाची आहे ? राज्यसरकारची की फडणविसांची ? आणि वशिलेबाजी करुन लस दिली असेल, तर राज्यसरकारने काय कारवाई केली ज्याच्या वशिला होता त्याच्यावर ?

In reply to by कपिलमुनी

घराणेशाही कन्सेप्टचा कॉपीराईट भंग झालेला दिसतोय वरकरणी. :)

In reply to by नावातकायआहे

म्हणजेच रेमेडीसीविर इंजेकॅशन्स च credit फडणवीस यांना व पर्यायाने भाजपला मिळू नये या साठीच पोलिसांनी कारवाई केली असे दिसतंय. पण ह्या सर्वात नुकसान झाले हे महाराष्ट्रातील करोना रुग्णाच झालं.

dose हे ट्वीट निट पहा कोरोना लसीचा हा दुसरा डोस आहे, जर लस मिळणार होती तर ती घरी का घेतली नाही ? लोक ट्विटरवर विचारत आहेत रेडमिसिवर लसी प्रमाणे कोरोना लसीचा सुध्दा गुप्त साठा भाजपाकडे आहे कि काय ?? शरद पवार सातार्‍यात पावसातील सभेत म्हणाले "मी म्हातारा आहे काय ? " त्या शरद पवारांना म्हातारा ठरवण्यासाठिच त्यांना लसीचा दुसरा डोस घरी दिला कि काय ?

पुतण्या ची वृत्ती बघा ,हुकूमशाही वृत्ती आहे त्याचा काका विरोधी पक्ष नेता आहे म्हणून हा काही पण करणार . राहुल गांधीच्या घराणेशाही वर टीका करणारे आता गप्प आहेत. राहुल जी सुशील ,सुसंस्कृत तरी आहेत.. आणि हे ह्यांचे वारस बघा गुंड,बेशिस्त , अडाणी,

In reply to by Rajesh188

तो दूरचा कुणीतरी नातेवाईक आहे आणि त्याचं आडनाव फडणवीस आहे. तो काही राजकारणात नाही. देवेंद्रजींचा वारसदार नाही. उगीच कुठे तरी बादनारायण संबंध लावणे सोडा.

In reply to by पिनाक

खोटे बोलता येत असेल तर च bjp मध्ये प्रवेश मिळतो असा काही नियम आहे का? तन्मय हा देवेंद्र जी च्या भावाचा मुलगा आहे.हे लांब चे नाते आहे का?

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन

उत्तरप्रदेशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे, उत्तरप्रदेश सरकार हतबल झाले होते. कोणतीच कार्यवाही होत नाही, असे पाहून एका याचिकेत लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि गोरखपूरमधे २६ एप्रीलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. याविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दखल केली होती. योगी सरकारच्या वतीने म्हटल्या गेले की लॉकडाऊनचे आदेश देणे न्यायपालिकेच्या कक्षेत येत नाही. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अगदी योग्य आहे, पण योगी सरकार कोरोनात हतबल दिसत आहे, हेही तितकेच सत्य आहे. दरम्यान योगी सरकारने संपूर्ण राज्यात शनिवारी आणि रविवारी राज्यात लॉकडावूनचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राने ज्या पद्धतीन विकेंडला लॉकडाऊन केले. अत्यावश्यक आस्थापनांना परवानगी देऊन इतर आस्थापना गर्दीच्या दुष्टीने बंद ठेवले त्याच पद्धतीने युपी सरकार प्रयत्न करीत असतांना दिसत आहे, महाराष्ट्राच्या लॉकडाऊनला नावे ठेवणा-यांनी आत्ता योगी सरकारची काळजी घ्यायला हवी, तिकडे काय काय मदत दिल्या जाते, कशी दिली जाते, तेही आपण पाहात राहु या. दुसरी गोष्ट, केंद्रसरकारचा महाराष्ट्र द्वेष नेहमीच दिसून आला आहे, मदतीतही सतत दुजाभाव ठेवला. दुसरीकडे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे. (बातमी ) खरंय महाराष्ट्र जसे तसे जमले तसे करोनावर नियंत्रणासाठीचे आपल्या लेवलचे ते सर्व प्रयत्न करीत आहेत, पण केंद्र म्हणून आपली भूमिका ही सहकार्याची असायला पाहिजे, आपला द्वेष किमान अशा संकटप्रसंगी तरी दिसू नये अशी अपेक्षा आहे. लोक सुखातले प्रसंग विसरतील पण दु:खात कोण कोण सहभागी होतं, कोणी कोणी मदत केली, कसं द्वेषाचं राजकारण केलं त्याला महाराष्ट्र विसरणार नाही. करोना काळात प्राण गमावणा-या आरोग्य योद्द्यांचे विमाछत्र पन्नास लाखाचं जे सुरक्षा देणारी विमायोजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, करोना काळात पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचा-यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्या कुंटूंबियांना आधार देण्यासाठी ही योजना सुरु झाली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील महिन्यामधे राज सरकारांना पाठविलेल्या पत्रात २४ मार्चपासून ही योजना बंद करण्यात आल्याच म्हटलं आहे. सदरील पत्रावरुन सरकारवर टीका व्हायला लागल्यावर २४ एप्रीलपर्यंतची येणारी सर्व प्रकरणे दावे निकाली काढल्या जाणार आहेत न्यु इंडिया इन्शोरन्स कंपनीशी चर्चा करत असल्याचे म्हटले होते. (बातमी ) सरकारच्या धोरणावर टीका झाली नसती तर ही योजना केव्हाच गुंडाळल्या गेली असती. ''तन्मय फडणवीस पुतण्या नसून दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लशीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही, जर नियमानुसार हे सर्व झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही.'' (फडवणीस साहेबांचं ट्वीट) अरे भावा, आपलं लशी दिल्याबद्दल आक्षेप नैच ये, पण तो पात्र नसतांना लस दिल्या गेली. आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. आंतरजालावर त्या दुरच्या पाहुण्यांचे आपल्या सोबतचे सर्व फोटो व्हायरल झालेले आहेत. ( ट्वीट आणि खुलासा. ) अध्यक्ष महोदय, आपलं राजकारण संपवतील बरं हे सगळे मिळून. आणि वरच्या शेठ लोकांवरही जास्त विसंबून राहू नका. सिंहासन मिळवून देण्यात ज्या थोरामोठ्यांचे तपस्वी हात होते ते सर्व अडगळीत पडले आहेत. आपलंही तसं व्हायला काही वेळ लागणार नाही. आपल्या गप्पा आपल्याला आवडतात, एक मिपाकर म्हणून आपल्याला सल्ला द्यावा वाटला, पुन्हा म्हणू नका तुम्ही तर काही बोलले नव्हते म्हणून. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला द्वेष किमान अशा संकटप्रसंगी तरी दिसू नये अशी अपेक्षा आहे. उठबस "टाळ्या थाळ्या, + मनकी बात" अशी चेष्टा करनार्यांनी असे लिहावे !

In reply to by चौकस२१२

आदरणीय पंतप्रधान यांनी करोनाच्या काळात भारतियांना जो दिवाबत्तीचा, टाळ्या- थाळीचा जो कै च्या कै टास्क दिला, तो आपल्या कायमच टिंगल टवाळीचा विषय आहे, हे नम्रपणे नमूद करतो. -दिलीप बिरुटे

In reply to by चौकस२१२

"टाळ्या थाळ्या - दिवे लावणे" यामागचा उद्देश "कोणाच्यातरी डोक्यात प्रकाश पडावा" हा नक्कीच नव्हता. एवढे नम्रपणे नमुद करतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. कारगिल युद्धातील हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी बांधलेल्या आदर्श इमारतीत आदर्श मुख्यमंत्र्यांचे दिवंगत वडील, सासूबाई, मेव्हणा व मेव्हणी याना प्रत्येकी १ अश्या एकूण ४ सदनिका वाटल्या होत्या. याविषयी पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर, "ते माझे खूप लांबचे नातेवाईक आहेत" असे उत्तर आदर्श मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे भावा, आपलं लशी दिल्याबद्दल आक्षेप नैच ये, पण तो पात्र नसतांना लस दिल्या गेली. आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. आंतरजालावर त्या दुरच्या पाहुण्यांचे आपल्या सोबतचे सर्व फोटो व्हायरल झालेले आहेत. -- लस देताना तो पात्र आहे की नाही हे तपासायची जबाबदारी कोणाची होती, फडणवीसांची की लस देणार्‍या कर्मचार्‍यांची ? की मोदींची ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे.
तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? या प्रश्नाला दिलेल्या महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे' या उत्तरात नेमकं काय वावगं आहे हे मला कळलं नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुसरीकडे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे. (बातमी ) ही मुलाखत टाईम्स नाऊ यांनी घेतली होती व त्यांनीच या मुलाखतीतील माहिती खालील पानावर दिली आहे. अमित शहा असे म्हटल्याचे यात कोठेही लिहिलेले नाही. अमित शहांची खालील वाक्ये पहा. On some states' allegation of step-brotherly treatment amid COVID On this question, the HM said that this charge is nothing but 'plain politics'. "Remdisivir is being manufactured in both Maharashtra and Gujarat. We have given more Remdisivir injections to Maharashtra than Uttar Pradesh. I can understand their (Maharashtra) concern due to high cases but this kind of politics is not right," the BJP leader said. https://www.google.com/amp/s/www.timesnownews.com/amp/india/article/ami… प्राध्यापक डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेल्या बातमीचा दुवा सामनाचे मांंडलिक असलेल्या मटाचा आहे. भाजपविरूद्ध धडधडीत खोटे लिहिणे, भाजपविरोधात असलेल्या शिवसेना व इतर पक्षांची चाटुगिरी हेच मटामधून होत असते. मटा हे वृत्तपत्र नसून विकाऊ प्रकाशन आहे. या बातमीने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.

In reply to by श्रीगुरुजी

मटाच्या बातमीत आपण उल्लेख केलेला संवादही खाली आलेला आहे, पण जो वर उल्लेख केला तो वेगळा प्रश्न आहे, आणि त्याचं त्यांनी वर उत्तरही दिलेलं आहे, त्याबाबत लिहिण्याची गरज नाही. बाकी वृत्तपत्र आणि प्रसिद्बी माध्यमे जी केंद्रसरकारची गुलामी करीत आहेत, त्यात काही नवल नाही. केंद्रसरकारकडून या वाहिन्यांना सरकारचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वेगवेगळे पॅकेजेस असतात त्यामुळे माध्यमे जी दिवस रात्र सरकारच्या नसलेल्या कामाची आणि बढ़ाईची कामे करीत आहेत, जसे निव्वळ बंगालचा प्रचार सध्या वाहिन्यांवरुन सुरु आहे त्याला कारण उद्योगपतीच्या हितांचे धोरण घेणे, तेव्हा उद्योगपतींवर जो निरंकुश असा दबाव असल्यामुळे ते सरकारच्या विरोधात लिहु शकत नाहीत हे मान्यच आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मटाच्या बातमीत आपण उल्लेख केलेला संवादही खाली आलेला आहे, पण जो वर उल्लेख केला तो वेगळा प्रश्न आहे, आणि त्याचं त्यांनी वर उत्तरही दिलेलं आहे, त्याबाबत लिहिण्याची गरज नाही. ही बातमी मटाचे स्वत:चे व्हर्जन आहे. ज्या टाईम्स नाऊने ही मुलाखत घेतली, त्यांच्या बातमीत हा संवाद दिला आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

मटाने स्वत:च अमित शाहंच्या तोंडात ते न बोललेली वाक्ये टाकलीत. सामनाच्या उधार उसनवारीवर जगणाऱ्या भाजपद्वेषी मटाकडून फक्त खोटारडेपणाच अपेक्षित आहे.

काही आयडींचे प्रतिसाद पाहुन वाटतय की, मिपावर " कोण होईल मिपाचा बरळसम्राट" स्पर्धा चालु आहेत. किंवा, तगडा नशा आणणार्‍या पदार्थांचे सेवन करुनच प्रतिसाद लिहावे असा नियम लागु केलाय किंवा कामाच्या अतिरिक्त भाराने संपादक मंडळ झोपा काढतय.

पक्षाचा प्रचार करण्यासाठी bjp ल kiti प्रचंड खर्च करावा लागत असेल .कितीही सरकार चुकीचे निर्णय घेत असेल तरी you tube,fb,web pages aani इतर माध्यमावर सरकार ची बाजू कोणत्या ही प्रसंगात लावून धरण्यासाठी करोडो लोक नेमली असतील त्यांना फिक्स पगार किंवा कमेंट वर दर्जा आणि संख्या बघून कमिशन द्यावे लागत असेल. Bjp ल ha रोज खर्च च हजारो करोड करावा लागत असेल. त्या मुळे किती ही फालतू दर्जा सरकार cha असू ध्या सरकार चे गुणगान हजारो लोक गात च असतात

In reply to by Rajesh188

सहमत आहे. मला एका ट्विट/ फेसबुक पोस्ट/ मिपावरील प्रतिसाद यासाठी दोन रूपये मिळतात आणि दिवसाला माझे उत्पन्न २५ हजार रूपयांपेक्षा जास्त आहे. मी कधीचीच नोकरी सोडून पूर्ण वेळ भाजपचा असा सोशल मिडियावर प्रचार करत असतो. खाली दिलेल्या एस.एम.एस प्रमाणे दिवसाला हजारो एस.एम.एस मला येत असतात. cell

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पर मेसेजचा २ रु. दर म्हणजे तुम्ही दिवसाला साडेबारा हजार पोस्ट सोशल मिडीयावर लिहिता ? आणि एवढा कंटेंट सुचतो कसा तुम्हाला ?

In reply to by प्रसाद_१९८२

मी त्यासाठी १८८ रावांचे प्रतिसाद आधार म्हणून घेतो. ते लिहित आहेत त्याच्या बरोबर उलटे लिहिले की माझे काम झाले. त्यांचे प्रतिसाद खूप मोठे असल्याने माझ्या २०-२५ ट्विट्स तरी त्यांच्या एका प्रतिसादातून निघतात. :)

In reply to by Rajesh188

करोडो लोक नेमली असतील त्यांना फिक्स पगार किंवा कमेंट वर दर्जा आणि संख्या बघून कमिशन द्यावे लागत असेल. करोड़ो म्हणजे निदान २ कोटी तरी हवेत प्रत्येकी ३५० रुपये रोजगार देऊन माणसे ठेवली तर रोजचे ७०० कोटी होतात म्हणजे वर्षाचे २५ हजार कोटी मिपा व्यवस्थापन झोपलंय का? इतके आचरट, अचाट आणि अफाट प्रतिसाद देणाऱ्या वर काहीच कारवाई करत नाही का?

In reply to by Rajesh188

सरकार ची बाजू कोणत्या ही प्रसंगात लावून धरण्यासाठी करोडो लोक नेमली असतील त्यांना फिक्स पगार किंवा कमेंट वर दर्जा आणि संख्या बघून कमिशन द्यावे लागत असेल.
करोडो लोक? म्हणजे किमान दोन कोटी लोक धरले तर भाजप हा जगातील सर्वात मोठी रोजगार निर्माण करणारी कंपनी आहे. https://en.wikipedia.org/wiki/List_of_largest_employers#Largest_private… वर जगातील सर्वात मोठ्या रोजगार देणार्‍या खाजगी/निमसरकारी कंपन्यांची यादी आहे त्यात कळेल की वॉलमार्ट २२ लाख लोकांना रोजगार देते. भाजप त्यापेक्षा जवळपास १० पटींनी मोठी रोजगार देणारी कंपनी असेल. मग लोक उगीच नोकर्‍या नाहीत म्हणून तक्रार का करत असतात काय माहित?