चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
2 Feb 2021 - 2:01 pm
गाभा: 

म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Feb 2021 - 4:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान रे चंसुकु
अर्थसंकल्प आला आणि शेयर बाजार चांगलाच वधारला.ही तेजी आता किती टिकते ते बघुया.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2021 - 5:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून काही दिवस मार्केट असं तराटलेलंच राहील वाटतं. शेअरमार्केटात कोणी मस्त फार्मात, तर काही लटकले असतील.
बजेट, निवडणुका, आणि थोडं निमित्तच लागतं, म्हणे मार्केटला असे झोके घ्यायला, नव्या लोकांनी अशावेळी अभ्यास केला पाहिजे.

अर्थात इश्क है तो रिस्क है. :)

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

2 Feb 2021 - 10:56 pm | शाम भागवत

मनीकंट्रोल.कॉम साईट वरती प्रत्येक शेअर साठी एक फोरम असतो. असं काहीतरी आपण अर्थक्षेत्र या विभागात केलं पाहिजे. मात्र एक धागा एका शेअरसाठी हा नियम प्रशासनाने केला पाहिजे. मग मात्र त्या शेअरची इत्यंभूत माहिती वर्षानुवर्षे जमा होत राहील. मग मात्र तेवढ्यासाठी मिसळपावचे सभासद होण्याची इच्छा मराठी लोकांमध्ये व्हायला लागेल.

शेअर बाजारात रस असलेले व सक्रीय असलेले असे जे सभासद आहेत, त्यांची इच्छा असल्यास व आवडत असल्यास,त्यांनी त्यांच्या आवडत्या शेअर्सचा धागा उघडावा.

या शेअर्सच्या संबंधात कोणी फंडामेंटल अभ्यास करत असेल, कोणी टेक्निकली अभ्यास करत असेल, कोणी बातम्यांवर लक्ष ठेवत असेल, कोणी राजकारणावरती लक्ष ठेवत असेल, कोणी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती लक्ष ठेवत असेल. असे अभ्यासू सभासद आपली मते त्या त्या धाग्यावर मांडू शकतील.

मात्र ज्या शेअर साठी धागा उघडण्यात आला आहे त्याच शेअर संबंधात प्रतिसाद आले पाहिजे.

मात्र तुलनात्मक अभ्यासासाठी इतर शेअर संबंधातील माहिती मांडावयास हरकत नसावी.

एक वेगळा धागा काढून ही सूचना करायची खूप इच्छा होत आहे.

राघव's picture

3 Feb 2021 - 12:01 pm | राघव

चांगली सूचना, आवडली.
फक्त आपल्याकडे धाग्यांचा खफ सहज होतो. अर्थात् मिपाची तीच खासियत आणि ताकदही आहे म्हणा! :-)

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 1:34 pm | मुक्त विहारि

काही वेळा, विषयांपेक्षा, प्रतिसाद भारी असतात ...

सामान्यनागरिक's picture

3 Feb 2021 - 5:38 pm | सामान्यनागरिक

कैच्याकै लेख असतात पण प्रतिसादांमुळे "वाचतात "
नाहीतर संपादक मंडळींनी कत्तल केली असती

मिपा इतकी लोकशाही आणि मनमोकळे वातावरण, इतर कुठल्याही साईटवर नाही....

योग्य भाषेत, संयम ठेवून, लेख लिहिला असेल तर, काहीच अडचण येत नाही...

वैयक्तिक टीका टिप्पणी आणि ती देखील, अतिशय खालच्या स्तरावर केली असेल, तर आणि तरच, प्रतिसाद उडवले जातात...

फारच अति केले तरच, सदस्यत्व रद्द केले जाते आणि ते देखील आधी सुचना देऊन ....

मिपा ते मिपा ...इतर आंतरजालीय स्थळांपेक्षा, मिपा हे फार उजवे आहे ...

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2021 - 1:16 pm | श्रीगुरुजी

मनीकंट्रोलवरील फोरममध्ये योग्य माहिती, तांत्रिक माहिती क्वचितच असते. फोरममध्ये बहुतांशी प्रतिसादक फक्त गॉसिप, अफवा व स्पेक्युलेशन करीत असतात.

आर्थिक जोखीम, आपापल्या जबाबदारी वर घ्यावी...

शाम भागवत's picture

3 Feb 2021 - 3:10 pm | शाम भागवत

निरीक्षण बरोबर आहे. पण फक्त पैशासाठी जमलेली लोक असतात तीथे . कोणतेही तत्त्व, मित्र, भाषा, देशप्रेम,मराठी लोकांचे भले व्हावे ही इच्छा असं काहीही तिथे असत नाही.

मिपाच तसं नाहीये असे मला वाटते. इथले सभासद ज्ञान वाटप करायला तयार असतात. त्यासाठी कष्ट घेतात. अभ्यास करतात. फक्त प्रशासनाला जरा लक्ष ठेवायला लागेल. या धाग्यांचे स्वरूप अभ्यासाचे रहावे, यासाठी कोणालाही धागा भरकटवू देता कामा नये. यासाठी काही जणांचे संपादक मंडळात नियुक्ती केली तरी चालेल.

या अभ्यासपूर्ण चर्चा एकदाका पैसे मिळवून देणाऱ्या व्हायला लागल्या की, मग मात्र सर्व सक्रिय सभासद दर्जा टिकवण्यातबद्दल जागृत रहावयास लागतील.

मात्र प्रशासकांनी याबाबत त्यांचे मत मांडल्याशिवाय पुढे जाण्यात काही अर्थ नाही.
असो.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Feb 2021 - 1:59 pm | चंद्रसूर्यकुमार

चांगली सूचना.

जर कोणी पुढाकार घेऊन धागा वगैरे काढल्यास त्यावर टेक्निकल अंगाने लिहायला आवडेल.

गणेशा's picture

4 Feb 2021 - 4:54 pm | गणेशा

योग्य..

मी स्वतः हा प्रयत्न करू इच्छितो.. पण वेळ खुपच कमी मिळतोय..
गेल्या आठ महिन्यात, fundamental and technical study ने दिड लाखाचे ४ लाख झालेत, ते हि intraday आणि options न करता.
फक्त positional and long term मध्ये.

२० - २२ जणांना शिकवले आहे.. त्यामुळे finance मध्ये पण नविन accounting /insurance /tax यात कंपनी टाकत आहे..

Share market नक्कीच web site वर पण लिहिल..
आणि येथे पण..

वेळ मात्र मिळाला पाहिजे..
कारण accenture मधले काम पण खुप्पच stress full झाले आहे...

आपल्याला त्रास देत नाहीत म्हणून त्यांची पाठराखण करायची असाच अर्थ निघेल बर्मा च्या लष्करी उठावाला पाठिंबा दिला तर.
लोक नियुक्त सरकार उलथवून लावणे हा गंभीर प्रकार आहे ,
कोणताच शहाणा देश असल्या कृत्याचे समर्थन करणार नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Feb 2021 - 2:16 pm | चंद्रसूर्यकुमार

सहमत आहे. प्रत्येकाने साधनशुचिता पाळलीच पाहिजे. म्हणूनच तुम्ही नाही का ३००+ पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणार्‍या तथाकथित शेतकर्‍यांचे समर्थन करत आहात? नेहरूंनी पण नाही का हजारो लोकांना ठार मारणार्‍या चे गव्हेराचे दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी मुद्दामून स्वागत केले होते? साधनशुचिता पाळावी ही अशी.

nehru

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 4:48 pm | मुक्त विहारि

कॉंग्रेस नेहमीच बरोबर असते आणि नेहरू घराणे, हे भारताचे अनभिषिक्त नेते आहेत ....

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2021 - 5:23 pm | श्रीगुरुजी

इराणचा धर्मांध विकृत हुकूमशहा अयातुल्ला खोमेनी १९८६ मध्ये गचकल्यानंतर राजीव गांधींनी भारतात एक दिवसाचा सरकारी दुखवटा पाळला होता.

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2021 - 5:43 pm | श्रीगुरुजी

इराकचा अत्यंत क्रूर हुकूमशहा असलेल्या सद्दाम हुसेनला भारताने अनेक दशके पाठिंबा दिला होता.

जग एखाद्या कोणत्याही देशातील घटनांंकडे नैतिकतेच्या चष्म्यातून कधीच पहात नाही. त्याकडे आपल्या देशाच्या हितसंबंधांच्या चष्म्यातूनच पाहिले जाते.

भंकस बाबा's picture

3 Feb 2021 - 6:05 pm | भंकस बाबा

पालिस्टीनी अतिरेकी यासर आराफात आपल्या इंदिरा गांधींचा खास पाहुणा होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2021 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नव्या कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकार व शेतक-यातील रस्सीखेच सुरुच आहे. शेतक-यांनी ६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत देशभरातील सर्व राष्ट्रीय आणि राज्यमहामार्ग जाम करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, दिल्ली सीमेवर शेतक-यांचे जथ्थे पोहचत आहेत. दरम्यान दिल्लीत शेतक-यांना येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलीसही कडेकोट बंदोबस्त व्यवस्थेत गुंतले आहेत. खिळ्यांनी रस्ते अडविणे, भिंती उभारणे, अशी तजवीजही सुरु आहे. (बातमी संदर्भ)

-दिलीप बिरुटे

दळणवळण, ही देशाची गरज असते ...

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2021 - 6:13 pm | श्रीगुरुजी

दूधाने तोंड भाजले की माणूस ताक सुद्धा फुंकुन पितो.

२६ जानेवारीस आंदोलक पंजाबी दलालांनी पोलिसांना दिलेली सर्व आश्वासने धुडकावून वेगळ्या वेळी, वेगळ्या मार्गाने, सशस्त्र आंदोलन करून यथेच्छ दंगल व नुकसान करून धुडगूस घातल्याने आता पोलिस काळजी घेणारच.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 8:54 pm | मुक्त विहारि

रस्ता रोको, रेल्वे रोको, ही आंदोलने, करणेच चुकीचे आहे ...

अशी आंदोलने करणार्यांवर, कायदेशीर कारवाई केली पाहिजे...

लोकांचा विरोध आहे कायद्याला आणि सरकार विरोध करणाऱ्या लोकावर बळाचा वापर करत आहे असा संदेश देशभर जाणे महत्त्वाचे आहे.
मोर्चा दिल्लीत च पोचला पाहिजे असं काही नाही.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 8:51 pm | मुक्त विहारि

शेतकरी वर्गाचा विरोध नाही ...

स्वलिखित's picture

2 Feb 2021 - 11:16 pm | स्वलिखित

मुवि काका थकून जाल

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 7:21 am | मुक्त विहारि

तारतम्यावर माझा विश्र्वास आहे ...

झोपलेल्या माणसाला जागे करता येते.. झोपेचे सोंग घेणाऱ्याला नाही..

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 10:06 am | मुक्त विहारि

व्यक्तिमत्वाला, असंख्य पैलू असतात...

चांगल्या कायदा सुधारना संपूर्ण देशाचा पाठिंबा असून काही दुष्ट, भ्रष्ट आणि फुकटे लोक डाव्या विचारसरणीने प्रेरित होऊन हुल्लडबाजी आणि हिंसा करीत आहेत आणि कमालीच्या संयमाने भारत सरकारने त्यांना बोलण्यांत गुंतवून ठेवले आहे हे सत्य आहे.

मुविकाका, दुव्यांबद्दल धन्यवाद.

जर एक-दोन ओळीत दुव्याबद्दल किंचित माहिती सांगीतली आणि सोबत दुवा दिला, तर आणिक छान. गूगलच्या स्निपेट्स सारखं. :-)

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 1:04 pm | मुक्त विहारि

बातमी तीच आहे ....

पण, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे ...

https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/farmers-protest...

ज्याअर्थी, परदेशी लोकांचा, आंदोलनाला पाठिंबा आहे, त्याअर्थी, मोदींनी पाचर योग्य ठिकाणी मारली आहे...

आग्या१९९०'s picture

3 Feb 2021 - 11:01 pm | आग्या१९९०

" अगली बार ट्रंप सरकार " असे बोललेलं सचिनला चालतं वाटतं. आपल्या माणसाला सुनावताना दातखीळ बसते.

तसेच भारतीयानी परदेशी चिवचिवाटाकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि मोदी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.
छान झाले की भारतात अस्थिरता आणायचा डाव उघडा पडला..
सऱकार बोलणी करायला तयार आहे तरी आडमुठेपणा चालला होता कारण खर तर जगात भारताची वाइट प्रतिमा करायची होती.

याना देश्द्रोही म्हणायचे नाही. केन्द्राचे बन्धन नको. राज्य स्तरावर मोकळिक हवी पण भुमिपुत्र मात्र बन्धनात..त्याला नाही द्यायची स्वतन्त्र निर्णय घ्यायची क्शमता...
ते फसवले जातील म्हणुन कायमचे पन्गु करुन ठेवायच.. पण एकही विरोधक "होउदे बाजार खुला आता शेतकरी करतील राज्य" म्हणत नाहीत किवा सहकार तत्व वापर करुन मालाला बाजार कसा मिळवायचा सान्गत नाहीत....

आग्या१९९०'s picture

4 Feb 2021 - 4:17 pm | आग्या१९९०

" अगली बार ट्रंप सरकार " असा प्रचार करणाऱ्याकडे अमेरीकी जनता पूर्णपणे दूर्लक्ष करू शकते कारण, असा बालीश प्रचार करणाऱ्याचा अध्यक्ष निवडणूकीवर काहीही प्रभाव पडणार नाही ह्याची त्यांना खात्री आहे . त्यांना स्वतःच्या निर्णयक्षमतेवर विश्वास आहे. आज सचिन काहीही बोलला तरी अमेरीकन कोण सचिन असाही प्रश्न विचारणार नाही. आपले उगाच नको त्या अमेरीकन सेलिब्रिटीला महत्व देऊन प्रसिद्धी देतात.

त्या मुळे अमेरिकन लोकांना सचिन कोण हे माहीत पण नसेल.
एअरपोर्ट वर जसे शाहरुख ला नागडा करून चेक करतात तसा च सचिन ला पण नागडा करून च चेक करतील.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 5:21 pm | श्रीगुरुजी

अभ्यास कमी पडतोय. खान नावामुळे शाहरूखची तपासणी झाली. सचिनच्या नावात खान नाही.

भंकस बाबा's picture

4 Feb 2021 - 6:28 pm | भंकस बाबा

परत एकदा चुकीची माहिती तुम्ही घेऊन आलेला आहात.
शाहरुख खानने एअरपोर्टवर नाव विचारले असता ' माय नेम इज खान अँड आय एम नॉट टेररिस्ट' असे तारे तोडले होते. हे त्याच्या माय नेम इज खान या टुकार चित्रपटाचे प्रमोशन होते. नशीब अमेरिकेने फक्त कपडे काढले , पार्श्वभागावर पोकळ बांबूचे फटके नाही मारले.

सॅगी's picture

4 Feb 2021 - 3:17 pm | सॅगी

तसं बोललेलं कोणा अमेरिकन सचिनला (किंवा कोणाही अमेरिकन माणसाला) चाललं नसतं तर त्याने सुनावलं असतं ना....भारतीय सचिनला ते चालत असेल तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 3:35 pm | श्रीगुरुजी

मुळात ७५ मिनिटातील भाषणात बोललेल्या या चार शब्दात काय चुकीचे होते? एकाही अमेरिकनाने त्यावर आक्षेप घेतलेला नाही. मग भारतात काही जणांना पोटदुखी का आहे?

सॅगी's picture

4 Feb 2021 - 3:48 pm | सॅगी

माझेही हेच म्हणणे आहे.

ह्या कायद्यांना विरोध करत आहेत ..

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Feb 2021 - 11:14 pm | चंद्रसूर्यकुमार

दोन मूलभूत प्रश्नः

१. सगळे पुरोगामी विचारवंत एकीकडे गांधीजींच्या नावाचा जयघोष करत असतात. पण चौरीचौराच्या घटनेत हिंसा झाल्याने व्यथित होऊन गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती त्याप्रमाणे २६ जानेवारीला आंदोलनात हिंसा झाल्यामुळे व्यथित होऊन हे तथाकथित शेतकरी आंदोलन मागे घ्यावे असे किती पुरोगामी विचारवंतांनी म्हटले?

२. क्षणभर धरून चालू की हे कृषीकायदे शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार आहेत. तसे असेल तर दोन महिन्यापेक्षा जास्त हे आंदोलन पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग वगळता इतर कुठेच का पसरले नाही? उत्तर प्रदेशचा दिल्लीजवळचा भाग वगळता इतर सगळे जिल्हे, बिहार, मध्य प्रदेश, बंगाल पासून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र, तेलंगण वगैरे राज्यांमध्ये असे आंदोलन का पसरले नाही? इतर ठिकाणी शेतकरी राहात नाहीत का? का इतर ठिकाणी फुकटचे पिझ्झे वाटायला आणि मसाज करून द्यायला खुर्च्यांची व्यवस्था करायला पैसे टाकणारा कोणी मिळाला नाही का या भागातले खरोखरचे शेतकरी शेतात काम करत असल्याने असले रिकामटेकडे कारभार करायला त्यांना वेळ नाही?

जो पर्यंत स्वतःच्या गळ्या पर्यंत येत नाही तो पर्यंत विरोध करायचंय नाही.
आपल्याला काय देणे घेणे ही वृत्ती म्हणून बाकी ठिकाणी आंदोलन नाहीत.
सरकार किती जनते च्या विरूद्ध काम करू ध्या त्यांस धर्म आणि जाती ची अफू ची गोळी दिली की तर सर्व विसरून त्यांनाच निवडून देणार हे राजकीय पक्षांना चांगले माहीत आहे.
मोदी ना बहुमत मिळाले त्याचे कारण त्यांचे सरकार मोठे दिव्य काम करत आहे म्हणून नाही तर अफू ची गोळी योग्य वेळी दिल्या मुळे जनता सर्व सरकारी गलथान कारभार विसरून मतदान करून बहु मता मध्ये ह्यांना च निवडून दिले.
24 साठी पण राम मंदिराची अफू ची गोळी तयार करायचे काम चालू आहे आणि ती अफू ची गोळी नाही तयार झाली तर पाकिस्तान ही हक्काची गोळी आहेच.

तेव्हा भारतात सुध्दा मुक्ताफळं उधळली गेली की तेथील घटनेचा भारताशी काय संबंध.
अमेरिकेतील निवडणुकी चे विश्लेषण भारतीय अती शहाणी मीडिया करत होती की भारताचा आणि अमेरिकेतील निवडणुकीचा काय संबंध.
बाइडन पासून तात्या पर्यंत भारतीय टीका टिप्पणी करत होते भारतीय ना काय गरज होती नाक घुप्सायची दुसऱ्या देशातील घटनेवर.
Bjp propogonds चालवते आणि त्याला कथित क्रिकेटर, actors स्वार्थ साठी साथ देतात आणि पाठीराखे डोळे,डोकं बंद करून तेच forward करतात.
कोणती ही व्यक्ती जागेतील कोणत्या ही प्रसंग विषयी मत व्यक्त करत आली आहे आणि करत राहील.
ती परकीय आहे म्हणून मत व्यक्त करू शकतं नाही हे अती च झाले.
सरकारी पातळीवर कोणत्या देशाने मत व्यक्त केले असते तर तर वेगळे होते पण विरोध केला पाहिजे.
तिथे अमित शाह संसदेत बरळे ले की चेले chapate डोकं बाजूला ठेवून लगेच इन्स्टंट देश प्रेमी झाले

बाप्पू's picture

4 Feb 2021 - 12:53 am | बाप्पू

188, तुमचे सगळे प्रतिसाद हे BJP वर येऊन थांबतात. धागा कोणताही असो.. BJP ने ह्याव केलं आणि त्याव केल हीच टिवटिव चालू असते. बरं आरोप करून नामानिराळे होता तुम्ही. इतर सभासदांनी योग्य किंवा मुद्देसूद प्रतिसाद दिला कि तुम्ही काही काळ शांत बसता.. आणि पुढचा एखादा सोयीस्कर प्रतिसाद पाहून त्या चर्चेत सुद्धा परत आपली Bjp नामाची पिपाणी वाजवून नवीन धून सोडून निघून जायचे..

त्यामुळे मी इथून पुढे तुमच्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देणार नाही.
आणि इतर लोकांनाही विनंती करतो कि अश्या लोकांना फाट्यावर मारावे.

धन्यवाद.

Rajesh188's picture

4 Feb 2021 - 1:23 am | Rajesh188

एकी कडे असा आव आणायचा नी bjp ची समर्थ क नाही.
आणि कंगना पासून अर्णव पर्यंत सर्वांच्या मूर्ख बडबडी चे समर्थन करायचे.
देश स्वतंत्र झाला तेव्हा जागतिक स्थिती काय होती.
भारतावर व्यापारी म्हणून आले आणि नुकतेच देश सोडून गेलेल्या स्थिती मध्ये भांडवल शही चे तेव्हाचे नेते समर्थन करता नव्हते म्हणून उद्योग हे नियंत्रणात ठेवले होते हे माहीत असून तेव्हाचे सर्व नेते म्हणजे काँग्रेस कशी नालायक होती हा bjp la anukul असा विचार मांडायचा
आणि परत सोवळे पणाच आव आणून मी bjp samarthak नाही हे पण सांगायचे .
असा duttapi पना तर मी करत नाही.
जे आहे ते स्पष्ट व्यक्त होतो.

> एकी कडे असा आव आणायचा नी bjp ची समर्थ क नाही.

भाजपाला मी कधीही मत दिलेले नाही. मोदी आणि डेव्ह फर्नाडिस ह्यांच्यावर मिपा वरील माझी टीका वाचून तुम्ही हे सहज पाहू शकता. टीका हि सत्यावर आधारित असावी व्यक्तीद्वेष वर आधारीत नसावी.

> आणि कंगना पासून अर्णव पर्यंत सर्वांच्या मूर्ख बडबडी चे समर्थन करायचे.

कंगना, अर्णब असो किंवा संजय झा असो किंवा तुम्ही स्वतः मी सर्वांच्या बोलण्याच्या अधिकाराचे १००% समर्थन करते. ह्याचा अर्थ मी त्यांच्या व्यक्तव्याशी संमती व्यक्त करत आहे असा होत नाही.

तुम्हाला जर थोडी जरी शरम असेल तर मी ह्यांच्या कुठल्या मूर्खपणाच्या बडबडीचे समर्थन केले आहे हे स्क्रिनशॉट देऊन दाखवावे. असे केलेत तर मी तुम्ही सांगाल त्या धर्मादायी संस्थेला १०,००० रुपये देणगी देईन. (इतर मिपाकरांनी इथे जज म्हणून राहावे. )

> काँग्रेस कशी नालायक होती हा bjp la anukul असा विचार मांडायचा

काँग्रेस हि नालायक होती आणि नेहरू सारखे नेते निर्बुद्ध आणि दुष्ट होते हे मी अनेकवेळा तर्क आणि पुरावे मांडून अनेकदा सिद्ध केले आहे. अर्थानं हे सिद्ध करायला मी काही दामिनी मधील सनी देओल प्रमाणे आव आणत नाही. हे सत्य सर्वमान्य आणि सर्वश्रुत आहे. है सत्याने भाजपायी लोकांचा फायदा होत असेल तर मी ते सत्य का म्हणून लपवू ? भाजपातील नेते काही विशेष चतुर किंवा विद्वान नाही आहेत पण सत्तेची शय्यासोबत ह्यांनी विशेष केली नाही त्यामुळे ह्यांची संतती कशी होईल ह्यावर लिहायला अजून वेळ आहे.

> असा duttapi पना तर मी करत नाही.

हो मी हे मान्य करते. तुम्ही दुटप्पी नाही आहात. तुम्ही द्वेष बुद्धीने प्रेरित आहात आणि भाजप पेक्षा मोदी ह्या माणसाचा अत्यंत एकांगी पद्धतीचा द्वेष तुम्ही करता. आणि विषय, स्थळ, काळ काहीही असला तरी लंगडत चालणार्या श्वानाप्रमाणे शेवटी भाजप आणि मोदी वाईट अशी निर्बुद्ध बडबड करायची इतकेच काय ती आपली कार्यक्षमता आहे.

> जे आहे ते स्पष्ट व्यक्त होतो.

जे टाकीत नाही ने नळांत कुठून येईल ? रिकाम्या टाकीचा नळ सोडला तर टाकीत काय आहे ह्या पेक्षा टाकीत काय नाही हे आम्हाला जास्त कळते. त्याच प्रमाणे आपल्या बडबडीतून आणि वैयक्तिक दोषआरोपातून आपल्यांत काय नाही ते जास्त व्यक्त होते.

बाकी चालुद्या, मनोरंजन तरी होते.

असे मनोरंजन करणारै, किती तरी आले आणि गेले ...

आता तर काही लोकांची नावे सुद्धा आठवत नाहीत ...

उद्दाम, सचीन, पोटे, ही अशीच काही नावे ....

हा तुमचा दावा तुम्हाला खरा वाटत असेल तरी त्याचे स्वागत आहे.
स्वतः ला वाटत आहे ना तुम्ही balance विचार करता कोणत्या विचारधारेच्या बांधील नाही आहात .
बस .
पण मोदी चे कोणतेच कर्तृत्व नसताना
त्यांची जी इथे टोकाची लाल करण्याची स्पर्धा
चालू असते म्हणून बाकी अलिप्त लोकांना पण जास्त अलिप्त राहता येत नाही.
हेच कारण आहे टोकाची परस्पर विरोधी मत असण्याचा

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 9:24 am | मुक्त विहारि

1. गुजरात राज्याची प्रगती, मोदींच्या काळात वेगात सुरू झाली.

2. गोध्रा हत्याकांडा नंतर, गुजरात मध्ये एकही दंगल झाली नाही। ।

3. चीनच्या आर्थिक नाड्या, हळूहळू आवळत चालले आहेत.

4. संरक्षण दलाला मजबूती आणली आहे.

इतकाही मोदी द्वेष करू नका की जेणेकरून, देशाचे संरक्षण धोक्यात येईल ...

साहना's picture

4 Feb 2021 - 11:00 pm | साहना

राजेशभाऊ,

फालतू पोपटपंची नको. माझे वरील चॅलेंज ला स्वीकृत करा नाहीतर निलाजरे पणाने आपल्या विचारयांच्या फुसक्या इथे सोडू नका.

Rajesh188's picture

4 Feb 2021 - 1:13 am | Rajesh188

देशातील गरिबी पासून ,भ्रष्ट प्रशासन,काश्मीर प्रश्न ,चीन,महागाई,अगदी रस्त्यावर खडे का आहेत असा विषय निघाला तरी नेहरू ना दोषी ठरवणारे इथे कमी नाहीत ते चालते का तुम्हाला .
मी तर आता सत्तेवर असलेल्या पक्षाला च दोषी ठरवत आहे तुम्ही लोक सत्तेवर नसलेल्या आणि मरून 50 ते 60 वर्ष झालेल्या लोकांना पण आताच्या सर्व च गैर soyina दोषी ठरवता ते चालत का.
अमित शाह नी संसदेत मत व्यक्त केल्या नंतर बाकी चमकेश लोकांना कंठ फुडला हे चुकीचे आहे का?
मग bjp वर नाही आरोप करणार तर कोणावर करणार.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 7:20 am | मुक्त विहारि

तेच तर सत्य आहे ...

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे कटू सत्य पचवायची ताकद हवी ...

कानडाऊ योगेशु's picture

5 Feb 2021 - 10:37 am | कानडाऊ योगेशु

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे कटू सत्य पचवायची ताकद हवी ...

फॉर दॅट मॅटर्,कुठलाही राजकिय पक्ष जनतेच्या भल्याचा विचार सर्वात शेवटी करतो हे विधान सत्य आहे.
एक नातेवाईक बीजेपी शासित प्रदेशात सरकारी पदावर काम करतो. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार सर्व योजनांमधली मलई प्रथम नेतेमंडळींमध्ये वाटली जाते व झिरपत झिरपत जनतेपर्यंत येते.किंबहुना योजना आणण्याआधी व्यक्तिगत फायदा व पक्षीय फायदा सर्वप्रथम पाहिला जातो. हे नागडे सत्य आहे

त्या निस्तरता निस्तरता, नाकी नऊ येत आहेत ...

हे केंद्रीय सरकार, त्या चुका निस्तरत आहेत, हा केंद्रीय सरकारचाच दोष आहे, नाही का?

बाय द वे,

आपल्या मनांत, BJP बद्दल द्वेष पहिल्या पासूनच आहे की, इतर काही कारणे आहेत?

नोटाबंदीचा तर काही संबंध नाही ना?

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Feb 2021 - 8:47 am | चंद्रसूर्यकुमार

त्यामुळे मी इथून पुढे तुमच्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देणार नाही.
आणि इतर लोकांनाही विनंती करतो कि अश्या लोकांना फाट्यावर मारावे.

सहमत आहे. असेच करायला हवे.

तितकाच वेळ चांगला जातो...

Rajesh188's picture

4 Feb 2021 - 10:59 am | Rajesh188

आणि आपली कंपू गिरी शाबूत ठेवावी.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 11:06 am | मुक्त विहारि

आजकाल तसाही, आमचा टाईमपास होत नाही ...

पुर्वी, सचीन, उद्दाम, पोटे, वगैरे मंडळी, आमचा छान टाईमपास करायची ...

आता, ती मंडळी नाहीत .... ती असती तर, तुम्हाला छान वैचारिक मंडळी मित्र, म्हणून मिळाली असती...

भाजपद्वेष आणि मोदी विरोध, हा तुमच्या मैत्रीचा, समान पाया आहे...

स्वलिखित's picture

14 Feb 2021 - 1:30 pm | स्वलिखित

संक्षि राहिले ओ

सॅगी's picture

4 Feb 2021 - 11:26 am | सॅगी

असे लिहून स्वतःदेखील तेच करायचे...नै का? :)

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 10:33 am | श्रीगुरुजी

काका पाठीशी असल्याने कोणतीही भीति नाही.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 10:59 am | मुक्त विहारि

काका मला वाचवा, हे ऐतिहासिक सत्य आहे ....

चाचा नेहरू पण, ह्याला अपवाद न्हवते ....

पण, अंगाशी आले की, काका मंडळी, हात काढून घेतात....

घटोत्कचाचा वध पण, काकानेच केला ....

गणेशा's picture

4 Feb 2021 - 4:43 pm | गणेशा

आजची घडामोड...

फेसबुक, ट्वीटर सारख्या माध्यमातून copy paste messages पडत असताना, आणि उगाच घाबरून किंवा कोणाच्या सांगण्यावरून hash tag चालवले जात असताना पाहतो आहे...
मनापासून प्रेम केलेला सचिन पण यांच्यात सामिल झालाय.. बेहत्तर, देशा पेक्षा व्यक्ती महत्वाचा नाहीच.. मग to सचिन असो वा मोदी...
.
.

रस्त्यावर ठोकलेला एक एक खिळा,
तुमचा अहम, तुमचे सत्ता साम्राज्य खिळखिळे करणार हे नक्की...

- शब्दमेघ

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 5:19 pm | मुक्त विहारि

मग ते घराणेशाही मुळे, पदावर बसलेले अपरिपक्व नेते असोत किंवा जनतेच्या भल्याचा विचार न करता, दळणवळण रोखणारे पक्ष असोत ...

सॅगी's picture

4 Feb 2021 - 5:29 pm | सॅगी

पोलिसांच्या गाडीवर चढवलेला एक एक ट्रॅक्टर,
जनतेच्या मनातुन, तुमच्यासाठी असलेली सहानुभूती कमी करणार हे नक्की...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2021 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) रस्त्यावर खिळे ठोकणे वगैरे मुळे टिकेचे धनी ठरलेल्या सरकारने गुपचुप खीळे काढायला लावले, ते काही प्रामाणिक मीडियाच्या नजरेतून सुटले नाही तेव्हा, स्थळ बदलामुळे असे करीत आहोत असे पोलिसांनी सांगितले.

२) सेलिब्रेटीजचे ट्विटर, आंदोलनाला मिळणारा पाठिंबा, दररोज वाढणारे आंदोलक, या आणि इतर विषयावर गृहमंत्री अजित डोवाल, दिल्ली पोलिस आयुक्त यांची आज बैठक.

३) गाझिपुला शेतकरी आन्दोलकांना भेटीस निघालेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांना शेतकरी आन्दोलकांना भेटण्यापासून रोखले.

आणि

४) गॅसचे दर २५ रूपयांनी वाढले.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2021 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

poptano bola

-दिलीप बिरुटे

बाप्पू's picture

5 Feb 2021 - 9:57 am | बाप्पू

@ प्राध्यापक.

म्हणजे रिहाना, राबिश, शीख / पंजाबी अक्टर्स हे पण पोपट आहेत हे मान्य केलेच शेवटी तुम्ही..

सॅगी's picture

5 Feb 2021 - 10:13 am | सॅगी

अगदी बरोबर, आता फक्त ती मलाला ट्वीट करायची बाकी आहे. एकदा का ते झाले की हा पोपटांचा थवा (खरे तर टोळीच) पुर्ण होईल बघा...

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 9:59 am | मुक्त विहारि

आमच्या बाजुलाच एका काकांनी, पिंजर्यात पोपट ठेवला आहे...

आमचे हे काका, दर काही वर्षांनी, पोपट मेला की बदलतात ...

आमच्या शेजारी पण एक काका आहेत. पोपटच नव्हे तर इतर सर्व प्राण्यांवर त्यांचे भयंकर प्रेम. विशेषतः अस्वलांवर. त्यांच्या सोबत राहूनच ते सुद्धा आता कोलांट्या उड्या मारतात.. अगदी अस्वला पेक्षाही मोठ्या पलट्या अगदी सहज मारून दाखवतात.

त्यांचा पोपट ( त्यांचा म्हणजे.. त्यांनी पाळलेला पोपट ) खूप हुशार आहे.
कुठेही पळून जात नाही.. बिना पिंजर्याचा सुद्धा घरीच बसून असतो... टॅलेंट तर एकापेक्षा एक आहेत. खुर्चीवर बसतो काय.. लिहून दिलेले भाषण अगदी तंतोतंत वाचून दाखवतो काय.. काकांसमोर मिठू मिठू करतो काय.. आणि आतातर काकांनी त्याला कोलांटी उडी मारायला देखील शिकवले आहे.

पोपट खूपच सर्वसमावेशक आहे. तो स्वतः पोपट आहे म्हणून घरात सर्वांनीच पोपट बनावे असा त्याचा बिलकुल हट्ट नाही. त्यामुळेच तर घरी पेंग्विन, आणि माकडे सुद्धा आहेत.. एक माकड रोज सकाळी घाण करते पण पोपट कधीही त्या माकडाकडे पाहत नाही. एरवी गळ्यात गळे घालून असते पण माकडाने केलेल्या कोणत्याही घाणीची जबाबदारी पोपट घेत नाही. नुकतेच माकडाने एका चिमणीचे घर पडण्याचा प्रयत्न केला पण पोपट त्यावेळी मात्र शांत बसले होते. कधीकधी वाटतं कि पोपटच पडद्यामागून माकडाला हे सर्व करायला सांगत असावा.

काकांची फॅमिली खूप मोठी आहे. काकांचे एक भाऊ आहेत. काका आणि ते भाऊ एकत्र राहायचे पण नंतर त्यांच्या घरात वाटण्या झाल्या. काकांच्या भावाच्या मुलाने सर्वांच्या मनाविरुद्ध लग्न केले.. नवीन सुनबाई आपल्या जातीची नसल्याने काकांनी घराच्या वाटण्या करून आपले वेगळे घर बांधले.. पण शेवटी रक्ताची नाती अशी एका झटक्यात तुटत नाहीत. अजूनही वेगवेगळे राहत असले तरी सर्व कार्यक्रमात काका मिळून मिसळून असतात.
काकांचा हा नवीन पोपट त्यांच्या भावासमोर देखील आपले कर्तब दाखवतो. काकांना आणि त्यांच्या भावाला दोघांनाही खुश ठेवतो..

पोपट आजकाल आपला रंग विसरलाय. हिरवा रंगात रंगला असला तरी जगाला माझा रंग भगवा आहे हे ओरडून ओरडून सांगत असतो..
पण काका आणि त्याचा भाऊ दिसल्यावर मात्र तो शांत बसतो. अचानक आपल्या अंगावर सगळे रंग आहेत. सगळे रंग कसे समान आहेत ते सांगू लागतो.

असा हा मल्टी टॅलेंटेड पोपट कुठल्या बाजारात मिळतो कुणास ठाऊक. महाग असावा. पण काका शेवटी रॉयल माणूस.. त्याचे छंद पण रॉयलच असणार.

जबराट प्रतिसाद
मल्टी टॅलेंटेड पोपट कुठल्या बाजारात मिळतो
अहो मकाऊ पोपट असेल. ख्या ख्या ख्या:

अनन्त अवधुत's picture

5 Feb 2021 - 12:56 pm | अनन्त अवधुत

खतर्नाक प्रतिसाद.__/\__

कधीकधी वाटतं कि पोपटच पडद्यामागून माकडाला हे सर्व करायला सांगत असावा

हे खरे. माकडावर प्रकाशझोत असताना पोपट अंधारात काय करतो ते पहावे.

बाप्पू's picture

5 Feb 2021 - 10:06 pm | बाप्पू

धन्यवाद अनंत अवधूत आणि सौन्दळा.

काकांबद्दल अजुन बरेच काही लिहिण्यासारखं आहे. पण काकांनी फक्त पोपटच नाही. तर चावकी कुत्री देखील पाळलेत.
काकांबद्दल काही बोलले कि काका कुत्र्यांना गुपचूप इशारा करतात. आणि मग कुत्री त्या व्यक्तीला स्वतःच्या घरी बोलावून अक्षरशः वळ उठेपर्यंत चावतात..
त्यामुळेच.. काकासे डर नही लगता साहब.. कुत्तो से लागता है.

टीप - सदर प्रतिसाद हे केवळ मनोरंजनासाठी लिहिले आहेत. कोणीही राजकीय व्यक्तीशी त्याचा संबंध जोडू नये .. जोडायचा असल्यास तो तुमच्या जबाबदारीवर जोडावा.

गोड गोड बोलून, आमीषे दाखवून, पोपटाला पिंजर्यात बंद करतात....

काकांचा हात खांद्यावर पडला की, पोपट मेलाच, म्हणून समजायचा...

घातक मधल्या कातिया पेक्षा, आमचे काका जास्त डेंजरस आहेत ...

रात्रीचे चांदणे's picture

4 Feb 2021 - 5:13 pm | रात्रीचे चांदणे

कोण चूक का बरोबर हे जनताच ठरवेल. येत्या काहीच दिवसात पश्चिम बंगाल च्या निवडणुका आहेत. माझ्या महितीप्रमाने सध्या bjp चे 3 आमदार आहेत. जर ह्यात घसघशीत वाढ झाली तर कमीतकमी पश्चिम बंगाल मधील शेतकऱ्यांना तरी नवीन कायद्याची काहीही अडचण नाही आस म्हणू शकतो. माझ्या ओळखीच्या शेतकार्यापैकी एकाचाही ह्या कायद्याला विरोध नाही.
ह्या आंदोलनाला देशाबाहेरून ही पाठिंबा मिळत आहे. जेव्हढा बाहेरून पाठिंबा जाईल तेव्हढा जास्त फायदा bjp ला होईल. कारण सामान्य जनतेला हे पटणार नाही. सचिन तेंडुलकर ने पहिल्यांदा अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या बद्दलच्या माझ्या मनात असलेल्या आदरा मध्ये वाढच झाली आहे.

म्हणजेच, कायदे जनतेच्या भल्यासाठी आहेत

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 5:24 pm | श्रीगुरुजी

बंगालमध्ये भाजप १००+ जागा मिळवेल असा सध्याचा अंदाज आहे.

सचिन व अनेक अभिनेत्यांनी अत्यंत योग्य भूमिका घेतली आहे.

शिवसेना, हा राष्ट्रीय पातळीवर प्रबळ पक्ष आहे, असे काही लोकांना वाटते...

त्यामुळे, शिवसेनेचा मुख्यमंत्री पण होऊ शकतो ...

महाराष्ट्रात, 20% लोकांनी, शिवसेनेला नाकारले तरी, मुख्यमंत्री पद, शिवसेनेला मिळालेच की नाही?

गणेशा's picture

4 Feb 2021 - 5:44 pm | गणेशा

एक प्रामाणिक प्रश्न..

तुम्हाला स्वतःला असे वाटत नाहीये का, आपण मुद्दा सोडून मुद्दाम शिवसेना विषय मध्ये आणत आहात..
मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि जनतेचे फसवणूक वगैरे..

येऊद्या कि बंगाल मध्ये bjp.. तसे हि ममता बद्दल एव्हडे काही चांगले ऐकलेय असे नाहीच..

पण आपल्या विचारांनी शिवसेनेला मध्ये आणायचे.. चर्चेचा रोख पुन्हा बदलायचा.. पुन्हा तेच जुन्या कढीला उधान आणायचे, कोणी खंजीर खुपसला बोलत रहायचे.. कंटाळा येत नाही का?
बरं तसे वेगळे धागे पण आहेत..
तुम्ही म्हणु. शकता मी काहीही बोलेल.. माझा त्याला ना नाही..
पण दरवेळेस तेच तेच विषयाचा कंटाळा येत नाही का..बोलावे, पण कुठेही तो मुद्दा का घुसडावा?

मोदी द्वेष, bjp द्वेष तुम्ही दुसऱ्यांना दाखवता, तेंव्हा आपण पण काँग्रेस, शरद पवार, शिवसेना द्वेषच करत असता, मग आपले ते खरे मानून दुसऱ्याला दोष देण्यात काय धन्यता?

असो.. मी काय म्हणतोय तेव्हडे कळाले तरी चांगले आहे..
बाकी चालुद्या..अश्या इतर मुद्द्यावर बोलण्यात काय हाशील नाही..

बिहार मध्ये पण निवडणूक लढवली होतीच की ...

बाय द वे,

ह्या वर्षभरात, महाराष्ट्रात किती प्रगती झाली नाही?

1. मेट्रोचे काम मार्गी लागले का?

2. एक पण झाड तोडल्या गेले नाही, असे झाले का?

3. ते वीज बिला बाबतीतले आश्र्वासन पुर्ण केले का?

4. शेतकरी वर्गाला, बांधावर जाऊन, एकरी का हेक्टरी, 25-30,000 देणार होते, ते दिले का?

......

घराणेशाहीची इतकाही पुजा बरी नाही ...

विकास दर वजा मध्ये गेला.
बेरोजगारी वाढली
पेट्रोल 100 री पार करेल च .
हे असले प्रश्न विचारले की corona च्या आड लपायचे आणि दुसऱ्या तोंडाने महाराष्ट्र नी काय प्रगती केली ह्या वर्षात हे विचारायचे.
इथे corona नव्हता का?

भंकस बाबा's picture

4 Feb 2021 - 6:38 pm | भंकस बाबा

राजेसाहेब, सरकार फुकट वॅक्सिंन वाटत आहे, तुम्ही लायनीत उभे आहात की नाही?

भंकस बाबा's picture

4 Feb 2021 - 6:41 pm | भंकस बाबा

कोणत्या देशाने विकासदर अधिक दाखवला आहे?
अशा राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाचे आमच्या मालाड मालवणीमध्ये शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल.
त्यांच्या वतीने तुम्ही आलात तरी चालेल!

आग्या१९९०'s picture

4 Feb 2021 - 8:44 pm | आग्या१९९०

कोणत्या देशाने विकासदर अधिक दाखवला आहे?

व्हिएतनाम

बाप्पू's picture

4 Feb 2021 - 8:49 pm | बाप्पू

3. ते वीज बिला बाबतीतले आश्र्वासन पुर्ण केले का?

फक्त या एका मुद्द्यामुळे उभ्या आयुष्यात मी परत सोनियासेनेला मत देणार नाही. याच्यासारखा लाचार मुखमंत्री होणार नाही. ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे भोंगे बंद करा असा नारा दिला त्याचा पोरगा आज अजान स्पर्धा भरवतोय. त्यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट पुसून जनाब लिहितोय.. अरे किती ही लाचारी..??

बऱ्याच जणांना वीजबिले अव्वाच्या सव्वा आली आहेत. त्यामागे काही काळेबेरे आहे का याचा तपास व्हायला हवा.
माझे स्वतःच्या बाबतीत एका जुन महिन्याचे बिल 6790 रुपये आले आहे. इतर वेळी हाच आकडा 1000 च्या आत असतो. फार फार तर 100-150 जास्त. मी अगदी कितीही आपटली तरीही 2500 पेक्षा जास्त लाईट बिल येणे शक्य नाही. उन्हाळा असल्याने फॅन वापरला असा म्हणले तरी उन्हाळा दरवर्षी येतो.. पण तेव्हा तर बिल जास्त येत नाही..
मग याचं वर्षी का??

याची तक्रार करण्यासाठी ऐन कोरोनाकाळात लाइनमध्ये/ गर्दीमध्ये थांबून तक्रार देखील केली पण आधी सर्व बिल भरा मगच अड्जस्ट करू अशी तंबी देऊ लागले.
बऱ्याच लोकांनी निमूटपणे पैसे भरले.. त्यानंतर त्यांचे लाईट बिल अड्जस्ट झाले कि नाही याचीही माहिती नाही.

याउलट आपले घरबसे मुख्यमंत्री खुर्चीत बसून, इतरांना तत्वज्ञान रुपी अमृत पाजण्यात व्यस्त होते. कि कामगारांना पगार द्या, नोकरीवरून काढू नका. भाडे घेऊ नका.. आणि असले बरेच काही. अरे तू स्वतः मध्यमवर्गीयांसाठी काय केले ते सांग ना xxxx. बाकीच्यांना कश्याला ज्ञान देतोयस.

यांच्याच ऊर्जामंत्र्याने सांगितले कि कोरोना काळातील बिले माफ होतील.. कधी म्हनाले कि बिल मागच्या वर्षीच्या रिडींग नुसार कन्सिडर केले जाईल.. कधी म्हणाले कि 100 युनिट फुकट देऊ.. आणि आता म्हणतायेत कि त्याचा निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ घेईल.. अरे मग तू कश्याला झालायस ऊर्जामंत्री... मंत्रिमंडळ च बघून घेईल बाकीचे सगळे. जा घरी..

दोन्ही पेंग्विन आता डोक्यात जायला लागलेत. आणि त्याहून कहर म्हणजे संपादक साहेबांची रोजची सामनात प्रसिद्ध होणारी तट्टी... वीट आला आता.

रात्रीचे चांदणे's picture

4 Feb 2021 - 9:02 pm | रात्रीचे चांदणे

त्याहून कहर म्हणजे संपादक साहेबांची रोजची सामनात प्रसिद्ध होणारी तट्टी
सामन्यात प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही गोष्टी बद्दल काहीही अडचण नाही. परंतु सामन्यात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपले सगळे मराठी वर्तमानपत्र आणि news चॅनेल्स जाहीर प्रसिद्धी का देतात हे समजत नाही. म्हणजे लोकसत्ता ऑनलाईन वाचावा म्हणून उघडला तर सामना मध्ये bjp वरती काय टीका केली हीच headline असते. ह्यात सामना ची काही चुक नाही पण लोकसत्ता आणि बाकी सारे copy and paste का करतेत हे समजत नाही.

कारण सामना हे वृत्तपत्र नसून शिवसेनेचे मुखपत्र आहे.
सामना मध्ये प्रसिद्ध होणारी गोष्ट हि शिवसेनेची भूमिका आणि त्या पक्षाचे ओपिनियन असते.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 10:14 pm | श्रीगुरुजी

ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे भोंगे बंद करा असा नारा दिला त्याचा पोरगा आज अजान स्पर्धा भरवतोय. त्यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट पुसून जनाब लिहितोय.. अरे किती ही लाचारी..??

शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी आहे/होता हा फार मोठा गैरसमज आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Feb 2021 - 10:48 pm | चंद्रसूर्यकुमार

शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी आहे/होता हा फार मोठा गैरसमज आहे.

शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली आणि पक्षाच्या अस्तित्वातील जवळपास पहिल्या वीस वर्षांमध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वामधील हिं सुध्दा कधी उच्चारला नव्हता. १९८० च्या दशकात काहीकाही घटना झाल्या त्यातून हिंदुत्व हा मते मिळवायला योग्य मुद्दा होऊ शकेल हे त्यांना समजण्याइतके मुरब्बी राजकारणी ते नक्कीच होते.
१९८० च्या दशकाच्या सुरवातीला मदुराईला हिंदूंचे सामुहिक धर्मांतर झाले, १९८० नंतर पंजाबात वातावरण बिघडायला लागल्यानंतर इंदिरा गांधींनी काही प्रमाणात हिंदू अपीजमेंट सुरू केली होती. मदुराई धर्मांतरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेने बोलावलेल्या सभेला सरकारच्या मालकीचे विज्ञान भवन वापरायला दिले गेले तसेच मुळात देवाधर्माचे काही न करणार्‍या इंदिरा गांधी मुद्दामून हिंदू मंदिरांच्या भेटी द्यायला लागल्या आणि रूद्राक्षाची माळ मुद्दामून flaunt करायला लागल्या. राजीव गांधींच्या कारभारात शहाबानो प्रकरणात मुस्लिम धर्मांधतेपुढे नांगी टाकली केली तर त्याला बॅलन्स करायला अयोध्येच्या रामजन्मभूमीची कुलपे उघडायला लागली. एकूणच वातावरण हिंदू राजकारणाला अनुकूल व्हायला लागले. त्यातून १९८६-८७ पासून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. १९८७ च्या पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत अगदी उघडपणे हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली.

पण पक्षाच्या वाटचालीत पहिली २० वर्षे हिंदुत्वातील हिं पण न उच्चारणे हे मुळातला हिंदुत्ववादी नेता असायचे लक्षण आहे का?

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 11:27 pm | श्रीगुरुजी

निव्वळ भगवी कफनी घालून हिंदुत्ववादी होता येत असते तर समाजवादी, निधर्मी, पुरोगामी वगैरे असलेले स्वामी अग्निवेश हिंदुत्ववादी समजले गेले असते.

ज्या पक्षाने स्थापनेपासून आतापर्यंत समाजवादी, मुस्लिम लीग, कॉंग्रेस, भाजप, रिपब्लिकन पक्ष, शेकाप, राष्ट्रवादी अशा सर्व पक्षांशी फक्त सत्तेसाठी युती केली तो पक्ष कधीच हिंदुत्ववादी नव्हता. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असता तर अडवाणींंच्या श्रीरामजन्मभूमीसाठी काढलेल्या रथयात्रेपासून बाबरी पाडेपर्यंतच्या सर्व आंदोलनात सेनेने सहभाग घेतला असता.

प्रत्येकाची मते वेगळी असतात..त्यामुळे तुमच्या मतांचा आदर आहेच...

बाकी निवडणुका.. शेतकरी.. आमदार हे कसेही कोणाचे येवो..

शेतकरी हि आपलाच आहे..
या एकीच्या मेसेज मध्ये तेव्हडे जरी सरकार ला कळाले तरी खूप, असे मला वाटते..

कायदे बदलता येतात, कायदे बनवता येतात पण विचार विनिमय न होता कायदा बनवणे चुकीचे हे जरी कळाले तरी योग्य..

बाकी कायदे बरोबर असतील हि.. त्यांचा परिणाम पाहिल्या शिवाय ते चूक कि बरोबर हे म्हणणे मला योग्य वाटत नाही..
मग ते काँग्रेस ने केले असते तरी किंवा आता bjp ने केले आहेत तरी..

पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते निंदनीय आहे..
मग येथे कोणतेही सरकार असते तरी तेच मत माझे कायम असते...

काँग्रेस ने केले तर बरोबर आणि bjp ने केले तर चूक हे मला मान्य च नाही..

उलट त्या अण्णांच्या आंदोलनावेळी मुंबई मध्ये मी रॅलीत त्यावेळेस च्या सरकार विरोधात ज्या घोषणा दिल्या त्याचा आता पश्चाताप होतोय...

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 5:44 pm | मुक्त विहारि

तुम्ही आंबे पिकवता, असे गृहीत धरू ...

सर्व खर्च लगा जाता, तुम्हाला 200₹ डझन, ह्या भावाने, आंबे विकले तरच फायदा होतो...

तुम्हाला जबरदस्तीने, APMC मध्येच आंबे विकायला सांगीतले आणि दर लावला, 150₹ डझन ... आत्तापर्यंतचे कायदे हेच करत आहेत ..

हा एक भाग....

--------‐------------

पण, जर तुम्हाला किरकोळ विक्री करायला किंवा दुसरा ठोक व्यापारी शोधायला परवानगी दिली, जे तुम्हाला 400₹ डझन, हा भाव द्यायला तयार आहेत.... नविन कायद्यांमुळे,

‐------------------

तर तुम्ही आंबे कुठे विकाल?

मुवि मी कायद्या ला विरोध करत नाहीच.. कायदे काय आहेत याचे पुर्ण विश्लेषण किंवा analysis म्हणू शकतो ते हि मी केलेले नाहीये..

पण माझ्या शेतात काय पिकवायाचे आणि त्याचा भाव दुसऱ्याने ठरवायचा, याशिवाय त्यावर कायदेशीर काही करायचे हि नाही हे मला योग्य वाटले नाही.. पण तरीही कायदे चांगले आहेत तर विचार विनिमय करून का केले जावू नये...असा माझा प्रश्न आहे..

अहम का? शेतकरी मग तो पंजाब चा असो, गुजरात चा असो वा बंगाल चा सर्वांचे म्हणणे ऐकून तरी घ्या...

आणि विदेशातील लोकांनी स्तुती केली कि जगभर डंका आणि नावे ठेवली कि अंतर्गत बाब,एकता हे मला पटत नाही...

एकता हि पंजाब सोडून कशी होईल?

असो..मी वरतीच लिहिलेलं आहे, कायद्याचा परिणाम काय होईल हे लगेच सांगता येणार नाही, ते जर योग्यच आहेत तर सरकारने ते शेताकऱ्यांशी बोलुन समोपचाराने करावे..हे इतके म्हणणे आहे..

असो.. घाईत तुटक लिहिलेले आहे..
समजुन घ्या..

कंजूस's picture

4 Feb 2021 - 6:22 pm | कंजूस

या वेबसिरिजमध्ये एकदा पाहिलं - बाजारसाठी ती बाई जाताना शेतातले पाच किलो तांदूळ घेऊन जाते. ते विकून इतर गोष्टी घेणार असते. बाजारात तांदूळ घेणाऱ्याने पंधरा रु किलोने घेतले. पण भाजी साठ रु किलो, मीठ वीस रु किलो, डाळी शंभर रु किलो.
म्हणजे नडतो कोण? अडतो कोण?

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 6:55 pm | मुक्त विहारि

माझा एक मित्र, डोंबिवली येथे, किरकोळ भाजी विक्री करतो...

तो वाशी येथल्या, APMC मार्केट मधून, भाजी खरेदी करतो ..

त्याच्या माहिती नुसार, शेतकरी अक्षरशः कवडीमोलाने, दलालांना, भाजी विकतात ....

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 6:51 pm | मुक्त विहारि

दलालांच्या पोटावर पाय आणल्याने, ते आंदोलन करत आहेत ...

माझ्या माहितीप्रमाणे हे कायदे आणतांना दोन्ही सभागृहात मांडल्या गेलेले आहेत.
तेव्हा केवळ आरोप आणि गोंधळ करण्यात वेळ न घालवता, सविस्तर चर्चा करायला विरोधी पक्षांना कुणी रोखले होते?
जर सरकार चर्चेसाठी तयार असेल तर, समिती स्थापन करून त्यांच्याकडे हे अवलोकनासाठी पाठवण्याचा आग्रह कशासाठी? विलंब करवण्यासाठीच ना?

आंदोलनकर्त्यांशी देखील अगदी पहिलेपासून चर्चेसाठी सरकार तयार आहेच.
कायद्यांतर्गत प्रत्येक कलमावर समाधान होईतोवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. आंदोलनकर्त्यांना चर्चा केली तरी समजूनच घ्यायची नाही. त्यांनी आपला एकच हेका लावलाय की कायदे मागे घ्या. का मागे घ्या? त्यावर एकही संयुक्तीक कारण ते देत नाहीत.

संसदेत संमत झालेले कायदे पुढे ढकलण्याची खरेतर सरकारला काहीही गरज नाही. तरीही दीड वर्षे कायदे पुढे ढकलून समाधान काढण्यासाठी देखील सरकार तयार आहे, पण ह्यांना चर्चा करून हे सोडवायचेच नाही. यात मग लोकांना वाटले की आंदोलनकर्त्यांचा हेतू स्वच्छ नाही, तर कुठे चुकले?

योग्यच आहेत तर सरकारने ते शेताकऱ्यांशी बोलुन समोपचाराने करावे..हे इतके म्हणणे आहे..>>>

हे एकदम बरोबर, सरकार चर्चेला तयार आहेच की, सरकारने वर्षभर कायदे स्थगित ठेवायची पण तयारी दाखवली होती.. पण तथाकथित शेतकरी कायदे रद्द करा या मागणीवर असून बसलेत ना.

अडमुठेपणा कोण करतोय ठरवा तुम्हीच... APMC बंद करा असे कोणीच म्हणत नाहीये, पण त्यांची एकाधिकारशाही मोडून काढा, आणि तितकेच हे कायदे करतायत. महाराष्ट्रात हे पूर्वीच झाले आहे, त्यामुळेच इतके मोठे आंदोलन होऊन सुद्धा महाराष्ट्रातले शेतकरी आणि राजकीय पक्ष पण शांत आहेत, कारण ते जर निघाले देशात आंदोलन करायला तर भाजप त्यांच्याच तोंडावर महाराष्ट्रातले कायदे मारील आणि आधी हे रद्द करा म्हणून सांगेल. ते काठावर बसून पाठिंबा देतायत.

असो, डोळे मिटून बसायचे असेल आणि नुसती दडपशाही दडपशाही ओरडायची असेल तर त्याला काही इलाज नाही.

अवांतर -
भारतीय जनतेला सरकारकडून कोणत्याही फेवर ची गरज नाही, ती आपला उत्कर्ष आपल्या बळावर करेल, सरकारने फक्त स्थिरता द्यावी इतकीच अपेक्षा असते, तीदेखील कित्येक वर्षे मिळत नव्हती. आता ती मिळायला लागली आहे, जनता आपला उत्कर्ष आपला आपण करेल, त्याची काळजी नसावी..

आग्या१९९०'s picture

4 Feb 2021 - 8:50 pm | आग्या१९९०

आंबे काय घेऊन बसलात ? द्राक्षवाले आतापर्यत थेट व्यापाऱ्यांनाच विक्री करायचे. माझ्या शेतातील पालेभाज्या , फळभाज्या , मका , सोयबीन थेट व्यापार्‍यालाच देतो.

बाप्पू's picture

4 Feb 2021 - 9:10 pm | बाप्पू

आम्हीदेखील थोड्या दिवसापुर्वीच पावटा आणि वाटाणा डायरेक्ट किरकोळ आणि होलसेल ग्राहकांना विकला.. जवळपास सर्व माल संपला. राहिलेला काही माल किरकोळ व्यापारी शेतात येऊन घेऊन गेले.

थोडीफार मेथी केली होती. तीदेखील अश्याच पद्धतीने विकली. जवळपास सर्व माल संपल्यानंतर औंध मधील एका पराठा शॉपमालकाने संपर्क केला..
जर हा माल मी मार्केट यार्ड ला पाठवला असता तर फायदा तर दूर पण इन्व्हेस्टमेंट पण निघाली नसती.. कारण या सर्वांचे भाव खूप खाली होते..

आता शेतात हरबरा आहे.. अजुन एखादा महिना लागेल.. तो देखील असाच विकणार आहे. पाहुयात...

स्वलिखित's picture

14 Feb 2021 - 2:00 pm | स्वलिखित

पन काय जर त्या ठोक व्यापार्याने १०० रु भाव लावला ?? अणि लावनार नाही कशावरुन

शेतकरी आपलेच आहेत हे रेहाना मंंडळींच्या मेसेजवरुन सरकारला कळावं इतकं सरकार आपल्या शेतकर्‍यांबद्दल असंवेदनशील आहे असं खरच वाटतं तुम्हाला? सरकारच्या निती-धोरणांबद्दल आक्षेप असेलही. त्यांचे वागणे, बोलणे सुद्धा पटत नसेल. पण भारताच्या परिस्थितीशी काहिही घेणंदेणं नसलेल्या काहि विदेशी सेल्लिब्रेटींनी आपल्या सरकारला अक्कल शिकवावी हे बरं वाटतं?

एरवी अशा चर्चेत भाग घेत नाहि... पण काहि सेन्सीबल व्यक्तींच्या प्रतिसादावर प्रश्न विचारायचं धाडस करतो.. तेव्हढीच विचारात भर.

अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो आहे..

आताचे मोदी सरकार हे शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे..
आणि बाहेरून प्रतिक्रिया उमटली कि आपली सार्वभौमता लगेच तुटते काय? नक्कीच नाही.. पण ते आपल्याला विरोध करतात, म्हणुन लगेच क्रिकेटर, बॉलिवूड कलाकार यांच्या मार्फत लगेच ट्वीट्स पाडून घेऊन देश एकसंद आहे, आमचे आंम्ही बघू, हि नीती हि चुकीचीच..हा अहम आहे, जगातून मला कोणी विरोध केला तर आम्ही असे हजार सेलिब्रिटी उभे करू हा अहमच आहे..

नायलाजाने म्हणावे लागते, मोदी आणि bjp निवडून आल्याने काँग्रेस यांच्या पेक्षा खूप भारी होती हे पटतेय, आणि माझ्या पूर्वज लोकांना माझ्या पेक्षा जास्त कळत होते हे आता नक्कीच वाटत आहे.
मोदी नसते तर अजूनही काँग्रेस ला शिव्या घालवण्यात दिवस घालवले असते...

आणि बाहेरच्यांनी जर काही म्हणायचे नाही तर आपण हि बाहेरच्या कडे जाऊन अब कि बार ट्रंम्प सरकार म्हणणे हे हि योग्य नव्हते...तेथील जनतेला ट्रंम्प नको असताना आपण नाक खूपसने बरोबर नव्हतेच..

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 12:13 am | श्रीगुरुजी

पण ते आपल्याला विरोध करतात, म्हणुन लगेच क्रिकेटर, बॉलिवूड कलाकार यांच्या मार्फत लगेच ट्वीट्स पाडून घेऊन देश एकसंद आहे, आमचे आंम्ही बघू, हि नीती हि चुकीचीच..हा अहम आहे, जगातून मला कोणी विरोध केला तर आम्ही असे हजार सेलिब्रिटी उभे करू हा अहमच आहे..

सरकारच्या सांगण्यावरून क्रिकेटपटू, अभिनेते वगैरेंनी ट्विट्स लिहिली?

आणि बाहेरच्यांनी जर काही म्हणायचे नाही तर आपण हि बाहेरच्या कडे जाऊन अब कि बार ट्रंम्प सरकार म्हणणे हे हि योग्य नव्हते...तेथील जनतेला ट्रंम्प नको असताना आपण नाक खूपसने बरोबर नव्हतेच..

अबकी बार ट्रंप सरकार हे वाक्य स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनीच २०१६ मध्ये स्वत:च्या प्रचारात भारतीयांच्या सभेत वापरले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये मोदींनी हा जुना संदर्भ दिला होता. अमेरिकेची निवडणुक त्यावेळी सुमारे १४ महिने लांब होती. आपल्या सव्वा तासांच्या भाषणात मोदींनी फक्त एकदा हा जुना संदर्भ दिला होता.

https://www.google.com/search?sxsrf=ALeKk03G8Kigkqbj71fW7T2YCj81AFbH9Q%3...

सरकारच्या सांगण्यावरून क्रिकेटपटू, अभिनेते वगैरेंनी ट्विट्स लिहिली?
तुम्हाला तसे वाटत नाही, ह्याचीच कमाल आहे..
एकावेळेस हे सगळे स्वयंस्पुर्ती ने जागे झालेत ते हि ७० दिवसा नंतर हे नक्कीच यामागे कोण हे दर्शविते आहे...

सचिन हा माझा लाडका क्रिकेटर त्यामुळे माझ्या मनातून थोडा उतरला आहेच..
पण या वेळेस मात्र हे नक्की..
कोणी कोणत्या क्षेत्रातील कितीही महान असले तरी त्या त्या क्षेत्रात तो महान, इतर ठिकाणी त्याचे मत हे तिकडच्या महानतेवर नक्कीच ठरवले नाही पाहिजे हे मात्र नक्की मला पुन्हा लक्षात आले..

राहता राहिला प्रोपोगंडा पसरावण्याचा प्रश्न...

मोदी हे स्वतःच स्वतःचा propoganda देशात पसरवतात, टीव्ही म्हणू नका, पत्रकार म्हणू नका.. सोशल मीडिया म्हणू नका..
महाशयांच्या नावे tv channel पण होता..
आणि एका परदेशी ट्वीट ने देश तुटत नसतो...पण अहम, मला.. मला चुकीचे ठरवले जातेय, मग चला आपल्या सेलिब्रिटिना बोलते करा..
आणि देशाची एकात्मता वर बोला ते नाही जमले तर परकीय शक्ती बोला असलेच धंदे करून तर propoganda रेटला जातोय..
आणि आपण बसलोय, ह्याचे मागे कोण नाही, ते स्वतःहून बोलतात असे म्हणत...

असो.. हे माझे मत आहे, येथे काँग्रेस असले लाचार वागत असती तरी माझी हीच मते असती..
कुठल्या हि पक्षा ची पालखी वाहण्याची गरजच नाही..

आणि भारत एक आहे तर येथील शेतकरी.. येथील प्रत्येक व्यक्ती, येथील प्रत्येक राज्य एकच आहे..

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 7:27 am | श्रीगुरुजी

७० दिवसांनंतर परदेशात कोणीतरी ट्विट्स करायला लागले आणि भारतात माध्यमे त्याला वारेमाप प्रसिद्धी द्यायला लागली, त्यानंतरच भारतीय सेलिब्रिटींंनी उत्तर दिलंय. त्यामुळे ७० दिवसांनंतर हे स्वयंफूर्तीने जागे झाले की सरकारच्या सांगण्यावरून हा प्रश्न येथे लागू पडत नाही. सुरूवातीच्या काळात कॅनडाच्या पंतप्रधानांनी विनाकारण नाक खुपसल्याने भारत सरकारने सरकारी पातळीवर योग्य ते सांगितले होते व त्यानंतर त्यांचे तोंड बंद झाले होते.

प्रपोगंडाचं म्हणाल तर भारतातील सर्व नेते हेच करीत असतात. राजीव गांधींनी भारतात पहिल्यांदा संगणक आणला, त्यांनी दळणवळण क्रांती केली वगैरे प्रपोगंडा फार पूर्वीपासून पसरविला गेला.

एकीकडे मोदी माध्यमांशी किंवा इतर कोणाशीही अजिबात बोलत नाहीत अशी त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे ते स्वतःच प्रपोगंडा पसरवितात म्हणूनही टीका करायची.

२००२ पासून मोदींविरोधात भारतात आणि जगभर प्रपोगंडा पसरविला गेला व अजूनही हे सुरू आहे. त्यांच्या विरोधात पार संयुक्त राष्ट्रसंघात आणि जागतिक न्यायालयात काही जण गेले होते. कोलंबिया देशाचा हुकुमशहा असलेल्या जनरल नोरिएगाला अमेरिकेने जसे सैन्य पाठवून पकडून आणून अमेरिकेत तुरूंगात डांबले, तसेच मोदींच्या बाबतीत करावे अशीही मागणी केली गेली. मोदींना घालविण्यासाठी कॉंग्रेसी नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानची मदत मागितली होती. हिटलर, सामुहिक हत्याकांड करणारा क्रूरकर्मा, नरसंहारक अशी त्यांची जगभर प्रतिमा केली गेली आहे. त्यामुळे जर मोदी स्वत:विषयी प्रपोगंडा पसरवून स्वतःविषयी मत बदलण्याचा प्रयत्न करीत असतील, तर ते योग्यच ठरेल.

तुम्ही लिहिलेले खूप एकांगी आहे असे तुम्हाला वाटत नाही हेच नवल आहे..

तुम्हाला असे म्हणायचे आहे का,७० दिवसा नंतर कुणी तरी ट्वीट करतेय आणि त्याला मुद्दाम प्रसिद्धी आपली मीडिया देतेय?
अहो आपली मीडिया पहिल्यापासून आंदोलना विरोधात बोलते.. सोशल मीडिया तर विचारूच नका, आंदोलना विरोधात बोलणारे जास्त..
मग एक ट्वीट ला प्रसिद्धी देणारे वेगळे आणि २६ तारखेला जो गोंधळ मीडिया दाखवतेय तो कोणता मीडिया आहे?

भूमिका मीडिया घेताना दिसतोय असे मला तरी वाटत नाही...

कोणाच्या एका ट्वीट ने सगळे हलू शकतात? का इतके विदारक चित्र त्या ट्वीट मध्ये होते? जे आपल्या मीडिया ला आधी दिसले नाही, आधी ते त्यावर बोलले नाही.. उलट त्या ट्वीट नंतर जरी मीडिया ला हे विदारक चित्र कळाले असेल तरी चांगले आहे..

प्रपोगंडा सर्वच नेते पसरवतात म्हणुन तुम्ही मोदींना त्यामागे लपवता आहात...
अटलबिहारी वाजपेयीनी पण रस्ते केले.. शायनींग इंडिया तितकासा प्रभाव टाकू शकला नाही पण त्यांनी नक्कीच इंडिया शाईन करण्यास हातभार लावला.. ते propganda नव्हे..

राजीव गांधी किंवा कुठलाही नेता असो, काळ बदलत जातोय, प्रगती होत जातीये.. म्हणुन होणारी प्रगती कोणत्या तरी पुंजीवाद्याच्या हातात द्यायला कोणता नेता पुढे आलाय?

मागे मी हसदेव अडाणी ला दिलंय लिहिले, कोण बोलले त्यावर? किती न्यूज, किती मीडिया बोलला त्यावर? २००९ पासून परमिशन मिळत नव्हती.. तरी मोदी२००९२०१६ नंतर हळू हळू ते जंगल अडाणी च्या घशात घातले...
धार्मिक मते, पाकिस्थान.. धार्मिक भावना.. पुंजीवाद हि असली मते रेटने हा प्रोपोगंडा आहे..
प्रगतीचा प्रोपोगंडा कोणता नेता पसरवत असेल मग ते मोदी असले तरी ते चांगले आहे.. पण तसे नाही.. मोदीनी स्वतः २०१९ ला प्रगती काय काय केली यावर मते मागितली नाहीत.. त्यांनी प्रोपोगंडे चालवले.. काँग्रेस ने कसे काय केले हि चित्रे ते पसरवत राहिले..

बाकी मोदी मीडिया ला पत्रकार परिषद देणे आणि propganda राबवणे वेगळे आहे हे नक्कीच कळत असावे...
मोदी मध्ये मीडिया, पत्रकारा ना सामोरे जाण्याची ताकद नाही किंवा ते मीडिया ला उत्तरे देऊ शकत नाही.. कारण त्यांना कोणी प्रश्न विचारणे आवडत नाही असे दिसते... यालाच मी म्हणेल तसे.. अहम.. अहंकार असे का म्हणू नये..
मीडिया काय पाकिस्थान चे प्रश्न विचारणार असतो काय?
असो.. जे लोकं बिला बद्दल, कायद्या बद्दल चर्चा केली म्हणतात, ते लोकं पत्रकार परिषद घेऊन मते, आरोप खंडण न करता, परदेशी.. बाह्यशक्ती असे करतेय आपण, आपला प्रश्न असे म्हणुन ते प्रश्न नाकारू कसे शकतात?

आणि भारताने पाकिस्थान ची मदत मोदी विरोधात मागितली होती?
मग मोदी नी निवडणूककाळा अगोदर पुन्हा तेच रहावेत म्हणुन पण पाकिस्थान ला मदत मागितली होती काय?
आपण नक्की काय बोलतोय?

असो..

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 1:10 pm | श्रीगुरुजी

जवळपास सर्व मराठी वृत्तवाहिन्या, अनेक हिंदी वृत्तवाहिन्या, अनेक मराठी वृत्तपत्रे आंदोलनाच्या बाजूने आहेय. त्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांपासून रिहानापर्यंत जे जे सरकारविरोधात व आंदोलनाच्या बाजूने बोलले त्यांना या माध्यमांनी प्रचंड प्रसिद्धी दिलीये. याउलट आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अशा काही संस्थांनी कायद्यांचे समर्थन केल्यानंतर त्यांना अनुल्लेखाने मारलंय.

मोदी प्रपोगंडा पसरवितात असे मी म्हटलेच नाही. जर ते प्रपोगंडा पसरवित असतील तर ते योग्यच आहे असे मी लिहिलंय.

मोदींनी २०१९ मध्ये कोणत्या मुद्द्यांंवर मते मागितली व २०१४ पेक्षा जास्त मतदारांनी कोणत्या मुद्द्यांवर त्यांना मत दिली हे शोधा.

मोदी पत्रकारांना फार वेळ का देत नाहीत त्याची कारणे सर्वश्रुत आहेत.

काश्मीर प्रश्नावर चर्चा सुरू करण्यासाठी मोदींना घालवा असे कॉंग्रेसींनी पाकिस्तानात जाऊन सांगितले होते हे सुद्धा सर्वश्रुत आहे.

प्रसाद_१९८२'s picture

5 Feb 2021 - 1:16 pm | प्रसाद_१९८२

मागे ठाकरे सरकारसाठी, 'सरकार किती चांगले काम करत आहे' अश्या प्रकारचे ट्विट्स करण्याचा
अनेक चाय-बिस्किट पत्रकार व सिने कलाकारांनी धडका लावला होता. नंतर हे ट्विट्स कोणत्या एजन्सी मार्फत केल्याचे उघड झाल्यावर ठाकरे सहित ट्विट करणारे अनेक जण तोंडावर आपटले होते.

याचा अनुभव तुम्हाला असल्याने, सध्या जे सिनेकलाकार ट्विट करत आहेत ते त्याच धर्तीवर असावेत, असा तुम्हाला आलेला संशय कदाचीत खरा असावा. :))

नालायक,आणि मूर्ख नक्की नव्हती आणि अजुन पण नाही.
Bjp ल मी सुद्धा मत दिले होते पण ती आता मोठी चूक वाटत आहे.
येथून पुढे परत कधीच bjp ल म्हणून मत देणार नाही असे ठरवून च टाकले आहे.
भारताच्या इतिहासात असे नालायक आणि
दूरदृष्टी नसलेले आत्मकेंद्री सरकार कधीच होवून गेले नाही .

पण तो अर्धवट मांडला आहे असं वाटतं.

या एकीच्या मेसेज मध्ये तेव्हडे जरी सरकार ला कळाले तरी खूप

रेहाना वगैरे मंडळी भारतातल्या शेतकर्‍यांविषयी जास्त संवेदनशील आहेत आणि त्यांना शेतकर्‍यांचं हित सरकारपेक्षा जास्त चांगलं कळतं असं म्हणायचं आहे का?

बाहेरुन प्रतिक्रीया आलि कि सार्वभौमत्व तुटत नाहि... पण आपल्या देशातल्या संवेदनशील विषयांवर जेंव्हा विदेशी राजकारणी, संस्था आणि सेलिब्रेटी असं मोहोळ उठल्यासारखं वातावरण निर्माण करतात तेंव्हा त्या अरे ला कारे करणं आवष्यक असतं असं मला वाटतं. लौंदासी भिडवावा दुसरा लौंद. ना कमि ना जास्त.

काँग्रेस बरी कि भाजपा हा वेगळा वादाचा मुद्दा होऊ शकतो ( मी व्यक्तीशः नेत्याला महत्व देतो, पार्टी दुय्यम. माझ्यासाठी शरद पवार ऑल टाईम फेव्हरेट. पण हे माझं वैयक्तीक मत झालं). पण कृषी कायद्या संदर्भात बघायचं झालं तर आंदोलकांची भुमीका मांडायला राकेश टिकैत प्रातीनीधीक स्वरुपात कन्सीडर केल्या जाऊ शकतात. मी त्यांची एबीपी माझा कट्टा वर मुलाखत बघितली.. आणि हे आंदोलन निव्वळ एका काल्पनीक आणि इल्लोजीकल भितीवर आधारीत आहे असं माझं मत बनलं. त्यानंतर अनेकांच्या मुलाखती बघितल्या.. कुठलंही काँक्रीट कारण दिसलं नाहि. तेंव्हा या बाबतीत माझ्यापुरतं मत सरकारच्या बाजुने. मतभेदांचं स्वागत आहेच. पण तुम्ही देखील, भांडवलदार शेतकर्‍यांच्या जमिनी घशात घालतील, साठेबाजी करुन भाव वाढवतील असल्या अनावष्यक भितीपलिकडे या आंदोलनात काय तथ्य आहे हे सांगु शकता का?

राहिला मुद्दा मोदिंच्या वक्तव्यांचा... मोदि पोलिटीकली कितीही करेक्ट बोलले असतील तरी त्यांचा रोख भारतीय वंशाच्या लोकांना सायलेण्ट मेसेज देणं हाच होता हे उघड आहे. (मोदिंनी वर्तमान निवडणुकीसाठी अबकी बार ट्रंप सरकार म्हटलं नव्हतं तर मागील वेळी ट्रंप निवडुन आले तेंव्हा भारतात अशी प्रतिक्रीय उमटली होती, असं त्यांचं स्टेटमेण्ट होतं). आणि ते करणं फारसं अयोग्य नव्हतं, कारण ओबामा वगैरे अमेरीकी राष्ट्राध्यक्षांनी भारतात येऊन भारताला धर्मनिरपक्षतेची अक्कल शिकयावचा अगोचरपणा केला होता. राजकारणी लोक्स राजकारण खेळत असतात. दुसर्‍या देशाच्या राजकारणाला आपापल्या पद्धतीने प्रभावीत करत असतात. कधि बोलुन, कधि गप्प बसुन.

असो. मुद्दा असा, कि रेहाना वगैरे गणंगांची टोळी कधि गप्प बसणार नाहि. त्यांच्यासाठी हा खेळ आहे. आपल्याही बाजुने गणंगांनी शिमग करावा. तो हि खेळाचा भाग आहे.

गोंधळी's picture

4 Feb 2021 - 9:43 pm | गोंधळी

पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते निंदनीय आहे.. +११११.

पंजाब-हरीयाणा मधिल वास्तव परीस्थिती या बद्दल मला ठोस अशी माहिती नाही. या कायद्यातील काही तर्तुदी महाराष्ट्रात २००६ मध्येच करण्यात आलेल्या आहेत.
पण काही तरतुदी (उदा. शेतकर्यांना करारा संबंधी न्यायालयात जाता येणार नाही.) शेतकर्यांच्या विरोधातील वाटतात. या कायद्याचा काय परीणाम होईल हे मी शेतकरी नसल्याने बोलणे चुकीचे ठरेल.

पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते. सध्या जे काहि चालु आहे खीळे वगैरे व १५ तारखेला जो काही गोंधळ घातला गेला त्यामुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे असे वाटते. त्यामुळेच बाहेरुन टिका होत आहे व याला सरकार जबाबदार आहे कारण ते चुकीच्या पध्दतीने आंदोलन हाताळत आहे.

भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा.
पण यात मोदींचा दोष नसुन भारतीय जनतेचा आहे. त्यांनी भावनिक मूर्ख होण्याचे सोडुन जागरुक रहाव. जे बरोबर आहे त्याला बरोबर पण जे चुक आहे त्याला चुकच म्हणावे.

मुद्देसूद आणि मनातले बोलला. मला इतक्या चांगल्या पद्धतीने मांडता आले नव्हते माझे मत.

बाप्पू's picture

4 Feb 2021 - 11:14 pm | बाप्पू

भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा.
पण यात मोदींचा दोष नसुन भारतीय जनतेचा आहे. त्यांनी भावनिक मूर्ख होण्याचे सोडुन जागरुक रहाव. जे बरोबर आहे त्याला बरोबर पण जे चुक आहे त्याला चुकच म्हणावे.

हे सगळं तत्वज्ञान दुसऱ्या बाजूला पण apply होते का?? कारण अश्या प्रकारची उदाहरणे द्यायची झाली तर एका प्रतिसादात सगळ्या लोकांची नावे आणि त्यांचा घटनाक्रम ( ट्विट, भाषण वगैरे ) मावणार नाहीत. एवढं टायपायला मला आत्ता वेळ नाहीये पण आपला आग्रह असल्यास मी कमीत कमी 20-25 उदाहरणे देऊ शकेल.. ती उदाहरणं तुम्ही भावनिक आवाहन म्हणणार नाही.. ते तुमच्या भाषेत प्रॅक्टिकल बोलणे किंवा फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन असणार..

कारण मोदी आणि BJP साठीच हे सगळे लॉजिक आहे.. आणि बाकींच्यांच्या बाबतीत फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन. उदा. जय श्री राम म्हणले कि कम्युनल आणि अल्लाह हूं अकबर सेकुलर.. rss आतंकवादी पण सिमी, लष्कर वगैरे भरकटलेली धार्मिक संस्था.. पिक्चर मध्ये शंकराला पाळताना, घाबरताना आणि लघवी करताना दाखवणं म्हणजे कलानिर्मिती स्वातंत्र्य.. नग्न चित्रे काढून प्रसिद्ध करणे हे पण कलानिर्मिती स्वातंत्र्य पण फक्त कार्टून छापणे हे भावना दुखावण्याचे षडयंत्र..
इकडच्या बाजूंच्यांनी विरोध केला कि असहिष्णू म्हणून हिणवायचे त्यांच्या रंगाचा आतंकवाद असा जावईशोध लावायचा.. पण तिकडून गळा कापला तरी ते त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य..

हे आणि असे मुद्दे एखाद्याने उचलले कि लगेच तुम्ही त्याला BJP चा एजेंट आणि साजस्वास्थ्य बिघडवणारा.. कम्युनल.. लोकांना भावनिक आवाहन करून मतं मिळवण्यासाठी चाललेला आटापिटा अश्या उपमा द्यायच्या.. कितपत बरोबर आहे हो??

  • काही गोष्टी वरवर भावनिक वाटतं असल्या तरी लॉंगटर्म मध्ये त्याचे भयानक परिणाम असतात. अश्या गोष्टी भावनिक किंवा भोळेभाबडया लोकांना फसवण्यासाठी नसून येणाऱ्या पिढीसाठी असतात. पटत नसेल तर जगाचा इतिहास पुन्हा वाचा. गोष्टी काही 1-2 वर्षे किंवा 1-2 दशकात घडत नसतात.. असले बदल हे स्लो पॉयसनिंग प्रमाणे काम करतात व रिजल्ट 2-3 पिढ्यानंतर दिसतात.

.या सर्वाचा शीख आणि दलाल आंदोलनाशी डायरेक्ट संबंध नाहीये पण
तुम्ही BJP च्या आणि सरकारच्या प्रत्येक गोष्टीला भावनिक आवाहन आणि मतं मिळवण्यासाठी चाललेली भावनिक खेळी असा जो काही गैर समज करून घेताय.. त्यामुळे इतके लिहिले.

तुम्ही काहीही बोलला तरी ते लोकशाही आणि अगदी 100 टक्के खरं आणि प्रॅक्टिकल... पण मोदी किंवा सरकार समर्थनार्थ काही केले के लगेच भावनिक आवाहन, भोळेपणा., प्रतिमा निर्मिती वगैरे वगैरे..

कायच्या काय लॉजिक..

हो हे लॉजिक दोन्हीकडील बाजूला लागू होते..
मुद्दा सचिन ने किंवा इतरांनी मत मांडू नये हा नाही..
मुद्दा हा आहे कि ७० दिवस काही न म्हणता एकाच वेळेस सगळे जवळ जवळ सेम ट्वीट करत आहेत.. त्यामुळे सचिनच काय इतर लोकांवर हि विश्वास ठेवता येत नाही..आणि हे जाणून बुजून केले जात आहे.. हे न कळण्यांइतपत कोणी लहान नाही..

बाकी दुसऱ्या देशात डंका वाजतोय म्हणणारे काही दिवसात दुसऱ्या देशाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये इथपर्यंत आलेत..
पुढील काही वर्षांनी, भारत हा धार्मिक तेढ निर्माण झाल्याने बाहेरील देशातील लोक इकडे पर्यटना ला येण्यास हि कमीच करतील आणि याला सर्वस्वी आताचे सरकार जबाबदार आहे..

भारताची इमेज कधीच बदनाम केलीये यांनी पण ते कळण्यास हि वेळच लागेल...

आणि bjp च्या कमजोर अर्थनितीचा पुढील काही वर्षानंतर नक्कीच परिणाम दिसून येईल हे मला वाटते आहे...

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 11:19 pm | श्रीगुरुजी

पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते. सध्या जे काहि चालु आहे खीळे वगैरे व १५ तारखेला जो काही गोंधळ घातला गेला त्यामुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे असे वाटते. त्यामुळेच बाहेरुन टिका होत आहे व याला सरकार जबाबदार आहे कारण ते चुकीच्या पध्दतीने आंदोलन हाताळत आहे.

बरं मग नक्की काय करणे योग्य होते? टिकैतने ६ फेब्रुवारीला बंद, चक्का जाम वगैरे करण्याचे जाहीर केलंय. २६ जानेवारीला या लोकांनी दिवसभर जसा धुडगूस घातला तसाही धुडगूस घालण्याची परवानगी द्यायला हवी होती का? जर तसा धुडगूस टाळायचा असेल तर काय करायला हवे?

भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा.

एकट्या सचिनने टीका केलेली नाही. अजय देवगण, सुनील शेट्टी, करण जोहर, चेतन भगत, अक्षयकुमार, सुरेश रैना, शिखर धवन, कोहली, कुंबळे, कैलाश खेर, अजिंक्य रहाणे, पीक्षटी उषा, रोहीत शर्मा, हार्दिक पंड्या अशा अनेक क्रिकेट खेळाडू व चित्रपटकर्मींनी असेच केले आहे. या सर्वांना असे करण्यास भाग पाडले गेले?

हे फक्त काही लोकांचे पटेल.बाकी लोक खूप हुशार आहेत त्यांना नक्की काय चालले आहे ,सर्व खेळाडू अचानक कसे जागे झाले ह्याची उत्तरं माहीत असतात.
जनतेला एवढे बेवकुब समजू नका.bjp samarthak nahi असे सांगायचे आणि bjp चीच चुकीची बाजू उचलून धरायची अशा
लोकांना जनता चांगलीच ओळखते.

गोंधळी's picture

5 Feb 2021 - 1:37 pm | गोंधळी

वरती चुकुन २६ तारखेचा उल्लेख १५ असा झाला आहे.

बाप्पूजी
काही गोष्टी वरवर भावनिक वाटतं असल्या तरी लॉंगटर्म मध्ये त्याचे भयानक परिणाम असतात. अश्या गोष्टी भावनिक किंवा भोळेभाबडया लोकांना फसवण्यासाठी नसून येणाऱ्या पिढीसाठी असतात. पटत नसेल तर जगाचा इतिहास पुन्हा वाचा. गोष्टी काही 1-2 वर्षे किंवा 1-2 दशकात घडत नसतात.. असले बदल हे स्लो पॉयसनिंग प्रमाणे काम करतात व रिजल्ट 2-3 पिढ्यानंतर दिसतात.

समजल नाही.

तुम्ही काहीही बोलला तरी ते लोकशाही आणि अगदी 100 टक्के खरं आणि प्रॅक्टिकल... पण मोदी किंवा सरकार समर्थनार्थ काही केले के लगेच भावनिक आवाहन, भोळेपणा., प्रतिमा निर्मिती वगैरे वगैरे..

मी फक्त माझ मत लिहित आहे. मी बरोबरच आहे असही माझ म्हणन नाही आहे तर माझ मतही चुकिचे असु शकते. पण ते योग्यरित्या,मुद्देसुद पटवुन दिले तर माझ मत बद्लुही शकत.

श्रीगुरुजी
बरं मग नक्की काय करणे योग्य होते? टिकैतने ६ फेब्रुवारीला बंद, चक्का जाम वगैरे करण्याचे जाहीर केलंय. २६ जानेवारीला या लोकांनी दिवसभर जसा धुडगूस घातला तसाही धुडगूस घालण्याची परवानगी द्यायला हवी होती का? जर तसा धुडगूस टाळायचा असेल तर काय करायला हवे?

ज्यांनी धुडगूस घातला त्यांना निसंशय जेल मध्येच टाकल पाहिजे. पण नक्की धुडगूस घातला कोणी ? हाच तर मुद्दा आहे.

मला वाटत सर्वांनी कुठ्ल्याही पक्षाचा कार्यकर्ता/समर्थक म्हणुन न पाहता तठस्थपणे भारताचा नागरिक म्हणुन या गोष्टींकडे पहायला हव.

मोदींबद्द्ल माझा आक्षेप हा आहे की ते खुप खोट बोलतात व दिखाउ पणा करतात.(या बद्दल बहुतेक लोक सहमत असतील) याची मुळात गरज काय आहे?

Rajesh188's picture

4 Feb 2021 - 11:45 pm | Rajesh188

तुम्ही अगदी योग्य लीहले आहे.
भावनिक परिस्थिती निर्माण करून सत्य दडपयच हेच सध्या चालू आहे.
देशद्रोही,अतिरेकी,खलिस्तानी हे शब्द ह्या वर्षी इतक्या वेळा टीव्ही न्यूज वर ऐकले तेवढे पूर्ण आयुष्य त पण ऐकले नाहीत.
ह्यांच्या लॉजिक च विचार केला तर भारतातील प्रतेक पाचवा व्यक्ती ह्यांच्या लॉजिक प्रमाणे अतिरेकी,देशद्रोही,खलिस्तानी आहे.(,आकडेवारी मागे पुढे होवू शक्य 5 हाच आकडा घेवून बसू नये)

आग्या१९९०'s picture

5 Feb 2021 - 12:32 am | आग्या१९९०

शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी किंवा देशद्रोही असतील तर दोन महीने शांततेने आंदोलन कशाला केले असते? पहिल्या दिवसापासून धिंगाणा घातला असता की. २६ जानेवारीची वाट कशाला बघत बसले असते?

अतिरेकी रस्ता रोको,किंवा आंदोलन करत नाहीत सू नियोजित हल्ले करतात.
पोलिस च्या लठ्या आणि अश्रू धुराचा मारा ते सहन करत नाहीत.

भंकस बाबा's picture

5 Feb 2021 - 8:23 am | भंकस बाबा

तुमची अतिरेकी या शब्दाची संकल्पना ही हातात मशिनगन घेऊन लोंकाचे मुडदे पाडणे अशी आहे. पण मी ती वेगळी करतो. धर्माच्या नावाने राजकारण करणे, एका धर्माला ग्लोरिफाय करून दुसऱ्या धर्माच्या नावाने बोंब मारणे, आपल्या धर्माला श्रेष्ठ ठरवण्यासाठी दुसऱ्या धर्माची निंदानालस्ती करणे, बिनबुडाची आंदोलने करून राजकीय वा आर्थिक वा सामाजिक पोळी भाजणे या सर्व गोष्टी अतिरेकी करतात. अमीर खान, अरुंधती रॉय, चित्रकार हुसेन, अमिताभ बच्चंन, झाकीर नाईक हे सर्व अतिरेकी आहेत, आणि ते मुडदे पाडणाऱ्यापेक्षा खतरनाक आहेत. कारण या लोंकाना फॉलो करणारी असंख्य मेंढरे असतात.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 8:43 am | मुक्त विहारि

सहमत आहे ...

व्यक्तिपूजा केली की, राष्ट्र लयाला जाते, ही जगरहाटी आहे...

आणि सध्या मोदी या व्यक्तीची पूजा/ भक्ती केली जातेय, त्यामुळे साहजिकच राष्ट्र लयाला जातेय या तुमच्या म्हणण्याला दुजोरा देतोय...

रात्रीचे चांदणे's picture

5 Feb 2021 - 9:35 am | रात्रीचे चांदणे

बहुसंख्य जनतेला हे वाटत नाही. बिहार मध्ये हेच सिद्ध झालं आहे. पश्चिम बंगाल मध्ये पण bjp वाढण्याची शक्यता आहे. Bjp ने सुरवातीच्या चुका सुधारून आंदोलन योग्य रित्या हाताळले आहे. पण काही सेलिब्रेटी च्या विरोधी tweet ला उत्तर देऊन सरकार ने त्यांचे महत्व वाढवू नये.

प्रदीप's picture

5 Feb 2021 - 11:11 am | प्रदीप

पण काही सेलिब्रेटी च्या विरोधी tweet ला उत्तर देऊन सरकार ने त्यांचे महत्व वाढवू नये.

ह्या बातमीत, सरकारने असे महत्व देऊन तातडीने जाहीर भाष्य का केले त्याविषयी काही माहिती दिलेली आहे.

Sources said the view in New Delhi is that the government will not take comments from “state actors” or “non-state actors” lying down, especially in the highly amplified social media zone.

While it was not the norm to respond to private individuals and the MEA departed from that norm by reacting to tweets from Rihanna and Thunberg, sources said the view within the government is that “diplomacy has to be dynamic” and it must take into account “social media realities, where influencers tend to shape the opinions of many”.

“Past governments did not deal with such a highly active social media zone, and it is important for the government to respond to criticism, irrespective of the source, government or non-government,” a senior government functionary said.

सुबोध खरे's picture

6 Feb 2021 - 11:10 am | सुबोध खरे

अतिरेकी या शब्दाची संकल्पना

मुळात अतिरेकी आणि दहशतवादी यातील फरकच लोक समजून घेत नाहीत.

शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी किंवा देशद्रोही असतील तर दोन महीने शांततेने आंदोलन कशाला केले असते? पहिल्या दिवसापासून धिंगाणा घातला असता की. २६ जानेवारीची वाट कशाला बघत बसले असते?

निव्वळ हास्यस्पद आहे. उदाहरण देतो म्हणजे हास्यस्पद का ते समजेल.
पाणी गरम व्हायला लागले कि डायरेक्ट उकळत नाही.. 100 डिग्री तापमान झाले कि उकळते.. पाण्याला उकळायचे असते तर 50-60 डिग्री लाच उकळले असते. 100.ची वाट कशाला बघत बसले असते ... :) :)

असो. आडमुठे धोरण कोण घेतेय ते जनता पाहते आहे. चर्चेच्या इतक्या फेऱ्या घेऊन.. कायद्यामध्ये बदल करण्यासाठी सकारत्मक पावले उचलून सरकारने आपली नियत आणि नैतिकता स्प्ष्ट केली आहे. शिखांनी आणि दलालांनी अविरत नुकसान आणि तोडफोड करून देखील सरकारने आजवर संयमी धोरण अवलंबले आहे. हे सर्वसामान्य जनता बघतेय आणि जाणतेय.
शेतकरी कायद्याला विरोध शेतकऱयांचा नसून दलाल आणि शीख लोकांचा आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. जे लोकं आंदोलन करतायेत त्यांना कायद्याची काडीचीही माहिती नाही.. त्यांची डोकी भडकावून त्यांना तिथे आणले गेले आहे फक्त गर्दी वाढवण्यासाठी. खरा शेतकरी कामधंदा सोडून इतके दिवस बोंबलत फिरू शकत नाही. हे सर्व मी स्वतः देखील एक शेतकरी आहे म्हणून सांगतोय..लहानपणापासून शेती पाहतोय आणि आता गेले 3-4 वर्षे करतोय देखील. ( स्पष्टीकरण एवढ्यासाठी दिले कारण पुन्हा कुणी विचारायला नको कि तुम्हाला शेतीतील काय कळत..) या आंदोलनामागील शक्ती वेगळ्या आहेत आणि त्यांना व्यवस्थित फंडिंग होत आहे..
एवढेच बोलून मी शांत बसतो.

मला वाटतं शेतकरी कायदा आणि त्याचे फायदे तोटे हा विषय आणि चर्चा कधीच बाजूला पडली असून आता फक्त Right vs ( लेफ्ट + लिब्रान्दु + शीख + खलिस्तानी + झुंडशाही + अँटी हिंदू + दलाल ) एवढाच विषय राहिला आहे..

"Right" is always right.. and "Left" can never be right.

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 7:28 am | श्रीगुरुजी

+ १

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 7:37 am | मुक्त विहारि

+2

माझ्तामते, जर ग्रेटा चे ते प्लेबूक चव्हाट्यावर आले नसते तर सेलेब्रिटी व्यक्त होण्याला काहीच अर्थ नव्हता. रेहाना आणि मिया बोलली म्हणून जर सेलेब्रिटींना उतरवले असे वाटत असेल तर तो भ्रम आहे असे समजा. इतके सेलेब्रिटी सरकारकडे सज्जड पुरावा असल्याशिवाय, किंवा तशीच केस असल्याशिवाय समर्थन करायला उतरणार नाहीत.

मुख्य म्हणजे यातल्या कोणीही रेहाना ला उत्तर म्हणून ट्वीत केलेले पण नाही. अर्थात सरकारने सांगितल्याशिवाय त्यांनी ट्वीत केलेले नाही यात पण शंका नाही, पण या ट्वीटमुळे रेहानाच्या टवीटमधली हवा काढली गेली.. आता रेहाना आणि ग्रेटा (ती तर गेलीच कामातून, म्हणजे तिची विश्वासार्हताच संपली एकदम, पुर्वी तरी काय होती म्हणा, पन तो भाग वेगळा) यांच्या ट्वीटचा मार्केटिंगला वापर करता येणे बंद झाले. कारण मग सचिनच्या टवीटचे काय असा प्रश्न उभा राहू लागला. दउसरी अशी एक पाचर मारली गेली की आता कोणताच सेलेब्रिटी आंदोलनासाठी आणून हवा करणे अशक्य झाले.
तिसरी गोष्ट म्हणजे जस्टिस फोर पीस चे कनेक्शन उघडे पडले. सचिनसाऱह्यांनी केलेला गदारोळ पाहिल्याव माझ्यासारख्या अनेकांनी नेमके काय झाले आहे बुवा हे बघण्यासाठी बातम्या शोधून ग्रेटा चा उघडा पडलेला XXभाग बघितला, त्यामुळे सरकारला जो संदेश जिथे पोचवायचा होता तिथे बरोबर पोचला.

एक नक्की सांगतो, शेतकरी आंदोलन वगैरे विसरून जा, यामध्ये शोबाजीपेक्षा खूप मोठे कुरघोडीचे राजकारण आहे. मी स्वतः शेतकरी आहे, आणि कृषी कायदे अजिबात वाईत नाहीत याची मला खात्री आहे. मि मागचि १० वर्षे स्वतःच रेटेल करतो.

पण काही तरतुदी (उदा. शेतकर्यांना करारा संबंधी न्यायालयात जाता येणार नाही.) शेतकर्यांच्या विरोधातील वाटतात.

==> ही तरतूद मला पण विरोधी वाटली होती, पण नतर लक्श्यात आले कि त्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली आहे, आणि मला वाटते आजतरी भारतातला असा कोणताही विषय नाही कि जो उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात नेता येत नाही.. म्हणजे स्थानिक पातळीवर लवाद्, आणि मग न्यायालये अशी योजना आहे, यात तसे वाईट काहीच दिसत नाही.

पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते.

सराकारने १८ महिने कायदे स्थगित ठेवायची तयारी दाखवली, चर्चेच्या जवळजवळ १० फेर्‍या केल्या, पण दत्ता सामंतसारखे हे देखील पुर्ण आडमुठेपणा करत बसले आहेत.. अश्या आंदोलनांचे पुढे काय होते हा इतिहास आहे.

एक सांगतो बघा, २०१४ नंतर गुजरातमध्ये हार्दिक पटेलने एक मोठे आंदोलन उभे केले होते, तेव्हा पण अशीच काहीतरी कारणे दिली होती, सरकारने तेव्हा त्याला ते आंदोलन पुर्णपणे करू दिले होते, हे सरकार आपल्या सवडीने प्रतिहल्ला करते. सरकारणे वेळ मिळाल्यावर बरोबर हल्ला केला. आज हार्दिक पटेल कोणाला माहीत तरी आहे का? आणि ते पटेल आरक्षणचे काय झाले ते तरी?
आंदोलन यशस्वी करायचे असेल तर काय मागण्या करायच्या, कधी माघार घयायची हे पण कळले पाहिजे. ते आण्णा हजारेंना आणि केजरीवालला बरोबर कळते, म्हणून ते यशस्वी आंदोलने उभी करतात. रामदेवबाबांना कळले नाही,मग त्यांचा पोपट झाला.. एक यशस्वी राजकारणी होण्यासाठी अशी मोठी आंदोलने देखील यशस्वीपणे उभी करावी लागतात.. तुम्ही काँग्रेसी आहात, जरा तुमच्या नेत्यांना हे पण समजावून सांगा असे सुचवेन.

आग्या१९९०'s picture

4 Feb 2021 - 9:08 pm | आग्या१९९०

तर कमीतकमी पश्चिम बंगाल मधील शेतकऱ्यांना तरी नवीन कायद्याची काहीही अडचण नाही आस म्हणू शकतो.

बरोबर आहे. उद्या सरकारने सीएनजीचे दर वाढवून पेट्रोल एवढे ठेवले तर कोणते इंधन वापरणारे रिक्षावाले बोंबा मारतील?

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बहुतेक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड होईल. त्यातच थोरल्या पवार साहेबांनी आता विधानसभा अध्यक्षपद हे "व्हॅकन्सी" असलेले पद आहे व त्यावर चर्चा होऊन मगच पुढील अध्यक्ष निवडला जाईल असे नेहमीप्रमाणे वेगवेगळे अर्थ निघणारे विधान केले. त्याचबरोबर आता काँग्रेस मधून अजून एक उपमुख्यमंत्री होईल असेही काही वर्तमानपत्रे अंदाज करत आहे. खरं तर हे सरकार तीन चाकी रिक्षेप्रमाणे असले तरी त्याची दोन चाके (शिवसेना व राष्ट्रवादी) पुढे आहेत आणि एक चाक (काँग्रेस) मागे आहे आणि पुढील दोन चाके मागील चाकाला आपल्या मनाप्रमाणे वळवतात असा अर्थ काढायचा की मग पुढील चाक म्हणजे राष्ट्रवादी व मागील दोन चाके म्हणजे काँग्रेस व शिवसेना असा अर्थ काढायचा त्याबद्द्ल संभ्रम वाटतो.
हे सरकार मधेच पडेल अथवा पडणार ही नाही मात्र जर यदाकदाचित ते पडलेच तर त्या दोषाचा धनी कोण असेल ? हे बघणे रोचक ठरेल.


टीप : हे सरकार पडावे किंवा स्थिर रहावे याबाबतीत माझे मत तटस्थ आहे. अर्थात आपल्या मताला निवडणूकीपुर्वी विचारतो कोण म्हणा :)

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 7:36 am | मुक्त विहारि

हेच सरकार पुढील 4 वर्षे चालणार ...

पुढच्या निवडणूकीत, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या बरोबर फरफटत जाणार ... ज्या ज्या ठिकाणी, भाजपचा उमेदवार येण्याची शक्यता आहे, त्या त्या ठिकाणी, शिवसेनेला आपला उमेदवार उभा करण्यासाठी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेवर दबाव आणणार...

जी गत मनसेची, नाशिक मध्ये झाली, तशीच गत, शिवसानेची होण्याची शक्यता आहे...

सध्या तरी, शिवसेनेचे हिंदूत्वही गेले आणि मराठी प्रेम पण गेले ...

काका जिंदाबाद ...

१०० दिवसांत पडणारे सरकार पडले नाही.. वर्षात हि पडले नाही...
त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे..

पुढच्या निवडणुकीसाठी हे सरकार, आपण काय कामे केली, काय प्रगती केली, कोविड विरुद्ध कसे लढले.. आणि अशी असंख्य कामे पुढे घेऊन आले तर मतदार मते देतील..

पण प्रगती वर न बोलता २०१९ ला ज्या पद्धतीने त्यावेळेस चे सरकार सामोरं गेले तसेच हे समोर आले तर यांची पण जागा मतदारांनी दाखवावी...

पक्ष कोणता यावर मते देऊ नयेत...

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 9:51 am | मुक्त विहारि

नुसतीच अधोगती....

अर्थात, अजान स्पर्धा आणि केम छो वरली, म्हणत, मतांची भीक मागणार्या शिवसेने कडून अपेक्षा नाहीच ...

मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थामुळे, हिंदुत्व पण गेले आणि मराठी प्रेम पण गेले ...

जोपर्यंत, डोळ्यांवर कातडे ओढलेले, मतदार आहेत, तोपर्य॔त शिवसेना आहे...

आमच्या सारख्या शिवसैनिकांनी, 1993 मध्येच शिवसेनेला, जय महाराष्ट्र म्हटले... मला आज देखील, शिवसेनेला सोडल्याचा पश्र्चात्ताप होत नाही ...

बरोबर आहे.. प्रगती नाही तर मते नाहीत,

यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस कोणीही सुटू शकत नाही..

पण एका पक्षाचे कातडे काढून टाकले तर दुसऱ्या पक्षाचे चढवले तर तेच भारी हे वाटू शकते, कदाचीत या कातडीचा पण उबग भविष्यात येऊ शकतो..
त्यामुळे जे योग्य ते योग्य.. जे चूक ते चूक...

बाकी २०१९ विधान सभेला मी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना वोट देणार होतो, पण ज्या पद्धतीने भाजपा निवडणूकीला सामोरे गेली.. प्रगती च्या गोष्टी न करता, काँग्रेस, काश्मिर या मुद्द्यावर बोलत राहिली.. त्यामुळे मी भाजपा विरोधात मतदान केले...( ते हि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ला केले नव्हतेच )

ज्यांना २०१४ च्या कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा ह्या जाहिर२०१४२०१९ ला delete कराव्या लागल्या उत्तरा अभावी ऱत्यांना मी वोट का द्यावे?

राहता राहिला पुढच्या निवडणूकीचा प्रश्न, जेंव्हा निवडणूक येईल तेंव्हा त्या ५ वर्षाचे कामकाज बघूच..

पण जे कुठल्या तरी पक्षाची, नेत्याची वेसण कायम नाकात घालून फिरतात आणि दुसऱ्याला व्यक्तिपूजा, नेत्यांची पूजा करता म्हणतात असे लोक कधीच आपली ओढलेली कातडी सोडण्यास तयार नसतात

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 11:05 am | मुक्त विहारि

आता ह्या, कातडीला आमचा नाईलाज आहे ...

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 1:48 pm | श्रीगुरुजी

त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे..

सहमत आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडले तरच हे सरकार पडेल. नंतर त्यापैकी कोणी भाजपला पाठिंबा दिला तरच भाजपचे सरकार येईल. एकंदरीत दोन्ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप कमी आहे.

पुढच्या पिढीला, राजकीय पटावर जिवंत ठेवायचे असेल तर, खेळाडू कमी करावे लागतील ...जेम्स बाॅन्डचा, कॅसिनो राॅयल, हा सिनेमा आठवा ...

शिवसेनेचे दोन हुकमी पत्ते होते ... मराठी आणि हिंदूत्व .... काकांनी, हे दोन्ही पत्ते उघडे पाडले ....

वंशपरापरागत, शिवसेनेला मत देणारा मतदार, हळूहळू बाहेर पडत आहे...डोंबिवलीत तरी हीच परिस्थिति आहे... आणि जे जे डोंबिवली येथे, ते ते जगात ...

मुख्यमंत्रीपदाला, अपयशाची काळी किनार नेहमीच असते .... आता ही किनार कितपत झाकायची आणि कितपत उघडी ठेवायचे? हे काकाच ठरवणार ....

मोदी उगाच, काकांना गुरूस्थानी मानत नाहीत ....

मोदी ह्याच चाली, भारतच्या भल्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरतात. तैवान प्रश्र्न जिवंत ठेवण्यात, मोदींचा हात असणारच...चीन उगाच मोदींच्या मागे लागलेला नाही....

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 2:20 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेला हाताळणे हे भाजपला हाताळण्यापेक्षा खूप जास्त सोपे आहे, हे पवार जाणतात. त्यामुळे पवार सेनेला सोडून भाजपबरोबर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसरे कारण म्हणजे भाजपबरोबर गेले तर सध्या मिळालेली अर्थ, गृह, रस्तेबांधणी अशी काही महत्त्वाची मंत्रीपदे सोडावी लागतील. पवार तोटा करून घेणार नाहीत.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 4:53 pm | मुक्त विहारि

काका आधी बोलणी करायला दिल्लीत गेले होते ...

पण, वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या असाव्यात ....

काकांनी, ह्या अक्षता आणि मुख्यमंत्री पद, शिवसेनेला देऊन, अर्थपूर्ण बोलणी केली असावीत, ....

म्हणायला, मुख्यमंत्री शिवसेनेचा पण, महत्वाची बरीचशी खाती, शिवसेनेकडे नाहीत ....

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2021 - 5:14 pm | श्रीगुरुजी

बरोबर. प्रमुख खाती हातात असताना व हाताळण्यास सोपा माणूस मुख्यमंत्री असताना काका हे सरकार पाडणार नाहीत.