Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 14/03/2021 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corpo… आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.

वाचने 52346
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

गळा कापणे हे धर्मकार्य आहे.. आणि आता भारत असुरक्षित नसतो.. असहिष्णूंता नसते.. UNA मध्ये जायची गरज नसते.. ट्विटर वर टिवटिवाट आणि अवॉर्ड वापसी करायची नसते. कारण #फेक्युलरिज्म.. रंगपंचमी आणि दिवाळी च्या वेळेस कुत्र्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल लेख च्या लेख लिहिणारे बॉलिवूड अभिनेत्री, अभिनेते, PETA वाले/वाल्या आज 50 हुन जास्त कुत्र्यांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यामुळे समाजात खरे कुत्रे आणि कुत्र्या कोण हे दिसले. #JusticeForShera

In reply to by मुक्त विहारि

कुराणातले वादग्रस्त भाग वगळण्याच्या बाबतीत माझा रिझवींना पाठिंबा आहे. -गा.पै.

In reply to by मुक्त विहारि

केशव उपाध्येंंनी विचारले तर हरकत नाही. पण फडणवीसांनी असा प्रश्न विचारणे अत्यंत हास्यास्पद व ढोंगीपणाचे लक्षण आहे.

फक्त देणे भोवती च गोल गोल फिरण्यासाठी आयुष्य वाया घालवू नका. बँक कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे तिकडे पण थोडे लक्ष असू द्या. भारत जसा खूप मोठा आहे तसेच भारतात समस्या पण खूप आहेत. फक्त शिवसेना आणि सत्ता मिळाली नाही तर दुखः किती कुरवाळत बसणार.

In reply to by मुक्त विहारि

खाजगीकरण होतेय.. बँक कर्मचारी आता जरा सचोटीने आणि भरीव काम करतील अशी अपेक्षा... काम न केल्यास वरून बांबू बसणे आणि नोकरी जाण्याची भीती निर्माण होणे गरजेचे आहे.. सरकारी सिस्टीम मध्ये हे होत नाही..

In reply to by बापूसाहेब

सगळ्या सरकारी बँका ( SBI सोडून ) येस बँकेला देऊन टाका. खासगी म्हणजे सगळं शिस्तबद्ध. आणि घोटाळा होऊन बुडलीच तर आहेच RBI आणि SBI वाचवायला. फक्त इथल्या अर्थतज्ञ बोकीलांची सल्लामसलत करून निर्णय घ्यावा.

In reply to by आग्या१९९०

एक महत्वाची माहिती: जेव्हा तुम्ही बँकेत पैसे ठेवता (म्हणजे बँकेला पैसे कर्जाऊ देता) किंवा त्यांचे शेअर्स घेता तेव्हा ती संपूर्णपणे तुमची जोखीम असते. सरकार तुम्हाला बँकेत पैसे ठेवा असं सांगायला येत नाही. किंवा ठेऊ नका असेही सांगायला येत नाही. सरकारी असो वा खाजगी, जर बँक बुडाली तर कायदेशीर पद्धतीने क्लेम करब्याव्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करावी ही गोष्ट चुकीची निघालि तर तुम्ही आणि तुमचे नशीब. लिमिटेड लैआबिलिटी मुळे बँकेच्या बोर्डावर पण (जर त्यांनी fraud केला नसेल तर) कायदेशीर कारवाई करता येत नाही. म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टमेंट चे निर्णय चुकले तरी तुम्ही काही करू शकत नाही.

In reply to by पिनाक

सहमत. त्यामुळे सरकारी बँकांचे खासगीकरण केल्याने समस्या उद्भवणार नाही असेही म्हणता येणार नाही.

In reply to by पिनाक

बँकांची ची काहीच जबाबदारी नसेल.बँक बुडाली बँकेच्या चुकीच्या निर्णय मुळे तरी. तर बँका हव्यात कशाला. हा पहिला प्रश्न. माणसांनी रोख पैसे घरात ठेवले तर इन्कम टॅक्स वाले तिकडे का कोलमडत असतात. बँका काहीच जबाबदारी नसेल तर. बँकेच्या बाहेर असणाऱ्या किती ही मोठ्या रक्कमे ला ब्लॅक money म्हणता येणार नाही. सरकार जबरदस्ती करत आहे लोकांना बँकेत पैसे ठेवण्यासाठी. किती तरी उदाहरणे देता येतील. नोट बंदी कशा साठी केली. बँक आणि सरकार जर लोकांनी बँकेत पैसे ठेवावे म्हणून जबरदस्ती करत नाही तर . ब्लॅक money ची व्याख्या ऐकायला आवडेल. पिणाक जरा ब्लॅक money ची व्याख्या सांगा. डिजिटल पेमेंट ची जबरदस्ती का.? हे पण जरा विस्कटून सांगा. चेक नी payment ची जबरदस्ती का?

In reply to by पिनाक

सरकार तुम्हाला बँकेत पैसे ठेवा असं सांगायला येत नाही.
रोखीचे व्यवहार करुन नका असे कोण सांगते ?

In reply to by मराठी_माणूस

प्रॉपर्टी आणि जमिनी चे व्यवहार रोख रक्कम देवून करण्यास बंधन आहे. असे काही व्यवहार आहेत त्या मध्ये रोख रक्कम देवून व्यवहार करण्यावर बंधने आहेत. घरात किती ही पैसे ठेवण्यास बंधन नाही पण त्याचा हिशोब द्यावा लागणार. हीच गेनाबाची मेख आहे. त्या मुळे तुम्ही घरात जास्त मोठी रक्कम ठेवू शकत नाही. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे ह्याचा अर्थ च बँकेत पैसे ठेवण्यास लोकांना प्रवृत्त करणे हा आहे.

In reply to by बापूसाहेब

ठेवू ज्या बँकेत असतात त्यांची सुरक्षा हे तुमचे खासगी भांडवलदार करणार आहेत का? की बँकेचे मालक च सर्व पैसे घेवून पसार होतील. असे झाले तर कोणाला फाशी वर चढवले पाहिजे त्या वेळेस. प्रश्न फक्त कर्मचाऱ्यांचा नाही. सामान्य लोकांचे पैसे सुरक्षित राहतील की नाही राहणार हा पण आहे. ह्या देशात अतिशय दुर्गम भाग पण आहे तेथील लोकांना हे खासगी बँकेचे मालक,आणि आता चे देशाचे मालक शेठ हे सेवा देतील का. की फक्त मुंबई ,पुण्यात च खासगी बँकेचे मालक ब्रांच चालवतील का?

In reply to by मुक्त विहारि

खासगी कारण झाल्या मुळे फक्त कर्मचारी संकटात येतील आणि बाकी काही प्रश्न च निर्माण होणार नाहीत. एवढा संकुचित विचार फक्त बुद्धीचे दिवाळे निघाले आहेत त्याच व्यक्ती करू शकतात.

In reply to by मुक्त विहारि

राजेश जी तुमच्या प्रतिसादाला आपला पास.. कारण मी अनुभवावरून बोललो. आजवर मी जवळपास 14 बँकेच्या सेवा वापरल्या आहेत, त्यामध्ये सहकारी, खाजगी, सरकारी, इंटरनॅशनल अश्या सर्व प्रकारच्या बँका आहेत. त्या अनुभवावरून मी सांगु शकतो कि खाजगी बँकामध्ये कस्टमर ला योग्य तो मानसन्मान दिला जातो. कामे विनाकारण अडवली जातं नाहीत आणि शक्यतो प्रत्यक्ष बँकेत जाण्याचे प्रसंग फार कमी येतात. कामे लवकर आणि वेळेत पूर्ण होतात. खाजगी असली तरी govt चे सगळे नियम पाळूनच व्यवहार होतात त्यामुळे खाजगी बँका धोकादायक पण सरकारी बँका विश्वासार्ह हा जावईशोध कुठून आला ते माहिती नाही. असो. बँकेचं खाजगीकरण झाल्याने नेमके काय परिणाम होतील हे एखाद्या निष्पक्ष मिपाकरांकडून वाचायला आवडेल. त्याचबरोबर जे काही कर्मचारी आत्ता संप करत आहेत त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?? त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत कि पगार कमी होणार आहेत.?? कोणी जाणकार व्यक्ती स्पष्टीकरण देऊ शकेल काय.??

In reply to by बापूसाहेब

काम करावे लागणार. वारंवार पगारवाढ होणार नाही. टार्गेट पूर्ण करावी लागतील, प्रमोशन निव्वळ वर्षांनी होणार नाहीत तर परफॉर्मन्स पाहून होतील. कार्यक्षम लोकांना जास्त पगार तर निर्बुद्धांना कमी पगार मिळेल. युनियन लोकांची दादागिरी चालणार नाही. माझ्या मते आपले पैसे सरकारी बँकेतून काढून घेण्याची हि योग्य वेळ आहे.

In reply to by साहना

असंच म्हणतायेणार नाही. परिस्थिती बदलली की माणसेही बदलतात. १९९५ नंतर खूप मोठ्या प्रमाणावर स्वेच्छा निवृत्ती घेतली गेली. त्यानंतर उरलेल्यांचे काम खूप वाढले होते. त्यामुळे त्यानंतर बँकेची नोकरी पूर्वीसारखी फारशी आरामदायक राहिलेली नाही.

In reply to by साहना

अनेक प्रश्न आहेत त्या मधील किरकोळ प्रश्न कर्मचारी लोकांचे पगार आणि कार्यक्षमता आहे. खरे गंभीर प्रश्न वेगळेच आहेत. कर्ज घेवून तो बुडवणारा आणि बँक चालवणारा एकच असेल तर सर्व सामान्य लोकांच्या ठेवी सुरक्षित राहतील ह्याची शास्वती कोण देणार .? ग्रामीण भागात बँकिंग सेवा हे खासगी बँक वाले देतील का?, खूप प्रश्न आहेत सध्या हे दोनच सांगितले. फक्त कर्मचारी आणि त्यांचे पगार ह्या फालतू गोष्टी भोवती च फिरू नका. काम केले की त्याचा मोबदला दिलाच पाहिजे. फुकट तर कोणी काम करणार नाही.

४० crpf चे जवान मारले गेले होते.तो स्फोट कोणी घडवला,एवढी मोठी स्फोटक देशात आलीच कशी हे अजुन इतके दिवस होवून सुद्धा सरकार ला माहीत नाही. ना ज्यांनी स्फोट घडवला ते पकडले गेले. त्याची चर्चा टीव्ही वर होत नाही. पण सचिन वझे म्हणजे राष्ट्रीय प्रश्न झाला आहे.

In reply to by सुबोध खरे

परमपूज्य राहुल गांधी, यांचे शिष्य आहेत... त्यामुळे, जास्त विचार न करताच मते व्यक्त करतात...

३०० kg स्फोटक देशाच्या सीमा ओलंडून देशात आलीच कशी ती कोणी आणली?,ती आणायला कोणी मदत केली.? त्या व्यक्ती वर कोर्टात केस चालू आहे का.? फक्त strike केला की प्रश्न संपतात का? खरे साहेब ह्याची उत्तर असतील तर ध्या . आमची पण थोडी माहीत वाढेल. सचिन वझे ची कशी पॉइंट to पॉइंट माहिती येत आहे समोर.

In reply to by Rajesh188

300 kg म्हणजे काही जास्त नव्हे.. एका फुटीरतावाद्याने 1-2 kg जमा केले तरी 200 -300 kg जमा व्हायला वेळ लागनार नाही..!! आणि सरकारला दोष देण्याआधी तुम्हच्याकडे काही पुरावा आहे का?? कि उगाच आपली कॉन्स्परसी थेअरी ठोकून देताय.. !!! BTW काश्मीर खोऱ्यात जवळपास सर्वच घरात किमान एकतरी व्यक्ती फुटीरतावादी असते. तिथे सैन्याला कोणत्याही एन्काउंटर मध्ये स्थानिक लोकांकडून सपोर्ट मिळत नाही.. उलट सैन्यावर दगडफेक करून आतंकवादी लोकांना पळून जाण्यात मदत केली जाते ( आता हे पाप कोणाचे आणि काश्मीर असे कुणामुळे झाले हे तुम्ही पद्धतशीर पणे झाकून ठेवणार )

In reply to by बापूसाहेब

ढकलले नेहरू वर.बाकी काही कर्तृत्व तर आहेच नाही. तुमच्या कार्यकाळात घटना घडली असेल तर त्याला कोण नेहरू जबाबदार. काहीच्या काय

In reply to by Rajesh188

काहीही हा राजेश भाऊ... एखाद्या गोष्टीला जो जबाबदार आहे त्यालाच जाब विचारणार.. कारण हे सर्व झाले तेव्हा BJP RSS किंवा इतर पक्ष नव्हते.. आणि जे होते त्यांनाच जाब विचारणार ना... तुम्हाला खरं माहिती असेल तर मग तुम्ही सांगा ते काश्मीर खोर्याचे पाप कोणाचे ते..

In reply to by बापूसाहेब

मारेकरी कोण होते हा आहे.त्या लोकांना अजुन अटक का नाही झाली?. हे एक माणसाचे तर काम नसणार त्या मधील एक तरी पकडला का गेला नाही? कोर्टात ह्या प्रकरणाशी संबंधित आरोप पत्र तरी दाखल केले आहे का? हे सर्व प्रश्न आहेत.

In reply to by बापूसाहेब

त्यांना वेळ मिळत नसेल... कदाचित, ते दक्षिण कोरियाचा अभ्यास करत असतील... किंवा परमपूज्य राहुल गांधी यांचे मौलिक विचार ऐकत असतील...

In reply to by बापूसाहेब

माझ्या प्रश्नांची उत्तरं च नाहीत. कारण तपास झालाच नाही. Surgical strike (तो पण खरा की खोटा माहीत नाही ) च्या आडून सर्व प्रकरण च दबले गेले पण. पण निवडणूक जिंकायला मात्र त्या strike चां खूप फायदा करून घेतला. ३०२ त्या मुळेच आहेत. लोक एकदाच फसतात सारखी नाहीत. आता एवढ्या समस्या देशात आहेत तरी लोकांना वझे ,अंबानी मध्येच गुंतवून ठेवायचे त्या साठी media नी २४ तास तोच फड लावायचा असले प्रकार चालू आहेत. पण आता लोक सावध आहेत . Corona फक्त इथेच का वाढतोय . बाकी देशातील सर्व राज्य शिस्त बद्ध आणि देशातील यूपी,बिहार सारखी राज्य पण शिस्त बद्ध . आणि महाराष्ट्र फक्त बेशिस्त आहे का? बंगाल मध्ये निवडणूक आहे तेथे बिन्धास्त सर्व नियम मोडला जात आहे. ना मास्क ना सोशल distance. तरी तिथे corona नाही. बिहार मध्ये निवडणूक झाली,इथे स्थानिक स्वराज्य संस्था ची निवडणूक झाली तेव्हा बिहार मध्ये corona वाढला नाही पण इथे निवडणुका झाल्या की corona वाढला. तो पण राजकीय झाला आहे. पंजाब,केरळ,महाराष्ट्र येथेच तो अस्तित्वात आहे. आता दीदी जिंकून आल्या तर बंगाल मध्ये corona ची एन्ट्री होईल. आणि BJP आली तर corona तर corona गायब होईल

In reply to by Rajesh188

तुम्ही खरोखरच, परमपूज्य राहुल गांधी यांचे शिष्य शोभता...पाकिस्तानच्या नेत्यांनी, सर्जिकल स्ट्राइक झाला, हे कबूल केले, तरी पण तुम्हाला विश्र्वास वाटत नाही... करोना बाबतीत जबाबदारी राज्य सरकारची आहे, गोव्यात निवडणूका आहेत का? कारण, गोव्यात करोनाची लागण, फारच कमी आहे....

In reply to by Rajesh188

मारेकरी कोण होते हा आहे.त्या लोकांना अजुन अटक का नाही झाली?. आपण ठार बधिर आहात का? मी दिलेल्या दुव्यात याची सर्व माहिती आहे. आपण सुधारायचं नाहीच असं ठरवलंय म्हटल्यावर कोण काय सांगणार?

ला इलाही म्हणणारी मॉमता दीदी आता चंडी पाठाच्या ओळी गाउ लागली असुन खुजलीवाल यांनी अयोध्येत मंदीर निर्माण झाल्यावर वृद्ध लोकांना फुकट तिर्थाटन करण्याचे जाहीर केले आहे म्हणे ! अचानक यांना हिंदूंची आठवण आली आहे ! असं कसं झाल ? :))) बादवे बाटला हाउसवर मॉमता दीदी त्याकाळी म्हणाल्या होत्या एनकांउंटर खोटे होते... माझे बोलणे जर खोटे ठरले तर राजकारण सोडुन देइन ! जाता जाता :- हिंदूस्थानी राजकारण्यांना पाहुन खालचा प्राणी चिंतेत पडला आहे, त्याला वाटत होते की तोच वेगात रंग बदलु शकतो ! :)))))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili

https://www.loksatta.com/desh-videsh-news/sharad-pawar-speaks-on-sachin… काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना सहकार्य करणं. ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत.... शरद पवार, बोलतात कमी, पण एकाच वेळी, अनेक गोष्टी सांगतात....

In reply to by मदनबाण

मॅक्सिमम सिटी ह्या पुस्तकात "नंबर २ आफ्टर स्कॉट्लंड यार्ड' नावाचा लेख मुंबई पोलिसांवर आहे. पकडलेल्या संशियितांच्या बॉसना(दाउद्/शकील वगैरे) फोन पोलिस कमीशनर्/गुन्हे पथकाचे अधिकारी लावतात.. व सौदा केला जातो. व संशयिताची किंमत ठरवली जाते. सौदा यशस्वी झाला की मग हवाला मार्गे पैसा अधिकारी लोकाना व मंत्रालयात पोचवला जातो. सौदा फसला की मग एन्काउंटर स्पेशालिस्ट संशयिताला मध्यरात्री कुठेतरी नेतात व मारून टाकतात. ९०च्या दशकातले हे बहुतांशी एन्काउंटर्स असे सौदेबाजीने झाले होते. दुर्दैवाने आपल्या पत्रकारात/मिडियात ना प्रश्न विचारण्याची धमक होती ना स्वतः संशोधन करण्याचा वकुब होता. आताही तेच.. त्या अर्नब गोस्वामीची पत्रकारिता आक्रस्ताळी खरी पण ज्या पद्धतीने त्याला अटक केली त्यावर ना आमच्या मिडीयाने प्रश्न विचारले ना स्वतःला बुधिमान म्हणवणार्या गिरीश कुबेर्/निखिल वागळ्यानी/कुमार केतकरांनी. आता हे जे काही किळसवाणे समोर येतेय त्यावरही हे स्वयंघोषित बुद्धिमान हाताची घडी तोंडावर बोट ठेउन आहेत.

In reply to by Rajesh188

म्हणजे? थोडा खुलासा हवा .... साधूंच्या हत्याकांडाचा निषेध, महाराष्ट्रातील जनतेने करायला नको का? तांदूळ घोटाळा झाला, त्याचा निषेध, महाराष्ट्रातील जनतेने करायला नको का? एका स्त्रीला शिवी दिली, त्याचा निषेध महाराष्ट्रातीलजनतेने करायला नको का? मराठी कधीच, अन्यायाला साथ देत नाही...

२४ तास देशाच्या सीमेवर सशस्त्र दल पहारा देत असताना सुद्धा अतिरेकी भारतीय सीमेच्या आत येतात कसे. इथे येवून दहशत वादी हल्ले होतातच कसे. भ्रष्टचार विरोधी दल अस्तित्वात असून सुद्धा देशात सर्रास भ्रष्टाचार होतात कसे. देशात न्यायालय अस्तित्वात आहेत तरी लोकांना न्याय मिळत नाही अशी बोंब असते ते कसे. गुन्हेगार,निवडणुकीत उभे राहून जिंकून पण कसे येतात. देशातील सर्वच यंत्रणा ह्या त्यांचे काम योग्य रित्या करत नाहीत. म्हणून च गुंड,टोळी युद्ध आणि बरेच प्रकार होत असतात. फक्त काही पोलिस च देशातील घाण आहे असे नाही कचरा एवढा आहे देशात की तो साफ करणे अशक्य आहे. त्या मुळे कोणालाच तू फक्त दोषी असे म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही.

In reply to by Rajesh188

जागता पहारा , डोळ्यात तेल घालुन वगैरे बोलायला ठीक आहे राजेशा पण भारत-पाकिस्तान सीमेची लांबी ३२०० कि.मी. आहे. जम्मु-काश्मिर सीमा - १२,२२ कि.मी/ आहे. म्हणजे मुंबई-चेन्नई अंतरापेक्षा थोडे कमी.

त्यानंतर_काय_झालं ? ● फडणवीसांनी विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असं भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती. ● याच सभागृहात ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं. त्यानंतर काय झालं ? ● गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले. याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते. त्यानंतर काय झालं ? ● फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर काय झालं ? ● अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल. (काही भक्तांची भिंत पाहिली तर या आवेशपूर्ण भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल) त्यानंतर काय झालं ? ◆ हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला. ● याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँकेमध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली. त्यानंतर काय झालं ? ● २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेतलं. विधानपरिषदेतून आमदार केला आणि आता ते विधानपरिषदमध्ये भाजपचे विरोधीपक्ष नेता आहेत. त्यानंतर काय झालं ? ● मुख्यमंत्री असतांना मामुनीं 'शिक्षकांची वेतन बँक खाती' मुंबई बँकेत वळवली... नंतर आधी हायकोर्ट मग सुप्रीम कोर्टने फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली. त्यानंतर काय झालं ? ● याच सभागृहात कृपाशंकर सिंघ यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल पण अनेक आरोप केले. त्यानंतर काय झालं ? ● विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकरच्या घोटाळ्याची कागदं नाचवली. पण स्वत: मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाहीये; असं प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं आणि त्याला निर्दोष सिद्ध केला. त्यानंतर काय झालं ? अशी अनेक उदाहरण देता येतील. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना राज्यात वाढलेली गुन्हेगारी असो, विशेषतः नागपूरात. हत्या असोत, आत्महत्या असतो... (विशेषतः गोविंद पानसरे, शेतकरी धर्मा पाटील यांना कोण विसरेल)... अनेक उदाहरण. ■ एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण (?) भाषण केलं त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं (जसे की दादा, तटकरे, कृपाशंकर) त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. ■ २०१४ पूर्वी ठीक होतं पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे दरवेळी प्रत्येक विषयात फडणवीस मी.. मी करत आकांडतांडव करत आहेत; ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये. उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतांना दिसत आहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केला. मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गुस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपने केलेला आकांडतांडव पाहता, मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे तर विरोधीपक्ष नेता म्हणून पुन्हा येण्याची संधी मिळाली आहे; याचं जास्तच नैराश्य आलेलं दिसत आहे. असो, अनेक भक्तांना फडणवीस अजूनही अभ्यासू नेते वाटत असले तरी त्यांचा अभ्यास दिवसेंदिवस उघडा पडून त्यांची चिडचिडच जास्त होतांना दिसत आहे.बाकी भक्तांबद्दल तर आपलं ठरलंच आहे,आपण फक्त त्यांची मजा बघायची.

In reply to by कपिलमुनी

गुरूजींनी ही पोस्ट नक्की आवडणार.;) गुरूजी कृहघ्या. अशीच यादी इतरांचीही करता येईल. त्यात काही विशेष नाही. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत नाही. मात्र पद मिळाल्यावर, काम करताना भ्रष्टाचार न करणे. सगे सोयऱ्यांनी सत्तास्थानाचा फायदा न उकळणे, घराणेशाही नसणे याला मी जास्त महत्व देतो. कारण तसे झाले तरच ते सर्वसामान्यांना फायदेशीर ठरेल. या न्यायाने फडणीस नको असतील तर फक्त पृथ्विराज चव्हाण शिल्लक राहतात. पण त्यांना कॉंग्रेस श्रेष्ठी काम करू देतील की नाही ही शंका राहतेच. याच निकषावर मला मोदी आवडतात. फक्त क्रिकेट क्रिडांगणाचे नामकरण खटकलंय. असो

In reply to by शाम भागवत

ती, घराणेशाहीला चपराक आहे... त्यामुळेच तर, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, विरोध करत आहेत...

In reply to by शाम भागवत

ही पोस्ट ३-४ दिवसांपूर्वीच मी पोस्ट केली होती. त्यातील सर्व दावे सत्य असल्याने पोस्ट केली होती. सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत असणारेच निर्णय लक्षात घ्यायचे असतील तर मराठा सर्व क्षेत्रात अत्यंत मागास आहेत असा खोटा अहवाल तयार करून प्रगत मराठा जातीला तब्बल १६ टक्के राखीव जागा देण्याच्या फडणवीसांच्या निर्णयाचा ब्राह्मण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः या विद्यार्थ्यांना १० वी/१२ वी/पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हव्या त्या शिक्षणसंस्थेत हव्या त्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. माझ्या माहितीतील दोन मिपा सदस्यांच्या मुलांना व नात्यातील काही जणांना या स्वार्थी निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. स्वत:च्या खुर्चीसाठी फडणवीसांनी नाणार, जैतापूर वगैरे प्रकल्प रद्द केल्याने जनतेला निश्चितच फटका बसला आहे. परंतु पद मिळाल्यावर, काम करताना भ्रष्टाचार न करणे. सगे सोयऱ्यांनी सत्तास्थानाचा फायदा न उकळणे, घराणेशाही नसणे या गोष्टींचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत नाही. अर्थात फडणवीस स्वतः घराणेशाहीतूनच पुढे आले आहेत (वडील आमदार, काकू आमदार व मंत्री). काम न करताना भ्रष्टाचार न करणे पण तुरूंगात टाकण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात भ्रष्टांवर कारवाई न करता त्यांना क्लीन चिट देऊन त्यांच्याशीच युती करणे, गुन्हेगारांना अभय देणे यामुळे अशा मुद्द्यांवर सुद्धा फडणवीस अनुत्तीर्ण आहेत. अर्थात ते कायमच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतात यावर अंधविश्वास असणाऱ्यांंना त्यांचे सर्व निर्णय बरोबरच वाटतात.

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीस यांचा चाहता असलो तरी वर शाम भागवत आणि कपिलमुनी यांचे मुद्दे आणि प्रश्न रास्त आहेत. फडणवीस आज तावातावाने बोलत असले तरी ते धुतल्या तांदळाचे नाहीत हेच खरे. या निमित्तांने आठवले -- निवडणूक म्हणजे चांगला माणूस निवडणे नव्हे.. तर कमीत कमी खराब माणूस निवडणे.

In reply to by बापूसाहेब

निवडणूक म्हणजे चांगला माणूस निवडणे नव्हे.. तर कमीत कमी खराब माणूस निवडणे.
एकदम मनातलं बोललात.

In reply to by कपिलमुनी

आता_काय_चाललंय? ओके, हे सगळे आरोप आहेत...भक्त की चमचे ते सोडून देऊ... हे सगळे माहित असताना आताचे सरकार काय करतंय? राणे, दरेकर यांच्या विरोधात ठोस पावले उचलायला यांना काय प्रॉब्लेम आहे? उलट "काय द्या"चे राज्य आहे हा संदेश कॄतीतून देता येईल...पण लक्षात कोण घेतो?

भारतीय जनता पक्षाची विचार श्रेणी च चुकीची आहे.आता पर्यंत ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या bjp सत्तेवर आल्या पासून घडत आहेत आता पर्यंत थोडी तरी मीडिया निती मान होती पण bjp सत्तेवर आल्या पासून खोट्या बातम्या आणि ठराविक हेतूंनी प्रेरित होवून २४ तास टीव्ही चॅनेल गुऱ्हाळ चालवत असतात सरकार विरोधी बोलणारे एकतर देशद्रोही असतात किंवा पाकिस्तानी प्रेमी असतात. हे नवीन च ह्यांच्या राज्यात चालू झाले आहे . देशापुढे खूप गंभीर प्रश्न आहेत पण bjp च एकच अजेंडा असतो. काही तरी फुटकळ प्रकरण काढायची आणि मीडिया ला २४ तास तेच दाखवा असे सांगायचे. सुशांत नी सहा महिने काढले आता सचिन वझे सहा महिने काढतील. पंतप्रधान तिकडे चुपचाप कायदे बदलायचे उद्योग चालू ठेवतील.. भीती हैयाच गोष्टी च वाटत भारताच्या सवैधानिक संस्था अर्धवट विचारसरणी च्या सरकार मुळे कमजोर होवू नयेत. एकदा व्यवस्था कोलमडली तर ती सावरणे कठीण होवून जाईल Bjp सरकार च्या काम करण्याच्या विचित्र पद्धती मुळे अशी भीती खूप लोकांच्या मनात निर्माण होत आहे

In reply to by Rajesh188

तुम्हाला सचिन वझे हे प्रकरण फुटकळ वाटत असेल तर माझा दंडवत घ्या राजे.. !!!!

In reply to by बापूसाहेब

कुबेरी अग्रलेख वाचलात तर तेही हे प्रकरण विशेष नाही म्हणतात . https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-sachin-vaze-case-ab… पुर्वीचे 'बुद्धिमान' संपादक गोविंद तळवलकरही हेच करायचे. राज्यात असे काही घडले की लगेच मॉस्को/लंडनमध्ये काय चालु आहे ह्यावर अग्रलेख यायचा.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/bjp-leader-dil… भाजपचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते १९९९, २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक जिंकले होते. जानेवारी २००३ ते मार्च २००४ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवले होते. निष्ठावतांना झिडकारण्याच्या व आयारामांना लाल गालिचा अंथरण्याच्या फडणवीसांच्या धोरणाचा ते बळी ठरले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना डावलून आदल्या दिवशी पक्षात आलेल्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर ते फारसे कार्यरत नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

भावपूर्ण श्रद्धांजली! २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना डावलून आदल्या दिवशी पक्षात आलेल्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली तसे नसते केले तर भाजपाला एक लोकसभा जागा गमवावी लागली असती.आणि सुजय दुसऱ्या पक्षातून निवडून नसता आला. असो..निष्ठावतांना झिडकारण्याच्या व आयारामांना लाल गालिचा अंथरण्याच्या फडणवीसांच्या धोरणाचा ते बळी ठरले लोकसभेत फडणवीसांचा काय संबंध आला? .. पुन्हा एकदा श्रद्धांजली.

In reply to by Bhakti

दिलीप गांधींना श्रध्दांजली.
लोकसभेत फडणवीसांचा काय संबंध आला?
लोकसभा निवडणुकांमध्ये नक्की कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरविण्यात राज्य युनिट्सचा किती सहभाग होता आणि मोदी-शहांचा किती सहभाग होता हे प्रश्न विचारायचे नसतात. काहीही झाले तरी सगळ्या गोष्टींसाठी फडणवीसांना जबाबदार ठरवायची फॅशन आहे. बाकी दिलीप गांधी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते तरीही २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना तिकिट नाकारले गेले होते. मान्य आहे की त्यावेळी प्रा.ना.स.फरांदे या भाजपच्या निष्ठावंत ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली गेली होती तरीही केंद्रीय मंत्र्याला लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारणे हा प्रकार त्यामानाने कमी होतो. या निवडणुकांमध्ये पक्षातर्फे उमेदवारी दिली न गेल्याने दिलीप गांधींनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारायचे २००४ मध्ये होते तसे काही कारण कशावरून नसेल?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

The state unit of the BJP has forwarded Sujay Vikhe Patil’s name to the central unit to be considered for candidature in the elections, said Devendra Fadnavis. The state unit of the BJP has forwarded his name to the central unit to be considered for candidature in the Lok Sabha elections, Fadnavis said, according to ANI. According to reports, Radhakrishna Vikhe Patil had requested the Nationalist Congress Party to leave aside the Ahmednagar Lok Sabha seat for his son. However, the NCP did not agree, according to NDTV. https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/latest/916308/maharashtra-se…

In reply to by श्रीगुरुजी

दोन गोष्टी- कोविडकाळात किंवा अन्य वेळीही कर्मचार्‍यांना कामावरून कमी करायचे असेल तर अनेकदा त्यांना स्वतःला राजीनामा द्यायला सांगतात याचा अर्थ ते स्वतः स्वखुषीने राजीनामा देतात असे नक्कीच नाही. त्याप्रमाणे केंद्रीय नेतृत्वाने हे प्रपोजल फडणवीसांकडून मागवले असेल ही शक्यता नाही? दुसरे म्हणजे शेवटी निर्णय केंद्रीय नेतृत्वानेच घेतला असेल तर मग मोदी-शहा यासाठी जबाबदार का नाहीत? एकटे फडणवीस कसे?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मोदी-शहांनी ज्या पध्दतीने पूर्ण पक्षसंघटना आपल्या मुठीत ठेवली आहे ते पाहता हा निर्णय घेण्यासाठी फडणवीसांना स्वातंत्र्य दिले असेल ही शक्यता त्यामानाने बरीच कमी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

The state unit of the BJP has forwarded Sujay Vikhe Patil’s name to the central unit to be considered for candidature in the elections, said Devendra Fadnavis. स्टेट युनिटने पाठवलंय. स्टेट युनिट म्हणजे फडणवीस? का प्रदेश अध्यक्ष? का आणखी कोणी? याचा अर्थच असा होतो आहे की, देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, स्टेट युनिटने पाठवलंय. (मी काहीही केलेलं नाही आहे.)

😀

मला तर वाटतं, फडणवीसांना हा सगळा प्रकार पसंत नसेल म्हणून हे प्रपोजल मोदी/शहांनी स्टेट युनिटला पाठवायला सांगितलं असेल.

🤣