Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी सोमवार, 08/03/2021 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे. https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-co… याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seein… त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gan… इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.
लेख वर्गीकरण

वाचने 45030
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by बापूसाहेब

नरसिंहरावाच्या काळापर्यंत खाजगी माध्यमे व आंतरजाल नसल्याने नेहरू-गांधीचे खूप उदात्तीकरण झाले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गांधी घराणे हे भारताचे प्रथम कुटुंब आहे असे २०१८ मध्ये जाहीर सांगून याच चाकोंनी नेहरू-गांधी घराण्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. कॉंग्रेसमध्ये लोकशाही नाही असे २०२१ मध्ये सांगून हेच चाको आता कॉंग्रेसमधून बाहेर पडलेत.

झाले ना पाच वर्ष आता मोदी ना हटवून दुसरे कोणाला तरी प्रधानमंत्री करायला पाहिजे. मूवी सारखे घराणे शाही च्या नावाने ओरडत आहेत. मग मोदी ना परत पंत प्रधान का केले. इथे परत फडणवीस च इथला मुख्यमंत्री कशाला हवय. Bjp मध्ये दुसरे कोण लायक नाही का.

In reply to by Rajesh188

पंतप्रधान राहूदे.. तुम्ही ते काँग्रेस चा अध्यक्ष गांधी सोडून दुसरा कोणी घेता येतो का ते पहा.. बाकीच्यांना नंतर ज्ञान द्या..!!

Maharashtra मधील आघाडी चे सरकार पाच वर्ष टिकणार आणि पुढची दहा पंधरा वर्ष पण आघाडीचं सत्तेवर असणार. फडणवीस पुढील वीस वर्ष तरी विरोधी पक्ष नेते च असणार.

नगरीनिरंजन,
त्यांच्यातलं कोणीच “मोदी मोदी” ओरडत नव्ह्तं त्यामुळे त्याचा संबंध मोदींशी लावायचा संबंध येत नाही.
समजा जर ओरडंत असतं 'मोदी मोदी' म्हणून, तर कोणाशी संबंध लावायला पाहिजे ना? माझ्या मते मोदी म्हणजे मोमोता दीदी होत. कारण की या बाई आक्रस्ताळ्या हावभावात आरडाओरडा करण्याबाबत प्रसिद्ध आहेत. नरेंद्र मोदी नव्हेत. आ.न., -गा.पै.

https://www.loksatta.com/thane-news/new-restrictions-in-kalyan-dombival… डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने, इतर शहरांत पण, ही परिस्थिति होऊ शकते....