Skip to main content

नोटबंदी गैरव्यवस्थापन माजी पंतप्रधानांची जबाबदारी ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 24/11/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय मनमोहनसिंगजी, मोदी सरकारने रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यन केल्या संबंधाने आपण आपले राज्यसभेतील टिकात्मक भाषण वाचनाचा योग आला. रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यनाच्या उद्दीष्टांबद्दल आपणास शंका नसल्याचे आपण म्हटले आहे. प्रश्न केवळ इंप्लीमेटॅशन (अमलबजावणी) मधील त्रुटींचा आहे या त्रुटी म्हणजे भलेमोठे गैरव्यवस्थापन आहे असे आपण आपल्या भाषणातून म्हटले आहे. दोन आठवडे कालावधीनंतरी ज्या प्रमाणात सामान्य जनतेस चलन उपलब्ध होणे अवघड जात आहे ते पाहता अमलबजावणी आणि व्यवस्थापनात त्रुटी शिल्लक राहील्या हे निश्चित. जुने चलन बाद केल्यानंतर नवे चलन किती लागेल आणि नव्या चलनाच्या छपाईस किती वेळ लागेल इत्यादी गणिते इकॉनॉमीक सेक्रेटरी आणि रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर यांच्या बोटावर असणार त्या गणितात ते खूप चुकले असतील अशी संभावना कमी आहे. कॅश वाहून नेण्यास सुरक्षा रक्षकांसहीत सक्षम वाहने किती आहेत आणि १००च्या नोटांसाठी अधिक वाहने अधिक सुरक्षा रक्षक लागतील का ? एटीएमचे रि कॅलिब्रेशन करण्यासाठी अधिक अधिक इंजिनीअर्स आणि तंत्रज्ञांचा ताफा लागेल का ? डिजीटल तंत्रज्ञानाकडे किती ट्रँझॅक्शन्स वळवावे लागेल आणि सामान्य सजनेस डिजीटल तंत्रज्ञान डेबीट कार्ड इत्यादी वापराची जागरूकता अभियानाच्या गरजा काय असू शकतील ? या मुद्द्यांवर काम करण्यास सध्याचे सरकार कुठेतरी कमी पडले हे स्प्ष्ट दिसतच आहे. यातील डिजीटल तंत्रज्ञानाचा भाग अलिकडचा गेल्या दशकाभरातला याला काही क्षणासाठी बाजूला ठेऊ. जे गैरव्यवस्थापन आणि त्रुटी शिल्लक राहील्या त्याचे मोदी सरकारचे आणि सध्याच्या आरबीआयच्या गव्हर्नरांचे माप त्यांच्या पदरात नक्कीच टाकू. माननीय मनमोहनसिंगजी, आपण ज्ञान आणि अनुभवाने या सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहात आणि आपण महत्वाच्या प्रसंगी भारतीय अर्थव्यवस्थेस सावरुन धरण्यात मोठी कामगिरी बजावलीत त्या बद्दल आदरच आहे. आता आपण विरोधीपक्षात आहात, विरोधीपक्षात बसून दोष दिग्दर्शनाची जबाबदारीही (उत्तमपणे ?) निभावताय आणि विरोधीपक्ष जिवंत असल्याचे दिसते आहे हे पाहून बरेच वाटते पण प्रश्न राहतो तो नोटांचे निर्मुल्यन करून नवीन नोटा व्यवहारात उपलब्ध करुन देताना राहीलेल्या त्रुटींच्या जबाबदारींची चर्चा करताना मागील सरकारांची आणि आरबीआय मध्ये मागील काळात जे कामास होते त्यांची सुद्धा जबाबदारी निश्चीत करण्याचा. माननीय मनमोहनसिंगजी, भारतातील काळ्या पैशाचा रोग अती जूना आहे आणि चलन न्रिर्मुल्यन हा त्यावरील एक महत्वाचा उपाय आहे हे आपल्यापेक्षा अधिक चांगले कुणास ठाऊक असेल ? मोदी सरकारने चलन निर्मुल्यन आत्ताच करावे एवढी इमर्जन्सी आत्ता होती किंवा नव्हती हा कदाचित वादाचा विषय असेल याचा निकाल काळाच्या ओघात इतिहास देईलच पण इकॉनॉमीक इमर्जन्सी विवीध कारणाने जगातल्या कोणत्याही देशा च्या कोणत्याही सरकार समोर येऊ शकतात याची आपणास कल्पना नसेल असेही संभवत नाही. असे चलन निर्मुल्यन अचानक करावे लागले तर ऐनवेळेची पळापळ नको म्हणून त्यासाठी काय पुर्वतयारी असावयास हव्यात आणि त्या किमान प्रमाणावर प्रत्येक सरकारने केलेल्या असावयास हव्यात की नको ? माननीय मनमोहनसिंगजी, आपण १९७० -७६ असा दीर्घकाळ भारत सरकारच्या सल्लागारपदांच्या विवीध पदांवर काम केलेले आहे, १९८२ ते ८५ आरबीआयचे गव्हर्नर होता, चलन निर्मुल्यनाच्यावेळी काय स्वरुपाची यंत्रणा लागते त्याचा तुम्हाला तेव्हा आढावा घेण्याची संधी येऊन गेली असेल, १९८५ ते १९८७ या कालावधीत नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद आपण भूषवले आहे त्या कालावधीत आवश्यक यंत्रणेसाठी लागणार्‍या तरतूदी करून ठेवण्याची आपणाकडे संधी होती, १९९१ ते १९९६ तब्बल पाच वर्षे आपण अर्थमंत्री पद सांभाळले आणि २००४ ते २०१४ एवढा मोठा काळ पंतप्रधानपद सांभाळले ज्या काळात यंत्रणेच्या गरजा तपासणे, आर्थिक आणि व्यवस्थापन विषयक नियोजनाची तयारी करुन ठेवणे आपणास निश्चित शक्य असावे किमानपक्षी आता आल्या आहेत तशा अडचणी येऊ शकतात याची आपण कुठे तरी नोंद करून ठेवलेली असणे अभिप्रेत असावे आणि म्हणून जे काही गैरव्यवस्थापन झाले आहे त्यात मोदी सरकारच्या सोबतच नैतीक जबाबदारीचे हक्कदार म्हणून अंशतः तरी आपल्याकडे का पाहू नये ? आम्ही सामान्य नागरीक सत्ताधारी अथवा विरोधीपक्षात नाही आहोत टिका करावयाची म्हणून टिका यात रस नाही. भारतासाठी अण्वस्त्र सज्जतेसाठी पुर्वाश्रमीच्या काँग्रस सरकारांनी परिश्रम घेऊन ठेवले आणि निर्णय घेण्याच्या वेळी भाजपा सरकार होते आम्ही क्रेडीट दोन्ही पक्षाच्या सरकारांना दिले. जी व्यवस्थापन विषयक पुर्वतयारीत अण्वस्त्र आणि कदाचित इतरही अजून बर्‍याच गोष्टीत काँग्रेस सरकारांनी आणि आपण केली असेलही त्या बद्दल नावे ठेवण्याचा उद्देश नाही, पण चलन निर्मुल्यनासाठीच्या पुर्व तयारीच्या सहभागात आपण आणि काँग्रेस कुठे कमी पडली नाही ना ही सामान्य नागरीक म्हणून आलेली शंका आहे. विषय निघालाच आहे तर १९९१ ते १९९६ या काळात आपण जाचक आयातकर अत्यंत वेगाने कमी करत नेले याचा आयात वस्तु विकणारा एक सामान्य विक्रीप्रतिनिधी म्हणून मी आठवण जतन केली आहे त्या काळात अर्थमंत्र्यांचे बजेट भाषण सुट्टी टाकून ऐकत असे आणि नंतर वाचत असे त्याच कालावधीत वस्तुंच्या उत्पादनावरील कर आपल्या सरकारने त्याच प्रमाणात का कमी केले नाहीत भारतात निर्मित वस्तु पेक्षा आयात वस्तु स्वस्त होऊ देण्या मागील आपली भूमिका आजतागायात मला व्यक्तीशः समाधानकारकपणे उलगडलेली नाही. आम्ही सामान्य नागरीक आपल्या ज्ञान आणि अनुभवाएवढी उंची गाठू शकत नाही मनात शंका येणे स्वाभाविक असते या शंकांसाठी आपल्याकडे निश्चित उत्तरे असतील. मिसळपावसारख्या संस्थळावर तेही मराठीतून उत्तरे देणे आपणास शक्य असणार नाही त्यामुळे माझेच लेखन बरोबर असा माझा कोणताही अट्टाहास नाही चुक भूल देणे घेणे. माननीय मनमोहन सिंगजी, एकुण मनाला सलणारी हि शंका शिल्लक आहे, आपल्या टिकेतील गैरव्यवस्थापनाचे माप अंशतःतरी आपल्याही पदरात पडत नाही का? आभार आपला आदर करणारा भारताचा एक सामान्य नागरीक

वाचने 60257
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

मागच्याना दोषी घोषित केले की आजची सुटका होते पण आजन्म नाहीं. मूळ मुद्दा हाच की गृहपाठ न करता तुघलकी निर्णय लादलाय वर देशभक्तिचा मुलामा. जोडीला नव-नवीन कल्पनांचे रूपांतर नियमात करुन परिस्थिति नियमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहता भारत कुठे वसतोय हे अजून सरकार व यंत्रणा यांना उमगलेले नाहीं हे कळून खंतावतोय व अनुभव घेतोय की का देश प्रगति करु शकत नाहीं. निसर्गाचे उजवे दान वाया घालवण्याचा करंटेपणा केलाय या अंमलबजावणीचा विसर पाडून. सखेद आश्चर्य एकच वाटते की एकही अधिकारी सक्षम नाहीं का एक निश्चलिकरण प्रक्रिया या भारत देशात राबवण्यासाठी काय व कितपत दक्षता घ्याव्या लागतील याचा अंदाज व कृती आराखडा तयार करण्यास? रिकॅलिब्रेशन असे गोंडस नाव दिले ATM Machine ला ज्या कॅसेट वापरतात त्या प्रत्येक यंत्र उत्पादकाची अंतर्गत रचना वेगळी असून नवीन नोटांचा आकार आधीच्या ( कॅसेट) खणात बसत नाहीं. आणि हे म्हणे डिजिटल इंडिया साकारणार! कॅसेटचा साचा नवीन बनवून मग नवीन खण बसवल्यावर हे नवीन नोटा देणार यंत्र. ६ महिने २२लाख मशीन. ५०० नोटा अजून दृष्टिस पडत नाहींत-कारणे माहीत नाहीं -जेटली सांगत होते पर्याप्त साठा आहे, १५ दिवसांत सर्व सुरळीत होईल. आज १५ दिवस सरले- परिस्थिति जैसे थे. शेतकरीचे पीक नाशवंत - उदाहरण टोमॅटो- रु २/ किलोग्राम.

In reply to by नमकिन

शेतकरीचे पीक नाशवंत - उदाहरण टोमॅटो- रु २/ किलोग्राम.
नोटाबंदी आता झाली. भूतकाळात असंख्य वेळा नोटाबंदी नसतानाही टोमॅटोचे भाव या पातळीवर किंवा त्यापेक्षाही खाली येऊन शेतकर्‍यांनी टोमॅटो फेकून देऊन लाल चिखल केला होता. हे भाव पडण्यामागे नोटाबंदी निर्णयाचा काहीच संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

नोटाबंदीचा संबंध नाही?? असे बेजबाबदार विधान तुमच्याकडूनच अपेक्षित होते गुरुजी. ग्रीनहाऊस गॅसेस, ओझोन थराची हानी किंवा अंटार्टीका मधला बर्फ नोटाबंदीमुळेच वितळला की. हेच का तुमचे अच्छे दिन?

In reply to by मोदक

ग्रीनहाऊस गॅसेस, ओझोन थराची हानी किंवा अंटार्टीका मधला बर्फ नोटाबंदीमुळेच वितळला की. ~ छ्या! काहीतरीच काय, ते तर काँग्रेसने करून ठेवलेल्या सत्तर वर्षांच्या घाणीमुळे झालंय ना?

मला माहित आहे मोदींच्या अनेक निर्णयांमुळे माझ्या अनेक मित्रांना त्रास होतो. याचे कारण खरा त्रास नसून तो इतके वर्ष बाळगलेल्या फालतू विचारसरणीचा पराभव होतो आहे हे त्यांना पटत नाही.पण पर्याय नाही.

In reply to by सुबोध खरे

याचे कारण खरा त्रास नसून तो इतके वर्ष बाळगलेल्या फालतू विचारसरणीचा पराभव होतो आहे हे त्यांना पटत नाही. +१००० त्यातील मुख्य म्हणजे, "भारत कधीच सुधारणार नाही. म्हणून मी काही छोटेमोठे अवैध करतो ते सर्व माफ आहे" असे आपल्या अवैध कामाचे समर्थन करण्याची प्रवृत्ती. आता, "ती कामे व विचारसरणी, दोन्हीही बरोबर नव्हते" याचा गिल्ट काँप्लेक्स, सत्य स्विकारणे कठीण करणारच. कारण, "मी/माझा विचार इतका चूक/खोटा कसा असू शकतो?" असा इगो आड येतोय. पण, चांगल्या सवयींचे क्रिटीकल मास जमा झाले की त्या नवीन सवयीही अंगवळणी पडतील.

गुरुजी, . स्वत: बँकेत गेलात तर चेक वापरून स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येतात हा अनुभव मी ३ वेगवेगळ्या बँकेत घेतला आहे. मनमोहन सिंगांचा मूळ मुद्दा होता की खात्यातून पैसे काढायला बंदी आहे असा भारत एकमेव देश आहे. परंतु या आरोपात १०% सुद्धा तथ्य नाही. ^^^ बँकेत पुरेशी कॅश असेल तरच पैसे मिळतात, 10000 चे लिमिट आहे पण ते कागदावर, त्याचा अर्थ तेवढे मिळतीलच असा होत नाही. या संदर्भात अनेक बातम्या उपलब्ध आहेत.

In reply to by संदीप डांगे

भले बॅंकेतून दहा हजार किंव्हा बँकेत पुरेशी कॅश असेल तेवढे पैसे, आजही मिळत आहेतच की, मग मनमोहन सिंगांचा "खात्यातून पैसे काढायला बंदी आहे असा भारत एकमेव देश आहे" हि अफवा पसरवायची काय गरज होती ?

In reply to by संदीप डांगे

१. चेकने पैसे काढण्याची सीमा सद्या एका आठवड्यात रु२४,००० व तेही एकाच वेळेत (पहिल्यासारखे दोन चेकने वेगवेगळ्या दिवशी नाही)काढता येतील इतकी वाढवलेली आहे. २. एटीएमची सीमा दिवशी रु२,५०० पर्यंत वाढवलेली आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या सीमा अनेक खाती असल्यास दर खात्यासाठी वापरता येतील. खरेच मोठ्या प्रमाणात रोख पैशांची गरज असलेल्यांची बहुदा अनेक खाती असतात. म्हणजे प्रत्यक्षात त्यांना रु२६,५०० X खात्यांचा आकडा इतके रोख पैसे दर आठवड्याला काढता येतील. यापेक्षा जास्त पैशांची गरज असलेली व्यक्ती, खात्यात जमा असण्याच्या सीमेत, हव्या तेवढा रकमेचे व्यवहार चेकने किंवा ऑनलाईन करू शकते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर, नियम आहेत हे कुणीही अमान्य केलेले नाही, फक्त ग्राउंड वर त्याची व्यवस्था अनेक ठिकाणी पूर्तता होत नाहीये एवढेच मी मांडले , अनेक बँकांना रोख रकमेचा तुटवडा जाणवतोय व तो वैयक्तिक नसतो. कलेक्टिव्ह आहे. माझ्या लाईनमध्ये उभ्या असलेल्या पहिल्या दहा व्यक्तींना नीट रक्कम मिळाली पण शेवटच्या व्यक्तीलाही मिळेलच हि रोखीच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. अशा रोख उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रात येत आहेत. राष्ट्रीय पातळींवर येतीलच असे नाही.

In reply to by संदीप डांगे

मी फक्त अद्ययावत माहिती दिली. बँकाबॅकांच्या कामात फरक आहे व अजूनही सर्वच ठिकाणी कमीजास्त त्रास आहे यात वादच नाही. या गोंधळापूर्वी माझे जुने कार्ड बाद करून बँकेने मोठ्या कौतूकाने नवे (व त्यांच्यामते जास्त भारी) कार्ड देण्याची कारवाई सुरू केली. नवे कार्ड दहा दिवसांपूर्वी घरी येऊन पडले आहे. काल ते एटीएमने अ‍ॅक्टिवेट करायला येऊ का असे मॅनेजरला फोनवर विचारले तर त्याने, "सर खूप गर्दी आहे. चारपाच दिवसांनी या" असे सांगितले. यात माझी काही दिवसांची गैरसोय झाली आहे. पण, कार्ड अ‍ॅक्टिवेट करायलासुद्धा येऊ नका इतकी एटीएमसमोर गर्दी आहे याचा अर्थ माझ्या बँकेच्या एटीएममधून लोकांना पैसे मिळत आहेत, ही गोष्ट मला आनंदाची वाटली. सर्वसाधारणपणे, सरकारी काम "अधिसूचना व तिच्या पूर्वतयारीसाठी काही मुदत" असे असते. आताचे सर्व काम "कालच व्हायला पाहिजे (गेट इट डन यस्टरडे)" अश्या प्रकारचे आहे. त्यामुळे अधिसूचना पाठवणे आणि तिच्या कारवाईची तयारी हे दोन्ही एकाच वेळी सुरू होतात. त्या अधिसूचनेतली माहिती आपल्याला माध्यमांतर्फे लगेच मिळते आणि आरबीआय कडून संगणकीय प्रकाराने बँकेला काही सेकंदात मिळते. पण, जमिनीवरच्या तयारीला (पैसे बँकेपर्यंत पोचायला) जास्त वेळ लागतो/लागणारच. यात एखाद्या दिवसाचा फरक पडतो. शिवाय सद्याचा मोठा बॅकलॉग आताशी काहीसा ताब्यात येऊ लागला आहे. तो बहुतांश ताब्यात आला आणि एटीएम कॅलिब्रेशनसकट सर्व यंत्रणा सुरळीत झाल्या की हा त्रास संपेल असे वाटते. त्यानंतरही खात्यातून मोठी नकद रक्कम काढण्याच्या सीमेत ३१ डिसेंबरपर्यंत खूप मोठा फरक पडेल असे मला वाटत नाही. कारण मोठी नकद उपलब्ध झाल्यास (सद्य "कर+२००%दंडापेक्षा" कमी पण तरीही अत्यंत आकर्षक असणारे कमिशन देवून) मोठ्या प्रमाणात काळा पैसा नव्या नोटांत बदलणे सहज शक्य होईल. आरबीआयसकट सर्व ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारणे बंद झाल्यावरच (पक्षी : उरलेल्या सर्व जुन्या नोटा कायमच्या बाद होऊन कितीही लालूच दाखवली तरी त्या नवीन नोटांच्या बदल्या घेण्यात अर्थ उरणार नाही तेव्हाच) खात्यातून नकद काढण्यावरची सर्व बंधने काढली जातील, असा माझा अंदाज आहे. याशिवाय, लोकांना थोडी तोशीस देवून का होईना पण नकद व्यवहारापासून बँक व्यवहाराकडे (चेक, डीडी, कार्ड्स, इ-ट्रान्सफर, इ) वळविणे, हा उप-उद्येश त्यामागे आहेच.

पाचशे आणि हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा अर्थव्यवस्थेची वाढ खोळंबण्याचा फटका बसेल, परंतु तो चालू तिमाहीपुरताच असेल. त्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर नवीन झळाळी मिळवेल, असा आशावाद उद्योग व वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. सरकारने चलनात ८६ टक्के वाटा असलेल्या नोटा रद्द केला आणि त्या बदल्यात नव्या नोटांच्या उपलब्धतेचाही अभाव असल्याने घाऊक बाजार आणि बडय़ा प्रकल्पांच्या कामकाजावर परिणाम स्वाभाविकपणे दिसला आहे, याची कबुली मात्र सीतारामन यांना द्यावी लागली. देशभरात सर्वत्र व्यापारी व लघुउद्योजकांना रोखीची गंभीर चणचण भासत असून, कच्चा माल खरेदी ते कामगारांचे वेतन त्यांना या स्थितीत देता आलेले नाही. सरकार तसेच रिझव्‍‌र्ह बँकेचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. पण या सज्जतेनंतरही चालू तिमाहीत अर्थवृद्धीची घडी विस्कटणारा परिणाम दिसू शकेल, असे त्या म्हणाल्या. मात्र हा परिणाम त्यापुढेही सुरू राहील असे वाटत नाही. त्यानंतर अर्थव्यवस्था सामान्य स्तरावर येईल, इतकेच नाही तर नवीन तेज तिने मिळविलेले दिसेल, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. या मंथनातून नव्याने पुढे येणाऱ्या व्यवस्थेत अधिकाधिक व्यवहार हे धनादेश, क्रेडिट कार्ड आणि ई-पाकिटे या सारख्या औपचारिक पर्यायांतून सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुरुवारी आंतरराष्ट्रीय पतसंस्था मूडीज्ने, सरकारच्या निश्चलनीकरण प्रक्रियेतून अर्थवृद्धीला बाधा पोहोचण्याचे भाकीत वर्तविताना, नजीकच्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेच्या विकासदर कमकुवत होण्याचा इशारा दिला आहे. तथापि, दीर्घावधीत ते कर महसुलात वाढीला चालना व परिणामी सरकारच्या वित्तीय स्थितीत सुदृढता येईल, असे तिने मत व्यक्त केले आहे. जीडीपीमध्ये २-३ टक्क्यांची घट अशक्य! सीतारामन यांनी ‘इंडियन एक्स्पेस’ला दिलेल्या मुलाखतीत, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निश्चलनीकरणातून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन – जीडीपीमध्ये २ ते ३ टक्के घट होण्याचा दावा पूर्णपणे नामंजूर केला. अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर काही विपरीत परिणाम झालाच तर तो या तिमाहीपुरताच असेल. दोन-तीन टक्क्यांची घट होईल म्हणणे हे अशक्यच आहे. भविष्य दाखविणाऱ्या जादूई गोळा पाहिला तरच या संबंधाने निश्चित प्रकारचा अंदाज करता येईल. -------------// निर्मलाजींनी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याबद्द्ल 'आशावाद' व्यक्त केलाय, पण 2 टक्केके घटीचे भाकीत मात्र मॅजिकबॉल प्रोफेसी वाटते. असो, अब वक्त ही बतायेगा.

In reply to by संदीप डांगे

अब वक्त ही बतायेगा. १००% पण तोपर्यंत, "ज्यांनी गेली काही दशके जनतेला बर्‍याच शेंड्या लावल्या आहेत आणि आताही लावतच आहेत*" त्यांच्यापेक्षा "जमिनीवर देशासाठी काहीतरी चांगले काम करून दाखवले आहे व आता या कारवाईच्या रुपाने प्रयत्न करत आहेत" त्यांच्यावर विश्वास ठेवण्याकडे, व्यक्तिगतरित्या माझा कल राहील. ============ * : ताजा संदर्भ : नोटाबंदीचा सर्वाधिक त्रास मुस्लिमांना सहन करावा लागतोय: कपिल सिब्बल या बातमीच्या मजकूरात, "राजकारणी लोकांची दिशाभूल कशी करतात" याचे उत्तम उदाहरण आहे... विशेषतः नोटाबंदी आणि अतिरेकी यासंबंधीचे विचार.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या राजकारणी लोकांना फाट्यावर मारलंय जनतेने, अजून पीळ गेला नाही. यांचा निषेध करावा तेवढा कमीच, लोकांना होणारा त्रास हा धर्माधारीत असतो पण दहशतवाद मात्र धर्माधारीत नाही हे विचार ठेवणारे काय लायकीचे आहेत हे जनता ओळखून आहे! सबब चिंता नसावी. :)

काही लोक अगदी जगबुडी झाल्यासारखे का लिहित आहेत? या आधी देखील चेक, ऑनलाईन पेमेंट होतेच ना? काही लोकांना जो त्रास होत आहे, त्यात ते का बदल करु शकत नाही आहेत? साधे उदाहरण म्हणजे, बजाज कर्ज योजना जवळपास सर्व मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स दुकानात तर गेली अनेक वर्ष उपल्ब्ध आहे कित्येक अडाणी लोकांनी त्याचा उपयोग करुन घरगुती उपकरणे घेतली आहेत त्यांना आता थोडी पाऊले पुढे जाण्यास काय हरकत असावी? हा, अत्यंत गरिब समाजाला त्रास होत आहे हे मान्य आहे, पण आपण एक नागरिक म्हणून त्यांची मदत करु शकतो ना? ते आपण न करता फक्त निगेटिव्ह सांगून त्यांना अजून त्रासात का टाकत आहात? उलट आपण लोकांना सांगू शकतो जेव्हढी गरज आहे तेवढीच रक्कम काढा ज्यामुळे तुमचे १०-१२ दिवस आरामात जातील. माझ्याकडे कामाला येण्यार्‍या स्त्रीने खात्यातून १०,००० रु. काढून आणले ते पण वेगवेगळे प्लान करुन ? तीला जेव्हा विचारले तर ती म्हणाली पुढे पैसे काढताच आले नाही तर? तर तीला समजवले. ह्या गोष्टी काही मोठ्या नाही आहेत, थोडा वेळ द्यावा लागतो एवढेच ना?

वाचकहो, लोकांना चलनरहितीचा त्रास होतोय हे नक्की. पण लोकं तो सोसायला तयार आहेत. असं निदान दिसतंय तरी. कोणी मोर्चाबिर्चा काढंत नाहीये, किंवा मोदींना शिव्याशापही देत नाहीये. अर्थात काही असमाधानी जंतू सर्वत्र सापडतातंच. पण त्यांच्या आक्रोशात दम नाही. मोदींनी चलनबंदी लोकांच्या हितासाठीच केली आहे अशी सार्वत्रिक भावना चालू घडीला तरी आहे. पुढचं पुढे. आ.न., -गा.पै.

संदीप डांगे,
~ म्हणजे तपस करून नेमके चोर पकडण्यापेक्षा सर्व नागरिकांना आपण चोर नाही हे पोलिसात जाऊन सिद्ध करून सर्टिफिकेट घ्यावे ह्या योजनेला आपला पाठिंबा आहे तर!
विमानात चढणाऱ्या सर्वच्या सर्व प्रवाशांना सिद्ध करावं लागतं की ते आतंकवादी नाहीत म्हणून! तिथे सदैव निरपराधीत्व सिद्ध करावं लागतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ओके सर, विमानात चढणार्‍यांनाच ना? की ज्या शहरात विमानतळ आहे त्या शहरातल्या सर्व नागरिकांना?

In reply to by गामा पैलवान

तसंच, राजकारणात प्रवेश करणार्‍या, निवडून आलेल्या असणार्‍या सर्व राजकारण्यांना सिद्ध करु देत की ते भ्रष्टाचारी नाहीत म्हणून ... माझा तर पाठिंबाच आहे बुवा!

In reply to by अनुप ढेरे

काही झाले तरी आपण टी एन शेषन सारखा मूर्खपणा करायचा नाही असे त्यानी ठरवले असावे. सबब त्यांची काही मजबूरी ते पाळत होतेच .!

In reply to by अनुप ढेरे

१९९१ पूर्वी ते काय करीत होते याची कल्पना नाही. १९९१-९६ या काळात नरसिंहरावांनी त्यांच्या करवी अर्थव्यवस्थेत बरेच बदल घडवून आणले. २००४-२०१४ या काळात ते एका घराण्याची निष्ठापूर्वक सेवा करीत होते व भ्रष्टाचार्‍यांना मोकळे रान देऊन डोळे मिटून स्वस्थ बसून होते.. त्यामुळे खाते नसलेल्या लोकांची बँकेत खाती उघडण्याच्या कामासाठी त्यांच्याकडे फारसा वेळ नव्हता हे नक्की.

अनुप ढेरे, लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. लेख वाचला. त्यावरून दिसतं की १९८५ ते १९९० च्या कालखंडात पैसा वाढला पण त्या दराने उत्पादन वाढलं नव्हतं. यामुळे असमतोल निर्माण झाला आणि तो हाताळण्यात राजीव गांधी कमी पडले. नेमकी अशीच परिस्थिती २०१४ नंतर उत्पन्न झालेली दिसतेय. रू ५०० आनि रू १००० च्या नोटांचं चलनवलन (क्याश सर्क्युलेशन) गेल्या दोनेक वर्षांत कमालीचं वाढलं होतं. मात्र १९९० प्रमाणे ही रिझर्व्ह बँकेने छापलेली अधिकृत रोकड नसून हिच्यात मोठ्या प्रमाणावर काळी रोकड समाविष्ट होती. एकंदरीत भारतीय शासनास १९९१ प्रमाणे अडचणीत आणण्याचा डाव असावा. मोदींनी बरोब्बर मर्माघात करून उधळून लावला. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मात्र १९९० प्रमाणे ही रिझर्व्ह बँकेने छापलेली अधिकृत रोकड नसून हिच्यात मोठ्या प्रमाणावर काळी रोकड समाविष्ट होती. -- सर्व नोटा (अस्सल असतील तर) अधिकृतच असतात. 'रोकड' काळी किंवा पांढरी नसते. व्यवहार काळे-पांढरे असतात. तुमचं विधान जरा गडबड वाटतंय.

संदीप डांगे,
सबब न्यायालयाला त्यांच्या कामात गती आणता येईल अशी व्यवस्था करणे सरकारची नियत असेल तर शक्य आहे की नाही एवढं आधी सांगा,
तुमचं हे विधान तत्त्वत: मान्य. पण काही न्यायाधीशही भ्रष्ट आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या कामात गती आणण्यासाठी त्यांची साफसफाई करायला लागेल. हे कामही सरकारनेच करायला हवंय. न्यायालयाची सफाई ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामात गती आणण्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी हे काम सावकाशंच होणार. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

न्यायाधीश आणि सरकार सोडून वकील हा एक महत्वाचा घटक आहे. सर्वसाधारणपणे वकिलाची फी ही तारखेवर असते. त्यामुळे शक्य तेवढी केस चालू राहावी यासाठी वकीलही प्रयत्न करतात. हे खालच्या कोर्टांमध्ये तर सर्रास चालतं. वरील कोर्टांमध्ये पण ज्याची बाजू लंगडी असते तो शक्य तेवढा निर्णय पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतो. त्यात साक्षीदार फिरणं, वेळेवर हजर न राहणं या गोष्टी तर असतातच. त्यामुळे यात नुसतं सरकारने प्रत्येक केस X महिन्यात सोडवावी हे ठरवून फार काही साध्य होईल असं वाटत नाही. त्यातून जरी हा नियम केला तरी आधीच्या केसेसचं काय? तो बॅकलॉग काढायला पण खूप वेळ जाईल. माझ्यामते सरकारने बऱ्याच जुन्या आणि त्रासदायक कलमांना काढून सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यासाठी न्यायाधीश आणि वकील या दोघांचे तेवढेच सहकार्य पाहिजे.

सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यात कॉलेजियम म्हणजेच न्यायाधीश नेमण्याच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू आहे. तेव्हा सरकार न्यायव्यवस्थेला त्यांचे काम सुरळीतपणे करू देईल असे वाटत नाही. खुद्द लोकपाल नेमण्यावरही सरकारने काहीही ठोस केलेले नाही. सध्या संसदेत पंतप्रधान चर्चेत भाग घेत नाहीत अथवा उत्तरेही देत नाहीत. तेव्हा पंतप्रधानांना संसद, न्यायपालिका आणि लोकपाल यांसारख्या संस्थांमध्ये होणारा संभावित विरोध टाळण्यासाठी लोकप्रियतेचा फायदा घेऊन जनमत आजमावणे जास्त सोयीस्कर वाटत असावे असे दिसत आहे.

संदीप डांगे,
ओके सर, विमानात चढणार्‍यांनाच ना? की ज्या शहरात विमानतळ आहे त्या शहरातल्या सर्व नागरिकांना?
हो. फक्त विमानात चढणाऱ्यांनाच. उगीच असंबद्ध प्रश्न विचारून फाटे फोडू नका. आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, विमानफाटा समजावून सांगतो. विमानात चढणाऱ्यांनी जर तपासणी करायचं नाकारलं तर विमानात चढू देत नाहीत. मात्र त्यांनी आपापला वेगळा मार्ग (रस्ता, जलमार्ग, इत्यादि) चोखाळायला हरकत नाही. त्याचप्रमाणे ज्यांना पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांत व्यवहार करायचा आहे त्यांनी आपापला वेगळा मार्ग शोधावा. आ.न., -गा.पै.

मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये १.१ लाख कोटी मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामधून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये दोन हजार रुयांच्या नोटांचे एकूण मुल्य ५.४ लाख कोटींपर्यंत कमी झाले आहे. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या ६.५ लाख कोटी रुपये मुल्यांच्या नोटा चलनात होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १८ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे. दोन हजारच्या नोट्यांच्या उलट ५०० रुपयांच्या नोटा या ४ लाख कोटींनी वाढल्याचे दिसत आहे. २०१८-२९ मध्ये १०.७ लाख कोटींच्या ५०० च्या नोटा चलनात असताना २०१९-२० साली हे मूल्य १४.७ लाख कोटींपर्यंत पोहचले. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली नव्हती असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे. तसचे बीएरबीएनएमपीएलने (भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड) आणि एसपीएमसीआयएलने (सिक्युरिटी प्रिटींग अॅण्ड मिटिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया) कोणताही अतिरिक्त पुरवठा केलेला नाही असंही या अहवालात म्हटलं आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/more-than-rs-1-lakh-crore-wor…

https://www.loksatta.com/desh-videsh-news/demonetised-notes-of-rs-4-cro… नोटबंदीमुळे कालबाह्य झालेल्या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बाळगणाऱ्या दोघांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. गोध्रा भागात ही कारवाई करण्यात आलेली असून, अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींकडून ४ कोटी ७६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली. 2020 मध्ये गुजरातेत जुन्या नोटा सापडल्या 4 दिन तो गुजारो गुजरात मे

In reply to by Gk

गुजरात वर लय लक्ष मोगाभाऊ तुमचे.. आणि गुजराती माणसाबद्दल तर लय म्हणजे लय च प्रेम. :) :) असो. पण नोटबंदी हा निर्णय चांगला होता हे माझे मत अजूनही आहे.. पण तरीही तो फ्लॉप झाला आणि चुकिचा होता किंबहुना चुकीच्या पद्धतीने राबवला गेला या तुमच्या मताशी देखील मी सहमतच आहे. सुरवातीला काळा पैसा, आतंकवाद, बनावट चलन अश्या बड्या बड्या बाता मरून झाल्यावर अंगाशी येतंय असं दिसायला लागले.. मग डिजिटल इंडिया चा प्रसार सुरु झाला.. नंतर अमुक अमुक लाख. कंपन्या बंद पडल्या..... हे म्हणायला लागले.. आता कुठेही नोटबंदीचा पुसटसा उल्लेख देखील केला जात नाही यातच त्यांच्या योजनेचा फोलपणा दिसून येतो.

In reply to by बाप्पू

नोटांबंदी म्हणजे कबिराचा दोहा झाला. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय। नोटबंदी करके सारे भारत का , काँग्रेस का काला पैसा ढुंढ रहे थे , लेकीन सबसे जादा काळा पैसा गुजरात सेही आया था

In reply to by Gk

नोटांबंदी म्हणजे कबिराचा दोहा झाला. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय। काळा पैसा जो देखन मैं चला, काळा पैसा न मिलिया कोय, जो गुजरात खोजा आपना, मुझसे काळा न कोय।

In reply to by Gk

तुम्हाला गुजरातची कावीळ झाली आहे का? जिथे पाहावं तेंव्हा गुजरात बद्दल खडे फोडताय? श्री मोदींनी गुजरात सोडून ६ वर्षे होऊन गेली.

In reply to by Gk

माणूस आणि प्रदेश यात गल्लत करू नये एवढे मूलभूत विचार आपण करत नाही? हिटलर जग सोडून गेल्याला ६५ वर्षे झाली. म्हणून त्यावरून कुणी "जर्मनी देशा" बद्दल उणे दुणे काढत बसत नाही. पराकोटीचा द्वेष असला कि विचारसरणी दूषित होते याचे हे उत्तम उदाहरण आहे

In reply to by सुबोध खरे

सहमत.. एक गुजराती माणूस जितका गुजरात वर लक्ष देत नसेल तितके खांग्रेसी आणि मोगाभाऊ देतायेत.. गुजरात म्हणजे भारतातील एक राज्य नसून ते मोदींचें प्रायव्हेट राज्य आहे कि काय असे वाटू लागलेय यांच्यामुळे.. याचं न्यायाने मग रायबरेली वर लक्ष दया कि ओ मोगाभाऊ.. हां??

In reply to by बाप्पू

गुजरात देखील भारताचाच हिस्सा आहे , कुणीही काहीही कितीही वेळा लिहू शकतो तुम्हीही 370 वर लिहा, बिहारचा माणूस मुंबईवर लिहिल, लोकशाहीने स्वातंत्र्य दिले आहे, लिहायचा अधिकार दडपून तुम्हाला देश पुन्हा पारतंत्र्यात घालायचा आहे का ?

In reply to by बाप्पू

मला गुजरात नावडण्यासारखे काही नाही उलट , आमचे एच आय व्ही चे 14 दिवसाचे ट्रेनिंग अहमदाबादला झाले आहे आणि अजून एक 30 दिवसाचा कोर्सही तिथेच झाला आहे दुसऱ्या कोणत्याच राज्यात मी इतके फिरलेलो नाही

In reply to by सुबोध खरे

तुम्हालाच काहीतरी प्रॉब्लेम आहे वायनाडला पूर आला , लाखनौला पेपर फुटला, मुंबईत सुशांत मेला, दिल्लीला केजरीवाल जिंकला लोक काही न काही लिहितच असतात गुजरातेत काळ्या नोटा सापडल्या म्हणून कुणी लिहिले तर तुमची टोळी माझ्या मागे का लागली समजत नाही

In reply to by Gk

तुम्ही गुजरात मध्येच काही सापडले कि लगेच इथे टाकता एवढे न कळण्या एवढे मिपाकर मूर्ख नाहीत.

In reply to by सुबोध खरे

मोदींवर गुजराथी असा शिक्का मारला कि मग मराठी mate मिळवणे सोपे हा भ्रम आणि इतर काही मुद्दा उरला नाही कि मोदी शहा ना "गुजराथी बनिये" ठरवून ते देश खायला उठलेत असा कांगावा करायला हि लोकं मोकळे .. उद्या मोदी आणि शहा जर ब्राहमण असते तर मग " मनुवाद आला, पगडी नको पागोटे वैगरे आरडाओरड केली असती याच लोकांनी मूळ गळू का होण्याचा आणि ठसठसण्याच कारण hech कि "भाजप सत्तेत येतंच कसं?" मोदींच्या समर्थकांनां सुद्धा "मोदीही चुकू शकतील" हे मान्य आहे पण या सर्व "उदारमतवाद्यांना" मोदी आणि भाजप प्रतेय्क बाबतीत चुकतंच या एकाच गोष्टीवर विश्वास आहे मग त्यांनी किती हि चांगलं काम केलं तरी

In reply to by चौकस२१२

आमचे प्रतिसाद वाचून कुणी कुणाlaa मत देत नाही. भाजपा , सेना, काँग्रेस व रावा ह्यांना महाराष्ट्रात महाराष्ट्रातील लोकांनी मते दिली आहेत , त्यामुळे ह्यात गुजराती , मराठी असेही काही नाही

केंद्र सरकारनं चार वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. चलनात असलेल्या बनावट नोटांपासून मुक्ती हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी केंद्र सरकारनं ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होता. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, गेल्या वर्षी जितक्या बनावट नोटा पकडण्यात आल्या त्यापैकी सर्वाधिक नोटा या २ हजार रूपयांच्या असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) वार्षिक अहलावातून ही माहिती मिळाली आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-most-fake-currency-in-the…

In reply to by Gk

यात धक्कादायक काय आहे? चोर काही मूर्ख नसतात. खोटी नोट तयार करायची तर ते १० रुपयाची कशाला करतील? २ हजारांचीच करणार. एवढे सुद्धा समजू नये का तुम्हाला?