इंग्लंडचा भारत दौरा

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
3 Feb 2021 - 10:31 pm
गाभा: 

सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्‍यावर आला आहे. या दौर्‍यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -

कसोटी सामने

पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे

दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे

तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार
२४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे

चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे

ट-२० सामने

पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे

दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे

तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे

चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे

पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे

एकदिवसीय सामने

पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे

दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे

तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे

भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 10:45 pm | मुक्त विहारि

इंग्लंडला हरवणे, कठीण जाणार ...

पहिला प्रतिसाद दिला...

जीवन मोहिते, यांनी इथे लेखन प्रकाशित करणे बंद केले आणि पहिल्या प्रतिसादाची चढाओढ संपली...

निदान त्या पहिल्या प्रतिसादाची चढाओढ परत सुरू करण्यासाठी तरी, जीवन मोहिते, यांनी परत लेख लिहीणे सुरू करायला हवे ....

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2021 - 11:17 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड संघ -

जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, झेक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिबले, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स

भारत संघ -

कोहली, रहाणे, मयंक आगरवाल, अश्विन, बुमराह, कुलदीप, सिराज, हार्दिक पंड्या, पंत, अक्षर पटेल, पुजारा, राहुल, साहा, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा, शुभमन गिल, ठाकूर, सुंदर

६००+ फलंदाज बाद करणारा जेम्स अँडरसन आणि ५००+ फलंदाज बाद करणारा स्टुअर्ट ब्रॉड भारतात कितपत यशस्वी ठरेल हे सांगणे अवघड आहे. जो रूट, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स नक्कीच यशस्वी ठरतील. उर्वरीत खेळाडूंपैकी बरेच जण प्रथमच भारतात खेळत आहेत.

भारतातर्फे कुलदीप यादव नक्कीच संघात असेल. ईशांत शर्मा भारतात फारसा यशस्वी ठरत नसल्याने सिराज किंवा ठाकूर संघात असावा.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 7:12 am | मुक्त विहारि

वाचत आहे

सौंदाळा's picture

4 Feb 2021 - 2:14 pm | सौंदाळा

काही वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेला असताना अँडरसनने कोहलीला टोमणा मारला होता की कोहली फक्त भारतीय खेळपट्टीवर चांगला खेळतो.
आणि आश्चर्यकारकरीत्या त्याला दुसऱ्या दिवशी प्रतिउत्तर कोणी दिले असेल, इंझमाम उल हक!!!
इंझमाम म्हणाला अँडरसन दुसऱ्याला बोलतोय पण तो स्वतः तरी भारतीय उपखंडात कुठे बळी मिळवू शकलाय, त्याने कोहलीला शिकवू नये.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 2:35 pm | श्रीगुरुजी

३८ वर्षीय जेम्स अँडरसनने १५०+ कसोटी सामन्यात ६००+ फलंदाज बाद केले आहेत. परंतु भारतात खेळलेल्या १० कसोटीत तो फक्त २६ फलंदाज बाद करू शकलाय.

३४ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडने ५००+ फलंदाज बाद केलेत. परंतु भारतात ६ कसोटी सामन्यात त्याचे फक्त १० बळी आहेत.

मालिका नेहेमीप्रमाणे फॉलो करत आहे...
कुठल्या वाहिनीवर पाहता येईल? दूरदर्शन दाखवणार का?

नाहीतर जियो टीव्ही आहेच.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 2:07 pm | श्रीगुरुजी

Live telecast on Star Sports network and Hotstar.

गोंधळी's picture

4 Feb 2021 - 2:17 pm | गोंधळी

भारत मालिका जिंकेल पण... काहीही होउ शकत (ft. Australia Tour). इंग्लंडला कमी लेखुन चालणार नाही.

अमर विश्वास's picture

4 Feb 2021 - 3:37 pm | अमर विश्वास

आपले फलंदाज बऱ्यापैकी धावा करतील ...
रोहित - शुभमन या सलामीच्या जोडीवर विशेष लक्ष असेल...
आणि अर्थातच रिषभ पंत वर ....

गोलंदाजीत जडेजाची उणीव जाणवेल ...

जर अश्विनला कुलदीपची योग्य साथ मिळाली तर भारत जिंकेल....

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 5:23 pm | मुक्त विहारि

क्षेत्ररक्षण, हा आपला अतिशय कच्चा भाग आहे ..

जॅक द रिपर's picture

4 Feb 2021 - 11:26 pm | जॅक द रिपर

India will beat England hands down.
At least 3-0

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 7:38 am | मुक्त विहारि

असं झालं तर उत्तम

नाणेफेक जिंकून इंग्लडची प्रथम फलंदाजी
नदीमला संधी. शार्दूल, सिराजपैकी कोणालाच संधी नाही. याचा त्यांच्या मनोधैर्यावर आणि खेळावर विपरीत परिणाम होऊ नये.
संघ निवडीवर कोहलीची छाप वाटतेय.

सौंदाळा's picture

5 Feb 2021 - 9:28 am | सौंदाळा

आणि एक
कोरोनाच्या धास्तीमुळे ४ कसोटीसाठी २ मैदाने हे काही पटले नाही.
एकदिवसीय आणि ट२० ठीक आहे पण कसोटी क्रिकेट मध्ये व्हेन्यू पण महत्वाची भूमिका बजावतो आणि मजा आणतो

इंग्लंड जर आपल्या स्पिन ला योग्य पद्धतीने सामोरे गेला तर ते जिंकू शकतात..

बघू काय होतेय ते

इंग्लंड जिकेल असेच वाटत होते, आणि ते खरे होताना दिसतेय

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2021 - 11:17 am | श्रीगुरुजी

दुर्दैव आपलं.

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 1:56 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड १२७/२

गोलंदाजीत फारसा दम दिसत नाही. फलंदाजी सुद्धा कंटाळवाणी सुरू आहे. या वेगाने आज फार तर सव्वादोनशे धावा होतील.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 2:09 pm | मुक्त विहारि

आपले क्षेत्ररक्षण कधी सुधारणार?

हा प्रश्र्न तुम्हाला नाही ...

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 5:11 pm | श्रीगुरुजी

दिवसाखेर २६३/३ (८९.३)

शेवटच्या षटकांत सिबले ८७ वर बाद झाल्याने खेळ थांबला. जो रूट १२७ धावांवर खेळतोय.

अमर विश्वास's picture

5 Feb 2021 - 5:47 pm | अमर विश्वास

आपण साडेतीन बॉलर्स घेऊन खेळतोय ...

बुमरा, ईशांत आणि अश्विन हे तीन ..... सुंदर आणि नदीम मिळून अर्धा ....

जडेजाची उणीव जाणवतेय ... कुलदीप आणि कोहली चे काय फाटलंय माहित नाही ...

ही कसोटी अनिर्णित राखली तरी उत्तम

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 6:04 pm | श्रीगुरुजी

खरं तर तीनच. कुलदीप असताना नदीम चहाबाजला का घेतले? ईशांतला भारतात क्वचितच यश मिळते हा इतिहास माहिती असताना सिराज ऐवजी त्याला का घेतले?

राघव's picture

5 Feb 2021 - 6:09 pm | राघव

नटराजन कुठे गेला?

सौंदाळा's picture

5 Feb 2021 - 7:21 pm | सौंदाळा

ईशांतला भारतात क्वचितच यश मिळते
पूर्णपणे सहमत, सकाळीच लिहिणार होतो पण म्हटलं कुठं सुरुवातीलाच नाट लावायचा.
अनाकलनीय सिलेक्शन आहे.
यावरुन आता कोहली आणि रहाणे मधे अंतर्गत धुसफुस सुरु होऊ नये म्हणजे मिळवली.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 7:42 pm | मुक्त विहारि

चालायचेच...

खेळ त्यांचा, पैसे त्यांचे, मग मनस्ताप आपण कशाला घ्या?

खेळाचा आनंद लुटायचा ....

अमर विश्वास's picture

5 Feb 2021 - 7:49 pm | अमर विश्वास

मुवि ...

जिंकलो तर जास्त आनंद होतो हो

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 8:08 pm | मुक्त विहारि

पण 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात ...

1. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसे संघ निवडणे ...

2. काही गोष्टी आपल्या हातात असतात, वेळ मिळाला की मॅच बघणे

3. त्यामुळे, खेळाचा आनंद लुटायचा ....

ह्या बाबतीत आमचे सासरे उत्तम म्हणायचे, त्यांच्या मते, पाकिस्तान आणि बांगलादेश, सोडला तर, जिंकणारा प्रत्येक संघ आपला ...

त्यांनी आयुष्यभर, मनापासून क्रिकेटचा आनंद घेतला ...

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 8:11 pm | श्रीगुरुजी

ईशांतला परदेशात खेळलेल्या ६२ कसोटी सामन्यात १९९ बळी मिळालेत आणि भारतात खेळलेल्या ३५ कसोटी सामन्यात ९८ बळी मिळालेत.

गामा पैलवान's picture

6 Feb 2021 - 12:02 am | गामा पैलवान

सौंदाळा,

संघनिवडीवर कर्णधाराची छाप असतेच. बघूया कोहली काय करतो ते.

अन्यथा राहणेस कर्णधार बनवणं इष्टं ठरावं. कोहली जबाबदारीतून मोकळा झाला की तो अधिक उपयुक्त ठरेल.

आ.न.,
-गा.पै.

गणेशा's picture

6 Feb 2021 - 2:42 am | गणेशा

Dream ११ भारी team झालीये माझी.. बघू..

https://photos.app.goo.gl/zeu9EkxERPNR4tRV8

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2021 - 8:08 am | श्रीगुरुजी

भारी टीम आहे.

गोंधळी's picture

6 Feb 2021 - 10:42 am | गोंधळी

रुट बहुतेक परत २०० करणार. खेळपट्टी अगदिच निर्जिव वाटतेय.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 10:50 am | मुक्त विहारि

काही सांगता येत नाही ...

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2021 - 1:55 pm | श्रीगुरुजी

षटकार मारून जो रूटचे द्विशतक पूर्ण

४४०/४

गोंधळी's picture

6 Feb 2021 - 2:25 pm | गोंधळी

३०० ही आरामात होउ शकतात.(करुन नायर प्रमाणे).

सौंदाळा's picture

6 Feb 2021 - 3:27 pm | सौंदाळा

पहिल्या कसोटीत इंग्लंडची दमदार फलंदाजी आणि जो रुटचे शानदार द्विशतक.
इंग्लंड आता ही कसोटी अजिबातच हरणार नाही. भारताच्या पहिल्या डावावर, कदाचित उद्या दिवस अखेरीस सामन्याचे चित्र स्पष्ट होईल.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 5:04 pm | मुक्त विहारि

हातातली मॅच घालवतात ...

एक कॅच सुटला की, एक कोटी रूपये दंड लावला पाहिजे ...हलकेच घ्या ... असे काही होणार नाही ...

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2021 - 8:18 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड दिवसाखेर ५५५/८ (१८०.०).

जो रूट बाद झाल्यानंतर इंग्लंड ४७६/६ (१५४.०) या भक्कम धावसंख्येवर होते. तेव्हाच डाव घोषित केला असता तर दमलेल्या भारताला २४ षटके फलंदाजी करावी लागली असती. परंतु डाव घोषित न करता पुढे २६ षटके खेळून अजून ७९ धावा वाढवून इंग्लंडने काय मिळविले राम जाणे.

गोंधळी's picture

7 Feb 2021 - 6:55 pm | गोंधळी

भारत ३ र्या दिवसाच्या खेळानंतर बॅकफुट वर गेला आहे. इंग्लंडकडे ३२१ चा लीड आहे.भारत २५७/६.
(टिव् टिव भारी पडली की काय)

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2021 - 7:06 pm | श्रीगुरुजी

तरीसुद्धा सामना अनिर्णित होणार.

सौंदाळा's picture

7 Feb 2021 - 8:55 pm | सौंदाळा

सांगता येत नाही.
तब्बल दोन दिवस बाकी आहेत.
बाकी स्पिन चांगली खेळणारी सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, द्रविड यांची शेवटची पिढी. सध्याचे बहुतांश भारतीय फलंदाज स्पिन गोलंदाजी चाचपडत खेळतात यावर परत शिक्कामोर्तब झाले.

हो खरे आहे, रहाणे तर खुप प्रॉब्लेम येतो स्पिन खेळताना, विराट पण आजकाल फार काही आश्वासक वाटत नाही फिरकी समोर

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 9:04 pm | मुक्त विहारि

ह्या पंतचे करायचे काय?

मस्त खेळत असतांना, इतका बेभरवशी पणा अयोग्य आहे ....

इन, नौ-दस रनों की किमत, तुम क्या जानोगे?

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Feb 2021 - 4:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

इंग्लंड ने दुसर्‍या डावात झटपट १७८ रन केल्या आणि भारता पुढे विजयासाठी ४२० धावांचे आवहान ठेवले आहे

पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

8 Feb 2021 - 5:05 pm | श्रीगुरुजी

भारत दिवसाखेर ३९/१. ४२० धावांचे लक्ष्य आहे.

सौंदाळा's picture

8 Feb 2021 - 5:10 pm | सौंदाळा

तुमचा काय अंदाज?
सर्व पर्याय शक्य वाटत आहेत.

श्रीगुरुजी's picture

8 Feb 2021 - 5:13 pm | श्रीगुरुजी

सामना बहुतेक अनिर्णित राहणार. कदाचित इंग्लंड जिंकेल. भारत जिंकण्याची शून्य शक्यता आहे.

राघव's picture

9 Feb 2021 - 2:18 am | राघव

९० षटकांत ३८० धावा करायच्या आहेत. म्हणजे ४ हून थोडा अधिकचा रन रेट हवा. कसोटीत हे नेहमीच कठीण असते. त्यात खेळपट्टी चांगली हातभर बॉल वळवते आहे. शेवटची इनिंग इथे त्रासदायकच.

पुन्हा ऑस्ट्रेलियातील मॅच ची आठवण आली. खात्री आहे की इंग्लंडला देखील तसे वाटले असावे.. म्हणूनच एवढा वेळ लावला डिक्लेअर करायला असावा.

पहिल्या दोन सत्रात २५० च्या आसपास धावा गोळा झाल्यात [जास्त विकेट्स न गमावता] तर भारत जिंकण्यासाठी काही प्रयत्न करू शकेल. नाहीतर सामना वाचवण्याशिवाय गत्यंतर नाही.

तुषार काळभोर's picture

9 Feb 2021 - 7:54 am | तुषार काळभोर

पाचव्या दिवशी शक्यतो अडीचशे सुद्धा अशक्यप्राय असतात.
पण मागील काही वर्षात चौथ्या डावात ३००-३५०+ धावा करण्याचं प्रमाण वाढलंय. कदाचित नवीन पिढीच्या नव्या शैलीचा परिणाम असेल.
भारताने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात हा पराक्रम केलाय.

आज ड्रॉ ची शक्यता कमी वाटते. कदाचित २५० च्या आत सर्व बाद.

नव्वद षटके खेळून काढली तर कदाचित जिंकतील सुद्धा! अन्यथा वाचवण्यासाठी आमला, ए बी डी, दुप्लेसिस यांनी २०१५ च्या दिल्ली कसोटीत जो प्रयत्न केला होता (६३८ चेंडूत ७८ धावा), तो पुजारा, रहाणे, पंत (!) यांना करावा लागेल. कोहली कडून अपेक्षा नाहीत. त्यापेक्षा जास्त मी आजकाल पंत कडून करतो.

सकाळच्या सत्रात विकेट जायला नको .....

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2021 - 10:14 am | श्रीगुरुजी

पुजारा गेला. भारताच्या पराभवाची शक्यता वाटायला लागलीये. ८५/२. दोन्ही फलंदाजांना लीचने बाद केले. जॅक लीच मधुसूदन पानसरे किंवा ओकीफसारखा भारताला नडणार अशी शंका मनात येतेय.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 10:29 am | मुक्त विहारि

कठीण आहे

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2021 - 11:12 am | श्रीगुरुजी

१२०/६. पराभवाची फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सिडने कसोटीसारखी फलंदाजी करणे आवश्यक आहे.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 11:20 am | मुक्त विहारि

Vs India

खरंय. त्या अँडरसनला कोण चावलंय माहीत नाही. अचानक कसली धारदार बॉलिंग करायला लागलाय.

कोहली आणि अश्विन म्हणजे शेवटची जोडी.
त्यानंतर कुणी वीस बॉल्स सुद्धा खेळणार नाहीत अशी परिस्थिती आहे. :-(

इंग्लंडने या कसोटीत संपूर्ण वर्चस्व गाजवलंय आपल्यावर. होमपीचवर जे आपण करायला हवं ते इंग्लंड करतांना दिसतंय.
पुढच्या वेळेस तरी टीम आणिक चांगली निवडतील अशी आशा.

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2021 - 1:20 pm | श्रीगुरुजी

दोघेही गेले. १७९/९.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 1:26 pm | मुक्त विहारि

टाॅस जिंकला पाहिजे....

टाॅस जिंकला तो मॅच जिंकला, असे झाले असावे ....

गोंधळी's picture

9 Feb 2021 - 1:53 pm | गोंधळी

भारत आज भारतासारखाच खेळला.खेळाडु येतात जातात पण संघाचा मुळ स्वभाव कही बदलत नाही.
माझ्या मते दोष खेळपट्टी व sg चेंडु यांचा आहे.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 5:06 pm | मुक्त विहारि

पाचव्या दिवशी, फलंदाजी करणे कठीण होते ...

आपण जर पहिल्यांदा फलंदाजी केली असती तर, आपण जिंकलो असतो...

तरीही, पाचव्या दिवशी, पहिल्या सत्रात, Andersonने कमाल केली ...

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2021 - 11:08 pm | श्रीगुरुजी

दुसरा कसोटी सामना याच मैदानात आहे.

२०१५ मधील श्रीलंका दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली.

२०१७ मधील ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील तीनपैकी दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली.

२०२०-२१ मधील भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत पहिला कसोटी सामना हरला पण पुढील तीनपैकी दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली.

आता तसेच व्हावे.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 9:26 am | मुक्त विहारि

पण,

भारतात टाॅस हा अतिशय महत्वाचा ठरतो ...

ह्या कसोटी सामन्यात जर, भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली असती तर, भारतच जिंकला असता...

गामा पैलवान's picture

10 Feb 2021 - 12:36 am | गामा पैलवान

मला क्रिकेटातलं काहीही कळंत नाही. तरीपण कोहलीच्या नेतृत्वावर मला शंका यायला लागलीये. कोहली सामन्यात नसतांना आणि असतांना ज्या प्रकारे खेळाडू खेळतात त्यावरून ही शंका उद्भवली आहे. कदाचित कर्णधारपदावरून त्याला मोकळीक मिळाल्यास त्याचा खेळ बहरू शकेल.
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 9:27 am | मुक्त विहारि

कोहली थोडासा हुकूमशाही पद्धतीने वागतो...

सौंदाळा's picture

10 Feb 2021 - 9:55 am | सौंदाळा

सहमत
फलंदाज म्हणून कोहली श्रेष्ठ आहेच. पण
शास्त्रीने कोहलीला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळेच कोहलीची एकाधिकारशाही आहे असे वाटते. कुंबळे औटघटकेचा कोच असताना सरावासाठी खेळाडू वेळेवर आला नाही तर त्याला फैलावर घेत असे हे खेळाडूंना पसंत नव्हते, या विधानावरून कोहलीची मानसिकता लक्षात येते.
हा संघ गोलंदाजीत खूपच असमतोल होता.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2021 - 10:59 pm | श्रीगुरुजी

उद्यापासून याच मैदानात दुसरा कसोटी सामना सुरू होतोय. पण खेळपट्टी शेजारची म्हणजे वेगळी असणार आहे.

मुक्त विहारि's picture

13 Feb 2021 - 8:20 am | मुक्त विहारि

पहिल्या दिवसाच्या खेळाचा परिणाम मॅच वर होण्याची शक्यता आहे ...

नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी. इशांत अजूनही संघात आहे आणि बुमराह जाऊन सिराज आला आहे. नदीम जाऊन कुलदीप यादव आला आहे आणि सुंदरच्या जागी अक्षर पटेल. इशांतचे असणे आणि बुमराह चे जाणे सोडून संघ ठीक वाटत आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्वाचा आहे.

रात्रीचे चांदणे's picture

13 Feb 2021 - 9:20 am | रात्रीचे चांदणे

कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि सिराज ला आज टीम मध्ये स्थान. बुमराह ला आराम देऊन सिराज ला संधी.

श्रीगुरुजी's picture

13 Feb 2021 - 11:24 am | श्रीगुरुजी

भारत ९०/३

भारताची तिखट फिरकी गोलंदाजी, इंग्लंड २३/३
कसोटीत रूटचा बळी घेऊन अक्षर पटेलने खाते उघडले.

तुषार काळभोर's picture

14 Feb 2021 - 12:07 pm | तुषार काळभोर

जेवणाच्या सुट्टी पर्यंत इंग्लंड ३९/४!

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2021 - 1:25 pm | श्रीगुरुजी

८७/६

फिरकी चालणार होती आणि त्यात टॉस जिंकला तेथेच भारताचा विजय निश्चित झालाय

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2021 - 2:27 pm | श्रीगुरुजी

चहापानापर्यंत १०६/८

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2021 - 3:42 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड सर्वबाद १३४. भारताला १९५ धावांची आघाडी. भारत दुसऱ्या डावात ३५/०.

गामा पैलवान's picture

14 Feb 2021 - 4:38 pm | गामा पैलवान

रोहित शर्मा १२.२ वर पायचीत होता म्हणे. पंचांनी रडीचा डाव खेळला वाटतं!
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

14 Feb 2021 - 4:50 pm | मुक्त विहारि

मानवी चुका ...

मुद्दाम केलेले नाही..

कानडाऊ योगेशु's picture

14 Feb 2021 - 5:28 pm | कानडाऊ योगेशु

रिव्यु घेतला नाही का इंग्लंडने.?
क्रिकेट पाहणे कधीच सोडुन दिले आहे.

मुक्त विहारि's picture

14 Feb 2021 - 7:52 pm | मुक्त विहारि

तिसर्या पंचाने, नीट चेक केले नाही ....

तुषार काळभोर's picture

14 Feb 2021 - 8:10 pm | तुषार काळभोर

या चेंडू मध्ये प्रॉब्लेम काय होता ते कळले नाही.
commentary करताना सुनील गावस्कर सुद्धा वारंवार 'no shot offered" असं म्हणत होते आणि त्यामुळं रुट नाराज होता.
रोहित ने शॉट खेळला की नाही याने काय फरक पडतो? ट्रॅकिंग नुसार तो आऊट नव्हताच ना?

ट्रॅकर ने दाखवलं: १. टप्पा ऑफ स्टंप च्या बाहेर होता. - आऊट
२. बॉल पॅड ला लागला, ते ऑफ स्टंप बाहेर - आऊट नाही (इम्पॅक्ट स्टंप च्या रेषेत व्हावा लागतो)
इथेच क्लिअर झालं की आऊट नाही, त्यामुळे पुढील ट्रॅकिंग लगेच नाही दाखवलं आणि तिसऱ्या पंचाने (रिव्यू चा) निर्णय दिला.
थोड्या वेळाने पुढील ट्रॅकिंग दाखवलं.
३. बॉल स्टंपवर आदळला असता - आऊट

रुट ची नाराजी कशासाठी होती?
शॉट खेळलाच नाही, म्हणून नॉट आउट दिलं असतं तर रिव्ह्यू वाया गेला नसता म्हणून?

तुषार काळभोर's picture

14 Feb 2021 - 8:20 pm | तुषार काळभोर

The ball must hit in line : The ball must hit the batsman in the region directly between the two wickets. An important exception is that, if the impact is outside the off stump, the batsman can be out LBW if he does not make a genuine attempt to play the ball (that is, if he does not "play a stroke"). If the impact is between wicket and wicket, the playing of a stroke is irrelevant.

जर इम्पॅक्ट ऑफ स्टंप च्या बाहेर झाला तर, आणि फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत नसेल तर, तो LBW आउट असतो.

गामा पैलवान's picture

14 Feb 2021 - 8:24 pm | गामा पैलवान

तुषार काळभोर,

बाद होण्यासाठी ३ लालबत्ती लागतात हे स्पष्ट करून सांगितल्याबद्दल आभार. दुसरी बत्ती हिरवी असल्याने तिसरी बत्ती बघायची गरज नाही, हे पटलं.

cricinfo.com वर काही जणांनी निषेध नोंदवला होता. म्हणून मला शंका आली.

आ.न.,
-गा.पै.

Ujjwal's picture

16 Feb 2021 - 12:03 pm | Ujjwal

England 116/7 till lunch break. 366 more to win. Looks like only formality is left. Kudos to Ashwin for his century.

नीलस्वप्निल's picture

16 Feb 2021 - 1:30 pm | नीलस्वप्निल

भारत जिन्कला

श्रीगुरुजी's picture

16 Feb 2021 - 10:47 pm | श्रीगुरुजी

अपेक्षेप्रमाणे भारत जिंकला. आता तिसरा सामना बहुतेक अनिर्णित होईल व चौथा भारत जिंकेल.

तिसरा सामना दिवस रात्र आणि पिंक बॉल नी आहे ज्यात गोलंदाजांना मदत मिळते त्यामुळे अनिर्णित राहण्याची शक्यता नाही

सौंदाळा's picture

24 Feb 2021 - 10:53 am | सौंदाळा

जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची कसोटी.
दिवसरात्र असल्यामुळे अजूनच उत्सुकता ताणली गेली आहे. स्पेशली तिसऱ्या सत्रात काय होईल? दव पडून फलंदाजांना मदत मिळेल का? वगैरे
धावपट्टीवर भरपूर गवत होते त्याचे काय झाले ते पण माहीत नाही. संघनिवड काय असेल?
कसोटीवर पूर्णपणे लक्ष ठेऊन बसणार आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Feb 2021 - 3:11 pm | श्रीगुरुजी

England won the toss and chose to bat.

India: 1 Rohit Sharma, 2 Shubman Gill, 3 Cheteshwar Pujara, 4 Virat Kohli (capt), 5 Ajinkya Rahane, 6 Rishabh Pant (wk), 7 R Ashwin, 8 Washington Sundar, 9 Axar Patel, 10 Jasprit Bumrah, 11 Ishant Sharma

England: 1 Dom Sibley, 2 Jonny Bairstow, 3 Zak Crawley, 4 Joe Root (capt), 5 Ben Stokes, 6 Ollie Pope, 7 Ben Foakes (wk), 8 Jofra Archer, 9 Jack Leach, 10 James Anderson, 11 Stuart Broad

श्रीगुरुजी's picture

24 Feb 2021 - 3:11 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड २७/२

पाटीलभाऊ's picture

24 Feb 2021 - 4:41 pm | पाटीलभाऊ

चहापानापर्यन्त ८१/४

सौंदाळा's picture

24 Feb 2021 - 4:48 pm | सौंदाळा

निर्विवादपणे भारताचे सत्र. सामना प्रत्यक्ष बघितला नाही पण अधूनमधून ऑनलाइन स्कोर चेक करत होतो. अश्विनने रुटचा बळी लवकर घेतला. अशीच गोलंदाजी चालू राहिली तर यजमानांचा पहिला डाव आजच आटपेल. बघू आता दुसऱ्या सत्रात काय होतंय. ऑफिसचे काम संपवून तिसऱ्या सत्राचा प्रत्येक चेंडू बघणार आहे.

अरे यार आज match आहे लक्षातच नव्हते

गामा पैलवान's picture

24 Feb 2021 - 8:08 pm | गामा पैलवान

८१/४ वरून ११२/१०. इंग्लंडचं शेपूट चटकन गुंडाळलं हे फार आवडलं.
-गा.पै.

तुषार काळभोर's picture

24 Feb 2021 - 8:16 pm | तुषार काळभोर

Once in a Blue Moon कामगिरी!
बऱ्याचदा वरचे सहा १५० करतात आणि खालचे चार शे सव्वाशे करून जातात.

नीलस्वप्निल's picture

24 Feb 2021 - 10:07 pm | नीलस्वप्निल

विराट चुकुन त्रिफलाचित झाला अस वाटले

गामा पैलवान's picture

24 Feb 2021 - 10:34 pm | गामा पैलवान

आपण ९९/३ वरनं ३०० मारणार काय? मारले तर विजय नक्की.
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2021 - 3:13 pm | श्रीगुरुजी

११७/६

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2021 - 3:31 pm | श्रीगुरुजी

१२५/८

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2021 - 3:31 pm | श्रीगुरुजी

१२५/८

गणेशा's picture

25 Feb 2021 - 4:14 pm | गणेशा

Root ५ wkts/८ runs / ६.२ overs

Nice spell.

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2021 - 4:43 pm | श्रीगुरुजी

भारत १४५/१०. इंग्लंड ५/२.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Feb 2021 - 6:24 pm | चंद्रसूर्यकुमार

मी आता क्रिकेट अजिबात बघत नाही पण इंग्लंड ११३ आणि भारत १४५ या धावसंख्येवरून पाकिस्तानच्या १९८७ च्या भारत दौर्‍यातील बंगलोर कसोटी सामना आठवला. हा सामना या जन्मी तरी विसरता येईल असे वाटत नाही. त्या सामन्याची पुनरावृत्ती व्हायला नको.

पहिल्या दिवशी पाकिस्तानचा डाव अवघ्या ११६ धावांमध्ये आटोपला आणि भारताने २ बाद ६८ अशी मजल मारली तेव्हा सामन्यावर भारताची बर्‍यापैकी पकड असेल असे वाटले. दुसर्‍या दिवशी शनीवार होता आणि मी शाळेत गेलो होतो.शनीवार असल्यामुळे शाळा अर्धा दिवस होती. दुपारी अडिचच्या सुमारास परत आलो तेव्हा अपेक्षा होती की भारताने बरीच आघाडी मिळवली असेल.पण कुठचे काय.तौसिफ अहमद आणि इक्बाल कासिमची फिरकी चालली आणि भारताचा डाव १४५ धावांमध्ये गुंडाळला गेला आणि अवघी २९ धावांची आघाडी आपल्याला मिळाली.दुसर्‍या दिवसाच्या शेवटापर्यंत पाकिस्तानने ५ बाद दिडशेच्या आसपास धावा केल्या.तिसर्‍या दिवशी रवी शास्त्री आणि मणिंदरसिंगची फिरकी चालली आणि पाकिस्तानचा डाव २४९ धावांमध्ये संपला.भारतापुढे लक्ष्य होते २२१ धावांचे.तिसर्‍या दिवशी दिलीप वेंगसरकर, श्रीकांत हे खंदे मोहरे स्वस्तात गमावून भारताने मजल मारली ४ बाद ९९ पर्यंत. चौथ्या दिवशी भारताची भिस्त होती सुनील गावसकरवर. त्याने एका बाजूने किल्ला लढवून ९६ धावा केल्या.मला वाटते सुनील गावसकरची ही शेवटची कसोटी होती.सुनील बाद झाला तेव्हा भारताने ८ विकेट गमावल्या होत्या आणि धावसंख्या झाली होती १८०. म्हणजे विजय आणखी ४१ धावा दूर होता.अशावेळी रॉजर बिन्नीने शिवलाल यादव आणि मणिंदरसिंग यांना साथीला धरून किल्ला लढवायचा प्रयत्न केला. शिवलाल यादवने एक चौकार आणि रॉजर बिन्नीने एक षटकारही मारला.शिवलाल यादव बाद झाल्यावर शेवटचा फलंदाज होता मणिंदरसिंग. त्याकाळी मणिंदरसिंगने बॉलला बॅट जरी लावली तरी अख्खे स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असे.त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा नव्हत्या.तरीही त्याने एक बाजू लावून धरली.शेवटी एका चेंडूवर रॉजर बिन्नी झेलबाद झाला आणि भारताचा डाव २०५ धावांवर संपला. भारताने सामना १५ धावांनी गमावला होता. त्यावेळी मला खरं सांगायचं तर रडायला आले होते.

त्यावेळी ११६ आणि १४५ धावा होत्या तर आता ११३ आणि १४५ आहेत. त्या सामन्याची पुनरावृत्ती व्हायला नको.

तुषार काळभोर's picture

25 Feb 2021 - 5:37 pm | तुषार काळभोर

रूट ने झक्कास बॉलिंग केली.
आता अक्षर पटेल नाचवतोय त्यांना!

२००१-०२ च्या भारताच्या न्युझीलंड दौर्‍यची आठवण झाली. तेव्हापण सकाळी उठून टीव्ही लावला की २-३-४ आऊट झालेले असायचे. थोड्या वेळाने कळायचं की हा तिसरा डाव आहे!

सौंदाळा's picture

25 Feb 2021 - 5:44 pm | सौंदाळा

अगदी अगदी,
ड्रॉप इन पिच हा शब्द तेव्हाच पहिल्यांदा ऐकला.
८०-१२० या रेंजच्या बाहेर शक्यतो कोणताच डाव जायचा नाही.

नीलस्वप्निल's picture

25 Feb 2021 - 5:47 pm | नीलस्वप्निल

इंग्लंड ५५/४

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2021 - 6:18 pm | श्रीगुरुजी

आजच संपणार असं दिसतंय.

गोंधळी's picture

25 Feb 2021 - 6:48 pm | गोंधळी

लय बेकार खेळपट्टी.

कसोटीला खेळपट्टी फ्लॅट नको पण इतकी गोलंदाजीला मदत करणारी नको की जिथे रूट सारखा गोलंडक 5 बळी घेईल ते पण केवळ 8 धावत, अजिबात चांगली पिच नाहीये

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2021 - 11:10 pm | श्रीगुरुजी

+ १

अक्षर पटेल सुद्धा केवळ दुसऱ्या सामन्यात ११ फलंदाज बाद करण्याएवढा महान गोलंदाज वाटत नाही. हा सामना अजिबात आवडला नाही. क्रिकेटच्या इतिहासातील २४१२ कसोटी सामन्यात २ दिवसांच्या आत संपलेला हा २२ वा सामना.

सामना ५ दिवस चालावा व त्यात सतत चढउतार असावे. आजच्या सामन्यापेक्षा सिडने येथील ५ दिवस चालून अनिर्णित राहिलेला आणि त्याच मैदानावर ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करून जिंकलेला सामना जास्त थरारक व आनंददायी होता.

भविष्यात अशा खेळपट्ट्या नको.

श्रीगुरुजी,

सुनील गावसकरच्या मते खेळपट्टी ठीक होती. फलंदाज हाराकिरी करून बाद झाले. विराट कोहली सुद्धा खेळपट्टी व्यवस्थित होती असं म्हणाला. जो रूटनेही खेळपट्टीवर भाष्य केलेलं नाही.

३० पैकी २१ बळी सरळ चेंडूंवर पडले. याचा अर्थ खेळपट्टी उत्तम होती, असा लावू नये. दिनरात सामना असल्याने दिवसाच्या मानाने रात्री वातावरणात आमूलाग्र फरक पडंत असतो. फलंदाज नवीन गुलाबी चेंडू, खेळपट्टी व वातावरणाशी नीटपणे जुळवून घेऊ शकले नाहीत. असं मला वाटतं.

मला क्रिकेटातलं फारसं कळंत नाही. मी फक्त पर्यायी दृष्टीकोन मांडतो आहे.

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

26 Feb 2021 - 4:01 pm | मुक्त विहारि

अशी गोष्ट आहे ....

त्यामुळे, खेळपट्टी योग्यच होती...

Vichar Manus's picture

25 Feb 2021 - 7:44 pm | Vichar Manus

* गोलंदाज

नीलस्वप्निल's picture

25 Feb 2021 - 7:53 pm | नीलस्वप्निल

भारत जिन्कला :)

सौंदाळा's picture

25 Feb 2021 - 11:53 pm | सौंदाळा

हुर्रे, जिंकलो.
पुढची कसोटीसुद्धा जिंकून जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश व्हायला पाहिजे.
पिचबद्दल सहमत, 2 दिवस पण खेळ झाला नाही. दिग्गज समालोचक पिच रिपोर्ट सांगताना सपशेल गंडतात हे परत सिद्ध झाले.

केवळ आपण जिंकतो म्हणून अशा खेळपट्टीचे समर्थन करणे योग्य नाही

सौंदाळा's picture

4 Mar 2021 - 3:13 pm | सौंदाळा

कोणी सामना बघतय का नाही?
इग्लंड्ची नाणेफेक जिंकुन फलंदाजी आणि पहिल्या डावात १७०/७
सिराजने जो रुट्ची अवघड विकेट लवकर मिळवली.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2021 - 3:18 pm | श्रीगुरुजी

बघतोय. कंटाळवाणा खेळ चाललाय.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2021 - 4:16 pm | श्रीगुरुजी

सर्वबाद २०५. भारत ०/१.

गामा पैलवान's picture

4 Mar 2021 - 4:25 pm | गामा पैलवान

आपण ४००+ केले तर विजय नक्की.
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 4:26 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

सौंदाळा's picture

5 Mar 2021 - 3:30 pm | सौंदाळा

पंतचे अर्धशतक, भारत १९६/६
गिल, पुजारा, कोहली सपशेल अपयशी, रहाणे परत एकदा बरी सुरुवात करुन जम बसतोय असे वाटत असताना बाद.
३०-५० धावांची आघाडीसुद्धा महत्वपुर्ण ठरु शकते.
खेळपट्टीपेक्षा फलंदाजांचा कमी झालेला संयम हेच फलंदाज पटापट बाद होण्याचे कारण वाटत आहे.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 3:39 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

सौंदाळा,

माझ्या मते इंग्लंडचे गोलंदाज अँडरसन व स्टोक्स अप्रतिम आहेत. पण त्यांना इतरांकडून पुरेसा हातभार लाभंत नाहीये. त्यामुळे ते दमतात. अर्थात, हे पंतच्या पथ्यावर पडलं. वरच्या फलंदाजांनी बोथट केलेली धार तिसऱ्या सत्रात कामी आली.

आ.न.,
-गा.पै.

तुषार काळभोर's picture

6 Mar 2021 - 1:30 pm | तुषार काळभोर

सुंदर चं शतक दुर्दैवाने हुकलं. ९६वर नाबाद राहिला.
सिराज ला नक्कीच वाईट वाटलं असेल.

असो.
परत घसरगुंडी सुरू झालीय.
४८/४ .
हे टाईप होईपर्यंत ५८/४ झालेत. नुकताच पोपने आश्विनला लाँगऑनला एक उत्तुंग षटकार ठोकला आहे.

तुषार काळभोर's picture

6 Mar 2021 - 1:49 pm | तुषार काळभोर

घसरगुंडी परत सुरू.
६६/६

एक डाव आणि २५ धावांनी भारताचा विजय. अक्षर, अश्विनचे ५-५ बळी
भारताने मालिका ३ -१ ने जिंकली.
आता जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारत - न्यूझीलंड अंतिम सामना लोर्ड्सवर (कदाचित) जूनमध्ये होईल.
त्याआधी आयपीएल सामने असतील आणि नंतर लगेच खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस कसा असेल सांगता येणार नाही.
आता एकदिवसीय सामने संपले की आयपीएलचे पडघम वाजायला सुरुवात होईलच.

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2021 - 4:24 pm | श्रीगुरुजी

पहिला कसोटी सामना वगळता अगदीच एकतर्फी मालिका झाली. इंग्लंडची रोटेशन पॉलिसी सुद्धा इंग्लंडला भोवली. मालिकेत मजा आली नाही.

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2021 - 7:17 pm | श्रीगुरुजी

पहिल्या डावात ४ बळी व दुसऱ्या डावात ५ बळी. पहिल्या डावात ४३ धावा. ही अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी सामनावीर पुरस्कारासाठी खूप कमी पडली. माझ्या दृष्टीने या सामन्यात हीच कामगिरी सर्वोत्तम आहे.

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात ०/१ अशा अवस्थेत केवळ तिसऱ्या चेंडूवर खेळायला आलेल्या गंभीरने एक बाजू लावून धरून ९७ धावा केल्या. ०/१ वरून ३१/२ व नंतर ११४/३ अशी स्थिती होती. २२३ धावा असताना गंभीर बाद झाला तेव्हा सामना भारताच्या खिशात होता. सामन्यातील सर्वोत्तम खेळी गंभीरची होती. परंतु धोनीला सामनावीर पुरस्कार दिला.

२००७ मधील ट-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात गंभीरने ५४ चेंडूत ७५ धावा करूनही १६ धावात ३ बळी घेतलेल्या इरफान पठाणला सामनावीर पुरस्कार दिला होता. त्या सामन्यात रूद्र प्रताप सिंगने सुद्धा २६ धावात ३ बळी घेतले होते. भारतातर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या धावा ३० होत्या (रोहीत शर्मा).

तुषार काळभोर's picture

6 Mar 2021 - 8:13 pm | तुषार काळभोर

.

पहिल्या कि दुसऱ्या टेस्ट नंतर आज वेळ मिळाला..

बघू पहिलीच t२० साठी team बनवली आहे..

https://photos.app.goo.gl/5ns3AuLnW2वोचरबजा

काय होते बघू

गणेशा's picture

16 Mar 2021 - 7:05 pm | गणेशा

https://photos.app.goo.gl/5ns3AuLnW2WoCRbJA

लिंक, auto मराठी असल्याने काही word मराठीत convert झालेले आधी

गणेशा's picture

16 Mar 2021 - 7:28 pm | गणेशा

बकवास झाली team.. :-)
Loss

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2021 - 11:09 pm | श्रीगुरुजी

भारताने ट-२० मालिका ३-२ अशी जिंकली. ११ षटकांत १२०/१ अशा भक्कम स्थितीतून इंग्लंड ढेपाळले.

आता २३ मार्च, २६ मार्च व २८ मार्चला पुण्यात एकदिवसीय सामने.

कोहलीला चांगलाच सुर गवसला आहे.
वन डे मधे पण भारताचे पारडेच जड असेल असं वाटतय

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 9:11 pm | मुक्त विहारि

तर, इंग्लंडचा संघ, रणनीति आणि गुणवत्ता घेऊन खेळतो...

त्यामुळे, टाॅस महत्वाचा आहे....

पहिल्यांदा बॅटिंग करून किमान 340च्या आसपास रन्स कराव्या लागतील.. इंग्लंडचे, बटलर, करन बंधू, बेयरस्टो, जेसन राॅय, बेन स्टोक्स आणि मोईन अली, 300-325 टार्गेट सहज पार करू शकतात...

डे-नाईट मॅच असेल तर, नंतर बॅटिंग करणे, अवघड होईल...

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2021 - 6:21 pm | श्रीगुरुजी

एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ -

इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड

आर्चर पाठदुखीमुळे घरी गेला. ख्रिस वोक्सला एकही सामना खेळविला नाही.

गणेशा's picture

22 Mar 2021 - 11:08 pm | गणेशा

रूट नाहीये काय?

पुणे difficult pitch असणार पण. Score कमी होतील.. England have edge

गणेशा's picture

23 Mar 2021 - 1:37 pm | गणेशा

https://photos.app.goo.gl/TJmgarrSLjc8wCUo9

आजची माझी dream ११ team.

बघू, रोहित आणि kl न घेण्याचा किती फटका बसतोय ते पाहू..

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 1:41 pm | मुक्त विहारि

किमान, 340 च्या आसपास तरी रन्स हव्यात...

मुक्त विहारि's picture

26 Mar 2021 - 9:45 pm | मुक्त विहारि

375 चे टार्गेट हवे ...

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2021 - 1:57 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड धावांचा पाठलाग करणार. पावसाची शक्यता आहे. डकवर्थ-लुईस चा फायदा होऊ शकतो.

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 2:04 pm | मुक्त विहारि

इंग्लंड धावांचा, यशस्वी पाठलाग करणार.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2021 - 6:09 pm | श्रीगुरुजी

भारत ३१७/५ (५०)

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 6:15 pm | मुक्त विहारि

इंग्लंडची विकेट पडली नाही तर, आपण हरायचे चान्सेस जास्त आहेत...

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 7:03 pm | मुक्त विहारि

पॅक अप करायला घ्यावे लागणार

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 9:43 pm | मुक्त विहारि

जबरदस्त मॅच फिरवली

135/0 Required Run Rate, 6 पेक्षा कमी

आणि

नंतरच्या 116 रन्स मध्ये 10 विकेट ....

खूप दिवसांनी, चांगली मॅच झाली....

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2021 - 8:37 pm | श्रीगुरुजी

स्टोक्स आणि बेअरस्टो मनसोक्त धुलाई करताहेत.

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2021 - 9:30 pm | श्रीगुरुजी

भारत अत्यंत वाईट हरला. इंग्लंडने गोलंदाजांंचा कचरा केला.

मुक्त विहारि's picture

26 Mar 2021 - 9:44 pm | मुक्त विहारि

आपण आधीची मॅच टर्न केली

ह्या मॅचमध्ये जमले नाही