Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 02/02/2021 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे. म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.

वाचने 62195
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

छान रे चंसुकु अर्थसंकल्प आला आणि शेयर बाजार चांगलाच वधारला.ही तेजी आता किती टिकते ते बघुया.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अजून काही दिवस मार्केट असं तराटलेलंच राहील वाटतं. शेअरमार्केटात कोणी मस्त फार्मात, तर काही लटकले असतील. बजेट, निवडणुका, आणि थोडं निमित्तच लागतं, म्हणे मार्केटला असे झोके घ्यायला, नव्या लोकांनी अशावेळी अभ्यास केला पाहिजे. अर्थात इश्क है तो रिस्क है. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनीकंट्रोल.कॉम साईट वरती प्रत्येक शेअर साठी एक फोरम असतो. असं काहीतरी आपण अर्थक्षेत्र या विभागात केलं पाहिजे. मात्र एक धागा एका शेअरसाठी हा नियम प्रशासनाने केला पाहिजे. मग मात्र त्या शेअरची इत्यंभूत माहिती वर्षानुवर्षे जमा होत राहील. मग मात्र तेवढ्यासाठी मिसळपावचे सभासद होण्याची इच्छा मराठी लोकांमध्ये व्हायला लागेल. शेअर बाजारात रस असलेले व सक्रीय असलेले असे जे सभासद आहेत, त्यांची इच्छा असल्यास व आवडत असल्यास,त्यांनी त्यांच्या आवडत्या शेअर्सचा धागा उघडावा. या शेअर्सच्या संबंधात कोणी फंडामेंटल अभ्यास करत असेल, कोणी टेक्निकली अभ्यास करत असेल, कोणी बातम्यांवर लक्ष ठेवत असेल, कोणी राजकारणावरती लक्ष ठेवत असेल, कोणी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती लक्ष ठेवत असेल. असे अभ्यासू सभासद आपली मते त्या त्या धाग्यावर मांडू शकतील. मात्र ज्या शेअर साठी धागा उघडण्यात आला आहे त्याच शेअर संबंधात प्रतिसाद आले पाहिजे. मात्र तुलनात्मक अभ्यासासाठी इतर शेअर संबंधातील माहिती मांडावयास हरकत नसावी. एक वेगळा धागा काढून ही सूचना करायची खूप इच्छा होत आहे.

In reply to by शाम भागवत

चांगली सूचना, आवडली. फक्त आपल्याकडे धाग्यांचा खफ सहज होतो. अर्थात् मिपाची तीच खासियत आणि ताकदही आहे म्हणा! :-)

In reply to by मुक्त विहारि

कैच्याकै लेख असतात पण प्रतिसादांमुळे "वाचतात " नाहीतर संपादक मंडळींनी कत्तल केली असती

In reply to by सामान्यनागरिक

मिपा इतकी लोकशाही आणि मनमोकळे वातावरण, इतर कुठल्याही साईटवर नाही.... योग्य भाषेत, संयम ठेवून, लेख लिहिला असेल तर, काहीच अडचण येत नाही... वैयक्तिक टीका टिप्पणी आणि ती देखील, अतिशय खालच्या स्तरावर केली असेल, तर आणि तरच, प्रतिसाद उडवले जातात... फारच अति केले तरच, सदस्यत्व रद्द केले जाते आणि ते देखील आधी सुचना देऊन .... मिपा ते मिपा ...इतर आंतरजालीय स्थळांपेक्षा, मिपा हे फार उजवे आहे ...

In reply to by शाम भागवत

मनीकंट्रोलवरील फोरममध्ये योग्य माहिती, तांत्रिक माहिती क्वचितच असते. फोरममध्ये बहुतांशी प्रतिसादक फक्त गॉसिप, अफवा व स्पेक्युलेशन करीत असतात.

In reply to by श्रीगुरुजी

निरीक्षण बरोबर आहे. पण फक्त पैशासाठी जमलेली लोक असतात तीथे . कोणतेही तत्त्व, मित्र, भाषा, देशप्रेम,मराठी लोकांचे भले व्हावे ही इच्छा असं काहीही तिथे असत नाही. मिपाच तसं नाहीये असे मला वाटते. इथले सभासद ज्ञान वाटप करायला तयार असतात. त्यासाठी कष्ट घेतात. अभ्यास करतात. फक्त प्रशासनाला जरा लक्ष ठेवायला लागेल. या धाग्यांचे स्वरूप अभ्यासाचे रहावे, यासाठी कोणालाही धागा भरकटवू देता कामा नये. यासाठी काही जणांचे संपादक मंडळात नियुक्ती केली तरी चालेल. या अभ्यासपूर्ण चर्चा एकदाका पैसे मिळवून देणाऱ्या व्हायला लागल्या की, मग मात्र सर्व सक्रिय सभासद दर्जा टिकवण्यातबद्दल जागृत रहावयास लागतील. मात्र प्रशासकांनी याबाबत त्यांचे मत मांडल्याशिवाय पुढे जाण्यात काही अर्थ नाही. असो.

In reply to by शाम भागवत

चांगली सूचना. जर कोणी पुढाकार घेऊन धागा वगैरे काढल्यास त्यावर टेक्निकल अंगाने लिहायला आवडेल.

In reply to by शाम भागवत

योग्य.. मी स्वतः हा प्रयत्न करू इच्छितो.. पण वेळ खुपच कमी मिळतोय.. गेल्या आठ महिन्यात, fundamental and technical study ने दिड लाखाचे ४ लाख झालेत, ते हि intraday आणि options न करता. फक्त positional and long term मध्ये. २० - २२ जणांना शिकवले आहे.. त्यामुळे finance मध्ये पण नविन accounting /insurance /tax यात कंपनी टाकत आहे.. Share market नक्कीच web site वर पण लिहिल.. आणि येथे पण.. वेळ मात्र मिळाला पाहिजे.. कारण accenture मधले काम पण खुप्पच stress full झाले आहे...

आपल्याला त्रास देत नाहीत म्हणून त्यांची पाठराखण करायची असाच अर्थ निघेल बर्मा च्या लष्करी उठावाला पाठिंबा दिला तर. लोक नियुक्त सरकार उलथवून लावणे हा गंभीर प्रकार आहे , कोणताच शहाणा देश असल्या कृत्याचे समर्थन करणार नाही.

In reply to by Rajesh188

सहमत आहे. प्रत्येकाने साधनशुचिता पाळलीच पाहिजे. म्हणूनच तुम्ही नाही का ३००+ पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणार्‍या तथाकथित शेतकर्‍यांचे समर्थन करत आहात? नेहरूंनी पण नाही का हजारो लोकांना ठार मारणार्‍या चे गव्हेराचे दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी मुद्दामून स्वागत केले होते? साधनशुचिता पाळावी ही अशी. nehru

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इराणचा धर्मांध विकृत हुकूमशहा अयातुल्ला खोमेनी १९८६ मध्ये गचकल्यानंतर राजीव गांधींनी भारतात एक दिवसाचा सरकारी दुखवटा पाळला होता.

In reply to by श्रीगुरुजी

इराकचा अत्यंत क्रूर हुकूमशहा असलेल्या सद्दाम हुसेनला भारताने अनेक दशके पाठिंबा दिला होता. जग एखाद्या कोणत्याही देशातील घटनांंकडे नैतिकतेच्या चष्म्यातून कधीच पहात नाही. त्याकडे आपल्या देशाच्या हितसंबंधांच्या चष्म्यातूनच पाहिले जाते.

नव्या कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकार व शेतक-यातील रस्सीखेच सुरुच आहे. शेतक-यांनी ६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत देशभरातील सर्व राष्ट्रीय आणि राज्यमहामार्ग जाम करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, दिल्ली सीमेवर शेतक-यांचे जथ्थे पोहचत आहेत. दरम्यान दिल्लीत शेतक-यांना येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलीसही कडेकोट बंदोबस्त व्यवस्थेत गुंतले आहेत. खिळ्यांनी रस्ते अडविणे, भिंती उभारणे, अशी तजवीजही सुरु आहे. (बातमी संदर्भ) -दिलीप बिरुटे

In reply to by मुक्त विहारि

दूधाने तोंड भाजले की माणूस ताक सुद्धा फुंकुन पितो. २६ जानेवारीस आंदोलक पंजाबी दलालांनी पोलिसांना दिलेली सर्व आश्वासने धुडकावून वेगळ्या वेळी, वेगळ्या मार्गाने, सशस्त्र आंदोलन करून यथेच्छ दंगल व नुकसान करून धुडगूस घातल्याने आता पोलिस काळजी घेणारच.

In reply to by श्रीगुरुजी

रस्ता रोको, रेल्वे रोको, ही आंदोलने, करणेच चुकीचे आहे ... अशी आंदोलने करणार्यांवर, कायदेशीर कारवाई केली पाहिजे...

लोकांचा विरोध आहे कायद्याला आणि सरकार विरोध करणाऱ्या लोकावर बळाचा वापर करत आहे असा संदेश देशभर जाणे महत्त्वाचे आहे. मोर्चा दिल्लीत च पोचला पाहिजे असं काही नाही.

In reply to by Rajesh188

चांगल्या कायदा सुधारना संपूर्ण देशाचा पाठिंबा असून काही दुष्ट, भ्रष्ट आणि फुकटे लोक डाव्या विचारसरणीने प्रेरित होऊन हुल्लडबाजी आणि हिंसा करीत आहेत आणि कमालीच्या संयमाने भारत सरकारने त्यांना बोलण्यांत गुंतवून ठेवले आहे हे सत्य आहे.

In reply to by मुक्त विहारि

मुविकाका, दुव्यांबद्दल धन्यवाद. जर एक-दोन ओळीत दुव्याबद्दल किंचित माहिती सांगीतली आणि सोबत दुवा दिला, तर आणिक छान. गूगलच्या स्निपेट्स सारखं. :-)

https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/farmers-protes… ज्याअर्थी, परदेशी लोकांचा, आंदोलनाला पाठिंबा आहे, त्याअर्थी, मोदींनी पाचर योग्य ठिकाणी मारली आहे...

" अगली बार ट्रंप सरकार " असे बोललेलं सचिनला चालतं वाटतं. आपल्या माणसाला सुनावताना दातखीळ बसते.

In reply to by आग्या१९९०

तसेच भारतीयानी परदेशी चिवचिवाटाकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि मोदी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. छान झाले की भारतात अस्थिरता आणायचा डाव उघडा पडला.. सऱकार बोलणी करायला तयार आहे तरी आडमुठेपणा चालला होता कारण खर तर जगात भारताची वाइट प्रतिमा करायची होती. याना देश्द्रोही म्हणायचे नाही. केन्द्राचे बन्धन नको. राज्य स्तरावर मोकळिक हवी पण भुमिपुत्र मात्र बन्धनात..त्याला नाही द्यायची स्वतन्त्र निर्णय घ्यायची क्शमता... ते फसवले जातील म्हणुन कायमचे पन्गु करुन ठेवायच.. पण एकही विरोधक "होउदे बाजार खुला आता शेतकरी करतील राज्य" म्हणत नाहीत किवा सहकार तत्व वापर करुन मालाला बाजार कसा मिळवायचा सान्गत नाहीत....

In reply to by सुखीमाणूस

" अगली बार ट्रंप सरकार " असा प्रचार करणाऱ्याकडे अमेरीकी जनता पूर्णपणे दूर्लक्ष करू शकते कारण, असा बालीश प्रचार करणाऱ्याचा अध्यक्ष निवडणूकीवर काहीही प्रभाव पडणार नाही ह्याची त्यांना खात्री आहे . त्यांना स्वतःच्या निर्णयक्षमतेवर विश्वास आहे. आज सचिन काहीही बोलला तरी अमेरीकन कोण सचिन असाही प्रश्न विचारणार नाही. आपले उगाच नको त्या अमेरीकन सेलिब्रिटीला महत्व देऊन प्रसिद्धी देतात.

In reply to by आग्या१९९०

त्या मुळे अमेरिकन लोकांना सचिन कोण हे माहीत पण नसेल. एअरपोर्ट वर जसे शाहरुख ला नागडा करून चेक करतात तसा च सचिन ला पण नागडा करून च चेक करतील.

In reply to by Rajesh188

परत एकदा चुकीची माहिती तुम्ही घेऊन आलेला आहात. शाहरुख खानने एअरपोर्टवर नाव विचारले असता ' माय नेम इज खान अँड आय एम नॉट टेररिस्ट' असे तारे तोडले होते. हे त्याच्या माय नेम इज खान या टुकार चित्रपटाचे प्रमोशन होते. नशीब अमेरिकेने फक्त कपडे काढले , पार्श्वभागावर पोकळ बांबूचे फटके नाही मारले.

In reply to by आग्या१९९०

तसं बोललेलं कोणा अमेरिकन सचिनला (किंवा कोणाही अमेरिकन माणसाला) चाललं नसतं तर त्याने सुनावलं असतं ना....भारतीय सचिनला ते चालत असेल तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?

In reply to by सॅगी

मुळात ७५ मिनिटातील भाषणात बोललेल्या या चार शब्दात काय चुकीचे होते? एकाही अमेरिकनाने त्यावर आक्षेप घेतलेला नाही. मग भारतात काही जणांना पोटदुखी का आहे?

दोन मूलभूत प्रश्नः १. सगळे पुरोगामी विचारवंत एकीकडे गांधीजींच्या नावाचा जयघोष करत असतात. पण चौरीचौराच्या घटनेत हिंसा झाल्याने व्यथित होऊन गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती त्याप्रमाणे २६ जानेवारीला आंदोलनात हिंसा झाल्यामुळे व्यथित होऊन हे तथाकथित शेतकरी आंदोलन मागे घ्यावे असे किती पुरोगामी विचारवंतांनी म्हटले? २. क्षणभर धरून चालू की हे कृषीकायदे शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार आहेत. तसे असेल तर दोन महिन्यापेक्षा जास्त हे आंदोलन पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग वगळता इतर कुठेच का पसरले नाही? उत्तर प्रदेशचा दिल्लीजवळचा भाग वगळता इतर सगळे जिल्हे, बिहार, मध्य प्रदेश, बंगाल पासून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र, तेलंगण वगैरे राज्यांमध्ये असे आंदोलन का पसरले नाही? इतर ठिकाणी शेतकरी राहात नाहीत का? का इतर ठिकाणी फुकटचे पिझ्झे वाटायला आणि मसाज करून द्यायला खुर्च्यांची व्यवस्था करायला पैसे टाकणारा कोणी मिळाला नाही का या भागातले खरोखरचे शेतकरी शेतात काम करत असल्याने असले रिकामटेकडे कारभार करायला त्यांना वेळ नाही?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जो पर्यंत स्वतःच्या गळ्या पर्यंत येत नाही तो पर्यंत विरोध करायचंय नाही. आपल्याला काय देणे घेणे ही वृत्ती म्हणून बाकी ठिकाणी आंदोलन नाहीत. सरकार किती जनते च्या विरूद्ध काम करू ध्या त्यांस धर्म आणि जाती ची अफू ची गोळी दिली की तर सर्व विसरून त्यांनाच निवडून देणार हे राजकीय पक्षांना चांगले माहीत आहे. मोदी ना बहुमत मिळाले त्याचे कारण त्यांचे सरकार मोठे दिव्य काम करत आहे म्हणून नाही तर अफू ची गोळी योग्य वेळी दिल्या मुळे जनता सर्व सरकारी गलथान कारभार विसरून मतदान करून बहु मता मध्ये ह्यांना च निवडून दिले. 24 साठी पण राम मंदिराची अफू ची गोळी तयार करायचे काम चालू आहे आणि ती अफू ची गोळी नाही तयार झाली तर पाकिस्तान ही हक्काची गोळी आहेच.

तेव्हा भारतात सुध्दा मुक्ताफळं उधळली गेली की तेथील घटनेचा भारताशी काय संबंध. अमेरिकेतील निवडणुकी चे विश्लेषण भारतीय अती शहाणी मीडिया करत होती की भारताचा आणि अमेरिकेतील निवडणुकीचा काय संबंध. बाइडन पासून तात्या पर्यंत भारतीय टीका टिप्पणी करत होते भारतीय ना काय गरज होती नाक घुप्सायची दुसऱ्या देशातील घटनेवर. Bjp propogonds चालवते आणि त्याला कथित क्रिकेटर, actors स्वार्थ साठी साथ देतात आणि पाठीराखे डोळे,डोकं बंद करून तेच forward करतात. कोणती ही व्यक्ती जागेतील कोणत्या ही प्रसंग विषयी मत व्यक्त करत आली आहे आणि करत राहील. ती परकीय आहे म्हणून मत व्यक्त करू शकतं नाही हे अती च झाले. सरकारी पातळीवर कोणत्या देशाने मत व्यक्त केले असते तर तर वेगळे होते पण विरोध केला पाहिजे. तिथे अमित शाह संसदेत बरळे ले की चेले chapate डोकं बाजूला ठेवून लगेच इन्स्टंट देश प्रेमी झाले

In reply to by Rajesh188

188, तुमचे सगळे प्रतिसाद हे BJP वर येऊन थांबतात. धागा कोणताही असो.. BJP ने ह्याव केलं आणि त्याव केल हीच टिवटिव चालू असते. बरं आरोप करून नामानिराळे होता तुम्ही. इतर सभासदांनी योग्य किंवा मुद्देसूद प्रतिसाद दिला कि तुम्ही काही काळ शांत बसता.. आणि पुढचा एखादा सोयीस्कर प्रतिसाद पाहून त्या चर्चेत सुद्धा परत आपली Bjp नामाची पिपाणी वाजवून नवीन धून सोडून निघून जायचे.. त्यामुळे मी इथून पुढे तुमच्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देणार नाही. आणि इतर लोकांनाही विनंती करतो कि अश्या लोकांना फाट्यावर मारावे. धन्यवाद.

In reply to by साहना

एकी कडे असा आव आणायचा नी bjp ची समर्थ क नाही. आणि कंगना पासून अर्णव पर्यंत सर्वांच्या मूर्ख बडबडी चे समर्थन करायचे. देश स्वतंत्र झाला तेव्हा जागतिक स्थिती काय होती. भारतावर व्यापारी म्हणून आले आणि नुकतेच देश सोडून गेलेल्या स्थिती मध्ये भांडवल शही चे तेव्हाचे नेते समर्थन करता नव्हते म्हणून उद्योग हे नियंत्रणात ठेवले होते हे माहीत असून तेव्हाचे सर्व नेते म्हणजे काँग्रेस कशी नालायक होती हा bjp la anukul असा विचार मांडायचा आणि परत सोवळे पणाच आव आणून मी bjp samarthak नाही हे पण सांगायचे . असा duttapi पना तर मी करत नाही. जे आहे ते स्पष्ट व्यक्त होतो.

In reply to by Rajesh188

> एकी कडे असा आव आणायचा नी bjp ची समर्थ क नाही. भाजपाला मी कधीही मत दिलेले नाही. मोदी आणि डेव्ह फर्नाडिस ह्यांच्यावर मिपा वरील माझी टीका वाचून तुम्ही हे सहज पाहू शकता. टीका हि सत्यावर आधारित असावी व्यक्तीद्वेष वर आधारीत नसावी. > आणि कंगना पासून अर्णव पर्यंत सर्वांच्या मूर्ख बडबडी चे समर्थन करायचे. कंगना, अर्णब असो किंवा संजय झा असो किंवा तुम्ही स्वतः मी सर्वांच्या बोलण्याच्या अधिकाराचे १००% समर्थन करते. ह्याचा अर्थ मी त्यांच्या व्यक्तव्याशी संमती व्यक्त करत आहे असा होत नाही. तुम्हाला जर थोडी जरी शरम असेल तर मी ह्यांच्या कुठल्या मूर्खपणाच्या बडबडीचे समर्थन केले आहे हे स्क्रिनशॉट देऊन दाखवावे. असे केलेत तर मी तुम्ही सांगाल त्या धर्मादायी संस्थेला १०,००० रुपये देणगी देईन. (इतर मिपाकरांनी इथे जज म्हणून राहावे. ) > काँग्रेस कशी नालायक होती हा bjp la anukul असा विचार मांडायचा काँग्रेस हि नालायक होती आणि नेहरू सारखे नेते निर्बुद्ध आणि दुष्ट होते हे मी अनेकवेळा तर्क आणि पुरावे मांडून अनेकदा सिद्ध केले आहे. अर्थानं हे सिद्ध करायला मी काही दामिनी मधील सनी देओल प्रमाणे आव आणत नाही. हे सत्य सर्वमान्य आणि सर्वश्रुत आहे. है सत्याने भाजपायी लोकांचा फायदा होत असेल तर मी ते सत्य का म्हणून लपवू ? भाजपातील नेते काही विशेष चतुर किंवा विद्वान नाही आहेत पण सत्तेची शय्यासोबत ह्यांनी विशेष केली नाही त्यामुळे ह्यांची संतती कशी होईल ह्यावर लिहायला अजून वेळ आहे. > असा duttapi पना तर मी करत नाही. हो मी हे मान्य करते. तुम्ही दुटप्पी नाही आहात. तुम्ही द्वेष बुद्धीने प्रेरित आहात आणि भाजप पेक्षा मोदी ह्या माणसाचा अत्यंत एकांगी पद्धतीचा द्वेष तुम्ही करता. आणि विषय, स्थळ, काळ काहीही असला तरी लंगडत चालणार्या श्वानाप्रमाणे शेवटी भाजप आणि मोदी वाईट अशी निर्बुद्ध बडबड करायची इतकेच काय ती आपली कार्यक्षमता आहे. > जे आहे ते स्पष्ट व्यक्त होतो. जे टाकीत नाही ने नळांत कुठून येईल ? रिकाम्या टाकीचा नळ सोडला तर टाकीत काय आहे ह्या पेक्षा टाकीत काय नाही हे आम्हाला जास्त कळते. त्याच प्रमाणे आपल्या बडबडीतून आणि वैयक्तिक दोषआरोपातून आपल्यांत काय नाही ते जास्त व्यक्त होते. बाकी चालुद्या, मनोरंजन तरी होते.

In reply to by साहना

असे मनोरंजन करणारै, किती तरी आले आणि गेले ... आता तर काही लोकांची नावे सुद्धा आठवत नाहीत ... उद्दाम, सचीन, पोटे, ही अशीच काही नावे ....

In reply to by साहना

हा तुमचा दावा तुम्हाला खरा वाटत असेल तरी त्याचे स्वागत आहे. स्वतः ला वाटत आहे ना तुम्ही balance विचार करता कोणत्या विचारधारेच्या बांधील नाही आहात . बस . पण मोदी चे कोणतेच कर्तृत्व नसताना त्यांची जी इथे टोकाची लाल करण्याची स्पर्धा चालू असते म्हणून बाकी अलिप्त लोकांना पण जास्त अलिप्त राहता येत नाही. हेच कारण आहे टोकाची परस्पर विरोधी मत असण्याचा

In reply to by Rajesh188

1. गुजरात राज्याची प्रगती, मोदींच्या काळात वेगात सुरू झाली. 2. गोध्रा हत्याकांडा नंतर, गुजरात मध्ये एकही दंगल झाली नाही। । 3. चीनच्या आर्थिक नाड्या, हळूहळू आवळत चालले आहेत. 4. संरक्षण दलाला मजबूती आणली आहे. इतकाही मोदी द्वेष करू नका की जेणेकरून, देशाचे संरक्षण धोक्यात येईल ...

In reply to by Rajesh188

राजेशभाऊ, फालतू पोपटपंची नको. माझे वरील चॅलेंज ला स्वीकृत करा नाहीतर निलाजरे पणाने आपल्या विचारयांच्या फुसक्या इथे सोडू नका.

In reply to by बाप्पू

देशातील गरिबी पासून ,भ्रष्ट प्रशासन,काश्मीर प्रश्न ,चीन,महागाई,अगदी रस्त्यावर खडे का आहेत असा विषय निघाला तरी नेहरू ना दोषी ठरवणारे इथे कमी नाहीत ते चालते का तुम्हाला . मी तर आता सत्तेवर असलेल्या पक्षाला च दोषी ठरवत आहे तुम्ही लोक सत्तेवर नसलेल्या आणि मरून 50 ते 60 वर्ष झालेल्या लोकांना पण आताच्या सर्व च गैर soyina दोषी ठरवता ते चालत का. अमित शाह नी संसदेत मत व्यक्त केल्या नंतर बाकी चमकेश लोकांना कंठ फुडला हे चुकीचे आहे का? मग bjp वर नाही आरोप करणार तर कोणावर करणार.

In reply to by Rajesh188

तेच तर सत्य आहे ... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे कटू सत्य पचवायची ताकद हवी ...

In reply to by मुक्त विहारि

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे कटू सत्य पचवायची ताकद हवी ...
फॉर दॅट मॅटर्,कुठलाही राजकिय पक्ष जनतेच्या भल्याचा विचार सर्वात शेवटी करतो हे विधान सत्य आहे. एक नातेवाईक बीजेपी शासित प्रदेशात सरकारी पदावर काम करतो. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार सर्व योजनांमधली मलई प्रथम नेतेमंडळींमध्ये वाटली जाते व झिरपत झिरपत जनतेपर्यंत येते.किंबहुना योजना आणण्याआधी व्यक्तिगत फायदा व पक्षीय फायदा सर्वप्रथम पाहिला जातो. हे नागडे सत्य आहे

In reply to by Rajesh188

त्या निस्तरता निस्तरता, नाकी नऊ येत आहेत ... हे केंद्रीय सरकार, त्या चुका निस्तरत आहेत, हा केंद्रीय सरकारचाच दोष आहे, नाही का? बाय द वे, आपल्या मनांत, BJP बद्दल द्वेष पहिल्या पासूनच आहे की, इतर काही कारणे आहेत? नोटाबंदीचा तर काही संबंध नाही ना?

In reply to by बाप्पू

त्यामुळे मी इथून पुढे तुमच्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देणार नाही. आणि इतर लोकांनाही विनंती करतो कि अश्या लोकांना फाट्यावर मारावे.
सहमत आहे. असेच करायला हवे.

In reply to by Rajesh188

आजकाल तसाही, आमचा टाईमपास होत नाही ... पुर्वी, सचीन, उद्दाम, पोटे, वगैरे मंडळी, आमचा छान टाईमपास करायची ... आता, ती मंडळी नाहीत .... ती असती तर, तुम्हाला छान वैचारिक मंडळी मित्र, म्हणून मिळाली असती... भाजपद्वेष आणि मोदी विरोध, हा तुमच्या मैत्रीचा, समान पाया आहे...

In reply to by श्रीगुरुजी

काका मला वाचवा, हे ऐतिहासिक सत्य आहे .... चाचा नेहरू पण, ह्याला अपवाद न्हवते .... पण, अंगाशी आले की, काका मंडळी, हात काढून घेतात.... घटोत्कचाचा वध पण, काकानेच केला ....

आजची घडामोड... फेसबुक, ट्वीटर सारख्या माध्यमातून copy paste messages पडत असताना, आणि उगाच घाबरून किंवा कोणाच्या सांगण्यावरून hash tag चालवले जात असताना पाहतो आहे... मनापासून प्रेम केलेला सचिन पण यांच्यात सामिल झालाय.. बेहत्तर, देशा पेक्षा व्यक्ती महत्वाचा नाहीच.. मग to सचिन असो वा मोदी... . . रस्त्यावर ठोकलेला एक एक खिळा, तुमचा अहम, तुमचे सत्ता साम्राज्य खिळखिळे करणार हे नक्की... - शब्दमेघ

In reply to by गणेशा

मग ते घराणेशाही मुळे, पदावर बसलेले अपरिपक्व नेते असोत किंवा जनतेच्या भल्याचा विचार न करता, दळणवळण रोखणारे पक्ष असोत ...