Skip to main content

आघाडी सरकार आणि सामान्य जनता

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 16/01/2021 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. 1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण. 2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार. 3. साधु हत्याकांड 4. तांदूळ घोटाळा 5. अर्भक मृत्यू 6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत 7. वाढीव पेट्रोल दर. 8. ड्रगचा वाढता वापर... 9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल 10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले 11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे. 12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....

वाचने 52723
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

त्या मुळे पेट्रोल चे दर जास्त आहेत त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे.
केंद्रात मोदी सरकारच्या ऐवजी चिवसेना आली किंवा भ्रष्टवादी आली किंवा वरुन "गर्व से कहो" म्हणणारे येउंदेत किंवा "हे राम" म्हणणारे बापू येउंदेत...पेट्रोलचे भाव वर वरच जात रहाणार आहेत #go electric

In reply to by टवाळ कार्टा

राज्य सरकार, त्यांचे दर कमीजास्त करू शकते. उदा. केंद्र सरकारने, आधारभूत किंमत 50/₹ ठरवली तर, राज्य सरकार ते त्याच किंमतीने विकू शकते किंवा, जास्त दर लाऊन विकू शकते. महाराष्ट्र सरकारने, इतर काही राज्यांपेक्षा जास्त दर लावले आहेत. काही लोकांना, स्वतःच्या चुकीचे खापर, इतर लोकांवर फोडायची सवय असते. सर्वसामान्य माणूस, इतका खोलवर विचार करत नाही.

1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण. 2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार. यात आता ३ री भर देखील पडली आहे असे म्हणावे का ? ‘Physically and mentally tortured’ former BARC CEO, arrested by Mumbai Police, admitted to hospital, daughter requests PM Modi to save his life दासगुप्ता यांची कन्या यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहुन त्यांच्याकडे आपल्या वडीलांच्या प्राणाची भिक मागितली असुन, दासगुप्ता यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit

In reply to by मदनबाण

अर्णव चे व्हॉट्सॲप चाट व्हायरल झाले आहे त्या वरून केंद्र सरकार आणि अर्णव चे देश प्रेम किती उच्च कोटी चे आहे हे लोकांना माहीत झालेलं आहे. दासगुप्ता पण त्यांचाच सवंगडी आहे. उच्च कोटी तील देश प्रेम असणारा. (उच्च कोटी देशप्रेम म्हणजे सामान्य लोक समजतात त्या पेक्षा खूप वेगळे देशावरचे प्रेम.) आता फक्त सुशांत बद्द्ल चे अर्णव चे चाट व्हायरल झाले की खूप मज्जा येईल.

In reply to by Rajesh188

अर्णव चे व्हॉट्सॲप चाट व्हायरल झाले आहे त्या वरून केंद्र सरकार आणि अर्णव चे देश प्रेम किती उच्च कोटी चे आहे हे लोकांना माहीत झालेलं आहे अर्णब आणि दासगुप्ता [ ज्यांना तुम्ही सवंगडी म्हणता ] हे दोघेही स्वतःचे पर्सनल कम्युनिकेशन स्वतःलाच गोत्यात आणण्यासाठी तसेच टॉर्चर करुन घेण्यासाठी व्हायरल करतील का ? अर्थातच नाही. मग त्यांचे पर्सनल कम्युनिकेशन व्हायरल कसे होउ शकत ? व्हॉट्सएप म्हणते ते एंड टु एंड एनक्रिप्शन करतात, म्हणजे कोणी तरी व्हॉट्सएप ला विनंती केली किंवा पैसे दिले आणि त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर असणार्‍या एनक्रिप्शन की वापरुन व्हॉट्सएप ने हा डेटा पुरवला ? पण ही शक्यता देखील धुसर दिसते ! [आधीच त्यांची पुंगी वाजलीय,असं केल तर देशातुनच ब्लॉक होतील. ] समजा तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे आणि माझा तुमच्याकडे, मग मी तुमचा नंबर अर्णब गोस्वामी नावाने सेव्ह करतो आणि तुम्ही माझा दास गुप्ता या नावाने सेव्ह करता, मग जसा प्लॅन असेल तसे आपण लिहायचे आणि स्क्रिन शॉट काढुन व्हायरल करायचे ! [ हे सहज शक्य आहे नाही ? :))) ] एक मंत्री काही काळा पूर्वी अर्णब जेल मध्ये आत्महत्या करेल अश्या स्वरुपाचे विधान करताना स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसले होते, त्याच मंत्र्याचा जावई ड्रग केस मध्ये अडकल्यावर हे अर्णब चॅट प्रकरण अचानक आले [ इतके दिवस हे चॅट रेकॉर्ड्स कुठे बरं दडलेले होते ? ] थोडक्यात कोणीतरी टायमिंग धरुन हा उध्योग करत आहे. असो... पाकिस्तानकडुन अपेक्षित प्रतिक्रिया देखील आली बघा ! तेव्हा देश-विघातक शक्तींचा हा एक डाव असलल्याचेच प्रथम दर्शनी दिसते. संदर्भ :- Pakistan calls Pulwama attack ‘false flag operation’ citing Arnab Goswami’s WhatsApp chats

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit

In reply to by मदनबाण

त्या scroll.in che ceo समीर पाटील आणि संपादक नरेश हे अर्णव चेच भावबंध नाहीत ना ह्याची खात्री पटल्यावर च तुम्ही दिलेल्या दुव्यावर किती विश्वास ठेवायचं ह्याचा विचार कोणी पण करेल.

In reply to by मदनबाण

अगदी बरोबर! या दोघांच्या कायप्पा गप्पा या दोघांशिवाय कोण प्रसिद्ध करणार? एका मंत्र्याची कबुतरबाजी व व दुसऱ्या मंत्र्याच्या जावयाचे अंमली पदार्थ संबंध बाहेर आल्यानंतर या दोघांच्या नावाखाली कायप्पा गप्पा प्रसिद्ध करणे हे संशयास्पद आहे.

In reply to by मदनबाण

सुशांत सिंग प्रकरणानंतर व्हाट्स ऍप सुरक्षेत चांगलीच वाढ झालेली दिसतेय. नायतर रियाचे सगळे चॅट टीव्हीवर दाखवायचे, त्याच्यावर तर मु.पो. ची सही पण नसायची.रियाच्या चॅट मधून सुशांतच्या चहात कायकाय मिसळलं कळत होतं की.

In reply to by शा वि कु

रेहा ने तिची ड्रग चॅट मान्य केली होती, हे सांगायचे सोयिस्कर रित्या विसरलात वाटतं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit

In reply to by मदनबाण

गोस्वामीने सुद्धा हे माझे चॅट नाहीत, मु.पो. थापा लावत आहे असे कुठे म्हणले नाही, हे तुम्हीसुद्धा विसरलातच की. चालायचंच.

In reply to by शा वि कु

गोस्वामीने सुद्धा हे माझे चॅट नाहीत, मु.पो. थापा लावत आहे असे कुठे म्हणले नाही ओक्के, तर मुंबई पोलिसांनी हे स्विकारले, त्यावर माननिय माजी मुख्यमंत्री काय म्हणाले ते खाली देतो :- The voluminous transcript of Mr Goswami’s chats released by Mumbai Police is deeply disturbing. Who gave access to such sensitive information from national security to constitutional amendments and political appointments?” “The Government of India must launch a thorough probe. Also the Parliamentary Standing Committee on Defence must take this matter with utmost priority,” he added. The admission by Chavan is, again, a stark reminder of the extent to which the Mumbai Police and the Maharashtra Government have gone to in order to target Arnab Goswami. संदर्भ :- Congress admits Mumbai police leaked Arnab Goswami chats: Here are all the wild conspiracy theories they generated जाता जाता :- From Times of Islamabad to The Hindu: 5 media outlets which ’knew about the Balakot airstrike before it happened’ according to ‘liberal’ logic

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit

In reply to by मदनबाण

रियाचे चॅट्स वाचणे ओके होते, ते पण पोलिसांनी नाही तर टीव्ही अँकर्स नी, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी पसरवल्या आणि त्यासाठी पोलिसांनी चॅट वाचले हे काय, तर "टार्गेटिंग गोस्वामी." छान. (टीआरपी scam, सरकारी कनेक्शन्सचा गैरवापर हे पण आहेच!) OpIndia नेहमीसारखं lol. काय होईल ह्याच स्पेक्युलेशन करणं आणि सरकार काय करणार आहे ह्याची नक्की बातमी आपल्या मित्राला सांगणे, हे सेम वाटतं का ? टाइम्स ऑफ इस्लामाबाद 4 पर्यायांचा विचार करत होता, त्यातला नक्की ऑप्शन गोस्वामीने लॉक करून दिला असता तर ? मिलिटरी, सैन्य वैगेरे बद्दल इतकं लिहिणाऱ्या व्यक्तीकडून असा रिस्पॉन्स ? बाकी सगळे पेपर पर्यायांचा विचार करत होते, तर गोस्वामीला काय होणार हे माहिती होतं आणि तो ते मित्राला सांगत होता. ह्यात मला तर फरक वाटतो. बाकी, मु.पो. ने बेकायदेशीर मार्गाने चॅट मिळवले तर नक्की कारवाई व्हावी. मूळ विषय- चॅट खरे आहेत की नाहीत ? कि मुंबई पोलीस सहजगत्या व्हेरिफाय होऊ शकणाऱ्या गोष्टीवर इतके धाधांत खोटे बोलत आहे ? (मला हे चॅट्स खरे आहेत असे म्हणायचे नसून, दोन चॅट्स लीक मध्ये काय क्वालिटेटिव्ह फरक तुम्हाला दिसला, ज्याने ते चॅट विश्वासार्ह होते आणि हे "कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या नावाने सेव्ह करून घेतलेले स्क्रीनशॉट" आहेत हे जाणून घ्यायचे आहे.)

In reply to by शा वि कु

रियाचे चॅट्स वाचणे ओके होते, ते पण पोलिसांनी नाही तर टीव्ही अँकर्स नी पोलिसांनी चॅट व्हायरल करण्याचे कारण काय ? असे व्यक्तिगत कम्युनिकेशन व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का ? त्यामुळे ट्रार्गेट गोस्वामी आहे हे उघड सत्य आहे, जरी तुम्हाला व्यक्तिगत रित्या ते मान्य नसेल तरी. काय होईल ह्याच स्पेक्युलेशन करणं आणि सरकार काय करणार आहे ह्याची नक्की बातमी आपल्या मित्राला सांगणे, हे सेम वाटतं का ? टाइम्स ऑफ इस्लामाबाद 4 पर्यायांचा विचार करत होता, त्यातला नक्की ऑप्शन गोस्वामीने लॉक करून दिला असता तर ? जर तर ला न्यायालयात देखील किंमत नसते... आर ठाकरेंची सगळी भाषणे अशीच जर-तर शब्दांचा वापर असलेली असतात. :) स्पेक्युलेशन करणे आणि अचूक माहिती देणे यात फरक असतो हे आपल्या समजत असेल असे मी समजतो.अर्णब ने कोणतीही ऑपरेशनल माहिती उघड केलेली निदान मला तरी दिसली नाही. जी लिंक दिली आहे त्यात अजय शुक्ला यांचे ट्विट वाचुन देखील तुम्ही जे अर्णबच्या बाबतीत म्हणत आहात तेच म्हणता येइल. बाकी सगळे पेपर पर्यायांचा विचार करत होते, तर गोस्वामीला काय होणार हे माहिती होतं आणि तो ते मित्राला सांगत होता. ह्यात मला तर फरक वाटतो. अगदी आपल्या पंतप्रधानां पासुन ट्रम्प तात्यांनी त्या काळात अशीच विधाने केलेली होती, फार मोठी कारवाई होइल हा अंदाज आणि नक्की कुठे आणि काय कारवाई होणार हे सांगणे यात फार मोठे अंतर आहे. अगदी टाईम्स ने देखील बातमी छापली होती :- Response to Pulwama attack: Precision air strikes the favoured option बाकी, मु.पो. ने बेकायदेशीर मार्गाने चॅट मिळवले तर नक्की कारवाई व्हावी. जशी मु.पो. वरकठोर कारवाई झाली पाहिजे, तसेच जर अर्णब दोषी आढळला तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. मूळ विषय- चॅट खरे आहेत की नाहीत ? कि मुंबई पोलीस सहजगत्या व्हेरिफाय होऊ शकणाऱ्या गोष्टीवर इतके धाधांत खोटे बोलत आहे ? जेव्हा मी प्रतिसाद लिहला होता तेव्हा मु.पो यांनीच हे पर्सनल कम्युनिकेशन लिक केले होते ते मला ठावूक नव्हते, तुमच्या दुसर्‍या प्रतिसादात जेव्हा उल्लेख आला त्या नंतर मी बातमी शोधली आणि मग दुवा देखील दिला. दोन चॅट्स लीक मध्ये काय क्वालिटेटिव्ह फरक तुम्हाला दिसला, ज्याने ते चॅट विश्वासार्ह होते आणि हे "कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या नावाने सेव्ह करून घेतलेले स्क्रीनशॉट" आहेत हे जाणून घ्यायचे आहे. दोन्ह चॅट मधील मुख्य फरक म्हणजे एक चॅट एका व्यक्तीने ड्रग्स संबंधी केले असुन दुसरे एका पत्रकाराने दुसर्‍या व्यक्तीशी केलेली सविस्तर चर्चा आणि इतर बाबींची चर्चा आहे. रेहा ने स्वत: मान्य केल्याचे तिचे चॅट सत्यच होते, त्यानुसार तिच्यावर कारवाई झालीच होती तसेच मु.पो. यांनीच स्वतः चॅट लिक केल्याचे मान्य केले असल्याने अर्णब चे चॅट सत्य असावे असे निदान या घडीला तरी मान्य करावे लागेल. तसेच मु.पो. वर कशी आणि कोणती कारवाई होइल ते देखील पहावयास हवे. जाता जाता :- कारगिल युद्धाच्या वेळी बर्खा दत्त आणि २६/११ च्या वेळी जवळपास सगळा मिडिया कसा वागला होता हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. संदर्भ :- Book reveals that Army was spooked by Barkha Dutt’s reporting in Kargil Remembering the role Barkha Dutt played in endangering the lives of 100s of civilians during the 26/11 Mumbai terror attack 26/11 attack: Media pulled by Supreme Court for it's role

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details

In reply to by मदनबाण

आधीच्या प्रतिसादात बर्खा दत्त यांचा उल्लेख केलेला आहेत, भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या वरील व्हिडियोत तिचे व्यवस्थित कौतुक केले आहे ते ऐकण्या सारखे आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exercise

देश चालवण्यासाठी पैसे लागतात तर राज्य चालवण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. केंद्र सरकार देश चालवण्यासाठी 32..98 म्हणजे 33 रुपये एक्साईज duty लावत असेल तर 18 रुपये vat राज्य सरकार का लावू शकतं नाही. . राज्यांची देनी केंद्र सरकार वेळेवर देत नाही. Gst मधील राज्यांचा हिस्सा वेळेवर देत नाही . मग राज्यांनी काय करायचे. एक तर gst मुळे राज्यांचे आर्थिक स्वतंत्र ह्या bjp सरकार नी हिरावून घेतले आहे. पण हे bjp च्या समर्थकांना कधीच दिसणार नाही.

दिलेल्या मुद्द्यावर बरेच बोलण्यासारखे आहे, पण वेळेअभावी लिहिता येत नाहीये. विशेष करून. पेट्रोल, साधू हत्या, आरे / कारशेड, मराठा आरक्षण आणि काही, cbi /ed तत्सम संस्था आणि इतर. तरीही लिहिण्याचा प्रयत्न केला असता, पण मुळ धागा लेखकानेच वेळ न घालवता फक्त point लिहिले आहेत तेच आवडले नाही. मते वेगळी असावीत पण विश्लेषण नको का आपल्या मतांचे? म्हणुन विस्तृत लिहीत नाही. उदा. पेट्रोल : देशात केंद्र सरकार अमुक ३०-३२ रुपये tax लावतेय, राज्य सरकार इतके लावतेय. बॅरल च्या किंमती.. म्हणजे देशात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना केंद्र सरकार विरोधात पेट्रोल, गॅस यांच्या विरोधात आंदोलन करायचे आणि आता राज्य? का मोदी है तो.. साधू हत्या झाली ती वाईट, पण जमलेल्या लोकात तेथील सरपंच हा सुद्धा bjp चा होता, ग्रामपंचायत सदस्य bjp चे. Lockdown, whatsapp मेसेज फिरेलेले होते मुले पळवणारी टोळी फिरतेय, वगैरे हे सगळे संदर्भ नकोत का? मराठा आरक्षण न्याय प्रविष्ट आहे हे फडणवीस सरकार सांगत होते, विरोधी राजकारण करतात हे बोलत होते, मग आता ते राज्य सरकार अंतर्गत आहे काय? शेतकरी अपुरी मदत, तांदूळ घोटाळा या बाबत माहिती येऊद्या सगळेच whatsapp सारखे नसते.. Cbi संस्था केंद्राकडे, तसेच ed वगैरे.. त्यांचा गैरवापर केंद्र सरकार करतेय कि राज्य? ड्रग चा वापर सामान्य माणसात वाढलेला data तर द्या.. मला वाटते म्हणुन कसे चालेल? कंगना, अर्णब फलाना कोणासाठी आहेत हे एकदा पाहिले पाहिजे, अर्णब चे चाट जे फिरतेय ते ही पाहिले पाहिजे.. असली लोकं आणि इतर याबद्दल सविस्तर तर लिहा.. असो..

In reply to by गणेशा

सहमत. हा धागा १०५ आणबनही घरी बसवले ह्याची जळजळ कुठेतरी काढण्यासाठी काढलेला वाटतोय :) असो. आघाडी सरकार ऊत्तम काम करतंय. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आघाडी सरकार ऊत्तम काम करतंय. -- आघाडी सरकारने, गेल्या दिडदोन वर्षात केलेले एक 'उत्तम' काम सांगा ?

In reply to by प्रसाद_१९८२

किमान समान लुटीचा कार्यक्रम किती छानपैकी राबवला जात आहे. तुम्हाला ना, कशाचं काही कौतुकच नाही बघा... :)

In reply to by प्रसाद_१९८२

आघाडी सरकारने, गेल्या दिडदोन वर्षात केलेले एक 'उत्तम' काम सांगा ?>>>> -महाराष्ट्राला काडीचा ऊपयोग नसलेल्या बुलेट ट्रेन ला स्थगीती. -कोरोना संकटावर ऊपाययोजना. (मागचं सरकार कोल्हापुरात लोक मरत असताना मते मागत फिरत होतं) -मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणनार्यांना धडा. -मुंबई पोलिसांना बदनाम करनार्याना चपराक. -कारशेड ची जागा बदलणे. - महाराष्ट्रात झालेली मोठी गुंतवणूक. - मुंबईतील कार्यालये अहमदाबाद ला हलवण्याचा डाव हाणून पाडणे. - राज्याच्या हक्काचा जीएसटी केंद्राने अडवलाय त्याविरूध्द वेळोवेळी आवाज ऊठवणे. - महाराष्ट्र हिताची कामे करणे. -मराठी माणूस अन्वय नाईक ह्यांच्या आत्महत्येची चौकशी करून दोषीला अटक करणे. अजुन अनेक

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वरील कामात अजून एक कामात अ‍ॅड करा त्या अर्णव गोस्मावीची ट्याव ट्याव बंद केली. किती तो आक्रस्ताळपणा. सध्या त्याचा आवाज म्यूट झाला एक चांगलं काम झालं टीआरपी घोटाळा मला वाटतं, ही नवी माहिती जनतेला मिळाली. :) -दिलीप बिरुटे

In reply to by श्रीगुरुजी

राऊत आणि अर्णब हे एकाच माळेचे मणी आहेत, दोघांचीही ट्याव ट्याव बंद झाली तर अतिउत्तम होईल.

In reply to by प्रसाद_१९८२

१) मा.सैनिक, विधवा, यांच्यासाठी घरपट्टी माफ २) शिवभोजन थाळी रुपये पाच ३) शेतक-यांना आठतास वीज मिळावी यासाठी कृषीपंप जोडणे.४) धानउत्पादकांना सातशे रुपये क्विंटल प्रोत्साहन योजना ५) सिंधुदुर्गात पाचशे खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय ६) नोव्हेंबरापासून कापूस खरेदी केंद्र सुरु .. ७) हेक्टरी शेतक-यांना आर्थिक मदत. असे बरेच कामं आहेत. बाकीचे सर्व घेतलेले निर्णय इथे आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मागील १० महिन्यात मुख्यमंत्री १० वेळा सुद्धा घराबाहेर आलेले नाहीत. सर्व कामे ठप्प आहेत. एक मंत्री २ वर्षे तुरुंगात राहून जामिनावर बाहेर आहे, एका मंत्र्यांने मागितलेल्या खंडणीमुळे एका व्यावसायिकाला आत्महत्या करावी लागली व तोच मंत्री आपल्यावर टीका करणाऱ्यांंना घरी पकडून आणून मारहाण करतो, अजून एक मंत्र्याची कबुतरबाजी नुकतीच बाहेर आली, अजून एका मंत्र्याचा जावई अंमली पदार्थांच्या विक्रीत सापडून तुरुंगात आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांंना घरी जाऊन बदडले जाते. हे सर्व बदनाम मंत्री अजून मंत्रीपदावर विराजमान आहेत. २०२०-२१ शैक्षणिक वर्ष अजून सुरू झाले नाही. ११ वी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अजूनही संपलेली नाही व त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले नाही. कोणत्याही अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा झालेली नाही. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली. एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष पूर्ण वाया गेले आहे व पुढील वर्ष सुध्दा वाया जाण्याची चिन्हे आहेत. आर्थिक परिस्थिती सुद्धा ठप्प आहे. चित्रपटगृहे, पर्यटनस्थळे, मंदिरे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अजूनही बहुतांशी बंद आहेत. आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन शक्यतो लवकरात लवकर परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही योजना नाही. केवळ आला दिवस ढकलणे सुरू आहे.

ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाचे विश्लेषण कुणी देईल का? सामनातील लेखानुसार महाआघाडी स्पष्टपणे जिंकली आहे.(मटामधील बातमीनुसार. सामना वाचत नाही पण अलिकडे मटामध्येच सामना मध्ये काय बातम्या आहेत ह्याच्या बातम्या असतात.)

In reply to by कानडाऊ योगेशु

आपणच जिंकलो असा चारही पक्षांचा दावा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विश्लेषण करण्यासारखे काहीही नसते. उमेदवाराच्या वैयक्तीक संपर्कावर मते मिळतात. येथे पक्षाचा संबंध नसतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

पक्षनिहाय आकड्यांनुसार, भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. बाकी सामनाचे मालक, महाआघाडीच्या टोळीचा एक भाग असल्याकारणाने, सामनातील लेख आणि बातम्या त्याच टाईपच्या असणार, त्यामुळे....

In reply to by सॅगी

महाविकास आघाडी ने या निवडणुका युती करून लढवल्या होत्या का?? नसेल तर हा विजय महाविकास आघाडीचा कसा काय असू शकतो?? पहिल्यांदा एकमेकाच्या विरोधात लढायचे आणि नंतर रिजल्ट आल्यावर तिघांची बेरीज करून हा आमचा विजय आहे म्हणायचे हे थोडं विचित्र आहे..

In reply to by बाप्पू

सर्वच पक्ष सोयिस्कर युती करतात. उदाहरणार्थ चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी युती केली होती. तरीही पराभव झाला.

फक्त एवढाच अर्थ घ्यायचा ग्रामपंचायत निकाला वरून की. तिनी पक्ष एकत्र आली तर bjp ची हार पक्की आहे. जवळ जवळ 9000 ग्रामपंचायती तिन्ही पक्षा कडे मिळून आहेत . आणि BJP कडे फक्त 3100 की 3200.

In reply to by Rajesh188

ग्रामपंचायत निवडणुक निकालांचा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या निकालाशी कणभरही संबंध नसतो.

In reply to by श्रीगुरुजी

कारण, मतांचे विकेंद्रीकरण, हळूहळू होत आहे. शिवाय, भाजपला हरवायचे असेल (जनता गेली खड्ड्यात), तर, एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टरवादी कॉंग्रेस, ह्या तिघांनाही माहिती आहे. ही निवडणूक, पुढील निवडणूकीत आपापसातील जागा वाटपासाठी लिटमस टेस्ट होती.

In reply to by मुक्त विहारि

पुढील विधानसभा निवडणुक २०१९ प्रमाणेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप-सेना अशीच होईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप विरूद्ध सेना अशीही थोडी शक्यता आहे. भाजप सेनेशी पुन्हा एकदा जमवून घ्यायचा प्रयत्न करीत आहे. सेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली तर आम्ही पाठिंबा देऊ, असे चंद्रकांत पाटलांनी जाहीर सांगितले आहे. ऑक्टोबर मध्ये फडणवीस व संजय राऊत यांची तब्बल दोन तास चर्चा झाली. एकंदरीत सेनेला पाठिंबा देऊन सेनेकडे अजून काही काळ मुख्यमंत्रीपद ठेवावे अशा वाटाघाटी सुरू आहेत. परंतु काहीही झाले तरी व कशीही आणि कधीही निवडणुक झाली तरी पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष असेल हे नक्की.

In reply to by मुक्त विहारि

फडणवीसांच्या ५ वर्षातील काही अत्यंत चुकीच्या निर्णयांंमुळे भाजपच्या काही मतदारांनी २०१९ मध्येच भाजपला मत दिले नव्हते. त्यामुळे सेनेबरोबर युती करूनही २०१४ च्या तुलनेत भाजपची मते कमी झाली व जागाही कमी झाल्या. आता परत सेनेशी युती केली तर भाजप महाराष्ट्रात संपेल.

In reply to by श्रीगुरुजी

मुळात भाजपला एका मेकओवरची गरज आहे.शरद पवार व अजित पवार ह्या काका पुतण्यांनी फडणवीसांना अक्षरशः मूर्ख बनवले.पुन्हा तोच चेहरा घेऊन समोर जाणे हि फार मोठी जोखीम ठरेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

+ १ फडणवीस व चंद्रकांत पाटील या दोघांची भाजप मतदारांमध्ये सुद्धा खूप नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. भाजपने या दोघांऐवजी नवीन नेते निवडले तरच महाराष्ट्रात भाजपची घसरण थांबेल.

In reply to by श्रीगुरुजी

अर्णव आणि कंगना ला उघड समर्थन देण्या मुळे जे पाहिले bjp चे मतदार होते ते पण bjp पासून दूर गेले . राम कदम चे माकड चाळे महाराष्ट्र मधील जनतेला आवडले नाही. आघाडी सरकार चा विरोध करता करता आपण महाराष्ट्र चाच विरोध करत आहोत हे bjp च्या लक्षात आले नाही. ज्या सुशांत साठी bjp नी महाराष्ट्र ची बदनामी केली त्या प्रकरणाचं तपास cbi नी करून सुद्धा मुंबई पोलिस चुकीचे होते हे दाखवता आले नाही. त्या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही पण महाराष्ट्र ची बदनामी मात्र bjp नी केली . आणि त्याचा दूरगामी परिणाम नक्कीच होणार आहे

In reply to by श्रीगुरुजी

सहमत. एरवी फडणवीस मला धुरंधर राजकारणी आहेत असे वाटायचे पण तो फासलेला पहाटेचा शपथविधी पाहिल्यानंतर माझे मत थोडे बदलले. चंद्रकांत पाटील फक्त मराठा नेतृत्वाच्या चेहऱ्यासाठी पक्षात घेतले आहेत असे वाटते. त्यांच्यात ना आक्रमक पणा ना सडेतोड उत्तर देण्याची ताकद. कोल्हापूर वरून निवडणुकीत उभे राहिले असते तर निवडून येणे अवघड होते. किंबहुना ते पडलेच असते. जनतेमध्ये तेवढा रोष होता हे नक्की ( कारण कोल्हापूर मध्ये पूरपरिस्थिती गंभीर असताना BJP च्या नेत्यानीं केलेले दुर्लक्ष ). .. त्यामुळेच पुण्याच्या सेफ जागेतून निवडणूक लढवली. पण असे करताना पुण्यात ज्यांनी इतकी वर्षे कष्ट घेतले त्यांच्यावर अन्याय झाला हे नक्की. रावसाहेब दानवे बद्दल तर न बोललेलंच बरं. पूर्णतः वाचाळवीर माणूस. कसा काय प्रदेशाध्यक्ष आहे कुणास ठाऊक. यांच्या घरातील भांडणामुळे औरंगाबाद ची सीट विधानसभा निवडणुकित हरले. अन्यथा तिथे युतीची ( शिवसेनेची ) सीट आली असती. विनोद तावडे कुठेही दिसत नाहीत. एकनाथ खडसे यांच्यासारख्या व्यक्तीस पक्ष सोडण्याची वेळ का आली हे देखील समजले नाही. शेवटपर्यंत त्यांनी विचारले की माझा गुन्हा काय पण कोणाकडूनच उत्तर आले नाही. शेवटी त्यांनी NCP ची वाट धरली. पण खरे सांगायचे तर त्यांनीच विदर्भात पक्ष उभा केला. त्यांच्यावर MIDC जमीन व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप होता. पण असे आरोप सर्वच पक्षात कितीतरी नेत्यांवर आहेत. त्यामुळे कोणी त्यांना वाळीत टाकल्यासारखे वागवत नाही. मुनगंटीवार त्यातल्या त्यात थोडे बरे वाटतात. पण त्यांना तितके फुटेज मिळताना दिसत नाही. BJP म्हणजे फडणवीसआणि फडणवीस म्हणजेच BJP he जे काही समीकरण बनले होते ( अजूनही आहे ) ते येणाऱ्या निवडणुकीत BJP साठी घातक ठरेल यात शंका नाही. BJP मध्ये मेकओवर होणे गरजेचे आहे.

In reply to by बाप्पू

स्पष्ट सांगायचं तर चंद्रकांत पाटील हे भाजपचे राऊत आहेत (अत्यंत वाचाळ, बेतात वक्तव्ये, फुशारक्या, उद्या म्हणे ते कसलातरी गौप्यस्फोट करणार आहेत) आणि फडणवीस भाजपचे शरद पवार आहेत (अत्यंत विश्वासघातकी, सहकाऱ्यांना संपविणे, भ्रष्टांंना संरक्षण, सत्तेसाठी काहीही करायला तयार इ.). या दोघांना मोदी-शहांनी का मुक्तहस्त दिला आहे ते समजत नाही. हे दोघे भाजपला संपविणार.

In reply to by श्रीगुरुजी

जोवर काँग्रेस अस्तित्वात आहे तोवर भाजपही राहणार हे नक्की, त्यामुळे भाजप महाराष्ट्रात (फॉर दॅट मॅटर, देशात) संपेल असे काही वाटत नाही.

पक्षांची नाव वेगळी असली तरी सर्वच राजकीय पक्षांची सत्ता राबवण्याची कार्य पद्धती थोडीफार फरकाने एक सारखीच असते. स्वतःचे पोट भरणे,कार्यकर्ता ची सोय करणे. हे सर्वच करतात. जास्त यश मिळाले की बेधुंद सर्वच पक्ष होतात. हीच धुंदी उतरवण्यासाठी बदल आवश्यक असतो. Bjp धुंदीत होती तिला जमिनी वर आणणे गरजेचं होते. बाकी कोणत्याच पक्षाला शत्रू समजण्याचे कारण नाही. सर्व च आपले आहेत.

जागृत जनताच सुशासन निर्माण करू शकते. फक्त राजकीय पक्षांच्या भरवशा वर सुशासन येणार नाही. जिथे सरकार चुकेल तिथे जागृत जनता असेल तर लगेच विरोध होईल . आणि सरकार नेहमी दबावात राहील. आपल्या जे चुकीचं घडते त्याला राजकीय पक्ष च जबाबदार आहेत असे ठरवले की आपण नामानिराळे राहण्यास मोकळे. असेच माझे मत आहे.

Caa ला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत ही चाल थोडीफार यशस्वी झाली पण शीख शेतकऱ्यांना खलिस्तानी ,अतिरेकी ठरवणे लोकांना बिलकुल आवडले नाही. शीख लोक देशद्रोही आहेत हेच कोणाला पटणार नाही. जेव्हा bjp ल जाणवले शीख लोकांना देशद्रोही म्हणणे आपल्यावर च उल्टेल तेव्हा आंदोलन कर्ते खलिस्तानी आहेत हे सांगणे bjp ni बंद केले. देर से आये मगर सही आये. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती.

भा़जपाचा कौन्ग्रेस् किवा राष्ट्रवादी केला फडणवीस यानी.. माझ्यामते फडणवीस राजकारण खेळले जे अयश्स्वी झाले हे दुर्दैव..शेवटी जो जीता वही सिकन्दर शिव्सेनेचा धाकटा भाउ म्हणुन कायम रहाणे भाजपासाठी उपयोगाचे नाही. कारण देश स्तरावर 'एक देश एक भाषा' एत्यादी भुमिका घ्यायची वेळ येणार तेव्हा कायम त्रास होणार. (नोटाबन्दीच्या वेळेला सर्वात जास्त टिका शिवसेनेने केली) त्यांमुळे खरतर यापुढे भाजपाने भले सत्तेबाहेर रहावे लागले तरी चालेल पण भलत्या युती नको असा बाणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवावा. फडणविसाना बर्याच त्रासाचा सामना करावा लागला. मराठा मोर्चा द्वारे दबावाचे राज़कारण झाले आरे प्रकरण (लवासा ऐशो आरामसाठी झाली तेव्हा कुठे होते पर्यावरण वादी? मेट्रोमुळे मुम्बैतल्या सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर होते आहे) अम्रुता फडणविस याना ट्रोल करणे महाराष्ट्रातील गडावर हेरीटेज हौटेल चालु करण्याचा निर्णय व्यवस्थित पणे भान्डवल करुन फडणविस कसे खलनायक आहेत ते रन्गवले गेले. शिव्सेनेने युति केवळ मोदी वलयाचा लाभ मिळवायला घेतली.प्रत्यक्श मात्र त्यान्चे लोक विरोधी प्रचार करत होते. अगदी चन्द्रकान्त पाटील बाहेरचे आहेत त्याना मत देउ नका असे कोथरुड मध्ये सन्गितले जात होते. अदानी आणि अम्बानी आहेतच हक्काचे बी जे पी साठी प्रगती दाखवायला आणि विरोधकान्साठी जनतेला भीती दाखवायला फडणविसाना ना घराण्याची पार्श्वभुमी ना जातिचा (अल्प्सन्ख्य असल्यामुळे) उपयोग पवार कायम फडणविसान्चा उल्लेख पेशवे असा करतात. यापुर्वी कधी नव्ह्ता एवढा पेशव्यान्चा इतिहास जागवला गेला. पेशवे कसे वाइट राज्यकर्ते आहेत याचा मुद्दाम प्रचार झाला (जरी आता त्यान्चा कोणी वन्शज राज्कारण किवा प्रसिद्धि मागे नाही). फडणविस पेशव्यान्चे वन्शज असल्यासारखे चित्र रन्गवले गेले (कायप्पा इ) एवढे सगळॅ चालु असताना फडण्विसानी कम्बर कसली आणि बहुमताने निवडुन् येण्यासाठी जो काही आटापिटा केला तो फसला एवढ नक्की. भारतातल्या प्रत्येक राज्यातली समीकरणे निराळी आणि गणिते वेगळी. आपण बिन पैशाचा तमाशा मस्त पैकी पहायचा......

शिवसेनेने काँग्रेस आणि राकॉशी केलेली युती अनेकांना त्रासाची वाटते. भाजपाबरोबर यूती केली असती तर मग लै भारी वाटले असते. आपापला एक विचार असतो. मागील पाचवर्षात भाजपाने शिवसेनेचा केलेला सारखा अपमान. आणि त्या बदल्यात भाजपाला शिवसेनेने दिला धडा, हिशेब महाराष्ट्राच्या आयुष्यात भाजपा विसरु शकणार नाही. लैच जबरा धक्का दिला. अनेकांना ते रुचणार नाही. मागील सरकारने ''अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल'' अशा गोळ्या महाराष्ट्राच्या जनतेला दिल्या. आता महायुतीचं सरकार, हळुहळु आपल्या पद्धतीने काम करीत आहे. करोना काळात मुख्यमंत्र्याचं आपल्या माणसाने केलेला सुसंवाद अनेकांना आश्वासक वाटला. करोनाकाळात परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. दिव्या बत्तीच्या भरवशावर न राहता लोकांना काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठीची एक आश्वासक मांडणी सरकारने केली. सरकार उत्तम काम करीत आहे, असे वाटते. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सरकार उत्तम काम करीत आहे ? एवढे सगळे फुटकळ निर्णय तर राज्याचे सामान्य प्रशासन( सचिव अधम किन्वा अंडर सेक्रेटरी) सुद्धा घेऊ शकते. प्रशासनात काम केले असेल त्याला हे सहज लक्षात येईल. साध्या मेट्रो कारशेडचं निर्णयात किती नाचक्की झाली आहे हे याचे या निर्लज्ज लोकांना काहीही घेणे देणे नाही. ज्या निर्णयामुळे राज्याचे काही हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल( दर डोई ४०० रुपये महाराष्ट्रातील जनतेला भरायला लागतील) तो केवळ आपला अहंगंड सुखावण्यासाठी घेतला. जी जमीन दुसऱ्याची आहे त्याने ती तिसऱ्याला( शापूरजी पालनजी) ला विकास करण्यासाठी दिल्याचे शपथपत्र केल्यावर केंद्र सरकारने त्यावर आक्षेप घेऊन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कल्याणकारी राज्याच्या उप जिल्हाधिकाऱ्याने हि जमीन MMRDA ला दिल्याचे पत्र जरी केले. शेम्बड्या पोरालाही समजेल कि इतकी बेकायदेशीर गोष्ट न्यायालयात एक दिवस ही टिकणार नाही. आता नवीन जमीनीच्या शोधात आहेत. मुंबई मेट्रोचा पूर्ण होण्याचा कालावधी किमान ४ वर्षे पुढे गेला. खा तुम्ही धूर धूळ आणि आवाज. आम्ही करतो वर्क फ्रॉम होम आणि पितो कोमट पाणी कुणाच्या बापाची जहागीर?

In reply to by सुबोध खरे

खा तुम्ही धूर धूळ आणि आवाज. आम्ही करतो वर्क फ्रॉम होम आणि पितो कोमट पाणी
दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे, मशाल मोर्चे काढून करोनाला पळवून लावण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम आणि कोमट पाणी बरं असावे. आपल्या गप्पूसेठला कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करायचा नाद आहे, स्वतः स्वदेशी लस टोचून आत्मनिर्भर झाल्याचा इव्हेंट कधी ? की भिती वाटतेय....! ;) बाकी, काय चाललंय नवीन डॉक्टरसाहेब ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर्क फ्रॉम होम आणि कोमट पाणी
हे सांगण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री मामुंनाही सतरांदा पत्रकार परिषदा घ्यायचीही गरज नसावी नाही का? तरीही घरी बसुन टिव्हीवर झळकुन चमकोगिरी करायचा नाद काही जात नाही ;) बाकी, काय चाललंय नवीन प्रा. डॉ. साहेब आपल्या संभाजीनगरात?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे, मशाल मोर्चे काढून https://www.bbc.com/news/av/uk-52054745 https://www.france24.com/en/20200318-weapplaud-french-pay-tribute-to-he… आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अशा गोष्टी जगभर केल्या जातात. हे आपल्याला ठाऊक नसावे. आणि एकदा मोदीद्वेषाची झापडे लावली कि ते दिसत नाही किंवा ऐकू सुद्धा येत नाही. बाकी त्या उपक्रमाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून बऱ्याच लोकांची फार जळजळ झाली होती. आजसुद्धा याच करोना योद्ध्यांना सर्वप्रथम आणि मोफत लस देण्यात येत आहे. नुसते थाळी वाजवण्याबद्दल शिमगा करणारे लोक याबद्दल एक चकार शब्द काढत नाहीत (ते नैसर्गिक आहे म्हणा) आता सुद्धा भारत लस बनवण्यात आणि देण्यात सर्वात पुढे आहे आणि याचे श्रेय श्री मोदींना मिळणार आहे या भीतीने विरोधकांची गाळण उडाली आहे. बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

अगदी हेच लिहायला आलो होतो ... नन्तर "झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोन्ग घेतलेल्याला जागे करता येत नाही" हे आठवले. मग तो नाद सोडुन दिला. बाकी दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे हे करोना योद्ध्यांना आणी सीमेवरच्या योद्ध्यांना मानवन्दना देण्यासाठी होते हे गल्लीत सग्ळ्याना माहीत आहे. हे लोक आमच्या सारखे वर्क फ्रोम होम करायला लागले तर आमच्या बुडाखाली फटाके फुटायला वेळ लागणार नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यांनी आधी लस कशासाठी टोचून घ्यावी? आधी सगळ्या डॉक्टर्स ना (खऱ्यावाल्या), नर्सेस ना, सफाई कर्मचाऱ्यांना, पोलिसांना लस देऊन मग वयोमानाप्रमाणे लस देण्याचं जाहीर झालंय. त्यांच्या वयोमानाप्रमाणे पहिल्या 3 कोटीं नंतर त्यांचा नंबर आहेच. बाकी खास करून कोव्हीशिल्ड ची लस actual virus नसल्याने (आणि वयोवृद्ध लोकांना तीच लावली जाणे अपेक्षित असल्याने) त्यांना धोका नाहीच. तर ते टाळतील कशासाठी? लस दिल्याने धोका असता तर लस नावाची गोष्ट बनवलीच गेली नसती. यव्हढी साधी गोष्ट कळत नाय तुम्हा झंटलमन लोकांना? डॉक्टर काय कॉपी करून झाला का?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजची बातमी: दुसऱ्या लाटेमध्ये (वयस्कर लोकांना लस टोचण्याची लाट) मोदी स्वतः लस टोचून घेणार आहेत. पहिल्या लाटेत लस टोचून न घेण्यासाठी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार एकाही मुख्यमंत्र्याने लस टोचून घेतली नव्हती. अगदी मी म्हटल्याप्रमाणेच. काही लोकांना नाही त्या कचरा गोष्टी लिहून तोंडावर आपटायची हौसच असते. https://www.thehindu.com/news/national/pm-modi-cms-to-take-covid-19-jab…

In reply to by पिनाक

पण मोदी वर कोणाचाच बिलकुल विश्वास नाही(फक्त डोळे झाकून विश्वास ठेवतात ते bjp अंध भक्त सोडले तर)

In reply to by Rajesh188

हो ना.. अंधभक्त अगदी तसाच विश्वास ठेवतात मोदींवर.. जसा तुम्ही खांग्रेस, आणि NDTV var ठेवता. आणि आता अलीकडे मामु घरबसे यांच्यावर

In reply to by बाप्पू

वाजपेयी सारख्या महान नेत्या नंतर अडवाणी सारख्या अनुभवी व्यक्ती ला पंतप्रधान पद देणे गरजेचे होते. पण बिलकुल कुवत नसणाऱ्या मोदी ना पंतप्रधान पदावर बसवून भारतीय जनता पक्षाने घोडचूक केलेली आहे ह्याची झलक पुढच्या निवडणुकीत तर मिळेलच पण त्या घोडचूक केल्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्ष परत आपल्या मुळ स्थानावर जाईल. लोकसभेत फक्त 2 सदस्य.

In reply to by Rajesh188

याच "सो कॉल्ड घोडचुकीला" देशातील मतदारांनी "दोन" वेळा निवडुन दिले आहे बरंका... ;) बाकी डोळे मिटून दूध पिणे चालु ठेवा. :)