स्थळ :- आमचे कार्यालय
वेळ :- कुठलीका असेना ? कोणाला काम करायची आहेत ?
पात्र :- खुद्द आम्ही आणी आमचा एक नविनच आमच्या आग्रहा खातर मिपा जॉइन केलेला सहकारी.
मित्र :- काय रे मिपा मिपा चालु आहे का ?
आम्ही :- हाना राव ! दुसरे धंदे काय आपल्याला ? त्यात आज एक लेख टाकलाय, प्रतिक्रीया वाढतायत का नाही त्यावर पण सारखे लक्ष ठेवुन आहे.
मित्र :- यार मला पण तुम्हा सगळ्यांचे बघुन काहितरी 'लै भारी' लिहावे असे वाटायला लागले आहे. प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे :( आता लिहिते व्हायला पाहिजे. मागच्या वेळी किती मेहनतीने एक विषय 'मटा' मधुन उचलला होता. ह्या मिपावाल्यांनी 'हा विषय आधी झालाय' 'चोरलेले लेखन' आणी काय काय बडबड केली. 'व्यासांनी सगळेच उष्टे करुन ठेवलय म्हणाव.'
आम्ही :- अरे पण तु तर मराठी साहित्याचा आनंद घ्यायला म्हणुन मिपावर आलास ना ? लेखन तुझा प्रांत नाही सोन्या. तु विश्लेषण चांगले करु शकतोस, प्रतिक्रीया छान देतोस तेव्हडे बास की.
मित्र :- नाही नाही नाही ! ठरले म्हणजे ठरले, मी लेखक होणारच. तु मला मार्गदर्शन कर बस.
आम्ही :- हम्म्म्म्म आता तु ठरवलेच आहेस तर मित्र म्हणुन तुला मदत करणे आमचे कर्तव्यच आहे. सगळ्यात आधी तु काहि गोष्टींना सुरुवात कर.
१)तुझ्या सारखेच अजुन ४/५ 'दुर्लक्षीत' शोधुन काढ.
२) त्यांच्या फडतुस लेखाला, कौलाला कोणी प्रतिक्रीया देत नसतेच. ती तु द्यायला सुरुवात कर. कितीही फालतु लिहिले असले तरी 'क्या बात है =)) =)) ' 'च्यायला लै भारी' 'जुने दिवस आठवले भे****' 'सेम सेम साला आमचा मास्तर/ डॉक्टर/ बाप / भाऊ .. असाच ***** होता.' अशा भरभरुन प्रतिक्रीया चालु कर.
३)तुम्हा सगळ्या झंपुंचा मिळुन एक कंपु चालु कर.
मित्र :- अरे पण हे सगळे कशासाठी ?
आम्ही :- खुळ्या अरे असे केलेस की तुझ्या हक्काच्या ४/५ प्रतिक्रीया तर नक्की झाल्या.
मित्र :- पण ४/५ फक्त ?
आम्ही :- मुर्ख आहेस. अरे ४/५ प्रतिक्रीयांना उत्तर म्हणुन तुझ्या ४/५ प्रतिक्रीया. 'आवरा' 'बंद करा असले फुटकळ कौल' 'अरे काय फालतुपणा आहे ?' 'तात्या काहितरी करा ह्यांचे' इ.इ. आरडाओरडी करणार्यांच्या ६/७ प्रतिक्रीया, किती झाल्या एकुण ?
मित्र :- च्यामायला १७/१८ झाल्या की राव ! लै भारी आयडीया.
आम्ही :- मिपाकरांच्या 'तुसड्या' प्रतिक्रीया आल्या रे आल्या की तु लगेच एक 'जाउदे नसेल आवडत तर नाही लिहिणार ह्यापुढे' किंवा 'आमच्या कडे कंपु नाही, आम्हाला असेच फाट्यावर मारणार' असली काहितरी खळबळजनक, हृदयाला हात घालणारी प्रतिक्रीया बोल्ड मध्ये टाकुन दे.
मित्र :- त्यानी काय होईल ?
आम्ही :- इकडे काहि खरच 'हळवे' मिपाकर पण आहेत राजा ;) पायाला मुंगी चावली तर 'आपली निबर कातडी चावुन तिला त्रास तर झाला नसेल ना ?' असे संत एकनाथ रावांना लाजवणारे विचार आहेत ह्यांचे. ते लगेच धावत येतील बघ आणी तुला 'लिहित रहा, प्रतिक्रीयांकडे लक्ष देउ नका.' 'खुप आवडले, चांगले लिहिताय' 'भलते सलते विचार करु नका' अशा प्रतिक्रीयांचा आधार देतील.
मित्र :- पशा पशा अरे २४/२५ प्रतिक्रीया कुठेच नाही गेल्या.
(आमचे मित्रवर्य आता फक्त नाचायचे बाकी राहिले होते)
आम्ही :- आणी सगळ्यात महत्वाचे, ज्या दिवशी काहि लिहिशील त्या दिवशी मिपावरुन बिल्कुल हलायचे नाही. तासाभरात लेखावर प्रतिक्रीया आली नाही तर लगेच लेखात एखाद्या दुसर्या शब्दाचे संपादन करुन लेख 'अद्ययावत' करायचा. तुझ्या लेखनाचा दर्जा बघता तुला शिव्या देणारी का होईना एकतरी प्रतिक्रीया पहिल्या ५ मिनिटात येणार हे नक्की. लगेच हुरळुन जायचे नाही, शांत राहायचे. लेख हळुहळु तळाला जातोय असे वाटले की त्या शिव्या देणार्या प्रतिक्रीयेवर 'ईट का जवाब पथ्थरसे' प्रतिक्रीया द्यायची आणी लेख वर आणायचा.
मित्र :- तोवर आमच्या झंपु कंपुतले कोणीना कोणी येईलच की मदतीला.
आम्ही :- भले शाब्बास ! मग आता कसली वाट बघतोयस ? होउन जाउ दे मिपावर तुझ्या टुकार लेखांचा आणी कौलांचा पाऊस.
दुसर्या दिवशी मिपा उघडले आणी पाहतो तर आमच्या समोर आमच्या मित्रानी प्रसवलेला पहिला वाहिला कौल 'गाढवानी तुम्हाला रस्त्यात लाथ मारली तर तुम्ही काय कराल ?'
१) गाढवाला उलटी लाथ माराल.
२) गाढवाला पायातला बुट फेकुन माराल.
३) जालींदर बाबांचे स्मरण करुन गाढवाला शाप द्याल.
४) गाढवाला गुळ खायला घालाल.
५) माणसावर बसवुन गाढवाची वरात काढाल.
६) इथे सांगता येणार नाही, नाहितर कोणीतरी मिपावालाच लाथ मारायचा.
७) इतर काही ..
वाचने
10797
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात
आयदिया :)
" 'च्यायला
भर
झकाआआआस
मेलो !!!! =))
एक नंबर
मला बी
कोण आहे रे
In reply to मला बी by दशानन
कोण आहे रे
In reply to कोण आहे रे by टारझन
राजे !
In reply to कोण आहे रे by परिकथेतील राजकुमार
सेफ्टी
In reply to राजे ! by अवलिया
सेफ्टी
In reply to सेफ्टी by दशानन
च्यायला
In reply to सेफ्टी by परिकथेतील राजकुमार
सगळेच ?
In reply to च्यायला by दिपक
का म्हणु नये?
In reply to सगळेच ? by टारझन
टारुबा की जै...
In reply to सगळेच ? by टारझन
प्रतिक्रिया येतायत न....कशा
In reply to सेफ्टी by परिकथेतील राजकुमार
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जबरी
क्या बात है
ही: हॉ: हॉ: हॉ:
दिसलं समोर
In reply to ही: हॉ: हॉ: हॉ: by धमाल मुलगा
हा हा हा !!!
In reply to दिसलं समोर by आंबोळी
च्यायचं बेरकी आहे हे पर्या!
In reply to ही: हॉ: हॉ: हॉ: by धमाल मुलगा
लिहित राहा !
सुधारणा
In reply to लिहित राहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै
लेख
बाप रे!!!
सॉल्लीड!!
भन्नाट !
अफलातुन लिहिले आहेस..
प्रतिसाद
प्रतिसादा
In reply to प्रतिसाद by परिकथेतील राजकुमार
च्गल
सही रे परा..
मस्त!
हा हा हा !!
आम्ही :- मिपाकरांच्या
हा हा हा पर्या जियो.. लय भारी
पराभौ, शॉल्लिड लिवलंयत
परा रपारपा पेटलास रे
भारीच लिहिलंय. खूपच सूक्ष्म
चुटचुटटीत लेख!! अन नऊ साली
अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु
In reply to चुटचुटटीत लेख!! अन नऊ साली by स्पंदना
माहिती आहे ओ गणाभाउ!! म्हणुन
In reply to अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु by गणपा
वा!
च्या बना......... हे असं आहे होय सगळे ?
अॅक्चुली, ह्यो लेख वाचुनच
पुढचा भाग लिहा लवकर. हा भागही
+१
In reply to पुढचा भाग लिहा लवकर. हा भागही by llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद!मी इथे नवीन