Skip to main content

आघाडी सरकार आणि सामान्य जनता

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 16/01/2021 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. 1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण. 2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार. 3. साधु हत्याकांड 4. तांदूळ घोटाळा 5. अर्भक मृत्यू 6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत 7. वाढीव पेट्रोल दर. 8. ड्रगचा वाढता वापर... 9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल 10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले 11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे. 12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....

वाचने 52723
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

गल्लीतील गुंड आणि खंडणीखोर सत्तेवर बसल्यावर दुसरं काय होणार? जनताच यांना योग्य वेळी धडा शिकवेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सामान्यतः, हुषार माणसे, निवडणुक लढवत नाहीत. डोंबोली सारख्या, सो काॅल्ड, सुशिक्षित माणसांच्या शहरात, साध्या नगरसेवक पदासाठी, समाजसेवा करणारा उमेदवार, कुठल्याही पक्षाला मिळत नाही,

याआधीचे सरकार कोणत्याही वर्गातील जनतेसाठी नव्हते. ज्यांनी आपल्या खुर्चीसाठी, आपल्याला प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून मत देणाऱ्या निष्ठावंत मतदारांचा विश्वासघात करून नुकसान केले, ते फक्त स्वत:चेच असतात.

यात वाचाळवीर राऊत यान्चे नाव हवे कारण त्यान्च्यामुळे २०२४च्या निवडणुकीवर परिणाम होईल असे आता तरी वाटत आहे.

In reply to by मुक्त विहारि

भ्रष्टाचार की सर्वात मोठी कीड आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तो करणे आणि करणार्‍यांना पाठीशी घालणे हे सतत चालले आहे.

In reply to by मराठी_माणूस

मागच्या सरकारने चुका केल्या असतील तर, त्या चुका टाळायला, ह्या सरकारने काय केले?

In reply to by साहना

त्यामुळे, प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणे, वेगळी असणे साहजिकच आहे. पण, त्याच बरोबर, सामान्य माणसाला त्रास होऊ नये, इतपत तरी काळजी घ्यायला हवी....

In reply to by साहना

प्रशासन यंत्रणा,आणि ते प्रशासन हकणारे सरकार नसेल तर कोणताच देश चालणार नाही सरकारी धोरण ही सर्वात जास्त महत्वाची असतात त्या वर लोकांच्या नोकऱ्या,व्यवसाय अवलंबून असतो. धोरण बदलेले तर चांगले चालणारे व्यवसाय पण क्षणात माती मोल होवू शकतात.. कोणी असे समजत असेल मी स्वतःच्या मेहनतीवर पैसे कमवत आहे तर ते अर्ध सत्य आहे प्रशासन आणि सरकारी धोरण हीच तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतात. सरकार ही यंत्रणा जीवनात नगण्य नाही अतिशय महत्वाची आहे. सरकारी यंत्रणा च पूर्ण फायदा घेवून त्याच यंत्रणेला नगण्य समजायचं हे थोड विरोधी मत वाटत. चांगले सरकार निवडणे म्हणजे आपले स्वतःचे भविष्य चांगले बनवणे

तुम्ही कोणत्या पक्षाचा आमदार आणि नगरसेवक निवडून दिला आहे? अगदी वैयतीक बोलायचे झाले तर तुम्ही ज्या आमदार आणि नगरसेवकाला मतदान केले आहे तो समाज सेवा निस्सीम भावनेने करतो का? आणि तुम्ही त्याला का मत दिले त्याचे एका वाक्यात कारण काय आहे. ह्या दोन प्रश्नांची उत्तर सर्वात महत्वाची आहेत.

वर्षे, दिड वर्षा पासून कोथळा, खंजीर, मराठी आस्मिता, कोमट पाणी, घरातच बसा, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या शिवाय एक ही वेगळा शब्द सध्याच्या महा आघाडी सरकार कडून ऐकला नाही. याशिवाय यांची सत्तेत येऊन केलेली कामे काय तर, गेल्या सरकारच्या योजना बंद करणे, स्वत:च्या हट्टासाठी आरे कारशेड इतत्र हलवणे, बुलेट ट्रेनला विरोध, केजरिवाल प्रमाणे प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलने, कंगानाचे घर बुलडोजर चालवून पाडणे, मंत्र्यासाठी आलिशान गाड्या खरेदी करणे याशिवाय इतर एक ही काम या सरकारने केले असेल तर सांगावे कुणी.

Corona काळात योग्य वेळी लॉक डाऊन. साथीच्या रोगात जनतेला फुकट रेशन. अपुऱ्या आरोग्य सुविधा असून सुध्धा परिस्थीत वर नियंत्रण. हिंदू मुस्लिम तणाव नाही.

In reply to by Rajesh188

Corona काळात योग्य वेळी लॉक डाऊन. -- तो केंद्र सरकारने लावला व त्यावर तुमच्या सारख्या अनेकांनी टिका केली होतो. साथीच्या रोगात जनतेला फुकट रेशन. -- फुकट अन्न धान्य केंद सरकारने दिले मात्र त्यातही महाविकास आघाडीने घोटाळे केले अपुऱ्या आरोग्य सुविधा असून सुध्धा परिस्थीत वर नियंत्रण. -- कोरोना संख्या व मृत्यु देशात सर्वात जास्त महाराष्ट्रात झाले आहेत. हिंदू मुस्लिम तणाव नाही. -- तो या आधी कधी होता ?

In reply to by Rajesh188

हायला दुसऱ्या धाग्यावर तर लॉक डाऊन केला आणि श्रमिकांचे हाल झाले म्हणून मोदींच्या नावाने शिमगा करत होतात. शरद कोचिंग क्लासेस लावले काय? कोलांट्या मारायला शिकलाय!

In reply to by Rajesh188

करोनाच्या काळात, वांद्रे रेल्वे स्टेशनवर, गर्दी कशी काय जमा झाली? उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्रा पेक्षा जवळ जवळ दुप्पट असुनही, त्या राज्याने, जास्त चांगल्या रीतीने ही लागण हाताळली

In reply to by मुक्त विहारि

पण ते गरजवंत व्यक्ती पर्यंत पोचवणे हे राज्य सरकार चे काम असते. एक उदाहरण घेवू. बिहार ला 86450 MT धान्य केंद्र सरकार नी दिले पण बिहार मधील bjp आघाडी सरकार नी फक्त.1.84 MT च धान्य वाटप जनतेला केले . आणि बाकी सर्व धान्य कुठे गेले ह्याचा पत्ताच नाही.

In reply to by Rajesh188

लेख नीट वाचता कि नाही? तुम्हीच दिलेल्या लिंक मध्ये महाराष्ट्र सरकारने धान्याचे एप्रिल मे मध्ये १ टक्क्यापेक्षा कमी आणि जुन मध्ये 0% वितरण केले आहे हे लिहिलंय. Of the 36 states and Union Territories (UTs) in India, two distributed zero grains (Goa, Telangana), 11distributed less than 1% of allocated grains (Andhra Pradesh, Gujarat, Jharkhand, Ladakh, Maharashtra,Meghalaya, Odisha, Sikkim, Tamil Nadu, and Tripura) across April and May 2020, whereas in June 2020 sixmore (Bihar, Gujarat, Maharashtra, Tamil Nadu, Sikkim, and Ladakh) also distributed zero grains.

In reply to by Rajesh188

तुम्ही विदा दिलाय. आजवर असे कधी झाले नव्हते की तुम्हाला माहिती/ दुवा/ विदा मागितला आणि तुमच्याकडून तो मिळाला .

सरकार कोणत्या पक्षाचे आहे ह्या पेक्षा सरकार चालवणारी लोक कोण आहेत हे जास्त महत्वाचे असते हेच तर सांगायचे आहे. म्हणून तर पहिल्याच कमेंट मध्ये मी तुम्ही कोणाला मत दिले होते आणि ज्याला मत दिले होते. तो व्यक्ती निस्सीम भावनेने समाजसेवा करत आहे का? असा प्रश्न विचारला होता.

In reply to by Rajesh188

पण तो एकटाच सत्तेत नाही, इतरही काही जण सत्तेत आहेत असो, तुमची विचारसरणी, माझ्या पेक्षा वेगळी असल्याने, तुम्ही, तुमच्या जागी आणि मी माझ्या जागी

मुळात हे मान्य करायला हवे कि फडणवीसांचा अतिअहंकार त्यांना व पक्षाला व राज्याला नडला. थोडे तोंड गप्प ठेवले असते तर आज सत्तेत असते. सध्याचे सरकार हे राज्य चालवायचे ह्या उद्देशाने स्थापलेले नसुन फक्त सरकार चालवायचेच ह्या हेतुने स्थापले गेलेले आहे.त्यामुळे दर तीन-चार महिन्यानेन आता पड्णार आता पडणार अशी आवई उठवली जाते पण होत काही नाही.

In reply to by बाप्पू

>काहीही करून माझाच मुख्यमंत्री झाला पाहिजे हा *बाळ*हट्ट नडला. काहीही करुन मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे हा हट्ट जास्त नडला.जेव्हा सेना मुख्य्मंत्री पदावर अडुन बसली होती तेव्हा ज्युनिअर ठाकरेंचे नाव पुढे केले होते. हा एक नंबरचा पोरकट पणा होता व कोणालाही मान्य झाला नसता.पण पुढे पवारांनी उध्दव ठाकरेंना पुढे आणुन मुत्सुद्दीपणा दाखवला.हाच पर्याय फडणवीसांना सेनेसमोर ठेवता आला असता.तसेही सेना अर्धा-अर्धा कार्यकाल वाटुन घ्यायला तयार होती.पण अतिस्वार्थ नडला. आणि पुढे अजित पवारांशी असंगाशी संग करुन स्वतःचे हसे करुन घेतले ते वेगळेच.

In reply to by कानडाऊ योगेशु

फडणवीसांनी २०१७ पासून अनेक गंभीर घोडचुका केल्यामुळे (अजिबात गरज नसताना शिवसेनेच्यया गळ्यात पडून युती करणे ही त्यातील एक गंभीर घोडचूक) व दुर्दैवाने मोदी-शहांनी त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांना मुक्तहस्त दिल्याने, २०१९ मध्ये अत्यंत अनुकूल परिस्थिती असूनही भाजपच्या जागा कमी झाल्या व सरकार गेले. फडणवीसांच्या चुका अजूनही सुरू आहेत व मोदी-शहांच्या अजूनही ते लक्षात येत नसल्याने, पुढील स्थानिक आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसून भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल. नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला आपले बालेकिल्ले गमवावे लागल्याने याचे प्रत्यंतर आले आहे. फडणवीसांच्या गंभीर घोडचुका व त्यामुळे भाजपची वेगाने होत असलेली घसरण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मूड येईल तेव्हा यावर लिहीन.

In reply to by कानडाऊ योगेशु

फक्त अतिअहंकार नव्हता. त्यांनी अनेक गंभीर घोडचुका केल्या व अजूनही त्या सुरूच आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा कमी होऊन सरकार गेले व भविष्यातील विधानसभा निवडणुकीतही त्यांचे सरकार येणे अवघड आहे. सद्यपरिस्थितीत सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे व पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची बरीच शक्यता आहे.

In reply to by सुबोध खरे

नक्कीच. परंतु ज्यांना प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून मत दिले त्यांच्याकडूनच विश्वासघात व्हावा हेच भाजप समर्थक मतदार deserve करीत होते का?

सरकार स्थापन केले ही राजकीय खेळी म्हणुन मान्य केले जाईल. पण आरे कार शेड बाबत केलेला खेळ, बुलेट रेल्वे ला खोडा हे पातळी सोडुन घेतलेले निर्णय सगळ्यात जास्त टोचले. सेना जगते ती मुंबईच्या जोरावर. पक्ष आणि सत्ता पैशाच्या जोरावर चालते. सेनेला पैसा मिळतो तो मुंबई आणि ठाण्यातुन. राजकारणासाठी पोटावर लाथ मारायला तयार झालात, जनतेच्या फायद्यापेक्षा आपले राजकारण महत्वाचे. राऊत यांच्या वायफळ बडबडीने जास्त उबग आणला. त्यात कंगना आणि अर्णब ने शिस्तीत म्हणा किंवा खेळुन, त्यांना काय राजकारण येते ते लोकांच्या मनात ठसवले. साहेब कायम हे दाखविण्यात मग्न झाले की मी म्हणजे फायनल रिमोट. कायम सरकार पडणार नाही ही टेप. कोणती कामे केली किंवा निर्णय घेतले हे विचारले तर सगळा गोंधळ. पुन्हा निवडणुका आल्या की यांना अजिबात उभे नाही करणार.

In reply to by जानु

>पण आरे कार शेड बाबत केलेला खेळ,..वगैरे वगैरे.. एरवी इथे मत सेनेविरुध्द जायला हवे पण रातोरात असंख्य झाडांची कत्तल करुन फडणवीस आपली विश्वासार्हता गमावुन बसले आहेत.बीजेपी च्या बाजुने असलेल्या अनेकांनाही ते कृत्य काही पसंत पडले नव्हते. हीच गोष्ट घाईगडबडीत पहाटे पहाटे उरकलेल्या शपथविधीची.ह्या दोन्ही कृत्यांना जनता माफ करणे अवघड आहे. >सेना जगते ती मुंबईच्या जोरावर. पक्ष आणि सत्ता पैशाच्या जोरावर चालते. सेनेला पैसा मिळतो तो मुंबई आणि ठाण्यातुन. बरोबरे.सेनेचा मुख्य अजेंडा हा मुंबई मनपा वर सत्ता हाच असतो आणि राज्यपातळीवरची सत्ता हे त्यामानाने दुय्य्म उद्देश्य असावे आणि पुढील मनपा निवडणुकींची सेनेने आत्तापासुनच फिल्डींग लावायला चालु केली आहे. (गुजरातीमधुन पत्रके वगैरे.). सेनेला जनता जोपर्यंत मनपा वरुन पायउतार करत नाही तोपर्यंत सेनेला लोकाधार नाही असे म्हणणे बिनबुडाचे ठरेल. बाकी राऊत ही बीजेपीची एक डोकेदुखी होऊन बसले आहेत आणि त्यांना हाताळणारा एकही सक्षम वीर बीजेपीत नाहीत.(काय ती अमृतावहींनीची आणि राणे सुपुत्रांची प्रत्युत्तरे.!)

सेना आणि भारतीय जनता पक्षात निवडणुकी आधीच संघर्ष चालू होता.. युती होईल की नाही ह्याची खात्री नव्हती. नानार प्रकल्प ल bjp आग्रही होती तर सेना त्याला विरोध करत होती. जिथे सेनेचे उमेदवार जिंकतात तेथील च राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या ताकत वान लोकांना bjp नी पक्षात प्रवेश दिला होता. देवेंद्र फडणवीस कर्ज माफी दिली असे सांगत होते तर ठाकरे एकाला ही कर्ज माफी मिळाली नाही असे सांगत होते. आरे मधील मेट्रो शेड साठी bjp आग्रही होती तर सेना त्याचा विरोध करत होती. Bjp देवेंद्र जी मुख्यमंत्री म्हणून promote करत होती तर सेना आदित्य ठाकरे ना. नारायण राणेंचा bjp pravesh सेने ला रुचला नव्हता. इतके सारे महाभारत निवडणुकी अगोदर घडत होते तरी युती झाली. का? दोन्ही पक्षात बेबनाव आहे हे राजकीय पंडित असलेल्या अमित शाह ना माहीत नव्हते का? ते काय बोळ्याने दूध पितात काय. युती तुटण्याची सर्व जबाबदारी सेने वर टाकून स्वतः नामा निराळा राहण्याचा प्रयत्न BJP करते आहे. पण राजकारणातील खेळाडू आणि समंजस जनता त्या वर विश्वास का म्हणून ठेवेल.

In reply to by Rajesh188

Bjp देवेंद्र जी मुख्यमंत्री म्हणून promote करत होती तर सेना आदित्य ठाकरे ना. हे जर असे होते तर शिमगा करायला निवडणुक का होउ दिली. त्या अगोदर आमचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरे आहे हे का नाही बोलले? कुणी तोन्ड दाबुन ठेवले होते का?

In reply to by Rajesh188

Bjp देवेंद्र जी मुख्यमंत्री म्हणून promote करत होती तर सेना आदित्य ठाकरे ना.
सेना आदित्य ठाकरे ना प्रमोट करत होती ह्याचा एखादा पुरावा आहे तुमच्याकडे? की आपले नेहमीप्रमाणे मनात येईल ते टंकायचे ?निवडणुक काळातील एखादी बातमी ज्यात सेनेने आदित्य ठाकरे ना मुख्यमंत्री म्हणून सादर केले आहे किंवा एखाद्या प्रचार सभेतील पोस्टर ज्या प्रचार सभेत सेना / भाजप मधले पहिल्या फळीतील नेते आहेत, असे काही असेल तर प्लिज इथे पोस्ट करा.

In reply to by अनन्त अवधुत

आदित्य ठाकरेचे नाव नव्हते, परंतु १८ फेब्रुवारीस युतीची अधिकृत घोषणा करताना "भाजप व सेना सर्व जागा, सर्व पदे व सर्व जबाबदाऱ्या समान वाटून घेणार आहेत", असे फडणवीसांनी आधी मराठीत व नंतर हिंदीत सांगितले होते (ते प्रत्येक गोष्ट दोन्ही भाषात सांगतात). नंतर १९ फेब्रुवारीस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना "सुरूवातीची अडीच वर्षे सेनेचा व उर्वरीत अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होईल असे वाटाघाटीत दोन्ही पक्षांनी ठरविले आहे", असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. हेच इतर सर्व सेना नेते वेगवेगळ्या सभातून ऑक्टोबर २०१९ पर्यंत सांगत होते व कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये फायनान्शियल एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेने सुद्धा हेच सांगितले होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या एक आठवडा आधी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी असे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले. हे सांगण्यास त्यांनी इतका उशीर का लावला? हे आधी सांगितले असते तर सेनेने विधानसभा निवडणुकीपूर्वीच युती तोडली असती या शंकेमुळे भाजप नेते जवळपास ८ महिने गप्प असावे. युतीसाठी सेनेने पुढाकार घेतला नव्हता. स्वतः फडणवीसच युतीसाठी अत्यंत कासावीस होते. त्यामुळेच त्यांनी वारंवार मातोश्रीवर फेऱ्या मारून अक्षरशः उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडून युती करायला लावली. युतीसाठी त्यांनी निदान मोघम स्वरूपात तरी सेनेला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले असावे. त्यामुळेच निकालानंतर सेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहिली. मुळात संपत आलेल्या सेनेला तब्बल १२६ जागा देऊन भाजपने स्वतः फक्त १४६ जागा लढविल्या, तेव्हाच भाजप बहुमताच्या १४५ या आकड्यापासून खूप दूर राहणार व सेनेला आपल्या ताकदीपेक्षा खूप जास्त जागा मिळून सेना भाजपला नाचविणार हे दिसत होते. हे ओळखून फडणवीसांनी मित्र पक्षाला दिलेल्या १८ जागा कमळ चिन्हावर लढवायला लावून आपली उमेदवार संख्या १६४ वर नेली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक भ्रष्ट आयाराम पायघड्या घालून भाजपत आणले. किमान २०१४ प्रमाणे १२५ च्या आसपास जागा मिळतील या भ्रमात फडणवीस होते. परंतु मतदारांनी दणका देऊन भाजपला १०५ वरच रोखले (यात मित्रपक्षांचे २ व १७-१८ आयारामांचा समावेश आहे) व फडणवीसांची स्वप्ने उधळली गेली.

In reply to by श्रीगुरुजी

सेनेचे नेते सेनेचा मुख्यमंत्री होईल हे सांगत होते. पण आदित्य ठाकरेचे नाव कोणी घेतले का, इतकेच विचारायचे होते.

+१

१०० टक्के सहमत !

https://maharashtratimes.onelink.me/W6tZ/dd08d9d7 ही महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी पूर्ण वाचा. पुढचा मुख्यमंत्री सेने चाचं असेल असे उद्धव ठाकरे किती तरी वेळेला सभेत म्हणाले आहेत. त्याची लिंक मागू नका ते जग जाहीर आहे. लोकसभा निवडणुकीत युती झाली तेव्हा ती bjp ची गरज होती. आणि सेना तिथेच चुकली.लोकसभे साठी सेने नी युती करायला च नको होती. Bjp ची गरज भागली होती. 370 कलम ,आणि बाकी कारण मुळे bjp स्वबळावर विधानसभा जिंकेल ह्याची खात्री bjp ला होती. त्या मुळे युती करणे निवडणूक पूर्व ही सेनेची गरज होती. लोकसभेत युती करून सेने नी जी चूक केली होती.त्याचा च तो परिणाम होता.

राजकारण असे चालत नाही. युती तुटण्याच कारण मुख्यमंत्री पद हे कधीच नव्हत.जसे तुम्ही समजत आहात. Bjp आणि सेनेची युती बाळासाहेब आणि bjp ह्यांनी का घडवून आणली. हा प्रश्न विचारून बघा स्वतः ला. नंतर काय काय घडामोडी घडल्या त्याचा एकदा विचार करा. मग तुटणे कोणाची गरज होती bjp ची की सेने ची तो विचार करा . मग तुमच्या लक्षात येईल मुख्यमंत्री पद तर फक्त बहाणा होता.

आता जी तीन पक्षाची आघाडी आहे त्या सरकार नी काय काम केली . 1 वर्षाचे सरकार आणि lockdown मध्ये सापडलेले सरकार . त्या सरकार नी काय काम केले त्याचे मापन कोणत्या फूट पट्टी नी करायचे. असे एका वर्षात सरकारी निर्णय होवून काम चालू होत नाही. त्या साठी मला वाटत. काँग्रेस ,राष्ट्रवादी युती सरकार जावून सेना युती सत्तेवर आली आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून राज्यात काय काम झाली त्याचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्री फडणवीस झाल्या नंतर किती धरण बांधली गेली ? किती क्षेत्र पाण्याखाली आले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्या पासून आज पर्यंत प्रशासन गतिमान झाले आहे का. फडणवीस मुख्य मंत्री होते तेव्हा पासून आज पर्यंत भ्रष्ट कारभार जो प्रशासनात होता तो नष्ट झाला आहे का. लोकांची काम सरकारी बाबू वेळात पूर्ण करत आहेत का . नवीन किती युनिट वीज निर्मिती महाराष्ट्रात चालू झाली. आता महाराष्ट्रात ज्या काही सुविधा दिसत आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार च्या काळातील आहेत,मुख्यमंत्री मनोहर जोशी च्या काळातील आहेत. की फडणवीस सरकार नी निर्माण केलेल्या आहेत. पाहिले ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा आणि नंतर आताच्या सरकार ला प्रश्न विचारा.

In reply to by Rajesh188

ह्या घटनांचा आणि करोनाचा, फार काही संबंध नाही उदाहरणार्थ, सामान्य माणसाला घरी बोलावून केलेली मारहाण निवृत्त सेनाधिकार्याला केलेली मारहाण यांचा आणि करोनाचा काहीही संबंध नाही

देशाची राजधानी दिल्ली शहरात आज (बुधवार, 1 जुलै) पेट्रोल 80.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.53 रुपये प्रति लीटर आहे. मात्र, दोन्ही इंधनांचा मूळ दर पाहिला तर तो अनुक्रमे 24.92 आणि 27.03 रुपये प्रति लीटर इतका आहे. दिल्ली मध्ये 24.92 रुपये मूळ किंमत (बेस प्राइज) असलेले पेट्रोल 80.43 रुपये आणि डीजेल 27.03 रुपये असताना 80.53 रुपये प्रति लीटर गेलेच कसे? जाणून घेण्यासाठी इंडियन ऑयल संकेतस्थळावर नजर टाकल्यावर दरांबाबत बरेच काही ध्यानात येते. जे दर 1 जुलै पासून लागू झाले आहेत. पेट्रोल बेस प्राइज 24.92 रुपये प्रति लीटर आहे. ज्यावर 33 पैसे प्रति लीटर दराने भाडे दिल्यानंतर त्याची किंमत 25.25 रुपये प्रति लीटर होते. त्यावर एक्साइज ड्युटी 32.98 रुपये प्रति लीटर, डीलरचे कमीशन 3.64 रुपये प्रतिल लीटर आणि मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट 18.56 रुपये प्रति लीटर असे लागते. त्यामुळे सर्वांचे मीळून होतात 80.43 रुपये. जो दर प्रत्यक्षात ग्राहकालाच द्यावे असे ठरतात पेट्रोल ,डिझेल चे दर. एक्साइज duty हा केंद्र सरकार चा कर आहे.. तो 32.98 रुपये आहे. राज्याने लावलेल्या vat च्या दुप्पट कर केंद्रांनी लावला आहे पेट्रोल ,डिझेल वर. त्या मुळे पेट्रोल चे दर जास्त आहेत त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. भाव वाढीला तेच जास्त जबाबदार आहेत.