Skip to main content

तुफान विनोदि विचित्रपट देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 06/11/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटाचा ट्रेलर :- http://in.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI दिग्दर्शक :- जगदिश शर्मा प्रदर्शन :- २१ ओक्ट. २००८ -------------------------------------------------------------------------------- कलाकार :- क्रिश्णा अभिषेक, ह्रुषीता भट्ट, प्रेम चोप्रा, शक्ति कपूर,कादर खान, कमाल रशिद खान, रवि किशन, रज़ा मुराद, चंकी पांडे, निर्मल पांडे, रणजीत, शिवा रिंदानी, किम शर्मा, यशपाल शर्मा, ग्रेसी सिंग, मनोज तिवारी, मुकेश तिवारी. तुफान विनोदि आहे हा विचित्रपट. अतिभव्या असे सेट, तगडी स्टारकास्ट, उच्च दर्जाचे छायाचित्रण सगळे कसे अगदी वाह वाह आहे. ह्या विचित्रपटातिल हिरो ला बघताना आपल्याला एकाच वेळी राजकुमारचा आवाज आणी दिलिप कुमारचा अभिनय असा दुहेरी आनंद मिळतो. ह्या वयातला आमचा देव आनंद सुद्धा ह्या विचित्रपटातिल हिरो पेक्षा कितितरी देखणा आणी चपळ वाटतो हा भाग निराळा. असो, इतर कलाकारांविषयी आनंदच आहे, बरेचशे आपण ह्याना पाहिलेत का ह्या सदरात मोडतात, उरलेले काहि यादव वंशिय आडनाव लावत असल्याने ह्या विचित्रपटात घेतले असावेत, काहि नाव परिचीत आहेत, त्या पैकी काहिनि म्हशीची व काहिनि ह्या विचित्रपटात कळशीची पाहुणी भुमिका केली आहे असे आमचा खास सुत्रधार सागंतो. सर्वच कलाकार ज्या सहजतेने गोठ्यात वावरतात त्या सहजतेने विचित्रपट भर वावरले आहेत. पानाला ज्या सहजतेनी चुना लावताता ( आजकाल हे लोक महाराष्ट्राला चुना लावत आहेत असे आमचा एक खोचक साथिदार निर्माता म्हणाला व लवकरच ह्या विषयावर आपण 'भाग भय्या राज आया' ह्या नावाचा सिनेमा काढत आहोत असे त्यानी आमच्या कर्णेंद्रियावर घातले.) त्या सहजतेने प्रत्येकानी अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाच्या रतिबाने पुर्णवेळ प्रेक्षकांना खुर्चित बांधुन ठेवण्याची जादु ह्या विचित्रपटात आहे. (काहि दुष्टबुद्धि लोक प्रेक्षक पहिल्या सिन लाच बेशुद्ध पडतात अशी बदनामी करत आहेत, देव त्यांना म्हशीच्या पायाखाली चिरडो.) ह्या विचित्रपटाला मोठ्या प्रमाणात गर्दि करुन आपदग्रस्तांना सहकार्य करावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36541
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपीनपंत, कायतरी गैरसमजाचे राजकारण चालु आहे, तसं काही नाही ...
आमी तुमचे विश्वासू हाय, २-४ तुकड्यांसाठी न्हाई तर खुर्ची साठी न्हाई पाटिंबा द्येत तुमास्नी. आवं, पाऽऽर शिरपाआबाच्या येळेपासून आपली घरं जवळ हायती...
भले !!! आम्ही हे कंदी इसरलो ??? म्हनुन तर नवा "कालवा" तुमच्या तालुक्यातनं काढला ना ? ( हा आता त्यामुले तुमचा १५० एकराचा उस झाला पण तो भाग वेगळा ) आनं ती "ग्रामरोजगार योजना" तुमच्याकडे दिली, तुमच्या गावाला "आदर्स गाव पुरस्कार मिळवुन" दिला ... शिवाय दुधसंध व पतपेढी गेली १० वर्से तुमच्याकडेच आहे की ... आता बोला आम्ही विसरलो का तुम्हाला ???
पाइंटाचा मुद्दा आला न्हवं ध्येनात? तुमी कितीबी मोटं व्हा... तुमची शक्ती हितनंच आल्याली हाय साधूबुवांचं 'शिंवाशन' पुस्ताक वाचलंय न्हवं?
आक्ष्क्षी बराबर ध्यानात आला, कळतयं आमालाबी सगळं ... बरं ते इरोधी पार्टीचे "टाराज देश्यमुख" वाडावर येऊन गेले म्हणे परवाच्याला ??? काय गोम आहे ??? असो. रातच्याला वाड्यावर या, दिवसा उगाच ते "ब्रिटीश टीव्ही" वाले कॅमेरा घेऊन हिंडतात मोकाट गुरासारखे, तवा रातच्याला या जेवायला ...
च्येर्मन, अवखळवाडी दूध सोसायटी, च्येर्मन, दहिवडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती, संस्थापक, श्री बाळेश्वर परस्पर सहकार मंडळ आणि पतपेढी अवखळवाडी बु||, तालुका माण, जिल्हा सातारा
=)) =)) =)) अशक्य !!! _/\_ छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

रातच्याला वाड्यावर नगं... मळ्यातल्या बंगल्यावर भेटू, त्ये मारुति कांबळे ब्येनं लै फिराय लागलंय गावात रातीचं, हिंदुराव हाय म्हना त्याच्यावर नदर ठेवायला (मायला त्ये हिंदुराव ब्येनं पन लै अवघाट हाय... नुसतं नदर ठेव म्हनलं तर जाऊन धरलाच त्येला) आनि टारभाऊंच काय इतकं मनावर घ्येउ नगासा... आशे छप्पन्न देशमुख आले आन् ग्येले... तुमी आपलंच हो शेवटी. आसं लोकांना भ्येटायला कसं मना करायचं हो... कामं आसतात त्येंची बी. वयनीसायबान्ला दंडवत सांगा. रातच्याला मळ्यावर येनार हाय ते सांगू नगा... या बायका म्हंजी... लगं आमच्या घरी फोन जाईल. मा. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

या मग फार्महौस वर, रात्री गाडी पाठवतो, बिनानंबरप्लेटची आहे, कुनाला आज्जाबात संशय येनार न्हाय !!! त्या हिंदुराव ने डोक्याला ताप करुन ठेव्लाय निस्ता, आता चुलत का होईना म्हेवना आहे म्हनुन गप्प रहावं लागतं ... मागं एकदा त्या पतपेढीवरुन भांडण झालं तर ह्याने भरबाजारातुन " जयश्या पवाराला" उचलला, अहो ८ दिवस निस्ती मिडीयात बोंबाबोंब ... त्याच्या बायडीने महिला मंडळ आम्हाला घेराव घातला ... शेवटी आम्ही शीयेमला फोन करुन कसेबसे मितवले, त्या फोलकीच्या कमीन्सराला २० लाख सारावे लागले ... ते टारुभौचं मनावर नाय वो घेत,, पण सावध असा. माणुस लै डेंजर आहे, नुस्ता तालमीतले पैलवान घेऊन हिंडतो बरुबर ... काय पैश्याची वगैरे बात नाही ना केली ? उगाच गुंडी सोडुन माल काढायचा ... आणि हो, ते "ब्रितीश टीव्ही" वाले आले की त्यांची डोस्की व कॅमेरे फोडुन हकलुन द्या भडव्यांना ... काल तुमची एक " शीडी" घेऊन आले होते मला दाखवायला, न्हेऊन डांबला फार्महौसवर आणि मरुस्तोवर हानला ... आज सकाळीच पार्सल डायरेक्ट "चंद्रपुर" ला सोडायची व्यवस्था केली आहे, आता काळाजी न्हाई ... तुम्ही सावध आसा, इलेक्शनचे दिस आहेत साहेब, इमेज महत्वाची !!!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

तुमी टारुभाऊची आज्याबात काळजी करु नका... लै उडतंय ते, पन आपलंच हाय ते, चड्डीत मुतत व्हतं तवापासून बसतंय बाजूला आपल्या... आता कुटं मिसरूडं फुटायलीत त्या मुळं जरा हवेत हाय ते... तसं चड्डीत र्हातं त्ये बरुबर. आनि त्ये शीडीचं कश्या पायी म्हन्ताय. हिकडं या, अजून ४ शीड्या देतो तुमास्नी... आम्ही बरुबर सगळं कट्ट्रोल मदी ठिवतो. बाकी २ म्हैन्यापूर्वी त्या गंगीचं कायतरी आलं होतं पेप्रात. आपलं बाळासाहेब आलं होतं हितं आमच्याकडे, नमस्कार करून ग्येलं, म्हनत व्हतं, 'आबा, डोक्यावर हात राहू द्या. आमचा बाप काय करत न्हाई, त्याच्या हाता बाहेर ग्येलाय घोळ या वक्ताला.' म्या सबूद दिला, 'गुमान जावा कुठंतरी पावण्याकडं, आमी बघतो हितलं सगळं' आटवन ठिवा. आनि आत्ता या वक्ताला त्या कांबळ्याकडंच नदर ठेवा. आपल्या बोलात, त्ये मायचं ब्येनं लोनी खाऊन जायचं. बिपिन कार्यकर्ते

In reply to by छोटा डॉन

>>असो. रातच्याला वाड्यावर या, दिवसा उगाच ते "ब्रिटीश टीव्ही" वाले कॅमेरा घेऊन हिंडतात मोकाट गुरासारखे, तवा रातच्याला या जेवायला ... चंदा बोरगावकरणीला बोलवणार व्हता ना! त्याचं काय झालं?

In reply to by ब्रिटिश टिंग्या

चंदा बोरगावकरणीला बोलवणार व्हता ना!
ब्रिटीश टिंग्यामहाशय, आपण नवे दिसता आमच्या प्रदेशात ... अहो तसाच प्रघात आहे म्हणायचा ... तुम्ही येऊन कसलेही "काम" करणार असला तरी "जेवायला या" असेच म्हणातात ... आता त्या "इंद्रीला" काय खरकटं काढयला बोलावलं आहे का ? समजेल हळुहळु तुम्हाला ... तुम्ही ते आमच्या विरोधात बोंबाबोंब करणे बंद करा म्हणजे तुम्हालाही बोलवु एकदा "जेवायला" , काय समजलात ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

डानराव, ह्यो टीवीवाला त्या कांबळ्याचाच मानूस हाय असा हिंदुरावाला डाउट हाय... पाटवायचा का त्या कांबळ्याकडं? मा. बिपिन कार्यकर्ते

In reply to by ब्रिटिश टिंग्या

अवो शेळके पाटील, आमच्या पार्टीची रहान्याची नीट सोय करा. मागच्या खेपंला आमच्या मावशीला लई तरास झाला बगा तुमच्या वाड्यावर! आनी त्ये कोन कोन गोरं पावनं आनलं होतंत त्ये समद्या ठीकानी घुसून ह्ये काय त्ये काय, फारच झाकपाक करत होतं. तवा या येळंला असं काही होनार नाही ते बगा. बाकी आपन भेटूच. चंदा बोरगावकरीन.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाई, शेळके पाटलाच्या वतीनं आमी सोत्ता मापी मागतो. या वक्ताला पाटिल जातीनं असतिल सोबतीला... (मायला त्या गोर्‍याच्या... बाई सोडून 'मावशीच्याच' मागं लागलं त्ये *^%$#) मा. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बाई, शेळके पाटलाच्या वतीनं आमी सोत्ता मापी मागतो. या वक्ताला पाटिल जातीनं असतिल सोबतीला... आता ग बया! तुमी का वो मापी मागता? तुमच्यामुलंच तर आमची हंशी मागल्या येलंस केवडी शिरीमंत जाली व्हती. खरं तर तुमच्याकडं आमचं लक्षचं नव्हतं, पर तुमी त्ये च्येर्मन का फिर्मन जाल्यापासून येकदम मोटी मान्सं जालात. (मायला त्या गोर्‍याच्या... बाई सोडून 'मावशीच्याच' मागं लागलं त्ये *^%$#) अवो, तुमाला काय बी माहित नाय. म्हनं कायतरी इंटर्व्हु का कायतरी घ्येचा मावशीचा आनि इचारतो काय तुमी बाई का मानूस! आता मावशी काय बोल्नार यावर! मग मीच हातात लाकूड घेऊन घालवून दिला त्या मुडद्याला. चंदी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कशी हाय हंशी? तिला पन आना बरुबर, आता तुमीच आटवन करून दिली म्हून म्हन्लं. बिपिन कार्यकर्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> चंदा बोरगावकरीन. ठार मेलो !!!! अशक्य ... अवो चंदाबाई, ते लोकच अशे अस्तात, अहो तिकडे रीतिरिवाजच तशे अस्तात ... तुम्ही कधी गेल्ता का फारीनला ??? तिकडे जावा मग कळेल ... बाकी ते गोरे म्हण्जे " इंरॉन ईज कुंपणीचे अधिकारी" होते, अवो आपल्याला २०० करोडच घबाड मिळणार आहे. त्यासाठी थोडे सहन केलं आम्ही, आमची म्हातारी बी लै कावली होती पघा, पन काय करणार, हे राजकारण असच आहे ... असो, आम्ही तुमची माफी ..... मागत न्हायी पण समजुन सांगतो. म्होरल्या येळेला काळजी घेउ, बाकी समदं येवस्तीत ना ? काय पाठवु का माल वगैरे ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आमची म्हातारी बी लै कावली होती पघा पन डानराव म्या म्हंतो, त्ये लोक म्हातारीपर्यंत पोचलंच कसं? तिलाबी न्हाय सोडलं? :O मा. बिपिन कार्यकर्ते

In reply to by छोटा डॉन

अवो चंदाबाई, ते लोकच अशे अस्तात, अहो तिकडे रीतिरिवाजच तशे अस्तात ... तुम्ही कधी गेल्ता का फारीनला ??? तिकडे जावा मग कळेल ... अवो पाटील, आमी कदी फारीनला जानार? तुमीच कायतरी येवस्था लावा पघा. तुमचा कायतरी दौरा-बिवरा असेल तर सांगा "भारतीय संस्क्रूती आनी लोककला" दावायला नेताय म्हनून. आमी बी कंदी जानार फारीनला. आमच्या मायला फार वाटायचं वो फारीनला जावसं. पण तवा काय ते राजकारनी लोकं निस्तं लोकांची कामंच करायचे. आता तुमी आहात, कारयकरते सायब आहेत म्हनून आमाला पन थोडं नाव हाय, तमाशाला लोकं इचारत्यात, कसं? बाकी ते गोरे म्हण्जे " इंरॉन ईज कुंपणीचे अधिकारी" होते, अवो आपल्याला २०० करोडच घबाड मिळणार आहे. म्हंजी, त्ये काय इजंच्या तारा टाकतात व्हय? आनी दोनशे करोड म्हंजे किती वो शून्य दोनावर? असो, आम्ही तुमची माफी ..... मागत न्हायी पण समजुन सांगतो. म्होरल्या येळेला काळजी घेउ, बाकी समदं येवस्तीत ना ? काय पाठवु का माल वगैरे ??? अवो तुमी अशी मापी मागून लाजवू नका गरीबाला! मी आपलं बोललू, मावशीची काळजी वाटते हो ... ती म्हतारी व्हयला लाग्ली आता. बाकी समदं येवस्थित तुमच्या क्रूपेनं. त्यो शेताचा तुकडा दिलायत तुमी, तो आता आमचा धाकला भाव पघतो. बाकी आमची तमाशा पार्टी सुरू हाय येवस्थित. आनी तुमी, ते कार्यकरते सायेब असे लोक असल्यावर काय चिंता आमास्नी! आनी माल पाठवा जरूर... कधी येयचं ते पण जरा आटवडाभर आदी कळवलं तर बरं होईल. चंदी बोरगावकरीन. कार्यकरते सायेब, हंशी आटवन काडते वो तुमची!

In reply to by विजुभाऊ

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

मुझे तो हल भी चलाना नही आता .... ई बम्बै मे आके हल काहे चलावत ह बबुआ. हल वल भूल जावो बम्बै मा चवपाटीया पे खडे रहके "नल" चलाना सीखो. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

विषयांतर करणरे इतके प्रतिसाद पाहून मिपाकरांना दिलेल्या सुटीचा किती प्रचंड गैरवापर होतो आहे हे पाहून खूप वाईट वाटले..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मुळात हा धागा "सिरीअस " नव्हता आणि त्याला आधी जे प्रतिसाद पडत गेले ते पण चेष्तेचे होते ... सगळे मजे मजेत आणि हलकेच चालु आहे. कुणाला टार्गेट / डिवचले जात नाहीये ... अति विषयांतर झाले हे मान्य आहे. पण आज "खुप खुप दिवसांनी एवढा टीपी" करायला मिळाला ह्याचा आनंद आहे ... असो. आपली इच्छा असेल तर " हा शेवटचा प्रतिसाद" ह्या धाग्यावरचा ... बाकी आमचा हेतु व भुमिका आपल्याला माहित आहेच ... धन्यवाद !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

सगळे मजे मजेत आणि हलकेच चालु आहे. कुणाला टार्गेट / डिवचले जात नाहीये ... अति विषयांतर झाले हे मान्य आहे. पण आज "खुप खुप दिवसांनी एवढा टीपी" करायला मिळाला ह्याचा आनंद आहे ... टीपी करण्याकरता खरडवहीची सोय केली आहे हे आपल्याला माहीत नाही का?? असो, या धाग्यातले सर्व अनावश्यक प्रतिसाद उडवावेसे वाटत आहेत, सवडीने उडवीनच. तूर्तास वेळ नाही... परंतु खरडवहीची सोय केलेली असताना प्रत्येकच ठिकाणी असा फालतू टाईमपास पाहिला की खूप वाईट वाटते... (खिन्न) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, डॉन्याशी सहमत. त्याने भूमिका मांडलीच आहे. कुठलाही त्रास झाला असल्याबद्दल क्षमस्व. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

डॉन आणि बिपीनभौंशी सहमत.

मेरेकू नही आवड्या. हा बंडलपट दिसतोय. त्यात त्या कमाल ने म्हटलय की राजकारण्यांच्या धमक्यांना घाबरून राज्य सोडून जाणार नाही. आता लालू साहेबांना घाबरून तर पळून आलेत कि बरेच जण(घाबरून म्हणा कंटाळून म्हणा). पोलीस तर फक्त मरायलाच ठेवल्यासारखे होते. रेवती

सदर धाग्याचा श्री बिपिन कार्यकर्ते, अदिती, राज जैन आणि छोटा डॉन यांनी खरडफळा सजमून जो दुरुपयोग केला आहे याची मिपाचा मालक म्हणून मला अत्यंत लाज वाटते...! मिपावर जास्तीत जास्त मोकळे व खेळकर वातावरण ठेवले आहे याचा गैरफायदा कसा घ्यावा याचं हा धागा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे... वरील चौघांच्या अनावश्यक आणि वाहवत जाणार्‍या विषयांतराकरता मी उर्वरीत मिपाकरांची हात जोडून क्षमा मागत आहे.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

असाच जर प्रकार मिपावर यापुढेही चालणार असेल तर खरडफळ्याचा काहीही उपयोग नसून तो रद्द करणे इष्ट होईल असे खेदाने म्हणावेसे वाटते! (संतप्त) तात्या.

मराठीच्या आंदोलनाचा मुद्दा करुन तयार करण्यात आलेल्या या भिकार चित्रपटाला सेंसॉर बोर्डाची परवानगी मिळू शकते मात्र याच विषयावर निर्मिती करण्यात आलेल्या मुंबई आमचीच या मराठी चित्रपटाला परवानगी नाकारण्यात येते . किती हा दुजाभाव? असले टुकार विचित्रपट जो कोणी पैसे खर्च करुन बघेल त्याची किव करावी तितकी कमी आहे. "अनामिका" अनुदिनी- http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/

ओ डॉन राव मी करु का काही मदत आप्ल्याला लय अनुभव हाय शिन्मा लायनी चा बरका हव असल्यास खात्री करा एक डाव मी आता तसा कोतवाल नाही बरं?

या चित्रपटाची दूरचित्रवाणीवरील दृध्य ,संवाद पाहून हा चित्रपट कीती टूकार आहे याची लगेचच कल्पना येते त्यामुळे अशा चित्रपटाविषयी चर्चा न करणेच उत्तम.

राहुल राजचा बाप म्हन्तो की राहुल राजचा मर्डर करनाऱया मुंबई पोलिसांना क्लिन चिट देनारे सर्वे लाचखाउ आहेत.

हा चित्रपट खुप उदात्त असा संदेश देतो याचा विसर पडला आहे.या देशाचि एकात्मता व अखंडता टिखवण्या साठी अश्या चित्र पटाचि निर्मीति आवश्यक आहे..हाताला काम नाहि खायला अन्न नाहि मग अश्या लोकांना मुंबईच मावशि सारखि वाटते...जि त्यांना मायेने जवळ घेवुन २ वेळेचे अन्न देते व घरी पाठवण्या साठी पैसे पण देते..सिनेमाचा दर्जा साधारण..व कलाकार सुमार असले तरी पुढे काहि वर्षातच जेंव्हा मुंबई केंद्र शाशित करण्याचा प्रस्ताव येइल त्या वेळी अभिशेक बच्च्चन ह्या मधे काम करेल..मग तर कौतुक करतालच ना सिनेमाचे.. :''(