Skip to main content

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 19/01/2021 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे. 1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही. 2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही. 3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण, A. राष्ट्रवादी युवा नेत्यावर, बलात्काराचा आरोप झाला आणि 21 दिवसाच्या आत, आरोप करणारी युवतीच गायब झाली B. धनंजय मुंडे यांच्यावर, बलात्काराचा आरोप झाला आहे आणि अद्याप तरी ते आहे त्याच पदावर आहेत. 4. आधी पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून, झाडे तोडायला विरोध करायचा आणि नंतर झाडे तोडायची. 5. आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची. इथे सगळेच सुशिक्षित असल्याने, फक्त मुद्देच मांडले आहेत.

वाचने 65817
प्रतिक्रिया 145

प्रतिक्रिया

https://www.loksatta.com/mumbai-news/chief-minister-uddhav-thackeray-gi… "जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा" आणि "केम छो वरली", हे बोर्ड, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच, मुंबईत लावले होते.

नंतर म्हणाले, तुमच्या कुटुंबाची काळजी ही तुमचीच जबाबदारी आता म्हणतात ..... तुम्हीच जबाबदार .... आलं अंगावर तर ढकलपंची करा .... https://www.loksatta.com/pune-news/in-pune-774-new-corona-patients-were… आता हे पण, सामान्य माणसावर ढकला....बियर बार, हाॅटेल, मंदिरे, बागा, सिनेमा आणि नाट्य गृहे, उघडली की हे होणारच होते...

महाराष्ट्र सरकार अतिशय उत्तम काम करत आहे. किती ही त्रास होत असला तरी bjp ला परत महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही.

मतदार च्या नालायक पना मुळे सर्वच पक्षात बलात्कारी,गुंड,लबाड लोक जन प्रतिनिधी आहेत. भारता मध्ये सर्वच पक्षात नालायक लोक खूप आहेत. त्या मध्ये bjp pan आहे.

In reply to by मुक्त विहारि

कल्याण, कल्याण ... आपणा सर्वांचं कल्याण हाच त्यांचा उदात्त हेतू आहे !

कायप्पावर नुकतंच आलेलं मीम: मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे: पाणी नळातून येते. नळाला पाणी येते. येते पाणी नळाला. नळामुळे पाणी येते. पाण्यामुळे नळ आहेत. :-)

In reply to by मुक्त विहारि

मोदी नी 15 लाख माझ्या अकाउंट मध्ये जमा केले की मग च शिव भोजन थाळी घरी मागविणार आहे.

In reply to by Rajesh188

आम्हाला १५ लाख मिळाले आहेत. कलम ३७० हटविले. भारतीयांचा आदर्श प्रातःस्मरणीय राजा राम यांचं मंदिर आयोध्येत होत आहे, पाकिस्तानची नांगी ठेचली, चीनच्या डोळ्यात डोळे घालून हाकलून लावले. सरकारी मालमत्ता नुसत्या पडून होत्या, त्या विकल्या, सार्वजनिक संपत्तीची विल्हेवाट लावली, आता काय राहीलं आहे, त्याचं तपास करुन, त्याचा बंदोबस्त करण्यात येईल. असे, अनेक देशोपयोगी निर्णय घेतलेले असल्यामुळे आम्हाला १५ लाख काय, ज्याची किंमतच होऊ शकत नाही, अशी आयुष्यभराची रक्कम मिळाली आहे. (आता बोला) ;) -दिलीप बिरुटे (रामभक्त)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कलम ३७० हटविले. मग चांगलंच केलं कि ... जमू आणि लडाख ना भारतबरोबर हवाय फक्त मुस्लिम बहुल आशय काश्मीर खोर्यालाच स्वतत्र किंवा भारतापासून दूरचे डोहाळे .. तुमच्या का पोटात दुखतंय.. एवढे वर्ष प्रिय काँग्रेस ला रक्षी बहुमत असून सुद्धा हिंमत झाली नाही राजा राम यांचं मंदिर आयोध्येत होत आहे, धर्मिक नसलेल्याला माझ्यसारख्याला पण हे केवळ प्रतीकात्मक बहुसंख्यनकाचा हक्क म्हणून झाले ते चांगलेच झाले असा वाटतंय..तुमच्या का पोटात दुखतंय. ( माझा जाऊद्या आपण तर आंधळे भक्त ! गेला बाजार जा रिझवान अहमद यांचे विडिओ बघा.. जरा डोळे उघडतील ) सरकारी मालमत्ता नुसत्या पडून होत्या, त्या विकल्या, --- सगळंच विकू नये हे मान्य ... कुठेतरी सीमा असावी.. पण ते करण्याची हिंमत दाखवली कि लगेच "भांडवली चोर" आणि नेहमीचीही फेकाफेकी "अडाणी अंबानी चाय घशात ..) आता काय राहीलं आहे, त्याचं तपास करुन,: आहे ना . खरा सर्वधर्म संभव.. समान नागरी कायदा ..

In reply to by चौकस२१२

आवरा काका. आमच्या पोटात दुखले तरी आम्ही आमचं पाहून घेऊ. फार तान घेऊ नका. काड़ीने मलम लावू नका. वाढदिवसाच्या शुभेच्छा....! बाकी, फेकाफेकी, भांडवलदारांच्या हातचे बाहुले वगैरे जागतिक लेवलवर वाढत्या दाढी सारखेच वाढत आहोत...! :) -दिलीप बिरुटे

In reply to by मुक्त विहारि

दोन महिन्यापुर्वी मी आणी सौ दोघांनी मिळून पुणे-सोलापुर महामार्गावर शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिचे निधन झाल्यामुळे सर्व हॉटेल्स बंद होती, फक्त स्थानिक नेत्याचे "शिवभोजन थाळी" वाले हॉटेल चालू होते. कोरोना परिस्थितीमुळे भोजन मोफत मिळाले. भोजनाचा दर्जा उत्तम होता !

In reply to by मुक्त विहारि

हो, ही देखील मी चाखलेली आहे, राबवणारे लोक प्रमाणिक असतील अश्या योजनांनी जनतेची खुप मोठी सोय होते. सध्या राबवत असलेल्या शासिकिय (विनाशुल्क) लसीचा देखील अतिशय उत्तम अनुभव आहे !

In reply to by चौथा कोनाडा

तामिळनाडू येथील "अम्मा कॅन्टिन" हे एक उदाहरण... पण आपल्याकडे ही योजना चालली नाही... लोकसत्तेत आलेली जुनी कात्रणे, शोधावी लागतील..

https://www.loksatta.com/mumbai-news/warn-to-corona-politicians-cm-uddh… इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच कृत्रिम श्वसनयंत्रे (व्हेंटिलेटर्स) उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांना केली. नेहमी प्रमाणेच, आलं अंगावर तर ढकल केंद्रावर....

In reply to by मुक्त विहारि

आहो ... इतकेच काय .. बंद पड्लेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करायला पण केंद्राने माणसे दिली पाहिजे असे म्हणत आहेत .. आता बोला ... इतक्या पुढारलेल्या राज्यात व्हेंटिलेटर्स दुरुस्त करणारे कारागीर नाहीत ..

न दिलेल्या फोडणीचा चुरकन आवाज

न दिलेल्या फोडणीचा चुरकन आवाज

लोकसन्ख्येची घनता दखविणारा तक्ता पहाता महाराष्ट्रावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. https://en.wikipedia.org/wiki/List_of_states_and_union_territories_of_I… राज्य स्तरावर लोकसन्ख्येची घनता जास्त आहे दिल्लीची. म्हणजे तिथे कोरोना पसरण्याची शक्यता जास्त आहे. तिथे शहरी लोक्सन्ख्येचा भाग देखिल ९७.५ टक्के आहे. महाराष्ट्राचा शहरी लोकसन्खेचा भाग ४५.२२,गुजरातचा ४२.६, उत्तर प्रदेशचा २२.२७ केन्द्र सरकार असा डाटा वापरुन लसीन्चे वितरण करत असावे अशी अपेक्शा आहे. आता तर लसी उप्लब्ध नाही असे म्हणत आहेत..

.....आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’... https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/pune-coroanavirus-situation… आता ही पण केंद्राचीच "जबाबदारी", असे म्हणण्याची शक्यता आहे...

माझ्या ओळखीचे bkc covid सेंटर मध्ये होते उत्तम सुविधा रुग्ण ना दिली जात आहे. सीबीसी,ecg,x ray पासून सर्व आवशक्या चाचण्या वेळेवर आणि मोफत केल्या जात आहेत. औषध वेळेवर मिळत आहेत. बाथरूम पासून जेवण पर्यंत सर्व सुविधा उत्तम आहेत.. एकंदरीत राज्य सरकार त्यांची जबाबदारी पार पाडत आहे. रुग्ण प्रचंड वाढल्या मुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला असेल नाकारता येत नाही पण चांगल्या कामाचे कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा माणसाकडे असावा. अगदी शत्रू जरी चांगले काम करत असेल तरी त्याचे कौतुक करावे.

In reply to by Rajesh188

नक्कीच ... आपण, ह्या राज्य सरकारने केलेल्या, चांगल्या कामाचा धागा काढा की.... बाय द वे, 1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

राज्य सरकार म्हणतेय लसी पुरेशा नाहीत. आज म टा मध्ये काही ठिकाणी लसी संपल्या म्हणून लसीकरण बंद केले अशा बातम्या आल्यात. केंद्र सरकार आणि राज्यातील बीजेपीचे नेते म्हणत आहेत लसी पुरवठा महाराष्ट्राला पुरेसा केलाय. नक्की कुणाचे खरे मानायचे? लसीकरण केंद्रे केंद्राकडे बोट दाखवण्या साठी मुद्दाम बंद केली की खरेच तुटवडा आहे? या तू तू मी मी मध्ये नागरिकांची ससेहोलपट होतेय त्याचं काय?

WHO ला काय कळतं म्हणणाऱ्या राऊतांनी आता ‘ब्रेक द चेन’साठी दिला WHO चाच संदर्भ, म्हणाले… https://www.loksatta.com/desh-videsh-news/sanjay-raut-says-break-the-ch…

सोनिया-राहुल गांधींची खिल्ली उडवल्याबद्दल कॉंग्रेसकडून फूड कंपनीविरोधात निषेध, 8 जणांना अटक... स्वतःला अहिंसावादी समजायचं आणि हिंसा घडवून आणायची .... इंदिरा गांधी हत्या, यांच्या हत्ये नंतर, कॉंग्रेसनेच हत्याकांड घडवून आणले, असे वाचनांत आले आहे...

In reply to by मुक्त विहारि

तातडीने पॅकेज गरजूंना पोहोचवायला हवे. लोकडाऊन त्याशिवाय लादणे फार निर्दयपणाचे काम आहे.

In reply to by कॉमी

मी 1983 ते 1998 पर्यंत शिवसैनिकच होतो ... डोंबिवली मध्ये, शिवसेनेच्या कार्यात जमेल तसा भाग पण घेत होतो... पण, Enron, एक रुपयात मिळणारी झुणकाभाकर आणि संजय दत्तला माफी दिली, ह्या तीन गोष्टी मनाला पटल्याच नाहीत.... एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांनी ठासून सांगीतले की, शिवसेनेत घराणेशाही नाही, ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत, ठाकरे यांना पदाची अपेक्षा नाही.... ही तिन्ही वाक्ये खोटी ठरली ... ह्या पक्षावर कसा विश्र्वास ठेवायचा? माझा कुणावरच वैयक्तिक राग नाही, पण चुकीच्या धोरणांना विरोध हा असणारच ...

महाराष्ट्र सरकारने सरकारने जाहिर केलेले ३ किलो तांदूळ व २ किलो गहू कोणाला फुकट मिळालेत का ? आता दुसरा लॉकडाऊन देखील लावला. यावेळी अशी काही घोषणा ?

आज व उद्या (दि १ मे आणि २ मे, शनिवार-रविवार) १८ ते ४४ गटातील नगरिकांचे लसीकरण करण्याचा शासनाने घाट घातलाय, या दरम्यान होणारे सधारण लसीकरण (वयोगट - ४५ ते ६०) बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून शासनाबद्दलचा रोष वाढत चालला आहे !

Thackeray Appeal to Doctors : गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या, फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन --------- "CM Uddhav Thackray Appeal Family Doctor For Taking Care Of Home Isolation Patients | Thackeray Appeal To Doctors : गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या, फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन" https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/… ----------- आधी म्हणाले की, तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो... आता जबाबदारीची ढकलंपंची सुरू ...

In reply to by मुक्त विहारि

काहिच्या काही. ह्यात कसली ढकलपंची दिसते तुम्हाला ? गृह विलगीकरणात असलेल्या लोकांकडे फॅमिली डॉक्टर्स नि लक्ष द्यावे असे म्हणण्यात काय वावगे आहे ?

In reply to by मुक्त विहारि

जबाबदारी हे वसुली सरकार घेऊ शकत नाही किंव्हा घेतली नाही आजपर्यंत. फेसबुक लाईव्ह मधे लस खरेदीसाठी चेक घेऊन बसलेले मुख्यमंत्री त्याचे पुढे काय झाले काय माहित. फक्त आले अंगावर की ढकल केंद्रावर, ढकल फडणवीसांवर हेच उद्योग कायम सुरु आहेत. त्या जितुद्दीन आव्हाडाने करमुसे नामक तरुणाला फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मरेस्तोवर बंगल्यावर नेऊन मारले होते आता त्याबद्दलची केस न्यायालयात सुरु झाल्यावर त्या वकिलाची फिस राज्य सरकार देणार आहे, कश्यासाठी ? हा आव्हाड सरकारचा जावई आहे का की याच्या केसची फिस जनतेच्या टॅक्समधून द्यायला ? जनतेसाठी खर्च करायला यांच्याकडे पैसा नाही मात्र बापाचे स्मारक, वकिलांच्या फीस द्यायला मात्र यांच्याकडे पैसा आहे. हे दळभद्री सरकार त्यांच्या कर्माने जेंव्हा पडेल तेंव्हा पडेल मात्र तो पर्यंत महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे हे दळभद्री नक्कीच वाटोळे करणार.

In reply to by प्रसाद_१९८२

हे दळभद्री सरकार त्यांच्या कर्माने जेंव्हा पडेल तेंव्हा पडेल मात्र तो पर्यंत महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे हे दळभद्री नक्कीच वाटोळे करणार. + ९९९९९९९९९९९९.... महाराष्ट्राचं नशीबच फुटकं म्हणून इतकं नालायक, निष्क्रीय, ठोंब्या सरकार महाराष्ट्रावर लादलं गेलं. सेनेशी युती करून आपल्या मतांवर सेनेचे आमदार निवडून आणण्याची अवदसा भाजपला आठवली हे महाराष्ट्राचं दुर्दैव.

मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही, या देशात हिंदूंचं राज्य परत आणायचंय- राहुल गांधी https://www.loksatta.com/desh-videsh/i-am-a-hindu-not-hindutvadi-rahul-… “आज भारतातील एक टक्के लोकसंख्येच्या हातात ३३ टक्के संपत्ती आहे. केवळ १० टक्के लोकांच्या हातात ६५ टक्के पैसा आहे. आणि सर्वात गरीब ५० टक्के लोकांच्या हातात फक्त ६ टक्के पैसा आहे.” मग, सुरूवात परमपूज्य राहुल गांधी यांनी, स्वतःची संपत्ती दान करावी.... लोकांच्या पुढे स्वतःचा आदर्श ठेवा....

In reply to by मुक्त विहारि

मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही, या देशात हिंदूंचं राज्य परत आणायचंय- राहुल गांधी साफ्ट हिंदुत्व त्ये हेच का रे बाळू ??? हिंदू सत्याचा शोध घेतो, त्याला सत्याग्रह म्हणतात म्हणजे त्यो गांधी बाबा हिंदू होता तर !

https://www.esakal.com/maharashtra/sanjay-raut-criticized-opposition-on… हो का? मग CAA आणि NRC च्या वेळी, भाजपला साथ का दिली नाही? अजान स्पर्धा आयोजित करायची आणि हिंदूत्ववादी आहोत असे म्हणायचे....

https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-bjp-chandraka… बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे हा त्याचाच एक भाग होता. आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. जर, बाबरी मस्जिद पाडणारे शिवसैनिक असतील, तर अशा शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो... खूद्द बाळासाहेब ठाकरे यांनी, जर-तरची भाषा वापरली आहे ... ठाम पणे काहीच सांगीतलेले नाही ... बजरंग दल आणि इतर काही दलांनी, ठामपणे सांगीतले होते.... असो, अजान स्पर्धा आयोजित करून, शिवसेनेने हिंदूत्व दाखवले आहे....

मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही हे मी पुरुष आहे पौरुषत्व नाही असे वाचल्यासारखे वाटते

बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत https://marathi.abplive.com/news/mumbai/cm-uddhav-thackeray-comment-on-… त्यापेक्षा, शेतकरी वर्गाला,हेक्टरी 25-30 हजार अशी, आर्थिक मदत केली असती तर, जास्त आनंद झाला असता... किमान इंधनावरील टॅक्स तरी कमी करायला हवा होता ...

द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत... https://marathi.abplive.com/news/india/congress-leader-rahul-gandhi-twe… ----- सहमत आहे, त्यामुळेच, भाजप शिवाय पर्याय नाही.... ------ मुजफ्फरनगर दंगल, आझाद मैदान दंगल, अमरावती दंगल, ही प्रकरणे बघता, द्वेष कोण पसरवत आहे आणि हिंदू हितवादी कोणता पक्ष आहे? हे आमच्या सारख्या अशिक्षित माणसांना नक्कीच समजते ... धर्मो रक्षति धर्माः, त्यामुळे मला तरी भाजप शिवाय पर्याय नाही...

हिंदुत्त्वापासून दूर गेल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले, आता तर राहुल गांधीसुद्धा आमच्या.. https://www.loksatta.com/elections/even-rahul-gandhi-started-speaking-o… ------ हो क्का? मग ते अजान स्पर्धा आयोजित करणे, हे काय होते?

In reply to by मुक्त विहारि

राहुल गांधीसुद्धा आमच्याच प्रभावामुळे हिंदू आणि हिंदुत्त्वाबद्दल बोलू लागले आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले. हायला म्हणजे शेना भाजपा ची बी टीम हाय तर ...

जनतेच्या शक्तीसमोर दडपशाही टिकत नाही ; शरद पवार यांचे मोदींवर टीकास्त्र https://www.loksatta.com/mumbai/ncp-chief-sharad-pawar-hit-out-at-pm-na… आसे आहे होय? मग मागच्या निवडणुकी नंतर, मोदींना भेटायला का गेले होते?

https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-on-pushpa-dia… ------- केम छो वरली.... जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा... --------

“मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे नाहीत”; किरीट सोमय्यांच्या धक्काबुक्की प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया https://www.loksatta.com/pune/jayant-patil-reaction-on-the-issue-of-pus… निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, तेंव्हा त्या मारहाण करणार्या शिवसैनिकांवर काय करवाई केली?

“पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राजकीय पक्षांना दिली तंबी! https://www.loksatta.com/maharashtra/mah-home-minister-dilip-walse-pati… ------- आणि सत्तारूढ़ पक्षच आंदोलन करत आहे .... हिजाबच्या निर्णयाविरुद्ध मालेगावमध्ये एल्गार; ‘राष्ट्रवादी’च्या रणरागिणी रस्त्यावर! (https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/maharashtra/hijab-agita…) -------- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, यांच्यावर माझा अजिबात विश्र्वास नाही....

भाजपने पाठित खुपसला!; गोव्यात आदित्य ठाकरेंनी केला 'हा' मोठा गौप्यस्फोट https://maharashtratimes.com/india-news/couldnt-focus-on-goa-earlier-be… निवडणूक होण्या आधीच, ही गोष्ट का सांगीतली नाही?

काल एक क्लीप पाहीली, त्यात रागा म्हणत आहे की, सिध्दूला कापा बघा त्याच्यातून पंजाब बाहेर येइल... :) सिध्दूचा चेहरा बघण्यासारखा झाला होता....

In reply to by खटपट्या

हा एक अतिशय मनोरंजक विषय आहे .... आणि गंमत अशी की, भारतातील काही सुशिक्षित लोकं, ह्याला नेता म्हणतात.... परमपूज्य राहुल गांधी यांना धड आकडेमोड पण येत नाही आणि त्यांच्याच पक्षातील नेत्यांची नावे देखील उच्चारता येत नाहीत...

In reply to by खटपट्या

उपमा देणं, सुतावरून स्वर्ग गाठणं, वाह्यात प्रश्न विचारणं, निर्लज्जपणाची सीमा गाठणं हे सर्व आपल्या प्रिय व्यक्तींची मक्तेदारी आहे. शेतकऱ्यांना वर्षभरात अनुल्लेखाने मारले आणि नंतर तपश्चर्या कमी पडली असे सद्गदित होऊन म्हणाले त्या क्लीपचा उल्लेख नव्हता केला. भारतातल्या सद्य स्थितीतील कोणत्याही गोष्टींना नेहरूंना जबाबदार धरणे, क्षुल्लक गोष्टींचा ऐतिहासिक असे वर्णन करणे, कुणाला तुम्ही कुणाचे पुत्र अहात याचा पुरावा मागणे.

“आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला” ; प्रियंका गांधींचं विधान! https://www.loksatta.com/elections/aam-aadmi-party-has-emerged-from-rss… ------- इतके अगाध ज्ञान कुठुन मिळवत असतील?

In reply to by मुक्त विहारि

हा .... हा .... हा .... ! थोर विचारवंत माणसे, एका मोठ्या पक्षाचा वारसा सांगणारे !