Skip to main content

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 19/01/2021 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे. 1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही. 2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही. 3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण, A. राष्ट्रवादी युवा नेत्यावर, बलात्काराचा आरोप झाला आणि 21 दिवसाच्या आत, आरोप करणारी युवतीच गायब झाली B. धनंजय मुंडे यांच्यावर, बलात्काराचा आरोप झाला आहे आणि अद्याप तरी ते आहे त्याच पदावर आहेत. 4. आधी पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून, झाडे तोडायला विरोध करायचा आणि नंतर झाडे तोडायची. 5. आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची. इथे सगळेच सुशिक्षित असल्याने, फक्त मुद्देच मांडले आहेत.

वाचने 65817
प्रतिक्रिया 145

प्रतिक्रिया

मोदी सरकारच्या काळात 5 लाख 35 हजार कोटींचा बँक घोटाळा, राहुल गांधींचा हल्लाबोल https://marathi.abplive.com/news/india/congress-leader-rahul-gandhi-hit… ------- घोटाळ्याला सुरूवात झाली, तेंव्हा कॉंग्रेसची राजवट होती ... ------ उलट, ह्या केंद्र सरकारने, हा घोटाळा उघडकीस आणला .. -----

माहूर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी, नांदेड काँग्रेसला मोठा झटका, शिवसेना किंगमेकर! https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/nanded-mahur-nagar-pa… ------- उदारमतवादी शिवसेना.... शिवसेनेला जर हिंदूत्वाची इतकी चाड आहे तर हिंदू नगराध्यक्षच हवा, ही अट का ठेवली नाही?

लोकोपयोगी कामासाठी महाराष्ट्र मागं हटणार नाही, सोनोवालजी हमारी सरकार पिछे नही हटेगी : उद्धव ठाकरे https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai/uddhav-thackeray-sai… बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? आरे इथे जे काही होणार होते, ते प्रकरण आता कुठे आहे?

सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-government-to-unveil-new-wo… एका स्त्रीला, "हरामखोर", असे ह्याच पक्षांतील नेत्याने म्हटले होते .... त्या नेत्यावर काही कारवाई केली असती तर, कदाचित गोष्ट वेगळी झाली असती...

जो संपूर्ण देशाला जगवतो त्याच जगणं सुसह्य करणं हेच आमच्या सरकारचं काम : मुख्यमंत्री https://marathi.abplive.com/news/maharashtra/agriculture-award-news-sta… आणि ही खालची बातमी .... रक्त आटवून पिकवलेला कांदा कवडीमोल ठरला; निराश तरुण शेतकऱ्याची आत्महत्या .... https://www.google.com/amp/s/marathi.hindustantimes.com/amp/maharashtra… नेहमी प्रमाणे, ही पण घटना, केंद्रावर ढकलण्याची शक्यता जास्त आहे...... ह्या राजवटीत, अजून काय काय वाचावे लागेल?