Skip to main content

शोध

लेखक Prajakta Sarwade यांनी शुक्रवार, 11/09/2020 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
माहीत नाही कोणत्या देशी येऊन मी थांबले, ना ओळख या पाऊल वाटांशी, ना इथल्या संकेतस्थळाशी पण पाऊसात माञ ओळखीचा गंध परिमळे ना सोबती कुणी माझ्या, ना मी कोणाची सोबती पुसत सारया दिशांना, कापत अंतरातले अंतर स्वतः च्या दिशेने स्वतः ला दिशा देत चालले गाफिल राहिली माझ्यातली कविता माझ्यामध्येच, अन माझेच शब्द आता मला ओळखेनासे झाले डोहातल्या चांदण्यापर्यत मौन माझे पोहचले सारे शब्द अलगद तुझ्या ओंजळीत येऊन ओसरले -प्राजक्ता ( मी इथे नवीन आहे, आणि ही पाहिलीच पोस्ट आहे , काही चुकलं तर माफ करा)
लेखनविषय:

वाचने 2290
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

माहीत नाही कोणत्या देशी येऊन मी थांबले, ना ओळख या पाऊल वाटांशी, ना इथल्या संकेतस्थळाशी
मिपावर हार्दिक स्वागत. लिहित रहाल तर गाढ ओळख होईल मिपाशी. रचना आवडली. पुढील रचनेच्या प्रतिक्षेत.

In reply to by Prajakta Sarwade

व्वा, छनच ! +१ तुम्हाला आवडलेल्या / न आवडलेल्या धाग्यावर देखील आवर्जून प्रतिसाद देत चला !