Skip to main content

भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 15/04/2021 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत. जोडीला सावरकरप्रेमींची भाषाशुद्धी आहेच. तर याच्या अगदी उलट हिंदी ही सगळ्या देशाला व्यवस्थित बोलता आलीच पाहिजे, पूर्ण देशाची स्वत:ची अशी एक भाषा हवीच यापासून ते हिंदीला विरोध म्हणजे देशद्रोह समजण्यापर्यंत काही लोक जातात. दक्षिण भारतीय लोक हिंदीला फारसे महत्व देत नसल्याने तिथल्या महानगरांमधे राहणारे लोक विशेषत: उत्तरभारतीय लोक चिडून असतात. नवीन भाषा ती सुद्धा जी पैसे मिळवायला मदत करत नाही ती 'शिकणे' हे अर्थातच त्यांच्यासाठी 'डोकेदुखी' असते. गायपट्ट्यातले बहुतांश लोक पैसे मिळवणे या एकाच दृष्टीकोनातून महाराष्ट्र ,द.भारतातील महानगरे गाठतात. साहजिकच स्थानिक भाषा, संस्कृती याला बाधा आणण्याला कारणीभूत ठरतात. काही स्थानिक नागरीक मानतात की यामुळे दुसर्‍या भाषेतले शब्द आपल्या भाषेत आल्याने आपली भाषा समृद्ध होते. भाषा पाण्यासारखी असते, हिंदीचा द्वेष करु नका वगैरे वगैरे. अशाचप्रकारे RSS, भाजप आणि मोदी समर्थकांमुळे हिंदू धर्मविषयक समूहांतही वाढ झाली आहे,होते आहे. पैसे घेऊन केली जाणारी धर्मांतरे, मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी, जुनी,वापरात नसलेली मंदिरे चर्चमधे रुपांतरीत करणे किंवा चर्चची बाह्यरचना हिंदू मंदिराप्रमाणे करणे, ख्रिश्चन धर्मात नसूनही हिंदू पद्धतीने येशु किंवा मेरीच्या मुर्तीवर उपचार करणे , हिंदू पुजाविधीसदृश्य पद्धतीने येशुची मुर्ती सजवणे हे प्रकार त्यांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहेत. अल्पसंख्यक लोकांची दादागिरी किंवा आक्रमकपणा, विशिष्ट पद्धतीनेच बनवलेला पदार्थ विकत घेईन अशी काही धर्मियांची मागणी किंवा अमुक पदार्थ विशिष्ट धर्मात निषिद्ध असूनही त्याच धर्मातल्या काही लोकांकडून तो खाल्ला जाणे हे काही लोकांच्या दृष्टीने चुकीचे,अस्मिताभंग करणारे,संस्कृतीला हानिकारक मानले जाते. याउलट "संविधानाने आम्हाला हवी ती भाषा बोलण्याचा,हवं ते खाण्याचा अधिकार दिला अाहे,हवा तो धर्म अवलंबण्याचा अधिकार दिला आहे.आमच्यावर दादागिरी करणारे तुम्ही कोण" असा प्रतिरोधही दुसर्‍या बाजूने होत असतो. मातृभाषा, स्वधर्म, मातृभाषेची शुद्धी, भाषेवरील किंवा धर्मावरील आक्रमण,धर्मांतर या अस्मिताविषयक गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता? यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत? का आहेत? तुमच्या धर्मावर,भाषेवर होणारा अन्याय हा तुमच्यासाठी कितपत दखलपात्र आहे? काही लोक भाषा, उपभाषा,बोली, प्रांत, उपप्रांत, धर्म, भौगोलिक विभाग, स्थानिक संस्कृती हे सगळे बाजूला सारुन 'पैसे कमवणे' या एकाच ध्येयाने प्रेरित असतात. 'पैशाने जितके श्रीमंत असाल तितकी तुमची जगात किंमत जास्त.कुठे या मर्यादा घालणार्‍या भाषिक,धार्मिक अस्मितांमधे अडकून वेळ वाया घालवता?' या विचारांचा अवलंब करणारे असतात. ते तुम्हाला योग्य वाटतात का? भाषिक,धार्मिक अस्मितांना तुम्ही किती महत्त्व देता? का देता?

वाचने 33169
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

आम्ही तर "Be romantic while in Rome." असं शिकलो होतो कॉलेजला असताना! ;)

In reply to by चौकस२१२

सुटसुटीत म्हणून भारतीयांनी विजार घालायला सुरवात केली नाही. स्मार्ट म्हणुन केली. सुट्सूटित तर लुंगी अस्ते पण स्मार्ट म्हणुन पोरं घरात ट्रॅक पॅंट घालतात. ज्या दिवशी पिठलं खाणारे लोक स्मार्ट, यशस्वी, जगावर प्रभुत्व गाजवणारे, यशस्वी आंत्रप्रिन्योर, गो गेटर वगैरे वगैरे मानसिकता बनेल त्या दिवशी पिझ्झा डाउनमार्केट फुकाच वाटेल

In reply to by चौकस२१२

ह्यात परकीय संस्कृतीचा कितपत प्रभाव आहे ? काही गोष्टी डाऊन मार्केट समजणे हे परकीय संस्कृतीचा शिवाय सुद्धा होत असतेच की. गावरान भाषा, हाणामारीचे बॉलिवुड सिनेमे, ईं गोष्टी काहींकडून डाऊन मार्केट समजल्या जातात ते काय परकीय संस्कृतीमुळे नसावे. आपल्याला आवडणारे जेवण, कला, साहित्य, कपडे इत्यादी श्रेष्ठ आणि बाकी कनिष्ठ हा भाव परकीय ऑर नो परकीय संस्कृती असतोच. स्वतःला उच्चभ्रू समजण्यासाठी काही तरी मार्ग सापडतच असतो. उदाहरणादाखल _ संदीप खरेला डाऊन मार्केट समजणारी कम्युनिटी आहे. ती काय संदीप खरे सोडा आणि रॉबर्ट ब्राऊन वाचा असं नाही म्हणत. संदीप खरे सोडा आणि अरुण कोलटकर वाचा म्हणते. मी सुद्धा नीट मांडले की नाही माहीत नाही.

In reply to by शा वि कु

म्हनुन डाउन मार्केटसुध्दा नेमके ठरवता येणार नाही... घराणेदार शास्त्रिय संगितवाले उडत्या चालीची गाणी म्हननारी नेहा कक्कर डाउनमार्केट म्हणतील मग भलेही वर्षातील सर्व चार्टबस्टर तिने गायले आसोत... पुणेरी भाषा प्रमाण म्हणत तिला अपमार्केट ठरवणारे भेटतील तर कोणी त्या प्रमाणाला मराठीचा संस्कृतसोबतचा व्याभिचार ठरवेल... थोडक्यात काय तर मार्केट बदलत असते.

ती नसेल तर एकच भाषा बोलणारे लोक एकमेकांशी नीट संवाद साधू शकतात. विदर्भातला माणूस पुण्यात येऊन अजून वंडी आली नाही म्हणाला तर पुणेरी माणसाला तो गाडीबद्दल बोलतोय हे समजणार नाही. यासाठी प्रमाणभाषा गरजेची असते.

ती नसेल तर राज्यसरकार शासकीय कागदपत्रे कोणत्या भाषेत काढणार? मालवणीत शासकीय अध्यादेश काढला तर किती मराठी लोकांना तो समजेल?

ती नसेल तर राज्यसरकार शासकीय कागदपत्रे कोणत्या भाषेत काढणार? मालवणीत शासकीय अध्यादेश काढला तर किती मराठी लोकांना तो समजेल?

In reply to by उपयोजक

मालवणी,कोकणी,राजस्थानी,भोजपुरी,मैथिली,आणि अशा अनेक भाषा ह्या बोली भाषा आहेत त्यांची लिपी नाही त्या लिहल्या जातं नाहीत फक्त बोलल्या जातात तामिळी ही जुनी भाषा आहे असे म्हणतात हिंदी भाषा ही उर्दू भाषेचं पिल्लू आहे. मराठी भाषा हिंदी पेक्षा जुनी आहे. महारष्ट्र मध्ये पाहिले म्हणजे १०० वर्ष पूर्वी मोडी भाषा होती ती मराठीत वाचली जायची की काय हे माहीत नाही. मोडी जर मराठीत वाचली जात असेल तर देवनागरी लिपी महाराष्ट्रात कधी पासून वापरात आली ह्याचा शोध घेतला पाहिजे.

सध्याचा जो महाराष्ट्र आहे त्या भूभागावर कोणती भाषा बोलली जात होती ते कोणी सांगू शकेल का?

टोपे साहेब नाशिकमधे घडलेल्या दुर्घटनेबद्दल हिंदी वाहिन्यांना हिंदीत माहिती सांगत होते. दक्षिणेतल्या चार राज्यांचे मंत्री त्यांच्या राज्यात घडलेल्या अशा मोठ्या घटनांबद्दल हिंदी वाहिन्यांच्या सोयीसाठी हिंदीतून माहिती देतात का? देत नसतील तर महाराष्ट्राचे मंत्री हिंदी वाहिन्यांची आयती सोय का करुन देतात? आपल्याला हिंदीतून सहज बोलता येतं हे आपलं कौशल्य दाखवण्यासाठी ते हिंदीतून बोलतात का? या हिंदी वाहिन्यांना दक्षिण भारतीय मंत्री हिंदीतून बाईट देत नाहीत तेव्हा त्या वाहिन्या काय करतात? जे करतात तेच महाराष्ट्रात का करत नाहीत?

In reply to by उपयोजक

हिंदी बोलण्याची खाज महाराष्ट्रातील बहुसंख्य नेत्यांना आहे. यात सर्वात प्रथम क्रमांकावर आहेत फडणवीस. आपले प्रत्येक वाक्य ते मराठी पाठोपाठ हिंदीतही सांगतात.

In reply to by श्रीगुरुजी

विदर्भात, विशेषतः वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ह्या भागांत, हिंदी सर्रास बोलली जाते... चलो, आते क्या ठेले पे जाएंगे बहुत बढिया क्या बात है बिलकूल सही घरी मराठी आणि बाहेर जास्त करून हिंदी, हे वैदर्भिय लोकांना नविन नाही...

In reply to by मुक्त विहारि

विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही. राज्याचा मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेता या पदावर असताना हिंदीत का बोलतात? वर मखलाशी म्हणजे हिंदी वाहिन्यांसाठी हिंदीत बोलतो असे निर्लज्ज समर्थनही करतात. विदर्भात माडिया किंवा तत्सम भाषासुद्धा बोलली जाते. मग त्या भाषेत हे का बोलत नाहीत? हिंदीभाषिक राज्याचे मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेता मराठी वाहिन्यांसाठी मराठीत बोलतात का? फक्त हिंदी का? इंग्लिश, तामिळ, कन्नड, गुजराती अशा वाहिन्यांसाठी त्या त्या भाषेत का बोलत नाहीत? मुळात फडणवीस व इतर नेते प्रत्येक वाक्य हिंदीत सांगत असतील, तर हिंदी वाहिन्या महाराष्ट्रात एकही मराठी कर्मचारी नोकरीत न घेता सर्व कर्मचारी थेट उत्तर प्रदेश, बिहार वगैरे राज्यातून भरतील कारण कर्मचाऱ्यांना मराठी येण्याची गरजच नाही. उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वगैरे करताना मराठीत बोलतात. हिंदी वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करताना प्रत्येक वाक्याचे हिंदी भाषांतर खालील पट्टीत दिसत राहते. म्हणजे हिंदी वाहिन्यांना हिंदीत सांगण्याची अजिबात गरज नाही. ठाकरेंच्या जागी फडणवीस असते तर फेसबुक लाईव्ह आधी मराठीत व नंतर ते जसेच्या तसे हिंदीत सांगितले असते. कोणत्या राज्यात सर्व निवेदने स्थानिक भाषेच्या बरोबरीने हिंदीत सुद्धा सांगितली जातात?

In reply to by श्रीगुरुजी

कारण, तुमच्या आणि माझ्या मैत्रीत, हा वादाचा मुद्दा आहे आणि तो मी तरी टाळलेलाच बरा .... जून किंवा जुलै महिन्यात, पुण्याला येत आहे... मस्त पैकी बियर पिऊ आणि इतर चर्चा करू...

In reply to by मुक्त विहारि

बाद घालू इच्छित नाही मंजी काय हॉं? १. गाडीभर पुरावे आहेत असे कोण म्हणाले ? २. सकाळी सकाळी शपथविधी कोण उरकला ? ३. कोणाच्या भाच्याला वेळेपूर्वी लस मिळाली ? ह्याची उत्तरे हवी आहेत, नाहीतर गोल गोल राणी.

In reply to by मुक्त विहारि

खरेच कट्टा होणार असेल तर मलाही यायला आवडेल मिपाकरांना भेटणे म्हनजे देव भेटण्याचा अनुभव आस्तो आसे म्हणतात. बसुच एकदा कट्टा करायला. मला मात्र बडवायजर लागते, हार्ड असेल तर मजाच और.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या मता शी सहमत आहे.कोणताच मुख्यमंत्री स्थानिक भाषे व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत स्टेटमेंट देत नाही.

In reply to by Rajesh188

हिंदी भाषिकांची आपण अरेरावी सहन करतो म्हणुन ते अरेरावी करत रहातात. एक जुना प्रसंग आठवतोय, TV वर पाहीलेला. आपले एक मुख्यमंत्री पत्रकारांना नुकत्याच घडलेल्या घटने बद्दल माहीती देते होते. सर्व पत्रकार त्यांच्या भवती कोंडाळे करुन प्रश्न विचारत होते. त्यात एका हिंदी चॅनल ची पत्रकार सतत "हिंदी मे बोलिए , हिंदी मे बोलिए " असे म्हणत होती. ते बघुन अतिशय चीड येत होती. पण मुख्यमंत्र्यांनी न चिडता तिला , "बताता हुँ" म्हणत हिंदीतुन उत्तर दिले. विनंती समजु शकतो पण तिच्या बोलण्यात सरळ सरळ उध्दटपणा होता.

In reply to by मराठी_माणूस

आपलेच मुख्यमंत्री एक नंबर चे भित्रे आणि आणि दिल्ली ची गुलामी करणारे असतात. हिंदी ही राष्ट भाषा आहे असा ह्यांचा गोड गैर समज असतो. राज ठाकरे ना मुख्यमंत्री करा एका पण हिंदी न्यूज चॅनल चे रिपोर्टर त्यांना हिंदीत बोला असे म्हणणार नाहीत .स्वतःच द्विभाषिक व्यक्ती बरोबर घेवून येतील. मान सन्मान पाहिजे असेल तर कणा ताठ असावा लागतो. छ्त्रपती ना औरंगजेब बादशहा नी चुकीच्या रांगेत उभे करून त्यांचा अपमान केला तेव्हा त्यांनी भर दरबारात बादशाह ला सुनावले होते. शत्रू च्या ताब्यात असून सुद्धा. ही आपली परंपरा आहे. पण मुख्यमंत्री मंडळी खुर्ची साठी किती ही झुकतील.

किती जणांना पटते? मराठी भाषेतून अरबी, फार्सी, पोर्तुगीज शब्दांची हकालपट्टी करणे हे जुलमी परकीयांची गुलामगिरी झिडकारुन स्वातंत्र्य मिळवणे आहे का? वैयक्तिक मला तरी ती पटते. आता जरी माझ्या लेखनात जुलमी परकीयांनी लादलेले काही शब्द असले तरी ते माझे मराठी लेखन सर्वांना सहज समजावे म्हणून वापरले आहेत. आपण सर्वांनीच अरबी, फार्सी, पोर्तुगीज शब्द मराठीतून हाकलून लावल्यास मराठी स्वतंत्र होईल. त्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत एकट्यादुकट्याने हे साध्य होणार नाही.

In reply to by उपयोजक

मिपावर कुणीतरी मराठीत प्रचलित झालेले ऊर्दू -अरबी -फारसी -पोर्तुगीज- इंग्रजी वगैरे शब्द आणि त्यांना सावरकरांनी वा अन्य कुणी सुचवलेले संस्कृतोद्भव /मराठी शब्द यांची एक यादी द्यावी त्यात वाचकांनी भर घालावी असे सुचवतो. असा एकादा धागा यापूर्वी मिपावर आलेला असल्यास कृपया त्याचा दुवा द्यावा.

तसेच मशारनिल्हे धाग्यात आता फारसे प्रचलित नसलेले शब्दही द्यावेत जेणेकरून हल्लीच्या पिढीस देखील त्यांचा बोध होईल.