Skip to main content

इंग्लंडचा भारत दौरा

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 03/02/2021 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्‍यावर आला आहे. या दौर्‍यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - कसोटी सामने पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार २४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.

वाचने 55034
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

इंग्लंडची विकेट पडली नाही तर, आपण हरायचे चान्सेस जास्त आहेत...

In reply to by मुक्त विहारि

जबरदस्त मॅच फिरवली 135/0 Required Run Rate, 6 पेक्षा कमी आणि नंतरच्या 116 रन्स मध्ये 10 विकेट .... खूप दिवसांनी, चांगली मॅच झाली....

In reply to by श्रीगुरुजी

आपण आधीची मॅच टर्न केली ह्या मॅचमध्ये जमले नाही