मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ....

मुक्त विहारि · · काथ्याकूट
हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे. 1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही. 2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही. 3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण, A. राष्ट्रवादी युवा नेत्यावर, बलात्काराचा आरोप झाला आणि 21 दिवसाच्या आत, आरोप करणारी युवतीच गायब झाली B. धनंजय मुंडे यांच्यावर, बलात्काराचा आरोप झाला आहे आणि अद्याप तरी ते आहे त्याच पदावर आहेत. 4. आधी पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून, झाडे तोडायला विरोध करायचा आणि नंतर झाडे तोडायची. 5. आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची. इथे सगळेच सुशिक्षित असल्याने, फक्त मुद्देच मांडले आहेत.

वाचने 65762 वाचनखूण प्रतिक्रिया 145

In reply to by मुक्त विहारि

विजुभाऊ Fri, 02/11/2022 - 16:38
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मग बारक्याला कोवीड कसा झाला? ( व्हॉट्सॅपवर आलेले एक ढकलपात्र )

चौथा कोनाडा Tue, 01/19/2021 - 22:28
खरंय ! मुद्दा क्र ३ ए आणि बी तर प्रकरणे हळुहळू कशी मिटवून टाकायची याची उदाहरणे आहेत. पडद्यामागून काय काय मांडवली होत असतील देवच जाणे !

दिगोचि Wed, 01/20/2021 - 05:18
आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची.>>> आता राश्ट्रवादीचे अध्यक्ष शेतकरी आन्दोलनात सहभाग घेणार आहेत. याना लाज कशी वाटत नाही आपण शेतकर्यान्च्या बाजुचे आहोत हे सान्गायला.

Rajesh188 गुरुवार, 01/21/2021 - 08:55
वीज निर्मिती आणि विजेचे वितरण ह्याचा प्रती युनिट खर्च काढला तर आजचे दर योग्य च आहेत . ते अजुन कमी करून महाराष्ट्र ल अंधारात लोटायचे आहे का? वीज बिल कमी करू असली आश्वासन सरकारं नी दिलीच नाही पाहिजेत. हा जे खूपच गरीब आहेत त्यांचे बिल सरकार नी भरावे पण चालू दरा नीच.

In reply to by Rajesh188

बाप्पू गुरुवार, 01/21/2021 - 10:40
राजेश भाऊ.. तुमच्या गुळमुळीत उत्तरावरून तुमची वीजप्रश्नाबाबत बोलायची गोची होणार हे नक्की. त्यामुळे शांत बसा ( नेहमीप्रमाणे ) आपले घरबसे मुख्यमंत्री कोरोना काळात प्रत्येक 10-12 दिवसांनी जे लेक्चर रुपी ज्ञान पाजत होते त्यात त्यांनी कुठेही मध्यमवर्गीय माणसाला आर्थिक दिलासा दिला नाही. पण व्यावसाईक, उद्योगपती यांना त्यांच्या कामगारांना पगार चालू ठेवायला आणि कामावरून न काढायला धमकीवजा आदेश मात्र दिला. घरमालकांनी भाडेकरुंकडून भाडे घेऊ नका असाही फतवा काढला. पण स्वतः काय केले?? घंटा.. उलट जनतेच्या माथ्यावर वाढीव वीजबिले पाठवून त्यांना लुटायचे काम केले. लोकां सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण. हिपोक्रसी. आजही कोरोना काळातील वीजबिल माफी बद्दल सरकार आणि नितीन राऊत एकमेकांकडे बोट दाखवतायेत. माझी इलेक्ट्रिसिटी मलाच शॉक.

In reply to by मुक्त विहारि

साहना गुरुवार, 01/21/2021 - 11:54
अहो विंग्रजी शाळेचे काय घेऊन बसलात ? बोंबे स्कॉटिश मध्ये बरे का ... इथे ह्यांचे गुंड नेते बिचारे कराची स्वीट्स वाल्याला धमकी देतात नाव बदलायला आणि ह्यांची पोरे जातात बोंबे स्कॉटिश मध्ये. मुंबईत कराची चालत नाही (जो अखंड भारताचा भाग आहे) पण बोंबे आणि स्कॉटिश मात्र कसे एकदम सोवळे आहे. हर शाख पे पेंग्विन बैठा है अंजाम ये गुलिस्ता क्या होगा ?

In reply to by साहना

भंकस बाबा Sat, 02/06/2021 - 19:27
पेंग्विन हा शब्द असांसदीय आहे. तुम्ही इथे वापरलाच कसा? उद्या मिपा संपादकावर पोलीस कारवाई झाली तर कोण जबाबदार? त्यापेक्षा बर्फाळ प्रदेशातील एक कुरूप काळ्या पाठीचा ढेरपोट्या पक्षी असा उल्लेख करा

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2021 - 13:12
शिवसेना मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढते, शिवसेना हिंदुत्ववादी आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली, शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला असे अनेक गैरसमज माध्यमे अनेक दशके पसरवित आहेत. या प्रचारात कणभरही तथ्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि गुरुवार, 01/21/2021 - 16:18
खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी पण, ठाम पणे कधीच सांगीतले नाही की, बाबरी मस्जिद, शिवसैनिकांनी पाडली. ह्या बाबतीत, गुळमुळीत धोरण अवलंबले होते.

In reply to by श्रीगुरुजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/21/2021 - 16:42
>>>>शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला...! शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा प्रवास सुरु झाला, त्या युतीवर लोकांचा विश्वास होता, लोक युतीचे फॅन होते. अच्छे दिन आल्या नंतर भाजपाच्या डोक्यात मस्ती आली. शिवसेनेचा सारखा अपमान केला आणि शिवसेनेने हिशेब पूर्ण केला, हे सत्य आहे. >>>>शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली....! बाबरी मशिदीचा ढाच्या पडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्वादी संघटना पुढे आली नव्हती. अशा वेळी प्रखर हिंदुत्ववादी नेते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत औरंगाबाद येथील शिवसेनेचे खासदार मोरेश्‍वर सावे व ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक कारसेवेला गेले होते. त्यांनी कारसेवेत सहभाग घेत हा ढाचा पाडला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, मोरेश्‍वर सावे,सतीश प्रधान यांना आरोपी करण्यात आले होते. पुढे थेट पुरावे न मिळाल्यामुळे ते निर्दोष सुटले तो भाग वेगळा. -दिलीप बिरुटे

In reply to by मुक्त विहारि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/21/2021 - 17:34
बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ज्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एक म्हणजे संतोष दुबे, यांच्याशी संपर्क करून आपण माहिती घेतली तर आपण सर्वांना माहिती होईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2021 - 17:55
संतोष दुबे हे विश्व हिंदू परीषदेशी संबंधित "हिंदू धर्म सेना" या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. https://www.google.com/amp/s/www.deccanherald.com/amp/national/invite-all-babri-mosque-demolition-accused-to-ram-temple-bhumi-pujan-hindutva-outfit-chief-864611.html हे संतोष दुबेचे मनोगत. Santosh Dubey, the youngest karsevak named in the Central Bureau of Investigation’s (CBI) chargesheet said, “We had gathered there on the instructions of L.K. Advani, M.M. Joshi, Uma Bharti and other Vishwa Hindu Parishad (VHP) and Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) leaders who told us that we have to erase the “sign of slavery” of 500 years. They told us that we have to demolish the Babri Masjid and we successfully did that”. Dubey, while talking to The Wire, gave details of how the plan was chalked out by senior BJP and VHP leaders. Dubey said that on December 3, 1992, the then revenue minister of Uttar Pradesh’s Kalyan Singh government, Brahm Dutt Dwivedi, came to his Faizabad residence and told him that Advani wants to meet him. “He took me to Hanuman Bagh temple in Ayodhya where a meeting of senior BJP and VHP leaders was in progress,” Dubey said. “I reached there along with karsevaks Pravin Sharma and Vijay Tiwari. We were introduced to Advani who addressed us in a challenging tone: ‘The Babri mosque is the greatest hurdle in the way of the construction of Ram temple. I need about 300 youths who are ready to sacrifice their lives for Ram and I don’t want this Babri structure to remain after December 6. You will get whatever you want to raze the mosque; we have our government in the state’,” Dubey narrated. “On Advani’s instruction, tools like hammers, gainti (pickaxe), belcha (shovel), pointed iron rods, ropes, drilling machines and some light explosives were arranged and handed over to us,” he added. यात कोठेही शिवसेनेचा उल्लेख नाही. https://www.google.com/amp/s/m.thewire.in/article/communalism/advani-told-us-i-dont-want-babri-structure-remain-december-6/amp

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु गुरुवार, 01/21/2021 - 17:36
शिवसेनेचा सारखा अपमान केला
त्याआधी माननीय बाळासाहेबही जाहीरपणे भाजपला आमची कमळाबाई असे म्हणुन हिणवत असत.!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2021 - 17:40
शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा प्रवास सुरु झाला, १९६६ मध्ये स्थापना झाल्यापासून १९९० मध्ये भाजपने युती करेपर्यंत सेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता (१९८५ मध्ये छगन भुजबळ). १९७२ मध्ये ०, १९७८ मध्ये ३५ जागा लढवून ०, १९८० मध्ये राज्यात व देशात प्रचंड लाट असलेल्या इंदिरा कॉंग्रेसबरोबर युती करूनही ०, १९८५ मध्ये १ अशी सेनेची स्थिती होती. मुंबईतील मराठीबहुल काही प्रभागांच्या बाहेर सेनेला ओळख नव्हती. १९८९ पर्यंत शिवसेना हा मुंबई महापालिका पातळीचा गट होता. १९८४ व १९८९ मध्ये सेनेचे काही नेते लोकसभा निवडणुक लढले ते सुद्धा भाजपच्या कमळ चिन्हावर कारण सेनेचे चिन्ह बहुसंख्य जनतेला माहितीच नव्हते. याउलट पूर्वाश्रमीचा जनसंघ व १९८० मध्ये स्थापन झालेला भाजप यांना पूर्वीपासूनच बऱ्यापैकी जनाधार होता. जनसंघाचे १९६७ मध्ये ४ व १९७२ मध्ये ५ आमदार होते. १९७९ मध्ये एकत्रित जनता पक्षाचे १०० आमदार होते. १९८० मध्ये १४ व १९८५ मध्ये १६ आमदार होते. मुख्य म्हणजे सुरूवातीपासूनच हे आमदार कोकण, मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व भागातून निवडून येत होते. मुंंबईबाहेर कोणीही ओळखत नसलेल्या व २४ वर्षात केवळ १ आमदार निवडून आलेल्या पक्षाचे बोट धरून सेनेपेक्षा बराच मोठा असलेल्या व प्रत्येक निवडणुकीत आपले थोडेफार आमदार निवडून आणणाऱ्या भाजपचा महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला, हा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. बाबरी मशिदीचा ढाच्या पडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्वादी संघटना पुढे आली नव्हती. अशा वेळी प्रखर हिंदुत्ववादी नेते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत औरंगाबाद येथील शिवसेनेचे खासदार मोरेश्‍वर सावे व ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक कारसेवेला गेले होते. त्यांनी कारसेवेत सहभाग घेत हा ढाचा पाडला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, मोरेश्‍वर सावे,सतीश प्रधान यांना आरोपी करण्यात आले होते. मी भ्रष्टाचार केला असेल तर मला तुरुंगात टाका, असे सांगणारा आपण भ्रष्टाचार केल्याचे नाकारत असतो. मी व्यवस्थित अभ्यास केला असता तर मी उत्तीर्ण झालो असतो, असे सांगणारा विद्यार्थी आपण अभ्यास केला नव्हता हेच मान्य करीत असतो. जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटेल, या वाक्याचा अर्थ या पाडापाडीत शिवसैनिक नव्हते याची मान्यता आहे. कारसेवेत उपस्थित असणाऱ्यांंमध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, उमा भारती, अशोक सिंघल, साध्वी ऋतांबरा इ. नेते होते. तेथे सेनेचा एकही नेता नव्हता. त्या काळात सेनेचे सर्व नेते व कार्यकर्ते महाराष्ट्राबाहेर गेलेच नव्हते. मुळात १९८९ मधील अडवाणींंची रथयात्रा, १९९० मधील कारसेवा, १९९२ मधील पाडापाडी व त्या ३-४ वर्षात चाललेले आंदोलन यात फक्त विश्व हिंदू परीषद, भाजप, संघ व बजरंग दलाचाच समावेश होता. या काळात अडवाणी, सिंघल, वाजपेयी अशा काही जणांना काही काळ अटक झाली होती. त्या संपूर्ण आंदोलनात सेनेचा सहभाग अत्यल्प किंवा शून्य होता. सेनेचा एकही नेता अटकेत नव्हता. नंतर ठाकरेंवर केस झाली ती बाबरी पाडल्यानंतर सामनातून लिहिलेल्या भडक अग्रलेखांंमुळे व नंतर झालेल्या दंगलीसंदर्भात.

In reply to by श्रीगुरुजी

Rajesh188 गुरुवार, 01/21/2021 - 21:02
तेव्हा bjp चे सर्व कार्यकर्ते शेपूट घालून लपून बसले होते हे जनते नी बघितले आहे रस्त्यावर प्रतिकार करण्यासाठी फक्त शिवसैनिक च होते. Bjp चे नेते ,कार्यकर्ते सर्व गायब होते. कोणत्याही सामान्य लोकांस विचारलं तर तो हेच सांगेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

बाप्पू गुरुवार, 01/21/2021 - 22:03
हो यात तथ्य आहे. पण त्याच बरोबर VHP आणि बजरंग दल चे कार्यकर्ते देखील होते. पण हो.. शिवसैनिक होते म्हणून मुंबईत हिंदूंचे शिरकाण झाले नाही.. ही हे खरे आहे.

In reply to by Rajesh188

श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2021 - 22:07
१९८९ पासून ६ डिसेंबर १९९२ पर्यंत चाललेल्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनेचा सहभाग अत्यल्प किंवा शून्य होता.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेनेचे खासदार मोरेश्वर आणि सतीश प्रधान हे प्रत्यक्ष सहभागी असल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर त्या प्रकरणात ते सहआरोपी होते आणि त्या प्रकरणातच निर्दोष सुटले. आता शिवसेनेचं कर्तुत्वच या महाराष्ट्रात मान्य करायचं नसेल तर विषय संपला. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Fri, 01/22/2021 - 00:24
शिवसेनेचे त्या काळातील प्रमुख नेते होते बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, नवलकर, राणे, वामनराव महाडिक, भुजबळ (डिसेंबर १९९१ पर्यंत), रावते इ. त्या काळात यापैकी कोणीही मुंबईबाहेर पाऊल ठेवले नव्हते. ६ डिसेंबर या दिवशी यापैकी कोणी अयोध्येत असते तर माध्यमांनी त्यांना टिपले असते कारण संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सुरू होते. परंतु तिथे एकाही माध्यमसंस्थेला सेनेचा एकही माणूस दिसला नव्हता. बाळ ठाकरे व इतरांवर नंतर तक्रार दाखल झाली ती सामनातील प्रक्षोभक अग्रलेख, नंतर झालेल्या दंगली (ज्यात सेनेच्या मधुकर सरपोतदारांचेही नाव होते), सावेंच्या घरी सापडलेले श्रीरामजन्मभूमी मंदिराचे चित्र असलेली दिनदर्शिका व काही प्रक्षोभक छापील साहित्य अशा काही गोष्टींमुळे. १९८९ पासून ६ डिसेंबर १९९२ पर्यंत झालेल्या या आंदोलनात सेनेचा सहभाग अत्यल्प किंवा शून्य होता. त्यामुळेच जर-तर शब्द वापरून बाळ ठाकरेंनी आंदोलनात शिवसेनेचा नसलेला सहभाग अप्रत्यक्षपणे मान्य केला होता.

In reply to by श्रीगुरुजी

कोण आरोपी होते आणि कोण निर्दोष सुटले. शिवसेनेचे खा.मोरेश्वर सावे आणि सतीश प्रधान यांची नावे आहेत. बातमी दुवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Fri, 01/22/2021 - 08:19
हे नेते त्या काळात अयोध्येत नव्हतेच. अयोध्येत पाऊल ठेवणारे पहिले ठाकरे वंशज म्हणजे उद्धव ठाकरे, जे ऑक्टोबर २०१९ मध्ये अयोध्येत गेले होते. प्रक्षोभक भाषणे व लेखन, दुसऱ्या धर्माचा अवमान होईल अशी वक्तव्ये, दंगलीला चिथावणी असे त्यांच्यावरील आरोप होते.

Rajesh188 गुरुवार, 01/21/2021 - 12:18
मी 7/12 उत्तर प्रदेश हे ॲप डाऊनलोड केले. आणि की आश्चर्य त्या ऍप वर फक्त हिंदी ही एकमेव भाषा होती .दुसऱ्या भाषेचा पर्याय च नाही. ह्या वर कहर म्हणजे की बोर्ड हा फक्त आणि देवनागरी मध्ये इंग्लिश हिंदी हा पण पर्याय नाही. महाराष्ट्र 7/12 ऍप साठी इंग्लिश मराठी अशा दोन भाषा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र काहीच मातृभाषेचा आग्रह धरत नाही बाकी राज्यांची ग्राउंड रिॲलिटी बघितली भाषे विषयी तर दिवसा चांदणे दिसतील. त्या संधी साधू bjp ल सत्ता नाही मिळाली इथे म्हणून एवढे पण सैरभैर होवू नका की आपल्याच लोकांवर अत्यंत नीच शब्दांचा वापर करून टीका करायची इच्छा होईल.

Rajesh188 गुरुवार, 01/21/2021 - 12:33
सेने नी डावपेच खेळून BJP ल सत्तेबाहेर केल्यामुळे bjp समर्थक depression मध्ये गेले आहेत . सेनेची झुंडशाही ह्यांना आताच दिसायला लागली अगोदर दिसत नव्हती. राजकारणात असे सत्तेचे खेळ सर्रास होतात BJP ni असे खेळ खेळून मित्र पक्षांना दगा दिलेला आहे. म्हणून कोणी depression गेले नाही. देव ह्यांना लवकर नैराश्यातून बाहेर काढेल हीच आशा आहे.

In reply to by Rajesh188

सॅगी गुरुवार, 01/21/2021 - 13:55
चिवसेनेने चोरलेल्या सत्तेच्या जीवावर जेवढ्या उड्या मारुन घ्यायच्या आहेत तेवढ्या मारुन घ्याव्यात. नंतर त्यांचे मतदारच त्यांच्या हातात केळी देतील. बाकी युतीत असतानाही आपल्याच सरकारविरोधात मुखपत्रातुन बोंबा मारायच्या आणि तरीही सत्तेला मुंगळ्यासारखे चिकटून बसायचे असे दुतोंडी कार्यक्रम केवळ चिवसेनाच राबवु शकते.

In reply to by प्रसाद_१९८२

श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2021 - 20:22
यात कसला लाचारपणा? शिवसेना हिंदुत्ववादी कधीच नव्हती. भगवी फफनी परीधान करून हिंदुत्ववादी होता येत असते तर कायम भगव्या कफनीत वावरणारे स्वामी अग्निवेश सुद्धा हिंदुत्ववादी असते. शिवसेना हा सप्तरंगी पक्ष आहे. मुस्लिम लीग, प्रजा समाजवादी, भाजप, शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन अशा सर्व पक्षांशी सेनेने भूतकाळात युती केली होती.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/21/2021 - 21:01
मात्र मला कळायला लागल्यापासून "ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक" अशी सामनाची टॅग लाईन वाचून माझी समजूत झाली होती की शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष होता\आहे म्हणून.

In reply to by प्रसाद_१९८२

बाप्पू गुरुवार, 01/21/2021 - 22:00
आत्ताची शिवसेना आणि ठाकरे म्हणजे बाटलेले हिंदुत्व.. वरून भजन आतून लावणी. टिपू सुलतान चे फॅड जास्तच वाढवले जातेय. इतिहास n वाचता माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बरेच जण व्हाट्सअँप ला टिपू चे स्टेटस सेकुलर आणि सच्चा भारतीय म्हणून ठेवू लागलेत. एकदा जन्मदाता बाप बदलला आणि धोतर सोडून सलवार चढवली. पण आजही बाप बदलण्यात ही लोकं पटाईत आहेत. कधी औरंगजेब, कधी खिलजी, कधी मोहम्मद बिन कासीम आणि आता टिपू.. कधी अरबी होतात, कधी मंगोल आणि कधी तुर्की.. आणि फार कमी वेळेला भारतीय असतात.

Rajesh188 गुरुवार, 01/21/2021 - 19:26
सेने ल त्यांच्या कर्माची फळ मिळतील त्यांचं चूक वाटलं तर पुढल्या वेळी निवडणुकीत सडकून मार खातील. Bjp वाले स्वतःला का त्रास करून घेत आहेत ते समजत नाही. युती होणे युती तुटणे हा नेहमी चालणारा खेळ आहे भारतीय राजकारणात. सेने नी युती तोडली (की तोडण्यास त्यांना मजबूर केले) म्हणजे काही तरी वेगळे केले जे देशात कधी घडलच नव्हत अशा प्रतिक्रिया येत आहेत. वाजपेयी नी किती तरी पक्षांना घेवून सरकार चालवले पण त्यांच्या नेतृत्वाची उंची आताच्या bjp च्या नेत्या मध्ये नाही.

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत गुरुवार, 01/21/2021 - 23:32
यात नविन काही नाही, आधी विरोधकांना वाजपेयी नव्हते आवडत, पण मग अडवाणींचे नाव पुढे आल्यावर वाजपेयी गोड झाले. मोदींचे नाव पुढे आल्यावर अडवाणी बरे वाटायला लागले. उद्या मोदींनंतर योगी, शहा, नड्डा अथवा ईतर कोणी भाजप नेते पंतप्रधान झाले की तुम्हाला वाजपेयी ऐवजी मोदी उंच वाटायला लागतील.

In reply to by Rajesh188

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/21/2021 - 23:45
योग्य बोललास रे राजेशा. मजा वाटतेय ती स्वयंघोषित पुरोगामी पत्रकारांची. गेले अनेक वर्षे सेनेचा उल्लेख 'कम्युनल पार्टी' असा व्हायचा. आता तो उल्लेख होत नाही. आमचा माहिमचा निखिल वागळे तर शिवसेनेवर तुटुन पडायचा. "माझी विचार्सरणी फुले-शाहू-आंबेडकरांची तर शिवसेना जातियवादी आहे" असे नेहमी म्हणायचा. 'उद्धव बावळट व कोत्या मनाचे आहेत' म्हणणार्या निखिलला आता उद्धव ठाकरेंमधील 'समंजस नेतृत्व' दिसू लागले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Rajesh188 गुरुवार, 01/21/2021 - 23:59
वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान होते पण त्यांच्या विषयी लोकांची मत कडवट कधीच नव्हती. ना विरोधी पक्षांनी पातळी ओलांडून त्यांच्या वर टीका केली. मोदी विषयी लोकांची मत कडवट आहेत आणि विरोधी पक्ष पण त्यांच्यावर कठोर टीका करत आहे. हा फरक दिसत नसेल तर देव च भले करो

In reply to by Rajesh188

श्रीगुरुजी Fri, 01/22/2021 - 00:05
मोदींविषयी फक्त पप्पू, राऊत, मणिशंकर अशाच नगण्य लोकांची मते कडवी आहेत व तेच अहोरात्र टीका करीत असतात. मोदी अशांना कणभरही महत्त्व देत नाहीत व जनताही अशांना थारा देत नाही. आजच्या इंडिया टुडेच्या सर्वेक्षणातून है पुन्हा एकदा दिसून आलंय.

In reply to by प्रसाद_१९८२

यश राज Fri, 01/22/2021 - 12:31
मला तर अख्खे मंत्रिमंडळ तर्र वाटते.. कोण काय बोलतो याचा काही पायपोसच नसतो...

मदनबाण Fri, 01/22/2021 - 13:56
1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही. मात्र स्वतःच्या बंगल्यांवर करोडो रुपये खर्च केले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exercise

शशिकांत ओक Fri, 01/22/2021 - 19:03
शिवसेना विषयच असा आहे की अनेक मतवादी मुक्त होऊन विहार करत तुटून पडतात... ढिंग टांग वर हाय बॅब्ज वाले दादू , विक्रमादित्य, बंधू सदु, नाना यांनी एकमेकांना दाखवलेले आरसे वाचून, भाऊ तोरसेकरांचे शाब्दिक शरसंधान ऐकून दिवस बरे जातात आजकाल... सर्वात जास्त दिवस कोण मोजत होते की २० जानेवारी कधी येणार तर ती होती मेलि ना...! कमल हॅरिस ला कमलादेवी म्हणून नामकरण करण्यात आलेले वाचून मजा वाटली.

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Sat, 02/06/2021 - 14:03
भाजपने आपल्याबरोबर युती करावी यासाठी शिवसेनेने भाजपला चांदीच्या वाटीत अक्षता घेऊन आमंत्रण दिले होते का? युतीसाठी कोण कासावीस झाले होते? आज शिवसेना जितकी घाणेरडी आहे तितकीच घाणेरडी जन्मापासून आहे. मग आताच शिवसेनेची घाण का नकोशी झाली?

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 17:07
खासदारकीच्या वेळी तरी नक्कीच .... आमच्या डोंबोलीत तरी, शिवसेनेचा उमेदवार, खासदारकीला उभा होता.. तेंव्हा, मोदींच्या नावावर मते मागीतली...

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Sat, 02/06/2021 - 20:14
महाराष्ट्रात भाजपाचा सखाराम बाईंडर झाला आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी चंपाला आसरा द्यायचा परंतू सन्मानाची वागणूक द्यायची नाही , परंतू तीने व्यभिचार केला तर आकाशपाताळ एक करायचे. ढोंगी कुठले.

Rajesh188 Sat, 02/06/2021 - 17:51
युती होती म्हणजे संगनमताने कोणता चेहरा पुढे करायचा हे ठरले असणार. दोन्ही पक्षांचा वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रचार करण्या पेक्षा समान मुद्द्यावर प्रचार केला जाणार . आणि मोदी चे नाव वापरण्यास तेव्हा BJP ची हरकत नव्हती . जिथे आवश्यकता वाटली असेल तिथे बाळासाहेब चे नाव bjp ni पण वापरले असेल.

In reply to by Rajesh188

मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 18:39
शिवसेना फक्त वेळ काढू धोरण अवलंबीत होते .. लोकसभा निवडणूकीत, मोदींच्या नावे मते मागीतली ... खरं तर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ ह्या भागात, भाजपचा उमेदवार येण्याची शक्यता असते... पण, लोकसभेच्या वेळी, ही जागा, शिवसेनेला दिली... आमदारकीच्या वेळी देखील, असेच झाले ... कल्याण-डोंबिवली भागात, भाजपला सीट मिळाली. ऐनवेळी, शिवसेनेची मते फुटली आणि ती मते मनसेला मिळाली... इतके असूनही, भाजपचा उमेदवार निवडून आला... शिवसेनेने फक्त भाजपचाच घात केला नाही तर, हिंदूत्वाच्या तत्वाला देखील तिलांजली दिली ... आता डोंबिवली आणि कल्याण येथील, हिंदू हितवादी, शिवसेने बरोबर नाहीत... मनसेचे उमेदवार, भाजप बरोबर आले आहेत... शिवसेनेने, हिंदू हितवादी समाजाच्या तोंडाला पाने पुसली...

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Sat, 02/06/2021 - 20:25
अजिबात गरज नसताना शिवसेनेच्या गळ्यात पडून शिवसेनेच्या अटी मान्य करून युती करून भाजपने काय मिळविले? विनाकारण स्वतः कमी जागा लढवून शिवसेनेला ताकदीपेक्षा खूप जास्त जागा देऊन शिवसेनेच्या जास्त जागा निवडून आणायला मदत करण्याची गरज होती का? मग आता तक्रार का?

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 23:02
हा प्रश्र्न एक किंवा दोन व्यक्तींपुरता नाही .... शिवसेनेने माझ्या सारख्य काही हिंदू हितवादी लोकांना पण धोका दिला आहे ... सत्ता काय, आज आहे तर उद्या नाही, पण विश्र्वास, एकदा गेला की गेलाच... संजय दत्तला माफी देऊन, बाळासाहेब यांच्या वरचा, माझा विश्र्वास उडाला होताच की .... पण आज सत्तेसाठी, शिवसेनेने संपूर्ण हिंदू समाजाचा वेठीस धरले आहे...

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Sat, 02/06/2021 - 23:42
शिवसेना हा पक्ष कधीच हिंदुत्ववादी नव्हता/नाही/नसेल. तस्मात् या पक्षाने हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांना कधीही धोका दिलेला नाही किंवा हिदू समाजास वेठीसही धरलेले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 08:10
पण, शिवसेना अद्यापही, स्वतःला हिंदूत्ववादीच समजते... आजच्या लोकसत्तेत पण, अशीच भलामण केली आहे... म्हणायला हिंदूत्ववादी आणि भरवायची अजान स्पर्धा...

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 08:32
अयोध्येतील बाबरी मशीद आम्हीच हातोडे मारून उद्धस्त केली (ते सुद्धा मुंबईच्या बाहेर पाऊल न ठेवता), शिवसेना फक्त मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी लढते (ते सुद्धा मुंबई महापालिकेची कंत्राटे, विधानपरीषद व राज्यसभेतील आमदारकी खासदारकी उत्तर भारतीयांना देऊन), आमच्यामुळेच महाराष्ट्रात भाजप वाढला (ते सुद्धा यांना मुंबई महापालिकेच्या काही प्रभागांच्या बाहेर कोठेही अस्तित्व नसताना आणि भाजपचे महाराष्ट्राच्या सर्व भागात थोडेफार आमदार निवडून येत असताना आणि स्वत:चे लोकसभा उमेदवार भाजपच्या निवडणुक चिन्हावर निवडणुक लढत असताना) . . . असे सुद्धा हास्यास्पद दावे अजूनही शिवसेना करीत आहे. मग आम्ही हिंदुत्ववादी आहोत (ते सुद्धा मुस्लिम लीग, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अशा मुस्लिमधार्जिण्या पक्षांशी युती करून) या शिवसेनेच्या समजुतीवर कसा विश्वास बसतो?

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 11:46
माझा पण बसला होता ... दादा कोंडके, असतांना... पण, नंतर, संजय दत्तला माफी दिली आणि विश्र्वास उडाला...

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 14:20
बघा, हिंदूंच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या तुमच्या हिंदुत्ववादी पक्षानेच पुन्हा एकदा एका हिंदुलाच मरेस्तोवर बदडले. https://m.lokmat.com/crime/elderly-citizen-beaten-shiv-sainiks-front-police-video-goes-viral-social-media-a629/

मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 08:06
https://www.loksatta.com/maharashtra-news/pm-narendra-modi-shivsena-sanjay-raut-judiciary-saamna-editorial-arnab-goswami-bmh-90-2396236/ कायदा हातात घेऊन, निवृत्त नौसैनिकाला मारहाण करणार्या कार्यकर्त्यांचे नेते, कायद्या बाबतीत बोलत आहेत .... जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते.

मुक्त विहारि Sun, 02/28/2021 - 09:10
https://www.loksatta.com/mumbai-news/chief-minister-uddhav-thackeray-giving-best-wishes-for-marathi-language-pride-day-akp-94-2410200/ "जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा" आणि "केम छो वरली", हे बोर्ड, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच, मुंबईत लावले होते.

मुक्त विहारि Mon, 03/01/2021 - 08:35
नंतर म्हणाले, तुमच्या कुटुंबाची काळजी ही तुमचीच जबाबदारी आता म्हणतात ..... तुम्हीच जबाबदार .... आलं अंगावर तर ढकलपंची करा .... https://www.loksatta.com/pune-news/in-pune-774-new-corona-patients-were-added-during-the-day-msr-87-svk-88-kjp-91-2410499/ आता हे पण, सामान्य माणसावर ढकला....बियर बार, हाॅटेल, मंदिरे, बागा, सिनेमा आणि नाट्य गृहे, उघडली की हे होणारच होते...

Rajesh188 Mon, 03/01/2021 - 12:58
महाराष्ट्र सरकार अतिशय उत्तम काम करत आहे. किती ही त्रास होत असला तरी bjp ला परत महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही.

Rajesh188 गुरुवार, 03/04/2021 - 22:32
मतदार च्या नालायक पना मुळे सर्वच पक्षात बलात्कारी,गुंड,लबाड लोक जन प्रतिनिधी आहेत. भारता मध्ये सर्वच पक्षात नालायक लोक खूप आहेत. त्या मध्ये bjp pan आहे.

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा Mon, 04/05/2021 - 13:12
कल्याण, कल्याण ... आपणा सर्वांचं कल्याण हाच त्यांचा उदात्त हेतू आहे !

चौथा कोनाडा Mon, 04/05/2021 - 13:16
कायप्पावर नुकतंच आलेलं मीम: मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे: पाणी नळातून येते. नळाला पाणी येते. येते पाणी नळाला. नळामुळे पाणी येते. पाण्यामुळे नळ आहेत. :-)

In reply to by Rajesh188

आम्हाला १५ लाख मिळाले आहेत. कलम ३७० हटविले. भारतीयांचा आदर्श प्रातःस्मरणीय राजा राम यांचं मंदिर आयोध्येत होत आहे, पाकिस्तानची नांगी ठेचली, चीनच्या डोळ्यात डोळे घालून हाकलून लावले. सरकारी मालमत्ता नुसत्या पडून होत्या, त्या विकल्या, सार्वजनिक संपत्तीची विल्हेवाट लावली, आता काय राहीलं आहे, त्याचं तपास करुन, त्याचा बंदोबस्त करण्यात येईल. असे, अनेक देशोपयोगी निर्णय घेतलेले असल्यामुळे आम्हाला १५ लाख काय, ज्याची किंमतच होऊ शकत नाही, अशी आयुष्यभराची रक्कम मिळाली आहे. (आता बोला) ;) -दिलीप बिरुटे (रामभक्त)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ Fri, 04/09/2021 - 14:34
कलम ३७० हटविले. मग चांगलंच केलं कि ... जमू आणि लडाख ना भारतबरोबर हवाय फक्त मुस्लिम बहुल आशय काश्मीर खोर्यालाच स्वतत्र किंवा भारतापासून दूरचे डोहाळे .. तुमच्या का पोटात दुखतंय.. एवढे वर्ष प्रिय काँग्रेस ला रक्षी बहुमत असून सुद्धा हिंमत झाली नाही राजा राम यांचं मंदिर आयोध्येत होत आहे, धर्मिक नसलेल्याला माझ्यसारख्याला पण हे केवळ प्रतीकात्मक बहुसंख्यनकाचा हक्क म्हणून झाले ते चांगलेच झाले असा वाटतंय..तुमच्या का पोटात दुखतंय. ( माझा जाऊद्या आपण तर आंधळे भक्त ! गेला बाजार जा रिझवान अहमद यांचे विडिओ बघा.. जरा डोळे उघडतील ) सरकारी मालमत्ता नुसत्या पडून होत्या, त्या विकल्या, --- सगळंच विकू नये हे मान्य ... कुठेतरी सीमा असावी.. पण ते करण्याची हिंमत दाखवली कि लगेच "भांडवली चोर" आणि नेहमीचीही फेकाफेकी "अडाणी अंबानी चाय घशात ..) आता काय राहीलं आहे, त्याचं तपास करुन,: आहे ना . खरा सर्वधर्म संभव.. समान नागरी कायदा ..

In reply to by चौकस२१२

आवरा काका. आमच्या पोटात दुखले तरी आम्ही आमचं पाहून घेऊ. फार तान घेऊ नका. काड़ीने मलम लावू नका. वाढदिवसाच्या शुभेच्छा....! बाकी, फेकाफेकी, भांडवलदारांच्या हातचे बाहुले वगैरे जागतिक लेवलवर वाढत्या दाढी सारखेच वाढत आहोत...! :) -दिलीप बिरुटे

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा Fri, 04/09/2021 - 13:03
दोन महिन्यापुर्वी मी आणी सौ दोघांनी मिळून पुणे-सोलापुर महामार्गावर शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिचे निधन झाल्यामुळे सर्व हॉटेल्स बंद होती, फक्त स्थानिक नेत्याचे "शिवभोजन थाळी" वाले हॉटेल चालू होते. कोरोना परिस्थितीमुळे भोजन मोफत मिळाले. भोजनाचा दर्जा उत्तम होता !

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा Fri, 04/09/2021 - 17:06
हो, ही देखील मी चाखलेली आहे, राबवणारे लोक प्रमाणिक असतील अश्या योजनांनी जनतेची खुप मोठी सोय होते. सध्या राबवत असलेल्या शासिकिय (विनाशुल्क) लसीचा देखील अतिशय उत्तम अनुभव आहे !

In reply to by चौथा कोनाडा

मुक्त विहारि Fri, 04/09/2021 - 18:27
तामिळनाडू येथील "अम्मा कॅन्टिन" हे एक उदाहरण... पण आपल्याकडे ही योजना चालली नाही... लोकसत्तेत आलेली जुनी कात्रणे, शोधावी लागतील..

मुक्त विहारि Fri, 04/09/2021 - 06:36
https://www.loksatta.com/mumbai-news/warn-to-corona-politicians-cm-uddhav-thackeray-abn-97-2440161/ इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच कृत्रिम श्वसनयंत्रे (व्हेंटिलेटर्स) उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांना केली. नेहमी प्रमाणेच, आलं अंगावर तर ढकल केंद्रावर....

In reply to by मुक्त विहारि

सुक्या Fri, 04/09/2021 - 07:13
आहो ... इतकेच काय .. बंद पड्लेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करायला पण केंद्राने माणसे दिली पाहिजे असे म्हणत आहेत .. आता बोला ... इतक्या पुढारलेल्या राज्यात व्हेंटिलेटर्स दुरुस्त करणारे कारागीर नाहीत ..

सुखीमाणूस Fri, 04/09/2021 - 12:03
लोकसन्ख्येची घनता दखविणारा तक्ता पहाता महाराष्ट्रावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. https://en.wikipedia.org/wiki/List_of_states_and_union_territories_of_India_by_population राज्य स्तरावर लोकसन्ख्येची घनता जास्त आहे दिल्लीची. म्हणजे तिथे कोरोना पसरण्याची शक्यता जास्त आहे. तिथे शहरी लोक्सन्ख्येचा भाग देखिल ९७.५ टक्के आहे. महाराष्ट्राचा शहरी लोकसन्खेचा भाग ४५.२२,गुजरातचा ४२.६, उत्तर प्रदेशचा २२.२७ केन्द्र सरकार असा डाटा वापरुन लसीन्चे वितरण करत असावे अशी अपेक्शा आहे. आता तर लसी उप्लब्ध नाही असे म्हणत आहेत..

मुक्त विहारि Fri, 04/09/2021 - 12:19
.....आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’... https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/pune-coroanavirus-situation-get-worsened-jumbo-covid-centre-get-housfull-in-12-days-434042.html/amp आता ही पण केंद्राचीच "जबाबदारी", असे म्हणण्याची शक्यता आहे...

Rajesh188 Fri, 04/09/2021 - 15:09
माझ्या ओळखीचे bkc covid सेंटर मध्ये होते उत्तम सुविधा रुग्ण ना दिली जात आहे. सीबीसी,ecg,x ray पासून सर्व आवशक्या चाचण्या वेळेवर आणि मोफत केल्या जात आहेत. औषध वेळेवर मिळत आहेत. बाथरूम पासून जेवण पर्यंत सर्व सुविधा उत्तम आहेत.. एकंदरीत राज्य सरकार त्यांची जबाबदारी पार पाडत आहे. रुग्ण प्रचंड वाढल्या मुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला असेल नाकारता येत नाही पण चांगल्या कामाचे कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा माणसाकडे असावा. अगदी शत्रू जरी चांगले काम करत असेल तरी त्याचे कौतुक करावे.

In reply to by Rajesh188

मुक्त विहारि Fri, 04/09/2021 - 15:39
नक्कीच ... आपण, ह्या राज्य सरकारने केलेल्या, चांगल्या कामाचा धागा काढा की.... बाय द वे, 1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

बबन ताम्बे Fri, 04/09/2021 - 22:19
राज्य सरकार म्हणतेय लसी पुरेशा नाहीत. आज म टा मध्ये काही ठिकाणी लसी संपल्या म्हणून लसीकरण बंद केले अशा बातम्या आल्यात. केंद्र सरकार आणि राज्यातील बीजेपीचे नेते म्हणत आहेत लसी पुरवठा महाराष्ट्राला पुरेसा केलाय. नक्की कुणाचे खरे मानायचे? लसीकरण केंद्रे केंद्राकडे बोट दाखवण्या साठी मुद्दाम बंद केली की खरेच तुटवडा आहे? या तू तू मी मी मध्ये नागरिकांची ससेहोलपट होतेय त्याचं काय?

मुक्त विहारि गुरुवार, 04/22/2021 - 15:34
WHO ला काय कळतं म्हणणाऱ्या राऊतांनी आता ‘ब्रेक द चेन’साठी दिला WHO चाच संदर्भ, म्हणाले… https://www.loksatta.com/desh-videsh-news/sanjay-raut-says-break-the-chain-decisions-related-to-corona-are-as-per-who-guidelines-scsg-91-2450985/

मुक्त विहारि गुरुवार, 04/29/2021 - 11:41
सोनिया-राहुल गांधींची खिल्ली उडवल्याबद्दल कॉंग्रेसकडून फूड कंपनीविरोधात निषेध, 8 जणांना अटक... स्वतःला अहिंसावादी समजायचं आणि हिंसा घडवून आणायची .... इंदिरा गांधी हत्या, यांच्या हत्ये नंतर, कॉंग्रेसनेच हत्याकांड घडवून आणले, असे वाचनांत आले आहे...

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि गुरुवार, 04/29/2021 - 11:42
https://www.tv9marathi.com/maharashtra/congress-protests-against-food-company-for-mocking-sonia-rahul-gandhi-8-arrested-446857.html/amp

In reply to by मुक्त विहारि

कॉमी Fri, 04/30/2021 - 18:32
तातडीने पॅकेज गरजूंना पोहोचवायला हवे. लोकडाऊन त्याशिवाय लादणे फार निर्दयपणाचे काम आहे.

In reply to by कॉमी

मुक्त विहारि Fri, 04/30/2021 - 18:48
मी 1983 ते 1998 पर्यंत शिवसैनिकच होतो ... डोंबिवली मध्ये, शिवसेनेच्या कार्यात जमेल तसा भाग पण घेत होतो... पण, Enron, एक रुपयात मिळणारी झुणकाभाकर आणि संजय दत्तला माफी दिली, ह्या तीन गोष्टी मनाला पटल्याच नाहीत.... एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांनी ठासून सांगीतले की, शिवसेनेत घराणेशाही नाही, ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत, ठाकरे यांना पदाची अपेक्षा नाही.... ही तिन्ही वाक्ये खोटी ठरली ... ह्या पक्षावर कसा विश्र्वास ठेवायचा? माझा कुणावरच वैयक्तिक राग नाही, पण चुकीच्या धोरणांना विरोध हा असणारच ...

प्रसाद_१९८२ Fri, 04/30/2021 - 19:57
महाराष्ट्र सरकारने सरकारने जाहिर केलेले ३ किलो तांदूळ व २ किलो गहू कोणाला फुकट मिळालेत का ? आता दुसरा लॉकडाऊन देखील लावला. यावेळी अशी काही घोषणा ?

चौथा कोनाडा Sat, 05/01/2021 - 12:54
आज व उद्या (दि १ मे आणि २ मे, शनिवार-रविवार) १८ ते ४४ गटातील नगरिकांचे लसीकरण करण्याचा शासनाने घाट घातलाय, या दरम्यान होणारे सधारण लसीकरण (वयोगट - ४५ ते ६०) बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून शासनाबद्दलचा रोष वाढत चालला आहे !

मुक्त विहारि Sun, 05/16/2021 - 18:08
Thackeray Appeal to Doctors : गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या, फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन --------- "CM Uddhav Thackray Appeal Family Doctor For Taking Care Of Home Isolation Patients | Thackeray Appeal To Doctors : गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या, फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन" https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackray-appeal-family-doctor-for-taking-care-of-home-isolation-patients-986744/amp?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16211684115575&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmaharashtra%2Fcm-uddhav-thackray-appeal-family-doctor-for-taking-care-of-home-isolation-patients-986744 ----------- आधी म्हणाले की, तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो... आता जबाबदारीची ढकलंपंची सुरू ...

In reply to by मुक्त विहारि

कॉमी Sun, 05/16/2021 - 18:38
काहिच्या काही. ह्यात कसली ढकलपंची दिसते तुम्हाला ? गृह विलगीकरणात असलेल्या लोकांकडे फॅमिली डॉक्टर्स नि लक्ष द्यावे असे म्हणण्यात काय वावगे आहे ?

In reply to by मुक्त विहारि

प्रसाद_१९८२ Sun, 05/16/2021 - 18:53
जबाबदारी हे वसुली सरकार घेऊ शकत नाही किंव्हा घेतली नाही आजपर्यंत. फेसबुक लाईव्ह मधे लस खरेदीसाठी चेक घेऊन बसलेले मुख्यमंत्री त्याचे पुढे काय झाले काय माहित. फक्त आले अंगावर की ढकल केंद्रावर, ढकल फडणवीसांवर हेच उद्योग कायम सुरु आहेत. त्या जितुद्दीन आव्हाडाने करमुसे नामक तरुणाला फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मरेस्तोवर बंगल्यावर नेऊन मारले होते आता त्याबद्दलची केस न्यायालयात सुरु झाल्यावर त्या वकिलाची फिस राज्य सरकार देणार आहे, कश्यासाठी ? हा आव्हाड सरकारचा जावई आहे का की याच्या केसची फिस जनतेच्या टॅक्समधून द्यायला ? जनतेसाठी खर्च करायला यांच्याकडे पैसा नाही मात्र बापाचे स्मारक, वकिलांच्या फीस द्यायला मात्र यांच्याकडे पैसा आहे. हे दळभद्री सरकार त्यांच्या कर्माने जेंव्हा पडेल तेंव्हा पडेल मात्र तो पर्यंत महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे हे दळभद्री नक्कीच वाटोळे करणार.

In reply to by प्रसाद_१९८२

श्रीगुरुजी Sun, 05/16/2021 - 19:10
हे दळभद्री सरकार त्यांच्या कर्माने जेंव्हा पडेल तेंव्हा पडेल मात्र तो पर्यंत महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे हे दळभद्री नक्कीच वाटोळे करणार. + ९९९९९९९९९९९९.... महाराष्ट्राचं नशीबच फुटकं म्हणून इतकं नालायक, निष्क्रीय, ठोंब्या सरकार महाराष्ट्रावर लादलं गेलं. सेनेशी युती करून आपल्या मतांवर सेनेचे आमदार निवडून आणण्याची अवदसा भाजपला आठवली हे महाराष्ट्राचं दुर्दैव.

मुक्त विहारि Sun, 12/12/2021 - 18:00
मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही, या देशात हिंदूंचं राज्य परत आणायचंय- राहुल गांधी https://www.loksatta.com/desh-videsh/i-am-a-hindu-not-hindutvadi-rahul-gandhi-slams-bjp-at-jaipur-rally-hrc-97-2716502/ “आज भारतातील एक टक्के लोकसंख्येच्या हातात ३३ टक्के संपत्ती आहे. केवळ १० टक्के लोकांच्या हातात ६५ टक्के पैसा आहे. आणि सर्वात गरीब ५० टक्के लोकांच्या हातात फक्त ६ टक्के पैसा आहे.” मग, सुरूवात परमपूज्य राहुल गांधी यांनी, स्वतःची संपत्ती दान करावी.... लोकांच्या पुढे स्वतःचा आदर्श ठेवा....

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ Fri, 01/14/2022 - 17:08
मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही, या देशात हिंदूंचं राज्य परत आणायचंय- राहुल गांधी साफ्ट हिंदुत्व त्ये हेच का रे बाळू ??? हिंदू सत्याचा शोध घेतो, त्याला सत्याग्रह म्हणतात म्हणजे त्यो गांधी बाबा हिंदू होता तर !

मुक्त विहारि Wed, 12/15/2021 - 10:46
https://www.esakal.com/maharashtra/sanjay-raut-criticized-opposition-on-hindutva-marathi-political-news-jpd93 हो का? मग CAA आणि NRC च्या वेळी, भाजपला साथ का दिली नाही? अजान स्पर्धा आयोजित करायची आणि हिंदूत्ववादी आहोत असे म्हणायचे....

मुक्त विहारि Wed, 12/15/2021 - 12:04
https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-bjp-chandrakant-patil-chhatrapati-shivaji-maharaj-hindu-vote-bank-sgy-87-2720229/ बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे हा त्याचाच एक भाग होता. आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. जर, बाबरी मस्जिद पाडणारे शिवसैनिक असतील, तर अशा शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो... खूद्द बाळासाहेब ठाकरे यांनी, जर-तरची भाषा वापरली आहे ... ठाम पणे काहीच सांगीतलेले नाही ... बजरंग दल आणि इतर काही दलांनी, ठामपणे सांगीतले होते.... असो, अजान स्पर्धा आयोजित करून, शिवसेनेने हिंदूत्व दाखवले आहे....

मुक्त विहारि Fri, 12/17/2021 - 18:00
बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत https://marathi.abplive.com/news/mumbai/cm-uddhav-thackeray-comment-on-bullock-cart-race-1018872/amp त्यापेक्षा, शेतकरी वर्गाला,हेक्टरी 25-30 हजार अशी, आर्थिक मदत केली असती तर, जास्त आनंद झाला असता... किमान इंधनावरील टॅक्स तरी कमी करायला हवा होता ...

मुक्त विहारि Mon, 01/10/2022 - 14:53
द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत... https://marathi.abplive.com/news/india/congress-leader-rahul-gandhi-tweet-about-election-2022-latest-update-1024566 ----- सहमत आहे, त्यामुळेच, भाजप शिवाय पर्याय नाही.... ------ मुजफ्फरनगर दंगल, आझाद मैदान दंगल, अमरावती दंगल, ही प्रकरणे बघता, द्वेष कोण पसरवत आहे आणि हिंदू हितवादी कोणता पक्ष आहे? हे आमच्या सारख्या अशिक्षित माणसांना नक्कीच समजते ... धर्मो रक्षति धर्माः, त्यामुळे मला तरी भाजप शिवाय पर्याय नाही...

मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 09:31
हिंदुत्त्वापासून दूर गेल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले, आता तर राहुल गांधीसुद्धा आमच्या.. https://www.loksatta.com/elections/even-rahul-gandhi-started-speaking-on-the-issue-of-hindutva-this-is-our-influence-sanjay-raut-abn-97-2759746/lite/ ------ हो क्का? मग ते अजान स्पर्धा आयोजित करणे, हे काय होते?

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ Fri, 01/14/2022 - 17:12
राहुल गांधीसुद्धा आमच्याच प्रभावामुळे हिंदू आणि हिंदुत्त्वाबद्दल बोलू लागले आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले. हायला म्हणजे शेना भाजपा ची बी टीम हाय तर ...

मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 12:06
जनतेच्या शक्तीसमोर दडपशाही टिकत नाही ; शरद पवार यांचे मोदींवर टीकास्त्र https://www.loksatta.com/mumbai/ncp-chief-sharad-pawar-hit-out-at-pm-narendra-modi-and-bjp-for-repressive-politics-zws-70-2760733/ आसे आहे होय? मग मागच्या निवडणुकी नंतर, मोदींना भेटायला का गेले होते?

मुक्त विहारि Mon, 01/31/2022 - 19:24
https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-on-pushpa-dialogue-mahavikas-aghadi-maharashtra-government-sgy-87-2783403/ ------- केम छो वरली.... जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा... --------

मुक्त विहारि Fri, 02/11/2022 - 14:14
“मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे नाहीत”; किरीट सोमय्यांच्या धक्काबुक्की प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया https://www.loksatta.com/pune/jayant-patil-reaction-on-the-issue-of-pushing-kirit-somaiya-abn-97-svk-88-2799754/ निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, तेंव्हा त्या मारहाण करणार्या शिवसैनिकांवर काय करवाई केली?

मुक्त विहारि Fri, 02/11/2022 - 14:21
https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/mumbai/sanjay-raut-baba-how-many-lies-raut-joined-hands-on-pm-narendra-modi-the-issue-of-hridaynath-mangeshkar-a601/amp/ खुद्द हृदयनाथ मंगेशकर, यांनीच ही गोष्ट सांगीतली आहे ...

मुक्त विहारि Fri, 02/11/2022 - 16:02
“पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राजकीय पक्षांना दिली तंबी! https://www.loksatta.com/maharashtra/mah-home-minister-dilip-walse-patil-warns-political-parties-on-hijab-row-pmw-88-2799565/ ------- आणि सत्तारूढ़ पक्षच आंदोलन करत आहे .... हिजाबच्या निर्णयाविरुद्ध मालेगावमध्ये एल्गार; ‘राष्ट्रवादी’च्या रणरागिणी रस्त्यावर! (https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/maharashtra/hijab-agitation-in-malegaon-against-hijab-decision-protest-by-ncp-workers-633713.html/amp) -------- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, यांच्यावर माझा अजिबात विश्र्वास नाही....

मुक्त विहारि Sat, 02/12/2022 - 19:58
भाजपने पाठित खुपसला!; गोव्यात आदित्य ठाकरेंनी केला 'हा' मोठा गौप्यस्फोट https://maharashtratimes.com/india-news/couldnt-focus-on-goa-earlier-because-of-friendship-with-bjp-says-aaditya-thackeray/articleshow/89528923.cms निवडणूक होण्या आधीच, ही गोष्ट का सांगीतली नाही?

खटपट्या Sun, 02/13/2022 - 09:09
काल एक क्लीप पाहीली, त्यात रागा म्हणत आहे की, सिध्दूला कापा बघा त्याच्यातून पंजाब बाहेर येइल... :) सिध्दूचा चेहरा बघण्यासारखा झाला होता....

In reply to by खटपट्या

मुक्त विहारि Sun, 02/13/2022 - 09:19
हा एक अतिशय मनोरंजक विषय आहे .... आणि गंमत अशी की, भारतातील काही सुशिक्षित लोकं, ह्याला नेता म्हणतात.... परमपूज्य राहुल गांधी यांना धड आकडेमोड पण येत नाही आणि त्यांच्याच पक्षातील नेत्यांची नावे देखील उच्चारता येत नाहीत...

In reply to by खटपट्या

सर टोबी Sun, 02/13/2022 - 11:35
उपमा देणं, सुतावरून स्वर्ग गाठणं, वाह्यात प्रश्न विचारणं, निर्लज्जपणाची सीमा गाठणं हे सर्व आपल्या प्रिय व्यक्तींची मक्तेदारी आहे. शेतकऱ्यांना वर्षभरात अनुल्लेखाने मारले आणि नंतर तपश्चर्या कमी पडली असे सद्गदित होऊन म्हणाले त्या क्लीपचा उल्लेख नव्हता केला. भारतातल्या सद्य स्थितीतील कोणत्याही गोष्टींना नेहरूंना जबाबदार धरणे, क्षुल्लक गोष्टींचा ऐतिहासिक असे वर्णन करणे, कुणाला तुम्ही कुणाचे पुत्र अहात याचा पुरावा मागणे.

मुक्त विहारि Sun, 02/13/2022 - 18:45
“आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला” ; प्रियंका गांधींचं विधान! https://www.loksatta.com/elections/aam-aadmi-party-has-emerged-from-rss-priyanka-gandhi-msr-87-2802168/ ------- इतके अगाध ज्ञान कुठुन मिळवत असतील?

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा Mon, 02/14/2022 - 17:17
हा .... हा .... हा .... ! थोर विचारवंत माणसे, एका मोठ्या पक्षाचा वारसा सांगणारे !

मुक्त विहारि Mon, 02/14/2022 - 20:13
मोदी सरकारच्या काळात 5 लाख 35 हजार कोटींचा बँक घोटाळा, राहुल गांधींचा हल्लाबोल https://marathi.abplive.com/news/india/congress-leader-rahul-gandhi-hits-out-at-modi-government-over-bank-fraud-1032975/amp ------- घोटाळ्याला सुरूवात झाली, तेंव्हा कॉंग्रेसची राजवट होती ... ------ उलट, ह्या केंद्र सरकारने, हा घोटाळा उघडकीस आणला .. -----

मुक्त विहारि Mon, 02/14/2022 - 20:16
माहूर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी, नांदेड काँग्रेसला मोठा झटका, शिवसेना किंगमेकर! https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/nanded-mahur-nagar-panchayat-election-national-congress-party-feroz-dosani-elects-as-mayor-638162.html ------- उदारमतवादी शिवसेना.... शिवसेनेला जर हिंदूत्वाची इतकी चाड आहे तर हिंदू नगराध्यक्षच हवा, ही अट का ठेवली नाही?

मुक्त विहारि Fri, 02/18/2022 - 09:24
लोकोपयोगी कामासाठी महाराष्ट्र मागं हटणार नाही, सोनोवालजी हमारी सरकार पिछे नही हटेगी : उद्धव ठाकरे https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai/uddhav-thackeray-said-maharashtra-government-will-not-step-back-in-development-projects-640479.html बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? आरे इथे जे काही होणार होते, ते प्रकरण आता कुठे आहे?

मुक्त विहारि Wed, 03/09/2022 - 05:47
सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-government-to-unveil-new-women-s-empowerment-policy-cm-uddhav-thackeray-zws-70-2834125/ एका स्त्रीला, "हरामखोर", असे ह्याच पक्षांतील नेत्याने म्हटले होते .... त्या नेत्यावर काही कारवाई केली असती तर, कदाचित गोष्ट वेगळी झाली असती...

मुक्त विहारि Tue, 05/03/2022 - 22:04
जो संपूर्ण देशाला जगवतो त्याच जगणं सुसह्य करणं हेच आमच्या सरकारचं काम : मुख्यमंत्री https://marathi.abplive.com/news/maharashtra/agriculture-award-news-state-government-effort-is-to-make-life-easier-for-the-farmers-says-cm-uddhav-thackeray-1055445/amp आणि ही खालची बातमी .... रक्त आटवून पिकवलेला कांदा कवडीमोल ठरला; निराश तरुण शेतकऱ्याची आत्महत्या .... https://www.google.com/amp/s/marathi.hindustantimes.com/amp/maharashtra/farmer-suicide-after-get-8-rs-price-per-1-kg-onion-in-market-141651551638560.html नेहमी प्रमाणे, ही पण घटना, केंद्रावर ढकलण्याची शक्यता जास्त आहे...... ह्या राजवटीत, अजून काय काय वाचावे लागेल?