डिस्क्लेमर : खालील लेख हा संपूर्ण काल्पनिक आहे.केवळ माझा वेळ जात नाही म्हणून लिहिला आहे.तुमचा वेळ जर अमुल्य असेल तर, खालील लेख नाही वाचलात तर फार उत्तम.
============================================
शेती करण्यापुर्वी बर्याच जणांचा सल्ला घेतला.त्यापैकी ज्यांनी खूप विरोध व्यक्त केला, ते सगळेच शहरातील.त्यातही बर्याच जणांचे मत असे पडले की, शेतीत पैसे घालवण्यापेक्षा , एखादे टूमदार फार्म हाऊस विकत घेतलेले परवडते.पुढे मग "फार्म हाऊस." ह्या संकल्पनेतील धोका लक्षांत यायला लागला आणि मी फार्म-हाऊस ही माझी नुसतीच हौस ह्या सदरांत मोडेल म्हणून तो विचार बाजूला सारला.
पण गेल्याच आठ्वड्यांत आमच्या एका हितचिंतकाने, हा विचार परत मला ऐकवला म्हणून हा धागा प्रपंच.
आमचा थोडक्यात संवाद असा.
तो : तुम्ही शेत विकत घेताय म्हणे?
मी : हो.
तो : काय भावात पडले?
मी : साधारणे सर्व खर्च वजा जाता एकरी २,५०,०००/- ला पडेल.
तो : अरे.मग शेत घेण्यापेक्षा फार्म हाऊस विकत घ्यायचे.मी मागच्याच वर्षी एक विकत घेतले.
मी : कितीला?
तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत.
मी : अरे व्वा!!! मस्तच.
तो : आता ६-७ वर्षांनी आम्ही तिथेच रहायला जावू.
मी : मस्त.
तो : सध्या आम्ही तिथेच एक कुटुंब ठेवले आहे.ते सध्या देखभाल करत आहेतच.
मी : छान.
तो : आता अजिबात शक्यच नाही झाले तर, ज्याने विकले आहे तो परत विकत घ्यायला किंवा विकायला मदत पण करणार आहे.
मी : ओके. हे तर फारच उत्तम.
तो : तुमच्या शेती पेक्षा, आमचे फार्म हाऊस फायदेशीर ठरणार बघ.
मी : असे झाले तर फार उत्तम.
तो : तू पण फार्म-हाऊसच विकत घ्यायला हवे होतेस.
मी : हो ना.पण काय आहे, माझी जागे बाबतची संकल्पना फार वेगळी आहे.मी सामान्य माणूस असल्याने, अन्न-वस्त्र-निवारा, अशीच माझी चढती भाजणी आहे.शेतात जर अन्नच पिकत नसेल तर शेताचा उपयोग काय?
तो : अरे, तू एकदा माझे फार्म हाऊस बघायला हवेस.
मी : अरे हो.नक्कीच येईन.पण हे आहे कुठेशी?
तो : अरे ते ढिकणेवाडीला आहे.म्हणजे फलाणेवाडी पासून साधारण १०-१२ किमी अंतरावर.
मी : अरे व्वा!!!! मग कधी जावू या.
तो : आता इतक्यात तरी काही शक्य नाही.ह्या डिसेंबरला त्या टलाण्या हॉटेल स्कीम मध्ये पैसे गुंतवले आहेत ना.ते थोडे वसूल करायला गोव्याला जाणार आहे.त्यामुळे उन्हाळ्यात नक्की जावू.
मी : उन्हाळ्यात मला जमेल असे वाटत नाही.कारण ह्या उन्हाळ्यात शेतात बरेच खड्डे खणायचे आहेत.
तो : बघ. ही शेती म्हटली की असे अडकायला होते.म्हणूनच फार्म हाऊस घ्यायचे.आपण मनांत आले की, लगेच निघू शकतो.
मी : हो ना.पण ते जावू दे.मग उन्हाळ्यात तू नक्की जाणार ना? कारण वहिनी म्हणत होत्या की, इथला उन्हळा त्यांना झेपत नसल्याने तुम्ही ह्यावर्षी युरोपला किंवा कूलु-मनालीला जाणर म्हणुन.
तो : हं.ते पण आहेच म्हणा.सध्या उकाडा इतका वाढला आहे की, एक स्वयंपाकघर सोडले तर प्रत्येक खोलीत ए.सी.
मी : (मनांत.आता बाथरूम आणि संडासात पण ए.सी. लावतो की काय? असेल ही.) आता आजकाल उन्हाळा जरा जास्त्च वाढला आहे.
तो : अरे ह्यावर्षी आम्ही नेमके उन्हाळ्यातच फार्म-हाऊस वर गेलो होतो.आमच्या फार्म हाऊसच्या इथे रेंज मिळत नाही.खूप प्रयत्न केला पण त्या आमच्या घरगड्याशी काही संपर्क होइना.घरी पोहोचलो तर घरी कुणीच नाही.आणि शेजारचे सगळेच बंगले रिकामे.मग काय? परत फलाणेवाडीला आलो आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि तिथेच राहिलो.
मी : गूड.हे मस्त.शहर जवळ असल्याचा हा एक फायदाच की.
तो : हो ना.मग दुसर्या दिवशी आम्ही तिथे गेलो तर काय.घरात बरीच घाण.दारे आणि खिडक्या बंद असल्याने घरात कोंदट हवा.शिवाय सध्या तिथे आसपास कुणीच नसल्याने, मुख्य टाकीत पाणीच न्हवते.रखवालदार पण नेमका उशीरा आला.तेंव्हा समजले की पंप जळालेला आहे आणि सोसायटीला अद्याप सेक्रेटरी नसल्याने, तो पंप काही दुरुस्त झालेला नाही.मग त्याच्या मदतीने कसे तरी संध्याकाळी वायरमनला गाठले.वायरमन म्हणाला आधी मागच्या कामाचे पैसे द्या.मगच हात लावतो.मग काय? वायरमनला पटवून त्या दिवसापुरता पंप चालू करून घेतला.चांगले ५००/-रु दिले.
अर्थात सुरुवातीला ह्या अडचणी येणारच.
पाणी सुरु होता-होता रात्र उजाडली तेंव्हा समजले की, घरातील काही ट्युब लाईट चालत नाही आहेत.खरे तर मागच्या वेळीच त्या बदलल्या होत्या पण आता परत बिघडल्या.रखवालदार म्हणाला की, तिथे लाईटचे फ्लक्च्युएशन जास्त असल्याने सगळ्याच घरातील ट्यूब लाईट जातात.
कसे-बसे जेवण घेतले आणि झोपायची तयारी केली...तर काय? सगळ्या चादरींना कुबट वास आणि उंदरांनी पाडलेली भोके.
आता घरी झोपायचा नाद सोडला आणि परत मुक्काम पोस्ट फलाणेवाडी.
आता तिसर्या दिवशी माझी परत एक चक्कर फार्म हाऊसवर करायचा विचार होता.पण तो दिवस समुद्र किनार्यासाठी राखीव असल्याने मग सरळ समूद्र किनार्यावर गेलो.मुले तिथेच जास्त रमल्याने मग तिथेच २ दिवस राहिलो आणि मग परत मुंबईला आलो.
आता परत एकदा फार्महाऊसवर जावे म्हणतो.
मी : का रे?
तो : अरे मागच्या वेळी, तो पंप दुरुस्त करण्याच्या वेळी, तो रखवालदार बोलता बोलता म्हणाला की, इथल्या एका सभासदाला त्याचे फार्म हाऊस विकायचे आहे.साधारण २-३ वर्षांपुर्वी त्याने २५ लाखाला विकत घेतले पण सध्या त्याला फारच आर्थिक अडचण असल्याने, तो २२ लाखाला पण द्यायला तयार आहे.बघ तुझी इच्छा असेल तर, आपण लगेच बोलणी करू.
मी : बरे मला एक सांग.हे जर ३०,००,०००/- तू बँकेत ठेवले असतेस तर तुला ह्या वर्षी किती मिळाले असते.
तो : आता फिक्स मध्ये ठेवले असते तर ह्या वर्षी २,५०,०००/- नक्की.पण का रे?
मी : काही नाही.इतक्या व्याजाच्या पैशांत माझी आणि माझ्या बायकोची, एक १५-२० दिवसांची कंबोडिया ट्रिप नक्कीच झाली असती.
तो : अरे कंबोडिया काय बघतोस? त्यापेक्षा आमचे फार्म हाऊस बघ.
आता पुढे मला काही बोलवेना.
वर्गीकरण
वाचने
63844
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्थावर मालमत्ता झाली तरी,
In reply to मुख्य मुद्दा हा आहे की आता हे by टर्मीनेटर
अल्पसंतुष्टत्वाचा मुद्दा
In reply to मुख्य मुद्दा हा आहे की आता हे by टर्मीनेटर
बायको माझ्यासारखी
In reply to अल्पसंतुष्टत्वाचा मुद्दा by प्रकाश घाटपांडे
आमची पीपीएफ,एफडी, कौटुंबिक
In reply to बायको माझ्यासारखी by कानडाऊ योगेशु
कुठल्याही भावनातिरेक हा तारतम्य गमावण्यास कारणीभुत ठरतो.
In reply to आमची पीपीएफ,एफडी, कौटुंबिक by प्रकाश घाटपांडे
फार नाही
In reply to कुठल्याही भावनातिरेक हा तारतम्य गमावण्यास कारणीभुत ठरतो. by मुक्त विहारि
बायको माझ्यासारखी
In reply to अल्पसंतुष्टत्वाचा मुद्दा by प्रकाश घाटपांडे
कर्तुत्ववान महिला ! घाटपांडे काकुंना आंतरराष्ट्रिय महिलादिनाच्या विशेष हार्दिक शुभेच्छा !घाटपांडे काका आता पर्यंत
In reply to मी आता निवृत्ती तथा ५८ वयाचा by प्रकाश घाटपांडे
उदंड आयुष्य सोडून सहमत
In reply to घाटपांडे काका आता पर्यंत by कानडाऊ योगेशु
इतका प्रांजलपणा खुप
In reply to उदंड आयुष्य सोडून सहमत by प्रकाश घाटपांडे
कमीत कमी रिस्क
In reply to उदंड आयुष्य सोडून सहमत by प्रकाश घाटपांडे
मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी
In reply to उदंड आयुष्य सोडून सहमत by प्रकाश घाटपांडे
श्रीगुरुजी माझ्यासारखेच
In reply to मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी by श्रीगुरुजी
मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी
In reply to उदंड आयुष्य सोडून सहमत by प्रकाश घाटपांडे
शाम भागवत, मला हा प्रश्न केवळ
In reply to उतार वयात हातचे सोडून by शाम भागवत
तुम्ही मानसिक
In reply to शाम भागवत, मला हा प्रश्न केवळ by प्रकाश घाटपांडे
विसंगती
In reply to तुम्ही मानसिक by शाम भागवत
राहण्याचे ठिकाण
In reply to हौसेला मोल नसते याची आता मला भीती वाटू लागली आहे by प्रकाश घाटपांडे
गुगलून बघितले
In reply to हौसेला मोल नसते याची आता मला भीती वाटू लागली आहे by प्रकाश घाटपांडे
हौसेला मोल नसते याची आता मला
In reply to हौसेला मोल नसते याची आता मला भीती वाटू लागली आहे by प्रकाश घाटपांडे
सहमत!
In reply to हौसेला मोल नसते याची आता मला by सुबोध खरे
तुमच म्हणण खरे ठरले
In reply to हौसेला मोल नसते याची आता मला by सुबोध खरे
मुविकाका आता ५ वर्षे झाली.
पुढच्या वर्षी लेखमाला लिहितो
In reply to मुविकाका आता ५ वर्षे झाली. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पिकवणे सोपे.
सहमत आहे
In reply to पिकवणे सोपे. by कंजूस
वरती काही प्रतिक्रिया
मित्रांबरोबर FD certificate बघत बसायचे का ?
In reply to वरती काही प्रतिक्रिया by अमर विश्वास
कमावलेल्या पैशातून नक्कीच
In reply to मित्रांबरोबर FD certificate बघत बसायचे का ? by कानडाऊ योगेशु
फार्म हाउस घेउ नये असे म्हटले नाहिये कुठेच
In reply to वरती काही प्रतिक्रिया by अमर विश्वास
पानशेतला फार्महाउस होते ....
In reply to फार्म हाउस घेउ नये असे म्हटले नाहिये कुठेच by राजेंद्र मेहेंदळे
सात वर्षात दामदुप्पट ... FD पण देत नाही
In reply to पानशेतला फार्महाउस होते .... by अमर विश्वास
ज्या लोकांकडे जास्त पैसा आहे
मुद्दा तोच
In reply to ज्या लोकांकडे जास्त पैसा आहे by Rajesh188
हौस ही जास्तीच्या पैशांमधून
आमच्या खापरपणजोबा/पणजोबा
जमीन साफ करून लागवडीयोग्य करणे, विहीर खणणे, मोटार लावणे....
In reply to आमच्या खापरपणजोबा/पणजोबा by श्रीगुरुजी
असा भाडेकरार करणारा शेतकरी आहे?
In reply to जमीन साफ करून लागवडीयोग्य करणे, विहीर खणणे, मोटार लावणे.... by मुक्त विहारि
भारत हा गंमतशीर लोकांचा मजेदार देश आहे
In reply to असा भाडेकरार करणारा शेतकरी आहे? by Rajesh188
जे शहरात राहतात व भविष्यात
In reply to जमीन साफ करून लागवडीयोग्य करणे, विहीर खणणे, मोटार लावणे.... by मुक्त विहारि
जे शहरात राहतात व भविष्यात शहरातच राहणार आहेत त्यांनी गावाकडील शेती, फार्म हाऊस वगैरे भानगडीत पडून पैसे अडकवू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे.+१ दुकान भाड्याने दिले तर २० हजार महिना मिळेल असे वडिलानी सांगितले नी ह्या आशेवर मी खिशातले नी कर्ज काढून १५ लाख घालून दुकान नि घर बांधले. गेल्या ३ वर्षापासून वडिलांनी एकही भाडेकरू दुकानात घुसू दिला नाहीये, दुकान तसेच पडून आहे. नी वरचा मजला भाड्याने देऊन ६ हजार रुपये स्वत ठेवताहेत. मला मिळाले तर काही नाही पण गेली ३ वर्षे एचडीएफसी बँकेचा १०७८० रुपयाचा हफ्ता नियमित भरतोय. :(माहिती हवी आहे
ओके
In reply to माहिती हवी आहे by राजेंद्र मेहेंदळे
मुळात शेतजमीन का असावी
सहमत आहे ....
In reply to मुळात शेतजमीन का असावी by Rajesh188
शेती पहावी करुन
मुळात ....
In reply to शेती पहावी करुन by प्रकाश घाटपांडे
करेक्ट
In reply to मुळात .... by मुक्त विहारि
करेक्ट !
In reply to मुळात .... by मुक्त विहारि
माऊली _/\_
In reply to करेक्ट ! by प्रसाद गोडबोले
शेती पहावी करुन - श्रीनिवास पंडित हा मूळ लेख अनुभव मासिकातील आहे
In reply to शेती पहावी करुन by प्रकाश घाटपांडे
अपयश पचवायची ताकद असेल तर... आणि....
In reply to शेती पहावी करुन - श्रीनिवास पंडित हा मूळ लेख अनुभव मासिकातील आहे by प्रकाश घाटपांडे
पंडितांचा लेख वाचलात / ऐकलात का?
In reply to अपयश पचवायची ताकद असेल तर... आणि.... by मुक्त विहारि
नाही ...
In reply to पंडितांचा लेख वाचलात / ऐकलात का? by प्रकाश घाटपांडे
मी त्या दृष्टीने म्हणत नाही.
In reply to नाही ... by मुक्त विहारि
हा धागा वर आला वाटते ...
"फक्त शेतजमीन घेउन त्यावर
मी आता असहाय्य आहे
In reply to "फक्त शेतजमीन घेउन त्यावर by अगम्य
सध्या माझे वैवाहिक जीवन पणाला
In reply to मी आता असहाय्य आहे by प्रकाश घाटपांडे
शेती व सावकारी
In reply to सध्या माझे वैवाहिक जीवन पणाला by प्रसाद गोडबोले
पुरेशी मसलपॉवर व मनीपॉवर नसेल
In reply to मी आता असहाय्य आहे by प्रकाश घाटपांडे
Don't worry
रो हाउस विकले
In reply to Don't worry by अगम्य
भांडवलवादी विचार
हे मान्यच!
In reply to भांडवलवादी विचार by अगम्य
तुमचे हे लेख आधी वाचले नव्हते. आता वाचले. छान लिहिले आहे.