Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 14/03/2021 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corpo… आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.

वाचने 52346
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

https://www.loksatta.com/pune-news/it-is-just-the-beginning-one-part-is… सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खातं होतं, त्यावेळी अशाप्रकारचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होती की, त्यांना पुन्हा घेतलं पाहिजे. म्हणून त्यावेळी मी अॅडव्हकेट जनरल यांना बोलवून ती फाईल दाखवली होती आणि त्यावेळी मला असा सल्ला दिला गेला होता की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते निलंबित झालेले असल्याने त्यांना घेणं योग्य होणार नाही, तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी करोनाचं कारण दाखवून करोनात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असं कारण दाखवून त्यांना पुन्हा घेतलं.....

In reply to by मुक्त विहारि

फडणवीस जे सांगत आहेत तशा घटना देशांत हजारो घडतात.. फडणवीस सांगत आहेत ते खरे जरी असले तरी त्यांचा हेतू स्वार्थी आहे.. सरकार ल अडचणीत आणणे हा त्यांचा हेतू आहे निःपक्ष प्रशासन असावे हा त्यांचा हेतू नाही. देशातील राजकीय पक्षांची पातळी खालावली आहे. आणि त्याला कारण स्व बुध्दी न वापरता भावनीक निर्णय घेणारी जनता. काँग्रेस नालायक असेल तर BJP सुद्धा नालायक च आहे आणि सेना,राष्ट्रवादी सुद्धा नालायक च आहेत. कारण जनताच त्यांचे प्रतिनिधी योग्य निवडत नाही

In reply to by Rajesh188

फडणवीस जे सांगत आहेत तशा घटना देशांत

हजारो

घडतात.. कशाला थापा मारताय? मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी नोकरीत परत सामावून घेतलेल्या माणसांची उदाहरणे दाखवून द्या.

In reply to by सुबोध खरे

मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी नोकरीत परत सामावून घेतलेल्या माणसांची उदाहरणे दाखवून द्या.
झाले गायब..!!! दावा हजाराचा करायचा पण 5 उदाहरणे पण द्यायची नाहीत.. !!

लोकसत्ता लोकप्रिय paper झाला वाटत. अर्णव नी लोकसत्ता मालकंस यशाचा मंत्र दिला.

आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. :( दु:खद बातमी. ख्रिश्चन धर्मांतरणाला पुन्हा वेग येणार अांध्रात.

In reply to by उपयोजक

उपयोजक, स्थानिक लोकप्रतिनिधी वायेसारचे चालतील. आमदार व खासदार नकोत. अर्थात, स्थालो एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर निवडून येणं ही धोक्याची घंटा आहेच. बहुधा छुपा ख्रिश्चन टक्का खूप वाढलेला असावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राष्ट्रीय पक्ष कोणत्याच लोकांना नको आहेत. प्रादेशिक पक्ष स्थानिक प्रश्न नीट समजून घेवू शकतात असे लोकांना वाटते. प्रथम देश हा सुविचार आहे फक्त फळ्यावर लिहायचं . इतकेच त्याचे महत्व आहे

In reply to by उपयोजक

देश हित करणारी उत्तम दर्जा ची माणसं निवडून ध्या. धर्म हा बाजूला ठेवा . हिंदू निवडून दिला म्हणून तो हिंदू चे भले करणार नाही. आणि मुस्लिम निवडून दिलं म्हणजे तो मुस्लिम लोकांचे भले करणार नाही. कोणत्या ही धर्माचा सभ्य व्यक्ती निवडून दिला तर तो मानव हित नक्की च करेल.

In reply to by NiluMP

खिलाफत चळवळ, रझा संघटने बद्दल काहीही माहिती नाही... तसेही त्यांना, दक्षिण कोरिया बद्दल पण काहीही माहिती नाही...

In reply to by मुक्त विहारि

अनभिज्ञता नाही ही. हे जाणीवपूर्वक लिहिणं आहे. बाकी खुसपटं काढणं, उगाच काहीही बाता ठोकणं हे सर्व शिवसेनेचं लक्षण आहे. ते आता दिसतंच आहे मागच्या ६-७ आठवड्यांपासून. हे सर्व सो कॉल्ड चांगल्या भाषेत लिहिलं म्हणजे प्रतिसाद देखील उडवल्या जात नाहीत. चिथावणीखोर लिहिणं हे अनभिज्ञता नाही तर धागे हायजॅक करण्याची मानसिकता दर्शवतं. कोणतीही चांगली चर्चा होऊच द्यायची नाही असं काहिसं धोरण वाटायला लागलं आहे हे. असो.

In reply to by राघव

आणि हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे... आमच्या डोंबिवली येथील पत्रीपुलाचे जास्तीत जास्त काम आधीच्या सरकारने केले आणि श्रेय उपटायचा प्रयत्न, ह्या सरकारने केला...

नावा वर राजकारण करणारी लोक मला सर्वात मोठे भामटे वाटतात. त्यांच्या हातून देश हित कधीच होणार नाही.

Corona हे थोतांड आहे ह्याची खात्री पटत चालली आहे. लोक पण आता ह्या बातम्या गंभीर पने घेत नाहीत महाराष्ट्र सोडून बाकी राज्यात लोक गर्दी करत नाहीत,सर्वच्या सर्व मास्क वापरतात ,आरोग्य व्यवस्था चांगली असहे,लोक शिस्त प्रिय आहेत, तर बिलकुल नाहीत तरी आकडे येथीलच कसे वाढतात. टेस्ट पण एक थोतांड च आहे. १००० गुणिले लोकसंख्या हा चावटपणा चालू आहे . एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही.

In reply to by Rajesh188

एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही.
तुमच्या माहितीतले कोणिही गंभीर आजारी न पडो ह्या सदिच्छा!

In reply to by Rajesh188

एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही. आपण स्वतःला सर्वज्ञ किंवा बुद्ध समजता काय? आणि आपले लाडके मुख्यमंत्री आरोग्य मंत्री जनतेला अंतर ठेवा, मुखवटा घाला, काळजी घ्या म्हणून आवाहन करतात ते काय गांजा पिऊन बोलतात का?

In reply to by सुबोध खरे

एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही. देशाच्या कानाकोपर्‍यात चौदा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पोटनिवडणुका , त्यातही

नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन

झाल्याने पोटनिवडणुका. थापाडेराव राव काहीही वाचत नाहीत काहीही ऐकत नाहीत सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना बोधीवृक्षाखाली बसून आपोआप होतच असते तेंव्हा त्यांना सर्व मिपाकरांनी शरण जावे हे उत्तम.

In reply to by सुबोध खरे

पण क्षय रोगांनी भारतात covid पेक्षा जास्त लोक मरण पावतात.(रुग्ण आणि होणारे मृत्यू असे बघा) Covid काळात अनेक रोगांवर उपचार च झाले नाहीत. किंवा बाकी रोगाच्या चाचण्या च झाल्या नाहीत हे पण सत्य आहे. एक लाख ५९ हजार covid मुळे मृत्यू झाले असे सरकारी रेकॉर्ड सांगते पण ह्या मृत्यू झालेल्या लोकात बाकी आजारांनी मरण आलेल्या लोकांचा पण सहभाग आहे . Covid positive pan मृत्यु दुसऱ्याच आजाराने हीच लोक जास्त आहेत. तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते आम्हाला सांगायला लागत आहे. देशाची लोकसंख्या १३० कोटी. Covid रुग्ण सव्वा कोटी पण नाहीत . आणि एकूण मृत्यू १ लाख ५९ हजार. आणि क्षय रोगाचा आकडा तुम्हाला माहीतच असेल. Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात. मग covid ची भीती प्रमाण पेक्षा जास्त दाखवून बाकी आजारांना दुर्लक्षित केले जात आहे.

In reply to by सुबोध खरे

पण क्षय रोगांनी भारतात covid पेक्षा जास्त लोक मरण पावतात.(रुग्ण आणि होणारे मृत्यू असे बघा) Covid काळात अनेक रोगांवर उपचार च झाले नाहीत. किंवा बाकी रोगाच्या चाचण्या च झाल्या नाहीत हे पण सत्य आहे. एक लाख ५९ हजार covid मुळे मृत्यू झाले असे सरकारी रेकॉर्ड सांगते पण ह्या मृत्यू झालेल्या लोकात बाकी आजारांनी मरण आलेल्या लोकांचा पण सहभाग आहे . Covid positive pan मृत्यु दुसऱ्याच आजाराने हीच लोक जास्त आहेत. तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते आम्हाला सांगायला लागत आहे. देशाची लोकसंख्या १३० कोटी. Covid रुग्ण सव्वा कोटी पण नाहीत . आणि एकूण मृत्यू १ लाख ५९ हजार. आणि क्षय रोगाचा आकडा तुम्हाला माहीतच असेल. Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात. मग covid ची भीती प्रमाण पेक्षा जास्त दाखवून बाकी आजारांना दुर्लक्षित केले जात आहे.

In reply to by Rajesh188

तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते माहिती आहे. मग काय शनिवार वाड्यावर लाऊड स्पीकर लावून बोंबलू? आजच माझ्या वर्ग मित्राच्या आईच्या स्तनाच्या कर्करोगाची चाचणी केली चौथ्या स्टेज मध्ये आहे ६ महिन्यापासून असलेली गाठ. कोवीड मुळे त्यांनी कुणाला सांगितले नाही. असे रुग्ण रोज पाहतो आहे. आम्हाला सांगायला लागत आहे. आपल्यासारखे बोधीवृक्षाखाली बसून ज्ञान मिळालेले नाही गेली ३७ वर्षे शिकतो आहे .आपल्या ज्ञानाच्या अगाध पातळीला पोहोचायला बहुतेक सात जन्म लागतील Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात. हे ज्ञान मला नाही. The India TB Report 2020 stated that 79,144 deaths due to tuberculosis were reported in 2019. पण क्षय रोगाने चालता फिरता माणूस चार दिवसांत कैलासवासी होत नाही. बरीच वर्षे उपचार नीट न मिळाल्याने /केल्याने जातात. ज्यांचे धडधाकट नातेवाईक असे गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना तुमचे असले अफलातून लॉजिक सांगणार का?

In reply to by सुबोध खरे

Dr साहेब तुमचे अगदी बरोबर आहे पण इथे अजून एक व्यक्ती आहे जी म्हणते केव covid च नाही तर सगळ्या लसी थोतांड आहे, त्यांना पण थोडे ज्ञान दया

In reply to by सुबोध खरे

डॉक्, हे सगळे त्यांना सांगून उपयोग होणार नाही. स्वतः एकांगी विचार ठेवायचे आणि अख्या जगाला निष्पक्ष विचाराचे ज्ञान द्यायचे हे यांचे लॉजिकल तत्वज्ञान. तर्क हा मुळातच निष्पक्ष ठेवावा लागतो, एकाच विषयाला अनेक कंगोरे असू शकतात हे बेसिक फंडेच यांना माहित नाहीत. किंवा वेड पांघरण्याचा प्रकार आहे. असो. आपल्या प्रतिसादांमधील माहिती आवडते. लिहिते रहा.

In reply to by Rajesh188

तरी त्याला केंद्रच दोषी आहेत अशी समजणारी अशिक्षित गुलाम लोक पण भरपुर आहेत. :)

In reply to by मदनबाण

तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची लिंक देवू नका. ज्यांचे व्हिडिओ तुम्ही लिंक म्हणून देता ती सर्व लोक सत्यवादी हरिश्चंद्र ची संतान नाहीत . तर लांडगे आहेत. कोणाला काय वाटतं हे महत्वाचे नाही .तुम्हाला स्वतःला काय वाटते तेव्हढेच सांगत जा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी फालतू वेळ पण कोणाकडे नसतो . दुनिया काय विचार करते हे त्या विचार करणाऱ्या वर सोडा . फक्त तुम्ही काय विचार करता ह्याच्या शी मिपाकरांना देणेघेणे आहे. लबाड लोकांशी काही देणेघेणे नाही.

In reply to by Rajesh188

@ राजेश... तुमच्या प्रतिसादास मी फक्त पास म्हणतो ! :))) असो... ताजा कलम :- White Innova car which accompanied explosives-laden Scorpio car recovered from Mumbai Police Commissioner Parambir Singh’s office: Reports राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयातून पांढरी इनोव्हा कार जप्त केली आहे.मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवण्यासाठी या इनोव्हाचा वापर केल्याचा संशय होता. जाता जाता :- वृद्धत्वात देखील मा.शरद पवार यांना किती सगळीकडे हेलपाटे घालावे लागत आहेत, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी. उगाच सगळीकडे डॅमेज कंट्रोल करत बसत स्वतःच्या प्रकृतीस डॅमेज करुन घेउ नये !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)

In reply to by मदनबाण

आता परमबीर सिंह आत जाणार का ? परमबीर आत जातील की नाही ते येत्या काळात कळेलच, पण सध्या त्यांची पालखी उचलली जाईल असे दिसते ! जाता जाता :- महाराष्ट्रात इतके मोठे कांड घडले, मुंबई पोलिसांची इज्जत वेशीला टांगली गेली तरी गृहमंत्री अजुन पदावर विराजमान कसे ? नक्की काय काम करुन कशाचा पगार घेतात हे मंत्री महोदय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili

In reply to by मदनबाण

परमबीर आत जातील की नाही ते येत्या काळात कळेलच, पण सध्या त्यांची पालखी उचलली जाईल असे दिसते ! पालखी उचलली जाईल असे वाटल्यावर यांची फाफललेली दिसतेय कारण अचानक यांना समर्थन देण्यासाठी कृत्रीम टिवटिवाट सुरु करण्यात आला आहे ! ‘Parambir Singh toolkit’: Campaign launched by unidentified groups on Twitter to support Mumbai CP after Shiv Sena backs Sachin Vaze in Antilia case गाड्या वापरणारे पोलिस,गाड्या पार्क करणारे पोलिस,गाड्यांचे नंबर प्लेट्स बदलणारे देखील पोलिसच मग तरी सुद्धा परबीर आणि गृहमंत्री अजुन पदावरच ! रक्षकच भक्षक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili

In reply to by Rajesh188

तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची लिंक देवू नका. १८८ प्रभू तुम्ही तर कोणत्याही धाग्यावर प्रतिसादच देऊ नका. आता त्यावर हसायला येत नाही पण कीव येते तुमची.

In reply to by आग्या१९९०

सत्तेत मग्न बेधुंद काँग्रेस चे शेवटचे दिवस आणि आता bjp चे वर्तन समान आहे. आता bjp च शेवट आला आहे जसे काँग्रेस च्य ::::::: भागावर लाथ मारून त्यांना बाहेर केले त्याच मार्गाने bjp जात आहे पण खूप लवकर ह्याचे दुःख होत आहे. एक निर्णय क्षमता असणारा पक्ष काहीच दिवसात नष्ट होईल त्याचे दुःख आहे

बातमी आली रे राजेशा- He (Waze) was initially very reluctant to speak up and denied all allegations. But when he was confronted with technical evidence, that includes his location at several places that he could not explain and footage from CCTV cameras along with results of forensics, he broke down and confessed that he was part of the conspiracy,” the source said. NIA claims Waze's teammate arranged for fake number plate for the explosive-laden SUV to mislead investigators, says more names from Mumbai Police will emerge. द प्रिन्ट वरील बातमी आहे. उद्या आमचे संजय राउत सामनात काय म्हणतात ते बघुया.

२००८ च्या बाटला हाऊस चकमकीत पोलिस अधिकारी मोहनचंद्र शर्मा यांना ठार मारल्याप्रकरणी दिल्लीतील कोर्टाने आरिझ खानला देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. बाटला हाऊस चकमक झाल्यानंतर सोनिया गांधी म्हणे रात्रभर तळमळत ढसढसा रडत होत्या. आपले युगपुरूष अरविंद केजरीवाल हे पण ही चकमक बोगस होती असे म्हणाले होते. आता या मंडळींची यावर प्रतिक्रिया काय असेल?

सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. sambhaji pawar सांगलीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून त्यांनी १९८६ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जनता पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणुक लढवली आणि जिंकली. ही पोटनिवडणुक माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे झाली होती. त्या पोटनिवडणुकीत संभाजी पवारांनी विष्णूअण्णा पाटील यांचा पराभव करून खळबळ उडवली. संभाजी पवार १९९० आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही जनता दलाचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. १९९५ मध्ये तर सांगलीशेजारच्या मिरज विधानसभा मतदारसंघातूनही जनता दलाचे प्रा.शरद पाटील यांनी विजय मिळवला होता आणि पूर्ण महाराष्ट्रातून अस्तंगत होणार्‍या जनता दलाचे दोन आमदार सांगली जिल्ह्यातून आले होते. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मी सांगलीत राहायला होतो. तेव्हा माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा सांगलीत आले होते आणि मतदारसंघात जनता दलाचे दोन आमदार असतानाही पक्षाचा लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार का नाही ही विचारणा त्यांनी स्थानिक नेत्यांकडे केली होती असे वाचल्याचे लक्षात आहे. संभाजी पवारांचा १९९९ मध्ये काँग्रेसच्या दिनकर पाटील यांनी पराभव केला. २००३ मध्ये संभाजी पवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी पण सांगलीत आले होते. २००४ मध्ये संभाजी पवार भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढले पण विष्णूअण्णा पाटील यांचे चिरंजीव मदन पाटील यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवली आणि ते जिंकले. संभाजी पवार दुसर्‍या तर काँग्रेसचे १९९९ ते २००४ या काळातील आमदार दिनकर पाटील तिसर्‍या क्रमांकावर होते. २००९ मध्ये संभाजी पवारांनी २००४ च्या पराभवाची परतफेड केली. २००९ ची विधानसभा निवडणुक सांगलीत गणेशोत्सवादरम्यान अफजलखान वधाचे पोस्टर लावल्यामुळे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर झाली होती. त्यावेळी मदन पाटील काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यांचा संभाजी पवारांनी पराभव केला. तसेच शेजारच्या मिरजमधूनही भाजपचे उमेदवार म्हणून सुरेश खाडे निवडून आले होते. सांगली आणि मिरज मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपने २००९ मध्ये यश मिळवले. २०१४ मध्ये वाढत्या वयामुळे संभाजी पवारांनी निवडणुक लढवली नाही. सांगली भागात त्यांचे नाव बर्‍यापैकी आदराने घेतले जायचे हे मी बघितले होते. त्यांना श्रध्दांजली.

https://www.loksatta.com/pune-news/kirit-somaiya-question-to-sharad-paw… सामान्य लोकांनी, असामान्य लोकांसाठी, निवडून दिलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील.

In reply to by मुक्त विहारि

सामान्य लोकांनी, असामान्य लोकांसाठी, निवडून दिलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील. असे नसून असामान्य लोकांचे, सामान्य लोकांनी निवडून न देताही मागच्या दाराने आलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील.

In reply to by मुक्त विहारि

अजब लोकशाहीचा किस्सा एकदा प्रमोद महाजन यानी एका चिनी अधिकार्‍याला सान्गितला होता. १८२ खासदार असलेला भाजपाचा प्रमोद महाजन विरोधी पक्षात तर रमाकान्त खलप हा म गो पक्षाचा एकमेव खासदार केन्द्र सरकारात !

https://www.loksatta.com/mumbai-news/investigate-shiv-sena-leader-varun… हे नक्की काय गौडबंगाल आहे? "वरूण सरदेसाई ", यांचा काय संबंध? अर्थात, सामान्य लोकांसाठी काम करणारे, असामान्य सरकार असल्याने, योग्य तो निर्णय नक्कीच घेतील....

ते पोलिस आयुक्त परमबीर सिंग ह्यांचीही कोठडीत ठेउन चौकशी केली पाहिजे. त्यांच्या छुप्या आशीर्वादाशिवाय हे सचिन वाझे अतिरेकी चाळे करू शकले नसते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुशांतच्या निधनानंतर रिहा चक्रवर्तीबरोबर गुलुगुलु बोलणारे हेच ना

राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य स्वपन दासगुप्ता यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा उद्यापासून ग्राह्य धरला जावा अशी विनंती त्यांनी केली आहे. dasgupta २०१६ मध्ये दासगुप्तांची नियुक्ती राज्यसभेवर झाली होती. नियमाप्रमाणे असे राष्ट्रपतीनियुक्त सदस्य नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये कोणत्या राजकीय पक्षात सामील झाले तर हरकत नसते पण त्यानंतर ते कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास ते अपात्र ठरतात. दासगुप्ता वेगवेगळ्या टिव्ही चॅनेलवर भाजपची बाजू मांडताना अनेकदा दिसतात पण त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. मात्र परवा भाजपने बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली त्यात हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर मतदारसंघातून उमेदवार म्हणून स्वपन दासगुप्तांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. म्हणजेच त्यांचा भाजपत प्रवेश होणार आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना पक्षाकडून त्यांच्या वतीने फॉर्म-बी भरला जाणार आणि ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील आणि त्यांना कमळ हे पक्षाचे चिन्ह देण्यात यावे असे पक्षाकडून निवडणुक आयोगाला सांगितले जाणार. सहा महिन्यांची मुदत उलटून गेल्याने दासगुप्तांनी स्वतःच राजीनामा दिला असता तर ते बरे झाले असते. पण तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील कृष्णनगरच्या खासदार महुवा मोईत्रा यांनी दासगुप्तांचे नाव उमेदवारांच्या यादीत असल्याबद्दल आक्षेप घेतला आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. स्वतः स्वपन दासगुप्तांनी याची माहिती पुढील ट्विट करून दिली आहे.

हे पूर्वी आऊटलुक साप्ताहिकाचे संपादक होते का?
नाही. ते विनोद मेहता. स्वपन दासगुप्ता आऊटलुकमध्ये नव्हते. अवांतरः पूर्वी स्वपन दासगुप्ता आणि चंदन मित्रा हे दोन पत्रकार चर्चांमध्ये भाजपची बाजू मांडायचे. पण चंदन मित्रा काही वर्षांपूर्वी तृणमूलमध्ये गेले. युट्यूबवर जून १९८८ च्या पोटनिवडणुकांवरील प्रणॉय रॉयचा व्हिडिओ मिळाला. याच पोटनिवडणुकांमध्ये वि.प्र.सिंग अलाहाबादमधून जिंकले होते. या कार्यक्रमात तरूणपणचे प्रणॉय रॉय, विनोद दुआ, चंदन मित्रा आणि शेखर गुप्ता दिसतील.