Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी सोमवार, 08/03/2021 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे. https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-co… याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seein… त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gan… इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.

वाचने 44738
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रात असा कायदा करायला गेले की सर्व हिंदी चॅनेल वेडे होते मुर्खासारखे २४ तास महाराष्ट्र कसा देशाची एकता तोडत आहे अशी बोंब मारली जाते. यूपी,बिहारी नेते बैचेन होतात आणि वेड्या सारखे महाराष्ट्र ला शिव्या शाप द्यायला सुरू करतात. त्यांना भीती असते तिथले बेरोजगार त्यांच्या डोक्यावर बसतील. पण देशात अनेक राज्यांनी असे कायदे केले तरी कोणाला काही फरक पडला नाही. ह्याचा अर्थ सरळ आहे महाराष्ट्र वीणा देशातील युवा वर्गाला रोजगार देण्यास एकपण राज्य सक्षम नाही. उत्तरेतील कमी शिक्षित लोकांना महाराष्ट्र शिवाय दुसरा कोणताच आधार नाही. मग योगी,नितीश किती ही प्रगती च्या गप्पा मारत असले तरी.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/breach-of-privileg… गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदविले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अवमान केला आहे.....इति फडणवीस.....

केरळमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि थ्रिसुरचे माजी खासदार पी.सी.चाको यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून पक्ष सोडायचा निर्णय घेतला आहे. पक्ष सोडताना त्यांनी आरोप केला की केरळमधील काँग्रेस पक्ष हा काँग्रेस (ए) आणि काँग्रेस (आय) या दोन गटांमध्ये विभागलेला आहे. त्यांच्या मते काँग्रेस (ए) म्हणजे माजी मुख्यमंत्री ओम्मेन चंडी यांचा गट तर काँग्रेस (आय) हा केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेनिथ्थला यांचा गट आहे. अशा परिस्थितीत केरळमध्ये काँग्रेसला भवितव्य नाही असे म्हणत त्यांनी पक्ष सोडला आहे. विधानसभा निवडणुक तोंडावर आलेली असताना हा काँग्रेस पक्षाला लागलेला धक्का आहे असे म्हटले तरी चालेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चाको मूळचे पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचे. १९८६ मध्ये पवारांबरोबर तेही स्वगृही परतले. परंतु नंतर १९९९ मध्ये पवारांबरोबर बाहेर पडले नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

चाको मूळचे पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचे. १९८६ मध्ये पवारांबरोबर तेही स्वगृही परतले. परंतु नंतर १९९९ मध्ये पवारांबरोबर बाहेर पडले नव्हते.
या गटातील मंडळींचा इतिहास रोचक आहे. पी.सी.चाकोंप्रमाणेच ए.के.अ‍ॅन्टनी, प्रियरंजन दासमुन्शी आणि अंबिका सोनी हे नेते पण काही काळ समाजवादी काँग्रेसमध्ये होते. मला वाटते वायलार रवी पण त्यात होते. तपासून बघायला हवे. हे सगळे नेते काँग्रेसमध्ये परत जाण्यासाठी १९८६ पर्यंत थांबले नाहीत. पण के.पी.उन्नीकृष्णन हे पवार काँग्रेसमध्ये परत गेल्यानंतरही उन्नीकृष्णन समाजवादी काँग्रेसमध्येच राहिले. पुढे ते वि.प्र.सिंगांच्या मंत्रीमंडळात मंत्री पण झाले. ते १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये परत आले पण त्यात पराभूत झाल्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. यापैकी कोणीही १९९९ मध्ये पवारांबरोबर बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले नाहीत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

१९८९ पर्यंत bjp लोकसभेच्या ५ सीट पण कोणत्याच निवडणुकीत जिंकू शकली नाही. . ३५० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा काँग्रेस नी किती तरी निवडणुकीत जिंकल्या आहेत. लोकसभेच्या ४०२, जागा जिंकून राजीव गांधी नी जो रेकॉर्ड केला आहे तो अजुन अबाधित आहे आणि पुढे कोणी तोडेल ह्याची बिलकुल शास्वती नाही. हा पण जरा इतिहास सांगावा. आपल्याला फक्त आताच ३०० च्या वर जागा मिळाल्या आहेत तर जनता परेशान झाली आहे. जमिनी वर च रहा म्हणजे पुढे यशाची आशा ठेवता येईल.

In reply to by Rajesh188

त्यावेळी मीडिया नव्हता. आजकाल कुठेही खट्ट झाले तरी आवाज पूर्ण जगभर होतो.. त्यावेळी नेमके सरकारमध्ये चाललंय काय हे सामान्य माणसाला समजत नव्हते.. लोकांना काहीबाही सांगून एकाच चिन्हावर शिक्का मारायला सांगितले जायचे.. आणि राहता राहिला 402 तर त्यावेळी सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आलेले आहेत ते. त्यात त्यांचे कर्तृत्व काय?? गांधी आडनाव असल्यामुळेच साधा ग्रामपंचायत न जिंकलेला माणूस डायरेकट पंतप्रधान झाला.. ते त्यावेळी शक्य होते.. आज भारतातील जनता बऱ्यापैकी मॅच्युअर झालेली आहे. त्यामुळे आता ते होणं इतक्या सहजासहजी शक्य नाही.. किंबहुना अशक्यच आहे. आणि हो... येणाऱ्या काही वर्ष्यात तुमचा हां 402 चा रेकॉर्ड देखील तुटेल..

In reply to by बापूसाहेब

नरसिंहरावाच्या काळापर्यंत खाजगी माध्यमे व आंतरजाल नसल्याने नेहरू-गांधीचे खूप उदात्तीकरण झाले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गांधी घराणे हे भारताचे प्रथम कुटुंब आहे असे २०१८ मध्ये जाहीर सांगून याच चाकोंनी नेहरू-गांधी घराण्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. कॉंग्रेसमध्ये लोकशाही नाही असे २०२१ मध्ये सांगून हेच चाको आता कॉंग्रेसमधून बाहेर पडलेत.

झाले ना पाच वर्ष आता मोदी ना हटवून दुसरे कोणाला तरी प्रधानमंत्री करायला पाहिजे. मूवी सारखे घराणे शाही च्या नावाने ओरडत आहेत. मग मोदी ना परत पंत प्रधान का केले. इथे परत फडणवीस च इथला मुख्यमंत्री कशाला हवय. Bjp मध्ये दुसरे कोण लायक नाही का.

In reply to by Rajesh188

पंतप्रधान राहूदे.. तुम्ही ते काँग्रेस चा अध्यक्ष गांधी सोडून दुसरा कोणी घेता येतो का ते पहा.. बाकीच्यांना नंतर ज्ञान द्या..!!

Maharashtra मधील आघाडी चे सरकार पाच वर्ष टिकणार आणि पुढची दहा पंधरा वर्ष पण आघाडीचं सत्तेवर असणार. फडणवीस पुढील वीस वर्ष तरी विरोधी पक्ष नेते च असणार.

नगरीनिरंजन,
त्यांच्यातलं कोणीच “मोदी मोदी” ओरडत नव्ह्तं त्यामुळे त्याचा संबंध मोदींशी लावायचा संबंध येत नाही.
समजा जर ओरडंत असतं 'मोदी मोदी' म्हणून, तर कोणाशी संबंध लावायला पाहिजे ना? माझ्या मते मोदी म्हणजे मोमोता दीदी होत. कारण की या बाई आक्रस्ताळ्या हावभावात आरडाओरडा करण्याबाबत प्रसिद्ध आहेत. नरेंद्र मोदी नव्हेत. आ.न., -गा.पै.