Skip to main content

इंग्लंडचा भारत दौरा

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 03/02/2021 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्‍यावर आला आहे. या दौर्‍यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - कसोटी सामने पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार २४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.

वाचने 54925
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

भारताची तिखट फिरकी गोलंदाजी, इंग्लंड २३/३ कसोटीत रूटचा बळी घेऊन अक्षर पटेलने खाते उघडले.

जेवणाच्या सुट्टी पर्यंत इंग्लंड ३९/४!

८७/६

या चेंडू मध्ये प्रॉब्लेम काय होता ते कळले नाही. commentary करताना सुनील गावस्कर सुद्धा वारंवार 'no shot offered" असं म्हणत होते आणि त्यामुळं रुट नाराज होता. रोहित ने शॉट खेळला की नाही याने काय फरक पडतो? ट्रॅकिंग नुसार तो आऊट नव्हताच ना? ट्रॅकर ने दाखवलं: १. टप्पा ऑफ स्टंप च्या बाहेर होता. - आऊट २. बॉल पॅड ला लागला, ते ऑफ स्टंप बाहेर - आऊट नाही (इम्पॅक्ट स्टंप च्या रेषेत व्हावा लागतो) इथेच क्लिअर झालं की आऊट नाही, त्यामुळे पुढील ट्रॅकिंग लगेच नाही दाखवलं आणि तिसऱ्या पंचाने (रिव्यू चा) निर्णय दिला. थोड्या वेळाने पुढील ट्रॅकिंग दाखवलं. ३. बॉल स्टंपवर आदळला असता - आऊट रुट ची नाराजी कशासाठी होती? शॉट खेळलाच नाही, म्हणून नॉट आउट दिलं असतं तर रिव्ह्यू वाया गेला नसता म्हणून?

In reply to by तुषार काळभोर

The ball must hit in line : The ball must hit the batsman in the region directly between the two wickets. An important exception is that, if the impact is outside the off stump, the batsman can be out LBW if he does not make a genuine attempt to play the ball (that is, if he does not "play a stroke"). If the impact is between wicket and wicket, the playing of a stroke is irrelevant. जर इम्पॅक्ट ऑफ स्टंप च्या बाहेर झाला तर, आणि फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत नसेल तर, तो LBW आउट असतो.

In reply to by तुषार काळभोर

तुषार काळभोर, बाद होण्यासाठी ३ लालबत्ती लागतात हे स्पष्ट करून सांगितल्याबद्दल आभार. दुसरी बत्ती हिरवी असल्याने तिसरी बत्ती बघायची गरज नाही, हे पटलं. cricinfo.com वर काही जणांनी निषेध नोंदवला होता. म्हणून मला शंका आली. आ.न., -गा.पै.

England 116/7 till lunch break. 366 more to win. Looks like only formality is left. Kudos to Ashwin for his century.

तिसरा सामना दिवस रात्र आणि पिंक बॉल नी आहे ज्यात गोलंदाजांना मदत मिळते त्यामुळे अनिर्णित राहण्याची शक्यता नाही

जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची कसोटी. दिवसरात्र असल्यामुळे अजूनच उत्सुकता ताणली गेली आहे. स्पेशली तिसऱ्या सत्रात काय होईल? दव पडून फलंदाजांना मदत मिळेल का? वगैरे धावपट्टीवर भरपूर गवत होते त्याचे काय झाले ते पण माहीत नाही. संघनिवड काय असेल? कसोटीवर पूर्णपणे लक्ष ठेऊन बसणार आहे.

England won the toss and chose to bat. India: 1 Rohit Sharma, 2 Shubman Gill, 3 Cheteshwar Pujara, 4 Virat Kohli (capt), 5 Ajinkya Rahane, 6 Rishabh Pant (wk), 7 R Ashwin, 8 Washington Sundar, 9 Axar Patel, 10 Jasprit Bumrah, 11 Ishant Sharma England: 1 Dom Sibley, 2 Jonny Bairstow, 3 Zak Crawley, 4 Joe Root (capt), 5 Ben Stokes, 6 Ollie Pope, 7 Ben Foakes (wk), 8 Jofra Archer, 9 Jack Leach, 10 James Anderson, 11 Stuart Broad

चहापानापर्यन्त ८१/४

निर्विवादपणे भारताचे सत्र. सामना प्रत्यक्ष बघितला नाही पण अधूनमधून ऑनलाइन स्कोर चेक करत होतो. अश्विनने रुटचा बळी लवकर घेतला. अशीच गोलंदाजी चालू राहिली तर यजमानांचा पहिला डाव आजच आटपेल. बघू आता दुसऱ्या सत्रात काय होतंय. ऑफिसचे काम संपवून तिसऱ्या सत्राचा प्रत्येक चेंडू बघणार आहे.

८१/४ वरून ११२/१०. इंग्लंडचं शेपूट चटकन गुंडाळलं हे फार आवडलं. -गा.पै.

Once in a Blue Moon कामगिरी! बऱ्याचदा वरचे सहा १५० करतात आणि खालचे चार शे सव्वाशे करून जातात.

विराट चुकुन त्रिफलाचित झाला अस वाटले

आपण ९९/३ वरनं ३०० मारणार काय? मारले तर विजय नक्की. -गा.पै.

११७/६

१२५/८

१२५/८

In reply to by श्रीगुरुजी

मी आता क्रिकेट अजिबात बघत नाही पण इंग्लंड ११३ आणि भारत १४५ या धावसंख्येवरून पाकिस्तानच्या १९८७ च्या भारत दौर्‍यातील बंगलोर कसोटी सामना आठवला. हा सामना या जन्मी तरी विसरता येईल असे वाटत नाही. त्या सामन्याची पुनरावृत्ती व्हायला नको. पहिल्या दिवशी पाकिस्तानचा डाव अवघ्या ११६ धावांमध्ये आटोपला आणि भारताने २ बाद ६८ अशी मजल मारली तेव्हा सामन्यावर भारताची बर्‍यापैकी पकड असेल असे वाटले. दुसर्‍या दिवशी शनीवार होता आणि मी शाळेत गेलो होतो.शनीवार असल्यामुळे शाळा अर्धा दिवस होती. दुपारी अडिचच्या सुमारास परत आलो तेव्हा अपेक्षा होती की भारताने बरीच आघाडी मिळवली असेल.पण कुठचे काय.तौसिफ अहमद आणि इक्बाल कासिमची फिरकी चालली आणि भारताचा डाव १४५ धावांमध्ये गुंडाळला गेला आणि अवघी २९ धावांची आघाडी आपल्याला मिळाली.दुसर्‍या दिवसाच्या शेवटापर्यंत पाकिस्तानने ५ बाद दिडशेच्या आसपास धावा केल्या.तिसर्‍या दिवशी रवी शास्त्री आणि मणिंदरसिंगची फिरकी चालली आणि पाकिस्तानचा डाव २४९ धावांमध्ये संपला.भारतापुढे लक्ष्य होते २२१ धावांचे.तिसर्‍या दिवशी दिलीप वेंगसरकर, श्रीकांत हे खंदे मोहरे स्वस्तात गमावून भारताने मजल मारली ४ बाद ९९ पर्यंत. चौथ्या दिवशी भारताची भिस्त होती सुनील गावसकरवर. त्याने एका बाजूने किल्ला लढवून ९६ धावा केल्या.मला वाटते सुनील गावसकरची ही शेवटची कसोटी होती.सुनील बाद झाला तेव्हा भारताने ८ विकेट गमावल्या होत्या आणि धावसंख्या झाली होती १८०. म्हणजे विजय आणखी ४१ धावा दूर होता.अशावेळी रॉजर बिन्नीने शिवलाल यादव आणि मणिंदरसिंग यांना साथीला धरून किल्ला लढवायचा प्रयत्न केला. शिवलाल यादवने एक चौकार आणि रॉजर बिन्नीने एक षटकारही मारला.शिवलाल यादव बाद झाल्यावर शेवटचा फलंदाज होता मणिंदरसिंग. त्याकाळी मणिंदरसिंगने बॉलला बॅट जरी लावली तरी अख्खे स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असे.त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा नव्हत्या.तरीही त्याने एक बाजू लावून धरली.शेवटी एका चेंडूवर रॉजर बिन्नी झेलबाद झाला आणि भारताचा डाव २०५ धावांवर संपला. भारताने सामना १५ धावांनी गमावला होता. त्यावेळी मला खरं सांगायचं तर रडायला आले होते. त्यावेळी ११६ आणि १४५ धावा होत्या तर आता ११३ आणि १४५ आहेत. त्या सामन्याची पुनरावृत्ती व्हायला नको.

रूट ने झक्कास बॉलिंग केली. आता अक्षर पटेल नाचवतोय त्यांना! २००१-०२ च्या भारताच्या न्युझीलंड दौर्‍यची आठवण झाली. तेव्हापण सकाळी उठून टीव्ही लावला की २-३-४ आऊट झालेले असायचे. थोड्या वेळाने कळायचं की हा तिसरा डाव आहे!

In reply to by तुषार काळभोर

अगदी अगदी, ड्रॉप इन पिच हा शब्द तेव्हाच पहिल्यांदा ऐकला. ८०-१२० या रेंजच्या बाहेर शक्यतो कोणताच डाव जायचा नाही.

लय बेकार खेळपट्टी.

कसोटीला खेळपट्टी फ्लॅट नको पण इतकी गोलंदाजीला मदत करणारी नको की जिथे रूट सारखा गोलंडक 5 बळी घेईल ते पण केवळ 8 धावत, अजिबात चांगली पिच नाहीये

In reply to by Vichar Manus

+ १ अक्षर पटेल सुद्धा केवळ दुसऱ्या सामन्यात ११ फलंदाज बाद करण्याएवढा महान गोलंदाज वाटत नाही. हा सामना अजिबात आवडला नाही. क्रिकेटच्या इतिहासातील २४१२ कसोटी सामन्यात २ दिवसांच्या आत संपलेला हा २२ वा सामना. सामना ५ दिवस चालावा व त्यात सतत चढउतार असावे. आजच्या सामन्यापेक्षा सिडने येथील ५ दिवस चालून अनिर्णित राहिलेला आणि त्याच मैदानावर ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करून जिंकलेला सामना जास्त थरारक व आनंददायी होता. भविष्यात अशा खेळपट्ट्या नको.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, सुनील गावसकरच्या मते खेळपट्टी ठीक होती. फलंदाज हाराकिरी करून बाद झाले. विराट कोहली सुद्धा खेळपट्टी व्यवस्थित होती असं म्हणाला. जो रूटनेही खेळपट्टीवर भाष्य केलेलं नाही. ३० पैकी २१ बळी सरळ चेंडूंवर पडले. याचा अर्थ खेळपट्टी उत्तम होती, असा लावू नये. दिनरात सामना असल्याने दिवसाच्या मानाने रात्री वातावरणात आमूलाग्र फरक पडंत असतो. फलंदाज नवीन गुलाबी चेंडू, खेळपट्टी व वातावरणाशी नीटपणे जुळवून घेऊ शकले नाहीत. असं मला वाटतं. मला क्रिकेटातलं फारसं कळंत नाही. मी फक्त पर्यायी दृष्टीकोन मांडतो आहे. आ.न., -गा.पै.

हुर्रे, जिंकलो. पुढची कसोटीसुद्धा जिंकून जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश व्हायला पाहिजे. पिचबद्दल सहमत, 2 दिवस पण खेळ झाला नाही. दिग्गज समालोचक पिच रिपोर्ट सांगताना सपशेल गंडतात हे परत सिद्ध झाले.

कोणी सामना बघतय का नाही? इग्लंड्ची नाणेफेक जिंकुन फलंदाजी आणि पहिल्या डावात १७०/७ सिराजने जो रुट्ची अवघड विकेट लवकर मिळवली.

पंतचे अर्धशतक, भारत १९६/६ गिल, पुजारा, कोहली सपशेल अपयशी, रहाणे परत एकदा बरी सुरुवात करुन जम बसतोय असे वाटत असताना बाद. ३०-५० धावांची आघाडीसुद्धा महत्वपुर्ण ठरु शकते. खेळपट्टीपेक्षा फलंदाजांचा कमी झालेला संयम हेच फलंदाज पटापट बाद होण्याचे कारण वाटत आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा, माझ्या मते इंग्लंडचे गोलंदाज अँडरसन व स्टोक्स अप्रतिम आहेत. पण त्यांना इतरांकडून पुरेसा हातभार लाभंत नाहीये. त्यामुळे ते दमतात. अर्थात, हे पंतच्या पथ्यावर पडलं. वरच्या फलंदाजांनी बोथट केलेली धार तिसऱ्या सत्रात कामी आली. आ.न., -गा.पै.

सुंदर चं शतक दुर्दैवाने हुकलं. ९६वर नाबाद राहिला. सिराज ला नक्कीच वाईट वाटलं असेल. असो. परत घसरगुंडी सुरू झालीय. ४८/४ . हे टाईप होईपर्यंत ५८/४ झालेत. नुकताच पोपने आश्विनला लाँगऑनला एक उत्तुंग षटकार ठोकला आहे.

एक डाव आणि २५ धावांनी भारताचा विजय. अक्षर, अश्विनचे ५-५ बळी भारताने मालिका ३ -१ ने जिंकली. आता जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारत - न्यूझीलंड अंतिम सामना लोर्ड्सवर (कदाचित) जूनमध्ये होईल. त्याआधी आयपीएल सामने असतील आणि नंतर लगेच खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस कसा असेल सांगता येणार नाही. आता एकदिवसीय सामने संपले की आयपीएलचे पडघम वाजायला सुरुवात होईलच.

पहिला कसोटी सामना वगळता अगदीच एकतर्फी मालिका झाली. इंग्लंडची रोटेशन पॉलिसी सुद्धा इंग्लंडला भोवली. मालिकेत मजा आली नाही.

पहिल्या डावात ४ बळी व दुसऱ्या डावात ५ बळी. पहिल्या डावात ४३ धावा. ही अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी सामनावीर पुरस्कारासाठी खूप कमी पडली. माझ्या दृष्टीने या सामन्यात हीच कामगिरी सर्वोत्तम आहे. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात ०/१ अशा अवस्थेत केवळ तिसऱ्या चेंडूवर खेळायला आलेल्या गंभीरने एक बाजू लावून धरून ९७ धावा केल्या. ०/१ वरून ३१/२ व नंतर ११४/३ अशी स्थिती होती. २२३ धावा असताना गंभीर बाद झाला तेव्हा सामना भारताच्या खिशात होता. सामन्यातील सर्वोत्तम खेळी गंभीरची होती. परंतु धोनीला सामनावीर पुरस्कार दिला. २००७ मधील ट-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात गंभीरने ५४ चेंडूत ७५ धावा करूनही १६ धावात ३ बळी घेतलेल्या इरफान पठाणला सामनावीर पुरस्कार दिला होता. त्या सामन्यात रूद्र प्रताप सिंगने सुद्धा २६ धावात ३ बळी घेतले होते. भारतातर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या धावा ३० होत्या (रोहीत शर्मा).

भारताने ट-२० मालिका ३-२ अशी जिंकली. ११ षटकांत १२०/१ अशा भक्कम स्थितीतून इंग्लंड ढेपाळले. आता २३ मार्च, २६ मार्च व २८ मार्चला पुण्यात एकदिवसीय सामने.

In reply to by श्रीगुरुजी

कोहलीला चांगलाच सुर गवसला आहे. वन डे मधे पण भारताचे पारडेच जड असेल असं वाटतय

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तर, इंग्लंडचा संघ, रणनीति आणि गुणवत्ता घेऊन खेळतो... त्यामुळे, टाॅस महत्वाचा आहे.... पहिल्यांदा बॅटिंग करून किमान 340च्या आसपास रन्स कराव्या लागतील.. इंग्लंडचे, बटलर, करन बंधू, बेयरस्टो, जेसन राॅय, बेन स्टोक्स आणि मोईन अली, 300-325 टार्गेट सहज पार करू शकतात... डे-नाईट मॅच असेल तर, नंतर बॅटिंग करणे, अवघड होईल...

एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ - इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड आर्चर पाठदुखीमुळे घरी गेला. ख्रिस वोक्सला एकही सामना खेळविला नाही.