Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 11/03/2021 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.

वाचने 55109
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

तिबेट हे स्वायत्त ठेवायचे १५० वर्षांचे ब्रिटिशांचे धोरण योग्य होते. भारत व चीन मधील तिबेट या बफर स्टेटचे महत्व जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांना समजले होते. हे धोरण चालू ठेवले असते तरी अनेक त्रासांतून मुक्तता मिळाली असती. त्या ऐवजी पीएलएला तिबेट ताब्यात घेण्याची मुभा आपण दिली. ही मोठी घोडचूक होती. इतकेच नव्हे तर तिबेटमधे अनेक दशके असलेली आपली सैन्य तुकडीही आपण परत बोलावली. खरं तर आपण त्यावेळेस विरोध केला असता तर ब्रिटन व अमेरिका आपल्या मागे उभे रहायला तयार होते. पण इथूनच भारत हा सॉफ्ट टार्गेट समजायला सुरवात झाली. "ताकदवान पण कचखाऊ" ही आपली प्रतिमा आपण जेव्हां पूर्णपणे पुसून टाकू तो सुदिन असेल.

In reply to by शाम भागवत

घराणेशाही मोडीत काढायला हवी... आणि सगळ्या प्रकारची प्रार्थनास्थळे बंद करून, व्यायामशाळा उघडायला हव्यात.. आणि किमान 15-20 वर्षे सैन्य दलात काढली असतील, त्यालाच निवडणूक लढवायचा अधिकार हवा...

In reply to by मुक्त विहारि

सैन्य दलात नोकरी करणारे उत्तम शासक असतात असे तुम्ही सुचवत आहात का? किंवा ते भ्रष्ट नसतात. सर्रास सर्व प्रामाणिक असतात . असा तुमचा भ्रम झालेला दिसतोय. चांगले प्रतिनिधी निवडणे हे जनतेचे काम आहे. मग निवडणुकीत कोणी ही उभे असू ध्या.

किमान 15-20 वर्षे सैन्य दलात काढली असतील, त्यालाच निवडणूक लढवायचा अधिकार हवा...>>>>>>> खूप हास्यास्पद सूचना आहे

In reply to by Rajesh188

कारण, अजून बराच अभ्यास करावा लागेल... मौर्य काळ ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात, तलवार हाती धरणारेच, उत्तम प्रशासक होते... सैन्यातील शिस्त, व्यावहारिक जीवनांत उपयोगी पडतेच...

अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत.
एक शंका आहे. ही अशी जी बिले आहेत ती मीटर रिडिंग नुसार दिली आहेत कि मीटर रिडींग व प्रत्यक्ष बिल ह्यात तफावत अश्या प्रकारची आहेत.?

In reply to by कानडाऊ योगेशु

मीटर रिडींग प्रमाणेच आहेत पण प्रश्न हां आहे कि कोणताही अतिरिक्त वापर नसताना 8-10 पटीने बिले आलीच कशी.. याची चौकशी व्हायला हवी.

In reply to by बापूसाहेब

मीटर रिडींग प्रमाणेच आहेत
मग प्रश्न असा पडतो कि रिडिंग इतके कसे काय पळाले वा पळवले गेले? म्हणजे जिथे साधारण महिन्याला १०० युनिट्स खर्ची होत असतील तिथे १००० युनिट कसे काय खर्च झाले असावेत. एकजात सगळे मीटर अचानकच फॉल्टी कसे काय झाले?

In reply to by कानडाऊ योगेशु

याविषयी इतर प्रतिसादांमधून माहिती देण्यात आली आहेच पण त्यात एक मुद्दा राहिलेला दिसत आहे आणि तो म्हणजे विजेच्या बिलांच्या स्लॅबचा. एप्रिल ते जून पर्यंत सरासरी वीजेचा वापर केला असे गृहित धरून बिले दिली गेली आणि माझ्यासारख्या अनेकांनी ती बिले ऑनलाईन भरली पण होती. त्यानंतर जुलै महिन्यात अचानक ७-८ पटींनी जास्त वीजेचा वापर केला असे बिल आले. वीजेच्या बिलांच्या वापराच्या स्लॅब्ज असतात. ३०० युनिट्सच्या वर प्रत्येक युनिटला ११-१२ रूपये इतका दर असतो. त्यामुळे ८०० युनिट्स वापरले असे बिल असेल तर ३०० च्या वरच्या ५०० युनिट्सचे बिलच सुमारे ६ हजार रूपये होते. तसेच इंधन अधिभार, व्हिलिंग चार्जेस वगैरे आणखी हजारेक रूपये त्यात मिळवा. पहिल्या ३०० युनिट्सचे बिल आणखी वेगळे. त्यामुळे बिले भरमसाठ आली. यात लिहिलेले महिने कदाचित थोडेफार पुढेमागे झाले असतील पण जे झाले ती सत्य परिस्थिती होती. मुळात सरासरीप्रमाणे ऑनलाईन आलेले बिल भरून वर मला पण असेच भरमसाठ बिल आले होते. मुळात १०० युनिट्स पेक्षा कमी वापरणार्‍या ग्राहकांना अचानक ७-८ पटींनी जास्त वीजेचा वापर केला आहे असे बिल आले आहे. त्यामागे मीटरमध्ये फेरफार होते का याविषयी कल्पना नाही. झालेला प्रकार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हजारो-लाखो ग्राहकांबरोबर झाला आहे याविषयी बातम्यांमध्ये बघितले आहे. कारण काहीही असले तरी कुठेतरी गफलत नक्कीच आहे आणि याविषयी सरकार नक्की काय चूक आहे हे बघायला पण तयार नाही. त्याउपर ही थकबाकी न भरणार्‍यांची कनेक्शन कट करणे हा निर्लज्जपणाचा कळसच झाला.

महाराष्ट्रात किती ग्राहकांना अशी जास्त बिल आली आहेत त्याची काही आकडेवारी आहे का? माझ्या इमारती मध्ये असे एक पण उदाहरण नाही. माझ्या गावी असे एक पण उदाहरण नाही.

In reply to by Rajesh188

मिटर रिडिंग प्रमाणे बिल पाठवले असेल तर आलेले बिल भरावेच लागेल. फारच शंका वाटत असेल तर मिटर तपासून घ्या.

In reply to by Rajesh188

तुम्ही चष्मा काढून "नीट" पहात चला.. दिसेल... हवं तर माझं इलेकट्रीसिटी बिल पाठवून देतो. गेल्या दोन वर्षात कधीही 200 युनिट क्रॉस केलेले नाही.. पण जुन 2020 मध्ये अचानक 856 युनिट वापर दाखवलाय.. बरं मार्च, एप्रिल, मे चे रिडींग avg नुसार अंदाजे घेतले होते (156 युनिट ).. बॅलन्स करण्यासाठी जून मध्ये जास्त युनिट आले असं समजून घेतले तरी एकदम 856 युनिट कसे काय??? याचाच अर्थ काहीतरी गडबड आहे.

In reply to by बापूसाहेब

काय ती भाषा? मी वीजबिलावरील रिडिंग आणि प्रत्यक्ष मीटरवरील रिडिंग दोन्ही तपासून खात्री करून मिटरची तक्रार करा असे सांगितले.

In reply to by आग्या१९९०

आग्या जी. माझा वरील प्रतिसाद तुमच्यासाठी नव्हे तर राजेश जी यांच्यासाठी होता.. कारण त्यांच्या मते वाढीव वीज बिल ही समस्या च नाहीये.. त्यांना असा कोणी व्यक्ती अजुन दिसलेला नाहीये ज्याला हा प्रॉब्लेम आहे....

In reply to by बापूसाहेब

bill हा माझा पुण्याच्या घराचा वीज वापर तक्ता. माझा भाडेकरु लोकडाउन मुळे आपल्या मुळ गावी आहे. तरीही त्याला जुन मधे ६०९ युनीट वापर झाला असे बिल आले आहे. घोळ जुन ते सप्टेबर या महिण्यांमधे आहे. फेब ते मे बिल बरोबर आहे. मी बाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष रीडिंग काय आहे ते माहीत नाही. पर्ंतु ह्यात संशयाला मोठी जागा आहे.

In reply to by सुक्या

Month |Current |Previous| Used Mar-20 |13354 |13296 | 58 Apr-20 |NA |13354 | May-20 |NA |13354 | Jun-20 |13963 |13354 | 609 Jul-20 |14330 |13963 | 367 Aug-20 |14620 |14330 | 290 Sep-20 |14913 |14620 | 293 Oct-20 |14978 |14913 | 65 Nov-20 |14978 |14978 | 0 Dec-20 |14978 |14978 | 0 Jan-21 |14980 |14978 | 2 Feb-21 |15071 |14980 | 91 थोडे अजुन अ‍ॅनॅलिसिस केले (खाज दुसरे काय !!). वरील तक्ता हा मीटर रीडिंग सह आहे. चालु बिलात मीटर चा फोटो आहे व त्यातले १५०७१ हे रीडिंग योग्य आहे. वरील तक्ता पाहता वीज मंडळाची यात काहीही चुक दिसत नाही. ज्या काळात प्रत्यक्ष रीडिंग घेता आले नाहीत तेव्हा अंदाजे रीडिंग घेतले आहेत. नंतर (नोव्हें - जानेवारी) च्या काळात जास्तीचे रीडिंग अ‍ॅडजेस्ट केले आहेत. यात मला फक्त व्याज जास्त लावलेले आहे आणी स्थिर आकार दर महिण्याला लावलेला आहे. तस्मात वीज मंडळाचा यात मला तरी घपला वगेरे दिसत नाही. हा माझ्या वरच्या आकडेवारीवरुन काढलेला निष़्कर्ष आहे. ईतरांचा अनुभव वेगळा असु शकतो.

In reply to by सुक्या

काहितरी नक्कीच गडबड असणार. वापर नसताना युनिट वाढायलाच नको. माझ्या कृषीपंपाचेबाबतीत वापर नसताना भरमसाठ बिल आले. तक्रार करून मिटर रिडिंग पंचनामा केल्यावर प्रत्यक्ष मिटर रिडिंग पेक्षा बिलावर चौपट रिडिंग दाखवले होते. साइट विजिट रिपोर्ट आणि मीटरचा चालू स्थितीतील फोटो आणि व्हिडिओ अधिकाऱ्याला दाखवल्यावर सरकारी योजनेप्रमाणे सवलत देऊन पैसे भरायला सांगितले. मी SVR मध्ये असलेल्या रिडिंग प्रमाणे फक्त वर्षभरातील दर महिन्याचे स्थिर आकार दंडासकट भरायला तयार आहे असे सांगूनही अधिकारी ते मान्य करत नाहीं. सध्या एकटाच लढत आहे. असे खूप जणांच्या बाबतीत झाले आहे, लोकं तावातावाने सरकार आणि विजमंडळला शिव्या घालतात.मी पुढाकार घेऊनही प्रत्यक्षात कोणीही एकत्र येऊन विरोध करायला तयार होत नाही. सरकार कुठलेही असो, खोटेपणा करत असतील तर विरोध करायलाच हवा हे लोकांच्या पचनी पडत नाही. फालतू लाड मलातरी पटत नाही.

In reply to by बापूसाहेब

हवं तर माझं इलेकट्रीसिटी बिल पाठवून देतो. गेल्या दोन वर्षात कधीही 200 युनिट क्रॉस केलेले नाही.. पण जुन 2020 मध्ये अचानक 856 युनिट वापर दाखवलाय..
म्हणजे कागदोपत्री दाखवलेय कि मीटर च्या रिडिंग नुसार ८५६ युनिट वापरले गेले आहेत? मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन अफरातफर करता येऊ शकते का? म्हणजे लॉकडाऊनमध्ये कुणा कर्मचार्याने परस्पर येऊन रॅण्डमली काही मीटर मध्ये असे फेरफार केले असणे शक्य आहे का?

In reply to by कानडाऊ योगेशु

मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन अफरातफर करता येऊ शकते का?
याबाबत जाणकार माहिती देऊ शकतील..
म्हणजे लॉकडाऊनमध्ये कुणा कर्मचार्याने परस्पर येऊन रॅण्डमली काही मीटर मध्ये असे फेरफार केले असणे शक्य आहे का?
हो. कारण वीज मिटर अश्या ठिकाणी आहे जिथे जाणे येणे होत नाही.. आणि आम्ही सर्वांनी कडकडीत लोकडाऊन पाळला असल्याने आठवड्यातून एकदाच किंवा दोनदा बाहेर पडायचो.. त्यामुळे जर बाहेरून असे करता येत असेल तर असे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by बापूसाहेब

म्हणजे साधारण मे ,जून,जुलै च्या दरम्यान वीज कंपनीचं कर्मचारी मीटर रिडिंग घेण्यास येवू शकत नव्हता. कारण covid मुळे पूर्ण लॉक डाऊन. तेव्हा वीज मंडला कडून मोबाईल वर ग्राहकांना msg केले होते स्वतः च मीटर रीडिंग घेवून तो फोटो महावितरण ल पाठवून देणे. विजचे बिल त्या नुसार ठरणार होते.. ज्यांनी सहकार्य दिले नाही त्यांना अंदाजे बिल दिली गेली(सरासरी वापर बघून) दुसरे त्या वेळेस तीन महिने बिल दिले गेले नव्हते एकत्रित बिल नंतर आले त्या मुळे बिल जास्त आले असा समज खूप लोकांचा झाला. प्रतेक महिन्यात बिल भरून सुद्धा जास्त बिल आले अशा केसेस ऐकण्यात आल्या . पण त्याचे प्रमाण कमी असावे. बाकी एकत्रित तीन महिन्याचे बिल एकदम दिल्या मुळे जास्त बिल आले अशा घटना जास्त आहेत. कित्येक लोकांनी अगदी डिसेंबर पर्यंत एक पण बिल भरलेले नाही. पुण्यात बिल न भरणाऱ्या लोकांचे आकडे मध्ये पेपर मध्ये आले होते. आणि अशा लोकांची संख्या साठ ते सत्तर हजार होती.फक्त पुण्यातील

In reply to by बापूसाहेब

म्हणजे साधारण मे ,जून,जुलै च्या दरम्यान वीज कंपनीचं कर्मचारी मीटर रिडिंग घेण्यास येवू शकत नव्हता. कारण covid मुळे पूर्ण लॉक डाऊन. तेव्हा वीज मंडला कडून मोबाईल वर ग्राहकांना msg केले होते स्वतः च मीटर रीडिंग घेवून तो फोटो महावितरण ल पाठवून देणे. विजचे बिल त्या नुसार ठरणार होते.. ज्यांनी सहकार्य दिले नाही त्यांना अंदाजे बिल दिली गेली(सरासरी वापर बघून) दुसरे त्या वेळेस तीन महिने बिल दिले गेले नव्हते एकत्रित बिल नंतर आले त्या मुळे बिल जास्त आले असा समज खूप लोकांचा झाला. प्रतेक महिन्यात बिल भरून सुद्धा जास्त बिल आले अशा केसेस ऐकण्यात आल्या . पण त्याचे प्रमाण कमी असावे. बाकी एकत्रित तीन महिन्याचे बिल एकदम दिल्या मुळे जास्त बिल आले अशा घटना जास्त आहेत. कित्येक लोकांनी अगदी डिसेंबर पर्यंत एक पण बिल भरलेले नाही. पुण्यात बिल न भरणाऱ्या लोकांचे आकडे मध्ये पेपर मध्ये आले होते. आणि अशा लोकांची संख्या साठ ते सत्तर हजार होती.फक्त पुण्यातील

सर्व धर्माची लोक भीक मागताना दिसतील पण शीख लोकांना भीक मागताना अजुन तरी मी बघितले नाही. लंगर मुळे त्यांना जेवण हक्काने रोज फुकट मिळत असणार जे गरीब आहेत त्यांच्या धर्मात त्यांना. हे एक कारण असावे.

In reply to by हरवलेला

प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन

सर्व धर्माची लोक भीक मागताना दिसतील पण शीख लोकांना भीक मागताना अजुन तरी मी बघितले नाही. लंगर मुळे त्यांना जेवण हक्काने रोज फुकट मिळत असणार जे गरीब आहेत त्यांच्या धर्मात त्यांना. हे एक कारण असावे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/tribal-school-girl-found-preg… आता 21 दिवसांत, तपास करणार का? सोलापूर, जळगांव नंतर हे अत्याचार, आणि म्हणे, हे सरकार जनतेच्या भल्यासाठी....

In reply to by Rajesh188

काश्मीर प्रश्र्न, कुणी निर्माण केला? तिबेटच्या पाठी कोण उभे राहिले नाही? चीनला आंतरराष्ट्रीय सुरक्षा समितीत, आपली जागा सोडून, कुणी दिली? चीनला जमीन कुणी दिली? नेपाळ, भारतात विलीन व्हायला तयार असतांना कुणी नकार दिला? सैन्य दलात अनावश्यक ढवळाढवळ कुणी केली? जीप घोटाळा कुणी केला? सैन्यात कपात करायचा निर्णय कुणी घेतला? ---------------- गेली 60-70 वर्षे भारत ह्याच चुकांची फळे भोगत आहे....

https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-coronavirus-updat… आता हे मात्र नक्कीच करून दाखवले .... पण, जबाबदारी मात्र तुमचीच...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/farmers-protest-दिल्लीच्या-सी… साध्या शेतकरी वर्गाकडे, इतका पैसा कुठून येतो? आणि इतका पैसा असेल तर, पंतप्रधान आवास योजनेचा फायदा, शेतकरी वर्गाने का घ्यावा?

In reply to by मुक्त विहारि

मुक्तविहारी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेने भाकीत केल्याप्रमाणे इ.स. २०३० नंतर मोठ्या शहरांत बरेचसे लोकं राहत असतील तर शहराबाहेर कच्च्या वस्त्या असतील. त्याची ही सुरुवात आहे. संदर्भासाठी जा.आ.व्या.वरील लेख : "They live different kinds of lives outside of the city" : https://www.weforum.org/agenda/2016/11/how-life-could-change-2030/ करोनाच्या थोतांडाखाली अनिर्वाचीत ( = निवडणूकबाह्य ) शक्ती खाजगी अजेंडे राबवीत आहेत. ही म्हणे लोकशाही. घंटा तिच्यायला लोकशाही. आ.न., -गा.पै.

इतके दिवस मिडियात सुशांत सिंग आत्महत्या हा शब्द प्रयोग केला जात होता, परंतु महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सुशांत सिंगची "हत्या" झाली होती असा त्यांच्या भाषणात उल्लेख केला आहे. आता मिडियाने सुशांत सिंग ने आत्महत्या केली होती असे म्हणणे टाळले पाहिजे नाही का ? स्वतः गृहमंत्रीच आता ती हत्या होती हे कबुल करुन मोकळे झाले आहेत हे आता लक्षात ठेवायला हवे. वरील प्रतिसाद मुख्य धाग्यात देखील देउन ठेवला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.

In reply to by मदनबाण

या बाबतीत नितेश राणे यांनी देखील हाच व्हिडियो ट्विट केला होता. दुवा :- https://twitter.com/NiteshNRane/status/1369905926887604224

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.

ही मागणी, स्वातंत्र्याच्या नंतर लगेच होत होती... स्वर्गीय आचार्य अत्रे यांनी मोहीम पण उघडली होती. (ह्या आंदोलनात शिवसेनेचा काहीही सहभाग न्हवता कारण शिवसेनेची स्थापना पण झालेली न्हवती) पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी, त्या काळांत काहीही ठोस अशी भुमिका घेतली नाही.... पंतप्रधान नेहरू यांच्या भाषावार प्रांत योजनेत, यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दाला किंमत होती... यशवंतराव चव्हाण यांनी ठरवले असते तर, सामान्य जनता पण, मतभेद विसरून, यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीमागे उभी राहिली असती... 1960 साली, बेळगांव, कारवार सोडून, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि तिथल्या मराठी माणसांसाठी, शिवसेनेने हा प्रश्र्न सोडवायची जबाबदारी घेतली.... 1995 च्या सुमारास, शिवसेनेने हा प्रश्र्न का नाही सोडवला? पण आता मात्र, शिवसेनेने प्रथेप्रमाणे, केंद्रावर ढकलले.. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-mp-sanja… नेहरूंनी केलेल्या चुकीची फळे, महाराष्ट्राला भोगावी लागत आहेत... ह्यासाठीच, व्यक्तीपुजा आणि घराणेशाही टाळायला हवी...

In reply to by मुक्त विहारि

कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांचे समान प्रश्न आहेत. आणि दोन्ही राज्यासमोर अडचणी पण समान आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक एकमेकाशी सलोख्याने राहतील ते दोन्ही राज्यांच्या हिताचे आहे. बेळगाव मध्ये राहून मराठी लोकांनी उत्तम प्रगती केली आहे. त्या मुळे हा वाद जास्त न वाढून देता दोन्ही राज्यांनी संगनमत नी सोडवावा. संघर्ष नको. तरी कर्नाटक आडगे पणाने वागत असेल तर . कृष्णा खोरे पाणीवाटप चे नियम महाराष्ट्र नी पाळू नयेत.

In reply to by नावातकायआहे

स्वित्झर्लंड ने देखील हल्लीच बुरखा बंदी केली आहे. “In Switzerland, our tradition is that you show your face. That is a sign of our basic freedoms,” Walter Wobmann, chairman of the referendum committee and a member of parliament for the Swiss People’s Party, had said before the vote.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.

In reply to by मुक्त विहारि

या सर्व देशांमध्ये झालेल्या बुरखा बंदीच्यापाठीमागे Rss आहे.. मोदी आणि BJP आहे.. - एक फ्रस्ट्रेटेड लिब्रान्दु...

In reply to by Rajesh188

नाही.. फुरोगामी लोकांची जुनी सवय आहे ना.... प्रत्येक गोष्टीला हिंदूं आणि RSS जबाबदार... !! म्हणून म्हणले कि स्वित्झर्लंड आणि श्रीलंकेत जे काही होईल त्याच खापर पण RSS वर फोडताय कि काय..

In reply to by बापूसाहेब

यांनाच मानतात... त्यामुळे, उद्या जर परमपूज्य राहुल गांधी, यांनी RSS आणि BJP वर आरोप केले की ते पण करणार...

हरयाणापाठोपाठ झारखंडमध्ये सुद्धा खाजगी क्षेत्रात स्थानिकांसाठी ७५% जागा राखीव ठेवणार. https://m.lokmat.com/national/after-haryana-jharkhand-government-clears… महाराष्ट्रात सुद्धा असाच निर्णय हवा.

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे, अहवालातून खुलासा https://www.lokmat.com/politics/congress-leader-rahul-gandhi-tweet-adan…

In reply to by गोंधळी

ह्यांच्या संपत्ती मध्ये कर्जाच वाटा जास्त असायचा . दुसरा निरव तर तयार होत नाही ना. जागतिक बाजारात एक पण भारतीय ब्रँड प्रसिद्ध नसताना भारतीय उद्योगपती ची नाव जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत येतात च कशी. घड्याळ पाडून गाड्या पर्यंत, कॉम्प्युटर पासून मोबाईल पर्यंत सर्व च्या सर्व विदेशी ब्रँड मार्केट मध्ये टॉप ला आहेत. पण श्रीमंती मध्ये भारतीय उद्योगपती टॉप ल. काय गोड बंगाल आहे.

In reply to by Rajesh188

ह्यांच्या कंपन्याचे बाजारमूल्य वाढले ( शेअर्सचे ) की ह्यांच्या संपत्तीत वाढ होते, आपण ते शेअर घेतले तर आपल्याही.

In reply to by आग्या१९९०

आज शेअर मार्केट मध्ये एवढं सरळ काही घडत नाही फॉर्म मध्ये असलेल्या कंपन्या कर्जात डुबक्या मारत आहेत अशा घटना बघण्यात आहेत.

In reply to by Rajesh188

तुमच्या मते फक्त कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेती आणि जोडधंदा करूनच श्रीमंत होता येते का?? यांच्याव्यतिरिक्त बाकीचे जे श्रीमंत आहेत ते कर्ज काढून होतात.. आणि ते फोटोग्राफी करून BMW फिरवणारे एवढे श्रीमंत कसे काय ते पण सांगा कि राव.. गेला बाजार, पेंग्विन चे ( पेंग्विन नावाच्या प्राण्याचे.. त्याचा इतर ठिकाणी संबंध जोडू नये ) फोटो इतक्या जास्त महागात कुठल्या बाजारात विकले जातात त्याची देखील माहिती द्या.. !!!

सिंघू आणि टीकरी सीमेवर पंचतारांकित आंदोलन करणाऱ्या दलालांचा आचरटपणा दिवसेंदिवस वाढतोय. आता तेथील महामार्गावर सिमेंट, विटा वापरून पक्की घरे बांधत आहेत. बुलडोझरने हे सर्व बांधकाम उद्वस्त करून या निरूद्योगी दलालांना रोजगार हमी योजनेवर कामाला लावण्याची गरज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पंतप्रधान आवास योजनेचा फायदा, शेतकरी वर्गाला द्यायची काहीच गरज नाही, हा चुकीचा संदेश, डोंबिवली येथे पसरत आहे...