Skip to main content

मातृभाषा

भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 15/04/2021 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत.

बेळगाव आणि कर्नाटक: सध्याच्या घटना

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 20/11/2020 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगाव आणि आजूबाजूचा कर्नाटकात समाविष्ट असलेला सीमाभाग मराठीबहूल असल्याने महाराष्ट्रात समाविष्ट करावा ही मागणी बर्‍याच वर्षांपासून होत अाहे.त्यासाठी वेळोवेळी आंदोलने,मारामार्‍या होत असतात. पण गेल्या काही दिवसातल्या सीमाभागातल्या बातम्या/घडामोडी पाहिल्या तर बेळगाव नि सीमाभाग महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी कर्नाटकने कंबर कसून तयारी केल्याचे दिसत आहे.सीमा आंदोलनातले एक शहर ही बेळगावची अोळख पुसून एक मोठे आणि विकसित शहर बनवून तिथे कन्नडिगांना बहुसंख्येने वसवून सीमाभागात मराठीभाषिकांना अल्पसंख्यक करणे हा उद्देश दिसतो आहे.मुंबईसारख्या मराठीभाषिक महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीबाबत अौदासीन्य असणारा मराठ

घडवणूक शब्दांची!

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 07/06/2018 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्‍या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्‍याच भाषांमधून ही आवक झालेली आहे. काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत. ही आवक अजूनही सुरुच आहे.

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 06/06/2016 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा.