✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डीडीएलजे : स्वप्न दाखवण्याची २५ वर्षे

म
महासंग्राम यांनी
Tue, 10/20/2020 - 15:37  ·  लेख
लेख
विसाव्या शतकाच्या अखेरीस भारताने आपली आर्थिक धोरणं बदलली आणि दोन-चार वर्षांत त्याचा परिणाम इथल्या मध्यमवर्गावर दिसू लागला.लोकांच्या खिशात खुळखुळणारा पैसा वाढला होता,उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या दुचाकीला लोकाश्रय मिळु लागला होता, केवळ सिनेमात दिसणारे ब्रँड्स भारतात आपली दालनं उघडू लागले होते. या साऱ्याचा बदल इथल्या तरूणाईवर होणं स्वाभाविक होतं. त्यांच्या इच्छा,स्वप्न यात कमालीचा बदल झाला तो ही फार झपाट्याने. याच बदलाच्या टप्प्यावर 'राज मल्होत्रा' भारतीय तरुणांना भेटला (आणि तरुणींना भावला.) उनाड,मित्रांसोबत गाड्या उडवत फिरणारा, मेंडोलीन वाजवणारा बेजबाबदार. युरो-ट्रिपच्या एका प्रवासात सिमरनवर भाळणारा, प्रेमात पडून जबाबदार होणारा वैगेरे अनेक बाजू असलेला, त्याची नायिका त्याच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची.बुजरी, शिस्तीत वाढलेली, वडिलांनी हिच्या संमतीशिवायच तिचं लग्न ठरवलेलं. रडून,भेकून,तिच्या घरच्यांना पटवून धावत्या रेल्वेत सिमरनचा हात पकडणारा राज हा पुढे अनेक (खऱ्या) प्रेमकथांची प्रेरणा ठरला, त्याचप्रमाणे मराठी लोकांमध्ये करवाचौथ सारख्या प्रथा पण घुसडल्या गेल्या. गावातून शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या तरुणींना वडील 'जी ले अपनी जिंदगी' म्हणू लागले. दिलवाले दुल्हनिया मध्ये आदित्य चोप्राला राज मल्होत्राच्या रोल साठी ' टॉम क्रूझ' ला घ्यायचं होतं, पण सुदैवाने यश चोप्रांनी याला नकार दिला (आता सिमरन ला पलट म्हणणाऱ्या टॉम क्रूझ ची कल्पना सुद्धा करू शकत नाही). डर, बाजीगर सारख्या चित्रपटांमुळे आधी अँटी हिरो इमेज असलेल्या शाहरुख खानला या सिनेमाने रोमँटिक नायक केलं,'अमिताभ नंतर कोण?' या प्रश्नाचे तितके प्रभावी नसले तरी तितकेच यशस्वी बॉलिवूडला मिळाले होते. 'दिलवाले दुल्हनिया..' प्रदर्शित होऊन आज २५ वर्षे लोटली.थेम्स आणि सतलजमधून आता बरंच पाणी वाहून गेलं आहे, Trafalgar Square पाशी कबुतरांना दाणे टाकायलाही तिथल्या प्रशासनाने बंदी घातली आहे म्हणे. , सध्या नात्यांच्या संकल्पनाही काळानुरूप बदलल्या. पण 'दिलवाले दुल्हनिया..'ची मोहिनी मात्र आजही कायम आहे. खऱ्या आयुष्यात राज मल्होत्रा च्या बापासारखा बाप कुठे खरच असतो का हे नाईंटीज वाली पोरं अजूनही शोधत आहेत. बाकी प्रेमकथा पडद्यावरच नेहमी मोहक वाटतात पण खरं आयुष्य माणसाला वासेपूर मधला 'फैजल' बनवतं ......! १३२
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पंजाबी
मिसळ
प्रवास
भूगोल
देशांतर
मौजमजा
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16482 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

हिंदुस्थान मे जब तक सनीमा है,

भीमराव
Tue, 10/20/2020 - 16:04 नवीन
हिंदुस्थान मे जब तक सनीमा है, लोग *** बनते रहेंगे. - लोकसंत रामाधीरसिंग
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

महासंग्राम
Tue, 10/20/2020 - 16:07 नवीन
अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

बॉलिवूडच्या सतत रद्दड कथेच्या

साहना
Wed, 10/21/2020 - 12:30 नवीन
बॉलिवूडच्या सतत रद्दड कथेच्या चित्रपटांपेक्षा जास्त कुतुहूल मला अश्या लोकांचे वाटते जे लोक हे चित्रपट पैसे देऊन पाहतात. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे इतका मूर्खपणाचा चित्रपट होता..... एका सिन मध्ये शाहरुख आणि काजोल ट्रेन मध्ये जाताना काजोलच्या अगदी अंगावर पडतो, मग तिचे कपडे काढतो (तिच्या बॅग मधून, अंगावरील नव्हे) इत्यादी. कुठल्याही रोमियोने हा प्रकार मुंबईतील ट्रेन मध्ये केला तर तो पुन्हा प्रेम करायच्या लायकीचा राहणार नाही ! मुळांत प्रेम म्हणून असल्या गोष्टी दाखवणे हेच बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

हो बरोबर..

योगी९००
Wed, 10/21/2020 - 13:16 नवीन
हो बरोबर.. बरेचसे सिन न पटण्यासारखे होते... घरी वडीलांना घाबरून "ओम जय जगदीश " करणारी काजोल प्रवासात मात्र चर्च मध्ये प्रेयर ऑफर करायला जाते. मी परदेशात बरीच वर्ष राहीलो. एकाही चर्च ला प्रेयर साठी कधी गेलो नाही किंवा जावेसे वाटले नाही. (फक्त काही चर्च बघण्यासाठी मात्र गेलो होतो). तसेच काजोल ट्रेनमध्ये पुस्तक घेऊन वाचत बसली असताना बाजूने पुस्तकात डोकावण्याऐवजी शाहरूख पुस्तकाच्या खालून डोके घालून (म्हणजे ते पण तिच्या सर्वांगाला स्पर्श करत) ती काय वाचते आहे असे प्रयत्न करतो. आपण प्रवासात कोठेही अनोळख्या व्यक्तीच्या पुस्तकात बाजूनेही डोकावण्याचे धाडस करणार नाही. हा मात्र एकदम अंगचटीला जातो. तिला ही त्याचे जास्त काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

टॉम क्रूझ ?

योगी९००
Tue, 10/20/2020 - 19:39 नवीन
टॉम क्रूझला हिंदी चित्रपटात ? त्याने आत्तापर्यंत चित्रपटाने जेवढा धंदा केलाय तेवढे पैसे घेतले असते.
  • Log in or register to post comments

अगदी खरंय

महासंग्राम
Tue, 10/20/2020 - 21:50 नवीन
अगदी खरंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

गुगल

शा वि कु
Wed, 10/21/2020 - 09:27 नवीन
गुगल प्रमाणे सध्या टॉम पेक्षा शाहरुख जास्त प्रति सिनेमा जास्त पैसे आकारतो. खरे खोटे शाहरुख (आणि टॉम) जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

१९९५

तुषार काळभोर
Wed, 10/21/2020 - 15:10 नवीन
१९९६ च्या मिशन इम्पॉसिबल साठी टॉम क्रुझ ला ७ कोटी डॉलर्स मिळाले होते. शाहरुखला आता तीन कोटी डॉलर्स एका चित्रपटाला मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

सुदैवाने यश चोप्रांनी याला नकार दिला

उपयोजक
Tue, 10/20/2020 - 21:16 नवीन
कदाचित दुबईतून भाईचा फोन यश चोप्रांना आल्याने 'टरकून' चोप्रांना ही संधी शाहरुखला द्यावी लागली असावी. ;)
  • Log in or register to post comments

आणि

Gk
Wed, 10/21/2020 - 07:25 नवीन
आणि मग चांदणी , सिलसिला बनवताना कुनाचा फोन आला होता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

झक्कास चित्रपट

तुषार काळभोर
Wed, 10/21/2020 - 08:10 नवीन
युरो ट्रीप हा सर्वात आवडता भाग. तो सोडून बाकी पिक्चर आता अर्ध्या तासात बसवायला लागेल. अमरीश पुरी एक लंबर अनुपम खेर जरा बालिश, पण पोराच्या मागे खंबीर पणे उभा राहतो प्रत्येक वेळी. आणि शाहरुख ... किलर! ' पलट ' चा सीन त्याच्या इतका चांगला कुणाला जमला नसता.
  • Log in or register to post comments

हा सिनेमा सुमारच होता.

प्रचेतस
Wed, 10/21/2020 - 14:03 नवीन
हा सिनेमा सुमारच होता. ह्याच्यापेक्षा हम आपके है कौन नक्कीच भारी आहे.
  • Log in or register to post comments

हम आपके है कौन

तुषार काळभोर
Wed, 10/21/2020 - 15:04 नवीन
लो चली मै गाण्यानंतर पाहवत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्यानंतर एकदमच सूर बदलतो

प्रचेतस
Wed, 10/21/2020 - 15:08 नवीन
त्यानंतर एकदमच सूर बदलतो सिनेमाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मी फक्त रेणुका शहाणे

महासंग्राम
Wed, 10/21/2020 - 18:49 नवीन
मी फक्त रेणुका शहाणे पायऱ्यांवरून पडते तेव्हा पर्यंत पाहतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

3 वर्षांपूर्वी पुन्हा पाहिला होता

Gk
Wed, 10/21/2020 - 15:48 नवीन
मराठा मंदिर मुंबई सेंट्रल अजून सुरू आहेImage removed.
  • Log in or register to post comments

प्रिटेन्शियस मुव्ही रिव्यूज

शा वि कु
Wed, 10/21/2020 - 15:51 नवीन
यांचा ddlj वरचा व्हिडीओ भन्नाट आहे. https://youtu.be/TOZyX3bv2Hc
  • Log in or register to post comments

तीनही खान ( आणि अजुन कोणी

दुर्गविहारी
Wed, 10/21/2020 - 18:36 नवीन
तीनही खान ( आणि अजुन कोणी असतील ते ) डोक्यात जात असल्यामुळे हा किंवा इतर चित्रपट बघायचा प्रश्नच येत नाही.बाकी हि चित्रपट मराठा मंदिरमध्ये चालविला गेला आहे.केवळ रेकॉर्ड्साठी. अधिक काही लिहायची इच्छा नाही.
  • Log in or register to post comments

बाई रेल्वेचे सगळे डबे आतून जोडलेले असताना

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/21/2020 - 23:52 नवीन
त्याच्या हातामागे धावत जाते....... अशा मठ्ठ बाईला ह्या हकल्याशिवाय चांगला मुलगा मिळणार नाही हे अमरीशपुरी ओळखून चुकले आणि त्यांनी तिचा हात सोडला शेवटी !
  • Log in or register to post comments

लोल ! :-))))

दुर्गविहारी
गुरुवार, 10/22/2020 - 11:07 नवीन
लोल ! :-)))) करणं जोहरी आणि चोप्राचे चित्रपट बघताना मेंदूचा वापर बंद करायचा. तरच सुसह्य होऊ शकत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

हाहाहाहाहा

महासंग्राम
गुरुवार, 10/22/2020 - 11:40 नवीन
हाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

जडत्वाचा नियम पाळला असेल

Gk
गुरुवार, 10/22/2020 - 17:19 नवीन
गाडी चालू आणि आपण लगेच चढले तर आपण पडू थोडे पळून पकडले तर धक्का कमी लागेल असा माझा अंदाज आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा