Skip to main content

उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 20/10/2020 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही. असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे? तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत? या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.

वाचने 45593
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

कायम समोर पहाणं आणि आजूबाजूला चाललेलं ऐकत रहाणं हे जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन मी शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. १००% अंध व्यक्ती 'पाहणार' कशी? आणि १००% बहिरी व्यक्ती 'ऐकणार' कशी? की हे दोन तुम्ही शोधलेल्या पद्धतीला अपवाद असणारेत? या दोघांना मनात येणार्‍या नकारात्मक विचारांचा त्रास होत नाही का? जरा उलगडून सांगा!

In reply to by उपयोजक

१००% अंध व्यक्ती 'पाहणार' कशी? आणि १००% बहिरी व्यक्ती 'ऐकणार' कशी? की हे दोन तुम्ही शोधलेल्या पद्धतीला अपवाद असणारेत? या दोघांना मनात येणार्‍या नकारात्मक विचारांचा त्रास होत नाही का? जरा उलगडून सांगा!
पूर्ण अंध आणि मूक-बधीर असलेल्या व्यक्तीच्या मेंदूला केवळ स्पर्श आणि गंध या दोनच संवेदनांमधून इनपुट जाईल त्यामुळे अशा व्यक्तीची मेंटल अ‍ॅक्टीविटी न्यूनतम असेल. तस्मात, तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त इतर काही नेगटिवीटी असण्याची शक्यता न्यूनतम आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

या विधानाला काही शास्त्रीय आधार? माझ्यामते हे विधान फारच धाडसी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त इतर काही नेगटिवीटी असण्याची शक्यता न्यूनतम आहे
म्हणजे अंध किंवा बहिऱ्या व्यक्तीला मेडीटेशनची गरज नसते? कि तुम्ही शोधलेल्या मेडीटेशनसाठी त्या व्यक्ती फीट नाहीत?? - (चिकित्सक) सोकाजी

In reply to by सोत्रि

जी व्यक्ती अंध आणि बहिरी आहे तिला काय दिसणार आणि ती काय ऐकणार ? उगीच फालतूचा टाईमपास करण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा स्वतः ते ध्यान करुन पहाणं श्रेयस आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

विचार केला आणि जे काय शिकायचे ते शिकलो! &#128519 - (कोणताही प्रश्न फालतू न समजणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

अति अवांतर : नाना तो कॉकटेल लाऊंज च्या रेसिप्यांचा उपक्रम पुन्हा सुरु करावा हि विनंती विशेष. जुने लेख वाचून भारी वाटलं होतं

कॉम्प्लेक्स काम कसे करावे यासाठी अतुल गावांदे यांचे "द चेकलिस्ट मॅनिफेस्टो" नावाचे उत्तम पुस्तक आहे, ज्यात अनेक क्षेत्रांमध्ये जिथे अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात, तिथे चेकलिस्टचा वापर करून कसे क्वालिटी मेंटेन केली जाते , हे पुस्तकात दिले आहे. चेकलिस्ट सामान्य जीवनात पण खूप उपयोगी आहे, आणि खूप सोप्पी. चेकलिस्टचे अनेक ऍप्स उपलब्ध आहेत.

जे मिळवयचे आहे ते दुय्यम ठेउन, ते मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया असेल (activity), ती करण्यात आनंद वाटत असेल तर ते मग सहज आणि सातत्याने होण्याची शक्यता वाढते.

ज्यात अनेक क्षेत्रांमध्ये जिथे अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात, तिथे चेकलिस्टचा वापर करून कसे क्वालिटी मेंटेन केली जाते हवाई दलाचे/ नौदलाचे विमान जेंव्हा हवेत उडते. मग ते अगदी १५ मिनिटांसाठी का असेना त्याच्या एकंदर १०,००० गोष्टींचा कसून तपास होतो या तपास पालिकेत प्रत्येक तपासलेल्या गोष्टीवर त्याला जबाबदार असणाऱ्या वायुसैनिकाची सही असते. यानंतर प्रत्यक्ष उड्डाणाच्या अगोदर त्याची देखरेख करणारा अधिकारी हि तपस तालिका स्वतः सर्वेक्षण करून पाहतो. त्यामुळे एखादी गोष्ट चुकून राहून गेली असे होतच नाही.( अशीच स्थिती नागरी विमानात सुद्धा असते असे ऐकले आहे) यामुळेच हवाई प्रवास हा अतिशय सुरक्षित झालेला आहे. दुर्दैवाने आपल्याकडे आपले वाहन अशा तर्हेच्या तपासतालीकेचा वापर करून उत्तम स्थितीत ठेवले जात नाही. ब्रेक नीट लागत नसताना सुद्धा अनेक लोक आपली वाहने तशीच चालवत असतात.

आधुनिक काळात .. चेकलिस्ट ,रिमांईंडर ,प्लान बी ची सवय दोन घ्या दोन फ्री ची गेम समजावून घेणे ,शक्यतो एजंट टाळणे पण अपरिहार्य असेल तर त्याचाच वापर करणे ई सवयी लावून घेणे फायद्याचे होईल.

तुम्ही ठरवून उद्या पासून व्यायाम सुरू करू शकता पण ती सवय 7 दिवसाच्या वर टिकवू शकत नाही कोणाच्या सांगण्या वरून व्यायाम ची सवय टिकत नाही. त्या साठी तुम्हाला मनापासून व्यायामाची आवड असावी लागते. व्यायाम करताना तुम्हाला त्यात आनंद वाटला पाहिजे जबरदस्ती नी काम केल्या सारखा तो करून चालत नाही. माझे निरीक्षण. रोज पहाटे गिरगाव चौपाटी वरून हँगिंग गार्डन मार्गे मी चालत ऑफिस ला जायचो अनंत वॉकिंग करणारे रमतगमत वॉकिंग च्या सोहळ्यात सहभागी असतं. आणि काही थोडके च नियमित रोज मनापासून वॉकिंग करणारे दिसायचे. जरा पावूस पडला की सर्व हौसे,नवसे,गवसे गायब असायचे त्या दिवशी. फक्त मनापासून नियमित वॉकिंग करणारे सदा सर्वकाळ उन्ह असू नाही तर पावूस वॉकिंग करत असत. ते खरे वॉकर. बाकी असेच ठरवून वॉकिंग चे नाटक करणारे.

मला वाटतं 'पॅशन' चा अभाव हे उपक्रम न चालण्याचे ऐकमेव कारण असावे. मी काही उपक्रम केले आणि यशस्वीपणे दिर्घकाळ चालू ठेवले, (1) 50 th Bithday ( 20-Oct) पासून हा उद्योग सूरु केलाय, B'day...No cake....मग? धावायचं! 50 th B'day--- 5 km jog 51 th B'day--- 6 km jog 52nd B'day -- 8 km jog 53rd B'day -- 10 km jog 54th B'day -- 12 km jog (all on tread mill) 55 th B'day--- 20 km walk 56nd B'day -- 10 km jog on tread mill 57rd B'day -- 20 km walk 58 th B'day -- 10 km jog on tread mill 59 th B'day -- 13 km cycling-done कुणीही तपासत नसतांना मी अपनेआप शी वादा केल्यासारखा एक दशकभर हे करतो आहे. (2) starmaker वर गाणे म्हणून publish करणे. मागच्यावर्षी सुरवात केली, काहितरी 92 गाणी झालीत,पुढे ही होत रहातील. (3) चालणे, दिड दोन वर्षापूर्वी NRC app वर चालणे नोंदवायला सुरवात केली, 15 दिवसापूर्वी 1000 किमी पार केले असे दिसले, आधी नोंदवत नव्हतो,आता एक हिशोब कळतोय, मजा वाटतेय. (4) यू ट्यूब व्हीडीओज- मागच्या वर्षी Nov 2019 ला सहज म्हणून अकाऊंट सूरु केले, आता पर्यंत 52 videos, प्रवास,recepi,tutorial वगैरे upload केलेत. (5) blog writing - 8 वर्षापासून अधूनमधून ब्लाॅक लिहीतोय,90 plus post झाल्यात,13,500 plus visits दिसतात, ( जरुरी नाही की त्यांनी पूर्ण लेख वाचला असेल) (6) गाण्यांना एक extra अंतरा लिहीणे,छंद म्हणून हा उद्योगही चालू असतो,लिहून स्वत:जवळचठेवणे. तर हे सर्व स्वत:च्या समाधानासाठी करत असतो, आणि चांगली consistency आहे.

In reply to by बाजीगर

वयाच्या साठीतही तुमचा उत्साह आणि दिनचर्येतील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. (तुम्ही दिलेल्या माहीतीवरुन तुम्ही साठीत असाल असं मी गृहीत धरत आहे) तुमच्या ब्लॉगवरील लेखन तसेच युट्युब चॅनलवरील व्हिडीओज वाचायला/पाहायला आवडेल. हे दुवे इथे देणे तुम्हाला उचित वाटत नसेल तर तुम्ही मला व्यनि करु शकता. :)

In reply to by सतिश गावडे

धन्यवाद सतिश गावडे साहेब.

In reply to by बाजीगर

१. स्टार मेकर ऐवजी स्म्यूलवर गाणी म्हणून पाहा, जास्त मजा येईल. मला रोज १०/१२ मुलींचे ड्युएट गायला इनवाइटस येतात. जवळजवळ २०० गाण्यांची लिरिक्स पाठेत. चांगल्या गायिकां बरोबर गायला सॉलीड मजा येते. २. चालणं किंवा धावणं यापेक्षा खेळणं हे जास्त मजेचं आहे. गेली कित्येक वर्ष दिवसाची सुरुवातच > योगासनं, प्राणायाम आणि टेबलटेनीस (करोनाचा कालावधी सोडता) अशी होते. ३. पोहणं हे एक कमालीचं आवडीचं कौशल्य आत्मसात केलं आहे. पाण्याच्या बायोंसीचा एक्झॅक्ट अंदाज आल्यामुळे देह होडीसारखा पाण्यावर तरंगत ठेवून तासंतास जलविहार करण्याचा छंद आहे. आपण, पाणि आणि अथांग आकाश हा ट्रायो जबरदस्त महौल जमवतो. ४. लेखनाची मौज काही औरच आहे. कविता, गजल, ललित कथा, चित्रपट परिक्षणं, कवितांचं रसग्रहण आणि जीवनाला स्पर्श करणर्‍या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर अनेक पोस्टस इथे प्रकाशित आहेत. " ती सध्या काय करते " वरचं परिक्षण ज्योती आळवणींनी सतीश राजवाड्यांना दाखवलं तेंव्हा ते ज्याम खूष झाले. त्यावेळच्या मिपा दिवाळी अंकात राजवाड्यांची मुलाखत आहे. ५. अध्यात्म हा जबरदस्त आवडीचा विषय आहे. मनोगतवर ऐंशीच्या जवळपास लेख वेगवेगळी उपनिषदं, झेन, अष्टावक्र महागिता आणि अध्यात्मातल्या अनेक गुंतागुंतीच्या विषयांचा उलगडा करतात. ६. माझं काम (सीए) हा एक सर्वोत्तम छंद आहे. सीझनला रोज सलग दहा ते बारा तास काम करणं आणि त्यातून व्यावसायिक कौशल्य वाढवत नेणं हे शेवटापर्यंत चालू राहिल.

In reply to by बाजीगर

१. सिंथेसायजर वाजवणे > ५०/६० लोकांसमोर जुन्या हिंदी गाण्यांची इंस्ट्रुमेंटल मैफिल सहजपणे जमवू शकतो. २. चेस.कॉमवर कंप्युटरशी चेस खेळणं > सध्या १२ व्या लेवलला मशीनला हरवू शकतो. यानं लॉजिकल माइंड डिवेलप होतं > कमालीचं फोकसिंग तयार होतं. ३. पत्नी समवेत जवळच्या रिसॉर्टसना (शक्यतो स्प्लेंडर कंट्रीच), हनीमून ट्रीप्स करणं ! . द मोस्ट रिफ्रेशिंग थींग ऑफ लाईफ .

In reply to by संजय क्षीरसागर

ग्रेट तुम्ही स्वतल विविध छंद मध्ये गुंतवून घेत आहात ते नक्कीच प्रशंसनीय आहे. आणि जे उपक्रम हाती घेत आहात ते आवडीने करत असल्या मुळे पूर्णत्वास जात आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या गायन कलेचे कौतुक वाटले. हे गाणे मी पहिल्यांदाच ऐकले त्यामुळे युट्यबर जाऊन मुळ गाणे ऐकले. मुळ रचनेपेक्षा तुमचे गायन थोड्या धिम्या चालीत वाटले पण आवडले. तुमच्या प्रतिसादांबद्द्ल १. कुठलीही गोष्ट लावून धरण्यामागे तुमच्या इंटरेस्टची तीव्रता कारणीभूत असते. लोकांचे इंटरेस्ट फारसे तीव्र नसतात त्यामुळे प्रोजेक्ट फाफलतो. सहमत यापुढे असे म्हणेन की फक्त इंटरेस्ट (आवड) नव्हे तर त्या गोष्टीची गरज त्या उपक्रमाच्या यशाची शक्यता वाढवितो. अर्थात गरजेमुळे बर्‍याचदा आनंदावर पाणी सोडावे लागते हा भाग अलहिदा ! २. आपल्याला जमेल हा अत्मविश्वास असेल तरच त्या उपक्रमावर मेहेनत होते. संदिग्धावस्थेमुळे उपक्रम बारगळण्याची शक्यता प्रचंड. सहमत ३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज) असहमत ! उलट प्रतिकुल परिस्थितीतून येऊन झगडणार्‍यांनी जास्त यश मिळविल्याची उदाहरणे आहेत. ४. लवकारात लवकर थोडं फार यश मिळणं अत्यंत अनिवार्य आहे. जर रिझल्ट येत नसेल तर तुम्ही चुकीची मेथड (उपक्रम नाही) निवडली आहे असा अर्थ होतो. त्यामुळे योग्य मेथड हा एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. असहमत. बर्‍याचदा बर्‍याच जणांना पहिल्या फटक्यात / लवकर यश मिळतं. त्याने त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. मात्र पहिल्याच मिळालेल्या यशाने बरेच जण गाफील होतात त्यामुळे प्रयत्नांत सातत्य आणि प्रयोगशील राहणं हे यश मिळण्यासाठी आणि ते जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अर्थात जग हे नाशिवंत आहे आणि जगातील सगळ्याच गोष्टी नाशिवंत आहेत त्यामुळे 'यश' देखील त्याला अपवाद नाही. तेव्हा अपयश पचविण्यासाठी मनाची तयारी ठेवणे कधीही आवश्यकच.

In reply to by धर्मराजमुटके

धागा विषयातले उपक्रम छांदाचे आहेत, तिथे करु किंवा न करु असा पर्याय असतो. तुमचे विचार उपजिवीकेसाठी राबाववल्या जाणार्‍या उपक्रमांबद्दल आहेत आणि त्या दृष्टीकोनातून ते योग्य आहेत.

In reply to by बाजीगर

चालण्याचे आणि पळण्याचे तुम्ही जे आकडे दिले आहेत ते रोजचे असतील तर तुम्ही 99.99 ,% लोकांपेक्षा उत्तम कामगिरी करत आहात. तुमची आकडेवारी ही सहज साध्य होणारी नाही.

(7) कंत्राटी शेती -शेवगा लागवड पुण्याहून 27 किमी वर मित्राच्या फार्मवरील 10 गुंठे जागेवर 300 शेवगा रोपं लावलीत. 92 जगलीत, जून-2019 ला सुरवात केलीय. गेले 14 महीने महीना रु.6000/-- मजूरी खर्च देतोय, इतर खर्च मिळून आता पर्यंत रु.1,75,000 खर्च केलेत. बघूया.अजून वर्ष दोनवर्ष सहज करु शकेन, हा pilot project म्हणूनबघतोय.

एरंडाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ते काय असतं? त्यातुन कोणत्या प्रतीचं उत्पादन घेता येतं? साधारण एका गुऱ्हाळाला किती खर्च येतो? कुटिलउद्योगाची सबसिडी याला लागु होते का? आपले काही अनुभव असतील तर कृपया व्यक्त करावेत.

मी मि.पा. वाचायची सवय लाऊन घेतली आहे... गेली ५-७ वर्स... नुकताच सभासद झालोय... आणी प्रतीसाद द्यायला सुरवात केलिये... रोजच्या कामातुन विरुनगला आणि मनस्वास्थ्यासाथी उत्तम असे माझे मत आहे..

कोणताही उपक्रम नियमित असावा याचा दुराग्रह असता कामा नये. मला चालण्याची आवड आहे व अपरिहर्यता देखील. तरीही माझ्याकडे बर्‍याच दिवसानी पाहुणा आला तर माझा चालण्याचा " नेम" आहे सबब तुम्ही काहीतरी करीत घरी बसा असा मी आग्रह करीत नाही .तर त्यदिवशी माझा व्यायाम रद्द करतो. मी अनेक जप वाले पाहिले आहेत जे आपली सगळी माणुसकी विसरून काही झाले तरी माझा जप चुकता कामा नये यासाठी विवाह मंडपात देखील कोपर्यात जप करीत बसतील., आलेल्या अतिथीला पुरेसा वेळ देणार नाहीत ! एवढे करून आयुष्यात त्यानी समाधान, शान्ती सहजीवन हे अनुभवलेले असतेच असा काही तर्क आपण काढू शकत नाही. जपाचा माझ्या मते एक फायदा असा असावा की त्याने उलट सुलट विचारान्ची आन्दोलने कमी होऊन निदान तेवढ्या पुरते तरी बी पी कमी होत असावे. यात अमुक अमुक शब्दात सामर्थ्य असते हा मात्र भम्पक पणा आहे. मुळात भाषा ही आवश्यक असली तरी ती वैश्विक कधीच नसते याचा पक्का विचार मनात असला की विशिष्ट जपात काही ताकद आहे यातील फोलपणा कळून येतो. जसे कहरवा या तालात याच्या ग्रीड ला महत्व आहे धागे नति नक धिन या बोलाना नाही. ह्र्दय लब डब करते काय वा टप टप करते काय त्यात अनियमित पणा आहे किन्वा कसे याला महत्व आहे ! आपल्याला जे आवडते ते काही दिवस टाळणे हे मानसिक सामर्थ्य मिळविण्याचे एक साधन नक्कीच आहे. यातून मानसिक गुलामी ( क्रेविंग ) कमी होते. मग ती चांगली सवयअसो वा वाईट !

In reply to by चौकटराजा

छान प्रतिसाद. पण खंड पडायची संधी आपण होऊन शोधू नये किंवा पटकन बळी पडू नये असे वाटते. शिस्तीने राष्ट्र मोठे होते असे म्हणतात ना?

In reply to by चौकटराजा

आपल्याला जे आवडते ते काही दिवस टाळणे हे मानसिक सामर्थ्य मिळविण्याचे एक साधन नक्कीच आहे. यातून मानसिक गुलामी ( क्रेविंग ) कमी होते. मग ती चांगली सवयअसो वा वाईट !
एक नंबर प्रतिसाद. माझेही मत असे आहे कि व्यायामाचीही शरीराला सवय होता कामा नये. कारण नियमित व्यायाम होत असेल तर कालांतराने ते ही रूटीन होते व एखादा दिवस व्यायाम करु शकलो नाही तर शरीर आळसावते. पूर्ण दिवस अक्षरशः दुर्मुखलेल्या अवस्थेत जातो.

In reply to by चौकटराजा

मी अनेक जप वाले पाहिले आहेत जे आपली सगळी माणुसकी विसरून काही झाले तरी माझा जप चुकता कामा नये यासाठी विवाह मंडपात देखील कोपर्यात जप करीत बसतील., आलेल्या अतिथीला पुरेसा वेळ देणार नाहीत !

😀

असेही जपवाले मी पाहिले आहेत की, जे माणूसकीला अतोनात जपतात. विवाह मंडपात अतिथीला व्यवस्थित वेळ देतात. कोणाचीही उपेक्षा करत नाहीत. मात्र जेव्हां त्यांना फावला वेळ मिळतो तेव्हां त्यांचा जप आपोआप सुरू होतो. त्याचबरोबर ते सावधपणे सगळीकडे लक्ष ठेऊन असतात. हा (आपोआप होणारा) जप मनातल्या मनात असल्याने कोणालाच कळू शकत नाही. निदान त्यांनी स्वतःहून सांगितल्याशिवाय ते कोणालाही कळू शकत नाही.

😀


In reply to by शाम भागवत

बरोबर आहे! असे संतुलन साधणारे लोकही असतात. किंबहूना त्यांचा जप अधिक फलदायी होत असावा.कारण त्यात अनावश्यक हेकटपणा नसतो.

माझा चालण्याचा " नेम" आहे सबब तुम्ही काहीतरी करीत घरी बसा असा मी आग्रह करीत नाही
फारच चांगली गोष्ट. दुसर्‍यांची दखल न घेता आपला परीपाठ चालु ठेवणे हे आलेल्या पाहुण्यासाठी अपमानास्पद आहे. (अवांतरः आपण काही बोलत असताना, समोरचा स्वतःच्या मोबाइल मधे व्यस्त असतो, नुसतेच हुं हुं चालु असते , मग मोबाइल मधे बघणे संपल्यावर मग विचारायचे "काय म्हणत होतास ?" हे अतिशय चीड आणणारे. )

या धाग्यावर मिपाचे सर्व पैलवान तेल लावून उतरले आहेत हिच धाग्याची उपयुक्तता ! आता आपण फक्त पॉपकॉर्न खायचे आणि त्रिशतका साठी शुभेच्छा.

💯


बर्‍याच दिवसांनी या धाग्यावर पुन्हा लिहितोय याचं कारण आधी केले मग लिहिले असे करायचे होते.शिवाय एक सुटलेला गुंताही कसा सुटला ते लिहायचे होते. इथे संजय क्षीरसागर यांनी जपापेक्षाही समोर पाहणे आणि आजुबाजूला जे काही आवाज ऐकू येतील ते ऐकणे हे सर्वात सोपे मेडीटेशन असल्याचे लिहिले होते.ते काही दिवस करुन पाहिले.पण त्याची उपयोगिता ही जपापेक्षा कमी असल्याचे माझे निरीक्षण आहे.सदर प्रकार म्हणजे एखाद्या अपार्टमेंटमधला सजग वॉचमन याच्यापलीकडे काहीही नाही.भटके कुत्रे शिरताना दिसले की काठी उगार, अनोळखी माणूस शिरताना दिसला तर आयडी प्रुफ मागणे , संशय आल्यास हाकलून देणे अशी कामे एखादा वॉचमन करतो त्यापेक्षा या पद्धतीत अधिक काही नाही. आता माळ घेऊन जप करणे हे अधिक फलदायी कसे ते सांगतो. माळ घेऊन काही मंत्र मनात पुटपुटून मणी पुढे सरकवणे या प्रकारात मंत्र १०८ वेळा म्हणणे,मणी मागे सरकवणे अशा कृती केल्या जातात ज्यामुळे अवधान जपावर 'केंद्रीत' होते.परिणामत: एकाग्रता वाढते.अवधान परत परत खेचून आणले जाते.अंतिमत: याचा सराव होतो.एकाग्रतेत वाढ होते.संक्षी यांनी सुचवलेला प्रकार हा अतिसंवेदनशील आहे.म्हणजे विशेष अशी कृती नसल्याने समोर पाहण्यातून किंवा भोवतालचे आवाज ऐकण्यातून मनात त्या ऐकू आलेल्या माहितीकडे किंवा समोरच्या दृश्याकडे अोढले जाऊन विचारांच्या प्रवाहात अडकण्याचीच शक्यता जास्त आहे.कारण काम काहीच नाही.शिवाय एखादा विचार आलाच मनात तर त्याला एंटरटेन करायचे नाही.मनात शिरु द्यायचे नाही.हे काम तसे सोपे नाही.म्हणूनच सर्वसामान्य लोकांना हा मार्ग तितकासा सोपा नाही.तस्मात जप जिंदाबाद! आता कोणता गुंता कसा सुटला ते सांगतो.जप करताना मधेच मन भरकटण्याचे कारण होते 'श्रद्धा नसणे'.अशा प्रकारे जप करणे हे काहीतरी दैवी/धार्मिक काम आहे आणि देव वगैरे वास्तवात काही नसल्याने या जपाला काही अर्थ नाही;आपण वेळ वाया घालवतोय वगैरे अतिचिकीत्सक तत्वज्ञानामुळे जप मधेच सुटायचा.श्रद्धा हा प्रकार केवळ भगवंतासमोर हात जोडणे,पुजा करणे अशा धार्मिक कार्यापुरताच मर्यादित आहे असा माझा गैरसमज होता. दरम्यान श्रद्धा या विषयावर मिपावरचेच धागे चाळताना हा धागा https://www.misalpav.com/node/41837 हाती लागला. श्रद्धेबद्दलचा गैरसमज या धाग्यातल्या या प्रतिसादामुळे दूर झाला. https://www.misalpav.com/comment/978992#comment-978992 श्रद्धेचा व्यापक अर्थ या प्रतिसादामुळे उमजला.थॉर माणूस यांनी ती श्रद्धा नव्हे असे म्हटले असले तरी पुढच्या प्रतिसादात श्री अरुण जोशी यांनी नेमका प्रश्न विचारला आहे. https://www.misalpav.com/comment/979062#comment-979062 त्याला काहीच उत्तर मिळाले नाही.ते तसे 'न मिळणे' साहजिकच होते. श्रद्धेबद्दलचा साधारण असाच पण मोघम स्वरुपातला विचार बर्‍याच वर्षांपूर्वी मी डॉ.राजेंद्र बर्वे यांच्या या https://youtu.be/7g8um6PWEXk (6.26 पासून ऐका) व्हिडिओत ऐकला होता पण त्याचा अदैवी/अधार्मिक असा व्यापक अर्थ मात्र गॅरी ट्रुमन यांच्या प्रतिसादामुळे समजला. ट्रुमन आणि arunjoshi123 यांचे तसेच हा उपयुक्त धागा काढल्याबद्दल आनन्दा यांचेही मनापासून आभार! _/\_

In reply to by उपयोजक

ओशोंनी म्हटलंय की साधक शेवटी स्वतःच्या अक्कल हुशारीनंच गुरु निवडतो ! त्याची आठवण झाली. १. बरोब्बर एक महिन्यापूर्वी आपले विचार बरेच सूज्ञ होते असे वाटते : जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते.पुढे पुढे १-२ दिवस खंड पडतो.मग बळजोरीने परत काही दिवस रेटले जाते.हा खंड पडण्याचा कालावधी वाढला तर उत्साह जवळपास संपल्यात जमा होऊन उपक्रम थंडावतो.मी आचरत असलेल्या उपायामुळे मला फायदा होणार आहे हे मला १००% माहित आहे.तसूभरही शंका नाही. सारांशाने सांगायचे तर उपक्रम बारगळ्याचे कारण हे त्या उपक्रमाच्या प्रक्रियेतला 'एकसुरीपणा' हे आहे. यावर काय उपाय करता येईल? २. आजच्या प्रतिसादावरुन असे दिसते की आपल्याला जपाचा उपक्रमच पुढे रेटायचा होता फक्त त्यासाठी आवश्यक मानसिक सामुग्री जमा करण्यासाठी हा विसविशित धागा काढला होता. त्या वेळीआम्ही जोखिम पत्करुन आपल्यास आणखी रेटले, त्यामुळे आपला नेमका मनसुबा समोर आला. ते एक असो, आता मुद्दा असा की आपण श्रद्धेचा आश्रय घेऊन तो रेटा पुन्हा मारण्याचे ठरवल्यामुळे सद्य परिस्थितीत आपला गुंता सुटला आहे असे आपणास वाटते आहे. ३. आपण श्रद्धेवर वाचन करण्याऐवजी इथले जपचंडी श्री शामराव भागवत यांच्या गेली तीस /पस्तीस वर्ष राबवलेल्या याच उपक्रमावरचे फलित दर्शवणारा हा धागा अप्रिय आठवणींपासून सुटका वाचला असता तर कालापव्यय टळला असता असे वाटते. कारण तिथे आम्ही यावर विस्ताराने लिहिले आहे व श्री शाभा आता आम्ही दिसलो की फक्त ॐ शांती: शांती: शांती: हा एकच जप करतात.

बहुधा तुम्हाला माझा http://www.misalpav.com/comment/1087107#comment-1087107 हा प्रतिसाद आवडला नाही.कारण त्यात मी तुम्ही सुचवलेल्या उपायाची जपाच्या तुलनेत मर्यादा दाखवली आहे. वास्तविक मी आधी केले मग सांगितले आहे. मला समस्या सोडवणारा उपाय मिळणे माझ्यासाठी महत्वाचे होते.तो उपाय काय आहे नि कोणी सांगितला हे नव्हे.यात जपाचा उपाय श्रेष्ठ ठरला कारण त्याचे तंत्र अधिक फलदायी आहे इतकेच! शाम भागवतांच्या जपसाधनेचा त्यांना छळणार्‍या अप्रिय आठवणींपासून सुटका न होण्याशी संबंध कसा काय म्हणे? जप केला की अप्रिय आठवणी येणे थांबते असे कुठे लिहिले आहे का? असो! माझ्यापुरता माझ्या समस्येचा गुंता सुटला हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.

In reply to by उपयोजक

असे वाटते.
१. जप केला की अप्रिय आठवणी येणे थांबते असे कुठे लिहिले आहे का ?
हाच तर त्यांनी शोधलेला उपाय आहे आणि त्याला कल्पनेतल्या घोडेस्वाराला क्षमा करण्याचा मार्ग सांगितला आहे. शिवाय तीस वर्ष जप करुनही वास्तव आणि कल्पना यातला फरक उमगू शकत नाही असा निष्कर्ष आम्ही आमच्या मतीनं काढला आहे. आमच्या ध्यानपद्धतीत कमालीची सजगता येते असा अनुभव आहे. जास्त काय लिहावे ? याउप्पर आपली इच्छा.