Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 14/03/2021 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corpo… आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.

वाचने 52346
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by शाम भागवत

राज्य संघटनेत फडणवीस व चंपा सोडले तर बाकीचे आहेत कोण? जे बाकीचे कोणी असतील (गिरीश महाजन, मुनगंटीवार, शेलार, दरेकर वगैरे) ते सर्व यांचेच समर्थक असून मम म्हणण्यापुरतेच आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मागील ३-४ वर्षातील महाराष्ट्रातील निर्णय पाहिले तर मोदी-शहांनी फडणवीसांना महाराष्ट्रात संपूर्ण रान मोकळे दिले आहे असे दिसून येत आहे. सेनेबरोबरील युती, जागावाटप, उमेदवारी वाटप, आयाराम प्रवेश, अजित पवारांबरोबर युती हे सर्व फडणवीसांच्या आग्रहामुळे झालेले दिसते. या सर्व निर्णयांसाठी फडणवीस अत्यंत आग्रही होते.

In reply to by Bhakti

२०१९ मध्ये दिलीप गांधीच पुन्हा मोठ्या मतांनी निवडून आले असते. त्यांचा पराभव अजिबात झाला नसता. म्हणून तर चंपाने जसा मेधा कुलकर्णींंना हाकलून कोथरूड हा सुरक्षित मतदारसंघ निवडला तसाच सुजय विखे पाटलांनी नगर हा सुरक्षित मतदारसंघ निवडला. हा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होता. राधाकृष्ण विखे पाटीलांनी हा मतदारसंघ कॉंग्रेससाठी मागितला व त्या बदल्यात राष्ट्रवादीला दुसरा मतदारसंघ देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु विखे पाटील घराणे व पवार यांच्यात शत्रुत्व असल्याने पवारांनी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यामुळे लगेच राधाकृष्ण विखे पाटीलांनी फडणवीसांशी बोलणी करून डील पक्के करून मुलाला भाजपत पाठवून उमेदवारी मिळविली आणि नंतर महिनाभराने स्वत:ही भाजपत डेरेदाखल झाले. फडणवीसांच्या शिफारशीमुळेच हे डील झाले होते.

काल निवडणुक आयोगाने विविध राज्यातील लोकसभेच्या २ आणि विधानसभांच्या १४ जागांसाठी पोटनिवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या जागांवर १७ एप्रिलला मतदान होईल आणि २ मे रोजी बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पाँडेचेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीबरोबरच या जागांवर मतमोजणी होईल. कर्नाटकात बेळगाव आणि आंध्र प्रदेशात तिरूपती या लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुक होणार आहे. बेळगावचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे तर तिरूपतीचे वाय.एस.आर काँग्रेसचे खासदार बल्ली दुर्गाप्रसाद राव यांचे कोविडमुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होणार आहे. पुढील विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक होणार आहे-- १. महाराष्ट्र- पंढरपूर. राष्ट्रवादीचे आमदार भरत भालके यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. २. गुजरात- मोरवा हदाफ. अपक्ष आमदार भुपेंद्रसिंग खंत यांची निवड जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे ही जागा रिकामी आहे. ३. झारखंड- मधुपूर. झामुमोचे आमदार आणि हेमंत सोरेन यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री हाजी हुसेन अन्सारी यांचे कोविड आणि हृदयविकाराने निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. ४. कर्नाटक- बसवकल्याण. काँग्रेसचे आमदार बी. नारायण राव यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. ५. कर्नाटक- मस्की. काँग्रेसचे आमदार प्रतापगौडा पाटील यांनी ऑपरेशन कमल अंतर्गत भाजपत प्रवेश केल्यामुळे राजीनामा दिल्यामुळे जागा रिकामी आहे. ६. मध्य प्रदेश- दमोह. काँग्रेसचे आमदार राहुल सिंग यांनी ऑपरेशन कमल अंतर्गत भाजपत प्रवेश केल्यामुळे राजीनामा दिल्यामुळे जागा रिकामी आहे. ७. मिझोराम- सरछिप. अपक्ष आमदार आणि माजी आय.पी.एस अधिकारी लालदुहोमा यांनी झोराम पीपल्स मूव्हमेंट या पक्षात प्रवेश केल्याने पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्याने ही जागा रिकामी आहे. १९८८ मध्ये हेच लालदुहोमा यांचे पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. ८. नागालँड- नोकसेन. नॅशनल डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे आमदार सी.एम.चँग यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. ९. ओरिसा- पिपली. बिजू जनता दलाचे आमदार प्रदीप महारथी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. १०. राजस्थान- सहारा. काँग्रेसचे आमदार कैलाशचंद्र द्विवेदी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. ११. राजस्थान- सुजानगढ. काँग्रेसचे आमदार आणि अशोक गेहलोत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री भंवरलाल मेघवाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. १२. राजस्थान- राजसमंद. भाजप आमदार किरण महेश्वरी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. १३. तेलंगण- नागार्जुन सागर. तेलंगण राष्ट्रसमितीचे आमदार नोमुला नरसिंहय्या यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. १४. उत्तराखंड- साल्त. भाजप आमदार सुरिंदरसिंग जीना यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

देशाच्या कानाकोपर्‍यात चौदा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पोटनिवडणुका , त्यातही नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन झाल्याने पोटनिवडणुका. दुर्दैवाने पुढील पोटनिवडणुका "दोन खासदारांची आत्महत्या" या कारणाने होतील.

In reply to by तुषार काळभोर

पहिल्यांदा इतक्या व्यापक प्रमाणात पोटनिवडनुका होत असतील
नाही. यापेक्षाही जास्त मतदारसंघात पोटनिवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२० मध्येच जवळपास ५० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली होती. त्यात मध्य प्रदेशात २० पेक्षा जास्त, गुजरातमध्ये ६ आणि उत्तर प्रदेशात ७ जागांवर पोटनिवडणुक झाली होती.

हिमाचल प्रदेशमधील मंडीचे भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतला मृतदेह त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आढळून आला आहे. ramswaroop sharma रामस्वरूप शर्मा हे हृदयविकाराने आजारी होते आणि डिप्रेशनमध्ये होते असे आताच वाचले. महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते तेव्हा त्यांची अवस्था बघून अनेकांना काळजी वाटली होती असेही वाचले. https://www.jagran.com/himachal-pradesh/kangra-himachal-mp-ramswaroop-s… गेल्या महिन्या-दीड महिन्यात दुसर्‍या लोकसभा खासदाराने आत्महत्या केलेली दिसते. हे चांगले लक्षण नाही.

खरे डॉक्टर,
नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन
जर इतकी माणसं करोनामुळे मारताहेत, तर करोना विषाणूचा अस्सल नमुना का अस्तित्वात नाहीये? आ.न., -गा.पै. टीप : या मुद्द्यावर चर्चा झाल्यास हा धागा बंद पडेल. याकरिता तुमच्याकडून उत्तर आलं तरीही मी गप्प बसेन.

In reply to by गामा पैलवान

कथित covid टेस्ट positive pan मृत्यू दुसऱ्याच आजाराने अशी प्रकरण खूप आहेत. पण सर्व मृत्यू corona वर ढकलले गेले. लोकांची pm पण केले गेले नाही.

In reply to by Rajesh188

संसर्गजन्य रोगाची साथ चालू असताना, रुग्णांशी कमीत कमी संपर्क कसा येईल ह्याची काळजी घेत असताना, शवविच्छेदन का बरे होत नसावे ? अगदी गहन कूटप्रश्न आहे म्हणायचा.

In reply to by गामा पैलवान

गा पै साहेब करोना विषाणूचा अस्सल नमुना का अस्तित्वात नाहीये? आपण हा पक्का गैरसमज (DELUSION) का करून घेतला आहे हे समजत नाही हा विषाणू या विषयात संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांना फुकट उपलब्ध आहे. मागे पण एकदा मी तुम्हाला हाच दुवा दिला होता. SARS-CoV-2 strains supplied by CDC and other researchers can be requested, free, from the Biodefense and Emerging Infections Research (BEI) Resources Repository external icon by established institutions that meet BEI requirements. https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/lab/grows-virus-cell-culture… First isolation of SARS-CoV-2 from clinical samples in India https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7366528/ आपण हे स्वीकारायचेच नाही असे ठरवले असेल तर माझा नाईलाज आहे.

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, मी मुद्देसूद प्रतिसाद दिला तर हा धागा खस्त होईल. त्यामुळे मी अतार्किक प्रतिसाद देतो. कृपया गोड मानून घ्या. PCR चाचणीचा जनक केरी म्युलीस याला याच शोधानिमित्त नोबेल मिळालं होतं. त्याची मुलाखत इथे आहे : https://twitter.com/LegendaryEnergy/status/1369720747313098753 हिच्यात त्याने फौचीची बिनपाण्याने हजामत केली आहे. काय समजायचंय ते कृपया समजून घ्या. मी अधिक काही लिहू शकंत नाही. खरंतर तुम्हाला प्रश्नंच विचारायला नको होता. भावनेच्या भरात चूक झाली. आ.न., -गा.पै. तळटीप : याच केरी म्युलीसचा २०१९ साली मृत्यू झाला. किती सोयीस्कर, नाहीका?

In reply to by Rajesh188

म्हणजे कोरोनामुळे न्यूमोनिया झाल्यास तो कोरोनाचा बळी नाही, तर न्यूमोनियाचा बळी मानायला पाहिजे. कोरोनाच्या लक्षणांमुळे झालेला मृत्यू कोरोना नव्हे तर सर्दी, पडसे, कफ, ताप ईईई. मध्ये विभागला पाहिजे. पॉईंट योग्य आहे. मी तर म्हणतो डॉक्टरने कोरोनाबळी म्हणून लिहिलं कि लगेच सीबीआयचा तपास व्हायला हवा मृत्यूचे कारण शोधण्यासाठी.

In reply to by Rajesh188

खरे साहेबांनी ह्या वर भाष्य करावे. छे छे आपल्या पुढे भाष्य करण्याची माझी काय टाप आहे. Recent research reported that the sensitivity of computed tomography in diagnosing COVID-19 is 98% while RT-PCR sensitivity is 71%. म्हणजेच CT SCANNING ने ९८ % रुग्णांमध्ये मृत्यू पूर्वी निदान करता येते. ( वैद्यकशास्त्रात १०० % कधीच नसते) हे CT SCANNING मी ज्या विषयात वैद्यक निष्णात ( MD)म्हणून पदवी मिळवली आहे त्यातच येते. त्यामुळे मला थोडेसं त्यातील समजू लागलंय असं वाटतं आहे. पण आपल्या अगाध ज्ञानापुढे मी म्हणजे सूर्यापुढे काजवा

माझ्या महितीनुसार कारणाचे मूळ डेथ सर्टीफिकेट मधे लिहिले जात नाही. काही उदाहरणे मी स्वतः पाहिलेली .. माझे वडील .. कारण मधुमेह .. लिहिलेले कारण हेपॅटिक फेल्युअर माझा भाउ -- कारण मधुमेह -- लिहेलेले कारण रेस्पीरेटरी फेल्यर. माझ्या एका मित्राचे वडील लिहिलेले कारण कार्डिअ‍ॅक फेल्युअर ई . अपघातात मेलेला माणूस अपघाताने मेला असे लिहित नाहीत तर शॉक ड्यू यू मल्टीपल इन्जरी असे लिहितात.