Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 06/02/2021 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल. ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-seni… आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.

वाचने 50586
प्रतिक्रिया 226

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

काही नेत्यांचे असे मत होते की लगेच स्वतंत्र स्वीकारावे आणि काही नेत्यांचे असे मत होते सामाजिक विषमता दूर झाल्यावर स्वतंत्र स्वीकारावे.

In reply to by Rajesh188

हिटलरने लादलेले दुसरे महायुद्ध आणि इंग्लंडचे कमी झालेले मनुष्यबळ, एखाद्या गुलामाला, स्वतंत्र सोडले की तो कसा भिरभिरतो, तशी नेहरूंची अवस्था झाली होती .... भांडवलशाही की साम्यवाद, ह्यातच त्यांची हयात गेली ....

In reply to by काळे मांजर

ह्यांना फुकट च मिळाले वरती व्याज म्हणून सत्ता पण आता मिळाली म्हणजे काही न करता भारतावर सत्ता गाजवण्याची संधी पण मिळाली. तेव्हा काँग्रेस नी काहीच प्रयत्न केले नसते आणि ब्रिटिश लोकांची गुलामी स्वीकारली असती तर मजेत दिवस गेले असते. किती तरी लोकांनी आपले आयुष्य पणाला लावले ब्रिटिश सत्ते बरोबर संघर्षात मारले गेले. किती जण तुरुंगात गेले आणि आयुष्याची होळी केली . आणि ह्यांना वाटत स्वतंत्र फुकटात मिळाले . किती सडके विचार असतील . ह्यांना सत्ता फुकट मिळाली हे मात्र सत्य आहे. हा जो काही भारत दिसत आहे त्या साठी लाखो लोकांनी जीवाचे दान दिले आहे. असे पण नालायक आहेत काही लोक की त्यांच्या मते युद्धातत मरणे हे सैनिकाचे काम च काही उपकार करत नाहीत पगार घेतात . ह्यांना double पगार देवू या आणि ऐन युध्दात प्राण अर्पण करायला पाठवूया . होतील का तयार.

In reply to by Rajesh188

फुकट मिळाले म्हणे खापर्पणजोबाच्या डोक्यावर अणुबोंम्ब फुटून मग स्वातंत्र्य मिळायला हवे होते का ?

In reply to by काळे मांजर

अशा लोकांनी, किंमतीबाबत विचार करू नये ... हवे असेल तर, चंपाबाई, मोगा आणि सचीन उद्दाम पोटे, यांना विचारा... जागो मोहन प्यारे

In reply to by Rajesh188

कारण, आमच्या घरातील जुन्या पिढीने, खूप कष्ट घेतले आहेत.. इथे वाडवडीलांची किर्ती सांगण्यात अर्थ नाही ... पण ज्या रितीने, भीक दिल्यासारखे स्वातंत्र्य, कॉंग्रेसने स्वीकारले, तिथेच अधोगती सुरू झाली.. राहता राहिला प्रश्र्न, सैनिकी शिक्षणाचा किंवा देशासाठी लढण्याचा, नैसर्गिक बुटकेपणा मुळे ती गोष्ट साध्य करता आली नाही ... पण, उद्या जर तशीच वेळ आली तर, इथला प्रत्येक मिपाकर, देशासाठी लढण्याचा प्रयत्न करेल...

In reply to by मुक्त विहारि

मग 100 टक्के सैनिकी भरतीचे गणित सोडवा भारताची लोकसंख्या किती , सैनिक किती , एका पदाला किती अर्ज येतात , सैनिकांचा खर्च किती , रोटेशनवर केवळ सगळ्यांनाचा सैनिक करायचे तर त्याचा खर्च किती मिपाकरच कशाला , अमिपाकरही लढतील की

In reply to by काळे मांजर

बाय द वे, चंपाबाई सध्या काय करतात? सचिन उद्दाम पोटे, कसे आहेत? जागो मोहन प्यारे, यांना नमस्कार सांगा ...

In reply to by मुक्त विहारि

स्वातंत्र्य सगळ्या देशाला मिळाले

In reply to by Rajesh188

ह्यांना सत्ता फुकट मिळाली हे मात्र सत्य आहे.?? म्हणजे नक्की कोणाला १९४७ वर्षानंतर जन्मलेल्या सगळ्यांनाच तसे ते फुकट मिळाले आहे तुही फक्त "यांच्या" वर का निशाणा साधलाय?? खरी गोची कि २ वेळा जनतेने "ह्यांना" निवडून दिले ते पचत नाहीये ! अनेकांना

In reply to by मुक्त विहारि

एखाद्या गुलामाला, स्वतंत्र सोडले की तो कसा भिरभिरतो, तशी नेहरूंची अवस्था झाली होती .... भांडवलशाही की साम्यवाद, ह्यातच त्यांची हयात गेली .... त्यांना भांडवलै, साम्यवाद, समाजवाद इ. शी काही देणेघेणे होते असे दिसत नाही. शांतीदूत अशी जगभर स्वप्रतिमा बनविणे, वाटेल ती किंमत देऊन प्रसंगी देशहिताचा बळी देऊन स्वप्रतिमा जपणे, मुस्लिम मतपेढी घट्ट करून खुर्ची जपणे यातच त्यांची हयात गेली.

In reply to by श्रीगुरुजी

हे ठरवून मिळालेले स्वातंत्र्य न्हवते ... स्वतंत्र झाल्यावर, पुढे काय? ह्याचे कुठलेही प्लॅनिंग न्हवते ... संरक्षण ही कुठल्याही देशाची, सर्वप्रथम गरज असते, हे पण माहिती न्हवते ...

In reply to by मुक्त विहारि

स्वातंत्र्य ठरवून मिळते का ? पांडवाना माहीत होते का की 18 दिवस लागणार म्हणून, की शिवाजी महाराजाना माहीत होते , की 1674 ला स्वातंत्र्य मिळणार म्हणून.

In reply to by काळे मांजर

चंपाबाई काय म्हणतात? सचिन उद्दाम पोटे, काय म्हणतात? जागो मोहन प्यारे, यांना नमस्कार सांगा...