Skip to main content

इंग्लंडचा भारत दौरा

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 03/02/2021 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्‍यावर आला आहे. या दौर्‍यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - कसोटी सामने पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार २४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.

वाचने 55034
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

पहिला प्रतिसाद दिला... जीवन मोहिते, यांनी इथे लेखन प्रकाशित करणे बंद केले आणि पहिल्या प्रतिसादाची चढाओढ संपली... निदान त्या पहिल्या प्रतिसादाची चढाओढ परत सुरू करण्यासाठी तरी, जीवन मोहिते, यांनी परत लेख लिहीणे सुरू करायला हवे ....

इंग्लंड संघ - जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, झेक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिबले, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स भारत संघ - कोहली, रहाणे, मयंक आगरवाल, अश्विन, बुमराह, कुलदीप, सिराज, हार्दिक पंड्या, पंत, अक्षर पटेल, पुजारा, राहुल, साहा, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा, शुभमन गिल, ठाकूर, सुंदर ६००+ फलंदाज बाद करणारा जेम्स अँडरसन आणि ५००+ फलंदाज बाद करणारा स्टुअर्ट ब्रॉड भारतात कितपत यशस्वी ठरेल हे सांगणे अवघड आहे. जो रूट, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स नक्कीच यशस्वी ठरतील. उर्वरीत खेळाडूंपैकी बरेच जण प्रथमच भारतात खेळत आहेत. भारतातर्फे कुलदीप यादव नक्कीच संघात असेल. ईशांत शर्मा भारतात फारसा यशस्वी ठरत नसल्याने सिराज किंवा ठाकूर संघात असावा.

In reply to by श्रीगुरुजी

काही वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेला असताना अँडरसनने कोहलीला टोमणा मारला होता की कोहली फक्त भारतीय खेळपट्टीवर चांगला खेळतो. आणि आश्चर्यकारकरीत्या त्याला दुसऱ्या दिवशी प्रतिउत्तर कोणी दिले असेल, इंझमाम उल हक!!! इंझमाम म्हणाला अँडरसन दुसऱ्याला बोलतोय पण तो स्वतः तरी भारतीय उपखंडात कुठे बळी मिळवू शकलाय, त्याने कोहलीला शिकवू नये.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

३८ वर्षीय जेम्स अँडरसनने १५०+ कसोटी सामन्यात ६००+ फलंदाज बाद केले आहेत. परंतु भारतात खेळलेल्या १० कसोटीत तो फक्त २६ फलंदाज बाद करू शकलाय. ३४ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडने ५००+ फलंदाज बाद केलेत. परंतु भारतात ६ कसोटी सामन्यात त्याचे फक्त १० बळी आहेत.

मालिका नेहेमीप्रमाणे फॉलो करत आहे... कुठल्या वाहिनीवर पाहता येईल? दूरदर्शन दाखवणार का? नाहीतर जियो टीव्ही आहेच.

आपले फलंदाज बऱ्यापैकी धावा करतील ... रोहित - शुभमन या सलामीच्या जोडीवर विशेष लक्ष असेल... आणि अर्थातच रिषभ पंत वर .... गोलंदाजीत जडेजाची उणीव जाणवेल ... जर अश्विनला कुलदीपची योग्य साथ मिळाली तर भारत जिंकेल....

नाणेफेक जिंकून इंग्लडची प्रथम फलंदाजी नदीमला संधी. शार्दूल, सिराजपैकी कोणालाच संधी नाही. याचा त्यांच्या मनोधैर्यावर आणि खेळावर विपरीत परिणाम होऊ नये. संघ निवडीवर कोहलीची छाप वाटतेय.

आणि एक कोरोनाच्या धास्तीमुळे ४ कसोटीसाठी २ मैदाने हे काही पटले नाही. एकदिवसीय आणि ट२० ठीक आहे पण कसोटी क्रिकेट मध्ये व्हेन्यू पण महत्वाची भूमिका बजावतो आणि मजा आणतो

In reply to by गणेशा

इंग्लंड जिकेल असेच वाटत होते, आणि ते खरे होताना दिसतेय

इंग्लंड १२७/२ गोलंदाजीत फारसा दम दिसत नाही. फलंदाजी सुद्धा कंटाळवाणी सुरू आहे. या वेगाने आज फार तर सव्वादोनशे धावा होतील.

In reply to by श्रीगुरुजी

आपले क्षेत्ररक्षण कधी सुधारणार? हा प्रश्र्न तुम्हाला नाही ...

दिवसाखेर २६३/३ (८९.३) शेवटच्या षटकांत सिबले ८७ वर बाद झाल्याने खेळ थांबला. जो रूट १२७ धावांवर खेळतोय.

आपण साडेतीन बॉलर्स घेऊन खेळतोय ... बुमरा, ईशांत आणि अश्विन हे तीन ..... सुंदर आणि नदीम मिळून अर्धा .... जडेजाची उणीव जाणवतेय ... कुलदीप आणि कोहली चे काय फाटलंय माहित नाही ... ही कसोटी अनिर्णित राखली तरी उत्तम

In reply to by अमर विश्वास

खरं तर तीनच. कुलदीप असताना नदीम चहाबाजला का घेतले? ईशांतला भारतात क्वचितच यश मिळते हा इतिहास माहिती असताना सिराज ऐवजी त्याला का घेतले?

In reply to by श्रीगुरुजी

ईशांतला भारतात क्वचितच यश मिळते पूर्णपणे सहमत, सकाळीच लिहिणार होतो पण म्हटलं कुठं सुरुवातीलाच नाट लावायचा. अनाकलनीय सिलेक्शन आहे. यावरुन आता कोहली आणि रहाणे मधे अंतर्गत धुसफुस सुरु होऊ नये म्हणजे मिळवली.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चालायचेच... खेळ त्यांचा, पैसे त्यांचे, मग मनस्ताप आपण कशाला घ्या? खेळाचा आनंद लुटायचा ....

In reply to by अमर विश्वास

पण 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात ... 1. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसे संघ निवडणे ... 2. काही गोष्टी आपल्या हातात असतात, वेळ मिळाला की मॅच बघणे 3. त्यामुळे, खेळाचा आनंद लुटायचा .... ह्या बाबतीत आमचे सासरे उत्तम म्हणायचे, त्यांच्या मते, पाकिस्तान आणि बांगलादेश, सोडला तर, जिंकणारा प्रत्येक संघ आपला ... त्यांनी आयुष्यभर, मनापासून क्रिकेटचा आनंद घेतला ...

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

ईशांतला परदेशात खेळलेल्या ६२ कसोटी सामन्यात १९९ बळी मिळालेत आणि भारतात खेळलेल्या ३५ कसोटी सामन्यात ९८ बळी मिळालेत.

सौंदाळा, संघनिवडीवर कर्णधाराची छाप असतेच. बघूया कोहली काय करतो ते. अन्यथा राहणेस कर्णधार बनवणं इष्टं ठरावं. कोहली जबाबदारीतून मोकळा झाला की तो अधिक उपयुक्त ठरेल. आ.न., -गा.पै.

पहिल्या कसोटीत इंग्लंडची दमदार फलंदाजी आणि जो रुटचे शानदार द्विशतक. इंग्लंड आता ही कसोटी अजिबातच हरणार नाही. भारताच्या पहिल्या डावावर, कदाचित उद्या दिवस अखेरीस सामन्याचे चित्र स्पष्ट होईल.

हातातली मॅच घालवतात ... एक कॅच सुटला की, एक कोटी रूपये दंड लावला पाहिजे ...हलकेच घ्या ... असे काही होणार नाही ...

इंग्लंड दिवसाखेर ५५५/८ (१८०.०). जो रूट बाद झाल्यानंतर इंग्लंड ४७६/६ (१५४.०) या भक्कम धावसंख्येवर होते. तेव्हाच डाव घोषित केला असता तर दमलेल्या भारताला २४ षटके फलंदाजी करावी लागली असती. परंतु डाव घोषित न करता पुढे २६ षटके खेळून अजून ७९ धावा वाढवून इंग्लंडने काय मिळविले राम जाणे.

भारत ३ र्या दिवसाच्या खेळानंतर बॅकफुट वर गेला आहे. इंग्लंडकडे ३२१ चा लीड आहे.भारत २५७/६. (टिव् टिव भारी पडली की काय)

In reply to by श्रीगुरुजी

सांगता येत नाही. तब्बल दोन दिवस बाकी आहेत. बाकी स्पिन चांगली खेळणारी सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, द्रविड यांची शेवटची पिढी. सध्याचे बहुतांश भारतीय फलंदाज स्पिन गोलंदाजी चाचपडत खेळतात यावर परत शिक्कामोर्तब झाले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हो खरे आहे, रहाणे तर खुप प्रॉब्लेम येतो स्पिन खेळताना, विराट पण आजकाल फार काही आश्वासक वाटत नाही फिरकी समोर

ह्या पंतचे करायचे काय? मस्त खेळत असतांना, इतका बेभरवशी पणा अयोग्य आहे .... इन, नौ-दस रनों की किमत, तुम क्या जानोगे?

इंग्लंड ने दुसर्‍या डावात झटपट १७८ रन केल्या आणि भारता पुढे विजयासाठी ४२० धावांचे आवहान ठेवले आहे पैजारबुवा,

In reply to by श्रीगुरुजी

तुमचा काय अंदाज? सर्व पर्याय शक्य वाटत आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सामना बहुतेक अनिर्णित राहणार. कदाचित इंग्लंड जिंकेल. भारत जिंकण्याची शून्य शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

९० षटकांत ३८० धावा करायच्या आहेत. म्हणजे ४ हून थोडा अधिकचा रन रेट हवा. कसोटीत हे नेहमीच कठीण असते. त्यात खेळपट्टी चांगली हातभर बॉल वळवते आहे. शेवटची इनिंग इथे त्रासदायकच. पुन्हा ऑस्ट्रेलियातील मॅच ची आठवण आली. खात्री आहे की इंग्लंडला देखील तसे वाटले असावे.. म्हणूनच एवढा वेळ लावला डिक्लेअर करायला असावा. पहिल्या दोन सत्रात २५० च्या आसपास धावा गोळा झाल्यात [जास्त विकेट्स न गमावता] तर भारत जिंकण्यासाठी काही प्रयत्न करू शकेल. नाहीतर सामना वाचवण्याशिवाय गत्यंतर नाही.

पाचव्या दिवशी शक्यतो अडीचशे सुद्धा अशक्यप्राय असतात. पण मागील काही वर्षात चौथ्या डावात ३००-३५०+ धावा करण्याचं प्रमाण वाढलंय. कदाचित नवीन पिढीच्या नव्या शैलीचा परिणाम असेल. भारताने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात हा पराक्रम केलाय. आज ड्रॉ ची शक्यता कमी वाटते. कदाचित २५० च्या आत सर्व बाद. नव्वद षटके खेळून काढली तर कदाचित जिंकतील सुद्धा! अन्यथा वाचवण्यासाठी आमला, ए बी डी, दुप्लेसिस यांनी २०१५ च्या दिल्ली कसोटीत जो प्रयत्न केला होता (६३८ चेंडूत ७८ धावा), तो पुजारा, रहाणे, पंत (!) यांना करावा लागेल. कोहली कडून अपेक्षा नाहीत. त्यापेक्षा जास्त मी आजकाल पंत कडून करतो.

पुजारा गेला. भारताच्या पराभवाची शक्यता वाटायला लागलीये. ८५/२. दोन्ही फलंदाजांना लीचने बाद केले. जॅक लीच मधुसूदन पानसरे किंवा ओकीफसारखा भारताला नडणार अशी शंका मनात येतेय.

In reply to by श्रीगुरुजी

खरंय. त्या अँडरसनला कोण चावलंय माहीत नाही. अचानक कसली धारदार बॉलिंग करायला लागलाय. कोहली आणि अश्विन म्हणजे शेवटची जोडी. त्यानंतर कुणी वीस बॉल्स सुद्धा खेळणार नाहीत अशी परिस्थिती आहे. :-( इंग्लंडने या कसोटीत संपूर्ण वर्चस्व गाजवलंय आपल्यावर. होमपीचवर जे आपण करायला हवं ते इंग्लंड करतांना दिसतंय. पुढच्या वेळेस तरी टीम आणिक चांगली निवडतील अशी आशा.

भारत आज भारतासारखाच खेळला.खेळाडु येतात जातात पण संघाचा मुळ स्वभाव कही बदलत नाही. माझ्या मते दोष खेळपट्टी व sg चेंडु यांचा आहे.

In reply to by गोंधळी

पाचव्या दिवशी, फलंदाजी करणे कठीण होते ... आपण जर पहिल्यांदा फलंदाजी केली असती तर, आपण जिंकलो असतो... तरीही, पाचव्या दिवशी, पहिल्या सत्रात, Andersonने कमाल केली ...

दुसरा कसोटी सामना याच मैदानात आहे. २०१५ मधील श्रीलंका दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. २०१७ मधील ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील तीनपैकी दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. २०२०-२१ मधील भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील तीनपैकी दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. आता तसेच व्हावे.

In reply to by श्रीगुरुजी

पण, भारतात टाॅस हा अतिशय महत्वाचा ठरतो ... ह्या कसोटी सामन्यात जर, भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली असती तर, भारतच जिंकला असता...

मला क्रिकेटातलं काहीही कळंत नाही. तरीपण कोहलीच्या नेतृत्वावर मला शंका यायला लागलीये. कोहली सामन्यात नसतांना आणि असतांना ज्या प्रकारे खेळाडू खेळतात त्यावरून ही शंका उद्भवली आहे. कदाचित कर्णधारपदावरून त्याला मोकळीक मिळाल्यास त्याचा खेळ बहरू शकेल. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सहमत फलंदाज म्हणून कोहली श्रेष्ठ आहेच. पण शास्त्रीने कोहलीला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळेच कोहलीची एकाधिकारशाही आहे असे वाटते. कुंबळे औटघटकेचा कोच असताना सरावासाठी खेळाडू वेळेवर आला नाही तर त्याला फैलावर घेत असे हे खेळाडूंना पसंत नव्हते, या विधानावरून कोहलीची मानसिकता लक्षात येते. हा संघ गोलंदाजीत खूपच असमतोल होता.

उद्यापासून याच मैदानात दुसरा कसोटी सामना सुरू होतोय. पण खेळपट्टी शेजारची म्हणजे वेगळी असणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पहिल्या दिवसाच्या खेळाचा परिणाम मॅच वर होण्याची शक्यता आहे ...

नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी. इशांत अजूनही संघात आहे आणि बुमराह जाऊन सिराज आला आहे. नदीम जाऊन कुलदीप यादव आला आहे आणि सुंदरच्या जागी अक्षर पटेल. इशांतचे असणे आणि बुमराह चे जाणे सोडून संघ ठीक वाटत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्वाचा आहे.

कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि सिराज ला आज टीम मध्ये स्थान. बुमराह ला आराम देऊन सिराज ला संधी.